25-07-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - बाजोलीचा खेळ आठवा, या खेळामध्ये साऱ्या चक्राचे, ब्रह्माचे आणि ब्राह्मणांचे रहस्य दडलेले आहे”

प्रश्न:-
संगमयुगावर बाबांकडून सर्व मुलांना कोणता वारसा प्राप्त होतो?

उत्तर:-
ईश्वरीय बुद्धीचा. ईश्वरामध्ये जे गुण आहेत ते आपल्याला वारशामध्ये देतात. आमची बुद्धी हिऱ्यासारखी पारस बनत आहे. आता आम्ही ब्राह्मण बनून बाबांकडून खूप मोठा खजिना घेत आहोत, सर्व गुणांनी आपली झोळी भरत आहोत.

ओम शांती।
आज आहे सतगुरुवार, बृहस्पतीवार. आठवड्यामध्ये देखील कोणता तरी एक उत्तम दिवस असतो. बृहस्पतीचा दिवस श्रेष्ठ म्हणतात ना. बृहस्पती अर्थात वृक्षपतीदिनाला शाळेत किंवा महाविद्यालयामध्ये प्रवेश दिला जातो. आता तुम्ही मुले जाणता की या मनुष्य सृष्टीरूपी झाडाचे बीजरूप आहेत बाबा आणि ते अकालमूर्त आहेत. अकालमूर्त बाबांची अकालमूर्त मुले. किती सोपे आहे. अवघड आहे फक्त आठवण. आठवणीनेच विकर्म विनाश होतात. तुम्ही पतिता पासून पावन बनता. बाबा समजावून सांगत आहेत की, तुम्हा मुलांवर अविनाशी बेहदची दशा आहे. एक असते ‘हद’ची दशा आणि दुसरी असते ‘बेहद’ची. बाबा आहेत वृक्षपती. वृक्षातून सर्वात पहिले ब्राह्मण निघाले. बाबा म्हणतात - ‘मी वृक्षपती सत्-चित्-आनंद स्वरूप आहे. मग महिमा गातात - ज्ञानाचा सागर, शांतीचा सागर… तुम्ही जाणता सतयुगामध्ये सर्व देवी-देवता शांतीचे, पवित्रतेचे सागर आहेत. भारत सुख-शांती-पवित्रतेचा सागर होता, त्याला म्हटले जाते विश्वामध्ये शांती. तुम्ही आहात ब्राह्मण. खरे तर तुम्हीसुद्धा अकालमूर्त आहात, प्रत्येक आत्मा आपल्या तख्तावर (सिंहासनावर) विराजमान आहे. ही सर्व चैतन्य अकालतख्त आहेत. भृकुटीमध्ये अकालमूर्त आत्मा विराजमान आहे, जिला तारा देखील म्हटले जाते. वृक्षपती बीजरूपाला ज्ञानाचा सागर म्हणतात, तर जरूर त्यांना यावे लागेल. सर्वात पहिले हवेत ब्राह्मण, प्रजापिता ब्रह्माची दत्तक मुले. मग जरूर माता देखील पाहिजे. तुम्हा मुलांना खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगतात. जसा बाजोलीचा (कोलांटी-उडीचा) खेळ खेळतात ना. त्याचा देखील अर्थ समजावून सांगितला आहे. बीजरूप बाबा आहेत मग आहेत ब्रह्मा. ब्रह्मा द्वारा ब्राह्मण रचले गेले. या वेळी तुम्ही म्हणाल की, ‘हम सो ब्राह्मण सो देवता…’ आधी आम्ही शूद्र बुद्धीचे होतो. आता पुन्हा आम्हाला बाबा पुरुषोत्तम बुद्धी बनवतात. हिऱ्यासमान पारसबुद्धी बनवतात. या बाजोलीचे रहस्य देखील समजावून सांगतात. शिवबाबा सुद्धा आहेत तर प्रजापिता ब्रह्मा आणि दत्तक मुले समोर बसली आहेत. आता तुम्ही किती विशाल-बुद्धी बनले आहात. ब्राह्मण तेच मग देवता बनतील. आता तुम्ही ईश्वरीय बुद्धीचे बनता ईश्वरामध्ये जे गुण आहेत ते तुम्हाला वारशामध्ये मिळतात. समजावून सांगताना हे विसरू नका. बाबा ज्ञानाचा सागर आहेत नंबरवन. त्यांना ज्ञानेश्वर म्हटले जाते. ज्ञान ऐकविणारा ईश्वर. ज्ञानाने होते सद्गती. ज्ञान आणि योगाने पतितांना पावन बनवतात. भारताचा प्राचीन योग प्रसिद्ध आहे कारण आयर्न-एज पासून गोल्डन-एज (लोहयुगा पासून सुवर्णयुग) बनले होते. हे तर समजावून सांगितले आहे की, योग दोन प्रकारचे आहेत - तो आहे हठयोग आणि हा आहे राजयोग. तो हदचा, हा आहे बेहदचा. ते आहेत हदचे संन्यासी, तुम्ही आहात बेहदचे संन्यासी. ते घर-दार सोडतात, तुम्ही साऱ्या दुनियेचा संन्यास करता. आता तुम्ही आहात प्रजापिता ब्रह्माची मुले, हे छोटेसे नवीन झाड आहे. तुम्ही जाणता जुन्या पासून नवीन बनत आहोत. कलम लागत आहे. खरोखर आपण बाजोली खेळतो. ‘हम सो ब्राह्मण’ मग ‘हम सो देवता’. ‘सो’ अक्षर नक्की लावायचे आहे. फक्त ‘हम’ नाही. ‘हम सो शूद्र’ होतो, हम सो ब्राह्मण बनलो… हि बाजोली अजिबात विसरता कामा नये. हे तर खूप सोपे आहे. छोटी-छोटी मुलेसुद्धा समजावून सांगू शकतील, आपण ८४ जन्म कसे घेतो, शिडी कशी उतरतो मग ब्राह्मण बनून चढतो. ब्राह्मणापासून देवता बनतो.

