26-06-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, या दुनियेमध्ये निष्काम सेवा केवळ एक बाबाच करतात, तुम्ही जे काही कर्म करता त्याचे तुम्हाला फळ अवश्य मिळते”

प्रश्न:-
ड्रामा अनुसार कोणती गोष्ट १०० टक्के सुनिश्चित आहे जी तुम्हा मुलांना आनंद देते?

उत्तर:-
ड्रामा अनुसार हे सुनिश्चित आहे की, नवीन राजधानी स्थापन होणारच आहे. तुम्हा मुलांना आनंद होत आहे की, आपण श्रीमताप्रमाणे आपण आपल्यासाठी आपली राजधानी स्थापन करत आहोत. या जुन्या दुनियेचा विनाश तर होणारच आहे. तुम्ही मुले जितका पुरुषार्थ कराल तितके उच्चपद प्राप्त होईल.

गीत:-
तुम्हें पाके हमने जहां पा लिया है…

ओम शांती।
मुले जे म्हणतात, तेच बाबा देखील म्हणतात. मुले म्हणतात - ‘बाबा, तुम्हाला प्राप्त करून आम्ही स्वर्गाचे मालक बनतो’. बाबा देखील म्हणतात - ‘मुलांनो, मनमनाभव’. अर्थ तर एकच झाला. सर्व मनुष्य विचारतील की ब्रह्माकुमार-कुमारींना या सत्संगामध्ये जाऊन काय बरे मिळते? तर ब्रह्माकुमार-कुमारी म्हणतात - आम्ही बापदादांद्वारे विश्वाचे मालक बनतो. इतर कोणीही विश्वाचा मालक बनू शकत नाही. विश्वाचे मालक हे लक्ष्मी-नारायणच आहेत, शिवबाबा काही विश्वाचे मालक असू शकत नाहीत. तुम्ही मुले विश्वाचे मालक बनता. तुमचे बाबा विश्वाचे मालक बनत नाहीत. अशी निष्काम सेवा करणारे दुसरे कोणीही नाही. प्रत्येकाला आपल्या सेवेचे फळ जरूर मिळते. भक्तिमार्गामध्ये किंवा इतर कोणत्याही प्रकारे जे कोणी जे काही करतात… सोशल वर्करला देखील सेवेचे फळ जरूर मिळते. गव्हर्नमेंट कडून पगार मिळतो. बाबा म्हणतात - मीच एक निष्काम सेवा करतो, जो मुलांना विश्वाचा मालक बनवतो परंतु मी बनत नाही. मुलांना सुखी करून, सुखधामचा मालक बनवून, २१ जन्मांचे सुख देऊन मी आपल्या निर्वाणधाममध्ये अथवा वानप्रस्थ अवस्थेमध्ये जाऊन बसतो. वानप्रस्थ तर मूलवतनलाच म्हणणार. मनुष्य वानप्रस्थ स्वीकारतात. सर्व काही मुलांच्या स्वाधीन करून सत्संग इत्यादी करू लागतात. गुरु करतात की, यांनी मुक्तीचा मार्ग दाखवावा. आता तुम्हा मुलांना समजले आहे की, मुक्ती-जीवनमुक्तीचा मार्ग कोणताही मनुष्य मात्र कधीही कोणाला दाखवू शकत नाही. ते कोणालाही सद्गती देऊ शकत नाहीत. स्वतःला देखील सद्गती देऊ शकत नाहीत. स्वतःला जर सद्गती देतील, तर मग दुसऱ्यांना देखील देऊ शकतील. बाबा येतातच परमधामवरून. ते तिथले राहणारे आहेत, तुम्ही मुले देखील तिथले राहणारे आहात. तुम्हाला पार्ट बजावायचा आहे या कर्म-क्षेत्रावर. बाबांना देखील एकदा इथे तुम्हाला मुलांकरिता यायचेच आहे. जर का स्वर्गाची स्थापना होत आहे तर जरूर नरकाचा विनाश होणारच आहे.

