26-10-25 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
15.10.2007 ओम शान्ति
मधुबन
“संगमयुगाच्या
जीवनमुक्त स्थितीचा अनुभव करण्यासाठी सर्व ओझे अथवा बंधन बाबांना देऊन डबल लाईट बना”
आज विश्व रचता बापदादा
आपली पहिली रचना अति लवली आणि लक्की (लाडक्या आणि भाग्यवान) मुलांसोबत भेटीचा सोहळा
साजरा करत आहेत. बरीच मुले सन्मुख आहेत, डोळ्यांनी पहात आहेत आणि चोहो बाजूंची बरीच
मुले हृदयामध्ये सामावलेली आहेत. बापदादा प्रत्येक मुलाच्या मस्तकामध्ये तीन
भाग्याचे तीन तारे चमकत असलेले बघत आहेत. एक भाग्य आहे - बापदादांच्या श्रेष्ठ
पालनेचे, दुसरे आहे शिक्षकाद्वारे शिक्षणाचे, तिसरे आहे सद्गुरू द्वारे सर्व
वरदानांनी चमकत असलेला तारा. तर तुम्ही सर्व जण आपल्या मस्तकावर चमकत असलेले तारे
अनुभव करत आहात ना! सर्व नाती बापदादांसोबत आहेत तरी देखील जीवनामध्ये ही तीन नाती
आवश्यक आहेत आणि तुम्ही सर्व सिकीलध्या (खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या) लाडक्या
मुलांना सहजपणे प्राप्त आहेत. प्राप्त आहेत ना! नशा आहे ना! हृदयामध्ये गीत गात
राहता ना - वाह! बाबा वाह! वाह! शिक्षक वाह! वाह! सतगुरु वाह! दुनियावाले तर लौकिक
गुरु ज्यांना महान-आत्मा म्हणतात, त्यांच्या द्वारे एक वरदान प्राप्त करण्यासाठी
देखील किती प्रयत्न करतात आणि तुम्हाला बाबांनी जन्मत:च सहज वरदानांनी संपन्न केले
आहे. इतके श्रेष्ठ भाग्य, स्वप्नामध्ये तरी विचार केला होता का की ईश्वर पिता
आपल्यावर इतके बलिहार जातील! भक्त लोक भगवंताची गाणी गातात आणि ईश्वर पिता कोणाची
गाणी गातात? तुम्हा लकी (भाग्यवान) मुलांची.
आत्ता देखील तुम्ही
सर्व विविध देशांमधून कोणत्या विमानाने आला आहात? स्थूल विमानांमधून की परमात्म
प्रेमाच्या विमानामधून सर्व बाजूंनी पोहोचला आहात! परमात्म विमान किती सहज घेऊन येते,
कसलाही त्रास नाही. तर सर्व जण परमात्म प्रेमाच्या विमानाने पोहोचला आहात याची
मुबारक असो, मुबारक असो, मुबारक असो. बापदादा एका-एका मुलाला पाहून भले पहिल्यांदाच
आले आहेत, किंवा खूप काळापासून येत आहेत. परंतु बापदादा प्रत्येक मुलाच्या विशेषतेला
जाणतात. बापदादांचा कोणताही मुलगा भले लहान आहे, किंवा मोठा आहे, किंवा महावीर आहे,
नाहीतर पुरुषार्थी आहे, परंतु प्रत्येक मुलगा सिकीलधा आहे, असे का? तुम्ही तर
बाबांना शोधलेत, सापडले नाहीत, परंतु बापदादांनी तुम्हा प्रत्येक मुलाला अतिशय
प्रेमाने, आपुलकीने, वात्सल्याने काना-कोपऱ्यातून शोधून काढले आहे. तर लाडके आहात
तेव्हाच तर शोधले; कारण बाबा जाणतात की, माझा एकही कोणता मुलगा असा नाही
ज्याच्यामध्ये कोणतीच विशेषता नसेल. प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या विशेषतेनेच आणले
आहे. कमीत-कमी गुप्त रुपामध्ये आलेल्या बाबांना तरी ओळखले. ‘माझे बाबा’ म्हटले,
सर्व जण म्हणता ना माझे बाबा! कोणी आहेत जे म्हणतात - ‘माझे नाही, तुझे बाबा’, कोणी
आहे? सर्व जण म्हणतात - ‘माझे बाबा’. तर विशेष आहे ना. इतके मोठे-मोठे वैज्ञानिक,
मोठे-मोठे व्ही.आय.पी. ओळखू शकले नाहीत, परंतु तुम्ही सर्वांनी तर ओळखले ना. आपले
बनवले ना. तर बाबांनी सुद्धा आपले बनवले. याच आनंदामध्ये पालना घेत उडत आहात ना!
