26-03-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - संग दोषापासून सुरक्षित राहून पूर्णपणे अभ्यासावर लक्ष द्या म्हणजे मग
कोणतेही वादळ येऊ शकत नाही, बाकी मायेला काही दोषी ठरवू नका”
प्रश्न:-
कोणती एक
गोष्ट नेहमी लक्षात ठेवाल तर बेडा पार होईल?
उत्तर:-
“बाबा जी आज्ञा द्याल ती मान्य करू”, असे नेहमी बाबांच्या आदेशावर चालत रहा तर तुमचा
बेडा (जीवन रुपी नाव) पार होईल. आज्ञेचे पालन करणारे मायेचा वार होण्या पासून
वाचतात, बुद्धीचे कुलूप उघडते. अपार आनंदामध्ये राहतात. कोणतेही उलटे कर्म होत नाही.
गीत:-
तुम्हें पाके
हमने…
ओम शांती।
सर्व सेंटर्सच्या गोड-गोड मुलांनी गाणे ऐकले. सर्वजण जाणतात की बेहदच्या बाबांकडून
पुन्हा ५ हजार वर्षांपूर्वी प्रमाणे आम्ही विश्वाची बादशाही घेत आहोत. कल्प-कल्प
आम्ही ही घेत आलो आहोत. बादशाही घेतो आणि पुन्हा गमावतो. मुले जाणतात आता आपण
बेहदच्या बाबांची गोद घेतली आहे (दत्तक पुत्र बनलो आहोत) किंवा त्यांची मुले बनलो
आहोत. आणि हे आहे देखील बरोबर. घरी बसून पुरुषार्थ करत आहोत. बेहदच्या बाबांकडून
उच्च पद प्राप्त करण्यासाठी शिक्षण सुरू आहे. तुम्ही जाणता ज्ञान सागर पतित-पावन
सर्वांचे सद्गती दाता शिवबाबाच आमचे पिता देखील आहेत, टीचर देखील आहेत, सद्गुरु
देखील आहेत. त्यांच्याकडून आम्ही वारसा घेत आहोत तर त्यामध्ये उच्च पद प्राप्त
करण्यासाठी किती पुरुषार्थ केला पाहिजे. अज्ञान काळामध्ये देखील शाळेमध्ये शिकत
असतात तर ते आपल्या कुवतीनुसार नंबरवार मार्कांनी पास होतात. तिथे असे तर कोणी
म्हणणार नाहीत की, माया आम्हाला संकटात टाकते किंवा वादळे येतात. चांगल्या रीतीने
शिकत नाहीत किंवा वाईट संगतीमध्ये जाऊन फसतात. खेळण्या-कुदण्यामध्ये मग्न होतात
त्यामुळे अभ्यास करत नाहीत, नापास होतात. बाकी याला मायेची वादळे असे काही म्हणता
येणार नाही. वर्तन ठीक नसेल तर टीचर देखील शेरा देतात की, ‘याच्याकडून गैरवर्तन होत
आहे. कुसंगतीमुळे बिघडला आहे’. यामध्ये माया रावणाला दोषी ठरविण्याची गरज नाही.
मोठ-मोठ्या चांगल्या व्यक्तींची काही मुले तर चांगली शिकतात, तर काही दारू इत्यादी
पिण्यास सुरू करतात. वाईट मार्गावर निघून जातात, मग अशावेळी वडील देखील म्हणतात की,
‘हा तर कपूत बनला आहे’. त्या शिक्षणामध्ये खूप सब्जेक्ट असतात, हे तर एकाच प्रकारचे
शिक्षण आहे. तिथे मनुष्य शिकवितात, इथे मुले जाणतात आपल्याला स्वयं भगवान शिकवत
आहेत. आम्ही जर चांगल्या रीतीने अभ्यास केला तर विश्वाचे मालक बनू शकतो. मुले तर
पुष्कळ आहेत, मग कोणी संग दोषामध्ये येऊन शिकत नाहीत. याला मायेचे वादळ का म्हणावे?
संग दोषामध्ये येऊन कोणी शिकत नाही तर यामध्ये माया किंवा शिक्षक किंवा पिता तरी
काय करतील. शिकू शकले नाहीत तर परत आपल्या घरी निघून गेले. हे तर ड्रामा अनुसार
पहिले भट्टीमध्ये यायचेच होते. येऊन शरण घेतली. कोणाला पतीने मारले, त्रास दिला, तर
कोणाला वैराग्य आले. घरी राहू शकल्या नाहीत, आणि मग कोणी तर इथे येऊन देखील निघून
गेल्या; शिकू शकल्या नाहीत तर मग जाऊन नोकरी इत्यादीमध्ये लागल्या किंवा लग्न केले.
