24-07-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - बाबांकडून होलसेल व्यापार करायला शिका, होलसेल व्यापार आहे ‘मनमनाभव’, अल्फला आठवण करणे आणि करविणे, बाकी सर्व आहे रिटेल’’

प्रश्न:-
बाबा आपल्या घरामध्ये कोणत्या मुलांचे वेलकम करतील?

उत्तर:-
जी मुले चांगल्या प्रकारे बाबांच्या मतावर चालतात, बाकी इतर कोणाचीही आठवण करत नाहीत, देहा सहीत देहाच्या सर्व संबंधापासून बुद्धियोग तोडून एकाच्या आठवणीमध्ये राहतात, अशा मुलांचे बाबा आपल्या घरामध्ये स्वागत करतील. बाबा आता मुलांना गुल-गुल (फूल) बनवतात, मग फूल मुलांचे आपल्या घरामध्ये वेलकम करतात.

ओम शांती।
मुलांनी आपले पिता आणि शांतीधाम, सुखधामच्या आठवणीमध्ये बसायचे आहे. आत्म्याला, बाबांचीच आठवण करायची आहे, या दुःख धामला विसरायचे आहे. बाबा आणि मुलांचे हे आहे गोड नाते. इतके गोड नाते इतर कोणत्या पित्याचे असतच नाही. नाते एक असते पित्याशी आणि मग टीचर आणि गुरुशी असते. आता इथे हे तिघेही एकच आहेत. हे देखील बुद्धीमध्ये लक्षात रहावे, किती आनंदाची गोष्ट आहे ना. एकच बाबा मिळाले आहेत, जे खूप सोपा रस्ता सांगतात. बाबांची, शांतीधाम आणि सुखधामची आठवण करा, या दुःखधामला विसरून जा. हिंडा-फिरा परंतु बुद्धीमध्ये हेच लक्षात रहावे. इथे तर कुठलाही गोरखधंदा इत्यादी नाहीये. घरामध्ये बसले आहात. बाबा केवळ ३ शब्द आठवण करायला सांगत आहेत. वास्तवामध्ये आहे एक शब्द - ‘बाबां’ची आठवण करा. बाबांची आठवण केल्याने सुखधाम आणि शांतीधाम दोन्ही वारशाची आठवण येते. देणारे तर बाबाच आहेत. आठवण केल्याने खुशीचा पारा चढेल. तुम्हा मुलांची खुशी तर नामीग्रामी आहे. मुलांच्या बुद्धीमध्ये आहे - बाबा आपल्याला घरामध्ये पुन्हा वेलकम करतील, रिसिव्ह करतील, परंतु त्यांनाच, जे चांगल्या रीतीने बाबांच्या मतावर चालतील इतर कोणाचीही आठवण करणार नाहीत. देहा सहीत देहाच्या सर्व संबंधापासून बुद्धियोग तोडून मामेकम् (मज एकाची) आठवण करायची आहे. भक्तीमार्गामध्ये तर तुम्ही खूप सेवा केली आहे परंतु जाण्याचा रस्ता मिळतच नाही. आता बाबा किती सोपा रस्ता सांगतात, फक्त याची आठवण करा - बाबा, पिता देखील आहेत, शिक्षक देखील आहेत, सृष्टीच्या आदि-मध्य-अंत चे ज्ञान ऐकवतात, जे दुसरे कोणीही समजावून सांगू शकणार नाही. बाबा म्हणतात - ‘आता घरी जायचे आहे’. मग सर्व प्रथम सतयुगामध्ये याल. या छी-छी दुनियेतून आता जायचे आहे. भले इथे बसले आहात परंतु इथून आता गेले की गेले. बाबा देखील खुश होतात, तुम्हा मुलांनी बाबांना बऱ्याच काळापासून इनव्हाईट केले आहे (बोलावले आहे). आता मग बाबांना रिसिव्ह केले आहे. बाबा म्हणतात - ‘मी तुम्हाला गुल-गुल बनवून मग शांतीधाममध्ये रिसिव्ह करेन. मग तुम्ही नंबरवार निघून जाल. किती सोपे आहे. अशा बाबांना विसरायचे नाही. गोष्ट तर खूप गोड आणि सरळ आहे. एक गोष्ट - अल्फला (बाबांची) आठवण करा. भले सविस्तरपणे समजावून सांगतात आणि शेवटी म्हणतात - ‘अल्फला आठवण करा, दुसरे कुणीही नाही’. तुम्ही