26-09-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - कायम हीच स्मृती रहावी की आपण श्रीमतावर आपली सतयुगी राजधानी स्थापन करत
आहोत, तर अपार आनंद होईल”
प्रश्न:-
हे ज्ञानाचे
भोजन कोणत्या मुलांना पचू शकत नाही?
उत्तर:-
जे चुका करून, छी-छी (पतित) बनून मग क्लासमध्ये येऊन बसतात, त्यांना ज्ञान पचू शकत
नाही. ते मुखावाटे असे कधीही म्हणू शकत नाहीत की, ‘भगवानुवाच - काम महाशत्रू आहे’.
त्यांचे मन आतल्या आत खात राहील. ते आसुरी संप्रदायाचे बनतात.
ओम शांती।
बाबा बसून रूहानी मुलांना समजावून सांगतात, ते कोणते पिता आहेत, त्या पित्याची महिमा
तुम्हा मुलांना करायची आहे. गायले देखील जाते - सत् शिवबाबा, सत् शिव टीचर, सत् शिव
गुरु. सत्य तर तो आहे ना. तुम्ही मुले जाणता आम्हाला सत्य शिवबाबा मिळाला आहे. आम्ही
मुले आता श्रीमतावर एक मत बनत आहोत. तर श्रीमतावर चालले पाहिजे ना. बाबा म्हणतात -
एक तर देही-अभिमानी बना आणि बाबांची आठवण करा. जितकी आठवण कराल, स्वतःचे कल्याण
कराल. तुम्ही पुन्हा एकदा स्वतःची राजधानी स्थापन करत आहात. यापूर्वी देखील आपली
राजधानी होती. आपण देवी-देवता धर्माचेच ८४ जन्म भोगून, अंतिम जन्मामध्ये आता
संगमावर आहोत. या पुरुषोत्तम संगमयुगा बद्दल तुम्हा मुलांशिवाय इतर कोणालाही माहित
नाही आहे. बाबा किती पॉईंट्स देतात - मुलांनो, जर चांगल्या रीतीने आठवणीत रहाल तर
खूप आनंदी रहाल. परंतु बाबांची आठवण करण्याऐवजी इतर दुनियावी गोष्टींमध्ये पडतात.
ही आठवण राहिली पाहिजे की, आपण श्रीमतावर आपले राज्य स्थापन करत आहोत. गायले देखील
आहे - उच्च ते उच्च भगवान, त्यांचेच उच्च ते उच्च श्रीमत आहे. श्रीमत काय शिकवते?
सहज राजयोग. राजाईसाठी शिकवत आहेत. आपल्या पित्याद्वारे सृष्टीच्या आदि-मध्य-अंताला
जाणून मग दैवी गुण देखील धारण करायचे आहेत. बाबांशी कधी सामना करता कामा नये. बरीच
मुले स्वतःला सेवाभावी समजून अहंकारामध्ये येतात. असे पुष्कळ असतात. मग कधी-कुठे
हार खातात तेव्हा मग नशाच उडून जातो. तुम्ही माता तर अशिक्षित आहात. शिकलेल्या असता
तर कमाल करून दाखवली असती. पुरुषांमध्ये तरीदेखील शिकले-सवरलेले काही आहेत. तुम्हा
कुमारींना तर किती नाव रोशन केले पाहिजे. तुम्ही श्रीमतावर राजाई स्थापन केली होती.
नारी पासून लक्ष्मी बनला होता तर किती अभिमान वाटला पाहिजे. इथे तर बघा पाई-पैशाच्या
शिक्षणासाठी जीवन कुर्बान करत आहेत. अरे तुम्ही गोरे बनता मग काळे, तमोप्रधान
असणाऱ्यासोबत मन का गुंतवता. या कब्रस्तान मध्ये कधीही मन गुंतवायचे नाही. आपण तर
बाबांकडून वारसा घेत आहोत. जुन्या दुनियेमध्ये मन गुंतवणे अर्थात नरकात जाणे आहे.
