24-09-2024
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - तुम्ही जेवढा वेळ बाबांच्या आठवणीमध्ये रहाल तेवढा वेळ कमाईच कमाई आहे,
आठवणीनेच तुम्ही बाबांच्या जवळ येत जाल”
प्रश्न:-
जी मुले
बाबांच्या आठवणीमध्ये राहू शकत नाहीत, त्यांना कोणत्या गोष्टीची लाज वाटते?
उत्तर:-
आपला चार्ट लिहिण्याची त्यांना लाज वाटते. समजतात की खरे लिहिले तर बाबा काय
म्हणतील? परंतु मुलांचे कल्याण यातच आहे की, खरा-खरा चार्ट लिहीत राहणे. चार्ट
लिहिण्याचे खूप फायदे आहेत. बाबा म्हणतात - मुलांनो, यामध्ये लाज वाटू देऊ नका.
ओम शांती।
रूहानी बाबा बसून मुलांना समजावून सांगत आहेत. आता तुम्ही मुले १५ मिनिटे आधी येऊन
बाबांच्या आठवणीमध्ये बसता. आता इथे दुसरे तर कोणते काम नाहीये. येऊन बाबांच्या
आठवणीमध्येच बसता. भक्तीमार्गामध्ये तर बाबांचा परिचयच नव्हता. इथे बाबांचा परिचय
मिळाला आहे आणि बाबा म्हणतात - ‘मामेकम् (मज एकाची) आठवण करा. मी तर सर्व मुलांचा
पिता आहे. बाबांची आठवण केल्यावर मग वारसा आपोआप आठवला पाहिजे. काही लहान मुले तर
नाही आहात ना. भले लिहितात आम्ही ५ महिन्यांचे किंवा ३ महिन्यांचे आहोत परंतु तुमची
कर्मेंद्रिये तर मोठी आहेत. तर रूहानी बाबा समजावून सांगत आहेत - ‘इथे बाबा आणि
वारशाच्या आठवणीमध्ये बसायचे आहे’. हे जाणता की आपण नरापासून नारायण बनण्यासाठी
पुरुषार्थामध्ये तत्पर आहोत आणि स्वर्गामध्ये जाण्यासाठी पुरुषार्थ करत आहोत. तर
मुलांनी हे लिहून ठेवले पाहिजे की, इथे बसल्या-बसल्या आपण किती वेळ आठवण केली?
लिहिल्यामुळे बाबांना समजेल. असे नाही की बाबांना, प्रत्येकजण किती वेळ आठवणीमध्ये
राहतो ते समजते? ते तर प्रत्येकजण आपल्या चार्टवरून समजू शकतो - बाबांची आठवण होती
की बुद्धी कुठे दुसरीकडे गेली? हे देखील लक्षात राहिले की ‘आता बाबा येणार’ तर हे
देखील आठवण करणे झाले ना. किती वेळ आठवण केली हे चार्टमध्ये खरे लिहितील. खोटे
लिहिल्याने तर अजूनच शंभर पट पाप चढेल अजूनच नुकसान होईल म्हणून खरे लिहायचे आहे -
जितकी आठवण कराल तितकी विकर्म विनाश होतील. आणि हे देखील जाणता की आपण आणखी
बाबांच्या जवळ येत जातो. शेवटी जेव्हा आठवण पूर्ण होईल तेव्हा मग आम्ही बाबांकडे
निघून जाऊ. मग कोणी तर लगेच नवीन दुनियेमध्ये येऊन पार्ट बजावतील, कोणी तिथेच बसून
राहतील. तिथे कोणता संकल्प तर येणार नाही. ते आहेच मुक्तीधाम, सुख-दुःखापासून न्यारे.
सुखधाममध्ये जाण्यासाठी तुम्ही आता पुरुषार्थ करता. जेवढी तुम्ही आठवण कराल तेवढी
विकर्म विनाश होतील. आठवणीचा चार्ट ठेवल्याने ज्ञानाची धारणा देखील चांगली होईल.
