26-05-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - सदैव याच आनंदात रहा की स्वयं भगवान आम्हाला टीचर बनून शिकवत आहेत, आम्ही त्यांच्याकडून राजयोग शिकत आहोत, प्रजायोग नाही”

प्रश्न:-
या अभ्यासाची खासियत कोणती आहे? तुम्हाला हा पुरुषार्थ किती काळ करायचा आहे?

उत्तर:-
हा अभ्यास जे बऱ्याच काळापासून करत आले आहेत, त्यांच्यापेक्षाही नवीन मुले वेगाने पुढे निघून जातात. ही देखील एक खासियत आहे जी ३ महिन्याची तीक्ष्ण बुध्दीवाली (तीव्र पुरुषार्थी) नवीन मुले जुन्या मुलांपेक्षाही पुढे जाऊ शकतात. जोपर्यंत तुम्ही पूर्ण पास होत नाही, कर्मातीत अवस्था होत नाही, सर्व हिशोब चुकता होत नाही तोपर्यंत तुम्हाला पुरुषार्थ करायचा आहे.

ओम शांती। मुले कुठे बसली आहेत? बेहदच्या बाबांच्या पाठशाळेमध्ये. मुलांना अतिउच्च नशा असला पाहिजे! कोणाच्या मुलांना? बेहदच्या बाबांच्या मुलांना अथवा रूहानी मुलांना. बाबा ‘आत्म्यांना’च शिकवतात. ‘गुजराती’ अथवा ‘मराठी’ वाल्यांना शिकवत नाहीत. ते तर नाव-रूप झाले. बाबा शिकवतातच मुळी आत्म्यांना. तुम्ही मुले देखील समजता आमचे बेहदचे बाबा तेच आहेत, ज्यांना ‘भगवान’ म्हटले जाते. ‘भगवानुवाच’, देखील आहे जरूर, परंतु भगवान कोणाला म्हटले जाते - हेच समजत नाहीत. म्हणतात देखील - ‘शिव परमात्माय नमः’. परमात्मा तर एकच आहेत. ते सर्वोच्च निराकार आहेत. तुम्हाला श्रीकृष्ण भगवान शिकवत नाहीत आणि ना कधी शिकवले होते. तुम्ही जाणता आम्हा आत्म्यांचे पिता आम्हाला शिकवत आहेत. भगवान तर निराकारच आहेत. शिवाच्या मंदिरात जातात, त्यांची पूजा देखील करतात, तर जरूर काही वस्तू तर आहे. नावा-रूपापासून न्यारी कोणती वस्तू थोडीच असते? हे देखील तुम्ही आत्ता समजता. साऱ्या दुनियेमध्ये हे कोणीही जाणत नाही. तुम्ही देखील आता समजू लागले आहात. बऱ्याच काळापासून जाणता. असे देखील नाही की, बऱ्याच काळापासून येणाऱ्यांपेक्षा नवीन येणारे तीव्र गतीने जाऊ शकत नाहीत. ही देखील खासियत आहे. ३ महिन्यांची नवीन मुले देखील खूप हुशार असू शकतात. म्हणतात - ‘बाबा, या आत्म्याची बुद्धी खूप तल्लख आहे’. नवीन मुले जेव्हा हे ज्ञान ऐकतात तेव्हा खूप गदगद् होतात. आहेत तर सर्व गॉडली स्टुडंट. निराकार बाबा ज्ञानाचे सागर शिकवत आहेत. ‘भगवानुवाच’, देखील गायले गेले आहे. परंतु केव्हा? ते मात्र विसरून गेले आहेत.

