25-08-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, बाबा आणि वारशाची आठवण करण्यामध्ये तुमची कमाई देखील आहे आणि तंदुरुस्ती देखील आहे, तुम्ही अमर बनता”

प्रश्न:-
हृदयाला शुद्ध बनवण्याची सोपी युक्ती कोणती आहे?

उत्तर:-
कुठेही राहा, ट्रस्टी होऊन राहा. नेहमी असे समजा की आपण शिवबाबांच्या भंडाऱ्यामधून खातो. शिवबाबांच्या भंडाऱ्यातील भोजन खाणाऱ्यांचे हृदय शुद्ध होत जाते. प्रवृत्तीमध्ये राहून जर श्रीमताप्रमाणे डायरेक्शन अनुसार ट्रस्टी बनून राहिलात तर तो देखील शिवबाबांचा भंडारा आहे, मनाने सरेंडर आहात.

ओम शांती।
जन्म-जन्मांतर अर्धाकल्प मुलांनी सत्संग केले आहेत, साधू-संत, पंडित इत्यादी सर्व मनुष्यांचे सत्संग असतात; हा मात्र कोणत्याही मनुष्याचा सत्संग नाहीये. याला म्हटले जाते - ‘रूहानी सत्संग’. सुप्रीम आत्मा आत्म्यांशी रूहरिहान अर्थात सत्संग करतात. इथे तुम्ही कोणत्याही मनुष्याकडून ऐकत नाही, ना देवतांकडून ऐकता. तुम्ही ऐकता भगवंताकडून. भगवंताला नेहमी निराकार म्हटले जाते आणि भगवंत येतातच तेव्हा जेव्हा मुलांना भगवान-भगवती बनविण्याकरिता शिकवायचे असते. भगवान आणि भगवतीचे पद भगवंताशिवाय इतर कोणीही देऊ शकत नाही. तुम्ही मुले जाणता की, कल्प-कल्प संगमयुग असते तेव्हा निराकार भगवान येऊन आम्हाला ज्ञान देतात. हे देखील फक्त तुम्हीच समजता, दुसरे कोणी मुश्किलीने समजू शकेल. शिवबाबा येतात जरूर, परंतु त्यांच्या ऐवजी श्रीकृष्णाला गीतेचा भगवान म्हटले गेले आहे. तर जरूर सर्वांच्या बुद्धीमध्ये मनुष्याचे शरीरच येत असेल. तुम्हीच दैवी-गुणवाले होता आणि आता आसुरी-गुणवाले बनला आहात. पुन्हा आता दैवी-गुणवाले बनत आहात. दैवी-गुण असणाऱ्यांना ईश्वरीय-संप्रदाय म्हटले जाते आणि आसुरी-गुण असणाऱ्यांना आसुरी-संप्रदाय म्हटले जाते. आता निराकार बाबा निराकार-संप्रदायाला अर्थात आत्म्यांना शिकवत आहेत, म्हणून म्हटले जाते ईश्वरीय-संप्रदाय अथवा रूहानी-संप्रदाय, ज्यांना रूहानी बाबा येऊन शिकवतात. आता तुम्ही आत्म-अभिमानी बनता. आपण आत्मा आहोत, बाबा आम्हाला शिकवत आहेत. म्हणतात - ‘माझी आठवण करा तर तुमची विकर्म विनाश होतील. आत्म्यांनाच शिकवतात, तेच नॉलेजफुल आहेत आणि ऋषी-मुनी इत्यादी तर सर्व नेती-नेती (आम्ही जाणत नाही, जाणत नाही) असे म्हणून गेले अर्थात आम्ही आत्म्याला जाणत नाही. जोपर्यंत ते ज्ञान-सागर सन्मुख येत नाहीत तोपर्यंत ज्ञान कसे सांगतील. या व्यवस्थित समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. आपल्याला कोणी मनुष्य शिकवत नाही, आम्हाला बाबा शिकवत आहेत. ते आहेत बेहदचे निराकार बाबा. हे देखील मुलांना समजावून सांगितले आहे, साकार आणि निराकार दोन पिता प्रत्येकाला असतात. एक आत्मिक आणि दुसरा भौतिक. रूहानी बाबाच येऊन आत्म्यांना पावन बनवतात. तुम्ही जाणता - आपण पावन होतो, पतित बनलो मग आता पतितापासून पावन कसे बनतो हे सर्व आपण जाणतो. चित्रे देखील समोर आहेत, बाबा सल्ला देतात की वारंवार सृष्टी-चक्राच्या चित्रासमोर जाऊन बसा म्हणजे मग बुद्धीमध्ये सारे ज्ञान येईल की आपण आता संगमयुगावर बसलो आहोत, बाकीचे सर्वजण स्वतःला कलियुगामध्ये समजतात. कलियुगाला घोर अंधार म्हटले जाते. आता तुम्ही आहात संगमावर. आता तुम्हाला ज्ञानाचा प्रकाश आहे, सतयुगामध्ये मग तुम्हाला हे ज्ञान मिळत नाही. बाबा जेव्हा येतात तेव्हाच लख्ख प्रकाश होतो. हे संगमयुग आहेच कल्याणकारी युग. याच्यासारखे युग कोणतेही नसते, ज्यावेळी बाबा येतात. सतयुगाला कल्याणकारी म्हणणार नाही, तिथे कोणाचे कल्याण होत नाही. कल्याण संगमावरच होते. सतयुगामध्ये तर असतेच कल्याण. संगमावर बाबा कलियुगाला सतयुग, कल्याणकारी बनवतात. तर आता तुमचे पहा किती कल्याण होत आहे, फक्त बाबांची आणि वारशाची आठवण करण्यामध्ये तुमची किती कमाई आहे. कमाई परी कमाई देखील आहे आणि आरोग्यापरी आरोग्य देखील आहे. तुमचे जीवन अमर बनते. तुमचा कधी अकाली मृत्यू होत नाही. तर तुम्हा मुलांना किती आनंद झाला पाहिजे कारण तुमच्या बुद्धीमध्ये संपूर्ण नॉलेज आहे. इथे तुम्ही मुले येता तर पुरुषार्थ करून म्युझियममधील चित्रांवर समजावून सांगण्याच्या लायक बनले पाहिजे. स्वतःला लायक बनविण्याकरिता ७-८ दिवस बसून शिका. प्रॅक्टिस झाली, लगेच पळा सेवेवर. सेवा करून पुन्हा परत या. हे शिकणे तर खूप सोपे आहे. चित्र समोर पाहिल्यानेच बुद्धीमध्ये येऊन जाते की आपण संगमावर बसलो आहोत. आजच्या दुनियेमध्ये असंख्य मनुष्य आहेत, उद्या फार थोडे असतील. इतके हे सर्व परत जाणार आहेत. आता बाबा स्वतः आले आहेत, मुलांचा किती मान ठेवतात. ‘दूरदेश का रहने वाला आया देश पराये…’ रावणाचा देश परक्याचा देश आहे ना. रामाच्या देशामध्ये तर कधीही रावण येऊ शकत नाही.

