24-08-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड मुलांनो, सुख
देणाऱ्या बाबांची अतिशय प्रेमाने आठवण करा, आठवणीशिवाय प्रेम असू शकत नाही”
प्रश्न:-
बाबा, मुलांना
दररोज आठवणीचा अभ्यास करण्यासाठी इशारा का देत असतात?
उत्तर:-
कारण आठवणी
द्वारेच आत्मा पावन बनेल. आठवणी द्वारेच संपूर्ण वारसा घेऊ शकाल. आत्म्याची सर्व
बंधने नष्ट होतील. विकर्मांपासून मुक्त व्हाल. सजा होण्यापासून सुटका होईल. जितकी
आठवण कराल तितका आनंद होत राहील. लक्ष्य समीप आल्याचा अनुभव होईल. तुम्ही कधीही
थकणार नाही. बेहदचे सुख मिळेल; म्हणून आठवणीचा अभ्यास जरूर करायचा आहे.
गीत:-
बचपन के दिन
भुला ना देना…
ओम शांती।
गोड-गोड रूहानी
मुलांना गाण्याच्या ओळीचा अर्थ समजला आहे. आता जिवंतपणी तुम्ही बेहदच्या बाबांचे
बनला आहात. सतयुगामध्ये देखील हदच्या पित्याचे बनता. आता केवळ तुम्ही ब्राह्मण
मुलेच बेहदच्या पित्याची बनला आहात. तुम्ही जाणता - आपण बेहदच्या बाबांकडून बेहदचा
वारसा घेत आहोत. जर बाबांना सोडले तर बेहदचा वारसा मिळू शकणार नाही. भले तुम्ही
सांगता, परंतु थोडक्यात काही कोणी संतुष्ट होत नाही. मनुष्य भरपूर धनाची इच्छा
ठेवतात. धना शिवाय सुख मिळू शकत नाही. धन सुद्धा पाहिजे, शांती देखील पाहिजे, निरोगी
काया देखील पाहिजे. तुम्ही मुलेच हे जाणता की, दुनियेमध्ये आज काय आहे आणि उद्या
काय होणार आहे. विनाश तर समोर उभा आहे; इतर कोणाच्याही बुद्धीमध्ये या गोष्टी नाहीत.
आणि जरी समजले की, विनाश समोर उभा आहे, तरी देखील आपण काय करायला हवे हेच जाणत
नाहीत. तुम्हा मुलांना समजते आहे - असे वाटते की कधीही युद्ध सुरू होईल, थोडीशी
ठिणगी पडली तरीही विस्फोट होईल, वेळ लागणार नाही. यापूर्वी देखील छोट्याशा
गोष्टीवरून किती मोठे युद्ध सुरू झाले. मुले जाणतात की, ही जुनी दुनिया नष्ट झाली
की झाली; त्यामुळे लवकरात-लवकर बाबांकडून वारसा घ्यायचा आहे. बाबांची निरंतर आठवण
करत राहाल तर खूप हर्षित राहाल. देह-अभिमानामध्ये आल्यानेच तो आनंद गायब होतो.
देही-अभिमानी बनता तेव्हा बाबांची आठवण करता. देह-अभिमानामध्ये आल्याने बाबांना
विसरून दुःख झेलता. जितकी बाबांची आठवण कराल, तितके बेहदच्या बाबांकडून सुख प्राप्त
कराल. इथे तुम्ही आलाच आहात असे लक्ष्मी-नारायण बनण्याकरिता. राजा-राणी आणि प्रजेचा
नोकर-चाकर यामध्ये खूप फरक आहे ना. आताचा पुरुषार्थ मग कल्प-कल्पांतरासाठी कायमचा
होतो. अखेरीला सर्वांना साक्षात्कार होईल - की आपण किती पुरुषार्थ केला. आता देखील
बाबा म्हणतात - आपल्या अवस्थेला बघत राहा की, अतिशय गोड असे बाबा, ज्यांच्याकडून
स्वर्गाचा वारसा मिळतो, त्यांची आपण किती आठवण करतो. तुमचे सर्व काही आठवणीवरच
अवलंबून आहे. जितकी आठवण कराल तितका आनंद देखील होईल. असे वाटेल बस्स, आता जवळ येऊन
पोहोचलो आहोत. काहीजण मग थकून देखील जातात, म्हणतात - माहित नाही, मंजिल अजून किती
दूर आहे, पोहोचलो तर मेहनत सुद्धा सफल होईल. दुनियेला देखील हे ठाऊक नाही की भगवान
कोणाला म्हटले जाते. म्हणतात देखील, ‘हे भगवान’ आणि मग म्हणतात - ‘भगवान
दगडा-मातीमध्ये आहे’. आता तुम्हा मुलांना समजते आहे आपण बाबांचे बनलो आहोत. आता
बाबांच्याच मतावर चालायचे आहे. भले परदेशामध्ये जरी आहात तरीही तिथे राहून देखील
फक्त बाबांची आठवण करायची आहे. तुम्हाला श्रीमत तर मिळाले आहे. आत्मा, बाबांच्या
आठवणी शिवाय तमोप्रधानापासून सतोप्रधान बनू शकत नाही. तुम्ही म्हणता - ‘बाबा, आम्ही
तुमच्याकडून पूर्ण वारसा घेणार. जसे आमचे बाबा (ब्रह्मा बाबा) वारसा घेतात, आम्ही
देखील पुरुषार्थ करून त्यांच्या गादीवर जरूर बसणार. मम्मा-बाबा राज-राजेश्वर आणि
राज-राजेश्वरी बनतात, तर आम्ही देखील बनणार’. परीक्षा तर सर्वांसाठी एकच आहे.
