24-06-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“पवित्रता रुपी गुणांना धारण करून डायरेक्टरच्या डायरेक्शनवर चालत रहा तर देवताई किंगडम मध्ये (दैवी साम्राज्यामध्ये) याल’’

(प्रातः क्लासमध्ये ऐकविण्यासाठी जगदंबा मम्माची मधुर महावाक्ये)

ओम शांती।
या दुनियेला नाटक देखील म्हणतात, ड्रामा म्हणा, नाटक म्हणा, खेळ म्हणा गोष्ट एकच आहे. नाटक जे असते त्यामध्ये कथा एकच असते. आणि मध्येच खूप बायप्लॉट्स (उपकथानक) दाखवतात परंतु स्टोरी एकच असते. अगदी तसाच हा बेहदचा वर्ल्ड ड्रामा आहे, याला नाटक देखील म्हटले जाते, ज्यामध्ये आपण सर्व ॲक्टर्स आहोत. आता आपण ॲक्टर्स आहोत तर ॲक्टरला नाटकाविषयी पूर्ण माहीती असायला हवी की कोणत्या स्टोरीवर हे सुरू होते, आपला हा पार्ट कुठून सुरू झाला आणि कुठे पूर्ण होतो, मग त्यामध्ये वेळो-वेळी कोण-कोणत्या ॲक्टर्सचा कसा-कसा पार्ट आहे आणि त्याचे डायरेक्टर, क्रियेटर कोण आहेत आणि या नाटकामध्ये हीरो-हीरोइनचा पार्ट कोणाचा आहे, या सर्व गोष्टीचे नॉलेज असायला हवे. केवळ नाटक आहे, असे म्हणून काम होणार नाही. नाटक आहे तर नाटकातील आपण ॲक्टर्स देखील आहोत. जर कोणी ड्रामामध्ये ॲक्टर आहे आणि आपण त्यांना विचारले की याची स्टोरी काय आहे, हा कुठून सुरू होतो, कुठे पूर्ण होतो! आणि जर तो म्हणाला कि, मला माहित नाही तर याला काय म्हटले जाईल? म्हणतील याला एवढे सुद्धा माहित नाही आणि म्हणतो - मी ॲक्टर आहे! ॲक्टरला तर सर्व गोष्टींची माहिती असायला हवी ना. नाटक सुरू आहे तर त्याचा शेवट देखील जरूर असणार. असे नाही सुरू झाले आहे तर चालतच राहील. तर या सर्व गोष्टींना समजून घ्यायचे आहे. या बेहदच्या नाटकाचे जे रचयिता आहेत ते जाणतात की कोणत्या प्रकारे या नाटकाची सुरुवात झाली, यामध्ये मुख्य ॲक्टर्स कोण आहेत आणि सर्व ॲक्टर्समध्ये हिरो आणि हिरोईनचा पार्ट कोणाचा आहे, या सर्व गोष्टी बाबा समजावून सांगत आहेत.

हे सर्व नॉलेज जे रोज क्लासमध्ये येतात आणि ऐकतात त्यांना समजते, त्यांना माहित आहे की याचा पहिला डायरेक्टर आणि क्रिएटर कोण आहे? क्रियेटर म्हणणार ‘सुप्रीम सोल’ला (परमपिता परमात्म्याला). परंतु ते देखील ॲक्टर आहेत, त्यांची ॲक्टिंग कोणती आहे? डायरेक्टरची. ते एकदाच येऊन ॲक्टर बनतात. आता डायरेक्टर बनून ॲक्ट करत आहेत. ते म्हणतात - ‘या नाटकाची सुरुवात मी करतो’. ती कशी? जी शुद्ध सतयुगी दुनिया आहे, ज्याला नवीन दुनिया म्हणतात, ती नवीन दुनिया मी क्रियेट करतो. आता तुम्ही सर्व जेकाही पवित्रतेला धारण करून डायरेक्टरच्या डायरेक्शनवर चालत आहात, ते सर्व ॲक्टर्स आता प्युरिफाइड (शुद्ध) बनत आहात, मग याच ॲक्टर्सद्वारे अनेक जन्मांचे चक्र चालू राहणार आहे. हे बाबाच समजावून सांगतात की आता पवित्र झालेले मनुष्य, दुसऱ्या जन्मामध्ये देवताई राज्यामध्ये जातील. ते किंगडम (साम्राज्य) दोन युग सूर्यवंशी, चंद्रवंशी रूपामध्ये चालते, मग जेव्हा तो सूर्यवंशी, चंद्रवंशी ॲक्टर्सचा पार्ट पूर्ण होतो तेव्हा मग थोडी अधोगती होते अथवा वाम मार्गामध्ये जातात. मग इतर धर्मांचा टर्न येतो इब्राहीम, बुद्ध, मग ख्रिश्चन हे सर्व धर्म स्थापक नंबरवार येऊन आपला-आपला धर्म स्थापन करतात.

