25-03-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुम्ही बाबांची मुले मालक आहात, तुम्ही काही बाबांकडे शरण घेतलेली नाही, संतान कधी पित्याला शरण जात नाही”

प्रश्न:-
कोणत्या एका गोष्टीची सतत स्मृती होत राहीली तर माया त्रास देणार नाही?

उत्तर:-
आपण बाबांकडे आलो आहोत, ते आपले पिता देखील आहेत, शिक्षक देखील आहेत, सद्गुरु देखील आहेत परंतु आहेत निराकार. आम्हा निराकारी आत्म्यांना शिकविणारे निराकार बाबा आहेत, याची स्मृती राहीली तर आनंदाचा पारा चढलेला राहील आणि मग माया त्रास देणार नाही.

ओम शांती।
त्रिमूर्ती बाबांनी मुलांना समजावून सांगितले आहे. त्रिमूर्ती बाबा आहेत ना. तिघांनाही रचणारे ते झाले सर्वांचे पिता कारण उच्च ते उच्च ते बाबाच आहेत. मुलांच्या बुद्धीमध्ये आहे आपण त्यांची संतान आहोत. जसे बाबा परमधाममध्ये राहतात तसे आपण आत्मे देखील तिथलेच निवासी आहोत. बाबांनी हे देखील समजावून सांगितले आहे की हा ड्रामा आहे, जे काही होते ते ड्रामामध्ये एकदाच होते. बाबा देखील एकदाच शिकविण्यासाठी येतात. तुम्ही काही शरणागती पत्करत नाही. हे शब्द भक्ती मार्गाचे आहेत - ‘शरण पडी मैं तेरे’. मूल कधी पित्याला शरण जाते का! मुले तर मालक असतात. तुम्ही मुले काही बाबांना शरण गेलेले नाही आहात. बाबांनी तुम्हाला आपले बनविले आहे. मुलांनी बाबांना आपले बनवले आहे. तुम्ही मुले बाबांना बोलावताच मुळी की, ‘बाबा या, आम्हाला आपल्या घरी घेऊन जा किंवा राजाई द्या’. एक आहे शांतीधाम, दुसरे आहे सुखधाम. सुखधाम आहे बाबांची मालमत्ता आणि दुःखधाम आहे रावणाची मालमत्ता. ५ विकारांमध्ये अडकल्यामुळे दुःखच दुःख आहे. आता मुले जाणतात - आपण बाबांकडे आलो आहोत. ते पिता देखील आहेत, शिक्षक देखील आहेत परंतु आहेत निराकार. आम्हा निराकारी आत्म्यांना शिकविणारे देखील निराकार आहेत. ते आहेत आत्म्यांचे पिता. याची सदैव स्मृती राहीली तरी देखील आनंदाचा पारा चढेल. हे विसरल्यामुळेच माया त्रास देते. आता तुम्ही बाबांजवळ बसले आहात तर बाबा आणि वारशाची आठवण येते. एम ऑब्जेक्ट तर बुद्धीमध्ये आहे ना. आठवण शिवबाबांची करायची आहे. श्रीकृष्णाची आठवण करणे तर खूप सोपे आहे, शिवबाबांची आठवण करण्यामध्येच मेहनत आहे. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करायची आहे. जर श्रीकृष्ण असेल मग त्याच्यावर तर सगळे लगेच फिदा होतील. खास मातांना तर खूप असे वाटते की आपल्याला श्रीकृष्णासारखा मुलगा व्हावा, श्रीकृष्णासारखा पती मिळावा. आता बाबा म्हणतात - ‘मी आलो आहे, तुम्हाला श्रीकृष्णासारखा मुलगा किंवा पती देखील मिळेल; अर्थात याच्यासारखा गुणवान सर्वगुण संपन्न, १६ कला संपूर्ण सुख देणारा मुलगा अथवा पती तुम्हाला मिळेल’. स्वर्ग किंवा श्रीकृष्णपुरीमध्ये सुखच सुख आहे. मुले जाणतात इथे आपण शिकत आहोत - श्रीकृष्णपुरीमध्ये जाण्याकरिता. सर्वजण स्वर्गाचीच आठवण करतात ना. कोणाचा मृत्यू झाला तर म्हणतात - ‘अमका स्वर्गवासी झाला’; मग तर आनंद झाला पाहिजे, टाळी वाजवली पाहिजे. नरकातून निघून स्वर्गामध्ये गेला, हे तर खूप चांगले झाले. जेव्हा कोणी म्हणतील, ‘अमका स्वर्गात गेला’ तर तुम्ही बोला - ‘कुठून गेला?’ जरूर नरकातून गेला. ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे. सर्वांना बोलावून टोली खाऊ घातली पाहिजे. परंतु ही तर समजून घेण्याची गोष्ट आहे. ते असे म्हणणार नाहीत की, २१ जन्मांसाठी स्वर्गात गेला. फक्त म्हणतात - स्वर्गात गेला. अच्छा, मग त्याच्या आत्म्याला इथे का बोलावता? नरकाचे भोजन खाऊ घालण्यासाठी? नरकामध्ये तर बोलावता कामा नये. हे बाबा बसून समजावून सांगतात, प्रत्येक गोष्ट ज्ञानाचीच आहे ना. बाबांना बोलावतात - आम्हाला पतितापासून पावन बनवा तर जरूर पतित शरीरांना नष्ट करावे लागेल. सगळे मरतील मग कोण कोणासाठी रडणार? आता तुम्ही जाणता आपण हे शरीर सोडून आपल्या घरी जाणार. आता ही प्रॅक्टिस करत आहोत की कसे शरीर सोडायचे. असा पुरुषार्थ दुनियेमध्ये कधी कोणी करत असतील!

