25-11-2024
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - शांतीचा गुण सर्वात मोठा गुण आहे, म्हणून शांतीने बोला, अशांती पसरविणे
बंद करा’’
प्रश्न:-
संगमयुगावर
बाबांकडून मुलांना कोणता वारसा मिळतो? गुणवान मुलांची लक्षणे कोणती असतील?
उत्तर:-
पहिला वारसा मिळतो ज्ञानाचा. दुसरा शांतीचा आणि तिसरा गुणांचा. गुणवान मुले नेहमी
आनंदामध्ये राहतील. कोणाचे अवगुण पाहणार नाहीत, कोणाची तक्रार करणार नाहीत,
ज्यांच्यामध्ये अवगुण आहेत त्यांची संगत देखील करणार नाहीत. कोणी काही म्हटले तर
ऐकून न ऐकल्या सारखे करून आपल्याच खुशीमध्ये राहतील.
ओम शांती।
रूहानी बाबा बसून रुहानी मुलांना समजावून सांगतात. एक तर तुम्हाला बाबांकडून
ज्ञानाचा वारसा मिळत आहे. बाबांकडून देखील गुण घ्यायचे आहेत आणि मग या चित्रांमधूनही
(लक्ष्मी-नारायणाकडूनही) गुण घ्यायचे आहेत. बाबांना म्हटले जाते शांतीचा सागर. तर
शांती देखील धारण केली पाहिजे. शांतीसाठीच बाबा समजावून सांगतात की, एकमेकांशी
शांतीने बोला. हा गुण अंगीकारला जातो. ज्ञानाचा गुण तर आत्मसात करतच आहात. हे नॉलेज
शिकायचे आहे. हे नॉलेज केवळ हे विचित्र बाबाच शिकवतात. विचित्र आत्मे (मुले) शिकतात.
ही आहे इथली नवीन कला, ज्याला इतर कोणीही जाणत नाहीत. श्रीकृष्णाप्रमाणे दैवी गुण
देखील धारण करायचे आहेत. बाबांनी समजावून सांगितले आहे - ‘मी शांतीचा सागर आहे’, तर
शांती इथे स्थापन करायची आहे. अशांती नष्ट होणार आहे. आपल्या वागणुकीला पाहिले
पाहिजे - आपण कितपत शांतीमध्ये राहतो. अशी बरीच पुरुष मंडळी असतात जी शांत राहणे
पसंत करतात. समजतात की शांत राहणे चांगले आहे. शांतीचा गुण देखील फार उत्तम गुण आहे.
परंतु शांती कशी स्थापन होईल, शांतीचा अर्थ काय आहे - हे भारतवासी मुले जाणत नाहीत.
बाबा भारतवासींसाठीच सांगतील. बाबा येतात देखील भारतामध्येच. आता तुम्ही समजता
बरोबर आपल्यामध्ये देखील शांती जरूर असायला पाहिजे. असे नाही कोणी अशांत करेल तर
स्वतःला देखील अशांत करायचे आहे. नाही, अशांत होणे हा देखील अवगुण आहे. अवगुणाला
काढून टाकायचे आहे. प्रत्येकाकडून गुण ग्रहण करायचे आहेत. अवगुणाकडे पाहिले देखील
नाही पाहिजे. भले आवाज ऐकता, काही करता तरी देखील स्वतः शांत राहिले पाहिजे कारण
बाबा आणि दादा दोघेही शांत राहतात. कधी चिडत नाहीत. ओरडत नाहीत. हे ब्रह्मा देखील
शिकले आहेत ना. जितके शांतीमध्ये रहाल, तितके चांगले आहे. शांतीनेच आठवण करू शकता.
अशांतीवाले आठवण करू शकणार नाहीत. प्रत्येकाकडून गुण ग्रहण करायचाच आहे. दत्तात्रेय
इत्यादीचे उदाहरण देखील इथेच लागू होतात. देवतांसारखे गुणवान तर कोणीच नाहीत. एकच
विकार मुख्य आहे, त्याच्यावर तुम्ही विजय प्राप्त करत आहात, कर्मेंद्रियांवर विजय
प्राप्त करायचा आहे. अवगुणांना सोडायचे आहे, पाहायचे देखील नाही, बोलायचे सुद्धा
नाही. ज्यांच्यामध्ये गुण आहेत त्यांकडेच जायचे आहे. अतिशय गोड शांत रहायचे आहे.