आता ब्राह्मण बनून खूप मोठा खजिना घेत आहोत. झोळी भरून घेत आहोत. ज्ञान सागर काही शंकराला म्हटले जात नाही. तो (शंकर) झोळी भरत नाही. हे तर चित्रकारांनी दाखवले आहे. शंकराची गोष्ट नाहीये. हे विष्णू आणि ब्रह्मा इथले आहेत. लक्ष्मी-नारायणाचे युगल रूप वरती दाखवले आहे. हा आहे यांचा (ब्रह्माचा) अंतिम जन्म. सर्व प्रथम हा विष्णू होता, मग ८४ जन्मानंतर हा (ब्रह्मा) बनला आहे. याचे नाव मी ‘ब्रह्मा’ ठेवले आहे. सर्वांचे नाव बदलून टाकले कारण संन्यास केला ना. शूद्रापासून ब्राह्मण बनले तर नाव बदलले. बाबांनी खूप सुंदर नावे ठेवली आहेत. तर आता तुम्ही समजता, बघता वृक्षपती या रथावर बसला आहे. त्यांचे (शिव बाबांचे) हे अकालतख्त आहे आणि यांचे (ब्रह्मा बाबांचे) सुद्धा आहे. या तख्ताला ते लोनवर घेतात. त्यांना आपले स्वतःचे तख्त तर मिळत नाही. म्हणतात - ‘मी या रथामध्ये विराजमान होतो, ओळख देतो. मी तुमचा पिता आहे, फक्त जन्म-मरणामध्ये येत नाही, तुम्ही येता’. जर मी सुद्धा आलो तर तुम्हाला तमोप्रधानापासून सतोप्रधान कोण बनवेल? बनविणारा तर पाहिजे ना म्हणूनच माझा असा पार्ट आहे. मला बोलवता देखील, ‘हे पतित-पावन या’. निराकार शिव बाबांना आत्मे बोलावतात कारण आत्म्यांना दुःख आहे. खास करून भारतवासी आत्मे बोलावतात की, ‘येऊन पतितांना पावन बनवा’. सतयुगामध्ये तुम्ही खूप पवित्र सुखी होता, कधी बोलावत नव्हता. तर बाबा स्वतः म्हणतात तुम्हाला सुखी करून मग मी वानप्रस्थमध्ये जाऊन बसतो. तिथे माझी आवश्यकताच नाही. भक्तीमार्गामध्ये माझा पार्ट आहे नंतर मग अर्धा कल्प माझा पार्ट नाही. हे तर एकदम सोपे आहे. यामध्ये कोणाला प्रश्न पडू शकत नाही. गायन देखील आहे - ‘दु:ख में सिमरण सब करें…’ सतयुग-त्रेतायुगामध्ये भक्तीमार्ग असतच नाही. ज्ञानमार्ग सुद्धा म्हणणार नाही. ज्ञान तर मिळतेच संगमयुगावर, ज्यामुळे तुम्ही २१ जन्मांसाठी प्रारब्ध मिळवता. क्रमवारीने पास होतात. नापास सुद्धा होतात. तुमचे हे युद्ध चालू आहे. तुम्ही बघता ज्या रथावर बाबा विराजमान आहेत, ते तर जिंकून घेतात. मग अनन्य मुले सुद्धा विजय प्राप्त करतात; जशी कुमारका आहे, अमकी आहे, नक्की विजय मिळवतील. अनेकांना आप समान बनवतात. तर मुलांना हे लक्षात ठेवायचे आहे की ही बाजोली आहे. छोटी मुलेसुद्धा हे समजू शकतात म्हणून बाबा म्हणतात मुलांनासुद्धा शिकवा. त्यांनासुद्धा बाबांकडून वारसा घेण्याचा अधिकार आहे. जास्त तर काही नाहीये. थोडे जरी या ज्ञानाला जाणून घेतले तरी देखील त्या ज्ञानाचा विनाश होत नाही. स्वर्गामध्ये तर नक्की याल. जसा क्राइस्टने स्थापन केलेला ख्रिश्चन धर्म किती मोठा आहे. हा देवी-देवता धर्म तर सर्वात पहिला आणि मोठा धर्म आहे. जो दोन युगे असतो तर जरूर त्यांची संख्यासुद्धा जास्त असली पाहिजे, परंतु त्याला ‘हिंदू धर्म’ म्हटले जाते. म्हणतात देखील ३३ करोड देवता. मग हिंदू का म्हणतात! मायेने बुद्धीला एकदमच मारून टाकले आहे; त्यामुळे ही अवस्था झाली आहे. बाबा म्हणतात मायेला जिंकणे काही कठीण गोष्ट नाहीये. तुम्ही प्रत्येक कल्पात विजय प्राप्त करता. सेना आहात ना. बाबा भेटले आहेत या विकाररूपी रावणावर विजय प्राप्त करून देण्यासाठी.

