25-06-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - एकदम पक्का-पक्का निश्चय करा की आपण आत्मा आहोत, आत्मा समजून प्रत्येक काम सुरू करा तर बाबांची आठवण येईल, पाप होणार नाही”

प्रश्न:-
प्रत्येकाला कर्मातीत अवस्थेला प्राप्त करण्यासाठी कोणती मेहनत करायची आहे? कर्मातीत स्थितीच्या समीपतेचे लक्षण काय आहे?

उत्तर:-
कर्मातीत बनण्यासाठी आठवणीच्या बळाने आपल्या कर्मेंद्रियांना वश करण्याची मेहनत करा. अभ्यास करा कि, ‘मी निराकार आत्मा निराकार बाबांची संतान आहे’. सर्व कर्मेंद्रिये निर्विकारी बनली पाहिजेत - ही आहे जबरदस्त मेहनत. जितके कर्मातीत अवस्थेच्या समीप येत जाल तितके अंग-अंग शितल, सुगंधित होत जाईल. त्यातून विकारी वास निघून जाईल. अतींद्रिय सुखाचा अनुभव होत राहील.

ओम शांती।
शिव भगवानुवाच. हे तर मुलांना सांगायचे नाही आहे की कोणा प्रती. मुले जाणतात - शिवबाबा ज्ञानाचा सागर आहेत. मनुष्य सृष्टीचे बीजरूप आहेत. तर जरूर आत्म्यांशी बोलतात. मुले जाणतात शिवबाबा शिकवत आहेत. ‘बाबा’ शब्दावरूनच समजतात परम आत्म्यालाच बाबा म्हणतात. सर्व मनुष्यमात्र त्या परम आत्म्यालाच फादर म्हणतात! बाबा परमधाममध्ये राहतात. सर्वात आधी या गोष्टी पक्क्या करायच्या आहेत. स्वतःला आत्मा समजायचे आहे आणि हा निश्चय पक्का करायचा आहे. बाबा जे ऐकवतात, ते आत्माच धारण करते. जे ज्ञान परमात्म्यामध्ये आहे ते आत्म्यामध्ये देखील आले पाहिजे. जे मग मुखाद्वारे वर्णन करायचे असते. जे काही शिक्षण घेता, ते आत्माच शिकते. आत्मा निघून गेली तर अभ्यास इत्यादी विषयी काहीही समजणार नाही. आत्मा संस्कार घेऊन गेली, जाऊन दुसऱ्या शरीरामध्ये बसली. तर आधी स्वतःला पक्के-पक्के आत्मा समजावे लागेल. देह-अभिमान आता सोडावा लागेल. आत्मा ऐकते, आत्माच धारण करते. आत्मा शरीरामध्ये नसेल तर शरीर हलू देखील शकणार नाही. आता तुम्हा मुलांना हा अगदी पक्का निश्चय करायचा आहे - परम आत्मा आम्हा आत्म्यांना ज्ञान देत आहेत. आम्ही आत्मे देखील शरीराद्वारे ऐकत आहोत आणि परमात्मा शरीराद्वारे ऐकवत आहेत - हेच वेळोवेळी विसरून जातात. देह आठवतो. हे देखील जाणता कि चांगले आणि वाईट संस्कार आत्म्यामध्येच असतात. दारू पिणे, घाणेरड्या गोष्टी करणे… हे देखील आत्माच कर्मेंद्रियांद्वारे करते. आत्माच या कर्मेंद्रियांद्वारे सारा पार्ट बजावते. सर्वप्रथम आत्म-अभिमानी जरूर बनायचे आहे. बाबा आत्म्यांनाच शिकवतात. आत्माच मग हे नॉलेज सोबत घेऊन जाईल. जसे तिथे परम आत्मा ज्ञानासहित राहतात, तसे तुम्ही आत्मे मग हे नॉलेज सोबत घेऊन जाल. मी तुम्हा मुलांना या ज्ञानासहित घेऊन जातो. मग तुम्हा आत्म्यांना पार्टमध्ये यायचे आहे, तुमचा पार्ट आहे नव्या दुनियेमध्ये प्रारब्ध भोगणे. ज्ञान विसरून जाते. हे सर्व चांगल्या प्रकारे धारण करायचे आहे. सर्वात पहिले हे खूप चांगले पक्के करायचे आहे की, ‘मी आत्मा आहे’, असे बरेच आहेत जे हे विसरून जातात. स्वतःवर खूप-खूप मेहनत करायची आहे. विश्वाचा मालक बनायचे आहे तर मेहनती शिवाय थोडेच बनाल. वारंवार या पॉईंटलाच विसरून जातात कारण हे नवे ज्ञान आहे. जेव्हा स्वतःला आत्मा विसरून देह-अभिमानामध्ये येता तर काही ना काही पापे होतात. देही-अभिमानी बनल्याने कधीही पाप होणार नाही. पापे नष्ट होतील. आणि मग अर्धाकल्प कोणतेही पाप होणार नाही. तर हा निश्चय ठेवला पाहिजे - मी आत्मा शिकते, देह नाही. आधी जिस्मानी मनुष्याचे मत मिळत होते, आता बाबा श्रीमत देत आहेत. हे नव्या दुनियेचे अगदी नवीन ज्ञान आहे. तुम्ही सर्व नवीन बनाल, यामध्ये गोंधळून जाण्याची गोष्टच नाही. अनेक वेळा तुम्ही जुन्यापासून नवे , नव्यापासून जुने बनत आले आहात, त्यामुळे चांगल्या रीतीने पुरुषार्थ करायचा आहे.

