26-07-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“ गोड मुलांनो - हा अनादि ड्रामा फिरतच राहतो, टिक-टिक होतच राहते, यामध्ये एकाचा पार्ट दुसऱ्याशी मेळ खाऊ शकत नाही, याला यथार्थपणे समजून सदैव हर्षित रहायचे आहे”

प्रश्न:-
कोणत्या युक्तीने तुम्ही हे कसे सिद्ध करून सांगाल की, भगवान या धरतीवर आलेले आहेत?

उत्तर:-
कोणालाही असे डायरेक्ट सांगायचे नाही की भगवान आलेले आहेत, असे सांगाल तर लोक हसतील, टीका करतील कारण आजकाल स्वतःला भगवान म्हणवून घेणारे खूप आहेत; म्हणून तुम्ही युक्तीने सर्वप्रथम दोन पित्यांचा परिचय द्या. एक हदचे, दुसरे बेहदचे पिता. हदच्या पित्याकडून हदचा वारसा मिळतो, आता बेहदचे बाबा बेहदचा वारसा देत आहेत, तर समजतील.

ओम शांती।
रुहानी बाबा बसून रूहानी मुलांना समजावून सांगत आहेत, सृष्टी तर हीच आहे. बाबांना देखील समजावून सांगण्यासाठी इथेच यावे लागते. मूलवतनमध्ये काही समजावून सांगितले जात नाही. स्थूल वतनमध्येच समजावून सांगितले जाते. बाबा जाणतात सर्व मुले पतित आहेत. काहीच कामाची राहिलेली नाहीत. या दुनियेमध्ये दुःखच दुःख आहे. बाबांनी समजावून सांगितले आहे की आता तुम्ही विषय सागरामध्ये अडकले आहात. खरे तर तुम्ही क्षीर सागरामध्ये होता. विष्णुपुरीलाच क्षीरसागर म्हटले जाते. आता क्षीर सागर (दुधाचा सागर) तर इथे मिळू शकणार नाही, तर तलाव बनवला आहे. तिथे (सतयुगामध्ये) तर म्हणतात की दुधाच्या नद्या वाहत होत्या, तिथे गाई देखील फर्स्ट क्लास नामीग्रामी असतात. इथे (कलियुगी दुनियेमध्ये) तर मनुष्य सुद्धा आजारी होत असतात, तिथे गायी सुद्धा कधी आजारी पडत नाहीत. एकदम फर्स्ट क्लास असतात. प्राणी इत्यादी कोणीही आजारी पडत नाहीत. इथे आणि तिथे (कलियुगामध्ये आणि सतयुगामध्ये) खूप फरक आहे. हे बाबाच येऊन सांगतात बाकी दुनियेमध्ये दुसरे कोणीही जाणत नाही. तुम्ही जाणता हे पुरुषोत्तम संगम युग आहे, जेव्हा बाबा येतात आणि सर्वांना परत घेऊन जातात. बाबा म्हणतात - ‘जी काही मुले आहेत कोणी ‘अल्ला’ला, कोणी ‘गॉड’ला, कोणी ‘भगवंता’ला बोलावत आहेत. माझी नावे तर खूप ठेवली आहेत. चांगले-वाईट जे सुचेल ते नाव ठेवतात’. आता तुम्ही मुले जाणता बाबा आलेले आहेत. दुनिया काही हे समजू शकणार नाही. समजतील तेच ज्यांना ५००० वर्षांपूर्वी समजले होते; म्हणूनच गायन आहे - ‘कोटींमध्ये कोणी, कोणी मध्ये सुद्धा कोणी’. मी जो आहे, जसा आहे; मुलांना काय शिकवतो ते तर तुम्ही मुलेच जाणता दुसरे कोणी समजू शकणार नाही. हे देखील तुम्ही जाणता की, आम्ही कोणा