26-03-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुम्ही बाबांचा हात पकडला आहे, तुम्ही गृहस्थ जीवन जगत असताना देखील बाबांची आठवण करता-करता तमोप्रधानापासून सतोप्रधान बनाल”

प्रश्न:-
तुम्हा मुलांमध्ये कोणता उल्हास असला पाहिजे? तख्तनशीन बनण्याची विधी काय आहे?

उत्तर:-
सदैव हा उल्हास रहावा की, ज्ञानसागर बाबा आम्हाला रोज ज्ञान रत्नांच्या थाळ्या भरभरून देत आहेत. जितके योगामध्ये रहाल तितकी बुद्धि कांचन होत जाईल. ही अविनाशी ज्ञान रत्नेच सोबत जातात. तख्तनशीन बनायचे असेल तर मात-पित्याला पूर्णपणे फॉलो करा. त्यांच्या श्रीमतानुसार चाला, इतरांनाही आप समान बनवा.

ओम शांती।
रूहानी मुले यावेळी कुठे बसली आहेत? म्हणतील - रूहानी बाबांच्या युनिव्हर्सिटीमध्ये किंवा पाठशाळेमध्ये बसलो आहोत. बुद्धीमध्ये आहे की आपण रूहानी बाबांच्या पुढ्यात बसलो आहोत, ते बाबा आम्हाला सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे रहस्य समजावून सांगतात किंवा भारताचे उत्थान आणि पतन कसे होते, हे देखील सांगतात. भारत जो पावन होता तो आता पतित आहे. भारत सिरताज होता मग कोणी विजय मिळवला आहे? रावणाने. राजाई गमावली म्हणजेच पतन झाले ना. कोणी राजा तर नाही आहे. आणि असला जरी तरीही पतितच असेल. याच भारतामध्ये सूर्यवंशी महाराजा-महाराणी होते. सूर्यवंशी महाराजे आणि चंद्रवंशी राजे होते. या गोष्टी आता तुमच्या बुद्धीमध्ये आहेत, दुनियेमध्ये या गोष्टी कोणीही जाणत नाहीत. तुम्ही मुले जाणता - आमचे रूहानी बाबा आम्हाला शिकवत आहेत. रूहानी बाबांचा आम्ही हात पकडला आहे. भले आम्ही राहतो गृहस्थ व्यवहारामध्ये परंतु बुद्धीमध्ये आहे की आता आम्ही संगमयुगावर उभे आहोत. पतित दुनियेमधून आम्ही पावन दुनियेमध्ये जातो. कलियुग आहे पतित युग, सतयुग आहे पावन युग. पतित मनुष्य पावन मनुष्यांच्या समोर जाऊन नमस्ते करतात. आहेत तर ते देखील भारताचे मनुष्य. परंतु ते दैवीगुणवाले आहेत. आता तुम्ही मुले जाणता आपण देखील बाबांकडून असे दैवीगुण धारण करत आहोत. सतयुगामध्ये हा पुरुषार्थ करणार नाही. तिथे तर आहे प्रारब्ध. इथे पुरुषार्थ करून दैवीगुण धारण करायचे आहेत. नेहमी आपली तपासणी करत रहायची आहे - आपण कितपत बाबांची आठवण करून तमोप्रधानापासून सतोप्रधान बनत आहोत? जितकी बाबांची आठवण कराल तितके सतोप्रधान बनाल. बाबा तर सदैव सतोप्रधान आहेत. आता देखील पतित दुनिया, पतित भारत आहे. पावन दुनियेमध्ये पावन भारत होता. तुमच्याकडे प्रदर्शनी इत्यादी ठिकाणी भिन्न-भिन्न प्रकारचे मनुष्य येतात. कोणी म्हणतात - जसे भोजन गरजेचे आहे तसेच हे विकार देखील भोजन आहे, यांच्या शिवाय मरायला होईल. आता अशी काही गोष्ट तर नाही आहे. संन्यासी पवित्र बनतात तर ते काय मग मरतात की काय! असे-असे बोलणाऱ्यांसाठी समजले जाते - हे कोणी खूप अजामिल सारखे पापी असतील, जे असे बोलतात. असे बोलण्याची गरज आहे का की, याच्या शिवाय तुम्ही मराल ज्यामुळे भोजनाशी याची तुलना करता! स्वर्गामध्ये येणारे जे असतील ते सतोप्रधान असतील. नंतर मग सतो, रजो, तमोमध्ये येतात ना. जे शेवटी येतात त्या आत्म्यांनी निर्विकारी दुनिया तर पाहिलीच नाही आहे. तर ते आत्मे अशाच प्रकारे बोलतील की, याच्याशिवाय आम्ही राहू शकत नाही. सूर्यवंशी जे असतील त्यांना तर लगेच बुद्धीमध्ये येईल - ही तर खरी गोष्ट आहे. बरोबर स्वर्गामध्ये विकाराचे नामो-निशाण नव्हते. विविध प्रकारची माणसे, विविध प्रकारच्या गोष्टी करतात. तुम्ही समजता कोण-कोण फूल बनणारे आहेत? कोणी तर काटेच राहतात. स्वर्गाचे नाव आहे - फुलांचा बगीचा. हे आहे काट्यांचे जंगल. काटे देखील अनेक प्रकारचे असतात ना. आता तुम्ही जाणता आपण फूल बनत आहोत. खरोखर हे लक्ष्मी-नारायण तर सदा गुलाबाची फुले आहेत. यांना म्हणता येईल किंग ऑफ फ्लॉवर्स. दैवी फ्लॉवर्सचे राज्य आहे ना. जरूर त्यांनी देखील पुरुषार्थ केला असेल. शिक्षणाने बनले आहेत ना.

