26-08-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, तुम्ही हमी देता की, आम्ही आमच्याच योगबलाद्वारे या भारताला स्वर्ग बनविणार आहोत, तिथे एक धर्म, एक राज्य असेल”

प्रश्न:-
मायेच्या कोणत्या विघ्नापासून सुरक्षित राहणारे खूप चांगला चमत्कार करू शकतात?

उत्तर:-
मायेचे सर्वात मोठे विघ्न आहे - देह-अभिमानामध्ये आणून एकमेकांच्या नावा-रुपामध्ये अडकवणे. जी मुले या विघ्नापासून सुरक्षित राहतात, मायेच्या धोक्यापासून स्वतःला सुरक्षित ठेवतात, ते अनेक चमत्कार करून दाखवतात. त्यांच्या बुद्धीमध्ये सेवेचे नवीन-नवीन विचार चालत राहतात. सेवेची उन्नती तेव्हा होईल जेव्हा देही-अभिमानी बनाल.

ओम शांती।
बाबा आलेले आहेत रूहानी मुलांना श्रीमत देण्याकरिता. हे तर मुले जाणतात की, थोड्या वेळातच ड्रामा प्लॅन अनुसार सर्व कार्य होणार आहे. आपण रावण-पुरीला विष्णु-पुरी बनवतो. आता बाबा देखील गुप्त तर शिक्षण देखील गुप्त आहे. सेंटर्स तर भरपूर आहेत. छोट्या-मोठ्या गावांमध्ये सेंटर्स आहेत आणि मुले देखील पुष्कळ आहेत. दिवसेंदिवस अजूनच वाढत जातील. पुस्तकांमध्ये देखील लिहिता की, ‘आम्ही या भारतभूमीला स्वर्ग बनवूनच सोडू’. तुम्हाला ही भारत-भूमी अतिशय प्रिय आहे कारण तुम्ही जाणता की हा भारतच स्वर्ग होता. या गोष्टीला ५००० वर्षे झाली. भारत सुजलाम्-सुफलाम् होता. तुम्हा ब्रह्मामुखवंशावली मुलांनाच हे नॉलेज आहे. या भारताला श्रीमतावर स्वर्ग बनवावे लागेल. सर्वांना मार्ग सांगायचा आहे; इथे जास्त काही वादविवाद करण्याचा प्रश्नच नाही. आपसामध्ये बसून सल्लामसलत केली पाहिजे की या चित्रांद्वारे अशी कोणती जाहिरात करावी ज्यामुळे वर्तमानपत्रांमध्ये देखील ही चित्रे टाकू शकू. यावर आपसामध्ये परिसंवाद केला पाहिजे. जसे त्या गव्हर्नमेंटचे लोक आपसामध्ये भेटतात, सल्लामसलत करतात की भारतामध्ये आपण कशा सुधारणा कराव्या. हे जे इतके मतभेद झाले आहेत, त्यांना आपसामध्ये एकत्र आणून ठीक करून, भारतामध्ये सुख-शांती कशी स्थापन होईल. अशाप्रकारे तुम्ही देखील रुहानी पांडव गव्हर्मेंट आहात, हे खूप मोठे ईश्वरीय गव्हर्नमेंट आहे. पतित-पावन बाबाच पतित मुलांना पावन बनवून पावन दुनियेचा मालक बनवतात. हे रहस्य तुम्ही मुलेच जाणता. मुख्य आहेच भारताचा आदि सनातन देवी-देवता धर्म. हा आहे - ‘रुद्रज्ञान-यज्ञ’. ‘रुद्र’ म्हटले जाते - शिवबाबांना. आता तुम्हाला बाबांनी येऊन जागे केले आहे, तुम्ही मग इतरांना जागे करायचे आहे. ड्रामा प्लॅन अनुसार तुम्ही जागे करत राहता. आतापर्यंत ज्याने-ज्याने जसा-जसा पुरुषार्थ केला आहे, तितकाच कल्पा पूर्वी देखील केला होता. तुमचे हे रूहानी युद्ध (आत्मिक युद्ध) आहे. कधी मायेचा जोर असतो, कधी ईश्वराचा. कधी-कधी तर सेवा खूप चांगल्या वेगाने चालते. कधी बऱ्याच मुलांना मायेची विघ्ने येतात. माया