तुमच्यावर आता बृहस्पतीची दशा आहे. भारतावरच दशा येते. आत्ता सर्वांवर राहूची दशा आहे. बाबा वृक्षपती येतात तर नक्कीच भारतावर बृहस्पतीची दशा बसेल. यामध्ये सर्व काही येते. तुम्ही मुले जाणता आपल्याला निरोगी काया मिळते, तिथे मृत्यूचे नाव सुद्धा नसते. अमरलोक आहे ना. असे म्हणणार नाही की अमका मेला. मृत्यूचे नाव सुद्धा नाही, एक शरीर सोडून दुसरे घेतात. शरीर घेताना आणि सोडताना आनंदच वाटत असतो. दुःखाचे नाव सुद्धा नाही. तुमच्यावर आता बृहस्पतीची दशा आहे. सर्वांवर काही बृहस्पतीची दशा असू शकत नाही. शाळेमध्ये देखील कोणी पास होतात, कोणी नापास होतात. हि देखील पाठशाळा आहे. तुम्ही म्हणाल आम्ही राजयोग शिकतो, शिकवणारे कोण आहेत? बेहदचे बाबा. तर किती आनंद झाला पाहिजे, यामध्ये आणखी दुसरी कोणती गोष्ट नाही. मुख्य गोष्ट आहे पवित्रतेची. लिहिलेले देखील आहे - ‘माझ्या मुलांनो! देहा सहित देहाचे सर्व संबंध सोडून मज एकाची आठवण करा.’ हे गीतेतील वाक्य आहे. हा गीता एपिसोड चालू आहे. त्यामध्ये देखील लोकांनी अगडम-बगडम गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. पिठात मिठा प्रमाणे काहीतरी आहे. गोष्ट किती सोपी आहे, जी लहान मूलाला सुद्धा समजेल. तरी देखील मग विसरता कसे? भक्तीमार्गामध्ये देखील म्हणत होता - ‘बाबा, तुम्ही याल तेव्हा आम्ही तुमचेच बनणार. दुसरे कोणीही नाही. आम्ही तुमचे बनून तुमच्याकडून पूर्ण वारसा घेणार’. बाबांचे बनताच मुळी वारसा घेण्यासाठी. दत्तक जातात, जाणतात बाबांकडून आम्हाला काय मिळणार आहे. तुम्हीसुद्धा दत्तक गेले आहात. जाणता की आम्ही बाबांकडून विश्वाची बादशाही, बेहदचा वारसा घेणार. इतर कोणातही मोह ठेवणार नाही. समजा कोणाचे लौकिक वडील सुद्धा असेल तरीही त्यांच्याकडे कितीसे असणार! फार तर लाख दीड लाख असतील. हे बेहदचे बाबा तुम्हाला बेहदचा वारसा देतात.