तुम्ही जाणता आता आपण ईश्वरीय फॅमिलीचे बनलो आहोत. अगोदर तर ईश्वराला जाणतही नव्हतो. बाबांनी येऊन ही फॅमिली बनविली आहे. पिता पहिले स्त्रीला ॲडॉप्ट करतात आणि मग तीच्याद्वारे मुलांना रचतात. बाबांनी देखील यांना (ब्रह्माला) ॲडॉप्ट केले आणि मग यांच्या द्वारे मुलांना रचले आहे. हे सर्व ब्रह्माकुमार-कुमारी आहेत ना. हे नाते प्रवृत्ती मार्गाचे होते. संन्याशांचा आहे निवृत्ती मार्ग. त्यांच्यामध्ये कोणी ‘मम्मा-बाबा’ असे म्हणत नाहीत. इथे तुम्ही मम्मा-बाबा म्हणता. बाकीचे जे काही सत्संग आहेत ते सर्व निवृत्ती मार्गाचे आहेत, हे एकच पिता आहेत ज्यांना मात-पिता असे म्हणून बोलावतात. बाबा बसून समजावून सांगतात, भारतामध्ये पवित्र प्रवृत्ती मार्ग होता, आता अपवित्र झाला आहे. मी पुन्हा तोच प्रवृत्ती मार्ग स्थापन करतो. तुम्ही जाणता - आपला धर्म खूप सुख देणारा आहे. मग आपण जुन्या धर्मवाल्यांचा संग का करावा! तुम्ही स्वर्गामध्ये किती सुखी असता. हिरे-माणकांचे महाल असतात. इथे भले अमेरिका-रशिया इत्यादी ठिकाणी किती श्रीमंत आहेत परंतु स्वर्गासारखे सुख असू शकत नाही. सोन्याच्या विटांसारखा महाल तर काही कोणी बनवू शकत नाही. सोन्याचे महाल असतातच सतयुगामध्ये. इथे सोने आहेच कुठे. तिथे तर प्रत्येक ठिकाणी हिरे-माणके जडवलेली असतील. इथे तर हिऱ्यांची देखील किती किंमत झाली आहे. हे सर्व मातीमध्ये मिसळून जाणार. बाबांनी समजावून सांगितले आहे - नवीन दुनियेमध्ये मग सर्व नवीन खाणी भरून जातील. आता या सर्व रिकाम्या होत राहतील. असे दाखवतात - सागराने हिरे-माणकांच्या थाळ्या भेट केल्या. हिरे-माणके तर तिथे तुम्हाला पुष्कळ मिळतील. सागराला देखील देवता रूप समजतात. तुम्ही समजता - बाबा तर ज्ञानाचा सागर आहेत. सदैव उल्हास रहावा की, ज्ञान सागर बाबा आम्हाला दररोज ज्ञान रत्नांनी, जवाहिऱ्यांच्या थाळ्या भरून देतात. बाकी तो तर पाण्याचा सागर आहे. बाबा तुम्हा मुलांना ज्ञान रत्ने देतात, जी तुम्ही बुद्धीमध्ये भरता. जितके योगामध्ये रहाल तितकी बुद्धी कांचन होत जाईल. ही अविनाशी ज्ञान रत्नेच तुम्ही सोबत घेऊन जाता. बाबांची आठवण आणि हे नॉलेज आहे मुख्य.

