26-06-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“ गोड मुलांनो - सदैव या नशेमध्ये रहा की आपले पद्मा-पदम भाग्य आहे, जी पतित-पावन पित्याची आपण संतान बनलो आहोत, त्यांच्याकडून आपल्याला बेहद सुखाचा वारसा मिळतो’’

प्रश्न:-
तुम्हा मुलांना कोणत्याही धर्मा विषयी घृणा अथवा तिरस्कार वाटू शकत नाही - असे का?

उत्तर:-
कारण तुम्ही बीज आणि झाडाला जाणता. तुम्हाला माहित आहे हे मनुष्य सृष्टी रुपी बेहदचे झाड आहे यामध्ये प्रत्येकाचा आपला-आपला पार्ट आहे. नाटकामध्ये ॲक्टर्स कधीही एकमेकांची घृणा करणार नाहीत. तुम्ही जाणता आपण या नाटकामध्ये हिरो-हिरॉईनचा पार्ट बजावला. आपण जे सुख पाहिले ते इतर कोणी पाहू शकत नाही. तुम्हाला अथाह खुशी आहे की संपूर्ण विश्वावर राज्य करणारे आपणच आहोत.

ओम शांती।
‘ओम् शांती’ म्हटल्याबरोबर लगेचच मुलांना जे नॉलेज मिळाले आहे, ते सारे बुद्धीमध्ये आले पाहिजे. बाबांच्या बुद्धीमध्ये देखील कोणते नॉलेज आहे? हे मनुष्य सृष्टी रुपी झाड आहे, ज्याला कल्पवृक्ष देखील म्हणतात, त्याची उत्पत्ती, त्याची पालना आणि मग विनाश कसा होतो, सर्व बुद्धीमध्ये आले पाहिजे. ज्याप्रमाणे ते जड झाड असते, हे आहे चैतन्य. बीज देखील चैतन्य आहे. त्यांची महिमा देखील गातात, ते सत्य आहेत, चैतन्य आहेत, अर्थात झाडाचे आदि-मध्य-अंताचे रहस्य समजावून सांगतात. बाकी कोणीही त्यांच्या ऑक्युपेशनला (जीवन चरित्राला) जाणत नाहीत. प्रजापिता ब्रह्माच्या ऑक्युपेशनला देखील जाणले पाहिजे ना. ब्रह्माची कोणी आठवण करत नाही कारण जाणतच नाहीत. अजमेरमध्ये ब्रह्माचे मंदिर आहे. त्रिमूर्ती चित्र छापतात, त्यामध्ये ब्रह्मा, विष्णू, शंकर आहेत. ‘ब्रह्मा देवताय नमः’ म्हणतात. आता तुम्ही मुले जाणता - यावेळी ब्रह्माला देवता म्हटले जात नाही. जेव्हा संपूर्ण बनतील तेव्हा देवता म्हटले जाईल. संपूर्ण बनून निघून जातात सूक्ष्म वतनमध्ये.