तुम्हाला फार थोडे शिकवले जाते, फक्त बाबांची आठवण करा. याला म्हटले जाते - ‘सहज
राजयोग बळ’. तुम्ही समजता - योगाद्वारे खूप बळ मिळते, जर आम्ही कोणतेही विकर्म केले
तर खूप सजा खावी लागेल, पद भ्रष्ट होईल. आठवणीमध्येच माया विघ्न आणते.
तुम्ही जाणता आपण
पावन दुनियेमध्ये जात आहोत. जे ब्राह्मण बनतील तेच निमित्त बनतील. ब्रह्मामुखवंशावळी
ब्राह्मण बनल्याशिवाय तुम्ही बाबांकडून वारसा घेऊ शकत नाही. बाबा मुलांना रचतातच
मुळी वारसा देण्याकरिता. शिवबाबांचे तर आपण आहोतच. ते नवीन सृष्टी रचतात मुलांना
वारसा देण्याकरिता. शरीरधारीलाच वारसा देतील. आत्मे तर वर (परमधाम मध्ये) राहतात.
तिथे काही वारसा अथवा प्रारब्धाची गोष्टच नाही. तुम्ही आता पुरुषार्थ करून प्रारब्ध
घेत आहात, ज्याच्या विषयी दुनियेला ठाऊक सुद्धा नाहीये. आता वेळ जवळ येत जात आहे.
धमकी देत राहतात की, ‘अमक्याने जर असे केले तर आम्ही त्यांना उडवून टाकू’. उडवण्याची
तयारी चालू आहे. बॉम्ब्स इत्यादी काही ठेऊन देण्यासाठी बनवलेले नाहीत. तयारी मोठ्या
प्रमाणात चालू आहे. ब्रिटिश गव्हर्मेंटच्या वेळी पाकिस्तान, हिंदुस्तान अस्तित्वात
होते का? लिहिलेले आहे - यवनांचे युद्ध. पांडव आणि कौरवांचे युद्ध नाहीये. खरोखर,
यवन युद्ध करत आहेत. बॉम्ब्स देखील तयार झाले आहेत. आता बाबा आम्हाला आदेश देत आहेत
की, माझी आठवण करा, नाहीतर अखेरीला खूप रडावे लागेल. परीक्षेमध्ये नापास होतात तर
रागाने जाऊन आत्महत्या करतात. इथे राग येण्याचा तर प्रश्नच नाही. अखेरीला तुम्हाला
खूप साक्षात्कार होतील. आपण काय-काय बनणार ते देखील समजेल. बाबांचे काम आहे
पुरुषार्थ करवून घेणे. म्हणतात - ‘मुलांनो, कर्म करत असताना देखील आठवण करायला
विसरता किंवा फुरसत मिळत नाही; तर मग ठीक आहे बसा, बसून बाबांची आठवण करा’.
