26-11-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुम्ही आहात त्रिमूर्ती बाबांची मुले, तुम्हाला आपली तीन कर्तव्ये लक्षात रहावीत - स्थापना, विनाश आणि पालना”

प्रश्न:-
देह-अभिमानाच्या गंभीर आजाराने ग्रस्त झाल्याने कोणकोणते नुकसान होते?

उत्तर:-
१) देह-अभिमानी असणाऱ्यांमध्ये इर्षा असते, इर्षेमुळे आपसामध्ये लून-पाणी (खारट-पाणी) होत राहतात, प्रेमाने सेवा करू शकत नाहीत. आतल्या आत जळत राहतात. २) बेपर्वा राहतात. माया त्यांना खूप फसवत राहते. पुरुषार्थ करता-करता बेपत्ता होतात, ज्याच्यामुळे शिक्षणापासून वंचित होतात. ३) देह-अभिमानामुळे मन साफ नसते, मन साफ नसल्यामुळे बाबांच्या हृदयामध्ये स्थान मिळत नाही. ४) मूड ऑफ करून घेतात, त्यांचा चेहराच बदलून जातो.

ओम शांती।
फक्त बाबांची आठवण करत आहात कि अजूनही काही आठवते आहे? मुलांना स्थापना, विनाश आणि पालना - तिन्हीची आठवण राहिली पाहिजे कारण या तिन्ही गोष्टी एकत्र एकाचवेळी होतात ना. जसे कोणी बॅरिस्टरी शिकतात तर त्यांना माहीत असते की, मी बॅरिस्टर बनणार, वकिली करणार. बॅरिस्टरिची पालना देखील करतील ना (ध्येयपूर्तीसाठी खत-पाणी घालत राहतील). जे काही शिकेल त्याचे ध्येय तर समोर असणार. तुम्ही जाणता आता आपण कन्स्ट्रक्शन करत आहोत. पवित्र नवीन दुनिया स्थापन करत आहोत, यामध्ये योग अतिशय गरजेचा आहे. योगाद्वारेच आपली आत्मा जी पतित बनली आहे, ती पावन बनेल. तर आपण पवित्र बनून मग पवित्र दुनियेमध्ये जाऊन राज्य करणार, हे बुद्धीमध्ये आले पाहिजे. सर्व परीक्षांमध्ये सर्वात मोठी परीक्षा अथवा सर्व शिक्षणामध्ये उच्च शिक्षण हे आहे. शिक्षण तर अनेक प्रकारचे आहे ना. ते तर सर्व मनुष्य, मनुष्यांना शिकवतात आणि ते शिक्षण या दुनियेसाठीच आहे. शिकून मग त्याचे फळ इथेच मिळेल. तुम्ही मुले जाणता या बेहदच्या शिक्षणाचे फळ आपल्याला नवीन दुनियेमध्ये मिळणार आहे. ती नवीन दुनिया काही दूर नाही. आता संगमयुग आहे. नवीन दुनियेमध्येच आपल्याला राज्य करायचे आहे. इथे बसले आहात तरी देखील बुद्धीमध्ये याची आठवण करायची आहे. बाबांच्या आठवणीनेच आत्मा पवित्र बनेल. आणि मग याची देखील आठवण ठेवायची आहे की आपण पवित्र बनणार आणि या अपवित्र दुनियेचा विनाश देखील जरूर होणार. सगळेच काही पवित्र बनणार नाहीत. तुम्ही फार थोडे आहात ज्यांच्यामध्ये ताकद आहे. तुमच्यामध्ये देखील नंबरवार ताकदी अनुसारच सूर्यवंशी-चंद्रवंशी बनतात ना. ताकद तर प्रत्येक गोष्टीमध्ये पाहिजे. ही आहे ईश्वरीय माईट (ईश्वरीय शक्ती), याला योगबलाची शक्ती म्हटले जाते. बाकी सर्व आहेत भौतिक शक्ती. ही आहे रूहानी (आत्मिक) शक्ती. बाबा कल्प-कल्प म्हणतात - ‘हे मुलांनो, मामेकम (मज एकाची) आठवण करा. सर्वशक्तिमान बाबांची आठवण करा’. ते एकच तर पिता आहेत, ज्यांची आठवण केल्याने आत्मा पवित्र बनेल. या धारण करण्याकरिता अतिशय चांगल्या गोष्टी आहेत, ज्यांना हा निश्चयच नाही आहे की आपण ८४ जन्म घेतले आहेत, त्यांच्या बुद्धीमध्ये या गोष्टी बसणार सुद्धा नाहीत. जे सतोप्रधान दुनियेमध्ये आले होते, तेच आता तमोप्रधान मध्ये आले आहेत. तेच येऊन