हा तर एक बहाणा आहे मायेच्या वादळांमुळे शिकू शकत नाहीत. हेच समजत नाहीत की, संग
दोषामुळे अशी हालत झाली आणि आपल्यामध्ये विकार जबरदस्त आहेत. तर असे का म्हणता की,
मायेचे वादळ आले म्हणून कोसळलो (अधोगती झाली). हे तर आपल्यावर अवलंबून आहे.
पिता, टीचर, सद्गुरूची
जी शिकवण मिळत आहे त्यावर चालले पाहिजे. जर त्यानुसार चालत नसाल तर जरूर कोणती वाईट
संगत लागली आहे किंवा काम विकाराचा नशा आहे किंवा देह-अभिमानाचा नशा आहे. सर्व
सेंटर्सवाले जाणतात की आपण बेहदच्या बाबांकडून विश्वाची बादशाही घेण्याकरिता शिकत
आहोत. निश्चय नसेल तर बसताच कशासाठी अजूनही भरपूर आश्रम आहेत. परंतु तिथे तर काहीच
प्राप्ती नाही. एम ऑब्जेक्ट नाहीये. ते सर्व छोटे-छोटे मठ-पंथ शाखा-उपशाखा आहेत.
झाड वृद्धीला प्राप्त होणारच आहे. इथे तर हे सारे कनेक्शन आहे. गोड दैवी झाडाचा जो
असेल तो निघून येईल. सर्वात गोड कोण असतील? जे सतयुगाचे महाराजा-महाराणी बनतात. आता
तुम्ही समजता जे पहिल्या नंबरमध्ये येतात, त्यांनी जरूर चांगला अभ्यास केला असेल.
तेच सूर्यवंशी घराण्यामध्ये गेले. असे देखील काही आहेत जे गृहस्थ व्यवहारामध्ये
राहत असताना अर्पणमय जीवन जगत आहे. खूप सेवा करत आहेत. फरक तर आहे ना. भले इथे
देखील राहतात परंतु दुसऱ्यांना शिकवू शकत नाहीत तर मग बाकीच्या इतर सेवेला लागतात.
शेवटी-शेवटी थोडा काळ राजाईचे पद घेतील. पाहिले जाते बाहेर गृहस्थ व्यवहारामध्ये
राहणारे शिकण्यामध्ये आणि शिकविण्यामध्ये खूप तीव्र (हुशार) बनतात. सगळेच काही
गृहस्थी नाही आहेत. कन्या किंवा कुमाराला गृहस्थी म्हणता येणार नाही; आणि जे
वानप्रस्थी आहेत ते साठी नंतर मग सर्व काही मुलांना देऊन स्वतः साधू इत्यादीं सोबत
जाऊन राहतात. आजकाल तर इतके तमोप्रधान आहेत त्यामुळे मरे पर्यंत सुद्धा धंदा
इत्यादीला सोडतच नाहीत. पूर्वी साठीमध्येच वानप्रस्थ अवस्थेमध्ये निघून जात होते.
बनारसमध्ये राहत होते. इथे तर मुलांना समजले आहे असे परत कधी कोणी जाऊ शकत नाही.
सद्गतीला प्राप्त करू शकत नाही.
बाबाच
मुक्ती-जीवनमुक्ती दाता आहेत. परंतु सर्वच काही जीवनमुक्तीला प्राप्त करत नाहीत.
कोणी तर मुक्तीमध्ये निघून जातात. आता आदि सनातन देवी-देवता धर्माची स्थापना होत आहे,
मग जो जितका पुरुषार्थ करेल. त्यामध्ये देखील कुमारींना चांगला चान्स आहे. त्या
पारलौकिक पित्याच्या वारस बनतात. इथे तर सर्व मुलांना बाबांकडून वारसा घेण्याचा
हक्क आहे. तिथे (या दुनियेमध्ये) तर मुलींना वारसा मिळत नाही. मुलांना लोभ असतो. भले
असे देखील आहेत जे समजतात की, हा देखील वारसा मिळेल, तो देखील घ्यावा, त्याला का
सोडावे. दोन्हीकडचे शिक्षण घेतात. असे तऱ्हे-तऱ्हेचे आहेत. आता हे तर समजतात की, जे
चांगला अभ्यास करतात ते उच्च पद घेतात. प्रजेमध्ये देखील अनेक श्रीमंत बनतात. इथे
राहणाऱ्यांना आतच राहावे लागते. दास-दासी बनतात. मग त्रेताच्या शेवटी फारफार तर
३-४-५ जन्म राजाई पद मिळेल, त्यापेक्षा तर ते श्रीमंत चांगले आहेत ते सतयुगापासून
त्यांची श्रीमंती कायम राहते. गृहस्थ व्यवहारामध्ये राहून श्रीमंताचे पद का घेऊ नये.