आता तुम्ही मुले जाणता - असे देखील कोणी असतात, ज्यांचे वडील टीचर असतात. परंतु ते फक्त एकच विषय शिकवतील, दुसरा विषय दुसरे टीचर शिकवतील. इथे तर बाबा सर्व मुलांचे टीचर आहेत. ही आश्चर्याची गोष्ट आहे. भरपूर मुले आहेत, ज्यांना निश्चय आहे की, शिवबाबा आम्हाला शिकवत आहेत. श्रीकृष्णाला काही ‘बाबा’ म्हणू शकत नाही. श्रीकृष्णाला असे बाबांसारखे टीचर, गुरु देखील कोणी समजणार नाही. हे तर प्रत्यक्षात शिकवत आहेत. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे स्टुडंट्स बसले आहात. बाबा टीचर तुम्हाला तुम्ही पास होईपर्यंत शिकवतात. कर्मातीत अवस्थेला प्राप्त करेपर्यंत पुरुषार्थ करायचा आहे. कर्मांच्या हिशोबातून मुक्त व्हायचे आहे. तुम्हाला आतून खूप आनंद झाला पाहिजे - बाबा आम्हाला अशा दुनियेमध्ये घेऊन जात आहेत; दुसऱ्या कोणत्या अशा शाळा नसतील की जिथे मुले बसली आहेत आणि समजतील की, परमधाम निवासी बाबा येऊन आम्हाला शिकवतील. आता तुम्ही इथे बसले आहात तर समजता की, आमचे बेहदचे बाबा आम्हाला शिकविण्याकरिता येतात. तर आतून खूप आनंद झाला पाहिजे. बाबा आम्हाला राजयोग शिकवत आहेत. हा राजयोग आहे, प्रजायोग नाही. या आठवणीनेच मुलांच्या आनंदाचा पारा चढला पाहिजे. किती मोठी परीक्षा आहे आणि तुम्ही किती सामान्य पद्धतीने बसला आहात. जसे मुसलमान लोक मुलांना सतरंजीवर बसवून शिकवतात. तुम्ही या निश्चयाने इथे येता. आता बाबांच्या सन्मुख बसला आहात. बाबा देखील म्हणतात - ‘मी ज्ञानाचा सागर आहे’. मी कल्प-कल्प येऊन राजयोग शिकवतो. श्रीकृष्णाचे ८४ जन्म म्हणा अथवा ब्रह्माचे ८४ जन्म म्हणा, गोष्ट एकच आहे. ब्रह्मा सो श्रीकृष्ण आहे. हे बुद्धीत चांगल्या प्रकारे धारण करायचे आहे. बाबांवर खूप प्रेम असायला हवे. आपण आत्मे त्या पित्याची संतान आहोत, परमपिता परमात्मा येऊन आम्हाला शिकवत आहेत. श्रीकृष्ण तर असू शकत नाही. असे थोडेच श्रीकृष्णाने शिकवले असेल? मुकुट वगैरे काढून आला असेल! आता शिकवणारा तर वृद्ध (अनुभवी) पाहिजे. बाबा म्हणतात - ‘मी वृध्द शरीर घेतले आहे, हे फिक्स (निश्चित) आहे’. शिवबाबा ब्रह्मा द्वारेच शिकवतात. म्हणतात देखील - खरोखर, परमपिता परमात्मा ब्रह्माद्वारे स्थापना करतात. आता ब्रह्मा कुठून आले, हेच समजत नाहीत. बाबा बसून वेळोवेळी मुलांना जागे करतात. मग माया पुन्हा झोपवते. आता तुम्ही सन्मुख बसले आहात, समजता की, मी तुमचा रुहानी पिता आहे. मला ओळखता ना! गातात देखील - परमपिता परमात्मा ज्ञानाचा सागर आहेत, पतित-पावन, दुःख हर्ता, सुख कर्ता आहेत. श्रीकृष्णासाठी असे कधी म्हणणार नाहीत. सर्वांना एकत्र तर शिकवू शकत नाही. मधुबनमध्ये मुरली चालते ती मग सर्व सेंटर्सवर जाते. तुम्ही आता सन्मुख आहात. जाणता की, कल्पापूर्वी देखील बाबांनी असे शिकवले होते. हीच वेळ होती जी आता भूतकाळ झाली आहे. आता पुन्हा ती वर्तमान काळ होणार