मी आत्मा कर्मेंद्रियांद्वारे हे काम करतो. ऑफिस इत्यादी ठिकाणी देखील स्वतःला आत्मा समजून कर्मेंद्रियांद्वारे काम करत रहाल तर शिकविणारे बाबा जरूर आठवतील. आत्माच बाबांची आठवण करते. भले आधी देखील म्हणत होता की, ‘मी ईश्वराची आठवण करतो’. परंतु स्वतःला साकार समजून निराकाराची आठवण करत होता. स्वतःला निराकार समजून निराकाराची आठवण कधीही करत नव्हता. आता तुम्हाला स्वतःला निराकार आत्मा समजून निराकार बाबांची आठवण करायची आहे. ही मोठी विचार सागर मंथन करण्याची गोष्ट आहे. भले काहीजण लिहितात - ‘मी दोन तास आठवणीमध्ये राहतो’. कोणी म्हणतात - ‘आम्ही सदैव शिवबाबांची आठवण करतो’. परंतु सदैव आठवण कोणी करू शकत नाही. जर आठवण करत असेल तर अगोदरच कर्मातीत अवस्था होईल. कर्मातीत अवस्था तर अतिशय जबरदस्त मेहनतीने होते. यामध्ये सर्व विकारी कर्मेंद्रिये वश होतात. सतयुगामध्ये सर्व कर्मेंद्रिये निर्विकारी बनतात. अंग-अंग सुगंधित होते. आता दुर्गंधीयुक्त घाणेरडे शरीर आहे. सतयुगाची तर खूप सुंदर महिमा आहे. त्याला म्हटले जाते हेवन, नवीन दुनिया, वैकुंठ. तिकडचे फीचर्स, मुकुट इत्यादी इथे कोणीही बनवू शकणार नाही. भले तुम्ही बघून सुद्धा येता. परंतु इथे तो बनवू शकत नाही. तिथे तर नॅचरल सौंदर्य असते तर आता तुम्हा मुलांना आठवणीनेच पावन बनायचे आहे. खूप-खूप आठवणीची यात्रा करायची आहे. यामध्ये भरपूर मेहनत आहे. आठवण करता-करता कर्मातीत अवस्था प्राप्त कराल तर सर्व कर्मेंद्रिये शितल होतील. अंग-अंग अतिशय सुगंधित होईल, दुर्गंध राहणार नाही. आता तर सर्व कर्मेंद्रियांमध्ये दुर्गंध आहे. हे शरीर काहीच कामाचे नाही आहे. तुमची आत्मा आता पवित्र बनत आहे. शरीर तर बनू शकणार नाही. ते तर तेव्हाच बनेल जेव्हा तुम्हाला नवीन शरीर मिळेल. अंगा-अंगात सुगंध असावा - ही महिमा देवतांची आहे. तुम्हा मुलांना खूप आनंद झाला पाहिजे. बाबा आले आहेत तर खुशीचा पारा चढला पाहिजे.

