26-10-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, कर्म करत असताना स्वतःला आशिक समजून मज एक माशूकची आठवण करा, आठवणीद्वारेच तुम्ही पावन बनून पावन दुनियेमध्ये जाल”

प्रश्न:-
महाभारत युद्धाच्यावेळी तुम्हा मुलांना बाबांचा कोणता हुकूम (आज्ञा) अथवा आदेश मिळाला आहे?

उत्तर:-
मुलांनो, बाबांचा हुकूम अथवा आदेश आहे - देही-अभिमानी बना. सर्वांना संदेश द्या की आता बाबा आणि राजधानीची आठवण करा. आपल्या वर्तनाला सुधारा. खूप-खूप गोड बना. कोणालाही दुःख देऊ नका. आठवणीमध्ये राहण्याची सवय लावा आणि स्वदर्शन चक्रधारी बना. पुढे पाऊल टाकण्याचा पुरुषार्थ करा.

ओम शांती।
मुले, बाबांच्या आठवणीमध्ये बसली आहेत. असा तर कोणताही सत्संग नाही, जिथे कोणी बसून म्हणेल की, ‘सर्व मुले बाबांच्या आठवणीमध्ये बसली आहेत’. हे एकच स्थान आहे. मुले जाणतात बाबांनी डायरेक्शन दिले आहे की, जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत बाबांची आठवण करत राहा. हे पारलौकिक बाबाच म्हणतात - ‘माझ्या मुलांनो’. सर्व मुले ऐकत आहेत. फक्त तुम्हा मुलांनाच नाही तर सर्वांना सांगतात. ‘मुलांनो, बाबांच्या आठवणीमध्ये राहा तर तुमची जन्म-जन्मांतरीची जी पापे आहेत, ज्यामुळे गंज चढला आहे, तो सर्व निघून जाईल आणि तुमची आत्मा सतोप्रधान बनेल. तुमची आत्मा मूळची सतोप्रधानच होती नंतर मग पार्ट बजावता-बजावता तमोप्रधान बनली आहे’. हे महावाक्य बाबांव्यतिरिक्त इतर कोणीही म्हणू शकत नाही. लौकिक पित्याला फार-फार तर दोन-चार मुले असतील. त्यांना सांगतील - ‘राम-राम’ म्हणा अथवा ‘पतित-पावन सीताराम म्हणा’ अथवा म्हणतील ‘श्रीकृष्णाची आठवण करा’. असे म्हणणार नाहीत की, ‘माझ्या मुलांनो, आता मज पित्याची आठवण करा’. पिता तर घरी आहेच. आठवण करण्याचा प्रश्नच नाही. हे बेहदचे बाबा जीव-आत्म्यांना सांगतात. आत्मेच बाबांसमोर बसले आहेत. आत्म्यांचे पिता एकदाच येतात, ५ हजार वर्षांनंतर आत्मे आणि परमात्मा भेटतात. बाबा म्हणतात - मी कल्प-कल्प येऊन हा पाठ शिकवतो. माझ्या मुलांनो, तुम्ही माझी आठवण करत आला आहात की, ‘हे पतित-पावन या’. मी येतो जरूर. नाही तर किती काळ आठवण करत राहाल! लिमिट (मर्यादा) तर जरूर असेल ना! मनुष्यांना हे माहीत नाही की, कलियुगाची मर्यादा केव्हा पूर्ण होते. हे देखील बाबांनाच सांगावे लागते. बाबांशिवाय कोणीही असे म्हणणार नाही की, माझ्या मुलांनो, माझी आठवण करा. मुख्य आहेच आठवणीची