प्रयत्न करतात की आपण राजाई पद प्राप्त करावे. परंतु जर घसरले तर प्रजेमध्ये चांगले
पद मिळविण्याचा पुरुषार्थ केला पाहिजे. ते देखील उच्च पद तर झाले ना. इथे
राहणाऱ्यांपेक्षा बाहेर राहणारे जास्त उच्च पद प्राप्त करू शकतात. सर्व काही
पुरुषार्थावर अवलंबून आहे. पुरुषार्थ कधी लपून राहू शकत नाही. प्रजेमध्ये जो
मोठ्यात मोठा श्रीमंत बनेल, तो देखील लपून राहणार नाही. असे नाही की बाहेर
राहणाऱ्यांना काही कमी दर्जाचे पद मिळते. शेवटी राजाई पद मिळविणे चांगले की
प्रजेमध्ये सुरुवातीपासूनच उच्च पद मिळविणे चांगले? गृहस्थ व्यवहारामध्ये
राहणाऱ्यांना तितकीशी मायेची वादळे येत नाहीत. इथे राहणाऱ्यांना खूप वादळे येतात.
हिंमत करतात आपण शिवबाबांच्या शरणमध्ये (आश्रयाला) बसलो आहोत परंतु संग दोषामुळे
अभ्यास करत नाहीत. शेवटाला सर्व माहीत होते. साक्षात्कार होईल, कोण कोणते पद
प्राप्त करणार. अभ्यास नंबरवार करतात ना. कोणी तर स्वतःच सेंटर चालवतात. कुठे तर
सेंटर चालविणाऱ्या पेक्षाही शिकणारे हुशार होतात. सर्व काही पुरुषार्थावर आहे. असे
नाही की मायेची वादळे येतात. नाही. आपले वर्तन ठीक नाही आहे. श्रीमतावर चालत नाहीत
लौकिकमध्ये देखील असेच होते. टीचर अथवा आई-वडिलांच्या मतानुसार चालत नाहीत. तुम्ही
तर अशा पित्याची मुले बनले आहात ज्यांना कोणी पिताच नाहीये. तिथे तर खूपदा बाहेर
जावे लागते. बरीच मुले संग दोषामध्ये अडकतात त्यामुळे नापास होतात. मग असे का
म्हणावे की मायेची वादळे येतात. हा तर आपलाच मूर्खपणा आहे. डायरेक्शनप्रमाणे चालत
नाहीत. अशा वर्तनामुळे नापास होतात. अनेकांना लोभ असतो, कोणामध्ये क्रोध, कोणामध्ये
चोरीची सवय, परंतु शेवटी सर्व काही ठाऊक तर होतेच. अमके-अमके अशा प्रकारच्या
वर्तनामुळे निघून गेले. कळून येते शूद्र कुळाचे बनले. त्यांना मग ब्राह्मण म्हणणार
नाही. पुन्हा जाऊन शूद्र बनले. शिक्षण सोडून दिले. थोडे जरी ज्ञान ऐकले असेल तरी
प्रजेमध्ये येतील. झाड मोठे आहे. कुठून-कुठून निघून येतील. देवी-देवता धर्माचे इतर
धर्मामध्ये कन्व्हर्ट झालेले असतील ते निघून येतील. पुष्कळ येतील तेव्हा सर्वजण
आश्चर्यचकित होतील. बाकीच्या धर्माचे देखील मुक्तीचा वारसा तर घेऊ शकतात ना. इथे
कोणीही येऊ शकतात. आपल्या घराण्यामध्ये उच्च पद मिळवायचे असेल तर ते देखील येऊन
लक्ष्य घेऊन जातील. बाबांनी तुम्हाला साक्षात्कार घडवला होता की ते देखील येऊन
लक्ष्य घेऊन जातात. असे नाही की इथे राहूनच लक्ष्या मध्ये राहू शकाल. कोणत्याही
धर्माचा लक्ष्य घेऊ शकतो. लक्ष्य मिळते - बाबांची आठवण करा. शांतीधामची आठवण करा तर
आपल्या धर्मामध्ये उच्च पद प्राप्त करू शकाल. त्यांना जीवनमुक्ती तर मिळणार नाहीये,
आणि ते येणारही नाहीत. मनच लागणार नाही. खरे मन त्यांचे लागते जे इथले आहेत. अखेरीला
आत्मे आपल्या पित्याला तर ओळखतील. बऱ्याच सेंटर्सवर असे देखील आहेत ज्यांचे
अभ्यासावर लक्ष नाहीये. तर समजून येते उच्च पद प्राप्त करू शकणार नाहीत. जर निश्चय
असेल तर असे म्हणू शकत नाहीत की फुरसत नाही. परंतु भाग्यामध्येच नाहीये त्यामुळे
म्हणतात फुरसत नाही, हे काम आहे. भाग्यामध्ये असेल तर दिवस-रात्र पुरुषार्थ करायला
लागतील. चालता-चालता संगतीमुळे देखील खराब होतात. त्याला ग्रहचारी देखील म्हणू शकता.