उडत आहात, चालत नाही आहात, उडत आहात कारण की चालणारे बाबांच्या सोबत आपल्या घरी जाऊ
शकणार नाहीत; कारण बाबा तर उडणारे आहेत, तर चालणारे सोबत कसे पोहोचतील! म्हणून बाबा
सर्व मुलांना कोणते वरदान देतात? फरिश्ता स्वरूप भव. फरिश्ता उडतो, चालत नाही, उडतो.
तर तुम्ही सर्व जण उडती कला वाले आहात ना! आहात का? हात वर करा जे उडती कला वाले
आहेत, की कधी चलती कला, कधी उडती कला? नाही ना? सदा उडणारे, डबल लाईट आहात ना! का?
विचार करा, बाबांनी तुम्हा सर्वांकडून गॅरेंटी घेतली आहे की जे पण कोणत्याही
प्रकारचे ओझे जर मनामध्ये, बुद्धीमध्ये असेल तर बाबांना देऊन टाका, बाबा
घेण्यासाठीच आले आहेत. तर बाबांना ओझे दिले आहे की थोडे-थोडे सांभाळून ठेवले आहे?
जेव्हा घेणारा घेत आहे, तर ओझे देण्यामध्ये देखील विचार करण्याची गोष्ट आहे काय? की
६३ जन्मांची सवय आहे ओझे सांभाळून ठेवण्याची? तर बरीच मुले कधी-कधी म्हणतात इच्छा
नाही आहे, परंतु सवयीपुढे मजबूर आहोत. आता तर मजबूर नाही आहात ना? मजबूर आहात की
मजबूत आहात? कधीही मजबूर बनू नका. मजबूत आहात. शक्तिंनो तुम्ही मजबूत आहात की मजबूर
आहात? मजबूत आहात ना? ओझे ठेवून घ्यायला चांगले वाटते काय? ओझ्यावर मन जडले आहे काय?
सोडा, सोडाल तर सुटाल. सोडत नाही त्यामुळे सुटत नाही. सोडण्याचे साधन आहे - दृढ
संकल्प. बरीच मुले म्हणतात - दृढ संकल्प तर करतो, परंतु, परंतु... कारण काय आहे?
दृढ संकल्प करता परंतु केलेल्या दृढ संकल्पाला रिवाइज करत नाही. पुन्हा-पुन्हा
मनामध्ये रिवाइज करा आणि रियलाईज करा (उजळणी करा आणि अनुभव करा), ओझे काय आहे आणि
डबल लाईटचा अनुभव काय आहे! रीयलाइजेशनचा कोर्स (अनुभूतीचा कोर्स) आता थोडा अजून
अंडरलाईन करा. बोलणे आणि विचार करणे हे करता, परंतु मनापासून रियलाईज (अनुभव) करा
की, ओझे काय आहे आणि डबल लाईट काय असते? फरक समोर ठेवा कारण बापदादा आता समयाच्या
समीपतेनुसार प्रत्येक मुलामध्ये काय बघू इच्छितात? जे म्हणता ते करून दाखवायचे आहे.