थोडेसे बोलून देखील तुम्ही सर्व काम करू शकता. सर्वांकडून गुण ग्रहण करून गुणवान
बनायचे आहे. जे बुद्धिवान हुशार असतात ते शांत राहणे पसंत करतात. अनेक भक्त लोक
ज्ञानी असणाऱ्यांपेक्षाही जास्त हुशार निर्माणचित्त असतात. बाबा तर अनुभवी आहेत ना.
हे (ब्रह्मा बाबा) ज्या लौकिक पित्याचे संतान होते, ते टीचर होते, अतिशय निर्माण,
शांत राहत असत. कधी क्रोधित होत नसत. ज्याप्रमाणे साधू लोक असतात तर त्यांची महिमा
केली जाते, भगवंताला भेटण्याकरिता पुरुषार्थ करत राहतात ना. काशीला, हरिद्वारला
जाऊन राहतात. मुलांनी खूपच शांत आणि गोड बनून राहिले पाहिजे. इथे कोणी अशांत राहत
असतील तर शांती पसरविण्यासाठी निमित्त बनू शकणार नाहीत. अशांत असणाऱ्या सोबत बोलायचे
सुद्धा नाही. दूर राहिले पाहिजे. फरक आहे ना. हे बगळे आणि ते हंस. हंस पूर्ण दिवसभर
मोती टिपत राहतात. उठता-बसता, चालता-फिरता आपल्या ज्ञानाचे चिंतन करत रहा. पूर्ण
दिवस बुद्धीमध्ये हेच राहावे - कोणाला कसे समजावून सांगावे, बाबांचा परिचय कसा
द्यावा.
बाबांनी सांगितले आहे
- जी पण मुले येतात त्यांच्याकडून फॉर्म भरून घेतला जातो. सेंटरवर जेव्हा कोणी
कोर्स करू इच्छितात तर त्यांच्याकडून फॉर्म भरून घ्यायचा आहे, कोर्स करायचा नसेल तर
फॉर्म भरून घेण्याची गरज नाही. फॉर्म भरूनच याकरिता घेतला जातो कि आपल्याला कळावे
की यांच्यामध्ये काय-काय आहे? काय समजावून सांगायचे आहे? कारण दुनियेमध्ये तर या
गोष्टींना कोणी समजत नाहीत. तर फॉर्मवरून त्यांच्या विषयी संपूर्ण माहिती कळते.
बाबांना कोणी भेटायला येतात तरी देखील फॉर्म भरून घ्यायचा आहे. म्हणजे समजेल की
कशासाठी भेटत आहेत? कोणीही येतात तर त्यांना हद आणि बेहदच्या पित्याचा परिचय द्यायचा
आहे कारण तुम्हाला बेहदच्या पित्याने येऊन आपला परिचय दिला आहे तर तुम्ही मग इतरांना
परिचय देता. त्यांचे नाव आहे शिवबाबा. ‘शिव परमात्माए नमः’ म्हणतात ना. त्या
कृष्णाला ‘देवताए नमः’ म्हणणार. शिवाला म्हणणार ‘शिव परमात्माए नमः’. बाबा म्हणतात
- ‘माझी आठवण करा तर तुमची पापे नष्ट होतील’. मुक्ती-जीवनमुक्तीचा वारसा प्राप्त
करण्यासाठी पवित्र आत्मा जरूर बनावे लागेल. ती आहेच पवित्र दुनिया, ज्याला
सतोप्रधान दुनिया म्हटले जाते. तिथे जायचे असेल तर बाबा म्हणतात - ‘माझी आठवण करा’.
हे तर खूप सोपे आहे. कोणाकडूनही फॉर्म भरून मग तुम्ही त्यांचा कोर्स करता. पहिल्या
दिवशी फॉर्म भरून घ्या आणि मग समजावून सांगा नंतर मग पुन्हा फॉर्म भरून घ्या तेव्हा
समजेल की, आपण जे काही समजावून सांगितले, ते त्यांच्या लक्षात राहिले की नाही.
