25-06-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड मुलांनो, पावन
बनण्याचा एकमात्र उपाय आहे - बाबांची आठवण, आठवणीची मेहनतच अंतिम समयी कामी येईल”
प्रश्न:-
संगमावर कोणता
तिलक द्याल तर स्वर्गाच्या राजाईचा तिलक मिळेल?
उत्तर:-
संगमावर हाच
तिलक द्या की, मी आत्मा बिंदू आहे, मी शरीर नाही. आतमध्ये हेच घोटत रहा की, मी आत्मा
आहे, मला बाबांकडून वारसा घ्यायचा आहे. बाबा देखील बिंदू आहेत, मी देखील बिंदू आहे.
या तिलक द्वारा स्वर्गाच्या राजाईचा तिलक प्राप्त होईल. बाबा म्हणतात - मी गॅरंटी
देतो की, तुम्ही माझी आठवण कराल तर अर्ध्या कल्पासाठी रडण्यापासून (दुःखातून) सुटाल.
ओम शांती।
हा ध्यास असला
पाहिजे की, ‘मज आत्म्याला बाबांची जरूर आठवण करायची आहे’, तेव्हाच तुम्ही पावन बनू
शकाल. मेहनत जी काही आहे ती हीच आहे, जी मेहनत मुलांकडून होत नाही. माया खूप हैराण
करते. एका बाबांची आठवण विसरायला लावते, दुसऱ्याची आठवण येते. बाबा अथवा साजनची
आठवण करत नाहीत. अशा साजनची तर कमीत-कमी आठ तास आठवण करून सेवा द्यायची आहे अर्थात
साजनची आठवण करून सहकार्य द्यायचे आहे. अथवा मुलांनी बाबांची आठवण केली पाहिजे - ही
आहे खूप मोठी मेहनत. गीतेमध्ये देखील आहे मनमनाभव. बाबांची आठवण करत राहा. उठता-बसता,
चालता-फिरता एका बाबांचीच आठवण करत रहा अजून काहीच नाही. अंतिम समयी ही आठवणच कामी
येईल. स्वतःला आत्मा अशरीरी समजा, आता आपल्याला परत जायचे आहे. ही भरपूर मेहनत
करायची आहे. पहाटे स्नान इत्यादी करून मग एकांतामध्ये वरती गच्ची वरती किंवा
हॉलमध्ये येऊन बसा. जितका एकांत असेल तितके चांगले आहे. नेहमी हेच लक्षात ठेवा की,
आपल्याला बाबांची आठवण करायची आहे. बाबांकडून संपूर्ण वारसा घ्यायचा आहे. ही मेहनत
दर ५००० वर्षानंतर तुम्हाला करावी लागते. सतयुग, त्रेता, द्वापर, कलियुग कुठेही
तुम्हाला ही मेहनत करावी लागत नाही. या संगमावरच तुम्हाला बाबा म्हणतात की, माझी
आठवण करा, बस्स. हीच ती वेळ आहे जेव्हा बाबा म्हणतात - माझी आठवण करा. बाबा येतात
देखील संगमावरच, अन्यथा बाबा इथे कधीच येत नाहीत. तुम्ही देखील नंबरवार
पुरुषार्थानुसार जाणता. बरीच मुले बाबांना विसरून जातात म्हणून खूप धोका खातात,
रावण खूप धोकेबाज आहे. अर्ध्याकल्पाचा हाच दुश्मन आहे; म्हणून बाबा म्हणतात - दररोज
पहाटे उठून विचार सागर मंथन करा आणि हाच चार्ट ठेवा की, ‘मी किती वेळ बाबांची आठवण
केली! किती गंज उतरला असेल!’ सर्व आधार आठवणीवरच आहे. आपला संपूर्ण वारसा घेण्यासाठी
मुलांनी सर्वतोपरी प्रयत्न करायचा आहे. नरापासून नारायण बनायचे आहे. ही आहे खरी
सत्यनारायणाची कथा. भक्त लोक पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाच्या कथेचे पठण करतात.
आता तुम्ही जाणता १६ कला संपूर्ण बनायचे आहे. ते बनाल सत्य बाबांची आठवण केल्याने.
