24-06-26    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   ओम शान्ति   मधुबन


“या कर्मक्षेत्रावर कर्म ही अनादि गोष्ट आहे, तुम्हाला कर्म करणे सोडून द्यायचे नाही आहे, परंतु कर्मयोगी बनायचे आहे”
(जगदंबा मातेच्या स्मृती दिनानिमित्त ऐकविण्याकरिता, त्यांच्या द्वारे उच्चारलेली मधुर महावाक्ये)


ही सृष्टी कर्माची शेती आहे, जिथे प्रत्येक मनुष्य-आत्मा आपापला पार्ट प्ले करत आहे, यामध्ये परमात्म्याचा देखील पार्ट आहे परंतु ते आत्म्यांप्रमाणे जन्म-मृत्यूच्या फेऱ्यामध्ये येत नाहीत. आत्म्यांप्रमाणे त्यांच्या कर्मांचे खाते उलटे बनत नाही. ते म्हणतात - ‘मी तर फक्त तुम्हा आत्म्यांना लिबरेट करण्याकरिता येतो, म्हणून मला लिबरेटर, बंधनातून मुक्त करणारा, गती सद्गती दाता म्हटले आहे’.

आत्मा जी मायेच्या बंधनाने ग्रासलेली आहे, त्याला दूर करून प्युअर (पवित्र) बनवितात; आणि म्हणतात की, माझे काम आहे आत्म्यांना सर्व बंधनांमधून सोडवून परत घरी घेऊन जाणे. तर सृष्टीचे जे अनादि नियम आणि कायदे आहेत त्यांना देखील समजून घ्यायचे आहे. त्यानंतर या मनुष्य सृष्टीची वृद्धी कशा प्रकारे होते आणि मग अशी देखील एक वेळ येते जेव्हा ही वृद्धी कमी होते. असे नाही की वाढते तर वाढतच जाते, नाही. कमी देखील होते. तर सृष्टीमध्ये प्रत्येक गोष्टीचा एक नियम आहे. आपल्या शरीराचा देखील नियम आहे - पहिले बाल्य-अवस्था, मग किशोर-अवस्था, मग तरुण-अवस्था, आणि मग वृद्ध-अवस्था. तर वृद्ध देखील लवकर होत नाहीत, परंतु हळू-हळू वृद्ध होत मग जीर्ण अवस्था होते. तर प्रत्येक गोष्टीचे वाढणे आणि त्याचा अंत होणे, हा देखील नियम आहे. याच प्रकारे सृष्टीच्या जनरेशनचा (पिढीचा) देखील नियम आहे. एका आयुष्यामध्ये देखील स्टेजेस (विविध टप्पे) आहेत, तशाच मग जन्मांच्या देखील स्टेजेस (विविध टप्पे) आहेत, त्याच प्रमाणे जनरेशन्सचे (पिढ्यांचे) देखील ज्या होऊन गेल्या आहेत त्यांचे देखील विविध टप्पे आहेत, अगदी याच प्रमाणे सर्व धर्मांचे देखील विविध टप्पे आहेत. पहिला जो धर्म आहे तो सर्वात शक्तिशाली आहे, त्याच्या नंतर जे येतात, त्यांची ताकद हळू-हळू कमी होत जाते. तर धर्मांचा विस्तार, धर्मांची प्रगती, अशी प्रत्येक गोष्ट विशिष्ट नियमांनुसार चालते, या सर्व गोष्टींना देखील समजून घेणे आवश्यक आहे.

