26-09-2024
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - कायम श्रीमतावर चालणे - हाच श्रेष्ठ पुरुषार्थ आहे, श्रीमतावर चालल्यानेच
आत्म्याचा दीपक जागृत होतो’’
प्रश्न:-
१ :- पूर्ण
पुरुषार्थ कोण करू शकतात? श्रेष्ठ पुरुषार्थ कोणता आहे?
उत्तर:-
पूर्णपणे पुरुषार्थ तेच करू शकतात ज्यांचे अटेंशन अथवा बुद्धियोग एका मध्येच आहे.
सर्वात श्रेष्ठ पुरुषार्थ आहे बाबांवर पूर्णपणे कुर्बान जाणे, कुर्बान जाणारी मुले
बाबांना अतिशय प्रिय वाटतात.
प्रश्न:-
२ :- खरी-खरी
दिवाळी साजरी करण्यासाठी बेहदचे बाबा कोणता सल्ला देतात?
उत्तर:-
मुलांनो, बेहदच्या पवित्रतेला धारण करा. जेव्हा इथे बेहद पवित्र बनाल, असा श्रेष्ठ
पुरुषार्थ कराल तेव्हाच लक्ष्मी-नारायणाच्या राज्यामध्ये जाऊ शकाल अर्थात खरी-खरी
दिवाळी अथवा राज्याभिषेकाचा दिवस साजरा करू शकाल.
ओम शांती।
मुले आता इथे बसून काय करत आहेत? चालता-फिरता अथवा इथे बसल्या-बसल्या
जन्म-जन्मांतरीची जी पापे डोक्यावर आहेत, त्या पापांचा आठवणीच्या यात्रेद्वारे
विनाश करत आहेत. हे तर आत्मा जाणते, जितकी मी बाबांची आठवण करेन तितकी पापे नष्ट
होत जातील. बाबांनी तर चांगल्या रीतीने समजावून सांगितले आहे - भले इथे बसले आहात
तरी देखील जे श्रीमतावर चालणारे आहेत, त्यांना तर बाबांचे मत चांगलेच वाटेल.
बेहदच्या बाबांचा सल्ला मिळतो - ‘बेहद पवित्र बनायचे आहे’. तुम्ही इथे आला आहात
बेहद पवित्र बनण्यासाठी आणि ते बनाल आठवणीच्या यात्रेद्वारेच. बरेचजण तर अजिबातच
आठवण करू शकत नाहीत, बरेचजण समजतात की, आम्ही आठवणीच्या यात्रेद्वारे आमची पापे
भस्म करत आहोत, म्हणजेच आपलेच कल्याण करत आहोत. बाहेरचे तर या गोष्टींना जाणत नाहीत.
तुम्हालाच बाबा मिळाले आहेत, तुम्ही राहताच बाबांसोबत. जाणता, आता आपण ईश्वरीय
संतान बनलो आहोत, पूर्वी आसुरी संतान होतो. आता आमचा संग ईश्वरीय मुलांसोबत आहे.
