27-02-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुम्ही या कब्रस्तानला परिस्तान बनवत आहात, त्यामुळे या जुन्या दुनियेपासून, कब्रस्तानपासून तुम्हाला पूर्णपणे वैराग्य आले पाहिजे”

प्रश्न:-
बेहदचे बाबा आपल्या रूहानी मुलांचे वंडरफुल सर्व्हंट आहेत, ते कसे?

उत्तर:-
बाबा म्हणतात - मुलांनो, मी तुमचा धोबी आहे. तुम्हा मुलांचीच काय तर साऱ्या दुनियेची छी-छी घाणेरडी वस्त्रे (पतित आत्म्यांना) सेकंदात स्वच्छ करतो. आत्मारूपी वस्त्र स्वच्छ बनल्याने शरीर देखील शुद्ध मिळते. असे वंडरफुल सर्व्हंट आहेत, जे ‘मनमनाभव’च्या छू मंत्राद्वारे सर्वांना सेकंदामध्ये स्वच्छ करतात.

ओम शांती।
‘ओम् शांती’चा अर्थ मुलांना बाबांनी समजावून सांगितला आहे. अहम् आत्म्याचा स्वधर्म आहे - शांत. शांतीधाममध्ये जाण्यासाठी काही पुरुषार्थ करावा लागत नाही. आत्मा स्वतः शांत स्वरूप, शांतीधाममध्ये राहणारी आहे. हो, थोड्या वेळासाठी शांत राहू शकते. आत्मा म्हणते - मी कर्मेंद्रियांच्या ओझ्याने थकले आहे, मी माझ्या स्वधर्मामध्ये स्थिर होते, शरीरापासून वेगळी होते. परंतु कर्म तर करायचेच आहे. शांतीमध्ये किती वेळ बसून रहाल? आत्मा म्हणते - आम्ही शांती देशाचे रहिवासी आहोत. फक्त इथे शरीरामध्ये आल्यावर मी टॉकी बनलो आहे (वाणीमध्ये आलो आहे). अहम् आत्मा अविनाशी आहे, माझे शरीर विनाशी आहे. आत्मा पावन आणि पतित बनते. सतयुगामध्ये पाचही तत्त्वे देखील सतोप्रधान असतात. इथे ५ तत्त्वे देखील तमोप्रधान आहेत. सोन्यामध्ये भेसळ पडल्याने सोने पतित बनते, मग त्याला स्वच्छ करण्यासाठी आगीमध्ये टाकले जाते, याचे नावच आहे - योग-अग्नी. दुनियेमध्ये तर अनेक प्रकारचे हठयोग इत्यादी शिकवतात. त्यांना योग-अग्नी म्हटले जात नाही. योग-अग्नी तो आहे, ज्याद्वारे पापे भस्म होतात. आत्म्याला पतितापासून पावन बनविणारे परमात्मा आहेत, बोलावतात - ‘हे पतित-पावन या’. ड्रामा प्लॅननुसार सर्वांना पतित, तमोप्रधान बनायचेच आहे. हे झाड आहे, याचे बीजरूप वर आहे. बाबांना जेव्हा बोलावतात, तेव्हा बुद्धी वरच्या दिशेने जाते, ज्यांच्याकडून तुम्ही वारसा घेत आहात, जे आता खाली आलेले आहेत. ते म्हणतात - मला यावेच लागते. मनुष्यसृष्टीचे जे झाड आहे, अनेक प्रकारच्या धर्मांचे, ते आता तमोप्रधान, पतित झाले आहे. जडजडिभूत अवस्था प्राप्त झाली आहे. बाबा बसून मुलांना समजावून सांगतात. सतयुगामध्ये देवता असतात, कलियुगामध्ये आहेत असुर. बाकी असुर आणि देवतांचे काही युद्ध झालेले नाहीये. तुम्ही या आसुरी ५ विकारांवर योगबलाद्वारे विजय प्राप्त करता. बाकी हिंसक युद्धाची काही गोष्ट नाही आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारे हिंसा करत नाही. कधी कोणाला हातही लावणार नाही. तुम्ही डबल अहिंसक आहात. कामकटारी चालवणे, हे तर सर्वांत मोठे पाप आहे. बाबा म्हणतात - ही कामकटारी आदि-मध्य-अंत दुःख देते. विकारामध्ये जाता कामा नये. देवतांच्या पुढे महिमा गातात ना - ‘आपण सर्वगुण संपन्न…’ आत्मा म्हणते - आम्ही पतित बनलो आहोत, म्हणूनच तर बोलावतात - ‘हे पतित-पावन या’. जेव्हा पावन असतात तेव्हा मात्र कोणालाच बोलावत नाहीत. त्याला स्वर्ग म्हटले जाते. इथे तर साधू-संत इत्यादी किती धून लावतात - ‘हे पतित-पावन सीताराम…’ बाबा म्हणतात - या वेळी संपूर्ण दुनिया पतित आहे, यामध्ये कोणाचाही दोष नाही. हा ड्रामा पूर्वनियोजित आहे. जोपर्यंत मी येत नाही, तोपर्यंत यांना आपला पार्ट बजावायचा आहे. ज्ञान आणि भक्ती, त्यानंतर आहे वैराग्य. जुन्या दुनियेपासून वैराग्य. हे आहे बेहदचे वैराग्य. त्यांचे आहे हदचे वैराग्य.