गोष्ट. रचनेच्या चक्राची देखील आठवण करणे ही काही मोठी गोष्ट नाहीये. फक्त बाबांची आठवण करण्यामध्ये मेहनत करावी लागते. बाबा म्हणतात - अर्धाकल्प आहे भक्तिमार्ग, अर्धाकल्प आहे ज्ञानमार्ग. ज्ञानाचे प्रारब्ध, तुम्ही अर्धा कल्प उपभोगले आहे, आणि मग अर्धाकल्प भक्तीचे प्रारब्ध. ते आहे सुखाचे प्रारब्ध, ते आहे दुःखाचे प्रारब्ध. दुःख आणि सुखाचा खेळ पूर्व-नियोजित आहे. नवीन दुनियेमध्ये सुख, जुन्या दुनियेमध्ये दुःख. मनुष्यांना या गोष्टींविषयी काहीच ठाऊक नाहीये. म्हणतात देखील - ‘आमचे दुःख हरण करा, सुख द्या’. अर्धा कल्प रावण राज्य चालते. हे देखील कोणालाही माहीत नाही की बाबांव्यतिरिक्त इतर कोणीही दुःखाचे निवारण करू शकत नाही. शरीराचा आजार इत्यादी डॉक्टर दूर करतात, ते झाले अल्पकाळासाठी. हे तर स्थायी आहे, अर्ध्या कल्पासाठी. नवीन दुनियेला स्वर्ग म्हटले जाते. जरूर तिथे सर्व जण सुखी असतील. मग बाकी इतके सर्व आत्मे कुठे असतील? हे कोणाच्याही लक्षात येत नाही. तुम्ही जाणता, हे नवीन शिक्षण आहे, शिकविणारे देखील नवीन आहेत. भगवानुवाच, ‘मी तुम्हाला राजांचाही राजा बनवतो’. हे देखील बरोबर आहे की, सतयुगामध्ये एकच धर्म असतो, तर जरूर बाकी सर्वांचा विनाश होईल. नवीन दुनिया आणि जुनी दुनिया कशाला म्हटले जाते, सतयुगामध्ये कोण राहतात - हे देखील आता तुम्हीच जाणता. सतयुगामध्ये एका आदि सनातन देवी-देवता धर्माचे राज्य होते. कालचीच तर गोष्ट आहे. ही कहाणी ५ हजार वर्षांची आहे. बाबा म्हणतात - ५ हजार वर्षांपूर्वी भारतामध्ये या देवी-देवतांचे राज्य होते. ते ८४ जन्म घेता-घेता आता पतित बनले आहेत म्हणून आता बोलावतात की, ‘येऊन पावन बनवा’. निराकारी दुनियेमध्ये तर सर्व पावन आत्मेच राहतात. मग जेव्हा खाली येऊन पार्ट बजावतात तेव्हा सतो, रजो, तमोमध्ये येतात. सतोप्रधान असणाऱ्याला निर्विकारी म्हटले जाते. तमोप्रधान असणारे स्वतःला विकारी म्हणवून घेतात. समजतात हे देवी-देवता निर्विकारी होते, आम्ही विकारी आहोत; म्हणून बाबा म्हणतात - देवतांचे जे पुजारी आहेत, त्यांच्या हे ज्ञान लगेच लक्षात येईल कारण ते देवता धर्माचे आहेत. आता तुम्ही जाणता - आपण जे पूज्य होतो, तेच पुजारी बनलो आहोत. जसे ख्रिश्चन क्राइस्टची पूजा करतात कारण ते त्या धर्माचे आहेत. तुम्ही देखील देवतांचे पुजारी आहात तर त्या धर्माचे ठरलात. देवता निर्विकारी होते, ते आता विकारी बनले आहेत. विकारासाठीच किती अत्याचार होतात.