बाबा येऊन दोजक पासून (नरकापासून) वाचवतात तरी देखील तोंड दोजकच्या दिशेला का करता.
तुमचे हे शिक्षण किती सोपे आहे. कोणी ऋषी-मुनीही जाणत नाहीत. ना कोणता टीचर, ना
कोणते ऋषी-मुनी समजावून सांगू शकतात. हे तर पिता-टीचर-गुरु देखील आहेत. ते गुरु लोक
शास्त्र ऐकवतात. त्यांना टीचर म्हणणार नाही; ते काही असे म्हणत नाहीत की आम्ही
दुनियेचा इतिहास-भूगोल ऐकवतो. ते तर शास्त्रांच्याच गोष्टी ऐकवतील. बाबा तुम्हाला
शास्त्रांचे सार समजावून सांगतात आणि मग दुनियेचा इतिहास-भूगोल देखील सांगतात. आता
हा टीचर चांगला की तो टीचर चांगला? त्या टीचर कडून तुम्ही कितीही शिका, कितीशे
कमावणार? ते देखील नशीब. शिकता-शिकता काही ॲक्सीडेंट झाला आणि मेला तर सारे शिक्षणच
संपले. इथे तुम्ही हे शिक्षण जितके म्हणून शिकाल, ते व्यर्थ जाणार नाही. परंतु हो,
श्रीमतावर न चालता काही उलटे चालू लागतात किंवा गटारात जाऊन कोसळतात (पतित होतात)
तर जितके शिकला ते काही नष्ट होत नाही, हे शिक्षण तर २१ जन्मांकरिता आहे. परंतु
कोसळल्यामुळे (पतन झाल्यामुळे) कल्प-कल्पांतरासाठी खूप-खूप नुकसान होते. बाबा
म्हणतात - ‘मुलांनो, काळे तोंड करू नका’. असे भरपूर आहेत जे तोंड काळे करून, छी-छी
बनून मग इथे येऊन बसतात. त्यांना हे ज्ञान कधीही पचणार नाही. अपचन होते. जो ऐकेल
त्याला अपचन होईल, मग तोंडाने कोणाला सांगू देखील शकणार नाही की, ‘भगवानुवाच - काम
महाशत्रू आहे, त्यावर विजय मिळवायचा आहे’. स्वतःच विजय प्राप्त करू शकत नाहीत तर
इतरांना कसे सांगणार! आतून मन खाईल ना! त्यांना म्हटले जाते आसुरी संप्रदाय, अमृत
पिता-पिता विष खातात तर १०० पटीने काळे बनतात. हाड्न हाड तुटून जाते.
तुम्हा मातांचे संघटन
तर खूप चांगले असले पाहिजे. एम ऑब्जेक्ट तर समोर आहे. तुम्ही जाणता या
लक्ष्मी-नारायणाच्या राज्यामध्ये एक देवी-देवता धर्म होता. एक राज्य, एक भाषा, १००
प्रतिशत प्योरिटी, पीस, प्रोस्पेरिटी (पवित्रता, शांती, संपन्नता) होती. त्याच एका
राज्याची आता बाबा स्थापना करत आहेत. हे आहे एम ऑब्जेक्ट. १०० प्रतिशत पवित्रता,
सुख, शांती, संपत्तीची स्थापना आता होत आहे. तुम्ही दाखवता विनाशानंतर श्रीकृष्ण
येत आहे. स्पष्ट लिहिले पाहिजे. सतयुगी एकच देवी-देवतांचे राज्य, एक भाषा, पवित्रता,