आहे. भक्तीमार्गातील गोष्टी तर आता सोडून द्यायच्या आहेत. आता तुमचे ज्ञानावर प्रेम आहे आणि शिकविणाऱ्यावर प्रेम आहे. काहीजण टीचर कडून जेव्हा शिकतात तेव्हा त्यांना सौगात (भेटवस्तू) देतात. हे बाबा तर स्वतःच सौगात देतात. इथे येऊन मुलांना साकार रूपात बघतात, ही माझी मुले आहेत. मुलांना हे देखील ज्ञान आहे - सर्वच काही ८४ जन्म घेत नाहीत. कोणाचा एक जन्म असला तरी देखील त्यात सुख-दुःखातून जातील. आता तुम्हाला या सर्व गोष्टी समजल्या आहेत. हा मनुष्य सृष्टीचा सिजरा (वंश-वृक्ष) आहे. पहिल्या नंबरला आहेत ब्रह्मा-सरस्वती, आदि देव, आदि देवी. नंतर मग अनेक धर्म होतात. ते आहेत सर्व आत्म्यांचे बीज. बाकी सर्व आहेत पाने. प्रजापिता ब्रह्मा सर्वांचा पिता आहे. यावेळी प्रजापिता हजर आहे. हे बसून शूद्रा पासून कन्व्हर्ट करून (परिवर्तन करून) ब्राह्मण बनवतात. असे कोणीही करू शकणार नाही. बाबाच तुम्हाला शूद्र पासून ब्राह्मण बनवून मग देवता बनविण्यासाठी शिकवत आहेत. हे आहेच सहज राजयोगाचे शिक्षण. राजा जनकने देखील सेकंदामध्ये जीवनमुक्ती प्राप्त केली अर्थात स्वर्गवासी बनला. मनुष्य गात तर राहतात परंतु तरी देखील समजावून सांगू शकत नाहीत. आता बाबा म्हणतात - ‘मुलांनो, देही-अभिमानी बना. तुम्ही अशरीरी आला होतात, मग शरीर घेऊन पार्ट बजावला. बरोबर ८४ जन्म घेतले आहेत. बाबा जे सत्य आहेत, ते केवळ सत्यच सांगतील. राजधानी झाली ना. राजयोग काही कोणी एकटा थोडाच शिकेल. तुम्ही सर्वजण आता काट्यापासून फूल बनत आहात. काटा आणि फूल कशाला म्हणतात, हे देखील आता तुम्ही समजत आहात. ही आहे छी-छी काट्यांची दुनिया. आम्ही ८४ जन्मांचे चक्र फिरून नरकवासी बनलो आहोत. वर्ल्डची हिस्ट्री-जिओग्राफी आम्ही पुन्हा रिपीट करणार. आम्ही पुन्हा स्वर्गवासी जरूर बनणार. कल्प-कल्प आम्हीच बनतो. घडोघडी हीच आठवण करायची आहे आणि नॉलेज समजावून सांगायचे आहे. हे लक्ष्मी-नारायण सूर्यवंशी होते. क्राईस्ट जेव्हा आला तेव्हा सुरुवातीला त्यांची जनसंख्या फार थोडी होती, राजधानी नव्हती. आता बाबा येऊन सतयुगी राजधानी स्थापन करत आहेत. स्थापना होतेच मुळी संगमावर. आता तुमच्या बुद्धीमध्ये आहे की हा आहे खरा-खरा कुंभमेळा. आत्मे अनेक आहेत, परमात्मा एक आहे. परमात्मा पिता, मुलांकडे येतात पावन बनविण्याकरिता. यालाच संगम युगाचा कुंभमेळा म्हटले जाते. आता तुम्हाला ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे. बाबा येऊन स्वर्गवासी बनवितात तर मग नरक, जुन्या दुनियेचा विनाश जरूर झाला पाहिजे. कल्प-कल्प विनाश होतच आहे. नवी सो जुनी, जुनी सो नवी होत राहते. हे तर जरूर होणार. नव्याला स्वर्ग, जुन्याला नरक म्हटले जाते. आता तर किती लोकसंख्येची वृद्धी होत जाते. धान्य मिळत नाही तर समजतात आम्ही मोठ्या प्रमाणात धान्य पिकवू, परंतु मुलांचा जन्मदर किती वाढत आहे. एवढे अन्न-धान्य कुठून आणणार.