बाबा आहेत श्रीमत देणारे. बाबा म्हणतात - गृहस्थीमध्ये राहा, काम-धंदा इत्यादी
काहीही करा परंतु बाबांची आठवण जरूर करायची आहे आणि पावन बनायचे आहे. बस्स. जर आठवण
केली नाहीत तर रावणाकडून कोणत्या ना कोणत्या प्रकारे धोका खात राहाल; त्यामुळे बाबा
प्रामुख्याने आठवणी विषयीच समजावून सांगत आहेत. शिवबाबांची आठवण करायची आहे. देहा
सहित देहाची जी काही नाती आहेत त्यांना विसरून स्वतःला आत्मा निश्चय करा. बाबा
वारंवार समजावून सांगतात की, ‘स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करायची आहे’.
नाहीतर मग अंतिम समयी खूप-खूप पश्चाताप कराल. खूप धोका खाल. अशी काही थप्पड बसेल की
माया एकदम तोंडच काळे करून टाकेल. बाबा आले आहेत तोंड गोरे करण्यासाठी. यावेळी
सर्वजण एकमेकांचे तोंड काळे करत राहतात (विकारात जात राहतात). गोरा बनविणारे एक
बाबाच आहेत, ज्यांच्या आठवणी द्वारे तुम्ही गोरे स्वर्गाचे मालक बनाल. ही आहेच पतित
दुनिया. बाबा येतातच मुळी पतितांना पावन बनविण्याकरिता. बाकी तुमच्या काम-धंद्याशी
बाबांचा काहीही संबंध नाही. शरीर निर्वाह अर्थ तुम्हाला जे करायचे आहे ते करा. बाबा
तर फक्त म्हणतात - मनमनाभव. तुम्ही विचारता देखील - आम्ही पावन दुनियेचे मालक कसे
बनू शकतो. बाबा म्हणतात - फक्त माझी आठवण करा. बस्स. पावन बनण्याचा अजून दुसरा
कोणताही उपाय नाही. कितीही दान-पुण्य इत्यादी करा, कितीही मेहनत करा, अगदी आगीतून
चालत गेलात तरीही, एका बाबांच्या आठवणीव्यतिरिक्त इतर कशाचाही उपयोग होणार नाही.
खूप सोपी गोष्ट आहे, याला म्हटले जाते - सहज योग. स्वतःला विचारा की, ‘मी आपल्या
गोड-गोड बाबांची संपूर्ण दिवसभरामध्ये किती आठवण करतो! झोपेत कोणती पापे तर होत
नाहीत ना? अशरीरी होतो का?’ बाकी दिवसाची खूप पापे होत राहतात आणि जुनी पापे देखील
खूप आहेत. मेहनत करायची आहे - आठवणीची. इथे येता तर ही मेहनत करायची आहे. बाहेरच्या
वाह्यात संकल्पांना काढून टाका. नाहीतर मग वायुमंडळ खूप खराब करतात. घराविषयी,
शेतीविषयक विचार चालत राहतात. कधी मुलांची आठवण येईल, कधी गुरुची आठवण येईल. संकल्प
चालत राहिले तर वायुमंडळाला खराब करतील. मेहनत न करणारे विघ्न टाकतात. या अतिशय
सूक्ष्म गोष्टी आहेत. तुम्हाला देखील हे आत्ता कळले आहे, नंतर तुम्हाला हे कधीही
कळणार नाही. बाबा आत्ताच वारसा देतात, मग अर्ध्याकल्पासाठी तुम्ही निश्चिंत होता.
लौकिक पित्याच्या विचारांमध्ये आणि बेहद पित्याच्या विचारांमध्ये किती अंतर आहे.
बाबा म्हणतात की भक्तिमार्गामध्ये मला किती काळजी असते. भक्त किती निरंतर आठवण करत
असतात. सतयुगामध्ये कोणीही आठवण करत नाही. बाबा म्हणतात की, तुम्हाला इतके सुख देतो
जेणेकरून तुम्हाला तिथे माझी आठवण करण्याची गरजच राहणार नाही. मी जाणतो माझी मुले
सुखधाम, शांतीधाम मध्ये बसली आहेत. दुसरा कोणताही मनुष्य समजू शकणार नाही. असे
बाबांवर निश्चय-बुद्धी होण्यामध्ये माया विघ्न आणते. बाबा म्हणतात की, फक्त माझी
आठवण करा तर तुमच्यामध्ये जी अलॉय चांदी, तांबे, लोखंड… इत्यादींची भेसळ पडली आहे
ती निघून जाईल. गोल्डन एज्ड मधून सिल्व्हर एज्डमध्ये आल्याने देखील दोन कला कमी
होतात. या गोष्टी तुम्हीच ऐकता आणि समजून घेत आहात. जो खरा ब्राह्मण असेल त्याच्या
बुद्धीमध्ये अगदी पक्के लक्षात राहील, नाहीतर लक्षात राहणार नाही. आठवण टिकणारच नाही.
