25-03-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


प्रश्न:-
मुलांमध्ये कोणती हिंमत टिकून राहिली तर खूप उच्च पद प्राप्त करू शकतात?

उत्तर:-
श्रीमतावर चालून पवित्र बनण्याची. भले कितीही दंगे झाले, अत्याचार सहन करावे लागले तरीही बाबांनी जे पवित्र बनण्याचे श्रेष्ठ मत दिलेले आहे त्यावर निरंतर चालत राहिले तर खूप उच्च पद प्राप्त करू शकतात. कोणत्याही गोष्टीमध्ये घाबरायचे नाहीये, काहीही झाले तरी - नथिंग न्यू.

गीत:-
भोलेनाथ से निराला…

ओम शांती।
हे आहे भक्तीमार्ग वाल्यांचे गाणे. ज्ञानमार्गामध्ये गाणे इत्यादीची काहीच गरज नाहीये कारण गायले गेले आहे - बाबांकडून आपल्याला बेहदचा वारसा मिळणार आहे. जे भक्तीमार्गाचे रिती-रिवाज आहेत, ते यामध्ये येत नाहीत. मुले कविता इत्यादी करतात ते इतरांना ऐकविण्या करिता. त्याचा देखील अर्थ जोपर्यंत तुम्ही समजावून सांगणार नाही तोपर्यंत कोणी समजू शकत नाही. आता तुम्हा मुलांना बाबा मिळाले आहेत तर आनंदाचा पारा चढला पाहिजे. बाबांनी ८४ जन्मांच्या चक्राचे नॉलेज देखील सांगितले आहे. आनंद झाला पाहिजे की, आपण आता स्वदर्शन चक्रधारी बनलो आहोत. बाबांकडून विष्णुपुरीचा वारसा घेत आहोत. निश्चय-बुद्धीच विजयन्ती. ज्यांना निश्चय असतो ते तर सतयुगामध्ये जाणारच. तर मुलांना नेहमी आनंद झाला पाहिजे - फॉलो फादर. मुले जाणतात निराकार शिवबाबांनी जेव्हापासून यांच्यामध्ये (ब्रह्मा बाबांमध्ये) प्रवेश केला आहे तर खूप हंगामे झाले. पवित्रतेवरून खूप वाद झाले. मुले मोठी होतात, तर त्यांना म्हणतात लग्न करा, लग्न केल्याशिवाय काम कसे चालेल. भले मनुष्य गीता वाचतात परंतु त्यातून त्यांना काहीच समजत नाही. सर्वात जास्त बाबांना अभ्यास होता. एकही दिवस गीता वाचणे चुकवत नव्हते. जेव्हा माहीत झाले गीतेचा भगवान शिव आहेत, तर त्यांना नशाच चढला की, मी तर विश्वाचा मालक बनणार आहे. हे तर शिव भगवानुवाच आहे मग पवित्रतेवरून देखील खूप मोठा वादंग झाला. यामध्ये बहादुरी पाहिजे ना. तुम्ही आहातच महावीर-महावीरणी. एका बाबांशिवाय इतर कोणाचीच पर्वा नाही. पुरुष आहे रचता, रचता स्वतः पावन बनतो तेव्हा रचनेला देखील पावन बनवितो. बस्स, याच गोष्टीवरून अनेकांचे भांडण झाले. मोठ-मोठ्या घरातून निघून आले. कोणाचीच पर्वा केली नाही. ज्यांच्या भाग्यामध्येच नसेल तर समजतील तरी कसे. पवित्र राहायचे असेल तर रहा नाहीतर जाऊन आपला प्रबंध करा. एवढी हिंमत पाहिजे ना. बाबांच्या समोर किती दंगे झाले. बाबांना कधी दु:खी झालेले पाहिलेत? वर्तमानपत्रांमधून अमेरिकेपर्यंत गेले. नथिंग न्यू. हे तर कल्पापूर्वी प्रमाणे होतेच यामध्ये घाबरण्याची काय गरज आहे. आपल्याला तर आपल्या बाबांकडून वारसा घ्यायचा