तुम्ही पहाल दोन दिवसाच्या फॉर्ममध्ये फरक जरूर असेल. लगेच तुमच्या लक्षात येईल -
यांना कितपत समजले आहे? आपल्या स्पष्टीकरणावर काही विचार केला आहे की नाही? हे
फॉर्म सर्वांकडे असले पाहिजेत. बाबा मुरलीमध्ये डायरेक्शन देतात तर मोठ-मोठ्या
सेंटर्सनी तर ताबडतोब कृतीमध्ये आणले पाहिजे. फॉर्म ठेवायचा आहे. नाहीतर माहित कसे
होईल. स्वतः देखील फील करतील - काल काय लिहिले होते आज काय लिहित आहे? फॉर्म तर
अतिशय गरजेचा आहे. वेग-वेगळे छापले तरी देखील हरकत नाही. किंवा एका ठिकाणी छापून मग
सर्वत्र पाठवावेत. हे आहे दुसऱ्यांचे कल्याण करणे.
तुम्ही मुले इथे आले
आहात देवी-देवता बनण्यासाठी. देवता अक्षर अतिशय श्रेष्ठ आहे. दैवी गुण धारण
करणाऱ्यांना देवता म्हटले जाते. आता तुम्ही दैवी गुण धारण करत आहात; तर जिथे
प्रदर्शनी अथवा म्युझियम असतात तिथे हे फार्म जास्त असले पाहिजेत. नाहीतर समजणार कसे
की, कशी अवस्था आहे. समजून घेऊन मग समजावून सांगावे लागेल. मुलांना तर नेहमी
गुणांचेच वर्णन करायचे आहे, कधीही अवगुणांचे वर्णन करायचे नाही. तुम्ही गुणवान बनत
आहात ना. ज्यांच्यामध्ये भरपूर गुण असतील ते इतरांमध्ये देखील गुण भरू शकतील.
अवगुणवाले कधीही गुण भरू शकणार नाहीत. मुले जाणतात वेळ काही जास्त राहिलेला नाही.
खूप पुरुषार्थ करायचा आहे. बाबांनी समजावून सांगितले आहे - तुम्ही रोज प्रवास करता,
यात्रा करत राहता. हे जे गायन आहे - ‘अतीन्द्रिय सुख गोप-गोपियों से पूछो’. ही या
अंतिम समयाची गोष्ट आहे. आता तर नंबरवार आहेत. काहीजण तर आतमध्ये आनंदाने गाणे गात
राहतात - ओहो! परमपिता परमात्मा आम्हाला भेटले आहेत, त्यांच्याकडून आम्ही वारसा घेत
आहोत. त्यांची कोणतीही कंप्लेंट असू शकत नाही. कोणी काही बोलले तरी देखील ऐकून न
ऐकल्यासारखे करून आपल्याच मस्तीमध्ये मस्त राहिले पाहिजे. कोणतेही आजारपण किंवा
दुःख इत्यादी असेल तर तुम्ही फक्त आठवणीमध्ये रहा. हा हिशोब आताच चुकता करायचा आहे,
नंतर मग तुम्ही तर २१ जन्म फूल बनता. तिथे दुःखाची गोष्टच असणार नाही. गायले जाते -
‘खुशी जैसी खुराक नहीं’. मग सुस्ती इत्यादी सर्व उडून जाते, यामध्ये तर ही आहे खरी
खुशी. ती आहे खोटी. धन मिळाले, दागिने मिळाले तर खुश होतील. ही आहे बेहदची गोष्ट.
तुम्हाला तर आता खुशीमध्ये राहिले पाहिजे. जाणता आपण २१ जन्मांसाठी कायमचे सुखी
असणार. याच स्मृतीमध्ये रहा की, आपण कोण बनतो. बाबा म्हटल्यावरच दुःख दूर झाली
पाहिजेत. ही तर २१ जन्मांची खुशी आहे. आता बाकी थोडे दिवस आहेत. आपण जातो आपल्या
सुखधामला. तर मग इतर काहीही आठवणीत राहू नये. हे बाबा आपला अनुभव ऐकवतात. किती
समाचार येतात, संघर्ष चालू असतो. बाबांना कोणत्या गोष्टीचे दुःख थोडेच होते. ऐकले,
ठीक आहे, ही भावी. हे तर काहीच नाही, आपण तर कुबेराच्या खजिन्यावाले बनतो. स्वतःशीच
बोलले तरीही आनंद होतो. अतिशय शांत राहतात, त्यांचा चेहरा देखील खूप प्रफुल्लित
राहील. स्कॉलरशिप इत्यादी मिळते तेव्हा चेहरा किती हर्षित राहतो. तुम्ही देखील
पुरुषार्थ करत आहात - या लक्ष्मी-नारायणाप्रमाणे हर्षितमुख बनण्याकरिता. यांना
ज्ञान तर नाही आहे. तुम्हाला तर ज्ञान देखील आहे तर खुशी राहिली पाहिजे. हर्षितपणा
देखील असायला हवा. या देवतां पेक्षा तुम्ही खूप उच्च आहात. ज्ञान सागर बाबा आपल्याला
किती उच्च ज्ञान देतात. अविनाशी ज्ञान रत्नांची लॉटरी मिळत आहे तर किती आनंदात
राहिले पाहिजे. हा तुमचा जन्म हिऱ्या समान गायला जातो. नॉलेजफुल बाबांनाच म्हटले
जाते, या देवतांना म्हटले जात नाही. तुम्ही ब्राह्मणच नॉलेजफुल आहात तर तुम्हाला
नॉलेजची खुशी असते. एक तर बाबा भेटल्याचा आनंद होतो. तुमच्या व्यतिरिक्त इतर
कोणालाही हा आनंद होऊ शकणार नाही. भक्ती मार्गामध्ये इतके गहिरे सुख नसते. भक्ती
मार्गाचे आहे आर्टिफिशियल अल्पकाळाचे सुख. त्याचे तर नावच आहे स्वर्ग, सुखधाम, हेवन.