एकदम बेशुद्ध करून टाकते. युद्धाचे मैदान तर आहे ना. माया, रामाच्या मुलांना बेशुद्ध करून टाकते. लव-कुशची कहाणी देखील आहे ना. रामाची दोन मुले दाखवली आहेत ना. इथे तर बाबांची असंख्य मुले आहेत. यावेळी सर्व मनुष्य कुंभकर्णाच्या निद्रेमध्ये झोपी गेले आहेत. ते, हे देखील जाणत नाहीत की, परमपिता परमात्मा आलेले आहेत - मुलांना वारसा देण्यासाठी. बाबा भारतामध्येच येतात. ही गोष्ट पूर्णपणे विसरून गेले आहेत. भारतवासीच स्वर्गाचे मालक होते, यामध्ये कोणताही संशय नाही. परमपिता परमात्म्याचा जन्म देखील इथे होतो तेव्हाच तर शिवजयंती भारतामध्ये साजरी करतात. तर जरूर त्यांनी येऊन काहीतरी केले असेल. बुद्धी म्हणते की, जरूर बाबांनी येऊन स्वर्गाची स्थापना केली असेल. प्रेरणेने स्थापना थोडीच करतील. इथे तर तुम्हा मुलांना राजयोग शिकवला जातो, आठवणीची यात्रा शिकवली जाते. प्रेरणेमध्ये कोणताही आवाज नसतो. समजतात की, शंकर प्रेरणे द्वारे विनाश करतो, परंतु यामध्ये प्रेरणेचा प्रश्नच नाही. तुम्हाला समजले आहे की ड्रामामध्ये त्यांचा पार्टच आहे - मुसळ (मिसाईल्स) बनविणे. ते विनाश करण्यासाठी निमित्त बनलेले आहेत. ‘प्रेरणा’ हा शब्द शास्त्रांमधला आहे, यामध्ये प्रेरणेची तर गोष्टच नाही. ड्रामा अनुसार विनाश तर होणारच आहे. गायले गेले आहे महाभारत लढाईमध्ये ही मुसळे (मिसाईल्स) इत्यादींचा उपयोग केला होता, जे घडून गेले आहे ते पुन्हा रिपीट होणार आहे. तुम्ही हमी देता की, योगबलाद्वारे स्वर्गाची स्थापना करणार, तिथे एकच धर्म असेल. तर मग बाकीचे सर्व धर्म कुठे असतील? जरूर नष्ट होतील. ही समजून घेण्याची गोष्ट आहे. गायले गेले आहे - ब्रह्मा द्वारा स्थापना, विष्णू द्वारा पालना तर ठीक आहे. परंतु शंकराला तर शिव सोबत एकत्र केले आहे, हे चुकीचे आहे. शिव-शंकर असे म्हणतात कारण शंकर तर काही काम करत नाही त्यामुळे त्याला शिव सोबत जोडले आहे. परंतु शिवबाबा म्हणतात - मला तर खूप काम करावे लागते. सर्वांना पावन बनवावे लागते. मी या ब्रह्मातनामध्ये प्रवेश करून या साकारद्वारे स्थापनेचे कार्य करवून घेतो. शंकराचा तर कोणताही पार्ट नाही. शिवची पूजा होते. ‘शिव’च कल्याणकारी झोळी भरणारे आहेत. ‘शिव परमात्माए नमः’ असे म्हणतात ना. हे ब्रह्मा देखील प्रजापिता आहेत. ब्रह्मा सो विष्णू, विष्णू सो ब्रह्मा या तर खूप रहस्यमय गोष्टी आहेत. या केवळ तुम्ही मुलेच जाणता. बुद्धिमान मुलांना बुद्धीमध्ये ज्ञान पटकन समजते. दुनियेतील लोकांना काहीच समजत नाही की, पतित-पावन बाबा केव्हा येतील! आता तर कलियुगाचा अंत आहे. जर असे म्हटले की कलियुगाच्या अंताला अजून ४० हजार वर्षे बाकी आहेत, तर आता अजून किती पतित बनतील? किती दुःख सहन करतील? कलियुगामध्ये सुख तर असणार नाही. काहीच जाणत नसल्याकारणाने बिचारे घोर अंधारामध्ये पडून आहेत.