साकारकडून शिकत नाही. निराकार शिकवतात. मनुष्य नक्कीच गोंधळून जाणार, निराकार तर वर (शांती धाममध्ये) राहतात, ते कसे काय शिकवणार! तुम्ही निराकार आत्मे सुद्धा वर परमधाममध्ये राहता. मग या तख्तावर (शरीरामध्ये) येतात. हे तख्त विनाशी आहे, आत्मा तर अकाल आहे. तीचा कधीही मृत्यू होत नाही. शरीर मृत्युमुखी पडते. हे आहे चैतन्य तख्त. अमृतसरमध्ये सुद्धा अकाल तख्त आहे ना. ते तख्त (सिंहासन) आहे लाकडाचे. त्या बिचाऱ्यांना माहित नाही आहे की ‘अकाल’ तर ‘आत्मा’ आहे, जिला काळ कधीही खात नाही. अकाल-मूर्त आत्मा एक शरीर सोडून दुसरे घेते. तिला देखील रथ तर पाहिजे ना. निराकार बाबांना देखील जरूर मनुष्याचा रथ पाहिजे कारण बाबा आहेत ज्ञानाचा सागर, ज्ञानेश्वर. आता ज्ञानेश्वर नाव तर खूप जणांचे आहे. स्वतःला ईश्वर समजतात ना. ऐकवतात भक्तीमधील शास्त्रांच्या गोष्टी. नाव ठेवतात ज्ञानेश्वर अर्थात ज्ञान देणारा ईश्वर. तो तर ज्ञान सागर पाहिजे. त्यालाच ‘गॉडफादर’ म्हटले जाते. इथे तर पुष्कळ ‘भगवान’ झाले आहेत. जेव्हा खूप निंदा होते, खूप गरीब होतात, दु:खी होतात तेव्हाच बाबा येतात. बाबांना म्हटले जाते गरीब-निवाज (गरिबांचे कैवारी). शेवटी तो दिवस येतो, जेव्हा गरीब-निवाज बाबा येतात. मुले सुद्धा जाणतात बाबा येऊन स्वर्गाची स्थापना करतात. तिथे (सतयुगामध्ये) तर अथाह धन असते. पैसे कधी मोजले जात नाहीत. इथे हिशोब करतात, इतके अरब खर्च झाला. तिथे तर हे नाव सुद्धा नाही, अथाह धन असते.

आता तुम्हा मुलांना माहित झाले आहे की, बाबा आलेले आहेत, आम्हाला आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी. मुले आपले घर विसरून गेली आहेत. भक्तीमार्गातील त्रास सहन करत राहतात, यालाच म्हटले जाते रात्र. भगवंताला शोधतच असतात, परंतु भगवान कोणालाच भेटत नाहीत. आता भगवान आलेले आहेत, हे देखील तुम्ही मुले जाणता, आणि निश्चय सुद्धा आहे. असे नाही की, सर्वांनाच पक्का निश्चय आहे. कधी ना कधी माया विसरायला लावते, तेव्हाच तर बाबा म्हणतात - ‘आश्चर्यवत् मेरे को देखन्ती, मेरा बनन्ती, औरों को सुनावन्ती; अहो माया, तू किती जबरदस्त आहेस तरीही पळवून लावतेस. भागन्ती तर अनेकजण होतात. फारकती देवन्ती बनतात’. मग ते कुठे जाऊन जन्म घेतील! खूप हलका (कमी दर्जाचा) जन्म मिळेल. परीक्षेमध्ये नापास होतात. ही आहे मनुष्यापासून देवता बनण्याची परीक्षा. बाबा असे तर म्हणणार नाहीत की, सर्वच नारायण बनतील. नाही, जे चांगला पुरुषार्थ करतील, ते पद सुद्धा चांगलेच मिळवतील. बाबा समजून जातात की, कोण चांगले