बाबा म्हणतात - माझी आठवण केल्याने तुमची विकर्म विनाश होतील आणि तुम्ही कायमचे सुखी बनाल. इथे कायमचे दुःखी आहेत. अल्पकाळाचे सुख आहे. तिथे तर सर्व जण सुखी असतील. तरी देखील पदामध्ये फरक आहे ना. सुखाचे देखील राज्य आहे, दुःखाचे देखील राज्य आहे. बाबा जेव्हा येतात तेव्हा विकारी राजांचे साम्राज्य देखील नेस्तनाबूत होते, कारण इथले प्रारब्ध संपते. आता तुम्ही मुले जाणता बाबांच्या श्रीमतावर चालायचे आहे. बाबा म्हणतात - जसा मी शांतीचा सागर आहे, प्रेमाचा सागर आहे, तसे तुम्हाला देखील बनवतो. ही महिमा एका बाबांची आहे. ही कोणत्याही मनुष्याची महिमा नाहीये. तुम्ही मुले जाणता बाबा पवित्रतेचे सागर आहेत. आपण आत्मे देखील जेव्हा परमधाममध्ये असतो तेव्हा पवित्र असतो. हे ईश्वरीय नॉलेज फक्त तुम्हा मुलांकडेच आहे इतर कोणीही जाणू शकत नाही. जसे ईश्वर ज्ञानाचा सागर आहेत, स्वर्गाचा वारसा देणारे आहेत. त्यांना, आपल्या मुलांना आप समान देखील जरूर बनवायचे आहे. पूर्वी तुम्हाला बाबांचा परिचय नव्हता. आता तुम्ही जाणता परमात्मा ज्यांची इतकी महिमा आहे ते आम्हाला इतके श्रेष्ठ बनवत आहेत, तर स्वतःला तसे श्रेष्ठ बनवावे लागेल. म्हणतात ना - ‘यांच्यामध्ये दैवी गुण खूप चांगले आहेत, जणू काही देवता…’ एखाद्याचा स्वभाव शांत असतो, कोणाला शिवी इत्यादी देत नाही, तर त्याला चांगली व्यक्ती म्हटले जाते. परंतु तो काही बाबांना आणि सृष्टी चक्राला जाणत नाही. आता बाबा येऊन तुम्हा मुलांना अमरलोकचा मालक बनवत आहेत. नवीन दुनियेचा मालक बाबांशिवाय इतर कोणीही बनवू शकत नाही. ही आहे जुनी दुनिया, ती आहे नवीन दुनिया. तिथे देवी-देवतांची राजधानी असते. कलियुगामध्ये ती राजधानी नाहीये. बाकी अनेक राजधान्या आहेत. आता पुन्हा अनेक राजधान्यांचा विनाश होऊन एक राजधानी स्थापन होणार आहे. तर जरूर जेव्हा राजधानी नाहीये तेव्हाच तर बाबा येऊन ती स्थापन करतील. ते तर बाबांशिवाय इतर कोणीही करू शकत नाही. तुम्हा मुलांचे बाबांवर किती प्रेम असले पाहिजे. बाबा जे सांगतील ते जरूर कराल. एक तर बाबा म्हणतात - माझी आठवण करा आणि सेवा करा, सर्वांना मार्ग सांगा. देवी-देवता धर्माचे जे असतील त्यांच्यावर जरूर परिणाम होईल. आपण महिमा करतोच मुळी एका बाबांची. बाबांमध्ये गुण आहेत तर बाबाच येऊन आम्हाला गुणवान बनवतात. बाबा म्हणतात - मुलांनो, खूप गोड बना. प्रेमाने बसून सर्वांना समजावून सांगा. भगवानुवाच मामेकम् (मज एकाची) आठवण करा तर मी तुम्हाला स्वर्गाचा मालक बनवेन. तुम्हाला आता परत घरी जायचे आहे. जुन्या दुनियेचा महाविनाश समोर उभा आहे. पूर्वी देखील महाभारी महाभारत युद्ध झाले होते. भगवंताने राजयोग शिकवला होता. आता अनेक धर्म आहेत. सतयुगामध्ये एक धर्म होता, जो आता प्रायः लोप झाला आहे. आता बाबा येऊन अनेक धर्मांचा विनाश करून एका धर्माची स्थापना करत आहेत. बाबा समजावून सांगत आहेत - मी हा यज्ञ रचतो, अमरपुरी मध्ये जाण्याकरिता तुम्हाला अमर कथा ऐकवतो. अमरलोक मध्ये जायचे आहे तर मृत्युलोकचा जरूर विनाश होईल. बाबा आहेतच नवीन दुनियेचे रचयिता. तर बाबांना जरूर इथेच यावे लागेल. आता तर विनाश ज्वाळा साक्षात समोर उभी आहे. तेव्हा मग समजतील तरी की, तुम्ही खरे सांगत आहात, बरोबर हे तेच महाभारत युद्ध आहे. हे प्रसिद्ध आहे तर जरूर या वेळी भगवान देखील आहेत. भगवान कसे येतात, हे तर तुम्ही सांगू शकता. तुम्ही सर्वांना सांगा की, आम्हाला तर डायरेक्ट भगवान समजावून सांगतात. ते म्हणतात - तुम्ही माझी आठवण करा. सतयुगामध्ये तर सर्व जण सतोप्रधान आहेत, आता तमोप्रधान आहेत. आता पुन्हा सतोप्रधान बना तर मुक्ती-जीवनमुक्तीमध्ये जाल.