तुम्हा मुलांना आपसामध्ये एकत्र येऊन, सेवेची वृद्धी कशी करता येईल याविषयी सल्ला मसलत केली पाहिजे. बाबा प्लॅन तर सांगत राहतात, मग मुलांनी आपसामध्ये एकत्र यायचे आहे. चित्रांवर चांगल्या रीतीने समजावून सांगायचे आहे. ही देखील ड्रामा अनुसार चित्रे बनत जात आहेत. मुले जाणतात की, जसजसा काळ लोटतो, हुबेहूब ड्रामा चालू राहतो. मुलांच्या अवस्था तर कधी वर, कधी खाली, हे होतच राहील. बाबा देखील साक्षी होऊन बघतात. कधी-कधी मुलांवर ग्रहचारी बसते तर त्याला नाहीसे करण्यासाठी प्रयत्न करवून घेतात. बाबा वारंवार सांगतात की, बाबांची आठवण करा. परंतु देह-अभिमानामध्ये येतात त्यामुळे अडखळत राहतात, यामध्ये देही-अभिमानी बनावे लागेल. परंतु मुलांमध्ये देह-अभिमान खूप आहे. तुम्ही देही-अभिमानी बना म्हणजे मग बाबांची आठवण राहील आणि मग सेवेमध्ये उन्नती देखील होत राहील. ज्यांना उच्च पद मिळवायचे आहे, ते सदैव सेवेमध्ये मग्न राहतील. भाग्यामध्ये जर नसेल तर पुरुषार्थ देखील करणार नाहीत. स्वतः म्हणतात की, ‘बाबा, आमच्याने धारणा होत नाही. बुद्धीमध्ये काही राहत नाही’. धारणा जर होत नसेल तर आनंद देखील टिकून राहत नाही. ज्यांना धारणा होते तर आनंद देखील टिकून राहतो. समजतात की, शिवबाबा आलेले आहेत. बाबा म्हणतात - ‘मुलांनो, तुम्ही चांगल्या रीतीने समजून घेऊन मग इतरांना देखील समजावून सांगा’. काहीजण मग सेवेला लागतात. पुरुषार्थ करत राहतात. तुम्ही मुले जाणता की, जो-जो सेकंद पास होत जातो तो ड्रामामध्ये नोंदलेला आहे, पुन्हा तो तसाच रिपीट होतो. मुलांनाच समजावून सांगितले जाते की बाहेर भाषण करतेवेळी तर अनेक प्रकारची माणसे येतात. तुम्ही मुले जाणता की सर्व वेद, शास्त्रे, गीता इत्यादी वरच भाषण करतात, त्यांना थोडेच हे माहिती आहे की, इथे ईश्वर आपले आणि या रचनेच्या आदि-मध्य-अंताचे रहस्य समजावून सांगत आहेत. चित्रांमध्ये किती चांगल्या रीतीने दाखविले आहे की परमात्मा कोण आहेत! या गोष्टी प्रोजेक्टरवर काही समजावून सांगू शकत नाही. प्रदर्शनीमध्ये चित्रे देखील समोर असतात आणि मग तुम्ही समजावून मग विचारू देखील शकता की, ‘आता सांगा की गीतेचे भगवान कोण आहेत? ज्ञानाचा सागर कोण आहेत? पवित्रता, सुख-शांतीचे सागर, लिबरेटर गाईड कोण आहेत?’ श्रीकृष्णासाठी तर म्हणू शकणार नाहीत. परमात्म्याची महिमा वेगळी आहे. अगोदर लिहून देखील घेतले पाहिजे, प्रोब घेतले पाहिजे (ज्यामध्ये व्यक्तीची पार्श्वभूमी, आवडीनिवडी, अनुभव इत्यादींबाबतचे प्रश्न अशी वैयक्तिक माहितीचे सर्वेक्षण करणारी प्रश्नावली भरून घेतली पाहिजे). सर्वांकडून सही देखील घेतली पाहिजे.