लगेच निश्चय-बुद्धी बनतील. जर काहीही समजत नसेल तर विचारले पाहिजे. जर व्यवस्थित समजले असेल तर बाबांची आठवण करतील. समजले नाही तर आठवण देखील करू शकणार नाहीत. ही तर सरळ गोष्ट आहे. आपण आत्मे जे सतोप्रधान होतो तेच परत तमोप्रधान बनलो आहोत. ज्यांना हा संशय असेल की, कसे समजणार आपण ८४ जन्म घेतले आहेत किंवा बाबांकडून कल्पापूर्वी देखील वारसा घेतला आहे, ते तर अभ्यासावर नीट लक्षसुद्धा देणार नाहीत. यावरून समजले जाते की यांच्या भाग्यामध्ये नाही. कल्पापूर्वी देखील समजले नव्हते त्यामुळे आठवण करू शकणार नाहीत. हा आहेच भविष्याकरिता अभ्यास. जर अभ्यास करत नसतील तर समजले जाते कल्प-कल्प अभ्यास करत नव्हते किंवा थोड्या मार्कांनी पास झाले होते. शाळेमध्ये बरेचजण नापास देखील होतात. पास देखील नंबरवार होतात. हे देखील शिक्षण आहे, यामध्ये देखील नंबरवार पास होतील. जे हुशार आहेत ते तर शिकून मग शिकवत राहतील. बाबा म्हणतात, मी तुम्हा मुलांचा सेवक आहे. मुले देखील म्हणतात की, आम्ही देखील सेवक आहोत. प्रत्येक भाऊ-बहिणीचे कल्याण करायचे आहे. बाबा आपले कल्याण करतात, आपल्याला मग इतरांचे कल्याण करायचे आहे. सर्वांना हे देखील समजावून सांगायचे आहे, ‘बाबांची आठवण करा तर पापे नष्ट होतील. जे जितके जास्तीत जास्त लोकांपर्यंत संदेश पोहोचवतात, त्यांना मोठा पैगंबर (देवदूत) म्हणणार. त्यांनाच महारथी अथवा घोडेस्वार म्हटले जाते. प्यादे मग प्रजेमध्ये जातात. यामध्ये देखील मुलांना समजते कोण-कोण श्रीमंत बनू शकतील. हे ज्ञान बुद्धीमध्ये राहिले पाहिजे. तुम्ही मुले जी सेवेसाठी निमित्त बनलेली आहात, सेवेकरिताच जीवन दिले आहे तर पद देखील असेच प्राप्त करणार. त्यांना कशाचीही चिंता वाटत नाही. मनुष्याला स्वतःचे हात-पाय आहेत ना. बांधू तर शकत नाही. स्वतःला मुक्त ठेवू शकता. असे बंधनामध्ये मी का म्हणून अडकू? का नाही बाबांकडून अमृत घेऊन अमृताचेच दान करू. मी काही शेळी-मेंढी थोडीच आहे जे कोणी आम्हाला बांधून ठेवेल. सुरुवातीला तर तुम्हा मुलांनी स्वतःला कसे मुक्त केले, ओरडून सांगितलेत, तर ते हाय-हाय करत बसले. तुम्ही म्हटले - ‘आम्हाला कसली चिंता आहे, आम्हाला तर स्वर्गाची स्थापना करायची आहे का बसून ही कामे करायची आहेत’. ती मस्ती चढते, जिला मौलाई मस्ती (ईश्वरीय नशा) म्हटले जाते. आपण मौलाचे मस्ताने (ईश्वरीय नशेमध्ये राहणारे) आहोत. तुम्ही जाणता मौलाकडून (ईश्वराकडून) आपल्याला काय प्राप्त होत आहे. मौला आपल्याला शिकवत आहेत ना. नावे तर त्यांची खूप आहेत परंतु काही-काही नावे खूप गोड आहेत. आता आपण मौलाई मस्त (ईश्वरामध्ये मदमस्त) बनलो आहोत. बाबा डायरेक्शन तर खूप सोपे देतात. बुद्धी देखील समजते - खरोखर आपण बाबांची आठवण करत-करत सतोप्रधान बनणार आणि विश्वाचे मालक देखील बनणार. हीच चिंता लागून राहिली आहे. बाबांची श्वासागणिक आठवण केली पाहिजे. समोर बसले आहात ना. इथून बाहेर पडलात कि विसरून जाणार. इथे जेवढा नशा चढतो तितका बाहेर राहत नाही, विसरायला होते. तुम्ही विसरता कामा नये. परंतु भाग्यामध्ये नसेल तर इथे बसलेले असताना देखील विसरून जाता.