बाबा म्हणतात - केवळ माझ्या आठवणीनेच तुम्ही सतोप्रधान बनून सतोप्रधान दुनियेचे मालक बनाल. आपण रुहानी पंडे आहोत, ‘मनमनाभव’ची यात्रा करतो. बाबा येऊन ब्राह्मण धर्म, सूर्यवंशी-चंद्रवंशी धर्म स्थापन करतात. बाबा म्हणतात - माझी आठवण केली नाहीत, तर जन्म-जन्मांतरीच्या पापांचे ओझे उतरणार नाही. हीच सर्वांत मोठी चिंता आहे. कर्म करत असताना, धंदा करताना माझे आशिक मज माशूकची आठवण करा. प्रत्येकाने स्वतःची पूर्ण काळजी घ्यायची आहे. बाबांची आठवण करा. कोणतेही पतित कर्म करू नका. घरोघरी बाबांचा संदेश देत राहा की भारत स्वर्ग होता. लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते. आता नरक आहे. नरकाच्या विनाशासाठी हे तेच महाभारत युद्ध आहे. आता देही-अभिमानी बना. बाबांचा आदेश आहे - माना अथवा नका मानू. आम्ही तर तुम्हाला संदेश देण्यासाठी आलो आहोत. बाबांचा हुकूम आहे - सर्वांना संदेश द्या. बाबांना विचारतात कोणती सेवा करू, बाबा म्हणतात - संदेश देत रहा. बाबांची आठवण करा, राजधानीची आठवण करा. अंत मति सो गति होईल. मंदिरांमध्ये जा, गीता पाठशाळांमध्ये जा. पुढे जाऊन तुम्हाला भरपूर भेटत राहतील. तुम्हाला देवी-देवता धर्मातील लोकांना जागृत करायचे आहे.