तुम्हा मुलांना हे ज्ञान आहे की आपले हे जुने शरीर आहे. बाबा देखील म्हणतात - मी जुन्या जुत्तीचा (तनाचा) आधार घेतो. ड्रामामध्ये हाच रथ निमित्त बनलेला आहे. हा बदलू शकत नाही. यांना पुन्हा तुम्ही ५ हजार वर्षानंतर पहाल. ड्रामाचे रहस्य समजले आहे ना. ही बाबांव्यतिरिक्त इतर कोणातही ताकद नाही जे समजावू शकतील. ही पाठशाळा अतिशय वंडरफुल आहे, इथे वृद्ध देखील म्हणतील - ‘आम्ही जातो भगवंताच्या पाठशाळेमध्ये - भगवान-भगवती बनण्यासाठी’. अरे, म्हाताऱ्या थोड्याच कधी शाळेमध्ये शिकतात. तुम्हाला कोणी विचारले - ‘तुम्ही कुठे जाता?’ तर बोला, ‘आम्ही ईश्वरीय युनिव्हर्सिटीमध्ये जातो’. तिथे आम्ही राजयोग शिकतो. शब्द असे वापरा जेणेकरून ते चक्रावून जातील. वृद्ध देखील म्हणतील - ‘आम्ही जातो भगवंताच्या पाठशाळेमध्ये’. इथे हे वंडर आहे, आम्ही भगवंताकडे शिकण्यासाठी जातो, असे इतर कोणी म्हणू शकत नाही. म्हणतील - मग निराकार भगवान कुठून आले? कारण ते तर समजतात भगवान नावा-रुपा पासून न्यारा आहे. आता तुम्ही समजून बोलता. प्रत्येक मूर्तीच्या ऑक्युपेशनला तुम्ही जाणता. बुद्धीमध्ये हे पक्के आहे की उच्च ते उच्च शिवबाबा आहेत, ज्यांची आपण संतान आहोत. अच्छा, मग सूक्ष्म वतनवासी ब्रह्मा-विष्णू-शंकर, तुम्ही फक्त म्हणायचे म्हणून म्हणत नाहीत. तुम्ही तर चांगलेच जाणता की, ब्रह्माद्वारे स्थापना कशी करतात. तुमच्या व्यतिरिक्त इतर कोणीही बायोग्राफी (चरित्र) सांगू शकणार नाही. आपल्याच बायोग्राफीला (चरित्राला) जाणत नाहीत तर मग बाकीच्यांचे तरी चरित्र कसे काय जाणतील? तुम्ही आता सर्वकाही जाणले आहे. बाबा म्हणतात मी जे जाणतो ते तुम्हा मुलांना समजावून सांगतो. राजाई देखील बाबांशिवाय काही कोणी देऊ शकत नाही. या लक्ष्मी-नारायणाने काही युद्ध करून हे राज्य प्राप्त केलेले नाही. तिथे युद्धच नसते. इथे तर किती भांडण-तंटे आहेत. किती प्रचंड लोकसंख्या आहे. आता तुम्हा मुलांच्या मनामध्ये हे आले पाहिजे की, आपण बाबांकडून दादाद्वारे वारसा प्राप्त करत आहोत. बाबा म्हणतात - मामेकम् (मज एकाची) आठवण करा, असे म्हणत नाहीत की ज्यांच्यामध्ये प्रवेश केला आहे त्यांचीही आठवण करा. नाही, म्हणतात - मामेकम् (मज एकाची) आठवण करा. ते संन्यासी लोक आपला फोटो नावा सहित देतात. शिवबाबांचा काय फोटो काढणार? बिंदूवर नाव कसे लिहिणार! बिंदूवर शिवबाबा नाव लिहाल तर बिंदू पेक्षाही नाव मोठे होईल. समजण्याच्या गोष्टी आहेत ना. तर मुलांना खूप आनंद झाला पाहिजे की आम्हाला शिवबाबा शिकवत आहेत. आत्मा शिकते ना. संस्कार आत्माच घेऊन जाते. आता बाबा आत्म्यामध्ये संस्कार भरत आहेत. ते पिता देखील आहेत, टीचर देखील आहेत, गुरु देखील आहेत. बाबा तुम्हाला जे शिकवतात ते तुम्ही इतरांनाही शिकवा, सृष्टी चक्राची आठवण करा आणि करवून घ्या. जे त्यांच्यामध्ये गुण आहेत ते मुलांना देखील देतात. म्हणतात मी ज्ञानाचा सागर आहे, सुखाचा सागर आहे. तुम्हाला देखील बनवतो. तुम्ही देखील सर्वांना सुख द्या. मनसा, वाचा, कर्मणा कोणालाही दुःख देऊ नका. सर्वांच्या कानामध्ये हीच गोड-गोड गोष्ट ऐकवा की शिवबाबांची आठवण करा तर आठवणीने विकर्म विनाश होतील. सर्वांना हाच संदेश द्यायचा आहे की, बाबा आलेले आहेत, त्यांच्याद्वारे हा वारसा घ्या. हा संदेश सर्वांना द्यावा लागेल. सरतेशेवटी न्यूजपेपरवाले देखील न्यूज देतील. हे तर जाणता अंतामध्ये सर्व म्हणतील - ‘अहो प्रभू तेरी लीला… तुम्हीच सर्वांना सद्गती देता’. दुःखातून सोडवून सर्वांना शांतीधाममध्ये घेऊन जाता. ही देखील जादुगरी झाली ना. त्यांची आहे अल्पकाळासाठी जादुगरी. हे तर मनुष्यापासून देवता बनवितात, २१ जन्मांसाठी. या मनमनाभवच्या जादूने तुम्ही लक्ष्मी-नारायण बनता. जादूगर, रत्नागर ही सर्व नावे शिवबाबांना दिली आहेत, ना की ब्रह्माला. हे ब्राह्मण-ब्राह्मणी सर्व शिकत आहेत. शिकून मग शिकवतात. बाबा एकटे थोडेच शिकवतात. बाबा तुम्हा सर्वांना एकत्र शिकवतात, तुम्ही मग इतरांना शिकवतात. बाबा राजयोग शिकवत आहेत. तेच बाबा रचयिता आहेत, श्रीकृष्ण तर रचना आहे ना. वारसा रचयित्याकडून मिळतो, ना की रचनेकडून. श्रीकृष्णाकडून वारसा मिळत नाही. विष्णूची दोन रूपे हे लक्ष्मी-नारायण आहेत. लहानपणी राधे-कृष्ण आहेत. या गोष्टी देखील पक्क्या आठवणीत ठेवा. वृद्ध देखील वेगाने जातील तर उच्च पद प्राप्त करू शकतात. वृद्ध मातांना मग थोडासा मोह देखील असतो. आपल्याच रचना रुपी जाळ्यामध्ये अडकून पडतात. कितीतरी जणांची आठवण येते, त्यांच्या पासून बुद्धियोग तोडून मग एका बाबांशी जोडणे यामध्येच मेहनत आहे. जिवंतपणी मरायचे आहे. बुद्धीमध्ये एकदाच बाण लागला म्हणजे मग पुरेसे आहे. मग युक्तीने चालायचे असते. असेही नाही की कोणाशी बोलायचेच नाही. गृहस्थ व्यवहारामध्ये भले रहा, सर्वांशी बोलून चालून रहा. त्यांच्याशीही नातेसंबंध भले ठेवा. बाबा म्हणतात - चॅरिटी बिगिन्स ॲट होम. जर नातेसंबंधच ठेवला नाहीत तर त्यांचा उद्धार कसा कराल? दोन्हीकडे तोड निभवायची आहे. बाबांना विचारतात - लग्नाला जाऊ? बाबा म्हणतील - ‘का नाही जायचे’. बाबा फक्त एवढेच म्हणतात - काम महाशत्रू आहे, त्याच्यावर विजय प्राप्त करायचा आहे तर तुम्ही जगतजीत बनाल. निर्विकारी असतातच सतयुगामध्ये . योगबलाद्वारे जन्म होतो. बाबा म्हणतात - निर्विकारी बना. एक तर हे पक्के करा की आपण शिवबाबांजवळ बसलो आहोत, शिवबाबा आम्हाला ८४ जन्मांची कहाणी सांगतात. हे सृष्टीचक्र फिरत राहते. सर्व प्रथम देवी-देवता येतात सतोप्रधान, मग पुनर्जन्म घेत-घेत तमोप्रधान बनतात. दुनिया जुनी पतित बनते. आत्माच पतित आहे ना. इथल्या कोणत्याही वस्तूमध्ये सार नाही आहे. कुठे सतयुगातील फळे-फुले आणि कुठे इथली! तिथे कधीही आंबट किंवा शिळेपाके काहीही नसते. तुम्ही तिथला साक्षात्कार देखील करून येता. तुमची इच्छा होते हे फळ-फुल घेऊन जावे. परंतु इथे येता तर ते गायब होते. हे सर्व साक्षात्कार करवून बाबा मुलांचे मनोरंजन करतात. हे आहेत रूहानी बाबा, जे तुम्हाला शिकवतात. या शरीराद्वारे आत्मा शिकते, ना की शरीर. आत्म्याला शुद्ध अभिमान आहे - मी देखील हा वारसा घेत आहे, स्वर्गाचा मालक बनत आहे. स्वर्गामध्ये तर सर्व जातील परंतु सर्वांचे नाव काही लक्ष्मी-नारायण तर असणार नाही ना. वारसा आत्मा प्राप्त करते. हे ज्ञान बाबांव्यतिरिक्त इतर कोणीही देऊ शकत नाही. ही तर युनिव्हर्सिटी आहे, यामध्ये लहान मुले, तरुण सर्वजण शिकतात. असे कॉलेज कधी पाहिले आहे? ते मनुष्याकडून बॅरिस्टर, डॉक्टर इत्यादी बनतात. इथे तुम्ही मनुष्या पासून देवता बनता.