गायन देखील आहे ना - ‘संग तारे कुसंग डुबोये…’ मुलांना वेळो-वेळी हे विसरायला होते
की आपण ईश्वरीय संतान आहोत तर आपल्याला ईश्वरीय मतावरच चालायला हवे, आपल्या मनमतावर
नाही. ‘मनमत’ मनुष्य मताला म्हटले जाते. मनुष्य मत आसुरीच असते. जी मुले स्वतःचे
कल्याण करू इच्छितात ते बाबांची चांगल्या प्रकारे आठवण करत राहतात, सतोप्रधान
बनण्यासाठी. सतोप्रधान असणाऱ्याची देखील महिमा केली जाते. जाणतात खरोखर आपण नंबरवार
सुखधामचे मालक बनतो. जितके-जितके श्रीमतावर चालतात तितके उच्च पद प्राप्त करतात,
जितके आपल्याच मतावर चालाल तर पद भ्रष्ट होईल. आपले कल्याण करण्यासाठी बाबांचे
डायरेक्शन तर मिळतच राहते. बाबांनी सांगितले आहे - हा देखील पुरुषार्थ आहे, जे जितकी
आठवण करतात तर त्यांची देखील पापे नष्ट होतात. आठवणीच्या यात्रेशिवाय तर पवित्र बनू
शकणार नाही. उठता-बसता, चालता हीच काळजी करायची आहे. तुम्हा मुलांना किती
वर्षांपासून शिक्षण मिळत आहे तरी देखील समजतात आम्ही अजून खूप दूर आहोत. बाबांची
इतकी आठवण करू शकत नाही. सतोप्रधान बनण्यासाठी तर खूप वेळ लागेल. मधेच शरीर सुटले
तर कल्प-कल्पांतरासाठी पद कमी होईल. ईश्वराचे बनलो आहोत तर त्यांच्याकडून पूर्ण
वारसा घेण्याचा पुरुषार्थ केला पाहिजे. बुद्धी एकीकडेच राहिली पाहिजे. तुम्हाला आता
श्रीमत मिळते. ते आहेत सर्वश्रेष्ठ भगवान. त्यांच्या मतावर चाललो नाही तर खूप
नुकसान होईल. चालता की नाही, ते तर तुम्हीच जाणता आणि शिवबाबा जाणतात. तुम्हाला
पुरुषार्थ करायला लावणारे ते शिवबाबा आहेत. सर्व देहधारी पुरुषार्थ करतात. हे (ब्रह्मा
बाबा) देखील देहधारी आहेत, यांना शिवबाबा पुरुषार्थ करायला लावतात. मुलांनाच
पुरुषार्थ करायचा आहे. मूळ गोष्ट आहे पतितांना पावन बनविण्याची. तसेही दुनियेमध्ये
पावन तर खूप असतात. संन्यासी देखील पवित्र राहतात. ते तर एका जन्मासाठी पावन बनतात.
असे खूप आहेत जे या जन्मामध्ये बाल-ब्रह्मचारी राहतात. ते काही दुनियेला पवित्रतेची
मदत देऊ शकत नाहीत. मदत तेव्हा होईल जेव्हा की श्रीमतावर पावन बनतील आणि दुनियेला
पावन बनवतील.
आता तुम्हाला श्रीमत
मिळत आहे. जन्म-जन्मांतर तुम्ही आसुरी मतावर चालले आहात. आता तुम्ही जाणता सुखधामची
स्थापना होत आहे. जितके आपण श्रीमतावर पुरुषार्थ करु तितके उच्च पद प्राप्त होईल.
हे ब्रह्माचे मत नाहीये. हे तर पुरुषार्थी आहेत. यांचा पुरुषार्थ जरूर इतका उच्च आहे
तेव्हाच तर लक्ष्मी-नारायण बनतात. तर मुलांनी हे फॉलो करायचे आहे. श्रीमतावर चालावे
लागेल, मनमतावर नाही. आपल्या आत्म्याच्या ज्योतीला जागृत करायचे आहे. आता दीपावली
येते, सतयुगामध्ये दिवाळी नसते. फक्त राज्याभिषेक असतो. बाकी आत्मे तर सतोप्रधान
बनतात. ही जी दीपावली साजरी करतात, ती आहे खोटी. बाहेरचे दिवे पेटवतात, तिथे तर
घरा-घरामध्ये दीपक जागृत झालेला असतो अर्थात सर्वांची आत्मा सतोप्रधान असते. २१
जन्मांसाठी ज्ञान घृत पडते. मग हळू-हळू कमी होत-होत यावेळी साऱ्या दुनियेचीच ज्योत
विझून गेली आहे. यामध्ये देखील खास भारतवासी, आम दुनिया. आता पाप-आत्मे तर सर्व
आहेत, सर्वांच्या महाविनाशाची वेळ आहे, सर्वांना हिशोब चुकता करायचा आहे. आता तुम्हा
मुलांना पुरुषार्थ करायचा आहे उच्च ते उच्च पद प्राप्त करण्याचा, श्रीमतावर
चालल्यानेच प्राप्त कराल. रावण राज्यामध्ये तर शिवबाबांची खूप अवहेलना केली आहे. आता
देखील त्यांच्या आदेशावर चालला नाहीत तर खूप धोका खाल. त्यांनाच बोलावले आहे की,
‘येऊन आम्हाला पावन बनवा’. तर आता आपले कल्याण करण्यासाठी शिवबाबांच्या श्रीमतावर
चालावे लागेल. नाही तर खूप अकल्याण होईल. गोड-गोड मुलांनो, तुम्ही हे देखील जाणता -
शिवबाबांच्या आठवणी शिवाय आपण संपूर्ण पावन बनू शकत नाही. तुम्हाला इतकी वर्षे झाली
आहेत तरी देखील ज्ञानाची धारण का नाही होत? सोन्याच्या भांड्यामध्येच धारणा होईल.