बाबा म्हणतात - तुमच्या पित्याचे नाव काय आहे? हे कोणाला विचारत आहेत? आत्म्याला. आत्मा म्हणते - ‘माझे बाबा’. ज्यांना माहित नाही की कोणी म्हटले, तर ते मग प्रश्न विचारू शकणार नाहीत. आता मुलांना समजले आहे - खरोखर, सर्वांचे दोन पिता आहेत. ज्ञान तर एक बाबाच देतात. आता तुम्ही मुले समजत असाल हा शिवबाबांचा रथ आहे. बाबा या रथाद्वारे आम्हाला हे ज्ञान ऐकवतात. एकतर हा आहे जिस्मानी ब्रह्मा बाबांचा रथ. दुसरा मग रुहानी बाबांचा रथ आहे. त्या रूहानी बाबांची महिमा आहे - ‘सुखाचा सागर, शांतीचा सागर…’. पहिले हे तर बुद्धीमध्ये राहील की, हे बेहदचे पिता आहेत ज्यांच्या द्वारे बेहदचा वारसा मिळतो. पावन दुनियेचे मालक बनतो. निराकारला बोलावतात - ‘पतित-पावन या’. आत्माच बोलावते. जेव्हा आत्मा पावन आहे तेव्हा बोलावत नाहीत, पतित असतात तेव्हा बोलावतात. आता तुम्ही आत्मे जाणता की, ते पतित-पावन बाबा या तनामध्ये आले आहेत. हे विसरायचे नाही की, आपण त्यांचे बनलो आहोत. हे सौभाग्यच काय परंतु पद्मभाग्याची गोष्ट आहे. तर मग त्या बाबांना विसरायचे कशासाठी. आता यावेळी बाबा आलेले आहेत - ही नवीन गोष्ट आहे. शिवजयंती देखील प्रत्येक वर्षी साजरी केली जाते. तर जरूर ते एकदाच येतात. लक्ष्मी-नारायण सतयुगामध्ये होते. आता यावेळी नाही आहेत. तर स्पष्ट करून सांगितले पाहिजे त्यांनी पुनर्जन्म घेतला असेल. १६ कला पासून १२-१४ कलेमध्ये आले असतील. हे तुमच्या व्यतिरिक्त इतर कोणीही जाणत नाही. सतयुग म्हटले जाते नवीन दुनियेला. तिथे सर्व काही नवीनच नवीन आहे. ‘देवता धर्म’ नाव देखील प्रसिद्ध आहे. तेच देवता जेव्हा वाममार्गामध्ये जातात तर मग त्यांना नवीन देखील म्हणू शकत नाही आणि देवता देखील म्हणू शकत नाही. कोणीही असे म्हणणार नाहीत की आम्ही त्यांच्या वंशावळीचे आहोत. जर स्वतःला त्या वंशावळीचे समजले असते तर मग त्यांची महिमा आणि आपली निंदा का केली असती? जर महिमा करतात तर जरूर त्यांना पवित्र, स्वतःला अपवित्र पतित समजतात. पावन पासून पतित बनतात, पुनर्जन्म घेतात. सर्व प्रथम जे पावन होते तेच मग पतित बनले आहेत. तुम्ही जाणता - आपण पावन पासून आता पतित बनलो आहोत. तुम्ही शाळेमध्ये शिकत आहात, त्यामध्ये नंबरवार फर्स्ट, सेकंड, थर्ड क्लास तर असतात.

आता मुले समजतात आपल्याला बाबा शिकवत आहेत, म्हणूनच ते येतात ना. नाहीतर इथे येण्याची गरजच काय? हे (ब्रह्मा बाबा) काही कोणी गुरु, महात्मा, महापुरुष इत्यादी नाही आहेत. हे तर साधारण मनुष्य तन आहे, ते देखील खूप जुने आहे. अनेक जन्मांच्या अंतामध्ये प्रवेश करतो. बाकीतर यांची कोणती महिमा नाहीये फक्त यांच्यामध्ये प्रवेश करतो तेव्हा यांचे नाव होते. नाही तर प्रजापिता ब्रह्मा कुठून आले. मनुष्य गोंधळून तर जातात ना. बाबांनी तुम्हाला समजावून सांगितले आहे तेव्हाच तर तुम्ही इतरांना समजावून सांगता. ब्रह्माचे पिता कोण आहेत? ब्रह्मा, विष्णू, शंकर यांचे रचयिता हे शिवबाबा आहेत. बुद्धी वर (परमधाममध्ये) निघून जाते. परमपिता परमात्मा जे परमधाममध्ये वास करतात, त्यांची ही रचना आहे. ब्रह्मा, विष्णू, शंकराचे ऑक्युपेशन वेगळे आहे. कोणी एकत्र तीन-चार लोक असले तरीही सर्वांचे ऑक्युपेशन वेग-वेगळे असते. प्रत्येकाचा पार्ट आपला-आपला आहे. इतके करोडोंनी आत्मे आहेत - एकाचा पार्ट दुसऱ्याशी मेळ खाऊ शकत नाही. या वंडरफुल गोष्टी समजल्या जातात. किती भरमसाठ मनुष्य आहेत. आता चक्र पूर्ण होते. अंत आहे ना. सर्व परत जातील, पुन्हा चक्र रिपीट होणार आहे. बाबा या सर्व गोष्टी भिन्न-भिन्न प्रकारे समजावून सांगत राहतात, काही नवीन गोष्ट नाहीये. म्हणतात - कल्पापूर्वी देखील समजावून सांगितले होते. बाबा खूप सुंदर आहेत, अशा बाबांची तर खूप प्रेमाने आठवण केली पाहिजे. तुम्ही देखील बाबांची लाडकी मुले आहात ना. बाबांची आठवण करत आले आहात. आधी सर्वजण एकाची पूजा करत होते. भेदभावाची गोष्ट नाही. आता तर किती भेदभाव आहे. हे रामाचे भक्त आहेत, ते कृष्णाचे भक्त आहेत. रामाचे भक्त धूप जाळतात तर कृष्णाचे भक्त नाक बंद करतात. अशा देखील काही गोष्टी शास्त्रांमध्ये आहेत. ते म्हणतील आमचा भगवान मोठा, हे म्हणतील आमचा मोठा, भगवान दोन आहेत असे समजतात. तर चुकीचे असल्या कारणामुळे सर्व अनराटीयस (अनैतिक) कृत्येच करतात.