आता तुम्हाला माहित झाले आहे - शिवबाबा ब्रह्माबाबांद्वारे आदि सनातन देवी-देवता धर्माची स्थापना करत आहेत. तुम्ही जाणता - आपण पुन्हा एकदा मनुष्यापासून देवता बनत आहोत. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे की दर ५ हजार वर्षानंतर आपण येऊन पुन्हा वारसा प्राप्त करण्याकरिता ब्रह्माद्वारे शिवबाबांची संतान बनतो. पतित-पावन त्यांना म्हटले जाते. नॉलेजफुल ज्ञानाचा सागर देखील आहेत. ‘योग’ अर्थात ‘आठवण’ शिकवतात; परंतु निराकार कसे बरे समजावून सांगतील म्हणून म्हणतात - ब्रह्माद्वारे मनुष्यापासून देवता बनवतो अर्थात देवी-देवता धर्माची स्थापना करवून घेतो. आता तो धर्म राहिलेला नाही, पुन्हा बनवावा लागेल. आता पुन्हा आदि सनातन देवी-देवता धर्म स्थापन करून बाकी सर्वांना मुक्तिधाम मध्ये घेऊन जातो. भारत प्राचीन खंड आहे त्यामुळे भारताची जनसंख्या खरेतर सर्वात जास्त असली पाहिजे. या गोष्टी इतर कोणाच्याही बुद्धीमध्ये येत नाही. आदि सनातन देवी-देवता धर्म सर्वात जास्त मोठा असला पाहिजे. ५ हजार वर्षांपासून त्यांची वृद्धी होत असते. बाकीचे तर सर्व येतातच २५०० वर्षा नंतर. इस्लामी धर्मियांची जनसंख्या कमी असली पाहिजे; त्यांच्या मागून थोड्या काळानंतर बौद्ध धर्माचे येतात तर त्यांच्या जनसंख्येमध्ये देखील थोडा फरक असला पाहिजे. इस्लामी, बौद्ध इत्यादी सुरुवातीला सतोप्रधान आहेत; नंतर मग हळूहळू तमोप्रधान बनतात. हा देखील हिशोब आहे. जी अनन्य हुशार मुले आहेत त्यांना यावर विचार करावा लागेल. आजकाल असे लिहितात की, चायनीज सर्वात जास्त आहेत. परंतु त्यांना सृष्टीचक्रा विषयीचे ज्ञान तर काहीच नाही. हे सर्व रहस्य तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे. जे शिकले-सवरलेले आहेत त्यांना डिटेलमध्ये समजावून सांगायचे आहे. देवी-देवता धर्मवाल्यांना ५००० वर्षे झाली आहेत, तर यावेळी त्यांची लोकसंख्या जास्त असली पाहिजे. परंतु देवी-देवता धर्माचे नंतर मग इतर धर्मांमध्ये कन्व्हर्ट झाले आहेत. सर्वात अगोदर जास्त करून मुसलमान बनले, नंतर मग बरेचजण बौद्ध देखील बनले. इथे देखील बौद्ध जास्त प्रमाणात आहेत, ख्रिश्चन तर बेसुमार प्रमाणात आहेत. देवता धर्माचे तर नाव देखील राहिलेले नाही. जर आपण ब्राह्मण धर्म सांगितला तरी देखील हिंदूंच्या कॉलममध्ये लिहितात. आता तुम्ही जाणता आदि सनातन देवी-देवता धर्म स्थापन होत आहे - आम्हा ब्राह्मणांद्वारे श्रीमतानुसार. ही देखील समज असली पाहिजे. धर्मांचा उल्लेख तर केला जातो ना. इथले मनुष्य स्वतःला हिंदूंच्या लाईनमध्ये घेऊन जातात. म्हणतील हिंदू आर्य धर्म आहे, सर्वात जुना आहे. भारतवासी सर्वात पहिले आर्य होते, खूप श्रीमंत होते, आता अन-आर्य बनले आहेत. आता अजिबात बुद्धी राहिलेली नाही, ज्याला जे येईल ते धर्माचे नाव ठेवतात. झाडाला एकामागोमाग एक छोटी-छोटी पाने, शाखा-उपशाखा तयार होत असतात. नवीन असणाऱ्यांचा थोडा मान असतो.