नवीन मुले लगेच सर्विसेबल (सेवेमध्ये सक्षम) होतात. फरक पहा किती आहे. जुनी मुले
इतकी आठवणीच्या यात्रेमध्ये राहत नाहीत, जितकी नवीन राहतात. बरीच चांगली मुले
शिवबाबांची लाडकी मुले येतात, किती सेवा करतात. जणूकाही शिवबाबांवर आत्म्याला
कुर्बान केले आहे. कुर्बान केल्याने मग सेवा देखील किती करतात. किती प्रिय गोड
वाटतात. बाबांना मदत करतातच आठवणीच्या यात्रेमध्ये राहिल्याने. बाबा म्हणतात - माझी
आठवण करा तर तुम्ही पावन बनाल. मला बोलावलेच आहे की, येऊन आम्हाला पावन बनवा; तर
बाबा म्हणतात - माझी आठवण करत रहा. देहाच्या सर्व नात्यांचा त्याग करावा लागेल. एका
बाबांशिवाय मित्र-नातेवाईक इत्यादींची देखील आठवण राहू नये, तेव्हाच उच्च पद
प्राप्त करू शकाल. आठवण केली नाहीत तर उच्च पद प्राप्त करू शकणार नाही. हे बापदादा
देखील समजू शकतात. तुम्ही मुले सुद्धा जाणता. नवीन-नवीन येतात, समजतात दिवसेंदिवस
सुधारणा होत जाते. श्रीमतावर चालल्यानेच सुधारतात. क्रोधावर देखील पुरुषार्थ
करत-करत विजय प्राप्त करतात. तर बाबा देखील समजावून सांगत राहतात, आपल्यातील
त्रुटींना काढत रहा. क्रोध देखील अतिशय वाईट आहे. आतून स्वतःला देखील जाळतात आणि
इतरांना देखील जाळतात. तो देखील निघून गेला पाहिजे. मुले बाबांच्या श्रीमतावर चालत
नाहीत तर मग पद कमी होते, जन्म-जन्मांतरासाठी, कल्प-कल्पांतरासाठी नुकसान होते.
तुम्ही मुले जाणता की
ते आहे भौतिक शिक्षण, हे आहे रूहानी शिक्षण, जे रूहानी बाबा शिकवतात. सर्व प्रकारची
काळजी देखील घेतली जाते. कोणी विकारी इथे आतमध्ये (मधुबनमध्ये) येऊ शकत नाही.
आजारपणाच्या वेळी सुद्धा विकारी मित्र-नातेवाईक येणे, हे तर चांगले नाही. आपल्याला
ते आवडणार सुद्धा नाही. नाही तर अंतिम समयाला ते मित्र-नातेवाईकच आठवतील. मग तो
उच्च पद प्राप्त करू शकणार नाही. बाबा तर पुरुषार्थ करवून घेतात, कोणाचीही आठवण येऊ
नये. असे नाही, मी आजारी आहे म्हणून मित्र-नातेवाईक इत्यादींनी भेटण्यासाठी यावे.
