24-11-24    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   15.12.2002  ओम शान्ति   मधुबन


“समयानुसार लक्ष्य आणि लक्षणाच्या समानते द्वारे बाप समान बना”


आज चोहो बाजूच्या सर्व स्वमानधारी मुलांना पाहून हर्षित होत आहेत. या संगमावर तुम्हा मुलांना जो स्वमान मिळतो त्यापेक्षा मोठा स्वमान साऱ्या कल्पामध्ये कोणत्याही आत्म्याला प्राप्त होऊ शकत नाही. किती मोठा स्वमान आहे, याला जाणता का? स्वमानाचा नशा किती मोठा आहे, हे स्मृतीमध्ये राहते? स्वमानाची माळा खूप मोठी आहे. एक-एक मणी मोजत जा आणि स्वमानाच्या नशेमध्ये लवलीन व्हा. हे स्वमान अर्थात टायटल्स स्वयं बापदादांद्वारे मिळालेले आहेत. परमात्म्याद्वारे स्वमान प्राप्त झाले आहेत त्यामुळे या स्वमानाच्या रुहानी नशेला (आत्मिक नशेला) अशी कोणतीही अथॉरिटी (शक्ती) नाही जी हलवू शकेल कारण ऑलमाइटी अथॉरिटी द्वारे प्राप्ती आहे.

तर बापदादांनी आज अमृतवेलेला साऱ्या विश्वातील सर्व मुलांकडे फेरी मारताना पाहिले की, प्रत्येक मुलाच्या स्मृतीमध्ये किती स्वमानांची माळा पडलेली आहे. माळेला धारण करणे अर्थात स्मृतीद्वारे त्याच स्थितीमध्ये स्थित राहणे. तर स्वतःला चेक करा - ही स्मृतीची स्थिती कितपत राहते? बापदादा बघत होते की, स्वमानाचा निश्चय आणि त्याचा रुहानी नशा दोन्हीचा बॅलन्स किती राहतो? निश्चय आहे - नॉलेजफुल बनणे आणि रुहानी नशा आहे - शक्तिशाली बनणे. तर नॉलेजफुलमध्ये देखील दोन प्रकार बघितले - एक आहेत - नॉलेजफुल (ज्ञानसंपन्न). दुसरे आहेत - नॉलेजेबुल (ज्ञान स्वरूप) तर स्वतःला विचारा - मी कोण? बापदादा जाणतात की मुलांचे लक्ष्य खूप उच्च आहे. लक्ष्य उच्च आहे ना, खरंच उच्च आहे? सर्वजण म्हणतात बाप समान बनणार. तर जसे बाबा उच्च ते उच्च आहेत तर बाप समान बनण्याचे लक्ष्य किती उच्च आहे! तर लक्ष्याला पाहून बापदादा खूप आनंदीत होतात परंतु... परंतु सांगू काय ते? परंतु काय… ते टीचर्स अथवा डबल फॉरेनर्स ऐकणार का? समजून तर गेला असाल. बापदादांना लक्ष्य आणि लक्षण समान असावे असे वाटते. आता स्वतःला विचारा की, लक्ष्य आणि लक्षण अर्थात प्रॅक्टिकल स्थिती समान आहे का? कारण लक्ष्य आणि लक्षण समान असणे - हेच बाप समान बनणे आहे. वेळेनुसार या समानतेला समीप आणा.

वर्तमान समयी बापदादा मुलांची एक गोष्ट पाहू शकत नाहीत. बरीच मुले भिन्न-भिन्न प्रकारे बाप समान बनण्याची मेहनत करतात; खरेतर बाबांच्या प्रेमासमोर मेहनत करण्याची आवश्यकताच नाही आहे, जिथे प्रेम आहे तिथे मेहनत नसते. जेव्हा उलटा नशा देह-अभिमानाचे नेचर बनतो (स्वभाव बनतो), तर तो नॅचरल होतो (स्वाभाविक होऊन जातो). देह-अभिमानामध्ये येण्यासाठी काही पुरुषार्थ करावा लागतो का? की ६३ जन्म पुरुषार्थ केला आहे? नेचर बनली, नॅचरल बनले आहे. ज्यामुळे आजही कधी-कधी हेच म्हणता की, ‘देही च्या ऐवजी देहामध्ये येतो’. तर देह-अभिमान जसा, नेचर आणि नॅचरल झाला तसे आता देही-अभिमानी स्थिती देखील नॅचरल आणि नेचर व्हावी, नेचर (स्वभाव) बदलणे अवघड असते. आत्ता देखील कधी-कधी म्हणता ना की, ‘माझा भाव नाही आहे, नेचर आहे’. तर त्या नेचरला नॅचरल बनवले आहे आणि बाप समान नेचरला नॅचरल बनवू शकत नाही! उलट्या नेचरच्या आहारी जाता आणि यथार्थ नेचर (खरा स्वभाव) बाप समान बनण्याचे आहे त्यामध्ये मेहनत कशासाठी? तर बापदादा आता सर्व मुलांची देही-अभिमानी होऊन राहण्याची नॅचरल नेचर (नैसर्गिक स्वभाव) पाहू इच्छितात. ब्रह्मा बाबांना पाहिलेत ना चालता-फिरता कोणतेही कार्य करताना देही-अभिमानी स्थिती नॅचरल नेचर होती.