आता तुम्ही मुले जाणता की, आपण बाबांकडून स्वर्गाचा वारसा घेत आहोत. तर अशा वारसा देणाऱ्या बाबांची किती आठवण केली पाहिजे. तुम्ही जितकी जास्त आठवण कराल तर, एक तर वारसा मिळेल आणि दुसरे म्हणजे तुम्ही पावन बनाल. लौकिक पित्या कडून तर धनाचा वारसा मिळतो. त्याचसोबत मग पतित बनण्याचा देखील वारसा मिळतो. ते आहेत लौकिक पिता, हे आहेत पारलौकिक पिता आणि हे मध्ये आहेत अलौकिक पिता. यांना मध्यभागी दोन्ही बाजूने जोडले जाते. शिवबाबांना तर काहीच त्रास होत नाही, यांना (ब्रह्मा बाबांना) किती शिव्या खाव्या लागतात. वास्तविक श्रीकृष्णाला शिव्या मिळत नाहीत. मधल्यामध्ये हे अडकले आहेत. म्हणतात ना - ‘रस्त्याने चालताना ब्राह्मण फसला’. शिव्या खाण्यासाठी हा फसला आहे. अलौकिक पित्यालाच सहन करावे लागते. हे कोणालाच ठाऊक नाही आहे की, शिवबाबा येऊन यांच्यामध्ये प्रवेश करून पतितांना पावन बनवतात. पवित्र बनण्यावरूनच मार खातात. बाबा म्हणतात - मी आलो आहे सर्वांना परत घेऊन जाण्याकरिता. तुम्ही जाणता, मृत्यू समोर उभा आहे. विनाश तर जरूर झाला पाहिजे. विनाशा शिवाय सुख-शांती कशी स्थापन होऊ शकेल. जेव्हा कोणते युद्ध इत्यादी होते तर मनुष्य यज्ञ इत्यादी करतात, जेणेकरून युद्ध बंद व्हावे. तुम्ही ब्राह्मणकुलभूषण जाणता की, विनाश तर जरूर होणार. नाहीतर स्वर्गाचे गेट कसे उघडेल. सर्वच काही स्वर्गामध्ये तर येणार नाहीत. जे पुरुषार्थ करतील तेच येतील, बाकीचे मुक्तिधाममध्ये जातील. हे कोणालाच माहित नसल्याकारणाने किती घाबरतात. शांतीसाठी किती खस्ता खातात. सतत परिषदा आयोजित करत असतात. फक्त तुम्ही ब्राह्मणच जाणता की, सुखधाम, शांतीधामची कशी स्थापना होत आहे. विनाशा शिवाय स्थापना होऊ शकत नाही. तुम्ही आता त्रिकालदर्शी बनला आहात. तिसरा नेत्र ज्ञानाचा मिळाला आहे. ते तर म्हणत असतात की, शांती कशी प्रस्थापित होईल? अर्थात कोणीही भांडू नये. सर्वजण म्हणतात वननेस असावा (एकता असावी). एकाच पित्याचे मत घ्यावे की, आपण सर्व एका पित्याची मुले भाऊ-भाऊ आहोत, तर मग वननेस होईल (एकता होईल). एका पित्याची मुले आहेत तर आपसामध्ये भांडता कामा नये. सुख-शांती ही देखील सतयुगामध्येच तर होती. तिथे कोणीही आपापसामध्ये भांडत नाहीत. ती तर सतयुगाची गोष्ट झाली, इथे तर आहे कलियुग. खरोखर सतयुगामध्ये देवता होते, बाकी सर्व आत्मे नेमके कुठे होते, हे कोणालाच माहीत नाही. तुम्हाला आता समजत आहे, एक राज्य केवळ सतयुगामध्येच होते. तिथे सुख-शांती सर्व काही होते. या सर्व गोष्टी नंबरवार पुरुषार्था अनुसार तुमच्या बुद्धीमध्ये आहेत. तुम्ही समजता, खरोखर आपण सतयुगामध्ये राज्य करत होतो, भरपूर सुख होते, अद्वैत धर्म होता; परंतु हे ज्ञान कोणालाच नाहीये. यावेळी तुम्ही नॉलेजफुल बनता. बाबा तुम्हाला आप समान बनवतात. जी बाबांची महिमा आहे तसेच तुम्हाला बनायचे आहे. फक्त दिव्यदृष्टीची चावी बाबांकडेच राहते. बाबांनी सांगितले आहे - भक्तिमार्गामध्ये मला काम करावे लागते, जो ज्याची पूजा करतो मी त्याची मनोकामना पूर्ण करतो. इथे देखील दिव्यदृष्टीचा पार्ट चालतो. म्हणतात ना - अर्जुनाला विनाशाचा साक्षात्कार झाला. विनाश देखील जरूर होणार आहे. विष्णुपुरीची देखील जरूर स्थापना होणार आहे. बाबांनी कल्पापूर्वी जसे समजावून सांगितले होते तसेच आताही बसून समजावून सांगत आहेत. बाबा आम्हाला मनुष्यापासून देवता बनवत आहेत. जेव्हा आपण देवता बनतो, तेव्हा