आता तुम्हा मुलांचे पालन-पोषण तर बाबांच्या हातात आहे. बस्स, तुम्हीं से खाऊं अर्थात तुमच्याच भंडाऱ्यातून खाणार... तुमचे सर्व पालन-पोषण इथेच होते. जे सरेंडर होतात त्यांचे पालन-पोषण तर होतेच परंतु जे मनाने देखील समजतात की, हे सर्व काही ईश्वराचे (बाबांचे) आहे, मी ट्रस्टी आहे, मी श्रीमतावरच चालून खर्च इत्यादी करतो. असे जे समजतात ते देखील शिवबाबांच्या भंडाऱ्यातून खातात. शिवबाबांच्या भंडाऱ्यातून खाल्ल्याने हृदय शुद्ध होते. असे नाही की ते शिवबाबांच्या भंडाऱ्यातून खात नाहीत. बाबांच्या डायरेक्शनवर चालणारे देखील जणू काही बाबांच्या भंडाऱ्यातूनच खातात. ज्या भंडाऱ्यातून खाल्ले, तो भंडारा भरपूर आणि काळ-कंटक दूर... त्यानंतर तुम्ही कधीही अकाली मृत्यूला प्राप्त होणार नाही. या वेळीच शिवबाबा येतात, त्यांची महिमा देखील गायली गेली आहे. शिवजयंती देखील साजरी करतात, परंतु त्यांचा भंडारा कसा असतो, हे कोणीही जाणत नाही. बाबा देखील खरोखर येतात ना. जीपण मुले येतात त्यांना शिवबाबांच्या भंडाऱ्यातून भोजन मिळते. अच्छा, पुरुष सरेंडर झाले तर ठीक आहे, जर ते सरेंडर होत नसतील तर मातांनी काय करावे? कारण कमाई आहे पतीची. तो तर सरेंडर होत नाही. तो जेव्हा कमाई करेल तेव्हा पत्नी खाईल. हां, जोडपे (युगल) सरेंडर असेल तर मग शिवबाबांच्या भंडाऱ्यातून पालन–पोषण होऊ शकते. हे बाबा मुलांना चांगल्या रीतीने समजावून सांगतात. बुद्धीमध्ये ठेवायचे आहे की, जोपर्यंत कर्मातीत अवस्था होईल तोपर्यंत आपण बाबांजवळ बसलो आहोत. दिवसेंदिवस आपण आपल्या स्वराज्याच्या जवळ येत जातो. काळ पुढे सरकत आहे आणि तुम्ही अधिकाधिक जवळ येत आहात. सतयुगाच्या पहिल्या वर्षामध्ये प्रवेश करण्यासाठी आता अजून किती वर्षे बाकी आहेत म्हणाल? आता किती जवळ आला आहात? बाबा म्हणतात - ‘मुलांनो, आता तुमचे ८४ चे चक्र पूर्ण होत आहे. तुम्ही आता ८४ जन्मांच्या चक्राला जाणले आहे. चक्राला पाहिल्यावरच म्हणाल की, आपण आता संगमावर आहोत. या बाजूला आहे कलियुग, त्या बाजूला आहे सतयुग. उद्या आपण आपल्या सुखधाममध्ये असणार. दुनियेला ठाऊकच नाहीये, ते तर पूर्णपणे घोर अंधारामध्ये आहेत. तुम्हा मुलांना खूप आनंद झाला पाहिजे. बेहदच्या बाबांकडून आम्ही २१ जन्मांची कमाई करतो. कायम सुखाचा वारसा प्राप्त करत आहोत - याचा आनंद असतो. स्वर्गवासी बनणे, हे तुमच्याच नशिबात आहे. स्वर्ग एक वंडरफुल (अद्भुत) गोष्ट आहे. जसे ७ वंडर्स दाखवतात ना. हे तर सर्वात मोठे वंडर आहे. वंडरफुल स्वर्गाची चित्रे देखील आहेत. हे लक्ष्मी-नारायण स्वर्गाचे मालक होते म्हणून बाबांनी लिहिले होते - वरती सूर्यवंशीं विषयी लिहा त्याच्या खाली चंद्रवंशीं विषयी लिहा म्हणजे मग अर्धेकल्प पूर्ण होईल. सूर्यवंशी, चंद्रवंशी १२५० वर्षे. म्हणजे मग लाखो वर्षांची गोष्टच उडून जाईल. तिथे बाहुबळावर किती खर्च होतो. इथे सुरुवातीपासून शेवटपर्यंत काहीही खर्च होत नाही. हा तर बाबांचा आणि मुलांचा हिशोब आहे, खर्चाची गोष्टच नाही. इथे मुले येऊन रिफ्रेश व्हावीत म्हणून घरे इत्यादी बनवतात. मुलांचेच पैसे आहेत त्यातलेही कितीतरी दिवस निघून गेले आहेत. बाकी थोडे दिवस उरले आहेत, खर्च काहीही नाही. एकही पैसा खर्च न करता तुम्ही जीवनमुक्ती प्राप्त करता. यामध्ये फक्त मेहनतीची गोष्ट आहे. भगवंताची तर सर्व भक्त आठवण करतात, परंतु ते हे जाणत नाहीत की भगवान कोण आहेत? भगवंताला न जाणल्या कारणाने अनेकांना भगवान मानतात. आता तुम्हा मुलांना खऱ्या बाबांचा परिचय द्यायचा आहे.