जो विचार करता तो स्वरूपामध्ये आणायचा आहे; कारण बाबांचा वारसा आहे, जन्मसिद्ध
अधिकार आहे - मुक्ति आणि जीवनमुक्ती. सर्वांना निमंत्रण सुद्धा हेच देता ना की,
येऊन मुक्ति-जीवनमुक्तीचा वारसा प्राप्त करा. तर स्वतःला विचारा - मुक्तिधाममध्ये
मुक्तीचा अनुभव करायचा आहे का सतयुगामध्ये जीवनमुक्तीचा अनुभव करायचा आहे की आत्ता
संगमयुगामध्ये मुक्ति, जीवनमुक्तीचा संस्कार बनवायचा आहे? कारण तुम्ही म्हणता की,
आम्ही आता आपल्या ईश्वरीय संस्कारांद्वारे दैवी संस्कार बनवणार आहोत. आपल्या
संस्कारांनी नवीन संसार बनवत आहोत. तर आता संगमावरच मुक्ति-जीवनमुक्तीचे संस्कार
इमर्ज पाहिजेत ना! तर चेक करा सर्व बंधनांमधून मन आणि बुद्धी मुक्त झाली आहे? कारण
ब्राह्मण जीवनामध्ये कितीतरी गोष्टींमधून जी पास्ट लाईफ मधील बंधने आहेत, त्यापासून
मुक्त झाला आहात. परंतु सर्व बंधनांमधून मुक्त आहात की कोणते ना कोणते बंधन अजूनही
आपल्या बंधनामध्ये बांधून ठेवते? या ब्राह्मण जीवनामध्ये मुक्ति-जीवनमुक्तीचा अनुभव
करणे हीच ब्राह्मण जीवनाची श्रेष्ठता आहे कारण सतयुगामध्ये जीवनमुक्त आणि जीवनबंधन
दोन्हीचेही ज्ञानच असणार नाही. आता तुम्ही अनुभव करू शकता, जीवनबंधन काय आहे, आणि
जीवनमुक्त स्थिती काय आहे, कारण तुम्हा सर्वांचा वायदा आहे, अनेक वेळा वायदा केला
आहे, कोणता वायदा करता? लक्षात आहे? कोणालाही विचारले की तुमच्या या ब्राह्मण
जीवनाचे लक्ष्य काय आहे? तर काय उत्तर देता? बाप समान बनायचे आहे. पक्के आहे ना?
बाप समान बनायचे आहे ना? का थोडे थोडे बनायचे आहे? समान बनायचे आहे ना! समान बनायचे
आहे की थोडे जरी बनलो तरी चालेल! असे चालेल? त्याला समान तर म्हटले जाणार नाही ना!
तर बाबा मुक्त आहे, की बंधन आहे? जर कोणत्याही प्रकारचे भले मग देहाचे असो, किंवा
कोणते देहाच्या संबंधाचे, माता पिता बंधू सखा नाही, देहाच्या सोबत कर्मेंद्रियांचा
जो संबंध आहे, त्या कोणत्याही कर्मेंद्रियांच्या संबंधाचे बंधन आहे, सवयीचे बंधन आहे,
स्वभावाचे बंधन आहे, जुन्या संस्कारांचे बंधन आहे, तर बाप समान कसे झालात? आणि रोज
वायदा करता की, बाप समान बनायचेच आहे. हात वर करायला सांगितले तर सगळे काय म्हणता?
लक्ष्मी-नारायण बनायचे आहे. बापदादांना आनंद होतो, वायदे खूप चांगले-चांगले करता
परंतु तुम्ही वायद्याचा फायदा घेत नाही. वायदा आणि फायदा याचा बॅलन्स ओळखत नाही.
वायद्यांची फाईल बापदादांपाशी खूप-खूप-खूप मोठी आहे, सर्वांची फाईल आहे. अशीच
फायद्याची सुद्धा फाईल असावी, बॅलन्स असावा तर किती छान वाटेल.