तिथे अपार सुख, इथे अपार दुःख. आता मुलांना समजते आहे - रावण राज्यामध्ये आपण किती
घाणेरडे बनलो आहोत. हळू-हळू खालीच उतरत आलो आहोत. हा आहेच विष सागर. आता बाबा या
विषाच्या सागरातून काढून तुम्हाला क्षीर सागरामध्ये घेऊन जातात. मुलांना इथे खूप
छान वाटते आणि मग विसरल्याने काय अवस्था होते. बाबा आनंदाचा पारा किती चढवतात. या
ज्ञान अमृताचेच गायन आहे. ज्ञान अमृताचा ग्लास पीत रहायचा आहे. इथे तुम्हाला खूप
चांगला नशा चढतो मग बाहेर गेल्यावर तो नशा कमी होतो. बाबा स्वतः फिल करतात, इथे
मुलांना चांगली फिलिंग येते - आपण आपल्या घरी जात आहोत, आपण बाबांच्या श्रीमतावर
राजधानी स्थापन करत आहोत. आपण खूप मोठे योद्धे आहोत. हे सर्व नॉलेज बुद्धीमध्ये आहे,
ज्यामुळे तुम्ही इतके पद प्राप्त करता. शिकवत कोण आहेत पहा! बेहदचे पिता, एकदम
बदलून टाकतात. तर मुलांना मनातून किती आनंद झाला पाहिजे. हे देखील मनामध्ये आले
पाहिजे की इतरांना देखील हा आनंद द्यावा. रावणाचा आहे शाप आणि बाबांचा मिळतो वारसा.
रावणाच्या शापाने तुम्ही किती दुःखी-अशांत बनले आहात. अनेक गोप सुद्धा आहेत ज्यांचे
मन होते सेवा करावी. परंतु कलश मातांना मिळतो. शक्ती दल आहे ना. ‘वन्दे मातरम्’
गायले जाते. सोबत ‘वन्दे पितरम्’ तर आहेतच. परंतु नाव मातांचे आहे. पहिले लक्ष्मी
मग नारायण. पहिले सीता, नंतर राम. इथे पहिले पतीचे नाव मग पत्नीचे लिहितात. हा
देखील खेळ आहे ना. बाबा समजावून तर सर्व काही सांगतात. भक्तिमार्गाचे रहस्य देखील
समजावून सांगतात. भक्तीमध्ये काय-काय असते. जोपर्यंत ज्ञान मिळत नाही तोपर्यंत समजते
थोडेच. आता तुम्हा सर्वांचे कॅरेक्टर (चारित्र्य) सुधारते. तुमचे दैवी कॅरेक्टर बनत
आहे. ५ विकारांमुळे आसुरी कॅरेक्टर होते. किती चेंज (परिवर्तन) होते. तर
परिवर्तनामध्ये आले पाहिजे ना. शरीर सुटले की मग थोडेच परिवर्तन होऊ शकेल.