तर पहा नाटकाची कथा कुठून सुरू झाली, कुठे संपते. त्या दरम्यान हे इतर बायप्लॉट्स (उपकथा) कशा चालतात, हा सर्व वृत्तांत बाबा बसून समजावून सांगत आहेत. आता हे नाटक पूर्ण होणार आहे, ते (दुनियेतील) नाटक तर ३ तासामध्ये संपते, याला ५ हजार वर्षे लागतात. आता त्यातील फार थोडी वर्षे बाकी आहेत; बस, आता त्याची तयारी चालू आहे. आता हे नाटक पूर्ण होऊन मग पुन्हा रिपीट होईल. तर हा सर्व वृत्तांत बुद्धीमध्ये असला पाहिजे, यालाच ज्ञान म्हटले जाते. आता पहा बाबा येऊन नवीन भारत, नवीन दुनिया बनवत आहेत. भारत जेव्हा नवीन होता तेव्हा एवढी मोठी दुनिया नव्हती. आज जुना भारत आहे तर दुनिया देखील जुनी आहे. बाबा येऊन भारत जो अविनाशी खंड आहे, आपला प्राचीन देश आहे. आता देश म्हणतात कारण दुसऱ्या देशांसोबत हा देखील जसा एक तुकडा झाला आहे. परंतु खरे पाहता संपूर्ण विश्वावर संपूर्ण पृथ्वीवर एका भारताचेच राज्य होते, ज्याला म्हटले जात होते - ‘प्राचीन भारत’. त्यावेळच्या भारताचे गायन आहे - ‘सोन्याची चिडिया’. संपूर्ण पृथ्वीवर केवळ भारताचाच कंट्रोल होता, एक राज्य होते, एक धर्म होता. त्यावेळी पूर्ण सुख होते, ते आता कुठे आहे! यासाठी बाबा म्हणतात याचे डिस्ट्रक्शन (विनाश) करून पुन्हा एक राज्य, एक धर्म आणि तोच प्राचीन नवीन भारत, नवीन दुनिया बनवतो. समजले. त्या दुनियेमध्ये कोणते दुःख नाही, कोणता रोग नाही, कधी कोणाचा अकाली मृत्यू होत नाही. तर असे जीवन प्राप्त करण्यासाठी पुरुषार्थ करा. फुकटचे थोडेच मिळणार आहे. काही तरी मेहनत करावी लागेल. बीज पेराल तर प्राप्त कराल. जर पेरणारच नाही तर प्राप्त कसे करणार? तर हे कर्मक्षेत्र आहे, या क्षेत्रामध्ये कर्मांद्वारे पेरायचे आहे. जे कर्म आपण पेरतो तेच फळ प्राप्त करतो. बाबा कर्मांचे बीज पेरायला शिकवत आहेत. ज्या प्रमाणे शेती करायला शिकवतात ना, कसे बीज पेरायचे, कशी त्याची संभाळ करायची, त्याचे देखील ट्रेनिंग देतात. तर बाबा येऊन आपल्याला कर्माच्या शेतीसाठी, कर्मांना कसे पेरावे, त्याचे ट्रेनिंग देत आहेत की आपल्या कर्मांना श्रेष्ठ बनवा, चांगले बीज टाका तर फळ चांगले मिळेल. जेव्हा कर्म चांगले असेल तर मग जे पेराल त्याचे फळ चांगले मिळेल. जर कर्म रूपी बीजामध्ये ताकद नसेल, वाईट कर्म पेराल तर फळ काय मिळणार? हे जे खात आहात आणि मग रडत आहात. जे खाता त्यामध्येच रडत आहात, दुःख आणि अशांती आहे. काही ना काही रोग इत्यादी कटकट होतच राहते, सर्व गोष्टी मनुष्याला दुःखी करतात ना; म्हणून बाबा म्हणतात - आता तुमच्या कर्मांना मी उच्च क्वालिटीचे बनवतो, ज्या प्रमाणे बीज देखील ज्या क्वालिटीचे असेल तर त्याच क्वालिटीचे पेराल, तर त्याचे फळ चांगले निघेल. जर बीज चांगल्या क्वालिटीचे नसेल तर मग चांगल्या क्वालिटीचे फळ मिळणार नाही. तर आपल्या कर्मांची देखील क्वालिटी चांगली पाहिजे ना. तर आता बाबा आमच्या कर्म रूपी बीजाला चांगल्या क्वालिटीचे बनवत आहेत. तर ते श्रेष्ठ क्वालिटीचे बीज जर पेराल तर श्रेष्ठ फळ मिळेल. तर आपल्या कर्मांचे जे बीज आहे, ते चांगले बनवा आणि मग चांगले पेरायला शिका. तर आता या सर्व गोष्टींना समजून घेऊन आपला पुरुषार्थ करा.