तुम्हा मुलांमध्ये खूप उल्हास राहिला पाहिजे. बाबा देखील गुप्त आहेत, तुम्ही देखील गुप्त सेना आहात. नॉनव्हायोलन्स, अन-नोन वॉरियर्स (अहिंसक, गुप्त योद्धे); असे म्हणतात ना की, असा एक अतिशय बलवान योद्धा आहे. परंतु नावा-गावाचा पत्ताच नाही. असे तर होऊ शकत नाही. गव्हर्मेंटकडे प्रत्येकाचे नाव-निशाण सर्व असते. अन-नोन वॉरियर्स, नॉनव्हायोलन्स हे तुमचे नाव आहे. सर्वात पहिली हिंसा आहे हे विकार, हेच आदि-मध्य-अंत दुःख देतात; म्हणून तर म्हणतात - ‘हे पतित-पावन, आम्हा पतितांना येऊन पावन बनवा’. पावन दुनियेमध्ये एकही पतित असू शकत नाही. हे तुम्ही मुले जाणता, आताच आपण भगवंताची संतान बनलो आहोत, बाबांकडून वारसा घेण्यासाठी, परंतु माया देखील काही कमी नाही आहे. मायेचे एकच चापट असे बसते जे एकदम गटारामध्ये पाडून टाकते. विकारामध्ये जेव्हा पडतात तर बुद्धी एकदम चट होते (नष्ट होते). बाबा किती समजावितात- आपसामध्ये देहधारीशी कधीही प्रीत ठेवू नका. तुम्हाला प्रीत ठेवायची आहे एक बाबांसोबत. कोणत्याही देहधारिशी प्रीत ठेवायची नाही, प्रेम ठेवायचे नाही. प्रेम ठेवायचे आहे त्याच्याशी जो देह रहित विचित्र पिता आहे. बाबा किती समजावून सांगत राहतात तरी देखील समजत नाहीत. भाग्यामध्ये नाही त्यामुळे मग एकमेकांच्या देहामध्ये अडकून पडतात. बाबा किती समजावतात - तुम्ही देखील रूप आहात. आत्मा आणि परमात्म्याचे रूप तर एकच आहे. आत्मा कधी लहान-मोठी नसते. आत्मा अविनाशी आहे. प्रत्येकाचा ड्रामामध्ये पार्ट नोंदलेला आहे. आता किती पुष्कळ मनुष्य आहेत, मग ९-१० लाख होतील. सतयुगाच्या सुरुवातीला किती छोटे झाड असते. प्रलय तर कधी होत नाही. तुम्ही जाणता जे काही मनुष्य मात्र आहेत त्या सर्वांचे आत्मे मूलवतनमध्ये राहतात. त्यांचे देखील झाड आहे. बीज टाकले जाते, त्यातून पूर्ण झाड उगवते ना. सर्वप्रथम दोन पाने निघतात. हे देखील बेहदचे झाड आहे, गोळ्यावर समजावून सांगणे किती सोपे आहे, विचार करा. आता आहे कलियुग. सतयुगामध्ये एकच धर्म होता. तर किती थोडे मनुष्य असतील. आता किती मनुष्य, किती धर्म आहेत. इतके सर्व जे पहिले नव्हते ते मग कुठे जातील? सर्व आत्मे परमधाम मध्ये निघून जातात. तुमच्या बुद्धीमध्ये सारे ज्ञान आहे. जसे बाबा ज्ञानाचा सागर आहेत तसे तुम्हाला देखील बनवतात. तुम्ही शिकून हे पद प्राप्त करता. बाबा स्वर्गाचे रचयिता आहेत तर स्वर्गाचा वारसा भारतवासीयांनाच देतात. बाकी सर्वांना परत घरी घेऊन जातात. बाबा म्हणतात - मी आलो आहे तुम्हा मुलांना शिकवण्यासाठी. जितका पुरुषार्थ कराल तितके पद प्राप्त कराल. जितके श्रीमतावर चालाल तितके श्रेष्ठ बनाल. सर्व काही पुरुषार्थावर अवलंबून आहे. मम्मा-बाबांच्या तख्तनशीन बनायचे असेल तर पूर्णपणे फॉलो फादर-मदर. तख्तनशीन बनण्यासाठी त्यांच्या आचरणानुसार चाला. इतरांना देखील आप समान बनवा. बाबा अनेक प्रकारच्या युक्त्या सांगतात. एका बॅजवरूनही तुम्ही कोणालाही चांगल्या रीतीने बसून समजावून सांगा. पुरुषोत्तम महिना असतो तर बाबा म्हणतात - सर्वांना चित्र मोफत द्या. बाबा सौगात देतात. पैसे हातामध्ये येतील तर जरूर समजतील, बाबांनाही खर्च होतो ना, तर मग लवकर पाठवतील. घर तर एकच आहे ना. या ट्रान्सलाईटच्या चित्रांची प्रदर्शनी बनेल तेव्हा मग कितीतरी पाहण्यासाठी येतील. पुण्याचे काम झाले ना. मनुष्याला काट्यापासून फुल पाप आत्म्यापासून पुण्य आत्मा बनवतात, याला विहंग मार्ग म्हटले जाते. प्रदर्शनीमध्ये स्टॉल घेतल्याने पुष्कळ लोक येतात. खर्च कमी होतो. तुम्ही इथे येता बाबांकडून स्वर्गाची राजाई खरेदी करण्यासाठी. तर प्रदर्शनीमध्ये देखील येतील, स्वर्गाची राजाई खरेदी करण्यासाठी. हे दुकान आहे ना.