या सेंटर्सच्या
टीचर्स बसल्या आहेत ना. हे सुद्धा सेंटर निवासी बसले आहेत ना? तर समान बनणारे झाले
ना. सेंटर निवासी निमित्त बनलेली मुले तर समान हवीत ना? आहेत देखील परंतु कधी-कधी
थोडे नटखट (खोडकर) होतात. बापदादा तर सर्व मुलांची साऱ्या दिवसाची हाल आणि चाल (स्थिती
आणि वर्तन) दोन्ही बघत असतात. तुमची दादी देखील वतनमध्ये होती ना, तर दादी सुद्धा
पाहत होती तर काय म्हणत होती, माहित आहे? म्हणत होती बाबा असे देखील आहे का? असे
होते, असे करतात, तुम्ही बघत असता? ऐकले, तुमच्या दादीने काय पाहिले. आता बापदादा
हेच पाहू इच्छितात की, प्रत्येक मुलाने मुक्ती-जीवनमुक्तीच्या वारशाचा अधिकारी बनावे,
कारण वारसा आताच मिळतो. सतयुगामध्ये तर नॅचरल लाईफ असेल, आताच्या अभ्यासाची नॅचरल
लाईफ, परंतु वारशाचा अधिकार आता संगमावर आहे म्हणून बापदादा हेच इच्छितात की
प्रत्येकाने स्वतः चेक करावे, जर कोणतेही बंधन खेचत असेल, तर कोणते कारण आहे याचा
विचार करा. कारणाचा विचार करा आणि कारणा सोबत निवारणाचा देखील विचार करा. निवारण
बापदादांनी अनेकदा वेगवेगळ्या रूपामध्ये दिले आहे. सर्वशक्तींचे वरदान दिले आहे,
सर्वगुणांचा खजिना दिला आहे, खजिन्याला यूज केल्याने खजिना वाढतो. खजिना सर्वांपाशी
आहे, बापदादांनी पाहिले आहे. प्रत्येकाच्या स्टॉकला देखील पाहतात. बुद्धी आहे -
स्टॉक रूम. तर बापदादांनी सर्वांचा स्टॉक पाहिला आहे. स्टॉकमध्ये आहे परंतु
खजिन्याला वेळेवर यूज करत नाहीत. केवळ पॉईंटच्या रूपामध्ये विचार करतात, हां, असे
करायचे नाही, असे करायचे आहे, पॉईंटच्या रूपाने यूज करतात, विचार करतात परंतु पॉईंट
बनून पॉईंटला यूज करत नाहीत म्हणून पॉईंट राहून जातो, पॉईंट बनून यूज करा तर निवारण
होईल. बोलतात देखील - ‘असे करायचे नाहीये’ आणि मग विसरून सुद्धा जातात. बोलण्यासोबत
विसरून देखील जाता. इतकी सोपी विधी सांगितली आहे, संगमयुगामध्ये केवळ बिंदूचीच कमाल
आहे, बस्स, बिंदू यूज करा इतर कोणत्या मात्रेची गरजच नाही. तीन बिंदूंना यूज करा.
आत्मा बिंदू, बाबा बिंदू आणि ड्रामा बिंदू. तीन बिंदू यूज करत रहा तर बाप समान बनणे
काही अवघड नाही. लावू इच्छिता बिंदू परंतु लावते वेळी हात हलतो, तर प्रश्नचिन्ह होते
किंवा आश्चर्याची मात्रा बनते. तिथे हात हलतो, इथे बुद्धी हलते. नाही तर तीन बिंदूना
लक्षात ठेवणे काही अवघड आहे काय? बापदादांनी तर दुसरी देखील सोपी युक्ती सांगितली
आहे, ती कोणती? आशीर्वाद द्या आणि आशीर्वाद घ्या. अच्छा, योग शक्तीशाली लागत नाही,
धारणा थोडी कमी होते, भाषण करण्याची हिम्मत होत नाही, परंतु आशीर्वाद द्या आणि
आशीर्वाद घ्या, फक्त एकच गोष्ट करा बाकीचे सर्व सोडून द्या, एक गोष्ट करा, आशीर्वाद
घ्यायचे आहेत आणि आशीर्वाद द्यायचे आहेत. काहीही होऊ दे, कोणी काहीही देवो परंतु मला
आशीर्वाद द्यायचे आहेत, घ्यायचे आहेत. एक गोष्ट पक्की करा, यामध्ये सर्वकाही येईल.