बाबा समजावून सांगत आहेत - मुलांनो, भक्ती भक्ती आहे, ज्ञान ज्ञान आहे. ज्ञानाचा सागर एक बाबाच आहेत. बाकी ते सर्व आहेत भक्तीचे सागर. ज्ञानाद्वारे सद्गती होते. आता तुम्ही मुले ज्ञानवान बनले आहात. बाबांनी तुम्हाला आपला स्वतःचा आणि संपूर्ण चक्राचा देखील परिचय दिला आहे, जो इतर कोणीही देऊ शकणार नाही; म्हणून बाबा म्हणतात - तुम्ही मुले ‘स्वदर्शन चक्रधारी’ आहात. परमपिता परमात्मा तर एकच आहेत. बाकी सर्व संतानच संतान आहेत. कोणीही स्वतःला परमपिता म्हणू शकत नाही. जे चांगले समंजस मनुष्य आहेत, ते समजतात हा किती मोठा ड्रामा आहे. त्यामध्ये सर्व ॲक्टर्स अविनाशी पार्ट बजावतात. ती छोटी नाटके (दुनियेतील नाटके) तर विनाशी असतात, हे नाटक आहे अनादि अविनाशी. कधीही बंद होणार नाही. इतकी छोटी आत्मा आणि इतका मोठा पार्ट आत्म्याला मिळालेला आहे - शरीर घेण्याचा आणि सोडण्याचा तसेच पार्ट बजावण्याचा. या गोष्टी कोणत्या शास्त्रांमध्ये नाही आहेत. जर याला (ब्रह्मा बाबांना) गुरुने ऐकवले असले असते तर त्यांचे आणखी देखील फॉलोअर्स असते ना, फक्त एक फॉलोअर काय कामाचा. फॉलोअर तो, जो पूर्णपणे फॉलो करेल. यांचा ड्रेस इत्यादी तर तसा फॉलोअर सारखा नाही आहे. कोण म्हणेल शिष्य आहे. हे तर बाबा बसून शिकवतात. बाबांनाच फॉलो करायचे आहे, ज्याप्रमाणे वरात असते ना. शिवाची देखील वरात म्हटले जाते. शिवबाबा म्हणतात - ही माझी वरात आहे. तुम्ही सर्व भक्तीणी आहात, मी आहे भगवान. तुम्ही सर्व सजण्या आहात, बाबा आले आहेत तुमचा शृंगार करून घेऊन जाण्यासाठी. किती आनंद झाला पाहिजे. आता तुम्ही सृष्टीच्या आदि-मध्य-अंताला जाणता. तुम्ही बाबांची आठवण करता-करता पवित्र बनता तर मग पवित्र राजाई मिळते. बाबा समजावून सांगतात की, मी येतोच अंतामध्ये. मला बोलावताच - ‘पावन दुनियेची स्थापना आणि पतित दुनियेचा विनाश करविण्यासाठी या’, म्हणूनच महाकाळ देखील म्हणतात. महाकाळाचे देखील मंदिर असते. काळाची मंदिरे तर पाहता ना. शिवाला ‘काळ’ म्हणतील ना. बोलावतात की, ‘येऊन पावन बनवा’. आत्म्यांना घेऊन जातात. बेहदचे बाबा किती पुष्कळ आत्म्यांना घेऊन जाण्यासाठी आले आहेत. काळ-काळ महाकाळ, सर्व आत्म्यांना पवित्र गुल-गुल (पवित्र फूल) बनवून घेऊन जातात. गुल-गुल (फूल) बनाल तर मग बाबा देखील मांडीवर बसवून घेऊन जातील. जर पवित्र बनला नाहीत तर मग सजा भोगावी लागेल, फरक तर असतो ना. पापे जर राहून गेली तर मग सजा खावी लागेल. पद देखील असे (कमी दर्जाचे) मिळते म्हणून बाबा समजावून सांगत आहेत - ‘गोड मुलांनो, खूप-खूप गोड बना’. श्रीकृष्ण सर्वांना गोड वाटतो ना. किती प्रेमाने कृष्णाला झुलवतात, ध्यानामध्ये श्रीकृष्णाला छोटा पाहून लगेच मांडीवर घेऊन लाड करतात. वैकुंठामध्ये जातात. तिथे कृष्णाला चैतन्य रूपामध्ये पाहतात. आता तुम्ही मुले जाणता खरोखरच वैकुंठ येत आहे. आपण भविष्यामध्ये हे बनणार. श्रीकृष्णावर कलंक लावतात, ते सर्व चुकीचे आहेत. आधी तुम्हा मुलांना नशा चढला पाहिजे. सुरुवातीला खूप साक्षात्कार झाले होते आणि मग शेवटी खूपच होतील, ज्ञान किती सुंदर आहे. किती आनंद वाटतो. भक्तीमध्ये तर काहीच आनंद वाटत नाही. भक्तीवाल्यांना हे थोडेच माहीत असते की ज्ञानामध्ये किती सुख आहे, तुलना सुद्धा करू शकणार नाहीत. तुम्हा मुलांना आधी हा शुद्ध नशा चढला पाहिजे. हे ज्ञान बाबांव्यतिरिक्त इतर ऋषी-मुनी इत्यादी कोणीही देऊ शकत नाहीत. लौकिक गुरु तर कोणालाही मुक्ती-जीवनमुक्तीचा रस्ता सांगू शकणार नाहीत. तुम्ही समजता कोणीही मनुष्य, गुरु असू शकत नाही, जो म्हणेल - ‘हे आत्म्यांनो, मुलांनो, मी तुम्हाला समजावून सांगतो’. बाबांना तर ‘बाळांनो-बाळांनो’ म्हणण्याची प्रॅक्टिस आहे. जाणतात ही माझी रचना आहे. हे बाबा देखील म्हणतात - ‘मी सर्वांचा रचयिता आहे. तुम्ही सर्व भाऊ-भाऊ आहात.’ त्यांना पार्ट मिळालेला आहे, कसा मिळाला आहे ते बसून समजावून सांगतात. सारा पार्ट आत्म्यामध्येच भरलेला आहे. जे कोणी मनुष्य येतात, ८४ जन्मांमध्ये कधी एक समान फीचर्स (वैशिष्ट्ये) मिळू शकत नाहीत. थोडी-थोडी बदलतात जरूर. तत्व देखील सतो-रजो-तमो होत जातात. प्रत्येक जन्माची फीचर्स एक दुसऱ्याशी मेळ खाऊ शकत नाहीत. या देखील समजून घेण्यासारख्या गोष्टी आहेत. बाबा रोज समजावून सांगत राहतात - ‘गोड मुलांनो, बाबांबद्दल कधीही संशय येऊ देऊ नका. ‘संशय’ आणि ‘निश्चय’ - दोन शब्द आहेत ना. बाबा म्हणजे बाबा, यामध्ये संशय तर असू शकत नाही. मुले असे म्हणू शकत नाहीत की, ‘आम्ही बाबांची आठवण करू शकत नाही’. तुम्ही वारंवार म्हणता की, ‘योग लागत नाही’. ‘योग’ शब्द बरोबर नाहीये. तुम्ही तर राजऋषी आहात. ‘ऋषी’ शब्द पवित्रतेसाठी आहे. तुम्ही राजऋषी आहात तर जरूर पवित्र असणार. छोट्याशा गोष्टीमध्ये नापास झालात तर मग राजाई मिळू शकणार नाही. प्रजेमध्ये निघून जाल. किती नुकसान होते. नंबरवार पदे असतात ना. एकाचे पद दुसऱ्याशी मेळ खाऊ शकत नाही. हा बेहदचा पूर्व नियोजित ड्रामा आहे. बाबांशिवाय बाकी कोणीही समजावून सांगू शकणार नाही. तर तुम्हा मुलांना किती आनंद होतो. ज्याप्रमाणे बाबांच्या बुद्धीमध्ये संपूर्ण ज्ञान आहे तसे तुमच्या बुद्धीमध्ये देखील आहे. बीज आणि झाडाला समजून घ्यायचे आहे. हे मनुष्य सृष्टीचे झाड आहे, याच्याशी वडाच्या झाडाचे उदाहरण अगदी अचूक आहे. बुद्धी देखील म्हणते आमचा आदि-सनातन देवी-देवता धर्माचा जो बुंधा होता तो प्राय: लोप झाला आहे. बाकी सर्व धर्मांच्या शाखा-उपशाखा इत्यादी उभ्या आहेत. ड्रामा अनुसार हे सर्व होणारच आहे, यामध्ये घृणा येत नाही. नाटकामध्ये ॲक्टरला कधी घृणा येईल काय! बाबा म्हणतात - ‘तुम्ही पतित बनले आहात पुन्हा पावन बनायचे आहे’. तुम्ही जितके सुख पाहता तितके इतर कोणी पहात नाही. तुम्ही हीरो-हीरॉइन आहात, विश्वावर राज्य प्राप्त करणारे आहात तर खूप आनंद झाला पाहिजे ना. भगवान शिकवतात! किती नियमित अभ्यास केला पाहिजे, इतकी खुशी असायला हवी. बेहदचे बाबा आम्हाला शिकवतात. राजयोग देखील बाबाच शिकवतात. कोणी शरीरधारी तर शिकवू शकत नाही. बाबांनी आत्म्यांना शिकवले आहे, आत्माच धारण करते. बाबा एकदाच येतात पार्ट बजावण्यासाठी. आत्माच पार्ट बजावून एक शरीर सोडून दुसरे घेते. आत्म्यांना बाबा शिकवतात. देवतांना शिकवणार नाहीत. तिथे तर देवताच शिकवतील. संगमयुगावर बाबाच शिकवतात पुरुषोत्तम बनविण्यासाठी. तुम्हीच शिकता. हे संगमयुग एकच आहे, जेव्हा तुम्ही पुरुषोत्तम बनता. सत्य बनविणारे, सतयुगाची स्थापना करणारे एकच खरे बाबा आहेत. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) संगम युगावर डायरेक्ट भगवंताद्वारे शिक्षण घेऊन, ज्ञानवान आस्तिक बनायचे आहे आणि बनवायचे आहे. कधीही बाबांबद्दल अथवा शिक्षणा बद्दल संशय उत्पन्न होऊ द्यायचा नाही.