अच्छा, आता दोन मिनिटे सायलेन्स. सायलेन्सचा अर्थ - ‘आई एम सोल’ (मी आत्मा आहे), आधी सायलेन्स मग टॉकीमध्ये (वाणीमध्ये) येतात. आता बाबा म्हणतात पुन्हा सायलेन्स वर्ल्डमध्ये चला तर सायलेन्स, शांती आपला स्वधर्म आहे. त्या सायलेन्समध्ये येण्यासाठी सांगत आहेत - या देहाची आणि देहा सहित देहाच्या संबंधांची आता अटॅचमेंट सोडा, त्यापासून डिटॅच व्हा. सन ऑफ सुप्रीम सोल (परम आत्म्याच्या मुलांनो), आता माझी आठवण करा आणि माझ्या धाममध्ये या. तर आता जाण्याचे ध्यान ठेवा, आता येण्याचा विचार करू नका. अंत मती सो गती. आता कोणतीही आसक्ती नको. आता तर शरीराची देखील आसक्ती सोडा. समजले. अशी आपली धारणा बनवायची आहे. अच्छा, आता सायलेन्समधे बसा. चालता-फिरता देखील सायलेन्स, बोलताना देखील सायलेन्स. बोलताना सायलेन्स कसा असतो? माहीत आहे? बोलत असताना आपला बुद्धीयोग आपल्या त्याच, ‘मी आत्मा आहे, आधी पवित्र आत्मा किंवा शांत स्वरूप आत्मा आहे’ हे लक्षात ठेवा. बोलताना आपल्यामध्ये हे नॉलेज असायला हवे की, मी आत्मा, या ऑर्गन्स द्वारा बोलते. तर ही आपली प्रॅक्टिस असली पाहिजे, ज्या प्रमाणे आपण याचा आधार घेऊन बोलतो. चला आता डोळ्यांचा आधार घेतो, पाहतो. ज्याची गरज आहे त्याचा आधार घेऊन कार्य करा. असे आधार घेऊन कार्य कराल तर खूप खुशी राहील, मग कोणते वाईट कर्म देखील होणार नाही. अच्छा.

अशा बापदादा आणि मातेची गोड-गोड खूप चांगले सदैव सायलेन्सची अनुभूती करणाऱ्या मुलांप्रती प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. अच्छा.