बापदादांनी समाचार ऐकला की आजकाल विशेष दादी हे रुहरिहान (आत्मिक बातचीत) करतात - ‘फरिश्ता अवस्था, कर्मातीत अवस्था, बाप समान अवस्था नॅचरल कशी बनेल?’ नेचर बनावी, हे रुहरिहान करता ना! दादींच्या देखील वारंवार हेच मनात येते ना - फरिश्ता बनावे, कर्मातीत बनावे, बाबा प्रत्यक्ष व्हावेत. तर फरिश्ता बनणे अथवा निराकारी कर्मातीत अवस्था बनण्याचे विशेष साधन आहे - निरहंकारी बनणे. निरहंकारीच निराकारी बनू शकतो म्हणून बाबांनी ब्रह्मा बाबांच्या द्वारे शेवटचा मंत्र - निराकारीच्या सोबत निरहंकारी म्हटले. केवळ स्वतःच्या देहामध्ये अथवा दुसऱ्याच्या देहामध्ये अडकणे, यालाच देह अहंकार अथवा देह-भान म्हटले जात नाही. देह अहंकार सुद्धा आहे, देह भान सुद्धा आहे. आपल्या देहाच्या किंवा दुसऱ्याच्या देहाच्या भानामध्ये न राहणे, आकर्षणापासून दूर राहणे - यामध्ये तर मेजॉरिटी पास आहेत. जे पुरुषार्थाच्या धूनमध्ये राहतात, खरे पुरुषार्थी आहेत, ते या मोठ्या रूपापासून दूर आहेत. परंतु देह-भानाची सूक्ष्म रूपे अनेक आहेत, याची आपसामध्ये मिळून लिस्ट बनवा. बापदादा आज ऐकवणार नाहीत. आज एवढाच इशारा खूप आहे कारण सर्व समजूतदार आहेत. तुम्ही सर्व जाणता ना, जर सर्वांना विचारले ना, तर सर्व जण खूप हुशारीने सांगतील. परंतु बापदादा फक्त एक छोटासा सोपा पुरुषार्थ सांगत आहेत की, सदैव मन-वचन-कर्म, संबंध-संपर्कामध्ये तीन शब्दांचा शेवटचा मंत्र (निराकारी, निरहंकारी, निर्विकारी) सदैव लक्षात ठेवा. संकल्प करता तर चेक करा - आपला संकल्प महामंत्र संपन्न आहे? तसेच बोल, कर्म सर्वांमध्ये फक्त तीन शब्द लक्षात ठेवा आणि त्यामध्ये समानता आणा. हे तर सोपे आहे ना? संपूर्ण मुरली लक्षात ठेवा असे म्हणत नाहीत, फक्त तीन शब्द. हा महामंत्र संकल्पाला देखील श्रेष्ठ बनवेल. वाणीमध्ये निर्माणता आणेल. कर्मामध्ये सेवा भाव आणेल. संबंध-संपर्कामध्ये सदैव शुभ भावना, श्रेष्ठ कामनेची वृत्ती बनवेल.

बापदादा सेवेचा समाचार सुद्धा सांगत आहेत, सेवेमध्ये आजकाल भिन्न-भिन्न कोर्स करता, परंतु अजून एक कोर्स राहिला आहे आणि तो आहे प्रत्येक आत्म्याला जी शक्ति पाहिजे, तो फोर्सचा कोर्स करा. शक्ति भरण्याचा कोर्स, वाणीद्वारे ऐकवण्याचा कोर्स नाही, वाणी सोबतच शक्ति भरण्याचा कोर्स सुद्धा असावा. ज्यामुळे फक्त ‘चांगले आहे-चांगले आहे’ म्हणू नये तर चांगले बनावेत. आपल्या तोंडून हे वर्णन करावे की, आज मला शक्तीची ओंजळ मिळाली. ओंजळभर मिळाल्याचा जरी अनुभव झाला तरीही त्या आत्म्यांसाठी ते पुष्कळ आहे. कोर्स करा परंतु अगोदर स्वतःसाठी करवून मग सांगा. तर ऐकलेत बापदादा काय इच्छितात? लक्ष्य आणि लक्षण यांना समान बनवा. सर्वांचे लक्ष्य पाहून बापदादा खूप-खूप खुश होतात. आता फक्त समान बनवा, म्हणजे मग बाप समान अगदी सहजच बनतील.