(हॉलमध्ये चिमण्या भांडत आहेत). यावेळी साऱ्या दुनियेमध्ये भांडण-तंटेच आहेत. सर्व आपसामध्ये भांडत राहतात. मनुष्यामध्ये ५ विकार देखील गायले जातात. पशूंची तर गोष्ट नाहीये. विशश वर्ल्ड आणि वाईसलेस वर्ल्ड (विकारी दुनिया आणि निर्विकारी दुनिया) मनुष्यांसाठीच म्हटले गेले आहे. कलियुगामध्ये आहे - आसुरी संप्रदाय, सतयुगामध्ये आहे - दैवी संप्रदाय. मनुष्य इतके तमोप्रधान-बुद्धी आहेत की जे अजिबातच समजत नाहीत की आपणच आसुरी-संप्रदाय आहोत. देवतांच्या समोर जाऊन गातात देखील की, ‘आम्हीच नीच-पापी आहोत, हम निर्गुण हारे मे कोई गुण नाही’. तुम्ही तर त्यांना सिद्ध करून सांगू शकता. शिडीच्या चित्रामध्ये अगदी स्पष्टपणे दर्शविले आहे. दाखविले आहे की कशी चढती कला आहे आणि मग उतरती कला आहे. भारतवासीयांसाठी मुख्य आहे शिडीचे चित्र. हे सर्वात उत्तम चित्र आहे. या चित्रावर खूप चांगल्या रीतीने समजावून सांगू शकता. ८४ जन्म पूर्ण करून मग पहिला नंबर घ्यायचा आहे आणि मग उतरत्या कलेमधून चढत्या कलेमध्ये जावे लागेल. प्रत्येकाचा विचार चालला पाहिजे की सर्वांना कशा रीतीने मार्ग सांगावा. जर विचारच चालले नाहीत तर तुम्ही सेवा कशी करणार. चित्रांवर समजावून सांगणे खूप सोपे होते. सतयुगानंतर शिडी उतरायचीच आहे. मुले जाणतात की आता आपण ट्रान्सफर होत आहोत. परंतु सरळ सतयुगामध्ये जात नाही. अगोदर शांतीधाममध्ये जायचे आहे. तुम्ही जाणता आपण पार्टधारी आहोत. बाकी तुमच्यामध्ये देखील नंबरवार आहेत जे स्वतःला या ड्रामातील पार्टधारी समजतात. दुनियेमध्ये असे कोणी म्हणू शकत नाही की, आम्ही पार्टधारी आहोत. आपण लिहितो देखील प्रत्येक मनुष्यमात्र या बेहद ड्रामाचे ॲक्टर्स असताना देखील ड्रामाच्या मुख्य ॲक्टर्स, डायरेक्टर आणि ड्रामाच्या आदि-मध्य-अंताला जाणत नाहीत, तर मग ते अडाणी आहेत. असे लिहिण्यास काहीच हरकत नाही; त्यामुळे एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देऊ नये. सेवा, सेवा आणि सेवा. बाबा जाणतात की मुलांवर कधी ग्रहचारी देखील बसते. जेव्हा ग्रहचारी बसते तेव्हा किती नुकसान होते, ते बाबाच जाणतात. श्रीमंत गरीब बनतात. कारण तर असते ना. खूपजणांना बाबा समजावून देखील सांगत राहतात - ‘मुलांनो, नावा-रूपामध्ये कधी फसू नका. नाहीतर माया अशी आहे जी नाकाला पकडून खड्ड्यातच घालते. माया खूप मोठा धोका देईल. आशिक-माशुक इथे बनायचे नाही. आशिक-माशुक काही विकारासाठी बनतात, आणि दुसरे मग फक्त रुपावर फिदा होतात. तुम्ही जाणता सेंटरवर देखील अशी मायेची विघ्ने खूप येतात, एकमेकांच्या नावा-रूपामध्ये फसतात. माया अशी प्रबळ आहे जी माता, मातेच्या नावा-रूपामध्ये; कन्या, कन्येच्या नावा-रूपामध्ये देखील अडकून पडतात. पुरुषार्थ करत असताना देखील माया एकदम पकडते; म्हणून बाबा सावधानी देतात की, ‘मुलांनो, माया फसवण्याचा खूप प्रयत्न करेल, परंतु तुम्हाला फसायचे नाहीये. देह-अभिमानामध्ये येता कामा नये. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करायची आहे. मायेच्या धोक्यापासून स्वतःला वाचवत राहायचे आहे. तुम्हा मुलांना बाबा गुल-गुल (फुल) बनविण्यासाठी आले आहेत, तुम्हाला कोणत्याही गोष्टीमध्ये संशय येता कामा नये. जर मनामध्ये संशय आला तर सेवा चांगल्या प्रकारे करू शकणार नाही. आतल्या आत घुसमटत रहाल. हिंमत ठेवली पाहिजे. वेळ फार थोडा आहे. बाबांची मुरली ऐकाल तर उत्साहामध्ये याल. आत्मप्रकाश बच्चा चांगल्या रीतीने चित्रांवर लक्ष देत आहे. बॉम्बेवाल्यांच्या देखील डोक्यामध्ये आले पाहिजे. मुख्य चित्राला आधी बनवावे लागेल. चेक केले पाहिजे, बाबा डायरेक्शन देत राहतात की कशा प्रकारे चित्रांमध्ये प्रगती झाली पाहिजे. अशी कोणती युक्ती करावी जेणेकरून शिडीचे चित्र एरोड्रमवर (विमातळावर) ठेवले जाईल. हे चित्र पाहून सर्वजण खुश होतील. शेवटी त्यांना समजेल की यांना मत देणारे कोण आहेत. तर मुलांना खूप नशा चढला पाहिजे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) तुम्ही मुले युद्धाच्या मैदानामध्ये आहात, माया रावणा सोबत तुमचे युद्ध आहे. माया खूप विघ्न घालते. मुलांना अतिशय सावध राहिले पाहिजे.