सर्व आधार बाबांची आठवण करण्यावर आहे. बाबा वारंवार सांगतात मुलांनो, बाबांची आठवण
करा. हे बाबा (ब्रह्मा बाबा) देखील म्हणतील - ‘शिवबाबांची आठवण करा’. शिवबाबा स्वतः
देखील म्हणतील - ‘मज पित्याची आठवण करा’. आत्म्यांना म्हणतात - ‘माझ्या मुलांनो’.
ते निराकार परमात्माच आत्म्यांना सांगतील. मूळ गोष्टच ही आहे. कोणीही आले तर त्यांना
सर्वप्रथम हेच सांगा की, अल्फ (बाबांची) आठवण करा, बाकी जास्त काही बडबड करायची नाही.
फक्त एवढेच बोला - स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. हेच आतमध्ये घोटायचे आहे
- ‘मी आत्मा आहे’. गातात देखील - ‘तुलसीदास चंदन घिसे, तिलक देत रघुवीर…’ तिलक काही
स्थूल थोडाच आहे. तुम्ही समजता की वास्तविक तिलक हा या वेळची यादगार आहे. तुम्ही
आठवण करत राहता जणू राजाईचा तिलक देता. तुम्हाला राजाईचा तिलक मिळेल, डबल सिरताज
बनाल. राजाईचा तिलक मिळेल अर्थात स्वर्गाचे महाराजा, महाराणी बनाल. बाबा किती सोपे
करून सांगतात. बस्स, फक्त एवढी आठवण करा - ‘मी आत्मा आहे, शरीर नाही. मला बाबांकडून
वारसा घ्यायचा आहे’.
तुम्ही जाणता - आपण
आत्मे बिंदू प्रमाणे आहोत, बाबा देखील बिंदू आहेत. बाबा ज्ञानाचा सागर, सुखाचा सागर
आहेत. ते आम्हाला वरदान देतात. यांच्या बाजूला (ब्रह्मा बाबांच्या आत्म्याच्या
शेजारी भृकुटी मध्ये) येऊन बसतात. गुरु आपल्या शिष्याला शेजारी बसवून शिकवतात. हे
देखील शेजारी बसले आहेत. मुलांना एवढेच सांगतात - स्वतःला आत्मा समजा, मामेकम् (मज
एकाची) आठवण करा. सतयुगामध्ये देखील तुम्ही स्वतःला आत्मा समजता, परंतु बाबांना
जाणत नाही. मी आत्मा शरीर सोडतो आणि मग दुसरे घ्यायचे आहे. ड्रामा अनुसार तुमचा
पार्टच असा आहे, म्हणून तिथे (सतयुगामध्ये) तुमचे आयुष्य दीर्घ असते, पवित्र राहता.
सतयुगामध्ये आयुष्य दीर्घ असते, कलियुगामध्ये कमी होते. तिथे आहेत - योगी, इथे आहेत
- भोगी. योगी पवित्र असतात. तिथे रावण राज्यच नसते. दीर्घायुष्य असते. इथे किती
अल्पायुष्य असते, याला कर्मभोग म्हटले जाते. तिथे कधीही अकाले मृत्यू होत नाही. तर
बाबा म्हणतात की, बाबांना ओळखले आहे तर श्रीमतावर चाला. एका बाबांची आठवण करा.
स्वतःला आत्मा समजा. आपल्याला आता जायचे आहे, हे शरीर सोडायचे आहे. बाकी सेवेमध्ये
वेळ द्यायचा आहे.