चार्ट ठेवण्याचे फायदेच फायदे आहेत. बाबा जाणतात आठवणीमध्ये न राहिल्यामुळे
लिहिण्याची लाज वाटते. बाबा काय म्हणणार, मुरलीमध्ये ऐकवतील. बाबा म्हणतात -
‘यामध्ये लाजण्याची काय गरज आहे’. प्रत्येकजण मनातून समजू शकतो - मी आठवण करतो की
नाही? कल्याणकारी बाबा तर समजावून सांगतात लिहून ठेवाल तर कल्याण होईल. बाबा
येईपर्यंत, जितका वेळ जे बसले त्यामध्ये आठवणीचा चार्ट किती होता? फरक बघायला हवा.
आवडत्या गोष्टीची तर खूप आठवण केली जाते. कुमार-कुमारीचा साखरपुडा झाला की त्यांच्या
मनामध्ये एकमेकांची आठवण टिकून राहते आणि लग्न झाल्यावर मग पक्की होते. न बघता
समजतात - आमचा साखरपुडा झाला आहे. आता तुम्ही मुले जाणता की शिवबाबा आमचे बेहदचे
बाबा आहेत. भले बघितलेले नाहीये परंतु बुद्धीने समजू शकता, ते बाबा जर
नावा-रूपापासून वेगळे आहेत तर मग पूजा कोणाची करता? आठवण का करता? नावा-रूपापासून
वेगळी बेअंत अशी तर कोणती वस्तू असतच नाही. जरूर वस्तूला बघितले जाते तेव्हाच तर
वर्णन केले जाते. आकाशाला देखील बघतात ना. बेअंत म्हणू शकत नाही. भक्तीमार्गामध्ये
भगवंताची आठवण करतात - ‘हे भगवान’ तर बेअंत थोडेच म्हणणार. ‘हे भगवान’ म्हटल्यावर
तर लगेच त्याची आठवण येते तर जरूर काहीतरी चीज आहे. आत्म्याला देखील आपण समजू शकतो
परंतु पाहता येत नाही.
सर्व आत्म्यांचे पिता
एकच आहेत, त्यांना देखील समजू शकतो. तुम्ही मुले जाणता - बाबा येऊन शिकवतातसुद्धा.
आधी हे माहीत नव्हते की ते शिकवतात देखील. श्रीकृष्णाचे नाव टाकले आहे. श्रीकृष्ण
तर या डोळ्यांनी दिसतो. त्याला तर बेअंत, नावा-रूपा पासून वेगळा म्हणू शकत नाही.
श्रीकृष्ण तर कधी असे म्हणणार नाही - ‘मामेकम् याद करो’. तो तर सन्मुख आहे. त्याला
‘बाबा’ असे म्हणणार देखील नाही. माता तर श्रीकृष्णाला बाळ समजून मांडीवर घेतात.
जन्माष्टमीला छोट्या श्रीकृष्णाला पाळण्यात झुलवतात. तो नेहमीच लहान असतो का! मग
रास-विलास सुद्धा करतात. तर नक्कीच थोडा मोठा झाला मग त्यापेक्षा मोठा झाला आणि मग
काय झाले, कुठे गेला, कोणालाच माहीत नाही. कायमचा छोटा देह तर राहणार नाही ना.
काहीच विचार करत नाहीत. ही पूजा इत्यादीची परंपरा चालू होते. ज्ञान तर कोणालाच
नाहीये. दाखवतात की, श्रीकृष्णाने कंसपुरीमध्ये जन्म घेतला. आता कंसपुरीची तर
गोष्टच नाही. कोणीही विचारच करत नाहीत. भक्त लोक तर म्हणतील श्रीकृष्ण हाजिरा-हजूर
आहे (सर्वव्यापी आहे) मग त्याला आंघोळ देखील घालतात, खाऊ देखील घालतात. आता तो खात
तर नाही. मूर्तीच्या समोर ठेवतात आणि स्वतः खाऊन टाकतात. हा देखील भक्तीमार्ग झाला
ना. श्रीनाथजीला इतका भोग (नैवेद्य) दाखवतात, तो तर खात नाही, स्वतः खाऊन टाकतात.