तुम्ही जाणता - बाबा आपले टीचर, सद्गुरु आहेत, ते आपल्याला सोबत घेऊन जाणार. मग आपण शिक्षणानुसार येऊन सुखधाममध्ये पद प्राप्त करणार. बाबा तर कधी तुमच्या सतयुगाला बघतही नाहीत. शिवबाबा विचारतात - ‘मी सतयुग बघतो का?’ पहावे तर शरीराद्वारे लागते, त्यांना काही आपले शरीर तर नाही आहे, तर मग कसे बघणार? इथे तुम्हा मुलांशी बोलतात, बघतात ही सारी जुनी दुनिया आहे. शरीराशिवाय तर पाहू शकणार नाहीत. बाबा म्हणतात - ‘मी पतित दुनियेमध्ये पतित शरीरामध्ये येऊन तुम्हाला पावन बनवितो. मी स्वर्ग बघतसुद्धा नाही. असेही नाही की कोणाच्या शरीरामध्ये लपून पाहून येईन. नाही, पार्टच नाही. तुम्ही किती नवीन-नवीन गोष्टी ऐकता. तर आता या जुन्या दुनियेमध्ये मन गुंतू द्यायचे नाही. बाबा म्हणतात जितके पावन बनाल तितके उच्च पद मिळेल. सारी आहे आठवणीच्या यात्रेची बाजी. यात्रेवर देखील मनुष्य पवित्र राहतात मग जेव्हा माघारी येतात तेव्हा पुन्हा अपवित्र बनतात. तुम्हा मुलांना आनंद झाला पाहिजे. जाणता बेहदच्या बाबांकडून आपण बेहद स्वर्गाचा वारसा घेत आहोत तर त्यांच्या श्रीमतावर चालायचे आहे. बाबांच्या आठवणीनेच सतोप्रधान बनायचे आहे. ६३ जन्मांचा गंज चढलेला आहे. तो या जन्मामध्ये उतरवायचा आहे, बाकी कोणता त्रास नाही आहे. विष पिण्याची जी भूक लागते, ती सोडून द्यायची आहे, त्याचा तर विचार देखील करू नका. बाबा म्हणतात - या विकारांमुळेच तुम्ही जन्म-जन्मांतर दुःखी झाला आहात. कुमारींची तर खूप दया येते. सिनेमाला गेल्यानेच खराब होतात, यामुळेच हेलमध्ये (नरकात) जातात. भले बाबा कोणाला म्हणतातही की, चित्रपट पहायला काही हरकत नाही, परंतु तुम्हाला पाहून इतरही जातील म्हणून तुम्ही जायचे नाही. हा आहे भागीरथ. भाग्यशाली रथ आहे ना जो ड्रामामध्ये आपल्या रथाचे लोन देण्यासाठी निमित्त बनला आहे. तुम्ही समजता - बाबा यांच्यामध्ये येतात, हा आहे हुसैनचा घोडा. तुम्हा सर्वांना अतिशय सुंदर बनवतात. बाबा स्वतः सुंदर आहेत, परंतु रथ हा घेतला आहे. ड्रामामध्ये यांचा पार्टच असा आहे. आता आत्मे जे काळे बनले आहेत त्याला गोल्डन एजड बनवायचे आहे.