२) बाप समान गोड बनायचे आहे. भगवान आमचा शृंगार करत आहेत, याच आनंदामध्ये रहायचे आहे. कोणत्याही ॲक्टरची घृणा अथवा तिरस्कार करायचा नाही. प्रत्येकाचा या ड्रामामध्ये ॲक्युरेट पार्ट आहे.

वरदान:-
अनेक प्रकारच्या सेवेची जबाबदारी पार पाडत असताना मध्ये-मध्ये एकांतवासी बनणारे अंतर्मुखी भव

सायलेन्सच्या शक्तीचा प्रयोग करण्याकरिता अंतर्मुखी आणि एकांतवासी बनण्याची आवश्यकता आहे. बरीच मुले म्हणतात अंतर्मुखी स्थितीचा अनुभव करण्यासाठी किंवा एकांतवासी बनण्यासाठी वेळच मिळत नाही कारण सेवेची प्रवृत्ती (जबाबदारी), वाणीच्या शक्तीची प्रवृत्ती (जबाबदारी) खूप वाढली आहे परंतु यासाठी एकदाच अर्धा तास किंवा एक तास काढण्याच्या ऐवजी मध्ये-मध्ये थोडासा वेळ जरी काढाल तर शक्तिशाली स्थिती बनेल.

बोधवाक्य:-
ब्राह्मण जीवनामध्ये युद्ध करण्या ऐवजी आनंद साजरा करा तर अवघड गोष्ट देखील सोपी होईल.