जर आशीर्वाद द्याल आणि आशीर्वाद घ्याल तर काय यामध्ये सर्व शक्ती आणि गुण येणार
नाहीत काय? ऑटोमेटिकली येतील ना! एकच लक्ष्य ठेवा, करून पहा, एक दिवस अभ्यास करून
पहा, मग सात दिवस करून पहा, चला बाकीच्या गोष्टी बुद्धीमध्ये येत नाहीत, एवढी एक तर
येईल. काहीही होवो परंतु आशीर्वाद द्यायचे आहेत आणि घ्यायचे आहेत. एवढे तर करू शकता
ना की नाही? करू शकता ना? अच्छा, तर जेव्हा पण जाल ना तर हे ट्राय करा. यामध्ये सगळे
आपोआप योगयुक्त होतील कारण वेस्ट कर्म करणारच नाहीत तर योगयुक्त झालेच ना. परंतु
लक्ष्य ठेवा आशीर्वाद द्यायचे आहेत, आशीर्वाद घ्यायचे आहेत. कोणी काहीही देवो, शाप
सुद्धा मिळतील, क्रोधाच्या गोष्टी सुद्धा येतील परंतु वायदा कराल ना, तर माया देखील
ऐकत आहे, की हे वायदा करतील, मग ती सुद्धा आपले काम तर करेल ना. एकदा का मायाजीत
बनलात की मग करणार नाही, आता तर मायाजीत बनत आहात ना, तर ती आपले काम करेल परंतु मला
आशीर्वाद द्यायचे आहेत आणि आशीर्वाद घ्यायचे आहेत. होऊ शकते? हात वर करा जे म्हणतात
होऊ शकते. अच्छा, शक्तींनो हात वर करा. हां, होऊ शकते ना? सर्व ठिकाणच्या टीचर्स
आल्या आहेत ना. तर जेव्हा तुम्ही आपल्या देशामध्ये जाल तेव्हा सर्वप्रथम सर्वांनी
एक आठवडा हा होमवर्क करायचा आहे आणि रिजल्ट पाठवायचा आहे, एकूण क्लासचे मेंबर्स किती
आहेत, किती ओ.के. आहेत आणि किती थोडे कच्चे आणि किती पक्के आहेत, तर ओ. के. च्या मधे
रेषा मारा; बस्स, असा समाचार द्या. इतके जण ओ.के., इतक्या जणांना ओ. के. मधे रेषा
मारावी लागली आहे. यामध्ये पहा डबल फॉरेनर्स आले आहेत तर डबल काम करतील ना. एक
आठवड्याचा रिजल्ट पाठवा मग बापदादा पाहतील, सोपे आहे ना, कठीण तर नाहीये. माया येईल,
तुम्ही म्हणाल - ‘बाबा, मला तर अगोदर असा संकल्प कधी येत नव्हता, आता आला, असे होईल,
परंतु दृढनिश्चय असणाऱ्याचा निश्चित विजय आहे. दृढतेचे फळ आहे - सफलता. सफलता
नसल्याकारणाने दृढतेची कमी. तर दृढतेची सफलता प्राप्त करायचीच आहे.
जशी सेवा
उमंग-उत्साहाने करत आहात तशी स्वतःची, स्वयं प्रति सेवा, स्व सेवा आणि विश्व सेवा,
स्व सेवा अर्थात चेक करणे आणि स्वतःला बाप समान बनवणे. कोणतीही कमी, कमजोरी बाबांना
द्या, ठेवली कशासाठी आहे, बाबांना आवडत नाही. कशाला कमजोरी ठेवून घेता? द्या ना.
देताना लहान मूल व्हा. जसे लहान मूल कोणतीही वस्तू सांभाळू शकत नसेल, कोणतीही वस्तू
आवडत नसेल तर काय करते? मम्मी-पप्पा, हे तुम्ही घ्या. असेच कोणत्याही प्रकारचे ओझे,
बंधन जे चांगले वाटत नाही, कारण बापदादा पाहतात, एका बाजूला असा विचार करत आहेत,
चांगले तर नाहीये, ठीक तर नाहीये परंतु काय करू, कसे करू… तर असे तर चांगले नाही.