बाबा सर्वशक्तिमान आहेत की ड्रामा? ड्रामा आहे आणि मग त्यांच्यामध्ये जे ॲक्टर्स आहेत त्यांच्यामध्ये सर्वशक्तिमान कोण आहे? शिवबाबा. आणि मग रावण. अर्धा कल्प आहे राम राज्य, अर्धा कल्प आहे रावण राज्य. वारंवार बाबांना लिहितात - आम्ही बाबांची आठवण विसरतो. उदास होतात. अरे, तुम्हाला स्वर्गाचा मालक बनविण्यासाठी आलो आहे मग तुम्ही उदास का राहता! मेहनत तर करायची आहे, पवित्र बनायचे आहे. असाच तिलक देणार काय! ज्ञान आणि योगाद्वारे आपणच आपल्याला राजतिलक देण्यासाठी लायक बनवायचे आहे. बाबांची आठवण करत रहा तर तुम्ही आपणच तिलकासाठी लायक बनाल. बुद्धीमध्ये आहे शिवबाबा आपले स्वीट पिता, टीचर, सद्गुरु आहेत. आम्हाला सुद्धा खूप स्वीट बनवतात. तुम्ही जाणता आपण श्रीकृष्णपुरी मध्ये जरूर जाणार. दर ५ हजार वर्षानंतर भारत स्वर्ग जरूर बनणार आहे. मग नरक बनतो. मनुष्य समजतात जे श्रीमंत आहेत त्यांच्यासाठी इथेच स्वर्ग आहे, गरीब नरकामध्ये आहेत. परंतु असे नाही आहे. हा आहेच नरक. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) चित्रपट नरकामध्ये जाण्याचा रस्ता आहे, म्हणून सिनेमा पहायचा नाही. आठवणीच्या यात्रेद्वारे पावन बनून उच्च पद घ्यायचे आहे, या जुन्या दुनियेमध्ये मन गुंतवायचे नाही.