देवींच्या पूजेच्या बाबतीतही असे करतात. आपणच देवी बनवतात, तिची पूजा वगैरे करून मग
बुडवून टाकतात. दागिने इत्यादी काढून घेऊन बुडवतात मग तिथे तर असे बरेच लोक असतात,
ज्याच्या हाताला जे येईल ते उचलून घेऊन जातात. देवींचीच जास्त पूजा होते. लक्ष्मी
आणि दुर्गा दोघींच्या मुर्त्या बनवतात. मोठी मम्मा देखील इथे बसली आहे ना, जिला
‘ब्रह्मपुत्रा’सुद्धा म्हणतात. तुम्ही समजता ना की तिच्या या जन्माची आणि
भविष्यातील रूपाची पूजा करत आहेत. किती अद्भुत ड्रामा आहे. अशा प्रकारच्या गोष्टी
शास्त्रांमध्ये येऊ शकत नाहीत. ही आहे प्रत्यक्ष कृती. तुम्हा मुलांना आता ज्ञान आहे.
समजता - सर्वात जास्त चित्रे आत्म्यांची बनवली आहेत. जेव्हा रुद्र-यज्ञ रचतात तेव्हा
लाखों शाळिग्राम बनवतात. देवींची कधी लाखों चित्रे बनवणार नाहीत. ते तर जितके पुजारी
असतील तितक्या देवी बनवत असतील. ते (दुनियावाले) तर एकाच वेळी लाख शाळिग्राम बनवतात.
त्यांचा कोणता नक्की दिवस नसतो. कोणताही मुहूर्त वगैरे नसतो, जशी देवींची पूजा
ठरलेल्या वेळेला होते. श्रीमंत लोकांच्या तर जेव्हा मनात येईल की, आता रुद्र अथवा
शाळिग्राम यज्ञ रचावा तर त्यावेळी ब्राह्मणांना बोलावतील. ‘रुद्र’ म्हटले जाते एका
बाबांना आणि मग त्यांच्या सोबत भरपूर शाळिग्राम बनवतात. ते श्रीमंत लोक सांगतात -
इतके शाळिग्राम बनवा. त्याची काही तिथी-तारीख निश्चित नसते. असे देखील नाही की
शिवजयंतीलाच रुद्र पूजा करतात. नाही, बरेचदा शुभ-दिवशी गुरुवारीच ठेवतात. दिवाळीला
ताटामध्ये लक्ष्मीचे चित्र ठेवून त्याची पूजा करतात. आणि मग ठेवून देतात. ती आहे
महालक्ष्मी, युगल (जोडी) आहे ना. मनुष्य या गोष्टींना जाणत नाहीत. लक्ष्मीला पैसे
कुठून मिळतील? जोडी तर पाहिजे ना. तर ही (लक्ष्मी-नारायण) युगल आहे. मग नाव
महालक्ष्मी ठेवतात. देवी कधी होत्या, महालक्ष्मी केव्हा होऊन गेली? या सर्व गोष्टी
मनुष्यांना माहीत नाहीत. तुम्हाला आता बाबा बसून समजावून सांगत आहेत. तुमच्यामध्ये
देखील सर्वांना एकसारखी धारणा होत नाही. बाबा इतके सर्व समजावून सांगून मग तरीही
म्हणतात - ‘शिवबाबांची आठवण आहे? वारशाची आठवण आहे?’ मूळ गोष्ट ही आहे.
भक्तीमार्गामध्ये किती पैसे वाया घालवतात. इथे तुमचा एक पैसासुद्धा वाया जात नाही.
तुम्ही सेवा करता संपन्न, पवित्र बनण्यासाठी. भक्तीमार्गामध्ये तर खूप पैसे खर्च
करतात, अपवित्र बनतात. सर्व मातीत मिसळून जाते. किती फरक आहे! या वेळी जे काही
करतात ते ईश्वरीय सेवेमध्ये शिवबाबांना देतात. शिवबाबा तर खात नाहीत, खाता तुम्ही.
तुम्ही ब्राह्मण (pause घेणे) मधले ट्रस्टी आहात; ब्रह्माला देत नाही. तुम्ही
शिवबाबांना देता. म्हणतात - ‘बाबा, तुमच्यासाठी धोतर-सदरा आणले आहे’. बाबा म्हणतात
- ‘यांना (ब्रह्मा बाबांना) देऊन तुमचे काहीही जमा होणार नाही. जमा ते होते जे
तुम्ही शिवबाबांची आठवण करून यांना देता’. आणि मग हे तर समजता ब्राह्मणांचे
शिवबाबांच्या खजिन्यातूनच पालन-पोषण होते. बाबांना विचारण्याची गरजच नाही की काय
पाठवू? हे तर घेणार नाहीत. जर ब्रह्माची आठवण केलीत तर तुमचे जमाच होणार नाही.