पुरुषार्थी आहेत - जे इतरांना देखील मनुष्यापासून देवता बनविण्याचा पुरुषार्थ करतात अर्थात बाबांची ओळख देतात. आजकाल विरोधामध्ये कितीतरी मनुष्य स्वतःलाच भगवान म्हणवून घेत आहेत. तुम्हाला अबला समजतात. आता त्यांना कसे समजावून सांगायचे की भगवान आलेले आहेत, डायरेक्ट जर कोणाला म्हणाल की, भगवान आलेले आहेत, तर असे कधीच मानणार नाहीत म्हणून समजावून सांगण्याची सुद्धा युक्ती हवी. असे कधी कोणाला सांगता कामा नये की, ‘भगवान धरतीवर आलेले आहेत’. त्यांना समजावून सांगायचे आहे की, तुमचे दोन पिता आहेत. एक आहे पारलौकिक बेहदचा पिता, दुसरा लौकिक हदचा पिता. व्यवस्थित परिचय दिला पाहिजे, जेणेकरून समजतील की हे बरोबर बोलत आहेत. बेहदच्या बाबांकडून वारसा कसा मिळतो - हे कोणीही जाणत नाही. वारसा मिळतोच पित्याकडून. दुसरे कोणी असे कधीही म्हणणार नाही की व्यक्तीला दोन पिता असतात. तुम्ही सिद्ध करून सांगता, हदच्या लौकिक पित्याकडून हदचा वारसा आणि पारलौकिक बेहदच्या पित्याकडून बेहदचा अर्थात नवीन दुनियेचा वारसा मिळतो. नवीन दुनिया आहे स्वर्ग, तो तर जेव्हा बाबा येतील तेव्हाच येऊन देतील. ते बाबा आहेतच नवीन सृष्टीचे रचयिता. बाकी तुम्ही जर फक्त म्हणाल की, भगवान आलेले आहेत, तर कधीच मानणार नाहीत, उलट अजूनच टीका करतील. ऐकणारच नाहीत. सतयुगामध्ये काही समजावून सांगावे लागत नाही. समजावून तेव्हा सांगावे लागते, जेव्हा बाबा येऊन शिकवण देतात. सुखामध्ये कोणीही आठवण करत नाही, दुःखामध्ये सर्वजण करतात. तर त्या पारलौकिक बाबांनाच म्हटले जाते - दुःखहर्ता, सुखकर्ता. दुःखातून मुक्त करून गाईड बनून मग आपल्या घरी स्वीट होममध्ये (शांती धाममध्ये) घेऊन जातात. त्यालाच म्हणणार स्वीट सायलेंस होम. तिथे आपण कसे जाणार - हे कोणीही जाणत नाही. ना रचता, ना रचनेच्या आदि-मध्य-अंत ला जाणत. तुम्ही जाणता - बाबा, आम्हाला निर्वाणधाममध्ये घेऊन जाण्यासाठी आलेले आहेत. सर्व आत्म्यांना घेऊन जाणार. एकाला सुद्धा सोडणार नाहीत. ते (शांतीधाम) आहे आत्म्यांचे घर, हे आहे शरीराचे घर. तर सर्वप्रथम बाबांचा परिचय द्यायला हवा. ते निराकार बाबा आहेत, त्यांना परमपिता सुद्धा म्हटले जाते. परमपिता शब्द एकदम बरोबर आहे आणि गोड सुद्धा आहे. फक्त भगवान, ईश्वर म्हटल्याने वारशाचा तो सुगंध येत नाही. तुम्ही परमात्म्याला आठवण करता तेव्हा वारसा मिळतो. पिता आहेत ना. हे देखील मुलांना समजावून सांगितले आहे की सतयुग आहे - सुखधाम. स्वर्गाला शांतीधाम म्हणणार नाही. शांतीधाम जिथे आत्मे राहतात. हे एकदम पक्के करा.