बाबा म्हणतात - या ज्ञानाद्वारे तुम्हाला खूप सुख मिळेल, त्यामुळे चांगल्या प्रकारे शिकून, पुरुषार्थ करून फुल पास झाले पाहिजे. बाबाच बसून आपला आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताचा परिचय देतात, बाकी इतर कोणीही देऊ शकत नाही. आता बाबांद्वारे तुम्ही त्रिकालदर्शी बनता. बाबा म्हणतात - ‘मी जो आहे, जसा आहे, मला यथार्थ रीतीने कोणीही जाणत नाही. तुमच्यामध्ये देखील नंबरवार आहेत. जर यथार्थ रित्या जाणले असते तर कधी सोडलेच नसते. हे आहे शिक्षण. भगवान बसून शिकवतात. म्हणतात - मी तुमचा ओबीडियंट सर्व्हेंट (आज्ञाधारक सेवक) आहे. पिता आणि टीचर दोघेही ओबीडियंट सर्व्हेंट असतात. ड्रामामध्ये माझा पार्टच असा आहे; मग सर्वांना सोबत घेऊन जाईन. श्रीमतावर चालून पास विद् ऑनर झाले पाहिजे. शिक्षण तर खूप सोपे आहे. सर्वात वृद्ध तर हे शिकणारे आहेत. शिवबाबा म्हणतात मी काही वृद्ध नाही. आत्मा कधी वृद्ध होत नाही. बाकी पत्थर-बुद्धी मात्र बनते. माझी तर आहेच पारस-बुद्धी, तेव्हाच तर तुम्हाला पारसबुद्धी बनविण्यासाठी येतो. कल्प-कल्प येतो. अगणित वेळा तुम्हाला शिकवतो तरी देखील विसरून जाल. सतयुगामध्ये या ज्ञानाची गरजच राहत नाही. किती चांगल्या रीतीने बाबा समजावून सांगतात. अशा बाबांना मग सोडचिठ्ठी देतात; म्हणूनच म्हटले जाते - महामूर्ख बघायचा असेल तर इथे बघा. असे बाबा ज्यांच्याकडून स्वर्गाचा वारसा मिळतो, त्यांना देखील सोडून देतात. बाबा म्हणतात - तुम्ही माझ्या मतावर चालाल तर अमरलोकमध्ये विश्वाचे महाराजा-महाराणी बनाल. हा आहे मृत्यूलोक. मुले जाणतात आपण सो पूज्य देवी-देवता होतो. आता आपण काय बनलो आहोत? पतित भिकारी. आता पुन्हा आपण सो प्रिन्स बनणार आहोत. सर्वांचा एकसारखा पुरुषार्थ तर असू शकत नाही. कोणी दूर निघून जातात, कोणी विद्रोही बनतात. असे ट्रेटर्स देखील पुष्कळ आहेत त्यांच्याशी बोलले देखील नाही पाहिजे. ज्ञानाच्या व्यतिरिक्त इतर काही विचारेल तर समजा कपटी आहे. संग तारे कुसंग बोरे. जे ज्ञानामध्ये हुशार आहेत, बाबांच्या हृदयासीन आहेत, त्यांचा संग करा. ते तुम्हाला ज्ञानाच्या गोड-गोड गोष्टी ऐकवतील. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या सेवाभावी, प्रामाणिक, आज्ञाधारक मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) जे देह रहित विचित्र आहेत, त्या बाबांशी प्रीत ठेवायची आहे. कोणत्याही देहधारीच्या नावा-रूपामध्ये बुद्धी अडकू द्यायची नाही. मायेची चापट लागू नये, याची काळजी घ्यायची आहे.