आहे. आपल्या रचनेला वाचवायचे आहे. बाबा जाणतात सारी क्रियेशन (रचना) यावेळी पतित आहे. मलाच सर्वांना पावन बनवायचे आहे. बाबांनाच सर्व जण म्हणतात - ‘हे पतित-पावन, हे लिबरेटर या, तर त्यांनाच दया येते. दयाळू आहेत ना. तर बाबा समजावून सांगत आहेत - ‘मुलांनो, कोणत्याही गोष्टीला घाबरू नका. घाबरल्याने उच्च पद प्राप्त करू शकणार नाही. मातांवर अत्याचार होतात. अशी देखील निशाणी आहे - द्रौपदीचे वस्त्रहरण करत होते. बाबा २१ जन्मांकरिता वस्त्रहरण होण्यापासून वाचवतात. दुनिया या गोष्टींना जाणत नाही. पतित तमोप्रधान जुनी सृष्टी देखील बनणारच आहे. प्रत्येक वस्तू नव्या पासून पुन्हा जुनी जरूर होणार आहे. जुन्या घराला सोडावेच लागते. नवीन दुनिया गोल्डन एज्ड, जुनी दुनिया आइरन एज्ड... कायमचे तर राहू शकत नाही. तुम्ही मुले जाणता - हे सृष्टी चक्र आहे. देवी-देवतांच्या राज्याची पुन्हा स्थापना होत आहे. बाबा देखील म्हणतात - पुन्हा तुम्हाला गीता ज्ञान ऐकवत आहे. इथे रावण राज्यामध्ये दुःख आहे. रामराज्य कशाला म्हटले जाते, हे देखील कोणी समजत नाही. बाबा म्हणतात मी स्वर्ग अर्थात राम-राज्याची स्थापना करण्याकरिता आलो आहे. तुम्हा मुलांनी अनेकदा राज्य घेतले आहे आणि मग गमावले आहे. हे सर्वांच्या बुद्धीमध्ये आहे. २१ जन्म आपण सतयुगामध्ये असतो, त्याला म्हटले जाते २१ पिढी अर्थात जेव्हा वृद्ध अवस्था होते तेव्हा शरीर सोडतात. कधीही अकाली मृत्यू होत नाही. आता तुम्ही जसे त्रिकालदर्शी बनले आहात. तुम्ही जाणता - शिवबाबा कोण आहेत? शिवाची मंदिरे देखील असंख्य बनविली आहेत. मूर्ती तर घरामध्ये देखील ठेवू शकता ना. परंतु भक्तीमार्गाची देखील ड्रामामध्ये नोंद आहे. बुद्धीचा वापर केला जावा. श्रीकृष्णाची अथवा शिवाची मूर्ती (शिवलिंग) घरामध्ये ठेऊ शकता. चीज तर एकच आहे. मग इतके दूर-दूर का जातात? काय त्यांच्याकडे गेल्याने श्रीकृष्णपुरीचा वारसा मिळणार आहे का? आता तुम्ही जाणता जन्म-जन्मांतर आपण भक्ती करत आलो आहोत. रावण राज्याचा देखील भपका बघा किती आहे. हा आहे अखेरचा भपका. रामराज्य तर सतयुगामध्ये होते. तिथे ही विमाने इत्यादी सर्व काही होते नंतर मग हे सर्व गायब झाले. आता पुन्हा यावेळी हे सर्व निघाले आहे. आता हे सर्व शिकत आहेत, जे शिकणारे आहेत ते संस्कार घेऊन जातील. तिथे येऊन मग विमान बनवतील. या भविष्यामध्ये तुम्हाला सुख देणाऱ्या वस्तू आहेत. हे सायन्स मग तुमच्या उपयोगाला येईल. आता तर हे सायन्स दुःख देण्याकरिता आहे, मग तिथे हेच सायन्स सुखासाठी असेल. आता स्थापना होत आहे. बाबा नवीन दुनियेकरिता राजधानी स्थापन करत आहेत तर तुम्हा मुलांना महावीर बनायचे आहे. दुनियेमध्ये हे थोडेच कोणी जाणतात की भगवान आलेले आहेत.