एका बाजूला चांगले नाही असे म्हणता आणि दुसऱ्या बाजूला सांभाळून ठेवता, याला काय
म्हणावे बरे! चांगले म्हणायचे का? चांगले तर नाही आहे ना. तर तुम्हाला काय बनायचे
आहे? चांगल्यात चांगले ना. फक्त चांगले सुद्धा नाही तर चांगल्यात चांगले. तर जी पण
अशी कोणती गोष्ट आहे, बाबा हाजिरा हजुर आहेत, त्यांना देऊन टाका, आणि जर परत फिरून
आली तर ठेव समजून परत देऊन टाका. अमानत मध्ये खयानत (बेईमानी) केली जात नाही कारण
तुम्ही तर देऊन टाकली, तर बाबांची वस्तू झाली ना, बाबांची वस्तू किंवा दुसऱ्याची
वस्तू तुमच्यापाशी चुकून आली तर ती तुम्ही कपाटात ठेवून द्याल का? ठेऊन द्याल?
काढून टाकाल ना. कसेही करून काढून टाकाल, ठेवून घेणार नाही. सांभाळून तर ठेवणार नाही
ना. तर देऊन टाका. बाबा घेण्यासाठी आले आहेत. आणखी काही तर तुमच्यापाशी राहिलेले
नाहीये, जे द्याल. परंतु हे तर देऊ शकता ना. धोतऱ्याची फुले आहेत, ती देऊन टाका.
सांभाळून ठेवायला आवडते का? अच्छा.
चोहो बाजूची सर्व
बापदादांची दिलपसंत मुले, दिलाराम आहेत ना, तर दिलारामची दिलपसंत मुले, प्रेमाच्या
अनुभवामध्ये सदैव तरंगणारी मुले, एक बाबा दुसरा न कोई, स्वप्नामध्ये देखील दुसरे
कोणीही नाही, अशी बापदादांची अति प्रिय आणि अति देहभानापासून न्यारी, खूप-खूप
वर्षांनी भेटलेल्या, पद्मगुणा भाग्यशाली मुलांना हृदयातून प्रेमपूर्वक आठवण आणि
पद्म-पद्मपटीने आशीर्वाद असो, त्याच सोबत बालक सो मालक मुलांना बापदादांचा नमस्ते.
वरदान:-
ईश्वरीय
मर्यादांच्या आधारे विश्वासमोर उदाहरण बनणारे सहजयोगी भव
विश्वासमोर उदाहरण
बनण्यासाठी अमृतवेले पासून रात्री पर्यंत ज्या ईश्वरीय मर्यादा आहेत त्याप्रमाणे
चालत रहा. विशेष अमृतवेलेच्या महत्वाला जाणून त्यावेळी पॉवरफुल स्टेज बनवा तर साऱ्या
दिवसाचे जीवन महान बनून जाईल. जेव्हा अमृतवेलेला विशेष बाबांकडून शक्ती भरून घ्याल
तर शक्ती स्वरूप होऊन चालल्याने कोणत्याही कार्यामध्ये मुश्किल असल्याचा अनुभव
होणार नाही आणि मर्यादापूर्वक जीवन जगल्याने सहजयोगीची स्टेज देखील आपोआप बनेल मग
विश्व तुमचे जीवन पाहून आपले जीवन बनवेल.
सुविचार:-
आपल्या चलन आणि
चेहेऱ्याद्वारे पवित्रतेच्या श्रेष्ठतेचा अनुभव करवा
अव्यक्त इशारे:- स्वयं
प्रति आणि सर्वांप्रती मनसा द्वारे योगाच्या शक्तींचा प्रयोग करा.
प्रयोगी आत्मा
संस्कारांवर, प्रकृतीद्वारे येणाऱ्या परिस्थितींवर आणि विकारांवर सदैव विजयी होईल.
योगी किंवा प्रयोगी आत्म्यासमोर हे पाच विकार रुपी साप गळ्यातील माळा अथवा आनंदाने
नाचण्याचे स्टेज बनते.