तुम्हा मुलांना अपार आनंद झाला पाहिजे की, बेहदचे बाबा आम्हाला स्वर्गाचा मालक बनविण्याकरिता शिकवत आहेत. बाबा येऊन स्वर्गाची स्थापना आणि नरकाचा विनाश करवून घेतात; म्हणून महाभारत लढाई देखील सोबत आहे. दर ५ हजार वर्षांनंतर हे चक्र फिरते. बाबा देखील कल्प-कल्प, कल्पाच्या संगमयुगामध्ये येतात. गीतेमध्ये त्यांनी मग युगे-युगे लिहिले आहे, ती देखील ५ युगे म्हटले आहे, ५ वेळा आले. मग २४ अवतार, अमका अवतार असे का लिहिले आहे! मनुष्य किती यज्ञ, तप, तीर्थ इत्यादी करतात, समजतात हे सर्व मार्ग भगवंताला भेटण्याचे आहेत. परंतु भगवंताकडे तर कोणीही जाऊ शकत नाही. अर्धा कल्प किती डोकेफोड केली आहे. जन्म-जन्मांतर फेऱ्या मारल्या, हे केले... तरीही बाबा काही भेटले नाहीत. आता बाबा तुम्हा मुलांच्या किती जवळ आहेत. तुमच्याशी बोलत आहेत, तुम्हाला समजावून सांगत आहेत. तुम्ही समजता कल्प-कल्प हुबेहूब आपण असे भेटतो; जे काही घडून गेले, तेच कल्प-कल्प होईल. तेच दादा सोनार असतील. पुन्हा त्यांच्यामध्येच बाबा प्रवेश करतील, पुन्हा तीच मुले येऊन बाबांची बनतील आणि पुन्हा स्वर्गाचा वारसा घेतील. हा बाबांचा तुम्हा मुलांसोबत अनादि अविनाशी पार्ट कल्प-कल्प असाच रिपीट होत राहतो. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) हे कल्याणकारी संगमयुग आहे, यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये कल्याण आहे, कमाईच कमाई आहे. बाबांची आणि वारशाची आठवण करून २१ जन्मांकरिता जीवन अमर बनवायचे आहे.