बाबा म्हणतात - ‘माझी आठवण करा तर विकर्म विनाश होतील’. गीतेमध्ये शब्द किती क्लियर आहेत. बाबांनी म्हटले देखील आहे - ‘माझे जे भक्त आहेत, जे गीता पठण करणारे आहेत, ते जरूर श्रीकृष्णाचे पुजारी असतील. तेव्हा बाबा म्हणतात देवतांच्या पुजार्यांना ऐकवा. मनुष्य शिवाची पूजा करतात आणि मग म्हणतात सर्वव्यापी आहे. निंदा करत असताना देखील मंदिरांमध्ये रोज जातात. शिवाच्या मंदिरामध्ये पुष्कळजण जातात. अनेक उंच पायऱ्या चढून वर जातात, शिवाचे मंदिर उंचावर बांधले जाते. शिवबाबा देखील येऊन शिडी विषयी सांगतात ना. त्यांचे उच्च नाव, उच्च ठिकाण आहे. किती उंचावर जातात. बद्रीनाथ, अमरनाथ तिथे शिवाची मंदिरे आहेत. उंच चढविणारे आहेत, तर त्यांचे मंदिर देखील खूप उंचावर बांधतात. इथे ‘गुरुशिखर’चे मंदिर देखील उंच पहाडीवर बांधलेले आहे. उच्च बाबा बसून तुम्हाला शिकवतात. दुनियेमध्ये इतर कोणीही जाणत नाही की शिवबाबा येऊन शिकवतात. ते तर सर्वव्यापी म्हणतात. आता तुमच्यासमोर एम ऑब्जेक्ट देखील उभा आहे. बाबांशिवाय अजून कोणी असे म्हणेल का की, ‘हे तुमचे ऑब्जेक्ट आहे’. हे बाबाच तुम्हा मुलांना सांगतात. तुम्ही कथा देखील सत्यनारायणाची ऐकता. ते (दुनियावाले) तर जे पास्ट होते (भूतकाळात होते), त्यांच्या कथा सांगतात की या पूर्वी काय-काय झाले. ज्याला कहाणी म्हटले जाते. हे उच्च ते उच्च बाबा मोठ्यात-मोठी कथा ऐकवतात. ही कथा तुम्हाला खूप उच्च बनविणारी आहे. हे सदैव लक्षात ठेवले पाहिजे आणि अनेकांना ऐकवले पाहिजे. कथा ऐकविण्यासाठी तुम्ही प्रदर्शनी किंवा म्युझियम बनवता. ५ हजार वर्षांपूर्वी भारतच होता, ज्यामध्ये देवता राज्य करत होते. ही आहे सच्ची-सच्ची कथा, जी दुसरे कोणीही सांगू शकत नाही . ही सत्य कथा आहे जी चैतन्य वृक्षपती बाबा बसून समजावून सांगतात, ज्याद्वारे तुम्ही देवता बनता. यामध्ये पवित्रता मुख्य आहे. पवित्र बनला नाहीत तर धारणा होणार नाही. वाघिणीच्या दुधासाठी सोन्याचे भांडे हवे, तेव्हाच धारणा होऊ शकेल. हे कान भांड्याप्रमाणे आहेत ना. हे सोन्याचे भांडे असायला हवे. आता दगडाचे आहे. सोन्याचे बनेल तेव्हाच धारणा होऊ शकेल. खूप लक्ष देऊन ऐकायचे आणि धारण करायचे आहे. कथा तर सोपी आहे, जी गीतेमध्ये लिहिली आहे. त्या (शास्त्रातील) कथा ऐकवून कमाई करतात. ऐकणाऱ्यांकडून त्यांची कमाई होते. इथे तुमची देखील कमाई आहे. दोन्ही कमाई चालूच राहतात. दोन्ही व्यापार आहेत. शिकवतात देखील. म्हणतात मनमनाभव, पवित्र बना. असे इतर कोणीही म्हणू शकणार नाही, आणि मनमनाभव सुद्धा राहत नाहीत. इथे (या दुनियेमध्ये) कोणताही मनुष्य पवित्र असू शकत नाही कारण भ्रष्टाचारातून उत्पत्ती होते (विकारातून जन्म आहे). रावण राज्य कलियुग अंतापर्यंत चालणार आहे, त्यात पावन बनायचे आहे. पावन म्हटले जाते देवतांना, मनुष्यांना नाही. संन्यासी देखील मनुष्य आहेत, त्यांचा आहे निवृत्ती मार्गाचा धर्म. बाबा म्हणतात - ‘माझी आठवण करा तर तुम्ही पवित्र बनाल’. भारतामध्ये प्रवृत्ती मार्गाचेच राज्य चालले आहे. निवृत्ती मार्गवाल्यांशी तुमचे काहीही कनेक्शन नाही आहे. इथे तर पती-पत्नी दोघांनाही पवित्र बनायचे आहे. दोन्ही चाके चालत असतील तर ठीक आहे, नाहीतर भांडणे होतात. पवित्रतेवरूनच भांडणे होतात. इतर कोणत्या सत्संगामध्ये पवित्रतेवर भांडण होते, असे कधी ऐकले नसेल. हे एकदाच जेव्हा बाबा येतात तेव्हा भांडण होते. साधू-संत इत्यादी कधी असे म्हणतात का की अबलांवर अत्याचार होतील! इथे मुली हाका मारतात - ‘बाबा, आम्हाला वाचवा’. बाबा देखील विचारतात - विवस्त्र तर होत नाहीस ना? कारण काम महाशत्रू आहे ना. एकदम कोसळतात (पतन होते). या काम विकाराने सर्वांना वर्थ नॉट ए पेनी (कवडीमोल) बनवले आहे. बाबा म्हणतात - ‘६३ जन्म तुम्ही वेश्यालयामध्ये राहता, आता पावन बनून शिवालयामध्ये जायचे आहे. हा एक जन्म पवित्र बना. शिवबाबांची आठवण करा तर शिवालय स्वर्गामध्ये जाल’. तरीदेखील काम विकार किती जबरदस्त आहे. किती हैराण करतो, कशिश (आकर्षण) वाटते. या आकर्षणाला काढून टाकले पाहिजे. आता जर का परत जायचे आहे तर पवित्र जरूर बनायचे आहे. टीचर काही बसून थोडाच राहील. शिक्षण थोडा वेळ चालणार. बाबा सांगतील. माझा हा रथ (ब्रह्मा बाबांचे तन) आहे ना. रथाचे आयुर्मान म्हणता येईल. बाबा म्हणतात - ‘मी तर सदैव अमर आहे, माझे नावच आहे - ‘अमरनाथ’. पुनर्जन्म घेत नाही म्हणून अमरनाथ म्हटले जाते. तुम्हाला अर्ध्या कल्पासाठी अमर बनवतात. तरीदेखील तुम्ही पुनर्जन्म घेता. तर आता तुम्हा मुलांना वर (परमधाममध्ये) जायचे आहे. तोंड त्या बाजूला (स्वर्गाकडे), पाय या बाजूला (नरकाकडे) करायचे आहेत. मग या बाजूला तोंड का फिरवले पाहिजे. म्हणतात, ‘बाबा, चूक झाली, तोंड या बाजूला झाले’. तर जणू उलटे बनतात.