मुलांसाठी म्युझियममध्ये आणि गावागावांमध्ये सेवा करण्यासाठी प्रबंध होत आहेत. जितका काही वेळ मिळाला आहे, बाबा तर म्हणतात लवकर-लवकर करा. परंतु ड्रामामध्ये अशी घाई करू शकत नाही. बाबा तर म्हणतात अशी मशिनरी असावी की, हात घातला आणि वस्तू तयार होईल. हे देखील बाबा समजावून सांगत राहतात - चांगल्या-चांगल्या मुलांच्या नाकाला आणि कानाला माया अगदी व्यवस्थित पकडते. जे स्वतःला महावीर समजतात त्यांनाच मायेची खूप वादळे येतात, मग ते कोणाचीही पर्वा करत नाहीत. लपवतात. अंतर्मन खरे नसते. खरे मन असणारेच स्कॉलरशिप मिळवतात. सैतानी मन असणारे चालू शकत नाहीत. सैतानी मनामुळे आपलाच बेडा गर्क करतात (स्वतःलाच अडचणीमध्ये आणतात). सर्वांचे शिवबाबांकडे काम आहे. हा साक्षात्कार तर तुम्ही करता. ब्रह्मा बाबांना बनविणारे देखील शिवबाबा आहेत. शिवबाबांची आठवण कराल तेव्हा असे बनाल. बाबा समजतात माया अतिशय कठोर आहे. जसे उंदीर चावतो तर कळत सुद्धा नाही, माया देखील अशीच मदमस्त उंदरीण आहे. महारथींनाच सावध रहायचे आहे. त्यांना स्वतःला समजत नाही की आपल्याला मायेने खाली पाडले आहे. लून पाणी (खारेपाणी) बनवले आहे. समजले पाहिजे लून पाणी झाल्यामुळे आपण बाबांची सेवा करू शकणार नाही. आतल्या आत जळफळत राहतील. देह-अभिमान आहे म्हणून जळत राहतात. ती अवस्था तर नाही आहे. आठवणीचे जौहर (आठवणीची शक्ती) भरत नाही, त्यामुळे खूप खबरदार राहिले पाहिजे. माया खूप शक्तिशाली आहे, मग तुम्ही जेव्हा युद्धाच्या मैदानावर आहात तर माया देखील सोडत नाही. अर्धे-अधिक तर नाहीसेच करून टाकते, कोणाला कळत देखील नाही. कसे चांगले-चांगले, नवीन-नवीन असलेले देखील शिक्षण सोडून घरी बसतात. चांगल्या-चांगल्या नामीग्रामी असणाऱ्यांवर देखील मायेचा वार होतो. समजत असताना देखील बेफिकीर होतात. छोट्याशा गोष्टीवरून लगेच खारट पाणी बनतात. बाबा समजावून सांगत आहेत - देह-अभिमानामुळेच खारे पाणी होतात. स्वतःला धोका देतात. बाबा म्हणतील हा देखील ड्रामा. जे काही बघता कल्पापूर्वी प्रमाणेच ड्रामा चालत राहतो. अवस्था वर-खाली होत राहते. कधी ग्रहचारी बसते, कधी खूप चांगली सेवा करून आनंदाची बातमी लिहितात. खाली-वर होत राहते. कधी हार, कधी जीत. पांडवांची मायेकडून कधी हार, कधी जीत होते. चांगले-चांगले महारथी देखील डळमळतात, बरेचजण मरून देखील जातात त्यामुळे जिथेही रहा बाबांची आठवण करत रहा आणि सेवा करत रहा. तुम्ही निमित्त बनलेले आहात सेवेसाठी. तुम्ही लढाईच्या मैदानावर आहात ना. जे बाहेरचे घर-गृहस्थ व्यवहारामध्ये राहतात, इथल्यांपेक्षा देखील खूप वेगाने पुढे जातात. सतत