त्याचप्रमाणे बाबा देखील म्हणतात - माझा देखील यामध्ये पार्ट आहे. मी देखील एक आत्मा आहे, मी म्हणजेच गॉड काही वेगळा प्रकार नाही आहे. मी देखील आत्माच आहे, परंतु माझे कार्य अत्यंत महान आणि श्रेष्ठ आहे म्हणून मला ‘गॉड’ म्हटले जाते. जसे तुम्ही आत्मा आहात तर मी देखील तसाच आहे. जसा तुमचा मुलगा आहे तर तो देखील मनुष्यच आहे, तुम्ही देखील मनुष्यच तर आहात, तुमच्या दोघांमध्ये तर काहीच फरक नाही आहे ना. तर मी देखील आत्माच आहे, आत्म्या, आत्म्यामध्ये काहीच फरक नाही आहे; परंतु कर्तव्यामध्ये मात्र खूप मोठा फरक आहे. म्हणूनच असे म्हटले जाते की, माझे जे कर्तव्य आहे ते इतरांपेक्षा वेगळे आहे. मी काही हदच्या एका धर्माचा स्थापक नाहीये, मी तर दुनियेचा क्रियेटर आहे; ते (धर्मस्थापक) झाले धर्माचे क्रियेटर. ज्याप्रमाणे ते आत्मे आपले कार्य आपल्या ठरलेल्या निश्चित वेळी करतात, तसाच मी देखील माझ्या ठरलेल्या निश्चित वेळी येतो. माझे कर्तव्य विशाल आहे, माझे कर्तव्य महान आहे आणि सर्वात अद्वितीय आहे; म्हणूनच म्हटले जाते - ‘तुमचे कार्य विलक्षण आहे’. त्यांना सर्वशक्तिवान देखील म्हटले आहे, सर्वात शक्तिशाली कार्य आहे आत्म्यांना मायेच्या बंधनातून सोडविणे आणि नवीन दुनियेचे कलम लावणे; म्हणूनच त्यांना इंग्रजीमध्ये म्हटले आहे - ‘हेवनली गॉड फादर’. जसे क्राईस्टला ख्रिश्चन धर्माचा फादर (जनक) म्हणता येईल, त्याला काही हेवनली गॉड फादर म्हणता येणार नाही. हेवनचे स्थापक केवळ एक परमात्माच आहेत. तर हेवन वर्ल्ड झाले ना, हेवन काही एक धर्म नाही आहे. तर ते वर्ल्ड स्थापक झाले आणि त्या वर्ल्डमध्ये एक धर्म, एक राज्य असेल, तत्व इत्यादी सर्व परिवर्तित होतील; म्हणूनच त्यांना म्हटले आहे - हेवनली गॉडफादर.