ब्रह्माला तर घ्यायचे आहे शिवबाबांच्या खजिन्यातून. तर शिवबाबांचीच आठवण येईल. तुमची
वस्तू का घेऊ. बी. कें. ना देणेसुद्धा चुकीचे आहे. बाबांनी सांगितले आहे तुम्ही
कोणाकडूनही वस्तू घेऊन वापरलीत तर त्यांचीच आठवण येत राहील. कोणती क्षुल्लक वस्तू
असेल तर तिचा प्रश्न नाही. चांगली वस्तू असेल तर अजूनच आठवण करून देईल - अमक्याने
ही दिली आहे. त्यांचे काही जमा तर होत नाही. तर नुकसान झाले ना. शिवबाबा म्हणतात
मामेकम् (मज एकाची) आठवण करा. मला कपडे इत्यादीची आवश्यकता नाही. कपडे वगैरे मुलांना
हवेत. ते शिवबाबांच्या खजिन्यातून वापरतील. मला तर स्वतःचे शरीरच नाही. यांना तर
शिवबाबांच्या खजिन्यातून घेण्याचा अधिकार आहे. राज्यपदाचे सुद्धा अधिकारी आहेत. मुले,
पित्याच्या घरीच खातात-पितात ना. तुम्ही देखील सेवा करता, कमाई करत राहता. जितकी
सेवा जास्त, तितकी कमाई होईल. शिवबाबाच्या भंडाऱ्यातून खातील-पितील. त्यांना दिले
नाहीत तर जमा होणार नाही. शिवबाबांनाच द्यायचे असते. बाबा, आम्ही तुमच्याद्वारे
भविष्य २१ जन्मांसाठी पद्मापद्मपती बनणार. पैसे तर संपून जातील त्यामुळे समर्थ
असणाऱ्याला आम्ही देतो. शिवबाबा समर्थ आहेत ना. ते २१ जन्मांसाठी देतात. ईश्वर अर्थ
इनडायरेक्ट सुद्धा देतात ना. इनडायरेक्टमध्ये बाबा इतके समर्थ नाहीत. आता तर खूप
समर्थ आहेत कारण सन्मुख आहेत. वर्ल्ड ऑलमायटी ऑथॉरिटी या वेळेसाठी आहेत.
ईश्वर अर्थ काही
दान-पुण्य करतात तर अल्पकाळासाठी काही तरी मिळते. इथे तर बाबा तुम्हाला समजावून
सांगतात - मी सन्मुख आहे. मीच देणारा आहे. याने (ब्रह्माबाबाने) देखील शिवबाबांना
सर्व काही देऊन साऱ्या विश्वाची बादशाही घेतली ना. हे देखील जाणता - या व्यक्तचाच (ब्रह्मा
बाबांचाच) अव्यक्त रूपामध्ये साक्षात्कार होतो. यांच्यामध्ये शिवबाबा येऊन मुलांशी
बोलतात. कधीही हा विचार येता कामा नये की आपण मनुष्याकडून घ्यावे. तुम्ही सांगा,
शिवबाबांच्या भंडाऱ्यामध्ये पाठवून द्या, यांना देऊन तर काहीच मिळणार नाही, अजूनच
नुकसान होईल. गरीब असतील, तर फारफारतर ३-४ रूपयांची एखादी वस्तू तुम्हाला देतील.