तुम्ही मुले अर्धा कल्प खोट्या कथा ऐकत आले आहात. आता सत्य कथा बाबांकडून ऐकत आहात. तर अशा बाबांची आठवण केली पाहिजे. लक्षपूर्वक ऐकले पाहिजे. ‘हम सो’ याचा अर्थ देखील समजावून सांगायचा आहे. ते तर म्हणतात, आत्मा सो परमात्मा. ही ८४ जन्मांची कहाणी तर कोणीही सांगू शकणार नाही. बाबांसाठी म्हणतात, कुत्रा-मांजर सर्वांमध्ये आहेत. बाबांची निंदा करतात ना. हे देखील ड्रामामध्ये नोंदलेले आहे. कोणालाही दोष देऊ शकत नाही. ड्रामाच असा बनलेला आहे. तुम्हाला जे ज्ञान देऊन देवता बनवतात तुम्ही मग त्यांनाच शिव्या देऊ लागता. तुम्ही अशी बाजोली खेळता (कोलांटी-उडीचा खेळ खेळता). हा ड्रामा सुद्धा बनलेला आहे. आणि मग मी येऊन तुमच्यावर सुद्धा उपकार करतो. जाणतो की तुमचा देखील काही दोष नाही, हा खेळ आहे. कहाणी तुम्हाला समजावून सांगतो, ही आहे सत्य कथा ज्याद्वारे तुम्ही देवता बनता. भक्तीमार्गामध्ये मग भरपूर कथा बनवल्या आहेत. एम ऑब्जेक्ट काहीच नाही आहे. ते सर्व आहेत पडण्यासाठी (पतित होण्यासाठी). त्या पाठशाळेमध्ये विद्या देतात तरीसुद्धा उदरनिर्वाहासाठी लक्ष्य आहे. पंडित लोक आपल्या उदरनिर्वाहासाठी बसून कथा सांगतात. लोक त्यांच्यासमोर पैसे ठेवत जातात, प्राप्ती काहीच नाही. तुम्हाला तर आता ज्ञानरत्न मिळतात, ज्याद्वारे तुम्ही नव्या दुनियेचे मालक बनता. तिथे प्रत्येक गोष्ट नवीन मिळेल. नवीन दुनियेमध्ये सर्व काही नवे असेल. हिरे-माणके वगैरे सर्व नवीन असतील. आता बाबा म्हणतात - ‘बाकी सर्व गोष्टी सोडून तुम्ही बाजोली (कोलांटी उडीचा खेळ) लक्षात ठेवा. फकीर लोकसुद्धा कोलांटी उड्या मारत तीर्थांवर जातात. कोणी पायी सुद्धा जातात. आता तर मोटार गाड्या, विमानेसुद्धा आली आहेत. गरीब तर त्यातून जाऊ शकत नाहीत. कोणी खूप श्रद्धा असणारे असतात तर चालतसुद्धा जातात. दिवसेंदिवस विज्ञानामुळे खूप सुख मिळत जाते. हे आहे अल्पकालीन सुख, कोसळतात (ऍक्सिडेंट होतात) तेव्हा किती नुकसान होते. या गोष्टींमध्ये अल्पकाळासाठी सुख आहे. बाकी शेवटी मृत्यू तर ठरलेला आहे. ते आहे सायन्स. तुमचे आहे सायलेन्स. बाबांची आठवण केल्याने सर्व रोग नष्ट होतात, निरोगी बनता. आता तुम्ही समजता सतयुगामध्ये एव्हरहेल्दी (कायम निरोगी) होते. हे ८४ चे चक्र फिरतच रहाते. बाबा एकदाच येऊन समजावून सांगतात - तुम्ही माझी खूप निंदा केली आहे, स्वतःला थप्पड मारली आहे. निंदा करता-करता तुम्ही शूद्र बुद्धी बनले आहात. शीख लोकसुद्धा म्हणतात, ‘जप साहेब’ (साहेबाचा जप केला) तर सुख