आता तुम्हा मुलांना ही खात्री आहे की, ही सर्व जुनी दुनिया नष्ट होणार आहे. लोकांना हे ज्ञान चांगले देखील वाटते परंतु डोक्यात काहीच जात नाही. तुमच्या बुद्धीमध्ये आहे नरकानंतर स्वर्ग येणार. सतयुगातील देवी-देवता होऊन गेले आहेत, हे लक्ष्मी-नारायण भारताचे मालक होते, चित्रं आहेत. सतयुगामध्ये आहे आदि सनातन देवी-देवता धर्म. आता स्वतःला देवता धर्माचे म्हणू शकत नाहीत, त्या ऐवजी हिंदू म्हणतात. मुले चांगल्या रीतीने जाणतात की आम्ही हे (देवी-देवता) बनत आहोत. बाबा आम्हाला शिकवत आहेत, या ऑर्गन्स द्वारे (ब्रह्मा तना द्वारे). बाबा म्हणतात - ‘नाहीतर मी तुम्हाला शिकवणार कसा’. आत्म्यांनाच शिकवतो कारण आत्म्यामध्येच भेसळ पडते. आता तुम्हाला खरे सोने बनायचे आहे, गोल्डन एज्ड मधून सिल्व्हर एज्ड मध्ये आलात अर्थात चांदीची भेसळ पडल्याने तुम्ही चंद्रवंशी बनता. सतयुगामध्ये गोल्डन एज्ड होता, तेच मग खाली उतरतात आणि मग वृद्धी देखील होत जाते. आता तुमच्या बुद्धीमध्ये आहे आम्ही गोल्डन, सिल्व्हर, कॉपर, आयर्नमध्ये ८४ चे चक्र फिरून आलो आहोत. अनेकदा हा पार्ट बजावला आहे, या पार्ट मधून कोणीही सुटू शकत नाही. ते (दुनियावाले) म्हणतात - आम्हाला मोक्ष हवा; परंतु खरेतर त्रस्त तुम्हाला व्हायला हवे. ८४ चा फेरा तर तुम्ही मारला आहे. मनुष्य तर समजतात येणे आणि जाणे होतच राहते, तर यापासून का नाही आपण सुटावे. परंतु हे तर होऊ शकत नाही. गुरु लोक देखील म्हणतात - तुम्ही मोक्ष प्राप्त कराल. ‘ब्रह्म’ची आठवण करा म्हणजे ‘ब्रह्म’मध्ये लीन व्हाल. भारतामध्येच अनेक मत-मतांतरे आहेत इतर कोणत्याही खंडामध्ये इतकी नाही आहेत. अनेकानेक मते आहेत, एकाचे मत दुसऱ्याशी मेळ खात नाही. रिद्धी-सिद्धी देखील खूप शिकतात. कोणी केसर काढतात कोणी काय… यातच मनुष्य खूप खुश होतात. हे तर आहे स्पिरिच्युअल नॉलेज (अध्यात्मिक ज्ञान). तुम्ही जाणता - स्पिरिचुअल फादर आम्हा आत्म्यांचे पिता आहेत. रुहानी बाबा आत्म्यांशी बोलतात. येऊन सत्यनारायणाची कथा ऐकवतात अथवा अमरकथा ऐकवतात ज्याद्वारे अमर लोकचे मालक बनवितात, नरापासून नारायण बनवितात. आणि नंतर मग तुम्ही कवडी समान बनता. आता तुम्हाला हिऱ्यासमान अनमोल जन्म मिळाला आहे तर मग कवड्यांच्या मागे वाया का घालवता. ही दुनियाच कितीसा काळ टिकणार आहे. किती भांडण-तंटे होत राहतात. सर्व नष्ट होतील. मृत्यू समोर उभा आहे मग इतके लाखो करोडो कोण बसून खाणार. तर का नाही याला सफल केले पाहिजे! हे रुहानी कॉलेज उघडल्याने मनुष्य एव्हरहेल्दी, वेल्दी, हॅपी (निरोगी, समृद्ध आणि आनंदी) बनतात. तरी देखील हे हॉस्पिटल आणि युनिव्हर्सिटी कंबाइंड आहे. हेल्थ, वेल्थ, हॅपिनेस तर आहेच. खरोखर, योगाने आयुष्य देखील वाढते. तुम्ही किती हेल्दी बनता, शिवाय कुबेराचा खजिना देखील मिळतो. अल्लाह-अवलदीनचे नाटक दाखवतात ना. तुम्ही जाणता अल्लाह जे आदि सनातन देवी-देवता धर्म स्थापन करतात, तिथे भरपूर सुख आहे. नावच आहे - स्वर्ग. तुम्ही शांतीधामचे रहिवासी होता, त्यानंतर मग तुम्ही सर्वात पहिले सुख-धाममध्ये आलात आणि मग ८४ जन्म घेत खाली घसरत आला आहात. कल्प-कल्प मी तुम्हा मुलांना असे बसून समजावून सांगतो. तुम्ही आपल्या जन्मांना जाणत नाही, मी तुम्हाला सांगतो. तुम्ही ८४ जन्म घेतले आहेत, हे शरीर पतित आहे. आत्मा देखील तमोप्रधान बनली आहे. बाबा राईट तेच सांगतात. बाबा कधीच चुकीचे सांगणार नाहीत. ते आहेतच सत्य. सतयुग आहेच वाईसलेस वर्ल्ड, रायटीयस दुनिया (निर्विकारी दुनिया, धर्मनिष्ठ दुनिया). मग रावण अनराइटियस (अधर्मी) बनवतो. हा आहेच झूठ खंड. गातात देखील - ‘झुठी माया, झुठी काया, झूठा सब संसार…’ कोणता संसार? हा सर्व जुना संसार खोटा आहे. सतयुगामध्ये खरा संसार होता. दुनिया एकच आहे, दोन दुनिया नाही आहेत. नवीन दुनिया मग जुनी बनते. नवीन घर आणि जुने घर यामध्ये फरक तर असतो. नवीन घर बनून तयार होते तेव्हा समजतात की, आता नवीन घरी जाऊन राहणार. इथे देखील मुलांसाठी नवीन घरे बनवतात, मुलांची संख्या वाढत जाईल. तुम्हा मुलांना तर खूप आनंद झाला पाहिजे. बाबा म्हणतात - मज ज्ञानसागराची मुले सर्वजण काम-चितेवर बसून बिचारे एकदम जळून गेले आहेत. आता बाबा पुन्हा त्यांना ज्ञान-चितेवर बसवत आहेत. ज्ञान-चितेवर बसवून स्वर्गाचे मालक बनवतात. काम-चितेवर बसल्याने एकदमच काळे बनले आहेत. श्रीकृष्णाला श्याम-सुंदर नाव दिले आहे, परंतु कोणीही त्याचा अर्थ समजू शकत नाहीत. आता तुम्ही कशापासून काय बनत आहात! बाबा कवडीपासून हिऱ्यासमान बनवत आहेत, तर मग इतके अटेंशन दिले पाहिजे. बाबांची आठवण केली पाहिजे. आठवणीनेच तुम्ही स्वर्गाचे मालक बनाल. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) या हिरे तुल्य अनमोल जीवनाला कवड्यांच्या मागे गमवायचे नाही. मृत्यू समोर उभा आहे त्यामुळे आपले सर्व काही रूहानी सेवेमध्ये सफल करायचे आहे.