सुख, शांती पुन्हा स्थापन होत आहे. गव्हर्मेंटची इच्छा आहे ना. स्वर्ग असतोच मुळी
सतयुग-त्रेतामध्ये. परंतु मनुष्य स्वतःला नरकवासी थोडेच समजतात. तुम्ही लिहू शकता -
द्वापार-कलियुगामध्ये सर्व नरकवासी आहेत. आता तुम्ही संगमयुगी आहात. पूर्वी तुम्ही
देखील कलियुगी नरकवासी होता, आता तुम्ही स्वर्गवासी बनत आहात. भारताला स्वर्ग बनवत
आहात श्रीमतावर. परंतु ती हिंमत, संघटन असायला हवे. फेरफटका मारायला जाता तर हे
लक्ष्मी-नारायणाचे चित्र घेऊन जायला हवे. चांगले आहे. यामध्ये लिहा - आदि सनातन
देवी-देवता धर्म, सुख-शांतीचे राज्य स्थापन होत आहे - त्रिमूर्ती शिवबाबांच्या
श्रीमतावर. इतक्या मोठ्या-मोठ्या अक्षरांमध्ये मोठी-मोठी चित्रे असावीत. छोटी मुले
छोटी चित्रे पसंत करतात. अरे चित्र तर जितके मोठे असेल तितके चांगले. हे
लक्ष्मी-नारायणाचे चित्र तर खूप चांगले आहे. यामध्ये फक्त लिहायचे आहे - ‘एकमेव
सत्य त्रिमूर्ती शिवबाबा, सत्य त्रिमूर्ती शिव टीचर, सत्य त्रिमूर्ती शिव गुरु’.
त्रिमूर्ती शब्द लिहिला नाहीत तर समजतील परमात्मा तर निराकार आहेत, ते टीचर कसे असू
शकतात. ज्ञान तर नाही आहे ना. लक्ष्मी-नारायणाचे चित्र पत्र्याच्या शीटवर बनवून
प्रत्येक ठिकाणी ठेवायचे आहे, ही स्थापना होत आहे. बाबा आलेले आहेत, ब्रह्माद्वारे
एका धर्माची स्थापना आणि बाकी सर्वांचा विनाश करवतील. हा मुलांना सदैव नशा राहिला
पाहिजे. छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये एक मत होत नाही तर लगेच चिडतात. हे तर होतेच.
कोणी कोणत्या बाजूला, कोणी कोणत्या बाजूला, मग बहुमत असणाऱ्यांची बाजू उचलून धरली
जाते, यामध्ये नाराज होण्याचा प्रश्नच नाही. मुले रुसतात. आमची गोष्ट मान्य केली
गेली नाही. अरे, यामध्ये रुसण्यासारखे काय आहे. बाबा तर सर्वांना रिझविणारा (खुश
करणारा) आहे. मायेने सर्वांना रुसवले आहे, सर्वजण बाबांवर रुसलेले आहेत, रूसलेच काय
परंतु बाबांना ओळखतही नाहीत. ज्या बाबांनी स्वर्गाची बादशाही दिली त्यांना ओळखत
सुद्धा नाहीत. बाबा म्हणतात - मी तुमच्यावर उपकार करतो. तुम्ही मग माझ्यावर अपकार
करता. भारताची हालत बघा काय झाली आहे. तुमच्यातही फार थोडे आहेत ज्यांना नशा राहतो.