जन्म-जन्मांतरीचे आशिक आहात एका माशूकचे. तुम्ही गात आले आहात - ‘बाबा, तुम्ही याल तर आम्ही तुमचेच बनणार. आता ते आले आहेत तर एकाचेच बनायला हवे. निश्चय बुद्धी विजयन्ती. विजय प्राप्त कराल रावणावर. नंतर मग यायचे आहे राम राज्यामध्ये. कल्प-कल्प तुम्ही रावणावर विजय प्राप्त करता. ब्राह्मण बनले आणि विजय प्राप्त केला रावणावर. राम राज्यावर तुमचा हक्क आहे. बाबांना ओळखले आणि राम राज्यावर अधिकार मिळवला. बाकी पुरुषार्थ करायचा आहे उच्च पद प्राप्त करण्याचा. विजय माळेमध्ये यायचे आहे. विजय माळा मोठी आहे. राजा बनाल तर सर्व काही मिळेल. दास-दासी सर्व नंबरवार बनतात. सर्व एक सारखे नसतात. कोणी तर खूप जवळ राहतात, जे राजा-राणी खातात, जे काही भंडाऱ्यामध्ये बनते ते सर्व दास-दासींना मिळते, ज्याला ३६ प्रकारचे भोजन म्हटले जाते. पद्मपती देखील राजांना म्हटले जाते, प्रजेला पद्मपती म्हणणार नाही. भले तिथे धनाची पर्वा राहत नाही. परंतु ही निशाणी देवतांची आहे. जितकी आठवण कराल तितके सूर्यवंशीमध्ये याल. नवीन दुनियेमध्ये यायचे आहे ना. महाराजा-महाराणी बनायचे आहे. बाबा नॉलेज देतात नरा पासून नारायण बनण्याचे, ज्याला राजयोग म्हटले जाते. बाकी भक्ती मार्गाची शास्त्रे देखील सर्वात जास्त तुम्ही वाचली आहेत. सर्वात जास्त भक्ती तुम्हा मुलांनी केली आहे. आता बाबांना येऊन भेटले आहात. बाबा रस्ता तर खूप सोपा आणि सरळ सांगत आहेत की, बाबांची आठवण करा. बाबा, बाळांनो-बाळांनो असे म्हणत समजावून सांगतात. बाबा मुलांवर बलिहार जातात. वारसदार आहात तर बलिहार जावे लागेल. तुम्ही देखील म्हटले होते - ‘बाबा, तुम्ही याल तर आम्ही बलिहार जाणार. तन-मन-धन सहित कुर्बान होणार’. तुम्ही एकदा कुर्बान जाता, बाबा २१ वेळा जातील. बाबा मुलांना आठवण देखील करून देतात. बाबा समजू शकतात, सर्व मुले नंबरवार पुरुषार्थानुसार आपले-आपले भाग्य घेण्यासाठी आले आहेत. बाबा म्हणतात - ‘गोड मुलांनो, विश्वाची बादशाही आपली जागीर (संपत्ती) आहे. आता जितका पुरुषार्थ तुम्ही कराल’. जितका पुरुषार्थ कराल तितके उच्च पद प्राप्त कराल. नंबरवन तेच आता लास्ट नंबरमध्ये आहेत. पुन्हा नंबरवनमध्ये जरूर जातील. सर्व काही पुरुषार्थावर अवलंबून आहे. बाबा मुलांना घरी घेऊन जाण्यासाठी आले आहेत. आता स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा तर पापे नष्ट होत जातील. तो आहे ‘काम-अग्नी’, हा आहे ‘योग-अग्नी’. काम अग्नीमध्ये जळता-जळता तुम्ही काळे झाले आहात. एकदम खाक झाले आहात. आता मी येऊन तुम्हाला जागे करतो. तमोप्रधाना पासून सतोप्रधान बनण्याची युक्ती सांगतो, अगदी सोपी आहे - मी आत्मा आहे. इतका वेळ देह-अभिमानामध्ये राहिल्या कारणाने तुम्ही उलटे लटकत होता. आता देही-अभिमानी बनून बाबांची आठवण करा. घरी जायचे आहे, बाबा नेण्यासाठी आले आहेत. तुम्ही निमंत्रण दिले आणि बाबा आले आहेत. पतितांना पावन बनवून पंडा बनून सर्व आत्म्यांना घेऊन जातील. आत्म्यालाच यात्रेवर जायचे आहे.