२) प्रत्येकाने आपल्या उन्नतीसाठी विचार केला पाहिजे. चित्रांवर कसे समजावून सांगावे, सेवा कशी वाढवावी. चित्रांमध्ये असे काय समाविष्ट करावे ज्यामुळे मनुष्यांना सहज समजेल.

वरदान:-
देह-अभिमानाच्या त्यागाद्वारे श्रेष्ठ भाग्य बनविणारे सिद्धी स्वरूप भव

देह-अभिमानाचा त्याग करणे अर्थात देही-अभिमानी बनल्यामुळे बाबांसोबत सर्व नात्यांचा, सर्व शक्तींचा अनुभव होतो; हा अनुभवच संगमयुगाचे सर्वश्रेष्ठ भाग्य आहे. विधात्या द्वारे मिळालेल्या या विधीला अंगीकारल्यामुळे वृद्धी देखील होईल आणि सर्व सिद्धी देखील प्राप्त होतील. देहधारीशी असलेल्या नात्यामागे अथवा स्नेहापोटी तर तुम्ही आपला ताज, तख्त आणि आपले सत्य स्वरूप सर्व सोडून दिले होते; तर मग आता बाबांच्या स्नेहापोटी देह-अभिमानाचा त्याग करू शकत नाही काय! याच एका त्यागामुळे सर्व प्रकारचे भाग्य प्राप्त होईल.

बोधवाक्य:-
क्रोध मुक्त बनायचे असेल तर स्वार्था ऐवजी नि:स्वार्थ बना, इच्छांच्या स्वरूपाला परिवर्तित करा.

हे अव्यक्त इशारे - अपवित्रतेच्या बीजाला सुद्धा नष्ट करून संपूर्ण स्वच्छ (पवित्र) बना.

बाबांसोबत तुम्ही सर्वांनी देखील विडा उचलला आहे की पवित्रतेद्वारे आम्ही प्रकृतीला देखील पावन करणार. तर हा संकल्प पूर्ण करण्यासाठी बापदादांची इच्छा आहे की, विश्वातील प्रत्येक मुलगा सर्वप्रथम लगाव मुक्त बनावा - भले मग ते साधनांपासून असो, अथवा व्यक्तींपासून असो. साधनांचा वापर करणे ही वेगळी गोष्ट आहे आणि लगाव (आसक्ती) वेगळी गोष्ट आहे. तर बापदादा प्रत्येक मुलाला पहिले लगाव-मुक्त बनवू इच्छित आहेत.