बापदादा तर मुलांना समान पेक्षाही उच्च, स्वतःपेक्षा देखील उच्च असल्याचे बघतात. बापदादा सदैव मुलांना मस्तकावरील मुकुट म्हणतात. आणि मुकुट तर मस्तकापेक्षाही उंच असतो ना! टीचर्स - मस्तकावरील मुकुट आहात?

टीचर्स सोबत:- बघा, किती टीचर्स आहेत. एका ग्रुपमध्ये इतक्या टीचर्स असतील तर प्रत्येक ग्रुपमध्ये किती टीचर्स असतील! टीचर्सनी बापदादांची एक इच्छा पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे परंतु समोर आणलेला नाही आहे. जाणता का कोणता ते? एक तर बापदादांनी सांगितले आहे की, आता वारसदारांची माळा बनवा. वारसदारांची माळा, जनरल माळा नाही. आणि दुसरे आहे - संबंध-संपर्क वाल्यांना माइक बनवा. तुम्ही भाषण करू नका परंतु ते तुमच्या वतीने मीडिया बनू द्या. आपली मीडिया बनवा. मीडिया काय करते? उलटा किंवा सुलटा आवाज तर पसरवते ना! तर असे माइक तयार व्हावेत जे मीडिया प्रमाणे प्रत्यक्षतेचा आवाज पसरवतील. तुम्ही म्हणाल - ‘भगवान आले आहेत, भगवान आले…’ ते तर सामान्यपणे समजतेही परंतु तुमच्यावतीने इतरांनी म्हणावे, ऑथॉरिटीवाल्यांनी म्हणावे की, ‘पहिले तुम्हा लोकांना शक्तींच्या रूपामध्ये स्वतःला प्रत्यक्ष करावे’. जेव्हा शक्ती प्रत्यक्ष होतील तेव्हा बाबा प्रत्यक्ष होतील. तर बनवा, मीडिया तयार करा. बघू. केले आहे? चला कांकण तर कांकण, माळा सोडा, असे तयार केले आहे? हात वर करा ज्यांनी असे तयार केले आहे? बापदादा बघतील कोणते तयार केले आहेत, अच्छा हिम्मत तर ठेवली आहे. ऐकले - टीचर्सना काय करायचे आहे! शिवरात्रीला वारिस क्वालिटी तयार करा. माइक तयार करा, तेव्हाच मग दुसऱ्या वर्षी शिवरात्रीला सर्वांच्या मुखातून - ‘शिवबाबा आले आहेत’, हा आवाज निघेल. अशी शिवरात्रि साजरी करा. प्रोग्राम तर खूप छान बनवले आहेत. प्रोग्राम सर्वांना पाठवले आहेत ना. प्रोग्राम तर चांगला बनवला आहे परंतु प्रत्येक प्रोग्राममधून एखादा माइक तयार व्हावा, एखादा वारसदार तयार व्हावा. हा पुरुषार्थ करा, भाषण केले आणि निघून गेले, असे नको. आता तर ६६ वर्षे झाली आहेत आणि सेवेचे ५० वे वर्ष देखील साजरे केलेत. आता शिवरात्रीची डायमंड जुबिली साजरी करा. हे दोन प्रकारचे आत्मे तयार करा, मग बघा नगाडा वाजतो की नाही. नगाडे तुम्ही थोडेच वाजवणार. तुम्ही तर देवी आहात तुम्ही तर साक्षात्कार घडवणार. नगाडे वाजवणारे तयार करा. जे प्रत्यक्षात गाणे गातील ‘शिव शक्तियां आ गई’. तर ऐकलेत - शिवरात्रीला काय करायचे! असेच भाषण करून प्रोग्राम संपवायचा नाही. मग लिहाल - ‘बाबा ५००-१०००, लाख माणसे आली’, आले तर खरे, संदेशही दिलात, परंतु वारसदार किती निघाले, माइक किती निघाले, आता हा समाचार द्या. जे आत्तापर्यंत केलेत धरणी बनवली, संदेश दिला, त्यासाठी बाबा चांगलेच म्हणतात, ती सेवा व्यर्थ गेलेली नाही आहे, समर्थ झाली आहे. प्रजा तर बनली आहे, रॉयल फॅमिली तर बनली आहे परंतु राजा-राणी देखील पाहिजेत. राजा-राणी तख्तवाले नाही, राजा-राणी सोबत तिथे दरबारामध्ये सुद्धा राजा समान बसतात, असे तर बनवा. राज्य दरबार शोभणारा होऊ देत. ऐकले, शिवरात्रीला काय करायचे आहे. पांडव ऐकत आहात. हात वर करा. लक्षात आले. अच्छा. मोठे-मोठे महारथी बसले आहेत. बापदादा खुश होतात, हे देखील हृदयातील प्रेम आहे, कारण तुम्हा सर्वांचा संकल्प चालतो ना, ‘प्रत्यक्षता कधी होणार, कधी होणार…’ तर बापदादा ऐकत राहतात. मधुबनवाल्यांनी ऐकले का? मधुबनवाल्यांनी ऐकले. मधुबन, शांतिवन, ज्ञान सरोवर वाले, सर्व मधुबन निवासी आहेत. अच्छा.