माये सोबत युद्ध चालत राहते. दर सेकंदा सेकंदाला तुमचा कल्पा पूर्वीप्रमाणे पार्ट चालत आला आहे. तुम्ही म्हणाल एवढा वेळ निघून गेला, काय-काय झाले आहे, तेही बुद्धीमध्ये आहे. सर्व ज्ञान बुद्धीमध्ये आहे. जसे बाबांमध्ये ज्ञान आहे, या दादांमध्ये (ब्रह्मा बाबांमध्ये) देखील आले पाहिजे. बाबा बोलतात तर जरूर दादा देखील बोलत असतील. तुम्ही देखील जाणता कोण-कोण चांगल्या साफ अंत:करणाचे आहेत. साफ मन असणारेच हृदयामध्ये स्थान मिळवू शकतात. त्यांचा लून पाणी (खाऱ्या पाण्यासारखा) स्वभाव असत नाही, सदैव हर्षित राहतात. त्यांचा मूड कधीही बदलणार नाही. इथे तर खूप जणांचा मूड बदलतो, काही विचारू नका. यावेळेस सर्वजण म्हणतात देखील आम्ही पतित आहोत. आता पतित-पावन बाबांना बोलावले आहे की, येऊन पावन बनवा. बाबा म्हणतात - ‘मुलांनो, माझी आठवण करत रहा तर तुमचे कपडे (आत्मा) साफ होतील. माझ्या श्रीमतावर चाला. श्रीमतावर न चालणाऱ्याचा कपडा साफ होत नाही. आत्मा शुद्ध होतच नाही. बाबा तर दिवस-रात्र यावरच जोर देत राहतात - ‘स्वतःला आत्मा समजा’. देह-अभिमानामध्ये आल्यामुळेच तुमची घुसमट होऊ लागते. जितके-जितके वर चढत जाता, प्रफुल्लित होत जाता आणि हर्षितमुख राहता. बाबा जाणतात चांगली-चांगली फर्स्ट क्लास मुले आहेत परंतु त्यांची अंतर्गत स्थिती बघितली तर जसे की गळून गेले आहेत. देह-अभिमानाची आग जशी काही वितळवून टाकत आहे. समजू शकत नाहीत की हा आजार आला कुठून. बाबा म्हणतात - ‘देह-अभिमानामुळे हा आजार होतो’. बाबा तर म्हणतात - ‘मुलांनो, देही-अभिमानी भव’. मुले विचारतात - हा आजार का झाला आहे? बाबा म्हणतात - हा देह-अभिमानाचा आजार असा आहे, काही विचारू नका. कुणाला हा रोग होतो तर एकदम गोचीडी सारखा चिकटतो, सोडतच नाही. श्रीमतावर न चालता आपल्या देह-अभिमानामध्ये चालतात तर एकदम जोरात मार लागतो. बाबांकडे सर्व समाचार येतात. माया कशी एकदम नाकाला पकडून खाली पाडते. बुद्धीला एकदम मारूनच टाकते. संशय बुद्धी बनतात. भगवंताला बोलावतात की येऊन आम्हाला पत्थरबुद्धी पासून पारसबुद्धी बनवा आणि मग त्यांच्या सुद्धा विरोधात जातात, तर मग गती काय होईल! एकदम खाली कोसळून पत्थर बुद्धी बनतात. मुलांना इथे बसून तो आनंद झाला पाहिजे, ‘स्टुडंट लाईफ इज दी बेस्ट’ ते हेच आहे. बाबा म्हणतात यापेक्षा आणखी कोणतेही उच्च शिक्षण आहे काय? दी बेस्ट तर हेच आहे, २१ जन्मांचे फळ देते, तर अशा शिक्षणावर किती लक्ष दिले पाहिजे. कोणी तर अजिबात लक्ष देत नाहीत. माया नाक-कान एकदम कापूनच टाकते. बाबा स्वतः म्हणतात अर्धा कल्प तिचे राज्य चालते तर अशी पकडते