दुसरे, गॉड इज ट्रूथ म्हटले आहे, तर ‘ट्रुथ’ काय गोष्ट आहे, कशाच्या बाबतीत ट्रूथ आहेत? ही देखील समजून घेण्याची गोष्ट आहे. बरेचजण असे समजतात की, जो खरे बोलतो तो गॉड आहे. गॉड म्हणजे अजून दुसरी कोणती गोष्ट नाहीये, बस्स, फक्त खरे बोलले पाहिजे. परंतु असे नाही, ‘गॉड इज ट्रुथ’ याचा अर्थच हा आहे की, गॉडनेच येऊन सर्व गोष्टींविषयीचे सत्य प्रकट केले आहे, ‘गॉड इज ट्रूथ’ अर्थात गॉडच सत्य सांगतात; सत्य त्यांच्यामध्येच वास करते, तेव्हाच तर त्यांना ‘नॉलेजफुल’ म्हटले आहे. ओशन ऑफ नॉलेज, ओशन ऑफ ब्लिस, गॉड नोज, ईश्वर सर्व काही जाणतात… तर जरूर विशेष काहीतरी जाणून घेण्यासारखी गोष्ट आहे ना! तर ती कोणती विशेष माहिती आहे? असे नाही की, याने चोरी केली, गॉड नोज. भले ते सर्व काही जाणतात परंतु त्यांची महिमा जी आहे ना, ती याकरिता आहे की आपल्या या दुनियेची जी अधोगती झालेली आहे तिचे उत्थान कसे होईल, या चक्रातील गोष्टींना ते जाणतात म्हणून म्हटले जाते - गॉड नोज. तर परमात्म्याची महिमा या दृष्टीने होते, जी मनुष्यापेक्षा वेगळी आहे कारण ते वेगळ्याच प्रकारचे जाणकार आहेत. मनुष्याचे ज्ञान हदचे आहे. म्हटले देखील आहे - मनुष्य अल्पज्ञ आहे आणि परमात्म्यासाठी म्हणतात की, ते सर्वज्ञ आहेत; ज्याला इंग्रजीमध्ये ‘नॉलेजफुल’ म्हणतात अर्थात सर्व गोष्टींचा ज्ञाता अथवा सर्वकाही जाणणारा आहे. तर जो सर्वज्ञ आहे तोच ट्रूथ जाणू शकतो; यथार्थ गोष्टींचे नॉलेज ज्याच्याकडे आहे, तर जरूर तोच सर्वांना देईल ना. जर स्वतः जाणत असेल आणि इतरांना देत नसेल तर त्याचा आपल्याला काय फायदा! त्याचे ज्ञान त्याच्याकडेच ठेवू दे. परंतु असे होत नाही. त्यांनी दिलेल्या माहितीमुळे आपल्याला काही लाभ मिळाला आहे, तेव्हाच तर आपण त्यांच्या क्वालिफिकेशनचे (महानतेचे) गायन करतो. त्यांच्या मागे धावतो. कधी काहीही झाले तर म्हणतात - ‘हे भगवान! आता तूच हे कर! ठीक कर, दया कर, माझे दुःख दूर कर’, तर आपण त्याच्याकडे मागतो ना. त्याच्याशी काहीतरी नाते आहे ना म्हणूनच आपण त्याची अशा प्रकारे आठवण करतो, जणू काही त्याने आपल्यावर काही उपकार केलेले आहेत. जर त्याने कधी काही उपकार केलेलेच नसतील तर आपण का बरे त्याच्यासाठी डोके आपटले असते. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला अडचणीच्या वेळी मदत करते तर मनात येते की, यांनी अडचणीच्या वेळेला मला खूप मदत केली होती. वेळेवर येऊन माझे रक्षण केले होते, तर त्यांच्या प्रति मनात आदरयुक्त प्रेम निर्माण होते. तर परमात्म्याच्या प्रती देखील असेच प्रेम वाटते की त्यांनी आपल्याला वेळेवर मदत केली आहे. परंतु असे नाही की, कधी एखाद्या मनुष्याचे चांगले झाले तर तुम्ही म्हणाल की, हे भगवंताने केले…बस्स, भगवान असेच करतात. परंतु त्यांचे सर्वात मोठे कार्य आहे, संपूर्ण दुनियेसाठीचे कार्य आहे, संपूर्ण दुनियेशी त्यांचे नाते आहे. बाकी असे नाही की कोणाला थोडा पैसा मिळाला, तर म्हणाल - ‘हे भगवंताने केले’; अशी तर आपणही चांगली कर्म करतो, तर त्या कर्माचे फळ मिळते. चांगल्या आणि वाईट कर्मांचा हिशोब चालतो, त्याचे देखील आपल्याला फळ मिळत असते; परंतु परमात्म्याने येऊन जे कर्म आपल्याला शिकवले त्याचे जे फळ आहे, ते वेगळेच आहे. अल्पकाळाचे सुख तर बुद्धीच्या आधारावर सुद्धा मिळते. परंतु त्यांनी जे नॉलेज दिले आहे त्याद्वारे आपल्याला कायमचे सुख प्राप्त होते. तर परमात्म्याचे कार्य अद्वितीय झाले ना. म्हणूनच ते म्हणतात की, ‘मीच येऊन कर्मा विषयीचे जे यथार्थ नॉलेज आहे ते शिकवतो, ज्याला म्हटले आहे - कर्मयोग श्रेष्ठ आहे’. यामध्ये कर्मत्याग, गृहस्थाश्रमाचा त्याग अभिप्रेत नाहीये; मी फक्त तुम्ही तुमच्या कर्मांना पवित्र कसे बनवावे, त्याचे नॉलेज देतो. तर कर्माला पवित्र बनवायचे आहे,

कर्म करणे सोडायचे नाहीये. कर्म तर अनादि गोष्ट आहे. हे कर्म-क्षेत्र देखील अनादि आहे. जिथे मानव आहे तिथे कर्म देखील आहे, परंतु त्या कर्माला तुम्ही श्रेष्ठ कसे बनवायचे ते मी येऊन शिकवतो, ज्यामुळे तुमच्या कर्मांचे खाते अकर्म बनेल. ‘अकर्म’ याचा अर्थ आहे - कोणतेही वाईट खाते तयार होत नाही.