नाही, त्यांना बोलावणे हा नियम नाही. नियम प्रमाण चालल्यानेच सद्गती होते. नाहीतर
फुकटचे आपलेच नुकसान करून घेतात. परंतु तमोप्रधान बुद्धी असलेले हे समजत नाहीत.
ईश्वर मत देतात तरी देखील सुधारत नाहीत. अतिशय काळजीपूर्वक चालले पाहिजे. हे आहे
होलीएस्ट ऑफ होली स्थान (सर्वश्रेठ पवित्र स्थान). इथे पतित राहू शकत नाहीत.
मित्र-नातेवाईक इत्यादी आठवत असतील तर मरतेवेळी जरूर त्यांचीच आठवण येईल.
देह-अभिमानामध्ये आल्याने आपलेच नुकसान करून घेतात. सजेचे निमित्त बनतात. श्रीमतावर
न चालल्यामुळे खूप दुर्गती होते. सेवेसाठी लायक बनू शकत नाहीत. कितीही डोकेफोड
करतील परंतु सेवेसाठी लायक बनू शकत नाहीत. अवज्ञा केली तर पत्थर-बुद्धि बनतात. वर
चढण्या ऐवजी खाली कोसळतात (अधोगती होते). बाबा तर म्हणतील, मुलांनी आज्ञाधारक बनले
पाहिजे. नाहीतर पद भ्रष्ट होईल. लौकिक पित्याची देखील ४-५ मुले असतात, परंतु
त्यामध्ये जी आज्ञाधारक असतात तीच मुले सर्वांना आवडतात. जे आज्ञाधारक नाहीत ते तर
दुःखच देतील. आता तुम्हा मुलांना दोन खूप मोठे पिता मिळाले आहेत, त्यांची अवज्ञा
करायची नाही. अवज्ञा कराल तर जन्म-जन्मांतर, कल्प-कल्पांतरासाठी अतिशय कमी दर्जाचे
पद प्राप्त कराल. पुरुषार्थ असा करायचा आहे जेणेकरून अंत समयी एका शिवबाबांचीच आठवण
यावी. बाबा म्हणतात - ‘मी समजू शकतो की प्रत्येकजण काय पुरुषार्थ करत आहे’. कोणी तर
फार थोडी आठवण करतात, बाकी मग आपल्या मित्र-नातेवाइकांचीच आठवण करत राहतात. ते
इतक्या आनंदामध्ये राहू शकत नाहीत. उच्च पद प्राप्त करू शकत नाहीत.
तुमचा तर रोजच
सतगुरुवार आहे. बृहस्पतीच्या दिवशी कॉलेजमध्ये बसतात. ती आहे भौतिक विद्या. ही आहे
रुहानी विद्या. तुम्ही जाणता शिवबाबा आमचे पिता, टिचर, सद्गुरु आहेत. तर त्यांच्या
डायरेक्शनवर चालले पाहिजे, तेव्हाच उच्च पद प्राप्त करू शकाल. जे पुरुषार्थी आहेत,
ते आतून आनंदित असतात; काही विचारू नका. स्वतः आनंदी आहेत तर इतरांना सुद्धा आनंदित
करण्याचा प्रयत्न करतात. मुली पहा रात्रं-दिवस किती मेहनत करत राहतात कारण हे
वंडरफुल ज्ञान आहे ना. बापदादांना दया येते की कितीतरी मुले अज्ञानापोटी किती
नुकसान करून घेतात. देह-अभिमानामध्ये येऊन आतल्या-आत खूप जळत राहतात. क्रोधामध्ये
मनुष्य तांब्या सारखा लाल होतो. क्रोध मनुष्यांना जाळतो, काम विकार काळे बनवतो. मोह
किंवा लोभामध्ये इतके जळत नाहीत. क्रोधामध्ये जळतात. क्रोधाचे भूत बहुतेकांमध्ये आहे.