२) जो ज्ञानाच्या गोष्टी सोडून दुसरे काहीही ऐकवत असेल तर त्याचा संग करायचा नाही. फुल पास होण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. काट्यांना फुल बनविण्याची सेवा करायची आहे.

वरदान:-
“एक बाबा दुसरा न कोई” या स्मृती द्वारे बंधनमुक्त योगयुक्त भव

आता घरी जाण्याची वेळ आहे त्यामुळे बंधनमुक्त आणि योगयुक्त बना. बंधनमुक्त अर्थात लूज ड्रेस, टाईट नाही. ऑर्डर मिळाली आणि सेकंदामध्ये गेला. असे बंधनमुक्त, योगयुक्त स्थितीचे वरदान प्राप्त करण्यासाठी नेहमी हा वायदा लक्षात रहावा की, “एक बाबा दुसरा न कोई’’. कारण घरी जाण्यासाठी किंवा सतयुगी राज्यामध्ये येण्याकरिता या जुन्या शरीराला सोडावे लागेल. तर चेक करा असे एव्हररेडी बनले आहात की अजूनही काही दोऱ्या बांधलेल्या आहेत? हे जुने शरीर टाईट तर नाही आहे?

बोधवाक्य:-
व्यर्थ संकल्प रुपी एक्स्ट्रा भोजन करू नका म्हणजे स्थूलपणाच्या आजारा पासून वाचाल.

अव्यक्त इशारे - सत्यता आणि सभ्यता रुपी कल्चरला धारण करा:- बाबांना सर्वात चांगली गोष्ट वाटते ती म्हणजे - सच्चाई, म्हणून भक्तीमध्ये देखील म्हणतात - ‘गॉड इज ट्रूथ’. सर्वात सुंदर गोष्ट सच्चाई आहे कारण ज्याच्यामध्ये सच्चाई असते त्याच्यामध्ये सफाई असते, तो क्लीन आणि क्लियर असतो. तर सच्चाईची विशेषता कधीही सोडायची नाही. सत्यतेची शक्ती एक प्रकारे लिफ्टचे काम करते.