तुम्ही आहात पांडव संप्रदाय. पांडवांचे राज्य नव्हते. कौरवांचे राज्य होते. इथे तर आता राजाई देखील नष्ट झाली आहे. आता भारताचे किती वाईट हाल झाले आहेत. तुम्ही पूज्य विश्वाचे मालक होता आता पुजारी बनले आहात. तर विश्वाचा मालक कोणीही नाही. विश्वाचे मालक केवळ देवी-देवताच बनतात. लोक असे म्हणतात की, विश्वामध्ये शांती व्हावी. तुम्ही त्यांना विचारा की, विश्वामध्ये शांती कशाला म्हणता? विश्वामध्ये शांती कधी होती? वर्ल्डची हिस्ट्री-जिओग्राफी रिपीट होत राहते. चक्र फिरत राहते. तुम्ही बोला, विश्वामध्ये शांती कधी झाली होती? तुम्हाला कोणती शांती हवी आहे? कोणीही सांगू शकणार नाही. बाबा समजावून सांगत आहेत - ‘विश्वामध्ये शांती तर स्वर्गामध्ये होती, ज्याला पॅराडाईज (स्वर्ग) म्हणतात’. ख्रिश्चन लोक म्हणतात - ‘बरोबर क्राइस्टच्या ३ हजार वर्षांपूर्वी पॅराडाईज होता’. त्यांची ना पारस बुद्धी बनते, ना पत्थर बुद्धी बनते. भारतवासीच पारस बुद्धी आणि पत्थर बुद्धी बनतात. नवीन दुनियेला स्वर्ग म्हटले जाते, जुन्याला तर स्वर्ग म्हणणार नाही. मुलांना बाबांनी हेल आणि हेवनचे (नरक आणि स्वर्गाचे) रहस्य समजावून सांगितले आहे. हे आहे रिटेल. होलसेलमध्ये तर केवळ एक शब्द म्हणतात - मामेकम् (मज एकाची) आठवण करा. बाबांद्वारेच बेहदचा वारसा मिळतो. ही देखील जुनी गोष्ट आहे, ५ हजार वर्षांपूर्वी भारतामध्ये स्वर्ग होता. बाबा मुलांना सच्ची-सच्ची कथा सांगतात. सत्यनारायणाची कथा, तिजरीची कथा, अमर कथा प्रसिद्ध आहे. तुम्हाला देखील ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळतो. त्याला तिजरीची कथा म्हटले जाते. त्यांनी तर भक्तीची पुस्तके बनविली आहेत. आता तुम्हा मुलांना सर्व गोष्टी व्यवस्थित समजावून सांगितल्या जातात. रिटेल आणि होलसेल असते ना! इतके ज्ञान ऐकवतात जे सागराला शाई बनवाल तरी देखील अंत मिळत नाही - हे झाले रिटेल. होलसेलमध्ये फक्त म्हणतात - ‘मनमनाभव’. शब्दच एक आहे, त्याचा अर्थ देखील तुम्ही समजता इतर कोणी सांगू शकणार नाही. बाबांनी काही संस्कृतमध्ये ज्ञान दिलेले नाही. हे तर जसा राजा आहे तशीच आपली भाषा चालवतात. आपली भाषा तर एक हिंदीच असणार. मग संस्कृत कशासाठी शिकायला हवे. किती पैसा खर्च करतात.