तुम्ही जाणता की ही जुनी दुनिया आता नष्ट होणार आहे. नवीन घर बांधतात तेव्हा जुन्या घराविषयी वैराग्य येते ना. बेहदचे बाबा म्हणतात - आता तुम्हाला स्वर्गरूपी घर बनवून देतो. आता तर आहे नरक. स्वर्ग आहे नवीन दुनिया. नरक आहे जुनी दुनिया. आता जुन्या दुनियेमध्ये राहून आपण नवीन दुनिया बनवत आहोत. जुन्या कब्रस्तानावर आपण परिस्तान बनवणार आहोत. हाच यमुनेचा तिर असेल. या तीरावर महाल बनतील. हीच दिल्ली, यमुना नदी इत्यादी असेल; बाकी हे जे दाखवतात की पांडवांचे किल्ले होते - या सर्व दंतकथा आहेत. ड्रामा प्लॅन अनुसार जरूर पुन्हा हे बनतील. जसे तुम्ही यज्ञ, तप, दान इत्यादी करत आला आहात तसे तरीही पुन्हा करावे लागेल. आधी तुम्ही शिवाची भक्ती करता, फर्स्टक्लास मंदिर बांधता. त्याला व्यभिचारी भक्ती म्हटले जाते.

आता तुम्ही ज्ञानमार्गामध्ये आहात. हे आहे अव्यभिचारी ज्ञान. एका शिवबाबांकडूनच तुम्ही ऐकता. ज्यांची सर्वप्रथम तुम्ही भक्ती सुरू केली, त्यावेळी इतर कोणताही धर्म नव्हता. तुम्हीच होता. तुम्ही खूप सुखी असता. देवता धर्म अतिशय सुख देणारा आहे. नाव घेतल्यानेच तोंड गोड होते. तर तुम्ही एका बाबांकडूनच ज्ञान ऐकता. बाबा म्हणतात - इतर कोणाकडूनही ऐकू नका. हे आहे तुमचे अव्यभिचारी ज्ञान. तुम्ही बेहदच्या बाबांचे बनला आहात. बाबांकडूनच वारसा मिळेल, नंबरवार पुरुषार्थानुसार. बाबा देखील थोड्या काळासाठी साकारमध्ये आलेले आहेत. म्हणतात - मलाच तुम्हा मुलांना ज्ञान द्यायचे आहे. माझे काही कायमचे शरीर नाही आहे; मी यांच्यामध्ये (ब्रह्मा बाबांच्या तनामध्ये) प्रवेश करतो. शिवजयंती नंतर लगेच गीता जयंती होते. तेव्हापासूनच ज्ञान सुरू होते. ही रूहानी विद्या तुम्हाला सुप्रीम रूहच (परम-आत्माच) देत आहेत. काही पाण्याची गोष्ट नाहीये. पाण्याला थोडेच ज्ञान म्हणणार. पतितापासून पावन ज्ञानाद्वारे बनतील, पाण्याने थोडेच पावन बनतील. नद्या तर संपूर्ण दुनियेमध्ये आहेतच. हे तर ज्ञान सागर बाबा येतात, यांच्यामध्ये (ब्रह्माबाबांमध्ये) प्रवेश करून नॉलेज ऐकवतात. इथे जेव्हा कोणाचा मृत्यू होतो तेव्हा त्यांच्या मुखामध्ये गंगेचे पाणी घालतात. समजतात की हे जल पतितापासून पावन बनविणारे आहे, म्हणून तो स्वर्गामध्ये जाईल. इथे देखील गोमुखावर जातात. खरे तर गोमुख तुम्ही चैतन्य आहात. तुमच्या मुखातून ज्ञान अमृत निघते. गायीपासून दूध मिळते, पाण्याची काही गोष्ट नाहीये. हे आता तुम्हाला