तुम्ही मुले खूप गरीब
आहात म्हणून बाबांना दया येते. तुम्हा वृद्धमाता, कुब्जा इत्यादींना कसलाच त्रास
देत नाहीत. वृद्धमातेला कुब्जा (कुबड असलेली) म्हटले जाते. वृद्धमातांना सांगितले
जाते - बाबांची आठवण करा. तुम्हाला कोणी विचारले की, ‘कुठे जातेस?’ तर सांगा, ‘गीता
पाठशाळेमध्ये जाते’.
मुले प्रदर्शनी
इत्यादीवर किती खर्च करतात, लिहितात देखील - अमका चांगला प्रभावित झाला. परंतु बाबा
म्हणतात - कोणीही असे लिहीत नाही की, ‘खरोखर यावेळी बेहदचे बाबा या ब्रह्मातनामध्ये
आले आहेत, त्यांच्याकडूनच स्वर्गाचा वारसा मिळू शकतो’. बाबा समजून जातात की, एकालाही
निश्चय झालेला नाहीये. फक्त प्रभावित होतात, हे ज्ञान खूप चांगले आहे. शिडीच्या
चित्रामध्ये अगदी व्यवस्थित दाखवले आहे. परंतु स्वतः योगमध्ये राहून
तमोप्रधानापासून सतोप्रधान बनावे, ते करत नाहीत. फक्त म्हणतात - परमात्म्याकडून
वारसा प्राप्त करण्याविषयीचे स्पष्टीकरण खूप छान आहे. परंतु स्वतः प्राप्त करावा,
ते करत नाहीत. अजिबात पुरुषार्थ करत नाहीत, प्रजा प्रचंड प्रमाणात बनेल. बाकी राजा
बनतील ती मेहनत आहे. प्रत्येकाने आपल्या मनाला विचारावे की, ‘मी बाबांच्या आठवणीत
कितपत हर्षित राहतो? मी पुन्हा सो देवता बनत आहे’. अशाप्रकारे आपल्याशीच एकांतामध्ये
बसून गप्पा मारा, प्रयत्न करून पहा. बाबांची आठवण करत राहाल तर बाबा गॅरंटी देतात
की, तुम्ही अर्धेकल्प कधीही रडणार नाही (दु:खी होणार नाही). आता तुम्ही म्हणता -
बाबा, येऊन आम्हाला रावण मायेवर विजय प्राप्त करून देतात. जे जितकी मेहनत करतात,
स्वतःसाठीच करतात. नंतर मग तुम्ही नवीन दुनियेमध्ये याल. तुम्हाला तमोप्रधानापासून
सतोप्रधान बनायचे असेल तर जुन्या दुनियेचा हिशोब देखील चुकता करायचा आहे. पावन
बनण्याची युक्ती देखील सांगतात. ही आहे महाविनाशाची वेळ, सर्वांचा विनाश होणार आहे.
नवीन दुनियेची स्थापना होणार आहे. तुम्ही जाणता - आम्ही या मृत्यूलोक मध्ये हे शरीर
सोडून मग नवीन दुनिया अमरलोकमध्ये येणार. आपण शिकतोच नवीन दुनियेकरिता, दुसरी कोणती
अशी पाठशाळा नाही, जिथे भविष्यासाठी शिकवतील. हो, जे खूप दान-पुण्य करतात तर ते
राजाच्या पोटी जन्म घेतात. गोल्डन स्पून इन माऊथ म्हटले जाते, हे सतयुगामध्ये
तुम्हाला मिळते, कलियुगामध्ये देखील जे राजांच्या पोटी जन्म घेतात त्यांना देखील
मिळतो, तरीही इथे तर अनेक प्रकारची दुःखे असतात. तुम्हाला तर भविष्य २१ जन्मांसाठी
कोणतेही दुःख होणार नाही. कधीही आजारी पडणार नाही, तुम्हाला तर गोल्डन स्पून इन
स्वर्ग (स्वर्गामध्ये सोन्याचा चमचा) असेल. इथे आहे अल्पकाळासाठी राजाई, तुमची आहे
२१ जन्मांसाठी. बुद्धीने व्यवस्थित विचार करायचा आहे, आणि मग इतरांना समजावून
सांगायचे आहे. असे नाही की भक्तिमार्गामध्ये राजा बनू शकत नाही. जेव्हा एखादी
व्यक्ती कॉलेज अथवा हॉस्पिटल उभारते, तर त्या व्यक्तीला देखील त्याचे फळ मिळते.