संदेशीच्या तनाद्वारे ऑलमाइटी पित्याची उच्चारलेली महावाक्ये (मातेश्वरीजीं प्रति)

१) हे शिरोमणी राधे बेटी, तू प्रत्येक दिवस मज समान दिव्य कार्यामध्ये तत्पर आहेस अर्थात वैष्णव शुद्ध स्वरूप आहेस, शुद्ध सेवा करत आहेस त्यामुळे साक्षात माझे स्वरूप आहेस. जी मुले आपल्या पित्याचे फुट स्टेप घेत नाहीत (पावलावर पाऊल टाकत नाहीत) त्यांच्या पासून मी बिल्कुल दूर आहे कारण संतान आहे तर मग अवश्य पित्या समान असली पाहिजे. हा कायदा आता स्थापन होतो जो सतयुग,-त्रेता पर्यंत चालतो, तिथे जसे पिता तसा बेटा. परंतु द्वापर-कलियुगामध्ये जसा पिता तसा बेटा असत नाही. आता मुलाला पित्या समान बनण्यासाठी परिश्रम करावे लागतात, परंतु तिथे तर नॅचरल असा कायदा बनलेला आहे जसा पिता तसा बेटा. जो अनादि कायदा या संगमाच्या वेळी ईश्वर पिता प्रत्यक्ष होऊन स्थापन करतात.

२) मधुर माळ्याची मधुर गोड दिव्य पुरुषार्थी बेटी, आता तुला खूप रमणीक स्वीटनेस बनायचे आहे आणि बनवायचे आहे. आता विश्वाच्या साम्राज्याची चावी सेकंदामध्ये प्राप्त करणे आणि करवून घेणे तुझ्या हातामध्ये आहे. पहा, ऑलमाइटी जे प्रत्येक जीव प्राण्याचा मालक आहेत ते जेव्हा प्रॅक्टिकलमध्ये या कर्मक्षेत्रावर आले आहेत तेव्हा संपूर्ण सृष्टी हॅप्पी हाऊस बनते. यावेळी त्याच जीव प्राण्यांचा मालक अव्यक्त रीतीने सृष्टीला चालवत आहेत. परंतु जेव्हा ते प्रत्यक्ष रूपामध्ये देहधारी बनून सृष्टी मालकाच्या रूपामध्ये कर्मक्षेत्रावर येतात तेव्हा सतयुग, त्रेताच्या वेळी सर्व जीव प्राणी सुखी बनतात. तिथे सत्याचा दरबार उघडा असतो. ज्यांनी ईश्वरीय सुख प्राप्त करण्याअर्थ पुरुषार्थ केला आहे त्यांना तिथे कायमसाठी सुख प्राप्त होते. यावेळी सर्वच जीव प्राण्यांना सुखाचे दान मिळत नाही, पुरुषार्थच प्रारब्धाला खेचून आणतो. ज्यांचा ईश्वराशी योग आहे त्यांना ईश्वरा द्वारे संपूर्ण सुखाचे दान मिळते.

३) ओहो! तू तीच शक्ती आहेस जीने आपल्या ईश्वरीय शक्तीचा रंग दाखवून या आसुरी दुनियेचा विनाश करून दैवी दुनियेची स्थापना करत आहेस, आणि मागाहून सर्व शक्तींची महिमा होते. आता ती शक्ती तुझ्यामध्ये भरत आहे. तू सदैव तुझ्या ईश्वरीय बळ आणि आत्मिक नशेच्या स्थितीमध्ये स्थित रहा तर सदैव अपार खुशी राहील. नित्य हर्षित मुख. तुम्हाला नशा असला पाहिजे की मी कोण आहे! कोणाचा आहे? माझे किती सौभाग्य आहे? किती मोठे पद आहे? आता तुम्ही पहिले स्वतःचे स्वराज्य प्राप्त करता आणि मग सतयुगामध्ये युवराज बनाल. तर किती नशा असला पाहिजे! या आपल्या भाग्याला पाहून खुशीमध्ये रहा, आपल्या भाग्याला पहा त्याद्वारे केवढी लॉटरी मिळत आहे. ओहो, किती श्रेष्ठ तुझे भाग्य ज्या भाग्याद्वारे वैकुंठाची लॉटरी मिळते. समजले, लकीएस्ट दैवी फूल बेटी.