बृहस्पतीची दशा बदलून मग मंगळाची दशा होते. कदाचित पुढे चालून उतरेल. काहीजणांसाठी
बाबा म्हणतात राहूची दशा बसली आहे. भगवंताचे देखील मानत नाहीत; समजतात की हे ब्रह्मा
सांगत आहेत. मुलांना हेच ठाऊक होत नाही की कोण आहेत जे डायरेक्शन देत आहेत.
देह-अभिमान असल्यामुळे साकारलाच (ब्रह्मा बाबांनाच) डायरेक्शन देणारे आहेत असे
समजतात. देही-अभिमानी असतील तर समजतील की शिवबाबा जे काही सांगत आहेत ते आपल्याला
करायचे आहे. जबाबदारी शिवबाबांवर आहे. शिवबाबांच्या मतावर चालले तर पाहिजे ना.
देह-अभिमानामध्ये आल्याने शिवबाबांना विसरून जातात तर मग शिवबाबा जबाबदार राहू शकत
नाहीत. त्यांचा आदेश तर मस्तकी धारण केला पाहिजे. परंतु समजत नाहीत की कोण सांगत
आहेत. तेही अजून दुसरी तर कोणती ऑर्डर करत नाहीत; बाबा फक्त एवढेच सांगतात की, मी
तुम्हाला श्रीमत देत आहे. एक तर माझी आठवण करा आणि जे ज्ञान मी ऐकवत आहे ते धारण करा
आणि इतरांकडूनही करवून घ्या. बस्स, हाच धंदा करा. ठीक आहे बाबा जो हुकूम. राजांसमोर
जे असतात ते असे म्हणतात - ‘जो हुकूम’. ते राजे हुकूम करत होते. हा शिवबाबाचा हुकूम
आहे. वारंवार म्हटले पाहिजे - “जो हुकूम शिवबाबा” तर तुम्हाला आनंद देखील वाटेल.
समजाल शिवबाबा हुकूम देत आहेत. शिवबाबांची आठवण राहिली तर बुद्धीचे कुलूप उघडेल.
शिवबाबा म्हणतात ही सवय लागली पाहिजे तर बेडा पार होईल. परंतु हेच अवघड आहे.
वारंवार विसरून जातात. असे कशाला म्हटले पाहिजे की माया विसरायला लावते. स्वतः
विसरतात म्हणून उलटी कामे होत राहतात.
अशा बऱ्याच मुली आहेत,
ज्ञान तर खूप चांगले देतात परंतु योग नाही, ज्यामुळे विकर्म विनाश होतील. अशी खूप
चांगली-चांगली मुले आहेत, परंतु योग बिल्कुल नाही आहे. वर्तनावरून समजून येते -
योगामध्ये राहत नाहीत आणि मग पापे राहून जातात जी मग भोगावी लागतात. यामध्ये
वादळांचा तर प्रश्नच नाही. असेच समजा की, ही माझी चूक आहे, मी श्रीमतावर चालत नाही.
इथे तुम्ही आला आहात राजयोग शिकण्याकरिता. प्रजा योग शिकवला जात नाही. माता-पिता तर
आहेतच. त्यांना फॉलो करा तर तुम्ही कधी गद्दीनशीन (सिंहासनधारी) बनाल. यांचे तर
निश्चित आहे ना. हे लक्ष्मी-नारायण बनतात तर फालो मदर-फादर. इतर धर्माचे मदर-फादरला
फॉलो करत नाहीत. ते तर फादरलाच मानतात. इथे तर दोघेही आहेत. गॉड तर आहेत क्रियेटर.