बाबा म्हणतात - मी या छोट्याशा संगमयुगामध्ये तुमच्या देशात, या कार्पोरियल दुनियेमध्ये (साकारी दुनियेमध्ये) तुमच्याकरिता आलो आहे, तर निदान जितका वेळ आहे तितका वेळ तरी माझा थोडा विचार करा. बाबांचे बनला आहात तर किमान इतका वेळ तरी शुद्ध (पवित्र) राहा. म्हणजे मग तुमचे असे प्रारब्ध बनेल ज्यामुळे तुम्हाला त्या दुनियेमध्ये मेहनत करावी लागणार नाही. आता थोडीशी मेहनत करण्याची गरज आहे, आता तुम्ही कसेही करून, प्राण पणाला लावून देखील पवित्र राहण्याची प्रतिज्ञा करा. स्वतःशी दृढ रहा, आपल्या धारणांमध्ये पुरेपूर राहण्याचा प्रयत्न करा. बाबा तुम्हाला स्पष्टपणे सांगत आहेत की, ‘तुम्ही फक्त एवढ्या थोड्या वेळाकरिता ही मेहनत करा. मी तुम्हाला अजून दुसरी कोणतीही मेहनत करायला लावत नाही, तुम्हाला जितके मिळते त्याच्या तुलनेत ही मेहनत काहीच नाही’.

असे नाही की, ‘मी हे करेन, मी ते करेन…’, असे फक्त म्हणत राहू नका किंवा दुनिया काय म्हणेल, ते काय म्हणतील… अरे दुनिया काय म्हणेल… याची चिंता सोडून द्या. आता ही दुनियाच नष्ट होणार आहे. आता तर मृत्यू समोर उभा आहे. तुम्ही एवढा जो व्याप वाढवून ठेवला आहे हे सर्व वाया घालवत आहात. आता बाबा म्हणतात - त्या वेस्टेजला वाचवा (अपव्यय करणे थांबवा). या शरीर निर्वाहाकरिता जितके पाहिजे तेवढे भले करा, जितका तुमच्या क्रियेशन सोबत (मुलांसोबत) जेवढा हिशोब आहे, तेवढे कर्तव्य जरूर पार पाडा, मी कुठे तुमच्या मुलांना सांभाळत बसणार. तुमच्या मुलांना तुम्हीच सांभाळायचे आहे. जिथे जरुरी आहे तिथे तर मी तुम्हाला फ्री करतो (मुभा देतोच), परंतु आता हे जे अवास्तव व्याप वाढवत आहात त्याच्यासाठी मी मनाई करतो; कारण आता त्या सर्व गोष्टी कोसळणारच आहेत, तर मग तुम्ही त्यावर आपला वेळ फालतूमध्ये वाया का घालवत आहात? या फालतूच्या जंजाळामुळेच तुम्ही दुःखी झाले आहात, मग त्या जंजाळामधूनच आता तुम्ही कसे सुटायचे तेच तर तुम्हाला आता सांगत आहे. तरी देखील अनेक कारणे सांगत बसणे, ही कुठली रीत आहे? तर मग बाबा देखील म्हणतात की, बघाच, आत्ता जर का तुम्ही मला स्वेच्छेने तुमचे बोट दिले नाहीत, हात धरला नाहीत, तर मग मात्र मी असे काही नाकाला पकडून घेऊन जाईन; नाक पकडले तर मग श्वास कोंडेल, मग दुःख होईल, सजा खावी लागेल! म्हणून बाबा सांगत आहेत - आता हातामध्ये हात देऊन सरळ मार्गाने चालण्याची वेळ आलेली आहे. जर तुम्ही सरळ रित्या चालला नाहीत तर मग माझ्या हातामध्ये तुमचे नाक तर येईलच, मग बघाच. मग त्यावेळी काहीच होऊ शकणार नाही, आणि काहीच करू देखील शकणार नाही. म्हणून बाबा म्हणतात - ‘मुलांनो, आता तुम्ही माझे बनून, माझ्या जवळ येऊन, मी सांगितलेले ऐकून, तरी देखील जर काहीच केले नाहीत तर त्यांच्यासाठी खूप मोठ्या कडक सजा आहेत; परंतु ज्या बिचाऱ्यांना माहीतच नाही त्यांची गोष्ट वेगळी आहे. बाकी ज्यांना माहित आहे, जे बसून, ऐकून, तरीही याच गोष्टींमध्ये गडबड घोटाळा करतील तर त्यांची काही खैर नाही. जसा १० पटीने फायदा आहे, तसेच १० पटीने नुकसान होईल. म्हणूनच सांगत आहे की, आपल्या नुकसानाला, घाट्याला… चांगल्या रीतीने समजून घ्या. व्यवस्थित थोडीतरी आपल्या बुद्धीची कवाडे उघडा. आता बाबांसोबत बुद्धियोग लावाल तर ताकद मिळेल. तर या सर्व गोष्टींना समजून घ्या, विसरू नका.