मग आसुरी सृष्टीचा विनाश जरूर होणार. चोहोबाजूला हाहाकार माजणार आहे. बुद्धी समजू शकते की, नैसर्गिक आपत्ती येणार आहेत. मुसळधार पाऊस देखील पडणार आहे. या सर्वांचा विनाश होईल तेव्हा मग सतयुगाची स्थापना होईल. ५ तत्वांचे खत देखील मिळेल. या धरतीला पाहा किती खत मिळते. बाबा म्हणतात - या रुद्र-ज्ञान यज्ञामध्ये हे सर्व काही स्वाहा होईल. भक्तिमार्गामध्ये पहा कसा रुद्र-यज्ञ रचतात. शिवबाबांचे लिंग आणि छोटे-छोटे शाळीग्राम भरपूर प्रमाणात बनवून पूजा करून नंतर मग विसर्जित करतात, आणि मग दररोज बनवतात. पूजा करून पुन्हा विसर्जित करतात. शिवबाबांसोबत ज्यांनी पण सेवा केली आहे त्यांचे देखील असे हाल करतात. रावणाचा बघा दरवर्षी पुतळा बनवून त्याला जाळतात. शत्रूचा तर एक-दोनदा पुतळा बनवून जाळतात, वर्षानुवर्षे पुतळा जाळण्याची प्रथा नसते. एकदाच राग काढून टाकतील. रावणाला तर दरवर्षी जाळतात. याचा अर्थ कोणी समजतात थोडेच; आणि मग म्हणतात - रावणाने सीतेला चोरले, अजिबात अर्थ समजत नाहीत. फॉरेनर्सना काय समजणार, त्यांना तर काहीही समजणार नाही. दिवसेंदिवस रावणाला मोठा बनवत जातात कारण रावण खूप दुःख देणारा आहे. आता तुम्ही याच्यावर विजय प्राप्त करता. सतयुगामध्ये हा असणारच नाही. हे जे कर्माचे भोग, आजार इत्यादी होतात, हे सर्व रावणामुळे होतात. रावणाची प्रवेशता झाल्यामुळे मनुष्य जे काही कर्म करतात ती विकर्म बनतात. सुख-दुःखाचा खेळ बनलेला आहे. या इतिहास-भूगोलाविषयी कोणालाच काहीही ठाऊक नाहीये. लक्ष्मी-नारायणाला हे राज्य कसे मिळाले? हे कोणालाच ठाऊक नाही. तुम्ही छोटी-छोटी मुले मात्र हे समजावून सांगता की, हे लक्ष्मी-नारायण सतयुगामध्ये राज्य करत होते; संगमावर हा राजयोग शिकून हे पद प्राप्त केले आहे. बिर्ला या व्यक्तीला देखील छोट्या-छोट्या मुलींनी जाऊन समजावून सांगावे की, यांनी हे राज्य कसे प्राप्त केले? आता तर कलियुग आहे, याला सतयुग म्हटले जात नाही. राजाई तर आता राहिलेलीच नाहीये. राजांचे तर मुकुटच नाहीसे केले आहेत. धर्मशास्त्रे केवळ चारच आहेत. गीता हे धर्मशास्त्र आहे, ज्याद्वारे आत्ता सध्या तीन धर्मांची स्थापना होते, सतयुगामध्ये नाही. असे नाही की लक्ष्मी-नारायणाने अथवा रामाने कोणता धर्म स्थापन केला. हा धर्म आत्ता स्थापन करत आहेत, त्यानंतर मग इस्लामी, बौद्ध, आणि ख्रिश्चन. ख्रिश्चनांचे, ‘बायबल’ हे एकच धर्मशास्त्र आहे, बस्स. त्याच्यानंतर मग त्यांची वृद्धी होत जाते. ‘आदि सनातन’ हा आहेच मुळी देवता धर्म; आता पुन्हा एकदा देवी-देवता धर्माची स्थापना करत आहेत. तुम्ही ड्रामाच्या रहस्याला चांगल्या रीतीने समजला आहात. आनंद देखील होतो. जेव्हा की तुम्हा मुलांना १०० टक्के खात्री आहे की आपण पुन्हा एकदा आपले राज्य-भाग्य स्थापन करत आहोत, यामध्ये युद्ध इत्यादीचा कोणता प्रश्नच नाही. राजधानी स्थापन होत आहे हे तर सुनिश्चित आहे. ॲज सर्टन ॲज डेथ (मृत्यूइतकेच हे निश्चित आहे). तुम्ही जाणता की, आपण पुन्हा एकदा राज्य-भाग्य प्राप्त करत आहोत. कल्प-कल्प बाबांकडून वारसा घेतो. जितका पुरुषार्थ कराल तितके उच्च पद प्राप्त कराल. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) जी बाबांची महिमा आहे त्या महिमेला स्वतःमध्ये उतरवायचे आहे. पित्या समान महिमा योग्य बनायचे आहे. पारलौकिक पित्याकडून पवित्रतेचा वारसा घ्यायचा आहे. पवित्र बनल्यानेच तुम्हाला स्वर्गाचा वारसा मिळेल.