२) मनसा-वाचा-कर्मणा कोणालाही दुःख द्यायचे नाही. सर्वांच्या कानामध्ये गोड-गोड गोष्टी ऐकवायच्या आहेत, सर्वांना बाबांची आठवण द्यायची आहे. बुद्धियोग एका बाबांसोबत जोडायचा आहे.

वरदान:-
स्मृतीचा स्वीच ऑन करून सेकंदामध्ये अशरीरी स्थितीचा अनुभव करणारे प्रीत बुद्धी भव

जिथे प्रभू प्रीत आहे तिथे अशरीरी बनणे एका सेकंदाच्या खेळा समान आहे. जसे स्विच ऑन करताच अंधार समाप्त होतो. तसे प्रीत बुद्धी बनून स्मृतीचा स्वीच ऑन करा म्हणजे मग देह आणि देहाच्या दुनियेच्या स्मृतीचा स्विच ऑफ होईल. हा सेकंदाचा खेळ आहे. मुखाने ‘बाबा’ म्हणण्यासाठी देखील वेळ लागतो परंतु स्मृतीमध्ये आणण्यासाठी वेळ लागत नाही. हा ‘बाबा’ शब्दच जुन्या दुनियेला विसरण्याचा आत्मिक बॉम्ब आहे.

बोधवाक्य:-
देहभानरुपी मातीच्या ओझ्यापासून दूर रहा तर डबल लाईट फरिश्ता बनाल.

अव्यक्त इशारे - सत्यता आणि सभ्यता रुपी कल्चरला धारण करा:-

सत्यतेची परख आहे संकल्प, बोल, कर्म, संबंध-संपर्क सर्वांमध्ये दिव्यतेची अनुभूती होणे. कोणी म्हणतात - ‘मी तर नेहमी सत्य बोलतो’, परंतु बोल किंवा कर्मामध्ये जर दिव्यता नसेल तर इतरांना तुमचे सत्य, सत्य वाटणार नाही त्यामुळे सत्यतेच्या शक्तीद्वारे दिव्यतेला धारण करा. काहीही सहन करावे लागेल, घाबरू नका. सत्य वेळे नुसार स्वतः सिद्ध होईल.