की काही विचारूच नका, त्यामुळे खूप सावध रहा. एकमेकांना सावधान करत रहा. शिवबाबांची आठवण करा नाहीतर माया कान-नाक कापून टाकेल. मग काहीच कामाचे राहणार नाही. असे तर अनेकांना वाटते की आपल्याला लक्ष्मी-नारायणाचे पद मिळावे, परंतु हे अशक्य आहे. थकून गायब होतात. मायेकडून हार खाऊन एकदम कचऱ्यात जाऊन पडतात. बघा, आपली बुद्धी बिघडली असेल तर समजले पाहिजे मायेने नाकाला पकडले आहे. आठवणीच्या यात्रेमध्ये भरपूर शक्ती आहे. खूप आनंद भरलेला आहे. म्हणतात देखील - ‘खुशी जैसी खुराक नहीं’. दुकानामध्ये ग्राहक येत राहतात, कमाई होत राहते तर त्यांना कधी थकवा येत नाही. उपाशीपोटी मरणार नाहीत. खूप आनंदात राहतात. तुम्हाला तर अथाह (बेसुमार) धन मिळते. तर तुम्हाला अतिशय आनंदात राहिले पाहिजे. बघितले पाहिजे - माझे वर्तन दैवी आहे का आसुरी आहे? वेळ फार थोडा बाकी आहे. अकस्मात मृत्यूची तर जशी काही शर्यत लागली आहे. ॲक्सीडेंट इत्यादी बघा किती होत राहतात. तमोप्रधान बुद्धीवाले बनत जातात. मुसळधार पाऊस पडेल, त्याला देखील नैसर्गिक ॲक्सीडेंट म्हणणार. मृत्यू समोर आला की आला. समजतात देखील की ॲटोमिक बॉम्ब्सचे युद्ध छेडले जाणार. अशी काही भयानक कामे करतात, त्रास देतील तर मग युद्ध देखील छेडले जाईल अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) मौलाई मस्तीमध्ये (ईश्वरीय नशेमध्ये) राहून स्वतःला स्वतंत्र बनवायचे आहे. कोणत्याही बंधनामध्ये बांधून घ्यायचे नाही. माया उंदरीणी पासून अतिशय सांभाळून रहायचे आहे, सावध रहायचे आहे. मनामध्ये कधीही सैतानी विचार (वाईट विचार) येऊ नयेत.

२) बाबांद्वारे जे बेसुमार धन (ज्ञानाचे धन) मिळत आहे, त्याच आनंदामध्ये रहायचे आहे. या कमाईमध्ये कधीही संशय-बुद्धी बनून थकून जायचे नाही. स्टुडंट लाईफ दी बेस्ट लाइफ आहे त्यामुळे पूर्णतः अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचे आहे.

वरदान:-
नेहमी अलर्ट राहून सर्वांच्या आशा पूर्ण करणारे मास्टर मुक्ती-जीवनमुक्ती दाता भव

आता सर्व मुलांमध्ये हा शुभ संकल्प इमर्ज झाला पाहिजे की सर्वांच्या आशा पूर्ण कराव्यात. सर्वांची इच्छा आहे जन्म-मरणाच्या फेऱ्यातून मुक्त व्हावे, तर त्याचा अनुभव करवा. यासाठी आपल्या शक्तिशाली सतोप्रधान व्हायब्रेशन द्वारे प्रकृती आणि मनुष्य आत्म्यांच्या वृत्तीला चेंज करा. मास्टर दाता बनून प्रत्येक आत्म्याच्या आशा पूर्ण करा. मुक्ती, जीवनमुक्तीचे दान द्या. ही जबाबदारीची स्मृती तुम्हाला सदैव अलर्ट बनवेल.

बोधवाक्य:-
मुरलीधरच्या मुरलीवर देहाचे सुद्धा भान हरपून जाणारेच सच्चे गोप-गोपी आहेत.