२) प्रवृत्तीमध्ये राहून मन-बुद्धीने सरेंडर व्हायचे आहे. श्रीमतानुसार खर्च करायचा आहे, पूर्णपणे ट्रस्टी होऊन राहायचे आहे.

वरदान:-
सहयोगाच्या शक्तीद्वारे, असहयोगी असणाऱ्यांना सहयोगी बनविणारे पित्यासमान परोपकारी भव

सहयोगी असणाऱ्यांसोबत सहयोगी बनणे - ही काही शौर्याची गोष्ट नाहीये; परंतु जसे बाबा अपकारींवर उपकार करतात तशी तुम्ही मुले देखील पित्यासमान बना. कोणी कितीही असहयोगी बनला, तुम्ही तुमच्या सहयोगाच्या शक्तीद्वारे असहयोगी असणाऱ्याला सहयोगी बनवा, असा विचार करू नका की, या कारणामुळे हा पुढे जात नाही. कमजोर असणाऱ्याला कमजोर समजून सोडून देऊ नका परंतु त्याला बळ देऊन बलवान बनवा. या गोष्टीवर अटेन्शन द्या, म्हणजे मग सेवेच्या प्लॅन रूपी दागिन्यांवर हिरे चमकू लागतील अर्थात सहज प्रत्यक्षता होईल.

बोधवाक्य:-
क्रोधाचे कारण आहे स्वार्थ अथवा ईर्ष्या - हेच चिडचिडेपणाचे मूळ आहे, अगोदर यालाच नष्ट करा.

हे अव्यक्त इशारे - अपवित्रतेच्या बीजाला देखील नष्ट करून संपूर्ण स्वच्छ (पवित्र) बना.

पवित्रता फाउंडेशन आहे आणि फाउंडेशनचे ब्रह्मचर्य व्रत धारण करणे ही एक कॉमन गोष्ट आहे, परंतु आता पुढे गेला आहात तर आता तुमची बाल्यावस्था राहिलेली नाहीये, आता तर वानप्रस्थ स्थितीमध्ये जायचे आहे. ‘मी ब्रह्मचारी तर राहतो’, ‘पवित्रता तर आहेच’ - फक्त यातच खुश होऊन जाऊ नका. मूळ फाउंडेशन आपल्या संकल्पाला शुद्ध बनवा, ज्ञानस्वरूप बनवा, शक्तीस्वरूप बनवा.