तुमच्याकडे कोणीही आले तर त्यांना बोला - ‘बाबा म्हणतात, माझी आठवण करा तर शांतिधाम-सुखधामचा वारसा मिळेल. हे समजून घ्यायचे असेल तर बसा आणि समजून घ्या. बाकी आमच्या जवळ दुसरी कोणती गोष्ट नाही.’ बाबा ‘अल्फ’ विषयीच समजावून सांगतात. ‘अल्फ’ कडूनच वारसा मिळतो. बाबांची आठवण करा तर पापे नष्ट होतील आणि मग पवित्र बनून शांतीधाममध्ये निघून जाल. म्हणतात देखील ‘शांती देवा’. बाबाच शांतीचे सागर आहेत तर त्यांचीच आठवण करतात. बाबा जो स्वर्ग स्थापन करतात तो तर इथेच असतो. सूक्ष्मवतनमध्ये काहीच नाही आहे. या तर साक्षात्काराच्या गोष्टी आहेत. असा फरिश्ता बनायचे आहे. बनायचे इथेच आहे. फरिश्ता बनून मग घरी निघून जाल. राजधानीचा वारसा बाबांकडून मिळतो. शांती आणि सुख दोन्ही वारसे मिळतात. बाबांशिवाय इतर कोणालाही सागर म्हणता येणार नाही. बाबा जे ज्ञानाचा सागर आहेत तेच सर्वांची सद्गती करू शकतात. बाबा विचारतात - ‘मी तुमचा पिता, टिचर, गुरु आहे, तुमची सद्गती करतो, मग तुमची दुर्गती कोण करतो? रावण. दुर्गती आणि सद्गतीचा हा खेळ आहे. जर कोणी गोंधळून जात असतील तर विचारू शकता. भक्तिमार्गामध्ये पुष्कळ प्रश्न पडतात, ज्ञान मार्गामध्ये प्रश्न उत्पन्न होण्याची गरजच नाही. शास्त्रांमध्ये तर शिवबाबांपासून देवतांची देखील किती निंदा केली आहे, कोणालाच सोडलेले नाही. हा देखील ड्रामा बनलेला आहे, तरीही करतील. बाबा म्हणतात - हा देवी-देवता धर्म खूप सुख देणारा आहे. त्यानंतर मग हे दुःख राहणार नाही. बाबा तुम्हाला किती हुशार बनवतात. हे लक्ष्मी-नारायण हुशार आहेत, तेव्हाच तर विश्वाचे मालक आहेत. बुद्धू काही विश्वाचे मालक होऊ शकत नाहीत. आधी तर तुम्ही काटे होता, आता फूल बनत आहात म्हणून बाबा देखील बगिच्यातून गुलाबाचे फूल घेऊन येतात की असे फूल बनायचे आहे. स्वतः येऊन फुलांचा बगीचा बनवतात. मग रावण येतो काट्यांचे जंगल बनविण्यासाठी. किती क्लियर आहे. या सर्वाचे चिंतन करायचे आहे. एकाची आठवण केल्याने त्यामध्ये सर्वकाही येते. बाबांकडून वारसा मिळतो. ही खूप मोठी संपत्ती आहे, शांतीचा देखील वारसा मिळतो कारण शांतीचा सागर तेच आहेत. लौकिक पित्याची अशी महिमा कधी करणार नाहीत. श्रीकृष्ण आहे सर्वात लाडका. सर्व प्रथम जन्म त्याचाच होतो म्हणून त्याला सर्वात जास्त प्रेम करतात. बाबा मुलांनाच संपूर्ण घराचा समाचार देतात. बाबा देखील पक्के व्यापारी आहेत, विरळाच कोणी असा व्यापार करेल. होलसेल व्यापारी कोणी मुश्किलीने बनतात. तुम्ही होलसेल व्यापारी आहात ना! बाबांची आठवण करतच राहता. कोणी रिटेलमध्ये सौदा करून मग विसरून जातात. बाबा म्हणतात - निरंतर आठवण करत रहा. वारसा मिळाला की मग आठवण करण्याची काही गरज राहणार नाही. लौकिक नात्यामध्ये पिता वृद्ध होतो तर काही-काही मुले शेवट पर्यंत देखील आधार बनतात. काही तर संपत्ती मिळाली आणि उडवून खलास करतात. बाबा (ब्रह्मा बाबा) सर्व गोष्टीत अनुभवी आहेत. तेव्हाच तर बाबांनी यांना आपला रथ बनवला आहे. गरिबीचा, श्रीमंतीचा सर्वांचा अनुभव आहे. ड्रामा अनुसार हा एकच रथ आहे. हा कधी बदलू शकत नाही. ड्रामा पूर्व नियोजित आहे, यामध्ये कधीही बदल होऊ शकत नाही. सर्व गोष्टी होलसेल आणि रिटेलमध्ये समजावून सांगतात आणि मग शेवटी म्हणतात - ‘मनमनाभव, मध्याजी भव’. मनमनाभव मध्ये सर्व काही येते. हा खूप जबरदस्त खजिना आहे, त्याने झोळी भरतात. अविनाशी ज्ञान रत्न एक-एक लाखो रुपयाचे आहेत. तुम्ही पद्मा-पदम भाग्यशाली बनता. बाबा तर सुख आणि दुःख दोन्ही पासून न्यारे आहेत. साक्षी होऊन ड्रामा पाहत आहेत. तुम्ही पार्ट बजावता. मी पार्ट बजावत असून देखील साक्षी आहे. जन्म-मरणामध्ये येत नाही. बाकीचे तर कोणी यापासून सुटू शकत नाहीत, मोक्ष मिळू शकत नाही. हा अनादि पूर्वनियोजित ड्रामा आहे. हे देखील आश्चर्य आहे. छोट्याशा आत्म्यामध्ये सारा पार्ट भरलेला आहे. हा अविनाशी ड्रामा कधी नाश होत नाही. अच्छा.