मधुबन मधून नगाडा वाजेल, कुठून नगाडा वाजेल? (दिल्लीमधून) मधुबन मधून नाही? म्हणा - चोहोबाजूंनी. एका बाजूने नाही वाजणार. मधुबन मधून सुद्धा वाजेल, तर चोहोबाजूंनी वाजेल तेव्हाच कुंभकर्ण जागे होतील. मधुबनवाले जसे सेवेमध्ये अथक होऊन सेवेचा पार्ट बजावत आहात ना, तशी ही देखील मनसा सेवा करत रहा. फक्त कर्मणा नाही, मनसा, वाचा, कर्मणा तिन्ही सेवा; करता देखील परंतु अजून जास्त करा. अच्छा. मधुबनवाले विसरलेले नाहीत. मधुबनवाले विचार करतात बापदादा येतात मधुबन मध्येच परंतु मधुबनचे नाव घेत नाहीत. मधुबन तर सदैव आठवणीत आहेच. मधुबन नसते तर हे कुठे आले असते! तुम्ही सेवाधारींनी जर सेवा केली नसती तर यांनी खाल्ले कसे असते, राहिले कसे असते! तर मधुबन वाल्यांची बापदादा देखील अंतःकरणापासून आठवण करत आहेत आणि अंतःकरणापासून आशीर्वाद देत आहेत. अच्छा. मधुबनवर देखील प्रेम, टीचर्सवर सुद्धा प्रेम, गोड-गोड मातांवर सुद्धा प्रेम आणि त्याच सोबत महावीर पांडवांवर देखील प्रेम. पांडवांशिवाय सुद्धा काही गति नाही त्यामुळे चतुर्भुज रूपाची महिमा जास्त आहे. पांडव आणि शक्ति दोन्हीचे कंबाइंड रूप विष्णु चतुर्भुज आहे. अच्छा.

मधुबनवाले पांडव तुम्हा सर्वांनाही नशा आहे ना? विजयाचा नशा दुसरा कोणता नशा नाही. चांगले आहे, पांडव भवनमध्ये मेजॉरिटी पांडव आहेत, पांडव नसते तर तुम्हा सर्वांना मधुबनमध्ये मजा आली नसती त्यामुळे बलिहारी मधुबन निवासींची जे तुम्हाला आनंदाने सामावून घेतात, खाऊ घालतात आणि उडवतात. आज बापदादांना मधुबन निवासींची अमृतवेले पासून आठवण येत आहे. भले इथे आहेत, किंवा वरती (पांडव भवनमध्ये) बसले आहेत, किंवा काही मधुबनवाले इथेही ड्युटीवर आहेत परंतु चोहो बाजूंच्या मधुबन निवासींना बापदादांनी अमृतवेले पासून आठवण दिली आहे. अच्छा.

बापदादांनी जी रुहानी एक्सरसाइज दिली आहे, ती पूर्ण दिवसभरामध्ये किती वेळा करता? आणि किती वेळ करता? निराकारी आणि फरिश्ता. बाप आणि दादा, आत्ता-आत्ता निराकारी, आत्ता-आत्ता फरिश्ता स्वरूप. दोन्हीमध्ये देहभान नाही आहे. तर देहभाना पासून दूर व्हायचे आहे यासाठी ही रुहानी एक्सरसाइज कर्म करताना सुद्धा आपली ड्युटी बजावत असताना सुद्धा एका सेकंदामध्ये अभ्यास करू शकता. हा एक नॅचरल अभ्यास होऊ द्या - आत्ता-आत्ता निराकारी, आत्ता-आत्ता फरिश्ता. अच्छा. (बापदादांनी ड्रिल करून घेतली)