आता हा जो काळ सुरू आहे, याला ओळखा, थोडे डोळे उघडा, बुद्धीची कवाडे उघडा आणि वेळेचा पूर्ण फायदा घ्या. पूर्णपणे आपले भाग्य जागे करा. म्हणतात देखील - जसा संग तसाच रंग असतो, त्यामुळे ज्यांच्यामध्ये आता ही धारणा पूर्णपणे होत नसेल तर मायेच्या संगाचा रंग लागेल; तेव्हाच तर म्हणतात - ‘हियर नो इविल, सी नो इविल, टॉक नो इविल…’ असे कितीतरी इविल आहेत (अनिष्ट गोष्टी आहेत) ज्या इथे देखील बऱ्याचजणांना सोडत नाहीत, आणि मग एकमेकांच्या संग दोषामध्ये येतात. तर बाबा म्हणतात - अशा संगदोषापासून दूर रहा. असे समजू नका की संगदोष बाहेर आहे, इथे नाही आहे. नाही, इथे देखील ते फिरत असतात, कारण त्यांचे राज्य आहे ना, म्हणून बाबा म्हणतात - व्यवस्थित कवच घालून राहा. कवच असेल तर त्याची गोळी लागणार नाही. योगाचेच कवच आहे, ज्ञानाची तलवार आहे. आणि सर्व अस्त्र-शस्त्रांना आपल्याकडे व्यवस्थित जपून ठेवा.

म्हणतात देखील - ‘जे पेराल तेच उगवेल’, या तर भविष्य प्रारब्ध बनविण्याच्या गोष्टी आहेत. तुम्हाला इथे काही प्रारब्ध उपभोगायचे नाहीये; इथे काही गुरु बनून तर बसायचे नाहीये. यामध्ये कोणी गैरसमज करून घेऊ नये, म्हणून हे सर्व समजावून सांगितले जात आहे. तरी या सर्व गोष्टी लक्षात ठेवून स्वतःला सुरक्षित ठेवायचे आहे. इथे कोणत्याही प्रकारचा अवांतर खर्च इत्यादी होता कामा नये. आता हा सर्व खर्च इतरांच्या कल्याणासाठीच युज करायचा आहे. एक-एक पैसा सुद्धा या कार्यासाठीच वापरायचा आहे. अच्छा.

अशा बापदादांच्या आणि मम्माच्या अत्यंत गोड, खूप छान आणि नेहमी जागरूक राहणाऱ्या मुलांप्रती प्रेमपूर्वक आठवण आणि गुड मॉर्निंग.

प्रश्न:- मम्मा आपण चालता-फिरता योगाच्या उच्च अवस्थेमध्ये कसे स्थित होऊ शकतो?