आपसामध्ये जेव्हा तुम्ही भेटता तेव्हा देखील हा प्रयत्न करा की आपण बाबांची आठवण
करत राहावी. एकत्र येऊन बसल्याने तुम्ही आठवण चांगली कराल, मदत मिळेल. मुख्य गोष्ट
आहे बाबांची आठवण करणे. इथे (सेंटरवर) या अथवा नका येऊ, परदेशामध्ये जाता तर मग येऊ
शकणार नाही. तिथे देखील फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा. बाबांच्या आठवणीनेच तुम्ही
तमोप्रधानापासून सतोप्रधान बनाल. बाबा म्हणतात, फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा -
बाबांची आठवण करा. बाबा म्हणतात - मनमनाभव. माझी आठवण करा तर विश्वाचे मालक बनाल.
मुख्य गोष्ट असते आठवणीची. कुठेही जाण्याची काही गोष्ट नाहीये. घरी रहा परंतु फक्त
बाबांची आठवण करत राहा. पवित्र बनला नाहीत तर बाबांची आठवण करू शकणार नाही. असे
थोडेच आहे की, सर्व येऊन क्लासमध्ये शिकतील. मंत्र घेतला; मग भले कुठेही जा.
सतोप्रधान बनण्याचा मार्ग बाबांनी सांगितला आहे. तसे तर सेंटरवर आल्याने नवीन-नवीन
पॉईंट्स ऐकत राहाल. जर कोणत्या कारणामुळे येऊ शकत नसाल, पाऊस पडत असेल अथवा कर्फ्यू
लागला असेल, कोणीही बाहेर पडू शकत नसेल, मग काय कराल. बाबा म्हणतात - काही हरकत नाही.
कुठेही राहून तुम्ही आठवणीमध्ये राहा. चालता-फिरता आठवण करा. इतरांना देखील हेच
सांगा की, बाबांची आठवण केल्याने विकर्म विनाश होतील आणि देवता बनाल. शब्द आहेतच
मुळी दोन.
बाबा म्हणतात - बालपण
विसरून जाऊ नका. आज हसत आहात, उद्या रडावे लागेल - जर बाबांना विसरला तर. बाबांकडून
पूर्ण वारसा घेतला पाहिजे. असे बरेच जण म्हणतात की स्वर्गामध्ये तर जाऊ ना, मग जे
काही भाग्यामध्ये असेल ते. याला काही पुरुषार्थ करणे म्हणणार नाही. मनुष्य
पुरुषार्थ करतातच मुळी उच्च पद प्राप्त करण्याकरिता. आता जेव्हाकी बाबांकडून उच्च
पद मिळत आहे तर निष्काळजीपणा कशाला केला पाहिजे. स्कूलमध्ये जे शिकणार नाहीत त्यांना
शिकलेल्यांसमोर पाणी भरावे लागेल. जर बाबांची पूर्णपणे आठवण केली नाहीत तर मग जाऊन
प्रजेचे देखील नोकर-चाकर बनाल. यामध्ये खुश थोडेच झाले पाहिजे. तर बाबा समजावून
सांगत आहेत - गोड-गोड मुलांनो, सन्मुख रिफ्रेश होऊन जाता. बऱ्याचजणी बांधेली देखील
आहेत, काही हरकत नाही, घरी बसून आठवण करत राहा. तुम्हाला किती सोपे उपाय समजावून
सांगतात; मृत्यू समोर उभा आहे, युद्ध अचानकच सुरू होईल. एकमेकांना धमकावतात - ‘थोडी
जरी गडबड केलीत तर आम्ही असे करू’. अगोदरच सांगून टाकतात, बॉम्ब्सचा अहंकार खूप आहे.