किती भांडतात. भांडून आपलेच नुकसान करतात. निराकार आणि साकार दोघांचीही अवज्ञा
करतात. बाबा समजतात हे तर कु-पुत्र आहेत. मेहनत कराल तर उच्च पद प्राप्त कराल. तर
आपल्या कल्याणासाठी सर्व नाती विसरायची आहेत. एका बाबांशिवाय कोणाचीही आठवण करायची
नाही. घरामध्ये राहून नातेवाईकांना बघत असताना देखील शिवबाबांचीच आठवण करायची आहे.
तुम्ही आहात संगमयुगावर, आता आपल्या नवीन घराची, शांतीधामची आठवण करा.
हे तर बेहदचे शिक्षण
आहे ना. बाबा जी शिकवण देतात त्यामध्ये मुलांचाच फायदा आहे. बरीच मुले आपल्या बेछूट
वागण्यामुळे फुकटचे आपले नुकसान करून घेतात. पुरुषार्थ करतात विश्वाची बादशाही
घेण्यासाठी परंतु माया मांजर कान कापते. जन्म घेतला आहे, म्हणतात - आम्ही हे पद
प्राप्त करणार परंतु माया मांजर घेऊ देत नाही, तर पद भ्रष्ट होते. माया खूप जोराने
वार करते. तुम्ही इथे येता राज्य घेण्यासाठी. परंतु माया हैराण करते. बाबांना दया
येते बिचारे उच्च पद प्राप्त करतील तर चांगले आहे. माझी निंदा करणारा बनू नये.
‘सतगुरू का निंदक ठौर न पाये’, कोणाची निंदा? शिवबाबांची. असे वर्तन करायचे नाही
ज्यामुळे बाबांची निंदा होईल, यामध्ये अहंकाराची गोष्टच नाही. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) आपल्या
कल्याणासाठी देहाची सर्व नाती विसरायची आहेत, त्यांच्यासोबत प्रीत ठेवायची नाही.
ईश्वराच्याच मतावर चालायचे आहे, आपल्या मतावर नाही. कुसंगती पासून स्वतःला वाचवायचे
आहे, ईश्वरीय संगामध्ये रहायचे आहे.
२) क्रोध अतिशय वाईट
आहे, तो आपल्यालाच जाळतो, क्रोधाच्या अधीन होऊन अवज्ञा करायची नाही. आनंदी रहायचे
आहे आणि सर्वांना आनंदी ठेवण्याचा पुरुषार्थ करायचा आहे.
वरदान:-
स्नेहाच्या
रिटर्नमध्ये स्वतःला टर्न करून बाप समान बनणारे संपन्न आणि संपूर्ण भव
स्नेहाचे लक्षण आहे
ते आपल्या प्रिय व्यक्तीची कमजोरी पाहू शकत नाहीत. प्रिय व्यक्तीची चूक आपली चूक
समजतील. बाबा जेव्हा मुलांची कोणती गोष्ट ऐकतात तेव्हा त्यांना वाटते की, ही माझी
गोष्ट आहे. बाबा मुलांना आपल्या सारखे संपन्न आणि संपूर्ण पाहू इच्छितात. या
स्नेहाच्या रिटर्नमध्ये स्वतःला टर्न करा (स्वतःला बदला). भक्त तर मस्तक छाटून
देण्यासाठी सुद्धा तयार असतात; तुम्ही देहाचे डोके छाटू नका परंतु रावणाचे डोके छाटा.
बोधवाक्य:-
आपल्या रुहानी
व्हायब्रेशनद्वारे शक्तिशाली वायुमंडळ बनविण्याची सेवा करणे सर्वात श्रेष्ठ सेवा आहे.