त्यापेक्षा तर शिवबाबांच्या भंडाऱ्यामध्ये दिल्याने पद्म होतील. स्वतःचे नुकसान
थोडेच करून घ्यायचे आहे. जास्त करून देवींचीच पूजा होते कारण तुम्ही देवीच ज्ञान
देण्यासाठी खास निमित्त बनता. भले गोप देखील ज्ञान देतात परंतु जास्त करून तर माताच
ब्राह्मणी बनून रस्ता दाखवतात त्यामुळे देवींचे नाव जास्त आहे. देवींची खूप पूजा
होते. तुम्ही मुले हे देखील जाणता अर्धा कल्प आपण पूज्य होतो. आधी आहात पूर्ण पूज्य,
मग अर्धे पूज्य कारण दोन कला कमी होतात. रामाचे घराणे म्हणणार त्रेतामध्ये. ते (दुनियावाले)
तर लाखो वर्षांची गोष्ट म्हणतात, तर त्याचा काही हिशोबच मिळू शकत नाही.
भक्तीमार्गवाल्यांच्या बुद्धीमध्ये आणि तुमच्या बुद्धीमध्ये किती दिवस-रात्री एवढा
फरक आहे! तुम्ही आहात - ईश्वरीय-बुद्धी, ते आहेत - रावण-बुद्धी. तुमच्या बुद्धीमध्ये
आहे की हे पूर्ण चक्रच ५ हजार वर्षांचे आहे, जे फिरत रहाते. जे रात्रीमध्ये आहेत ते
लाखो वर्षे म्हणतात, जे दिवसामध्ये आहेत ते ५ हजार वर्षे म्हणतात. भक्तीमार्गामध्ये
अर्धा कल्प तुम्ही असत्य गोष्टी ऐकल्या आहेत. सतयुगामध्ये अशा गोष्टी असतच नाहीत.
तिथे तर वारसा मिळतो. आता तुम्हाला डायरेक्ट मत मिळते. श्रीमद्भगवतगीता आहे ना. इतर
कोणत्याही शास्त्रांमध्ये ‘श्रीमद्’ नाव नाही आहे. दर ५ हजार वर्षांनंतर हे
पुरुषोत्तम संंगमयुग, गीतेचे युग येते. लाखो वर्षांची तर गोष्ट असू शकत नाही. कधीही
कोणी आले तर संगमावर घेऊन जा. बेहदच्या बाबांनी रचयिता अर्थात् स्वतःचा आणि रचनेचा
सर्व परिचय दिला आहे. तरी देखील म्हणतात - ठीक आहे, बाबांची आठवण करा, आणखी काही
धारणा करू शकत नसाल तर स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. पवित्र तर बनायचेच आहे.
बाबांकडून वारसा घेता तर दैवी गुण देखील धारण करायचे आहेत. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) २१
जन्मांकरता पद्मांची कमाई जमा करण्यासाठी सर्वकाही ईश्वरीय सेवेमध्ये डायरेक्ट सफल
करायचे आहे. ट्रस्टी बनून शिवबाबांच्या नावाने सेवा करायची आहे.
२) आठवणीमध्ये जितका
वेळ बसता, तितका वेळ बुद्धी कुठे-कुठे गेली हे चेक करायचे आहे. आपला खरा-खरा
पोतामेल (चार्ट) ठेवायचा आहे. नरापासून नारायण बनण्यासाठी बाबा आणि वारशाच्या
आठवणीमध्ये रहायचे आहे.
वरदान:-
विस्मृतीच्या
दुनियेतून निघून स्मृती-स्वरूप राहून हिरो पार्ट बजावणारे विशेष आत्मा भव
हे संंगमयुग स्मृतीचे
युग आहे आणि कलियुग विस्मृतीचे युग आहे. तुम्ही सगळे विस्मृतीच्या दुनियेतून निघून
आला आहात. जे स्मृती-स्वरूप आहेत तेच हिरो पार्ट बजावणारे विशेष आत्मा आहेत. या वेळी
डबल हीरो आहात, एक तर हिऱ्यासारखे अमूल्य बनले आहात दुसरे म्हणजे हीरो पार्ट आहे.
तर सदैव हेच गीत मनामध्ये वाजत रहावे की, ‘वाह माझे श्रेष्ठ भाग्य’. जसे शरीराचे
ऑक्युपेशन लक्षात राहते तसे हे अविनाशी ऑक्युपेशन की “मी श्रेष्ठ आत्मा आहे” हे
लक्षात राहील तेव्हा म्हणणार विशेष आत्मा.
बोधवाक्य:-
तुम्ही
हिम्मतीचे पहिले पाऊल टाका तर बाबांची संपूर्ण मदत मिळेल.