बाबा समजावून सांगतात - खूप-खूप गोड बना. खराब वर्तन असेल तर पद भ्रष्ट होईल. कोणालाही दुःख देऊ नका, वेळ फार थोडा आहे. बिलवेड बाबांची आठवण करा, ज्यांच्याकडून स्वर्गाची राजाई मिळते. जर कोणाला मुरली चालवता येत नसेल तर शिडीच्या चित्रा समोर बसून फक्त हे चिंतन करा की, ‘अशा प्रकारे आपण जन्म घेतो, अशा प्रकारे चक्र फिरत राहते…’ असे केल्याने तुमच्या मुखातून आपोआप शब्द बाहेर पडू लागतील. जी गोष्ट मनात येते, ती बाहेर जरूर निघते. आठवण केल्याने आपण पवित्र बनू आणि नवीन दुनियेमध्ये राज्य करू. आता आपली चढती कला आहे. तर आतून आनंद झाला पाहिजे. आपण मुक्तिधाममध्ये जाऊन मग जीवनमुक्तीमध्ये येऊ. ही खूप जबरदस्त कमाई आहे. काम-धंदा भले करा - फक्त बुद्धीने आठवण करा. आठवणीची सवय लागली पाहिजे. स्वदर्शन चक्रधारी बनायचे आहे. वर्तन जर खराब असेल तर मग धारणा होणार नाही. हे ज्ञान कोणाला समजावून सांगू शकणार नाही. पुढे पाऊल टाकण्याचा पुरुषार्थ केला पाहिजे. मागे येता कामा नये. प्रदर्शनीमध्ये सेवा केल्याने खूप आनंद होईल. फक्त एवढेच सांगायचे आहे की, बाबा म्हणतात - माझी आठवण करा. देहधाऱ्यांची आठवण केल्याने विकर्म बनतील. वारसा देणारा मी आहे. मी सर्वांचा पिता आहे. मीच येऊन तुम्हाला मुक्ती-जीवनमुक्तीमध्ये घेऊन जातो. प्रदर्शनी-मेळ्यामध्ये सेवा करण्याची खूप आवड असली पाहिजे. सेवेवर लक्ष दिले पाहिजे. मुलांना सेवेसाठी आपणहून विचार आले पाहिजेत. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) एका बाबांवरच पूर्ण प्रेम ठेवायचे आहे. सर्वांना खरा मार्ग सांगायचा आहे. धंदा इत्यादी करत स्वतःची पूर्ण काळजी घ्यायची आहे. एकाच्या आठवणीमध्ये राहायचे आहे.

२) सेवा करण्याची खूप-खूप आवड असायला हवी. आपल्या वर्तनाला सुधारायचे आहे, स्वदर्शन चक्रधारी बनायचे आहे.

वरदान:-
मेहनत आणि महानता यांच्या सोबतच रुहानियतचा अनुभव करविणारे शक्तिशाली सेवाधारी भव

जे पण आत्मे तुमच्या संपर्कामध्ये येतात त्यांना रुहानी शक्तीचा अनुभव करवून द्या. अशी स्थूल आणि सूक्ष्म स्टेज बनवा ज्यामुळे येणारे आत्मे आपल्या स्वरूपाचा आणि रुहानियतचा अनुभव करतील. अशी शक्तिशाली सेवा करण्यासाठी सेवाधारी मुलांना व्यर्थ संकल्प, व्यर्थ बोल, व्यर्थ कर्माच्या गोंधळापासून दूर राहून एकाग्रता अर्थात रुहानियतमध्ये राहण्याचे व्रत घ्यावे लागेल. याच व्रता द्वारे ज्ञान-सूर्याचा चमत्कार दाखवू शकाल.

बोधवाक्य:-
बाबांच्या आणि सर्वांच्या आशीर्वादांच्या विमानामध्ये उडणारेच ‘उडता योगी’ आहेत.

हे अव्यक्त इशारे - परोपकाराच्या भावनेने संपन्न बनून अपकारीवर देखील उपकार करा.

अती पाप-आत्मा, अती अपकारी आत्मा, बगळ्या समान आत्म्या विषयी देखील नफरत नको, घृणा नको, निरादर नको परंतु विश्व कल्याणकारी स्थितीमध्ये स्थित होऊन दयाळू बनून करुणेची भावना ठेवून, सेवेचा संबंध समजून सेवा करा. होपलेस केसची जितकी सेवा कराल तितकेच बक्षिसाचे अधिकारी बनाल आणि नामीग्रामी विश्व-कल्याणकारी म्हणून गायले जाल. पीस-मेकरचे प्राइज घ्याल (शांती-दूताचे बक्षिस घ्याल).