२) श्रीमतावर आपल्याच तन-मन-धनाद्वारे एक आदि सनातन देवी-देवता धर्माची स्थापना करायची आहे.

वरदान:-
जुन्या संस्काररूपी अस्थिंना संपूर्ण स्थितीच्या सागरामध्ये विसर्जित करणारे समान आणि संपूर्ण भव

पित्या समान अथवा संपूर्ण बनण्याकरिता सृष्टीच्या महाविनाश काळापूर्वी आपल्यातील कमजोरींना आणि उणीवांना नष्ट करा. स्वतःला इतके तेजस्वी बनवा की कोणत्याही प्रकारच्या संभ्रमाचे नामोनिशाण सुद्धा राहू नये. जणूकाही पुनर्जन्मानंतर जुन्या जन्मातील गोष्टी विसरून जातात; तसे जुन्या गोष्टींना, जुन्या संस्कारांना भस्म करा, अस्थिंना देखील संपूर्ण स्थितीच्या सागरामध्ये विसर्जित करा, तेव्हा म्हणणार - समान आणि संपूर्ण.

बोधवाक्य:-
विस्ताराला सार मध्ये सामावून घेण्याची जादू शिका, म्हणजे तुम्ही पित्या समान बनाल.

हे अव्यक्त इशारे - सदैव हर्षित राहण्याकरिता आपल्या नेचरला (स्वभावाला) सरळ बनवा, सहनशील बना.

सहनशीलता असणारे बाह्यमुखतेच्या व्हायब्रेशनलाच नव्हे, परंतु मनामध्ये देखील जे संकल्प उत्पन्न होतात, त्या संकल्पांच्या उत्पत्तीला पाहून देखील घाबरणार नाहीत. आपल्या सहनशीलतेच्या शक्तीद्वारे सामना करतील आणि चेहऱ्यावरून सदैव संतुष्ट अथवा प्रसन्नचित्त दिसून येतील. त्यांचे डोळे आणि चेहरा कधीही असंतुष्ट असल्याचा दिसून येणार नाही. ते संतुष्टमणी असल्याकारणाने सदैव हर्षित राहतात.