हा आहे नारायणी नशा. असे थोडेच म्हणायला हवे की, आम्ही तर राम-सीता बनणार. तुमचे एम
ऑब्जेक्टच आहे नरापासून नारायण बनणे. तुम्ही मग राम-सीता बनण्यामध्ये खुश होऊन जाता,
हिंमत दाखवली पाहिजे ना. जुन्या दुनियेमध्ये तर अजिबात मन गुंतवता कामा नये. कोणावर
मन जडले आणि मेले. जन्म-जन्मांतरीसाठीचे नुकसान होईल. बाबांकडून तर स्वर्गाचे सुख
मिळत आहे तर मग आपण नरकामध्ये का पडावे. बाबा म्हणतात - तुम्ही जेव्हा स्वर्गामध्ये
होता तेव्हा दुसरा कोणताही धर्म नव्हता. आता ड्रामा अनुसार तुमचा धर्म राहिलेला नाही
आहे. कोणीही स्वतःला देवता धर्माचा समजत नाही. मनुष्य असूनही स्वतःच्या धर्माला
जाणले नाही तर काय म्हटले जाईल. हिंदू काही धर्म थोडाच आहे. कोणी स्थापन केला, हे
देखील जाणत नाहीत. तुम्हा मुलांना किती समजावून सांगितले जाते. बाबा म्हणतात - मी
काळांचाही काळ आता आलो आहे - सर्वांना परत घेऊन जाण्यासाठी. बाकी जे चांगल्या रीतीने
शिकतील ते विश्वाचे मालक बनतील. आता चला घरी. इथे राहण्याजोगे नाहीये, आसूरी मतावर
चालून खूप कचरा केला आहे. बाबा तर असे म्हणतील ना - तुम्ही भारतवासी जे विश्वाचे
मालक होता, आता किती ठोकरा खात आहात. लाज नाही वाटत का? तुमच्यातही काही आहेत जे
चांगल्या रीतीने समजतात. नंबरवार तर आहेत ना. बरीच मुले तर झोपेतच असतात. तो आनंदाचा
पारा चढत नाही. बाबा आपल्याला पुन्हा राजधानी देत आहेत. बाबा म्हणतात - या साधू
इत्यादींचा देखील मी उद्धार करतो. ते ना स्वतःला, ना दुसऱ्यांना मुक्ती देऊ शकतात.
खरा गुरु तर एकच सद्गुरु आहे, जे संगमावर येऊन सर्वांची सद्गती करतात. बाबा म्हणतात
- मी येतोच कल्पाच्या संगम युगे युगे, जेव्हा मला साऱ्या दुनियेला पावन बनवायचे आहे.
मनुष्य समजतात बाबा सर्वशक्तीमान आहेत, ते काय नाही करू शकत. अरे, मला बोलावताच की,
‘आम्हा पतितांना पावन बनवा’; तर मी येऊन पावन बनवतो. बाकी अजून काय करणार. बाकी
रिद्धी-सिद्धीवाले तर भरपूर आहेत, माझे कामच आहे नरकाला स्वर्ग बनविणे. तो तर ५
हजार वर्षानंतर बनतो. हे तुम्हीच जाणता. आदि सनातन आहे देवी-देवता धर्म. बाकी तर
सर्व नंतर मागाहून आले आहेत. अरविंद घोष तर आत्ता आले आहेत तरी देखील बघा त्यांचे
किती आश्रम बनले आहेत. तिथे काही निर्विकारी बनण्याची गोष्ट थोडीच होते. ते तर
समजतात गृहस्थीमध्ये राहून कोणीही पवित्र राहू शकत नाही. बाबा म्हणतात - गृहस्थ
व्यवहारामध्ये रहात असताना फक्त एक जन्म पवित्र रहा. तुम्ही जन्म-जन्मांतर तर पतित
होत राहिले आहात. आता मी आलो आहे तुम्हाला पावन बनविण्यासाठी. हा अंतिम जन्म पावन
बना. सतयुग-त्रेतामध्ये तर विकार असतही नाहीत.
हे लक्ष्मी-नारायणाचे
चित्र आणि शिडीचे चित्र खूप चांगले आहे. यामध्ये लिहिलेले आहे - सतयुगामध्ये एक
धर्म, एक राज्य होते. समजावून सांगण्याची चांगली युक्ती पाहिजे. वृद्ध मातांना
देखील शिकवून तयार केले पाहिजे, जेणेकरून प्रदर्शनीमध्ये थोडेफार सांगू शकतील.