बाबा म्हणतात - गृहस्थ व्यवहारामध्ये राहत असताना कमलपुष्प समान पवित्र रहा, यामध्ये घाबरण्याचा प्रश्नच नाही. फारफार तर शिव्या देतील. शिव्या तर यांना (ब्रह्मा बाबांना) देखील खूप मिळाल्या आहेत. श्रीकृष्णाने शिव्या खाल्ल्या - असे दाखवले आहे. आता श्रीकृष्ण तर शिवी खाऊ शकत नाही. शिव्या तर कलियुगामध्ये खातात. तुमचे रूप जे आता आहे ते पुन्हा कल्पा नंतर यावेळी असेल. मध्येच कधीही असू शकणार नाही. प्रत्येक जन्मामध्ये फीचर्स बदलत जातात, हा ड्रामा बनलेला आहे. ८४ जन्मांमध्ये ज्या फिचर्समध्ये जन्म घेतले आहेत तेच घ्याल. आता तुम्ही जाणता हीच फिचर्स बदलून दुसऱ्या जन्मामध्ये ही लक्ष्मी-नारायणाची फिचर्स बनतील. तुमच्या बुद्धीचे आता कुलूप उघडले आहे. ही आहे नवीन गोष्ट. बाबा देखील नवीन, गोष्टी देखील नवीन. या गोष्टी काहींच्या लवकर लक्षात येत नाहीत. जेव्हा भाग्यामध्ये असेल तेव्हाच तर काही समजेल. बाकी महावीर त्यांना म्हटले जाते जे कितीही संकटे आली तरीही घाबरणार नाहीत. परंतु आत्ता ती अवस्था होऊ शकणार नाही. होणार आहे जरूर. महावीर कोणत्याच संकटांना घाबरणार नाहीत. ती अवस्था अखेरीला होणार आहे म्हणून गायले गेले आहे - अतींद्रिय सुख गोप-गोपींना विचारा. बाबा आले आहेत तुम्हा मुलांना स्वर्गाच्या लायक बनविण्याकरिता. कल्पापूर्वीप्रमाणे नरकाचा विनाश तर होणारच आहे. सतयुगामध्ये तर एकच धर्म असेल. सर्वांना ‘वननेस’ असावा असे वाटते, एक धर्म असायला हवा. हे देखील कोणाला माहिती नाहीये की राम राज्य, रावण राज्य वेग-वेगळे आहे. आता जर बाबांवर पूर्ण निश्चय असेल तर श्रीमतावर चालावे लागेल. प्रत्येकाची नाडी (अवस्था) पाहिली जाते, त्यानुसार मग सल्ला देखील दिला जातो. बाबांनी (ब्रह्मा बाबांनी) देखील आपल्या मुलांना सांगितले - ‘जर लग्न करायचे असेल तर तुझे तू जाऊन कर. पुष्कळ मित्र-नातेवाईक बसले आहेत ते लग्न लावून देतील’. मग कोणीतरी असा पुढाकार घेणारा निघाला. तर प्रत्येकाची अवस्था पाहिली जाते. कोणी विचारतात - ‘बाबा, अशी परिस्थिती आहे, मी पवित्र राहू इच्छितो, तर माझे नातेवाईक मला घरातून बाहेर काढतात, तर आता काय करावे? अरे, हे देखील विचारतो आहेस की, पवित्र राहायचे आहे, जर राहू शकत नाहीस तर मग जाऊन लग्न कर. अच्छा, समजा कोणाचा साखरपुडा झालेला आहे, तर तीचे समाधान करायचे आहे, हरकत नाही. लग्न-गाठ जेव्हा बांधतात तर त्यावेळी तिला सांगतात की, ‘हा पती तुझा गुरु आहे’. ठीक आहे, तुम्ही तिच्याकडून लिहून घ्या. तू मानत आहेस की मी पती तुझा गुरु ईश्वर आहे, हे लिहून दे. अच्छा, आता मी आदेश देतो की, पवित्र रहायचे आहे. हिंमत पाहिजे ना. ध्येय खूप मोठे आहे. प्राप्ती खूप जबरदस्त आहे. काम विकाराची आग तेव्हा लागते जेव्हा प्राप्ती विषयी ठाऊक नसते. बाबा म्हणतात - इतकी मोठी प्राप्ती होत आहे तर मग एक जन्म पवित्र राहिलात तर काय मोठी गोष्ट आहे. मी तुझा पती ईश्वर आहे. माझ्या आज्ञेनुसार पवित्र रहावे लागेल. बाबा युक्त्या सांगत असतात. भारतामध्ये हा कायदा आहे की, पत्नीला सांगतात - तुझा पतीच ईश्वर आहे. त्याच्या आज्ञेमध्ये राहायचे आहे. पतीचे पाय चेपायचे आहेत कारण समजतात ना, लक्ष्मीने देखील नारायणाचे पाय चेपले होते. ही प्रथा कुठून आली? भक्तिमार्गाच्या चित्रांवरून. सतयुगामध्ये तर अशी गोष्टच असत नाहीत. नारायण काही कधी थकतो काय ज्यामुळे लक्ष्मी त्याचे पाय चेपेल. थकण्याची गोष्टच असू शकत नाही. ही तर दुःखाची गोष्ट होते. तिथे दुःख, वेदना कुठून आल्या. तर बाबांनी फोटोमधून लक्ष्मीचे चित्रच काढून टाकले. नशा तर चढतो ना. बालपणापासूनच वैराग्य वृत्ती होती त्यामुळे भक्ती खूप करत होते. तर बाबा युक्त्या खूप सांगतात. तुम्ही जाणता आता आपण एका पित्याची मुले आहोत तर आपसामध्ये बहिण-भाऊ झालो. डाडेकडून (आजोबांकडून) वारसा घेत आहोत. बाबांना बोलावतातच मुळी पतित दुनियेमध्ये. हे पतित-पावन सर्व सीतांचे राम. बाबांना म्हटले जाते ट्रूथ, सचखंड स्थापन करणारे. तेच साऱ्या सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे सत्य ज्ञान तुम्हाला देतात. तुमची आत्मा आता ज्ञान सागर बनत आहे.