संपूर्णतेला प्राप्त करण्यासाठी दादी प्रकाशमणिजींचा गुप्त पुरुषार्थ

(१९ व्या पुण्यस्मृतिदिना निमित्त विशेष धारणा)

१) दादीजींनी सर्व जबाबदाऱ्या सांभाळत असताना हे लक्ष्य ठेवले की, मला सर्वगुण संपन्न, सर्व कलांमध्ये संपन्न, निर्विकारीपणामध्ये देखील संपन्न... बनून संपूर्णतेच्या ध्येयाला प्राप्त करायचेच आहे.

२) दादीजींनी मन, वचन आणि कर्माने डबल अहिंसक बनून, सर्वांना सुख दिले आणि सुख घेतले. मनसाद्वारे सुद्धा कोणत्याही आत्म्याला ना दुःख दिले ना दुःख घेतले.

३) दादीजी सदैव एका बाबांच्याच आकर्षणामध्ये राहिल्या, त्यांना कोणत्याही जुन्या वस्तू, व्यक्ती आणि तत्वांनी स्वतःकडे आकर्षित केले नाही. सदैव एका बाबांच्या आठवणीमध्ये राहून आपल्या सूक्ष्म वृत्तींनाही एकाग्र केले.

४) सदैव साक्षीपणाच्या स्टेजमध्ये राहून, सदैव साथीदाराच्या सोबतीचा अनुभव केला. त्यांच्या दृष्टी आणि वृत्तीमध्ये रूहानियत आणि अलौकिकता होती. त्यांच्या संस्कारांमध्ये इतकी रॉयल्टी होती की त्यांची नजर कोणातही अडकली नाही.

५) त्यांनी कोणाचाही अवगुण चित्तावर ठेवला नाही. कोणाचे अवगुण नोट केले नाहीत. सदैव परचिंतन, परदर्शन आणि परमत यापासून मुक्त राहून स्व-चिंतनामध्ये राहिल्या.

६) दादीजी ब्रह्मा बाबांसारख्या सदैव निर्मान राहिल्या. निराकारी आणि निरहंकारी स्थितीमध्ये राहण्याचा अभ्यास केला. सदैव स्वतःला सेवाधारी समजल्या. कधी स्वतःची महिमा स्वीकारली नाही. कोणी निंदा केली तर घाबरल्या नाहीत आणि स्तुतीमुळे हुरळूनही गेल्या नाहीत. प्रत्येक गोष्टीमध्ये आपली स्थिती समान ठेवली.

७) बापदादांकडून मिळालेल्या दिव्य बुद्धीच्या सौगातीला जपून ठेवले. सदैव समर्थ संकल्प केले. प्रत्येक कर्म श्रीमताप्रमाणे असावे, त्यामध्ये जरा सुद्धा मनमत अथवा परमत मिक्स होऊ नये, दिव्य बुद्धीच्या आधारावर प्रत्येक संकल्प, बोल आणि कर्म असावे, हेच लक्ष्य ठेवून संपूर्णतेला प्राप्त केले.

८) सदैव एक बल, एक भरोसा, एकाशीच सर्व नाती, कोणातही झुकाव-लगाव (ओढ-आसक्ती) नाही. नेहमी सर्वांना भाऊ-भाऊच्या वृत्तीने पाहिले आणि दयाळूपणाच्या गुणाला धारण करून कमजोर आत्म्यांमध्ये बळ भरले. अपकार करणाऱ्यांवर देखील उपकार केला.

९) प्रत्येक लहान-मोठ्या परिस्थितीला ‘नथिंग न्यु’ च्या स्मृती द्वारे पार केले. कोणत्याही दृश्याला पाहून ‘का?’, ‘काय?’ अशा प्रश्नांमध्ये अडकण्याऐवजी सदैव साक्षी-भाव धारण करून, नेहमी हर्षित राहिल्या.

१०) त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये रॉयल्टी दिसून येत असे. त्या कधीही कोणताही सर्वसामान्य शब्द बोलल्या नाहीत. त्यांच्या मुखातून तेच शब्द बाहेर पडत असत, जे साकार रूपात घडणार आहे. अशा सिद्धी स्वरूप आत्म्याचे संकल्प देखील सिद्ध होत असल्याकारणाने सहजच संपूर्णतेला प्राप्त केले.