४) या सुंदर संगमाच्या वेळी स्वतः निराकार परमात्म्याने साकारमध्ये येऊन ही ईश्वरीय फॅक्टरी उघडली आहे, जिथून कोणताही मनुष्य आपले विनाशी कखपण (अवगुण) देऊन अविनाशी ज्ञान रत्न घेऊ शकतो. ही अविनाशी ज्ञान रत्नांची खरेदी अति सूक्ष्म आहे, ज्याला बुद्धीद्वारे खरेदी करायचे आहे. ही काही स्थूल वस्तू नाही जी या डोळ्यांनी दिसून येईल परंतु अति महीन गुप्त लपलेली असल्यामुळे याला कोणीही लुटू शकत नाही. असा सर्वोत्तम ज्ञान खजिना प्राप्त केल्याने अति निरसंकल्प, सुखदायी अवस्था होते. जोपर्यंत कोणी हि अविनाशी ज्ञान रत्न खरेदी केलेली नाहीत, तोपर्यंत निश्चित, निश्चिंत, निरसंकल्प राहू शकत नाही, त्यामुळे या अविनाशी ज्ञान रत्नांची कमाई करून आपल्या बुद्धी रुपी सूक्ष्म तिजोरीमध्ये धारण करून निरंतर निश्चिंत रहायचे आहे. विनाशी धनामध्ये तर दुःख भरलेले आहे आणि अविनाशी ज्ञान धनामध्ये सुख सामावलेले आहे.

५) ज्या प्रमाणे सूर्य समुद्राच्या पाण्याला शोषून घेतो ज्यामुळे मग उंच डोंगरांवर पाऊस पडतो, अगदी तसाच हा देखील डायरेक्ट ईश्वराद्वारे पाऊस पडतो. असे म्हणतात, शिवाच्या जटांमधून गंगा प्रकट होते. आता यांच्या मुखकमळाद्वारे ज्ञान अमृत धारा वाहत आहे, ज्यालाच अविनाशी ईश्वरीय धारा म्हटले जाते, ज्याद्वारे तुम्ही भगीरथ पुत्र पावन होऊन, अमर बनत आहात. हा सिरताज (मुकुटधारी) बनवण्यासाठी वन्डरफुल मण्डली (अद्भुत मेळावा) आहे, इथे जे कोणी नर आणि नारी येतील ते मुकुटधारी बनतील. दुनियेला देखील मेळावा म्हटले जाते. मंडल अर्थात स्थान, आता हा मेळावा कुठे स्थिरावलेला आहे? ओम् आकारामध्ये अर्थात अहम् स्वधर्मामध्ये आणि बाकीची सारी दुनिया स्वधर्माला विसरून प्रकृतीच्या धर्मामध्ये स्थिरावली आहे. तुम्ही शक्ति मग प्रकृतीला विसरून आपल्या स्वधर्मामध्ये स्थिरावले आहात.

६) या दुनियेमध्ये सर्व मनुष्य निराकार ईश्वराची आठवण करतात, ज्याला आपल्या डोळ्यांनी पाहिले देखील नाही त्या निराकारवर त्यांचे इतके अति प्रेम असते ज्यामुळे म्हणतात - ‘हे ईश्वरा मला तुझ्यामध्ये लीन कर’, परंतु कसे आश्चर्य आहे जे स्वयं ईश्वर जेव्हा साकारमध्ये प्रत्यक्ष झाले तेव्हा त्यांना ओळखतच नाहीत. ईश्वराचे खूप प्रेमळ भक्त असे म्हणतात - ‘जिथे पाहतो तिथे तूच तू आहेस’, भले ते तसे पाहतही नाहीत परंतु बुद्धीयोगाद्वारे हाच अनुभव करतात की ईश्वर सर्वत्र आहे. परंतु तुम्ही अनुभवाने म्हणता की, ‘स्वयं निराकार ईश्वर प्रत्यक्षात साकारमध्ये इथे आलेले आहेत’. आता सहजच तुम्ही येऊन मला भेटू शकता. परंतु माझी बरीच मुले देखील प्रत्यक्ष साकारमध्ये प्रभू पित्याला ओळखत नाहीत. त्यांना निराकार अति गोड वाटतो परंतु ते निराकार, जे आता साकारमध्ये प्रत्यक्ष आहेत, त्यांना जर ओळखतील तर कितीतरी प्राप्ती करू शकतात, कारण प्राप्ती तरी देखील साकार द्वारेच होईल. बाकी जे ईश्वराला दूर निराकार समजतात आणि पाहतात, त्यांना काहीच प्राप्ती नाही ते झाले भक्त, त्यांना कोणतेही ज्ञान नाही. आता साकार प्रभू पित्याला जाणणारी ज्ञानी मुले, सर्व दैवी गुणांच्या सुगंधाने भरलेले स्वीट फ्लॉवर आपल्या प्रभू पित्यावर आपले जीवन अर्पण करतात, ज्याद्वारे त्यांना जन्म-जन्मांतर संपूर्ण देवताई दिव्य सुंदर शरीर प्राप्त होते.