तुम्ही बाबांना विसरून देह-अभिमानी बनता तर उलटे बनता. बाबा सर्व काही सांगतात. बाबांकडून काहीही मागायचे नाही की, मला ताकद द्या, शक्ती द्या. बाबा तर रस्ता सांगतात - योगबलाने असे बनायचे आहे. तुम्ही योगबलाने इतके श्रीमंत बनता जे २१ जन्म कधी कोणाकडे मागावे लागणार नाही. इतके तुम्ही बाबांकडून घेता. समजता बाबा तर अथाह कमाई करून देतात, म्हणतात जे हवे ते घ्या. हे लक्ष्मी-नारायण आहेत हाइयेस्ट. मग जे हवे ते घ्या. पूर्ण अभ्यास केला नाहीत तर प्रजेमध्ये निघून जाल. प्रजा देखील जरूर बनवायची आहे. पुढे जाऊन तुमची म्युझियम पुष्कळ होतील आणि तुम्हाला मोठमोठे हॉल मिळतील, कॉलेजेस् मिळतील जिथे तुम्ही सेवा कराल. हे जे लग्नसराईसाठी हॉल बनवतात, ते देखील तुम्हाला जरूर मिळतील. तुम्ही समजावून सांगाल - ‘शिव भगवानुवाच, मी तुम्हाला असा पवित्र बनवतो’, तर ट्रस्टी हॉल देतील. तुम्ही बोला - ‘भगवानुवाच - काम महाशत्रू आहे, ज्यामुळे दुःख मिळाले आहे. आता पावन बनून पावन दुनियेमध्ये जायचे आहे’. तर तुम्हाला हॉल मिळत राहतील. मग म्हणणार टू लेट (फार उशीर झाला). बाबा म्हणतात - मी असे फुकटचे थोडेच घेईन जे मग परत द्यावे लागेल. मुलांच्या पैशा-पैशाने तलाव बनतो. बाकी तर सारे मातीत मिसळून जाणार आहे. बाबा सर्वात मोठा सराफ देखील आहे. सोनार, धोबी, कारागीर देखील आहे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) बाबा जी सत्य कथा ऐकवतात, ती लक्षपूर्वक ऐकायची आहे आणि धारण करायची आहे. बाबांकडून काहीही मागायचे नाही. २१ जन्मांसाठी आपली कमाई जमा करायची आहे.