गोड मुलांनी हिंमत ठेवली पाहिजे, आपल्याला बाबांच्या श्रीमतावर चालायचे आहे. बेहदचे बाबा बेहदच्या रचनेला स्वर्गाचा मालक बनवत आहेत. तर पुरुषार्थ करून वारसा घ्यायचा आहे. वारी जायचे आहे. तुम्ही त्यांना आपले वारसदार बनवाल तर ते तुम्हाला २१ जन्मांकरिता वारसा देतील. बाबा मुलांवर वारी जातात (बलिहार जातात). मुले म्हणतात - ‘बाबा, हे तन-मन-धन सर्व काही तुमचे आहे. तुम्ही पिता देखील आहात तर मुलगा देखील आहात. गातात देखील - ‘त्वमेव माताश्च पिता त्वमेव…’ एकाचीच महिमा किती महान आहे. त्यांना म्हटलेच जाते सर्वांचा दुःख हर्ता, सुख कर्ता. सतयुगामध्ये ५ तत्व देखील सुख देणारे होते. कलियुगामध्ये ५ तत्व देखील तमोप्रधान असल्या कारणाने दुःख देतात. तिथे तर आहेच सुख. हा ड्रामा बनलेला आहे. तुम्ही जाणता ही तीच ५ हजार वर्षांपूर्वीची लढाई आहे. आता स्वर्गाची स्थापना होत आहे. तर मुलांनी नेहमी आनंदात राहिले पाहिजे. भगवंताने तुम्हाला ॲडॉप्ट केले आहे; तर मग तुम्हा मुलांचा बाबा शृंगार देखील करतात, शिकवतात देखील. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) सदैव बाप समान बनण्याची हिंमत ठेवायची आहे. बाबांवर पूर्ण रीतीने वारी जायचे (बलिहार जायचे) आहे.

२) कोणत्याही गोष्टीमध्ये घाबरायचे नाही. पवित्र जरूर बनायचे आहे.