असे निरंतर भव! चोहो बाजूंचे बापदादांच्या आठवणीमध्ये मग्न राहणारे बाप समान बनण्याच्या लक्ष्याला लक्षणामध्ये समान बनविणारे, जे काना-कोपऱ्यामध्ये सायन्सच्या साधनांद्वारे दिवस अथवा रात्र जागत बसले आहेत, त्या मुलांना देखील बापदादा प्रेमपूर्वक आठवण, मुबारक आणि अंतःकरणपूर्वक आशीर्वाद देत आहेत. बापदादा जाणतात सर्वांच्या हृदयामध्ये या वेळी दिलाराम बाबांची आठवण सामावलेली आहे. प्रत्येक काना-कोपऱ्यामध्ये बसलेल्या मुलांना बापदादा व्यक्तिगत नावाने प्रेमपूर्वक आठवण देत आहेत. नावांची माळा जपली तर रात्र संपून जाईल. बापदादा सर्व मुलांना आठवण देत आहेत, भले पुरुषार्थामध्ये कोणताही नंबर असो परंतु बापदादा सदैव प्रत्येक मुलाच्या श्रेष्ठ स्वमानाला प्रेमपूर्वक आठवण देत आहेत आणि नमस्ते करत आहेत. प्रेमपूर्वक आठवण देतेवेळी बापदादांसमोर चोहो बाजूंच्या प्रत्येक मुलाची आठवण आहे. कोणी एक जरी मूल कोणत्याही कोपऱ्यामध्ये, गावामध्ये, शहरामध्ये, देशामध्ये, विदेशामध्ये, जिथेही आहेत, बापदादा त्याला स्वमानाची आठवण करून देत प्रेमपूर्वक आठवण देत आहेत. सर्वजण प्रेमपूर्वक आठवणीचे अधिकारी आहेत कारण ‘बाबा’ म्हटले त्यामुळे प्रेमपूर्वक आठवणीचे अधिकारी आहेतच. तुम्हा सर्व सन्मुख असणाऱ्यांना देखील बापदादा स्वमानाचे माळाधारी या स्वरूपामध्ये बघत आहेत. सर्वांना बाप समान या स्वमान स्वरूपामध्ये प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.

दादीजींसोबत संवाद:- ठीक झालात, आता कोणता आजार नाही ना. पळून गेला. तो फक्त दाखवण्यासाठी आला जो सर्व बघतील की आजार आमच्याकडे सुद्धा येतो त्यामुळे ही काही मोठी गोष्ट नाही आहे.

सर्व दादी खूप चांगला पार्ट बजावत आहेत. बापदादा सर्वांच्या पार्टला बघून खुश होतात. (निर्मलशांता दादींसोबत) आदि रत्न आहात ना! अनादि रूपामध्ये सुद्धा निराकारी बाबांच्या समीप आहात, सोबतच राहता आणि आदि रूपामध्ये देखील राज्य दरबारातील साथी आहात. सदैव रॉयल फॅमिलीमधील सुद्धा रॉयल सदस्य आहात आणि संगमावर देखील आदि रत्न बनण्याचे भाग्य मिळाले आहे. तर खूप मोठे भाग्य आहे; आहे ना भाग्य? तुमचे हजर असणे हे देखील सर्वांकरिता एक वरदान आहे. बोला अथवा नका बोलू, काही करा अथवा नका करू परंतु तुमचे हजर असणेच सर्वांकरिता वरदान आहे. अच्छा, ओम् शांति.

वरदान:-
लौकिक अलौकिक जीवनामध्ये सदैव न्यारे बनून परमात्म साथीच्या अनुभवाद्वारे नष्टोमोहा भव

सदैव न्यारे (अलिप्त) राहण्याची निशाणी आहे प्रभू प्रेमाची अनुभूति आणि जितके प्रेम असते तितके सोबत रहाणार, वेगळे होणार नाहीत. प्रेम त्यालाच म्हटले जाते जे सोबत राहतील. जेव्हा बाबा सोबत आहेत तर सर्व ओझे बाबांना देऊन स्वतः हलके व्हा, हीच विधी आहे नष्टोमोहा होण्याची. परंतु पुरुषार्थाच्या सब्जेक्टमध्ये ‘सदैव’ शब्दाला अंडरलाईन करा. लौकिक आणि अलौकिक जीवनामध्ये सदैव न्यारे रहा तेव्हा सदैव सोबतीचा अनुभव होईल.

सुविचार:-
विकार रुपी सापांना आपली शैय्या बनवा तेव्हाच सहजयोगी बनाल.