२) घरी परत जायचे आहे, त्यामुळे योगबलाने शरीराचे आकर्षण संपवायचे आहे. कर्मेंद्रियांना शितल बनवायचे आहे. या देहाचे भान सोडण्याचा पुरुषार्थ करायचा आहे.

वरदान:-
एका जागेवर राहून अनेक आत्म्यांची सेवा करणारे लाईट-माईट संपन्न भव

जसे लाईट हाऊस एका स्थानावर स्थित असताना दूर-दूरची सेवा करते. तसे तुम्ही सर्वजण एका स्थानावर राहत असताना अनेकांच्या सेवेअर्थ निमित्त बनू शकता; यासाठी फक्त लाईट-माईटने संपन्न बनण्याची आवश्यकता आहे. मन-बुद्धी कायम व्यर्थ विचार करण्यापासून मुक्त असावी, मनमनाभवच्या मंत्राचे सहज स्वरूप असावे - मन्सा शुभ भावना, श्रेष्ठ कामना, श्रेष्ठ वृत्ती आणि श्रेष्ठ वायब्रेशनने संपन्न असावे तर ही सेवा सहज करू शकाल. हीच मनसा सेवा आहे.

बोधवाक्य:-
आता तुम्ही ब्राह्मण आत्मे माईट बना आणि दुसऱ्या आत्म्यांना माइक बनवा.