उत्तर:- वास्तविक पाहता, आपले हे जीवनच नैसर्गिकरित्या योगमय झाले पाहिजे कारण योग म्हणजेच - निश्चय. तर निरंतर निश्चयाला पक्के करून तसे प्रॅक्टिकल स्वरूप बनायचे आहे. निश्चय स्वरूप बनून कर्मेंद्रियांद्वारे कर्म करा; भले स्थूल कर्मेंद्रिये कोणतेही कार्य करत असली, तरीही तुम्ही स्वतः त्याच सुख स्वरूप अवस्थेमध्ये लवलीन होऊन रहायचे आहे. तुमचा चेहरा नेहमी सुख स्वरूप, रमणीक दिसावा. कोणताही अशुद्ध संकल्प, विकल्प राहू नये. ईश्वरीय आनंदामध्ये, आंतरिक मग्न अवस्थेमध्ये राहाल तर मग कोणत्याही अशुद्ध संकल्प, विकल्पाची उत्पत्ती होणार नाही. शुद्ध प्युअर धरणीमध्ये जो पण संकल्प उत्पन्न होईल तो लोक-संग्रहाप्रति अथवा आपल्या उन्नती प्रति असेल. ही अतिशय गोड अशी सुंदर अवस्था आहे जी वेळेवर मदत करते. असे ईश्वरीय अलौकिक सुंदर पवित्र जीवन बनविण्याची आताच तुम्हाला ही सुवर्णसंधी मिळालेली आहे. तर अशी अवस्था बनविण्याकरिता थोडी मेहनत करा.

जेव्हा आपण योगामध्ये बसतो तर आपण मनामध्ये मंत्र, पूजा, जप इत्यादी काहीच करत नाही; जसे भक्तिमार्गामध्ये काहीजण मनातल्या मनात प्रार्थना करतात, माळ जपतात, मूर्तीला समोर ठेवून फूल अर्पण करतात, ते सर्व मनातल्या मनातच करतात, ज्याला मनसा पूजा म्हणता येईल. परंतु आपल्या योगामध्ये आपण फक्त आपल्या स्व स्वरूपामध्ये स्थित होऊन सुख स्वरूप बनतो. आपल्या मना सहित सर्व कर्मेंद्रियांना कंट्रोल करून एकाग्रचित्त बनून ईश्वरीय सुख स्वरूप होतो, आणि या योगसाधनेसाठी एक विशिष्ट वेळ निश्चित केलेली आहे. जिथे एकाच वेळी सर्वजण एकत्र बसून अभ्यास करतात. यामध्ये फक्त व्यक्त गोष्टींशी असलेले नाते तोडून अव्यक्त संबंधाशी नाते जोडून ठेवायचे आहे म्हणजे मग आठवण करणे सोपे होईल अच्छा. ओम् शांती.

वरदान:-
कायम बाप-दादांच्या सोबत राहून मायेला दुरूनच मूर्च्छित करणारे मायाजीत, जगतजीत भव

जसे बाबांचे स्नेही बनला आहात तसेच बाबांना तुमचे सोबती बनवा, तर माया दुरूनच मूर्छित होईल. तुमचा सुरुवातीचा जो वायदा आहे - ‘तुम्हीं से खाऊं, तुम्हीं से बैठूं, तुम्हीं से रूह को रिझाऊं…’ या वायद्या प्रमाणे संपूर्ण दिनचर्येमध्ये प्रत्येक कार्य बाबांच्यासोबत करा म्हणजे मग माया डिस्टर्ब करू शकणार नाही, तिचे लक्ष विचलित होईल. तर साथीदाराला नेहमी सोबत ठेवा, साथीदाराच्या शक्तीमुळे अथवा भेटीमध्ये मग्न राहिल्याने मायाजीत, जगजीत बनाल.

सुविचार:-
आपल्या श्रेष्ठ वृत्तीद्वारे प्रवृत्तीच्या परिस्थितींना परिवर्तित करा.

हे अव्यक्त इशारे - सदैव हर्षित राहण्याकरिता आपल्या नेचरला (स्वभावाला) सरळ बनवा, सहनशील बना.

अव्यक्त स्थितीरुपी आरशाला स्वच्छ आणि स्पष्ट करण्याकरिता सरळता, श्रेष्ठता आणि सहनशीलता या तीन गोष्टींवर लक्ष द्या. जर तिघांपैकी एका गोष्टीची जरी कमी असेल तर आरशावर कमी असल्याचा डाग दिसून येईल; त्यामुळे जे काही कार्य करता ते सामान्य असल्या प्रमाणे दिसू नये. सामान्यतेला श्रेष्ठतेमध्ये परिवर्तित करा. प्रत्येक कार्यामध्ये सहनशीलतेला आणि वाणीमध्ये सरळतेला धारण करा तर सेवेमध्ये सफलता दिसून येईल.