मिळेल अर्थात मनमनाभव. शब्दच मुळी दोन आहेत बाकी जास्त डोकेफोड करण्याची आवश्यकताच नाही. हे देखील बाबा येऊन समजावून सांगतात. आता तुम्ही समजता साहेबाची आठवण केल्याने तुम्हाला २१ जन्म सुख मिळते. ते देखील त्याचा (ईश्वराला भेटण्याचा) रस्ता सांगतात, परंतु पूर्ण रस्ता तर जाणतच नाहीत. ‘सिमर-सिमर सुख पाओ’. तुम्ही मुले जाणता खरोखर सतयुगामध्ये रोगराई इत्यादी दुःखाची कोणती गोष्टच नसते. ही तर सर्वसाधारण गोष्ट आहे. त्याला सतयुग गोल्डन-एज म्हटले जाते, याला कलियुग आयर्न-एज म्हटले जाते. सृष्टीचे चक्र फिरत राहते. स्पष्टीकरण किती सुंदर आहे. बाजोली आहे, आता तुम्ही ब्राह्मण आहात नंतर मग देवता बनाल. या गोष्टी तुम्ही विसरून जाता. बाजोली (कोलांटी उडी) आठवली तर हे सर्व ज्ञान आठवेल. अशा बाबांची आठवण करत रात्री झोपले पाहिजे. तरी देखील म्हणतात - ‘बाबा विसरून जातो’. माया घडोघडी विसरायला लावते. तुमचे युद्ध मायेसोबत आहे. मग अर्धे कल्प तुम्ही तिच्यावर राज्य करता. गोष्ट तर सोपी करून सांगतात. नावच आहे - ‘सहज ज्ञान, सहज आठवण’. बाबांची फक्त आठवण करा, काही त्रास देतात का. भक्तीमार्गामध्ये तर तुम्ही खूप त्रास सहन केला आहे. साक्षात्कार घडावा म्हणून गळा कापून घेण्यासाठी तयार होतात, काशी-कलवट खातात. हो, जे निश्चयबुद्धी होऊन आठवण करतात त्यांची मग विकर्म विनाश होतात. मग पुन्हा नव्याने हिशोब सुरू होईल. बाकी माझ्याकडे काही येत नाहीत. माझ्या आठवणीने विकर्मे विनाश होतात, जीवघात केल्याने नाही. माझ्याकडे तर कोणी येत नाहीत. किती सोपी गोष्ट आहे. हि बाजोली तर वृद्धांच्या देखील लक्षात राहिली पाहिजे, मुलांच्या सुद्धा लक्षात रहायला हवी. अच्छा.

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

वरदान:-
निर्बलापासून बलवान बनून असंभवला संभव करणारी हिम्मतवान आत्मा भव ‘हिम्मते बच्चे मददे बाप’ या वरदानाच्या आधारे हिम्मतीचा पहिला दृढ संकल्प केला की, आम्हाला पवित्र बनायचेच आहे आणि बाबांनी पद्मगुणा मदत केली की तुम्ही आत्मे अनादि-आदि पवित्र आहात, अनेकदा पवित्र बनले आहात आणि बनत रहाल. अनेक वेळच्या स्मृतीने समर्थ बनलात. निर्बला पासून इतके बलवान बनलात ज्यामुळे चॅलेंज करता की, विश्वाला सुद्धा पावन बनवूनच दाखवू, ज्याला ऋषी-मुनी महान आत्मे समजतात की प्रवृत्तीमध्ये राहून पवित्र राहणे खूप अवघड आहे आणि तुम्ही त्याला अतिशय सोपे म्हणता.

बोधवाक्य:-
दृढ संकल्प करणेच व्रत घेणे आहे, खरे भक्त कधी व्रत तोडत नाहीत.