बाबा म्हणतात - ‘मुले अजून योगबळामध्ये तरबेज झालेली नाहीत’; असे होऊ नये की युद्ध
सुरू होईल. परंतु ड्रामा अनुसार असे होणारच नाही. मुलांनी पूर्ण वारसा घेतलेला
नाहीये त्यामुळे हा विश्वास आहे की, हे युद्ध जरी सुरू झाले तरी देखील बंद सुद्धा
होईल कारण अजून राजधानी स्थापन झालेली नाही. वेळ पाहिजे. पुरुषार्थ करवून घेत
राहतात, ठाऊक नाही कोणत्याही वेळेला काहीही होऊ शकते. बस कोसळते, विमान कोसळते,
ट्रेन घसरून पडते, मृत्यू किती सहज उभा आहे. धरणीकंप देखील होत राहतात. सर्वात
जास्त काम भूकंपाला करायचे आहे. परंतु विनाश होण्यापूर्वी बाबांकडून पूर्ण वारसा
घ्यायचा आहे; त्यासाठी अतिशय प्रेमाने बाबांची आठवण करायची आहे - ‘बाबा,
तुमच्याशिवाय आमचे दुसरे कोणीही नाही’. फक्त बाबांचीच आठवण करत राहा. जसे छोट्या
मुलांना समजावून सांगितले जाते, तसे किती सोप्या रीतीने समजावून सांगत आहेत, जास्त
काही त्रास देत नाही, फक्त आठवण करा. आणि काम-चितेवर बसून तुम्ही जे जळून खाक झाला
आहात, ते आता ज्ञान-चितेवर बसून पवित्र बना. तुम्हाला विचारतात की, ‘तुमचे ध्येय
काय आहे?’ तर बोला - ‘जे सर्वांचे पिता आहेत ते म्हणत आहेत की, मामेकम् (मज एकाची)
आठवण करा तर तुमची विकर्म विनाश होतील आणि तुम्ही तमोप्रधानापासून सतोप्रधान बनाल.
सर्वांचे सद्गती दाता एक बाबाच आहेत. आता बाबा म्हणतात - फक्त माझी आठवण करा म्हणजे
मग गंज उतरेल’. हा एवढा संदेश द्या, तर संदेश देऊ शकता ना. स्वतः आठवण करतील
तेव्हाच तर दुसऱ्यांना आठवण करून देऊ शकतील, दुसऱ्यांना आवडीने सांगतील. नाहीतर ते
शब्द हृदयापासून येणार नाहीत. बाबा म्हणतात - कुठेही असा जितके शक्य होईल फक्त
बाबांची आठवण करा. भले खाणे-पिणे इत्यादीचा थोडा त्रास होतो. राहायचे तर घरीच आहे
ना. घरी राहत असताना बाबांची आठवण करा, जो भेटेल त्याला हीच शिकवण द्या - ‘समोर
मृत्यू उभा आहे’.
बाबा म्हणतात - तुम्ही
सर्व तमोप्रधान पतित बनला आहात, आता माझी आठवण करा आणि पवित्र बना. आत्माच पतित बनली
आहे, सतयुगामध्ये असते - पावन आत्मा. बाबांच्या आठवणी द्वारेच आत्मा पावन बनेल दुसरा
कोणताही उपाय नाही. हा संदेश सर्वांना देत जा, म्हणजे मग अनेकांचे कल्याण कराल,
अजून कोणताही त्रास देत नाही. पुरुषोत्तम महिन्यामध्ये देखील जाऊन सर्वांना समजावून
सांगा की, सर्वात पुरुषोत्तम कोण आहे? सतयुग आदिमध्ये हे लक्ष्मी-नारायण पुरुषोत्तम
होते. यांना असे पुरुषोत्तम बनविणारे अर्थात स्वर्गाची स्थापना करणारे बाबा आहेत.
सर्व आत्म्यांना पावन बनविणारे पतित-पावन बाबाच आहेत. सर्वात उत्तम ते उत्तम पुरुष
बनविणारे बाबाच आहेत. जे पूज्य होते तेच मग पुजारी बनले आहेत. रावण राज्यामध्ये आपण
पुजारी बनलो, रामराज्यामध्ये पूज्य होतो. आता रावण राज्याचा अंत आहे. आपण पुजारी
पासून पुन्हा पूज्य बनत आहोत. बाबांची आठवण करण्याचा इतरांनाही मार्ग सांगायचा आहे.
वृद्ध मातांनी देखील ही सेवा केली पाहिजे. मित्र-नातेवाईकांना देखील बाबांचा परिचय
द्या. बोला, ‘शिवबाबा म्हणतात - मामेकम् (मजा एकाची) आठवण करा तर तुम्ही स्वर्गाचे
मालक बनाल’. निराकार शिवबाबा, सर्वांचे सद्गती दाता बाबा, सर्व आत्म्यांना म्हणत
आहेत की, माझी आठवण करा तर सतोप्रधान बनाल. हे समजावून सांगणे तर सोपे आहे ना.
वृद्ध माता देखील ही सेवा करू शकतात. मुख्य गोष्ट हीच आहे. लग्नसराई इत्यादी कुठेही
जा, कानामध्ये हीच गोष्ट सांगा - ‘गीतेचे भगवान म्हणत आहेत की माझी आठवण करा’; या
गोष्टीला सर्वजण पसंत करतील. जास्त बोलण्याची गरज नाही. फक्त बाबांचा संदेश द्यायचा
आहे की, ‘बाबा म्हणतात - माझी आठवण करा’.