११) दादीजी सदैव आत्मविश्वासाने भरपूर असल्याकारणाने याच स्मृतीमध्ये राहिल्या की, मी तर कल्प-कल्पाची विजयी आत्मा आहे. कोणत्याही जुन्या संस्कार-स्वभावाच्या अथवा कर्मांच्या हिशोबाच्या अधीन राहिल्या नाहीत. असा अनुभव केला जणू आत्मा प्रकाशाच्या शरीरामध्ये निवास करत आहे.

१२) दादीजींची बुद्धी साफ, स्वच्छ आरशासारखी होती. त्या निरंतर तपस्वीमूर्त होऊन राहिल्या. सदैव हीच स्मृती राहिली की या तपस्येद्वारेच विश्वाचे कल्याण होईल, सुखमय संसार येईल.

१३) दादीजींनी अंतिम समयाला समोर बघत असूनही सदैव स्व-चिंतन केले. स्व-उन्नतीसाठी दररोज अमृतवेलेला बाबांशी गोड-गोड रूहरिहान केली, बाबांच्या महावाक्यांचा सखोलपणे अभ्यास केला. बाबांसोबत बाबांच्या मुरलीवर जीवापाड प्रेम केले.

१४) दादीजींनी आपली संपूर्ण स्थिती बनविण्यासाठी देहभानापासून परे राहण्याचा अभ्यास केला. त्यांच्या बुद्धीमध्ये सदैव हेच राहिले की, मी विश्व कल्याणाच्या निमित्त आहे, मला स्वतःची स्थिती उच्च, एकाग्र, एकरस अथवा संकल्पांपासून परे निरसंकल्प बनवायची आहे; तेव्हाच मी या जुन्या दुनियेमधून भरारी घेऊन बाबांकडे वतनमध्ये जाऊन बसू शकेन.

१५) सदैव याच लगनमध्ये (ध्यासामध्ये) राहिल्या की, मला बाबांच्या आठवणींमध्ये राहून, सर्वांना संतुष्ट करून सर्वांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत. कोणतीही आत्मा माझ्यामुळे कधीही डिस्टर्ब होऊन मला अभिशाप देऊ नये, याची पूर्णत: काळजी घेऊन त्या सर्वांच्या आशीर्वादाच्या पात्र बनल्या.

१६) सदैव एकच लक्ष्य समोर राहिले की, मला संपन्न फरिश्ता अथवा कर्मातीत बनायचे आहे. हे जुने शरीर सोडून फरिश्ता बनून अव्यक्त-वतनवासी बनायचे आहे. या सेवा तर दिवस-रात्र चालूच राहतील. मला सेवेसोबतच स्वतःवर सूक्ष्म अटेन्शन देऊन पास विद् ऑनर बनायचे आहे.

१७) दादीजी सदैव सर्व विघ्नांपासून दूर, निर्विघ्न अवस्थेमध्ये राहिल्या. एकांतामध्ये बसून स्वतःच स्वतःची सूक्ष्म चेकिंग करून, आपल्या कमी-कमजोरींना, आत्मारूपी हिऱ्याच्या डागाला संपूर्ण नाहीसे करून, अमूल्य हिरा बनल्या.

१८) स्वतःला संपूर्ण पावन, लाईट-माईटने संपन्न बनविण्याकरिता आंतरिक वैराग्य वृत्तीद्वारे सर्व गोष्टींपासून उपराम राहून आपल्या सूक्ष्म दृष्टी, वृत्तीला संपूर्ण पावन बनविले. जुन्या संस्कारांच्या प्रकृतीला पराभूत करून, प्रकृतीजीत बनून बाबांच्या कुशीत विलीन झाल्या.

१९) मी बाबांची आहे, मला बाबांसारखे संपूर्ण बनायचेच आहे, त्यामुळे सूक्ष्म देह-अभिमानाला, स्वतःच्या संस्कारांना, मान-शान आणि महिमेला, बुद्धी आणि सवयींना संपूर्ण समर्पण केले आणि पित्यासमान बनून अव्यक्त-वतनवासी बनल्या.