वरदान:-
समस्यांना चढत्या कलेचे साधन असल्याचा अनुभव करून नेहमी संतुष्ट राहणारे शक्तिशाली भव

जे शक्तिशाली आत्मे आहेत ते समस्यांना असे पार करतात जणू काही एखादा सरळ रस्ता सहज पार करतात. समस्या त्यांच्यासाठी चढत्या कलेचे साधन बनते. प्रत्येक समस्या ओळखीची असल्याचा अनुभव होतो. ते कधीही आश्चर्यचकित होत नाहीत; उलट नेहमी संतुष्ट राहतात. मुखातून कधीही ‘कारण’ शब्द निघत नाही परंतु त्याचवेळी कारणाला निवारणामध्ये बदलतात.

बोधवाक्य:-
स्वस्थितीमध्ये स्थित राहून सर्व परिस्थितींना पार करणे हीच श्रेष्ठता आहे.

मातेश्वरीजींची अनमोल महावाक्ये:-

“परमार्थाद्वारे व्यवहार स्वतःच सिद्ध होतो”

भगवानुवाच आहे की, तुम्ही माझ्या द्वारे ‘परम’ अर्थाला जाणल्याने माझ्या ‘परम’ पदाला प्राप्त कराल अर्थात परमार्थाला जाणल्याने व्यवहार सिद्ध होतो. आता बघा, देवतांसमोर प्रकृती तर चरणाची दासी होऊन राहते, ही ५ तत्वे सुख-स्वरूप बनून स्वेच्छेने सेवा करतात. यावेळी पहा मनाला अपेक्षित सुख न मिळाल्यामुळे मनुष्य दुःख, अशांतीचा अनुभव करत राहतो. सतयुगामध्ये तर ही प्रकृती आदरयुक्त होऊन राहते. पहा, देवतांच्या जड चित्रांवर देखील इतके हिरे-माणके लावतात, तर जेव्हा प्रत्यक्ष चैतन्य मध्ये असतील तर त्यावेळी किती वैभव असेल? यावेळी मनुष्य उपाशी मरत आहेत आणि जड चित्रांवर करोडोंनी रुपये खर्च करत आहेत. तर एवढा फरक का आहे! जरूर त्यांनी अशी श्रेष्ठ कर्म केली आहेत तेव्हाच तर त्यांचे यादगार बनलेले आहेत. त्यांचे पूजन देखील किती होते. ते निर्विकारी प्रवृत्तीमध्ये राहत असताना देखील कमलपुष्प समान अवस्थेमध्ये राहत होते, परंतु आता ते निर्विकारी प्रवृत्तीच्या ऐवजी विकारी प्रवृत्तीमध्ये गेले आहेत. ज्यामुळे सर्व जण परमार्थाला विसरून व्यवहाराच्या दिशेने चालत आहेत, म्हणून रिझल्ट उलटा दिसून येत आहे. आता आपल्याला स्वयं परमात्मा येऊन विकारी प्रवृत्तीमधून बाहेर काढून निर्विकारी प्रवृत्ती शिकवत आहेत, ज्यामुळे आपले जीवन कायमसाठी सुखी बनते, म्हणून अगोदर पाहिजे परमार्थ त्यानंतर आहे व्यवहार. परमार्थामध्ये राहिल्याने व्यवहार ऑटोमॅटिकली सिद्ध होतो. ओम् शांती.

हे अव्यक्त इशारे - “निश्चयाच्या फाउंडेशनला मजबूत करून सदैव निर्भय आणि निश्चिंत रहा”

जसे डॉक्टर पेशंटला पहिले विश्वासात घेतात, तर त्याला विश्वास वाटू लागतो की, हा डॉक्टर खूप चांगला आहे, यांच्याद्वारे शफा (स्वास्थ्य) प्राप्त होईल. तसेच डॉक्टरने किती जरी चांगले औषध दिले, परंतु जर विश्वास नसेल तर त्या औषधाचा परिणाम होत नाही. असेच रूहानी डॉक्टरीमध्ये देखील अशी शक्तीशाली स्टेज असावी ज्यामुळे सर्वांचा विश्वास बसेल की, इथे पोहोचलो आहोत तर अवश्य काही ना काही प्राप्ती होणारच आहे.