मदरचे मग गुप्त रहस्य आहे. आई-वडील शिकवत राहतात, समजावून सांगतात की, असे करू नको,
असे कर. टीचर देखील सजा देतील तर स्कूलमध्ये सर्वांसमोर देतील ना. मुलगा असे थोडेच
म्हणेल की माझी इज्जत घालवता. वडील ५-६ मुलांसमोर थप्पड मारतील. तर मुलगा असे थोडेच
म्हणेल की ५-६ जणांच्या पुढे का मारली. नाही. इथे तर मुलांना शिकवण दिली जाते तरी
देखील चालू शकत नाहीत तर मग ठीक आहे गृहस्थ व्यवहारामध्ये राहून पुरुषार्थ करा. जर
इथे राहून डिससर्व्हीस कराल तर जे काही थोडे जमा झाले असेल ते देखील नष्ट होईल.
शिकायचे नसेल तर सोडून द्या. बस्स, मी चालू शकत नाही. निंदा कशाला करायची. असंख्य
मुले आहेत. कोणी शिकतील कोणी सोडून देतील. प्रत्येकाने आपल्या अभ्यासामध्ये मस्त
राहिले पाहिजे.
बाबा म्हणतात -
दुसऱ्यांकडून सेवा घेऊ नका. कोणताही अहंकार येता कामा नये. दुसऱ्याकडून सेवा करून
घेणे हा देखील अहंकार आहे. बाबांना सांगावे तर लागेल ना. नाहीतर जेव्हा ट्रिब्युनल
बसेल तेव्हा म्हणतील - कायदे कानून विषयी आम्हाला थोडेच माहीत होते म्हणून बाबा
आधीच समजावून सांगत आहेत नंतर मग साक्षात्कार करवून सजा देतील. बिना पुरावा सजा
थोडीच मिळू शकते. कल्पापूर्वी प्रमाणे चांगले तर खूप सांगतात. प्रत्येकाचे भाग्य
पाहिले जाते. काहीजण सेवा करून आपले जीवन हिऱ्या समान बनवतात, तर काहीजण असे आहेत
जे भाग्याला लकीर लावतात. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) पिता, टीचर,
सद्गुरुद्वारे जी शिकवण मिळते त्यावर चालायचे आहे. मायेला दोष न देता आपल्यातील
कमी-कमजोरींची तपासणी करून त्याला काढून टाकायचे आहे.
२) अहंकाराचा त्याग
करून आपल्या अभ्यासामध्ये मग्न राहायचे आहे. कधीही इतरांकडून सेवा घ्यायची नाही.
संगदोषापासून खूप-खूप जपून राहायचे आहे.
वरदान:-
संकल्पाच्या
इशाऱ्या द्वारे सर्व कारभार चालविणारे सदा लाईटचे ताजधारी भव
जी मुले नेहमी लाईट (हलके)
राहतात त्यांचा संकल्प अथवा वेळ कधीही व्यर्थ जात नाही. तोच संकल्प उत्पन्न होतो जे
होणार आहे. जसे बोलून गोष्ट स्पष्ट करतात तसेच संकल्पा द्वारे सगळा कारभार चालतो.
जेव्हा अशी विधी धारण कराल तेव्हा हे साकार वतन सूक्ष्म वतन बनेल. याकरिता
सायलेंन्सची शक्ती जमा करा आणि लाईटचे ताजधारी होऊन रहा.
बोधवाक्य:-
या दुःखधाम
पासून किनारा करा (दूर रहा) तर कधीही दुःखाची लाट येऊ शकणार नाही.
हे अव्यक्त इशारे -
“निश्चयाच्या फाउंडेशनला मजबूत करून सदैव निर्भय आणि निश्चिंत रहा”
जशी कार मधील बॅटरी
जेव्हा थोडी लूज होते, कार आपणहून चालत नाही तेव्हा इतरांना थोडा धक्का मारायला
लावतात, अगदी तसेच ज्यापण आत्म्यामध्ये तुमचा विश्वास आहे आणि वाटेल की यांच्याकडून
आपल्याला मदत मिळू शकते तर त्यांच्याकडून थोडासा सहयोग घेऊन पुढे गेले पाहिजे.
कमजोरीच्या गोष्टीचा जास्त विचार करू नका तेव्हाच आनंदामध्ये पुढे जात रहाल.