बाबा म्हणतात - ‘मुलांनो, तुम्हाला हे वेदशास्त्र इत्यादी शिकल्याने काहीच प्राप्ती होत नाही. शास्त्र पठण करतातच भगवंताला प्राप्त करण्यासाठी आणि भगवान तर म्हणतात, मी कोणालाही शास्त्र पठण केल्याने भेटत नाही. मला इथे बोलावतातच की, ‘येऊन या पतित दुनियेला पावन बनवा’. या गोष्टी कोणीही समजत नाहीत, पत्थरबुद्धी आहेत ना. शाळेमध्ये विद्यार्थी अभ्यास करत नसेल तर म्हणतात ना की, तू एकदम पत्थर-बुद्धी आहेस. सतयुगामध्ये असे म्हणणार नाही. पारस बुद्धी बनविणारे आहेत परमपिता बेहदचे बाबा. यावेळी तुमची बुद्धी पारस आहे कारण तुम्ही बाबांसोबत आहात. मग सतयुगामध्ये एका जन्मामध्ये सुद्धा थोडासा फरक तर जरूर पडतो. १२५० वर्षांमध्ये दोन कला कमी होतात. सेकंदा सेकंदाला १२५० वर्षामध्ये कला कमी-कमी होत जातात. यावेळी तुमचे जीवन एकदम परफेक्ट बनते जेव्हा तुम्ही बाबांसारखे ज्ञानाचा सागर, सुख-शांतीचा सागर बनता. संपूर्ण वारसा घेता. बाबा येतातच वारसा देण्यासाठी. सर्वप्रथम तुम्ही शांतीधाम मध्ये जाता, नंतर मग सुखधाम मध्ये जाता. शांतीधाममध्ये तर आहेच शांती. मग सुखधाममध्ये जाता, तिथे जरा सुद्धा अशांतीची गोष्ट नसते. मग खाली उतरायचे असते. मिनिटा-मिनिटाला तुमची घसरण सुरू असते (पतन होत असते). नवीन दुनियेपासून जुनी होत जाते. म्हणून बाबांनी सांगितले होते की हिशोब काढा, ५ हजार वर्षांमध्ये इतके महिने, इतके तास... तर मनुष्य आश्चर्यचकित होतील. हा पूर्ण हिशोब तर सांगितला आहे. एकदम अचूक हिशोब लिहीला पाहिजे, यामध्ये थोडा देखील फरक पडू शकत नाही. मिनिटागणिक टिक-टिक होत राहते. संपूर्ण रीळ रिपीट होते, फिरता-फिरता मग गुंडाळत रोल होत जातो मग पुन्हा तोच रिपीट होईल. हा प्रचंड रोल अतिशय वंडरफुल आहे. याचे मोजमाप करू शकत नाही. संपूर्ण दुनियेचा जो पार्ट चालतो, टिक-टिक होत राहते. एक सेकंद दुसऱ्याशी मेळ खाऊ शकत नाही. हे चक्र फिरतच राहते. तो असतो हदचा ड्रामा, हा आहे बेहदचा ड्रामा. आधी तुम्ही काहीही जाणत नव्हता की हा अविनाशी ड्रामा आहे. ‘बनी बनाई बन रही…’ जे व्हायचे असते तेच होते. काही नवीन गोष्ट नाहीये. अनेक वेळा सेकंद बाय सेकंद हा ड्रामा रिपीट होत आला आहे. दुसरे कोणी या गोष्टी समजावून सांगू शकणार नाही. सर्वप्रथम तर बाबांचा परिचय द्यायचा आहे - बेहदचे बाबा बेहदचा वारसा देतात. त्यांचे एकच नाव आहे - ‘शिव’. बाबा म्हणतात - ‘मी तेव्हाच येतो जेव्हा धर्माची अति ग्लानी होते’; याला म्हटले जाते घोर कलियुग. इथे अतोनात दुःख आहे. असे बरेच आहेत, जे म्हणतात अशा घोर कलियुगामध्ये पवित्र कसे राहू शकणार! परंतु त्यांना हे माहितच नाही आहे की पवित्र बनविणारा कोण आहे? बाबाच संगमावर येऊन पवित्र दुनिया स्थापना करतात. तिथे (सतयुगामध्ये) पती-पत्नी दोघेही पवित्र राहतात. इथे दोघेही अपवित्र आहेत. ही आहेच अपवित्र दुनिया. ती आहे पवित्र दुनिया - स्वर्ग, हेवन. हा