कोणालाही हे चित्र दाखवून बोला - यांचे राज्य होते ना. आता तर नाहीये. बाबा म्हणतात
- आता तुम्ही माझी आठवण करा तर तुम्ही पावन बनून पावन दुनियेमध्ये निघून जाल. आता
पावन दुनिया स्थापन होत आहे. किती सोपे आहे. म्हाताऱ्या बसून प्रदर्शनी बद्दल
समजावून सांगतील तर नाव प्रसिद्ध होईल. श्रीकृष्णाच्या चित्रामध्ये देखील लिखाण खूप
सुंदर आहे. सांगितले पाहिजे हे लिहिलेले जरूर वाचा. हे वाचताच तुम्हाला नारायणी नशा
अथवा विश्वाच्या मालक पणाचा नशा चढेल.
बाबा म्हणतात - मी
तुम्हाला असे लक्ष्मी-नारायण बनवतो तर तुम्हाला देखील इतरांवर दयाळू बनले पाहिजे.
जेव्हा आपले कल्याण कराल तेव्हाच दुसऱ्यांचे देखील करू शकाल. वृद्ध मातांना शिकवून
इतके हुशार बनवा जेणेकरून बाबा म्हणतील की, प्रदर्शनीसाठी ८-१० वृद्ध मातांना पाठवा
तर लगेच याव्यात. ‘जो करेगा सो पायेगा’. समोर एम ऑब्जेक्टला पाहूनच आनंद होतो. आपण
हे शरीर सोडून जाऊन विश्वाचे मालक बनणार. जितके आठवणीमध्ये रहाल तितकी पापे भस्म
होतील. बघा लिफाफ्यावर छापले आहे - ‘वन रिलिजन, वन डीटी किंग्डम, वन लँग्वेज… (एक
धर्म, एक दैवी राज्य, एक भाषा) ती लवकरच स्थापन होईल. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) कधीही
आपसामध्ये किंवा बाबांवर रुसायचे नाही, बाबा खुश करण्यासाठी आले आहेत त्यामुळे कधीही
नाराज व्हायचे नाही. बाबांशी सामना करायचा नाही.
२) जुन्या दुनियेवर,
जुन्या देहावर मन गुंतवायचे नाही. सत् बाप, सत् टीचर, आणि सद्गुरु सोबत सच्चे रहायचे
आहे. कायम एकाच्या श्रीमतावर चालून देही-अभिमानी बनायचे आहे.
वरदान:-
आपल्या तपस्वी
स्वरूपाद्वारे सर्वांना प्राप्तींची अनुभूती करविणारे मास्टर विधाता भव
जसे सूर्य विश्वाला
प्रकाशाची आणि अनेक विनाशी प्राप्तींची अनुभूती करवितो तसे तुम्ही तपस्वी आत्मे
आपल्या तपस्वी स्वरूपा द्वारे सर्वांना प्राप्तीच्या किरणांची अनुभूती करवा. यासाठी
आधी जमेचे खाते वाढवा. मग जमा केलेले खजिने मास्टर विधाता बनून देत जा. तपस्वीमुर्त
चा अर्थच आहे - तपस्ये द्वारे शांतीच्या शक्तीची किरणे चोहो बाजूंना पसरत असल्याचा
अनुभव व्हावा.
बोधवाक्य:-
स्वतः निर्माण
बनून सर्वांना मान देत चला - हाच खरा परोपकार आहे.
अव्यक्त इशारे:- आता
लगनच्या (एकाग्रतेच्या) अग्नीला प्रज्वलित करून योगाला ज्वाला रूपी बनवा. आता
चांगले-चांगले म्हणत आहेत, परंतु चांगले बनायचे आहे ही प्रेरणा मिळत नाहीये. त्याचे
एकच साधन आहे - संघटित रूपामध्ये ज्वाला स्वरूप बना. प्रत्येकाने चैतन्य लाईट हाऊस
बना. सेवाधारी आहात, स्नेही आहात, एक बल एक भरोसे वाले आहात, हे तर सर्व ठीक आहे,
परंतु मास्टर सर्वशक्तिवान ची स्टेज, स्टेजवर यावी तेव्हा सर्वजण तुमच्यासमोर
परवान्या प्रमाणे फेऱ्या मारू लागतील.