७) स्वतःला जाणल्याने तुम्हाला योग्य-अयोग्य, सत्य-असत्याची परख आली आहे. या ईश्वरीय ज्ञानाद्वारे वाणी सत्य असते, ज्यामुळे कोणाच्या संग दोषाचा प्रभाव पडू शकत नाही. संग दोषाची छाया त्याच्यावर पडते जो स्वतः अज्ञानवश आहेत. यावेळी सत्याची दुनियाच नाही आहे त्यामुळे कोणाच्या शब्दावर विश्वास न ठेवता त्यांच्याकडून लेखी लिहून घेतात. मनुष्यांचे असत्य बोलणे होते, जर सत्य असते तर त्याची महावाक्ये पुजली गेली असती. ज्या प्रमाणे पहा दैवी पित्याच्या सत्य महावाक्यांची शास्त्रे बनली आहेत, ज्यांचे गायन आणि पूजन चालते. त्यांनी सत्य महावाक्यांची धारणा केल्याने आपल्यामध्ये ईश्वरीय क्वालिटी येते. केवळ इतकेच नाही परंतु कोणी तर शिकता-शिकता श्रीकृष्णाचा, ब्रह्माचा साक्षात्कार देखील करतात.

ओहो! होली हृदय कमळ, होली हस्त कमळ, होली नयन कमळ राधे बेटी, तुझी संपूर्ण काया पलटून कमळफुल समान कोमल कंचन बनली आहे. परंतु पहिली आत्मा जेव्हा कंचन बनते तेव्हा संपूर्ण तन कंचन प्युअर बनते. ज्याला होली (पवित्र) कोमल शरीरामध्येच अति आकर्षण भरलेले आहे. तु परमेश्वर पित्याद्वारे तळपणाऱ्या अज्ञानाला विझवून ज्ञान तेजाला जागृत करून अति शितल रूप बनली आहेस. स्वतः शितल स्वरूप बनून मग अन्य बरोबरीच्यांना देखील अशी खरी शीतलता दान देण्याकरीता या सुंदर संगम समयी निमित्त बनली आहेस. तुझ्या जड चित्रांद्वारे देखील संपूर्ण दुनियेला शितलता आणि शांतीचे दान मिळत राहते. आता तू संपूर्ण सृष्टीला तारण्यासाठी शेवटी आपले दिव्य तेज दाखवून, नवीन वैकुंठ गोल्डन बगीच्यामध्ये जाऊन विश्राम करशील. अच्छा.

वरदान:-
“बाबा’’ शब्दाच्या चावीद्वारे सर्व खजिने प्राप्त करणारे भाग्यवान आत्मा भव

भले तुम्ही ज्ञानाच्या इतर विस्ताराला काहीही समजू शकत नाही किंवा कोणाला सांगू शकत नाही परंतु तुम्ही एक “बाबा’’ शब्द हृदयापासून मानला आणि अंतःकरणापासून इतरांना ऐकवला तर विशेष आत्मा बनलात; दुनियेसमोर महान आत्म्याच्या स्वरूपामध्ये गायन योग्य बनलात कारण एक “बाबा’’ शब्द सर्व खजिन्यांची अथवा भाग्याची चावी आहे. चावी लावण्याची विधी आहे हृदयापासून जाणणे आणि मानणे. हृदयापासून म्हणा - ‘बाबा’, तर खजिना नेहमी हजर आहे.

बोधवाक्य:-
बापदादांवर प्रेम असेल तर प्रेमामध्ये जुन्या दुनियेला कुर्बान करा.