हॉस्पिटल बांधतात तर दुसऱ्या जन्मामध्ये उत्तम आरोग्य लाभते. म्हणतात ना - ‘यांना
संपूर्ण आयुष्यात कधी तापही आला नाही’. दीर्घायुष्य मिळते. खूप दान इत्यादी करतात,
हॉस्पिटल इत्यादी उभारतात तेव्हा आयुष्य वाढते. इथे तर योगाद्वारे तुम्ही
एव्हरहेल्दी-वेल्दी बनता. योगाद्वारे तुम्ही २१ जन्मांकरिता शफा (तंदुरुस्ती)
प्राप्त करता. हे तर खूप मोठे हॉस्पिटल आहे, खूप मोठे कॉलेज आहे बाबा प्रत्येक
गोष्ट चांगल्या रीतीने समजावून सांगतात. बाबा म्हणतात - ज्याला जिथे आवडेल, जिथे मन
लागेल, तिथे जाऊन अभ्यास करू शकता. असे नाही की आमच्याच सेंटरवर यावे, यांच्याकडे
का जातात. नाही, ज्याला जिथे पाहिजे तिथे जाऊ द्यावे. गोष्ट तर एकच आहे. मुरली तर
वाचून ऐकवतात. ती मुरली इथून जाते; मग कोणी विस्ताराने चांगले समजावून सांगतात, कोणी
फक्त वाचून ऐकवतात. भाषण करणारे चांगली ललकार करत असतील (उत्तेजित करत असतील).
कुठेही भाषण असो सर्वप्रथम हेच सांगा की, शिवबाबा म्हणतात - स्वतःला आत्मा समजून मज
पित्याची आठवण करा तर तुमची विकर्म विनाश होतील आणि पावन बनून पावन दुनियेचे मालक
बनाल किती सोपे करून सांगतात. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) बाहेरच्या
वाह्यात (व्यर्थ) विचारांना सोडून एकांतामध्ये बसून आठवणीची मेहनत करायची आहे. पहाटे
लवकर उठून विचार सागर मंथन करायचे आहे आणि आपला चार्ट चेक करायचा आहे.
२) जसे भक्तीमध्ये
दान-पुण्याचे महत्व आहे, तसे ज्ञान मार्गामध्ये आठवणीचे महत्व आहे. आठवणीद्वारे
आत्म्याला एव्हरहेल्दी-वेल्दी बनवायचे आहे. अशरीरी होऊन राहण्याचा अभ्यास करायचा आहे.
वरदान:-
कंबाइंड
रूपातील सेवेद्वारे आत्म्यांना समीप संबंधामध्ये आणणारे कंबाइंड रूपधारी भव
फक्त आवाजाद्वारे (वाणीद्वारे)
सेवा केल्याने प्रजा बनत जात आहे, परंतु आवाजापासून परे स्थितीमध्ये स्थित होऊन
नंतर मग आवाजामध्ये या, अव्यक्त स्थिती आणि मग आवाज, अशी कंबाइंड रुपातील सेवा
वारसदार तयार करेल. आवाजाद्वारे प्रभावित झालेले आत्मे अनेक आवाज ऐकल्याने
आवागमनमध्ये येतात (येऊन ऐकून निघून जाणारे असतात). परंतु कंबाइंड रूपधारी बनून
कंबाइंड रुपातील सेवा कराल तर त्यांच्यावर दुसऱ्या कोणत्याही प्रकारचा प्रभाव पडू
शकत नाही.
बोधवाक्य:-
साधनांमध्ये
बेहदच्या वैराग्य वृत्तीची साधना मर्ज होऊ देऊ नका.
हे अव्यक्त इशारे -
सदैव हर्षित राहण्याकरिता आपल्या नेचरला (स्वभावाला) सरळ बनवा, सहनशील बना.
जी मुले सहनशील असतात
ती आपल्या सहनशीलतेच्या शक्तीद्वारे अत्यंत कठोर संस्कार असणाऱ्याला, कुठल्याही
कठीण कार्याला शीतल बनवतात अथवा सुलभ करतात. सहनशीलतेचा गुण असणारा गंभीर असेल आणि
सखोलपणे विचार करेल. तो कधीही घाबरणार नाही. खोलवर जाऊन सफलता प्राप्त करेल.