आहे दोजक, नरक, हेल. तुम्हा मुलांना समजले आहे नंबरवार पुरुषार्था नुसार. समजावून सांगण्यासाठी देखील मेहनत आहे. गरीब लगेच समजतात. दिवसेंदिवस वृद्धी होत जाते, मग घर सुद्धा तेवढे मोठे हवे. इतकी सारी मुले येतील कारण बाबा तर आता कुठे जाणार नाहीत. सुरुवातीला तर कोणी न सांगता देखील बाबा स्वतःच जात असत. आता तर मुले इथे (मधुबन मध्ये) येत राहतील. थंडीमध्ये सुद्धा यावे लागेल. प्रोग्राम बनवावा लागेल. अमुक-अमुक वेळेला या, मग गर्दी होणार नाही. सगळे एकत्र एकाच वेळी तर येऊ शकणार नाहीत. मुलांची वृद्धी तर होतच राहणार. इथे मुले छोटी-छोटी घरे बनवतात, तिथे (सतयुगामध्ये) तर पुष्कळ महाल मिळतील. हे तर तुम्ही मुले जाणता - धन-संपत्ती सर्वकाही मातीत मिसळून जाणार आहेत. बरेचजण असे देखील करतात की खड्डे खणून त्यामध्ये पैसे ठेवतात. मग एक तर चोर तरी घेऊन जातात, नाहीतर खड्ड्यातच राहून जातात, मग शेती नांगरते वेळी धन निघते. आता विनाश होईल, सर्व काही खाली गाडले जाईल. मग तिथे सर्व काही नवीन मिळेल. बरेच असे राजांचे किल्ले आहेत जिथे सामान गाडले गेले आहे. मोठ-मोठे हिरे सुद्धा मिळतात तेव्हा हजारो-लाखोंची कमाई होते. असे नाही की स्वर्गामध्ये तुम्ही खोदकाम करून हिरे इत्यादी काढणार. नाही, तिथे तर प्रत्येक गोष्टींच्या खाणी इत्यादी सर्व नवीन भरपूर होतील. इथे तर जमीन कलराठी (निकृष्ट प्रतीची) आहे त्यामुळे ताकद नाहीये. जे बीज पेरतात त्यामध्ये काहीच ताकद राहिलेली नाही आहे. कचरापट्टी अशुद्ध गोष्टी खत म्हणून घालतात. तिथे तर अशुद्ध गोष्टीचे नाव सुद्धा नसते. सर्व काही नवीन. स्वर्गाचा साक्षात्कार सुद्धा मुली करून येतात. तिथले सौंदर्यच नैसर्गिक आहे. आता तुम्ही मुले त्या दुनियेमध्ये जाण्यासाठी पुरुषार्थ करत आहात. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-

१) या वेळीच बाप समान परफेक्ट बनून संपूर्ण वारसा घ्यायचा आहे. बाबांची सर्व शिकवण स्वतःमध्ये धारण करून त्यांच्या सारखे ज्ञानाचा सागर, सुख-शांतीचा सागर बनायचे आहे.
२) बुद्धीला पारस (निर्मळ) बनविण्यासाठी पूर्णपणे अभ्यासावर लक्ष द्यायचे आहे. निश्चय बुद्धी बनून मनुष्यापासून देवता बनण्याची परीक्षा पास करायची आहे.

वरदान:-
निश्चित विजयाच्या आनंदामध्ये राहून बाबांची पदमगुणा मदत प्राप्त करणारे मायाजीत भव
बाबांच्या पदमगुणा मदतीची पात्र असलेली मुले मायेच्या आक्रमणाला आव्हान करतात की, तुझे काम आहे येणे आणि आमचे काम आहे विजय प्राप्त करणे. ते मायेच्या वाघ रूपाला मुंगी समजतात कारण जाणतात की हे मायेचे राज्य आता संपणार आहे, अनेकदा विजयी झालेल्या आम्हा आत्म्यांचा विजय १०० टक्के निश्चित आहे. या निश्चिततेचा नशा बाबांच्या पदमगुणा मदतीचा अधिकार प्राप्त करून देतो. या नशेद्वारे सहजच मायाजीत बनता.

बोधवाक्य:-
संकल्प शक्ती जमा करून स्व-प्रती आणि विश्वा-प्रती याचा प्रयोग करा.