ठीक आहे, पाहिजे तर
असे समजा की भगवान प्रेरणा करत आहेत. स्वप्नामध्ये साक्षात्कार होतो, आवाज ऐकू येतो
- ‘बाबा म्हणतात माझी आठवण करा तर सतोप्रधान बनाल’. तुम्ही स्वतः देखील फक्त याचे
चिंतन करत राहा म्हणजे मग बेडा पार होईल (जीवन रुपी नौका पार होईल). आपण
प्रॅक्टिकलमध्ये बेहदच्या बाबांचे बनलो आहोत आणि बाबांकडून २१ जन्मांचा वारसा घेत
आहोत, तर आनंद झाला पाहिजे ना. बाबांना विसरल्याने त्रास होतो. बाबा किती सोपे करून
सांगत आहेत की, ‘माझी आठवण करा’; तर सर्वजण समजतील यांना मार्ग तर खरोखर योग्य
मिळाला आहे. हा मार्ग कधी कोणीही सांगू शकणार नाही. काळ असा असेल जे तुम्ही घरातून
बाहेर देखील पडू शकणार नाही. बाबांची आठवण करत-करत शरीर सोडाल. ‘अंतकाल जो शिवबाबा
सिमरे… फिर नारायण योनि बल-बल उतरे’. लक्ष्मी-नारायणाच्या घराण्यामध्ये येतील. नेहमी
राजाई पद प्राप्त करतील. बस्स, फक्त प्रेमाने बाबांची आठवण करा. आठवणी शिवाय प्रेम
कसे कराल. सुख मिळते तेव्हाच तर आठवण केली जाते. दुःख देणाऱ्यावर प्रेम केले जात
नाही. बाबा म्हणतात - मी तुम्हाला स्वर्गाचा मालक बनवतो त्यामुळे तुम्ही माझ्यावर
प्रेम करा. बाबांच्या मतावर चालले पाहिजे ना. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) शिक्षणाच्या
बाबतीत कधीही निष्काळजीपणा करायचा नाही. युद्ध सुरू होण्यापूर्वी बाबांकडून संपूर्ण
वारसा घ्यायचा आहे.
२) श्रीमतावर बाबांची
अतिशय प्रेमाने आठवण करायची आहे.
वरदान:-
संकल्प, वृत्ती
आणि स्मृतिद्वारे व्यर्थला समाप्त करणारे सच्चे ब्राह्मण संपूर्ण पवित्र भव
आपल्या संकल्प, वृत्ती
आणि स्मृतीला चेक करा - असे नाही की, थोडेसे काही चुकले, पश्चाताप केला, माफी
मागितली, म्हणजे मोकळे झालो. कितीही कोणी माफी मागेल परंतु जे पाप अथवा व्यर्थ कर्म
झाले आहे त्याची खूण नाहीशी होत नाही. रजिस्टर साफ स्वच्छ होत नाही. केवळ एक विधी
म्हणून याचे पालन करू नका; परंतु हे लक्षात राहावे की, ‘मी संपूर्ण पवित्र ब्राह्मण
आहे’. अपवित्रता - संकल्पाला, वृत्तीला आणि स्मृतीला स्पर्श देखील करू शकत नाही.
त्यामुळे पावलोपावली सावध राहा.
बोधवाक्य:-
बाबांच्या
सोबतीला उपयोगात आणा म्हणजे मग कधीही दिलशिकस्त (निराश) होणार नाही.
हे अव्यक्त इशारे -
अपवित्रतेच्या बीजाला सुद्धा नष्ट करून संपूर्ण स्वच्छ (पवित्र) बना.
पवित्रतेचे रहस्य
प्रॅक्टिकल मध्ये आणणे अर्थात संकल्प रूपामध्ये देखील पाचही विकारांवर विजयी बनणे.
व्यर्थ संकल्प, क्रोध देखील उत्पन्न करतो, तर काम-विकार अर्थात कोणत्याही
आत्म्याप्रती व्यर्थ दृष्टी जरी जात असेल तरीही त्यावेळी पवित्रता मानली जाणार नाही.
तर तुम्ही हे व्यर्थ संकल्प बाबांच्या प्रेमाखातर समर्पित करा.