२) शिक्षण आणि शिकविणाऱ्यावर खरे-खरे प्रेम करायचे आहे. स्वयं भगवान आम्हाला शिकविण्याकरिता येतात, याच आनंदामध्ये राहायचे आहे.

वरदान:-
कॅचिंग पॉवर द्वारे आपल्या खऱ्या संस्कारांना कॅच करून त्याचे स्वरूप बनणारे शक्तिशाली भव

पुरुषार्थाचा मुख्य आधार कॅचिंग पॉवर आहे. जसे वैज्ञानिक खूप पूर्वी रेकॉर्डिंग केलेल्या साऊंडला कॅच करतात, त्याचप्रमाणे तुम्ही सायलेन्सच्या शक्तीद्वारे आपले आदि दैवी संस्कार कॅच करा; यासाठी नेहमी हीच स्मृती रहावी की, मी हाच होतो आणि आता पुन्हा बनत आहे. जितके त्या संस्कारांना कॅच कराल तितके त्याचे स्वरूप बनाल. ५ हजार वर्षांची गोष्ट इतकी स्पष्ट अनुभव होईल की जशी कालचीच गोष्ट आहे. आपल्या स्मृतीला इतके श्रेष्ठ आणि स्पष्ट बनवा तेव्हाच शक्तिशाली बनाल.

बोधवाक्य:-
ब्राह्मण जीवनाचा श्वास आनंद आहे, शरीर भले नष्ट होवो, परंतु आनंद जाऊ नये.

हे अव्यक्त इशारे - सदैव अचल, अडोल एकरस स्थितीचा अनुभव करा.

एकाच झटक्यात सौदा करणारे एकाचेच असल्या कारणाने नेहमी एकरस राहतात. बाकी जे थोडे-थोडे करून सौदा करतात - एका ऐवजी दोन नौकेमध्ये पाय ठेवणारे असतात, ते नेहमी कोणत्या ना कोणत्या समस्येमुळे अशांतीमध्ये राहतात, त्यामुळे ते एकरस राहू शकत नाहीत; म्हणून सौदा करायचा असेल तर सेकंदामध्ये करा. हृदयाचे तुकडे-तुकडे करू नका.