बाबांमध्ये शक्ती आहे, कितीतरी जणांमध्ये परिवर्तन घडवून आणतात. बरीच मुले आपला
अनुभव ऐकवतात - ‘मी खूप कामी, व्यसनी होतो, माझ्यामध्ये खूप परिवर्तन झाले आहे. आता
आम्ही खूप प्रेमाने राहतो’. प्रेमाचे अश्रू देखील येतात. बाबा समजावून तर खूप
सांगतात परंतु या सर्व गोष्टी विसरून जातात. नाहीतर आनंदाचा पारा चढलेला राहील. आपण
अनेकांचे कल्याण करावे. मनुष्य खूप दुःखी आहेत, त्यांना रस्ता सांगावा. समजावून
सांगण्यासाठी देखील किती मेहनत करावी लागते. शिव्या देखील खाव्या लागतात.
अगोदरपासूनच आवाज (तक्रार) आहे की, हे सर्वांना भाऊ-बहिणी बनवतात. अरे, भाऊ बहिणीचे
नाते तर चांगले आहे ना. तुम्ही आत्मे तर भाऊ-भाऊ आहात. परंतु तरी देखील
जन्म-जन्मांतराची दृष्टी जी पक्की झाली आहे ती मोडतच नाही. बाबांकडे तर खूप समाचार
येतात. बाबा समजावून सांगतात या घाणेरड्या दुनियेमधून तुम्हा मुलांचे मन उडाले
पाहिजे. गुल-गुल (फूल) बनले पाहिजे. कितीतरी जण ज्ञान ऐकून देखील विसरून जातात.
सर्व ज्ञान उडून जाते. काम महाशत्रू आहे ना. बाबा तर खूप अनुभवी आहेत. या विकारापायी
तर राजांनी आपले राज्य सुद्धा गमावले आहे. काम विकार खूप खराब आहे. सर्वजण म्हणतात
देखील बाबा हा खूप कट्टर शत्रू आहे. बाबा म्हणतात - काम विकाराला जिंकल्याने तुम्ही
विश्वाचे मालक बनाल. परंतु काम विकार असा कट्टर आहे जो प्रतिज्ञा करूनही पुन्हा
कोसळतात (अधोगती होते). खूप मुश्किलीने काहीजण सुधारतात. यावेळी साऱ्या दुनियेचे
कॅरेक्टर बिघडलेले आहे. पावन दुनिया कधी होती, कशी बनली, यांनी राज्य-भाग्य कसे
प्राप्त केले, कोणी सांगू शकणार नाही. पुढे वेळ येईल तुम्ही लोक परदेशात सुद्धा जाल,
ते देखील ऐकतील. पॅराडाईज कसा स्थापन होतो. तुमच्या बुद्धीमध्ये या सर्व गोष्टी
चांगल्या रीतीने आहेत. तर आता तुम्हाला हीच घोर चिंता लागून राहिली पाहिजे, इतर
सर्व गोष्टी विसरायच्या आहेत. अच्छा.
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) उठता-बसता,
चालता-फिरता ज्ञानाचे चिंतन करून मोती वेचणारे हंस बनायचे आहे. सर्वांमधून गुण
ग्रहण करायचे आहेत. एकमेकांमध्ये गुणच भरायचे आहेत.
२) आपला चेहरा नेहमी
प्रफुल्लित ठेवण्याकरिता आपणच आपल्याशी गोष्टी करायच्या आहेत - ‘ओहो! आम्ही तर
कुबेराच्या खजिन्याचे मालक बनत आहोत. ज्ञान सागर बाबांकडून आम्हाला ज्ञान रत्नांची
लॉटरी मिळत आहे!’
वरदान:-
आपल्या
टायटलच्या स्मृती सोबतच समर्थ स्थिती बनविणारे स्वमानधारी भव
संगमयुगावर स्वयं बाबा
आपल्या मुलांना श्रेष्ठ टायटल देतात, तर त्याच रूहानी नशेमध्ये रहा. जसे टायटल
आठवेल तशी समर्थ स्थिती बनत जावी. ज्याप्रमाणे आपले टायटल आहे - ‘स्वदर्शन चक्रधारी’
तर ही स्मृती येताच परदर्शन समाप्त व्हावे, स्वदर्शन चक्रा समोर मायेचा गळा कापला
जावा. ‘मी महावीर आहे’, हे टायटल आठवले तर स्थिती अचल-अडोल बनावी. तर टायटलच्या
स्मृती सोबत समर्थ स्थिती बनवा तेव्हा म्हणणार - श्रेष्ठ स्वमानधारी.
बोधवाक्य:-
भटकणाऱ्या
आत्म्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी परखण्याच्या शक्तीला वाढवा.