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) ज्याप्रमाणे बाबा मुलांवर बलिहार जातात, तसे तन-मन-धना सहित एकदाच बाबांवर पूर्ण कुर्बान जाऊन २१ जन्मांचा वारसा घ्यायचा आहे.

२) बाबा जे अविनाशी अनमोल खजिना देतात त्याने आपली झोळी सदैव भरपूर ठेवायची आहे. सदैव याच खुशी आणि नशेमध्ये रहायचे आहे की आपण पद्मा पदम भाग्यशाली आहोत.

वरदान:-
ब्राह्मण जीवनाची प्रॉपर्टी आणि पर्सनॅलिटीचा अनुभव करणारे आणि करविणारे विशेष आत्मा भव

बापदादा सर्व ब्राह्मण मुलांना स्मृती देतात की ब्राह्मण बनलात - अहो भाग्य! परंतु ब्राह्मण जीवनाचा वारसा, प्रॉपर्टी ‘संतुष्टता’ आहे आणि ब्राह्मण जीवनाची पर्सनॅलिटी ‘प्रसन्नता’ आहे. या अनुभवापासून कधी वंचित राहू नका. अधिकारी आहात. जेव्हा दाता, वरदाता मोठ्या मनाने प्राप्तींचा खजिना देत आहेत तर त्याला अनुभवामध्ये आणा आणि इतरांना देखील अनुभवी बनवा तेव्हा म्हणणार विशेष आत्मा.

बोधवाक्य:-
अंतिम समयाचा विचार करण्या ऐवजी अंतिम स्थितीचा विचार करा.