ठाऊक झाले आहे. तुम्ही जाणता - ड्रामामध्ये जे एकदा झाले आहे ते पुन्हा ५ हजार वर्षांनंतर हुबेहूब रिपीट होणार. हे बाबा बसून समजावून सांगतात, जे सर्वांचे सद्गती दाता आहेत. आता तर सर्वजण दुर्गतीमध्ये पडून आहेत. या अगोदर तुम्ही जाणत नव्हता की, रावणाला का जाळतात. आता तुम्ही समजता - बेहदचा दसरा होणार आहे. संपूर्ण सृष्टीवर रावणाचे राज्य आहे ना. ही संपूर्ण जी पृथ्वी आहे ती लंका आहे. रावण काही मर्यादित ठिकाणी राहत नाही. रावणाचे राज्य संपूर्ण सृष्टीमध्ये आहे. भक्ती देखील अर्धाकल्प चालते. अगोदर असते अव्यभिचारी भक्ती, नंतर मग व्यभिचारी भक्ती सुरू होते. दसरा, रक्षाबंधन इत्यादी सर्व आताचे सण आहेत. शिवजयंती नंतर असते श्रीकृष्ण जयंती. आता कृष्णपुरीची स्थापना होत आहे. आज कंसपुरीमध्ये आहोत, उद्या कृष्णपुरी मध्ये असणार. श्रीकृष्ण थोडाच इथे असू शकतो. श्रीकृष्ण जन्म घेतोच मुळी सतयुगामध्ये. तो आहे पहिला राजकुमार. शाळेमध्ये शिकायला जातो, जेव्हा मोठा होतो तेव्हा गादीचा मालक बनतो. बाकी ही रासलीला इत्यादी ते तर आपसामध्ये आनंद साजरा करत असतील. परंतु श्रीकृष्ण कोणाला बसून ज्ञान सांगतील, हे कसे होऊ शकते? सर्व महिमा एका शिवबाबांची आहे, जे पतितांना पावन बनवतात. तुम्ही एखाद्या मोठ्या अधिकाऱ्यांना हे ज्ञान समजावून सांगा तर ते म्हणतील - तुम्ही बरोबर सांगत आहात. परंतु ते इतर कुणाला हे ज्ञान ऐकवू शकणार नाहीत. त्यांचे कोणी ऐकणारही नाही. बी.के. बनला की सर्व म्हणतील - यांना तर जादू लागली आहे. बी.के. चे नाव ऐकले की बस्स. समजतात की या जादू करत असणार. थोडे कोणाला ज्ञान द्या तर म्हणतात - या बी.के. जादू करतात. बस्स, या तर आपल्या दादांशिवाय दुसऱ्या कोणालाच मानत नाहीत, भक्ती इत्यादी काहीच करत नाहीत. बाबा तर म्हणतात - कोणालाही मनाई करू नका की, भक्ती करू नका; ती आपोआपच सुटेल. तुम्ही भक्ती सोडता, विकार सोडता, यावरुनच हंगामा होतो.

बाबांनी सांगितले आहे - मी रुद्र ज्ञान यज्ञ रचतो, यामध्ये आसुरी संप्रदायाची विघ्ने पडतात. हा आहे शिवबाबांचा बेहदचा यज्ञ, ज्यामध्ये मनुष्यापासून देवता बनतात. गायन देखील आहे - ज्ञान यज्ञातून विनाश ज्वाळा प्रज्वलित झाली. जेव्हा जुनी दुनिया विनाश होईल तेव्हाच तुम्ही नवीन दुनियेमध्ये राज्य कराल. मनुष्य म्हणतील - आम्ही म्हणतो शांती व्हावी आणि या बी.के. म्हणतात विनाश व्हावा. बाबा समजावून सांगतात - ही सारी जुनी दुनिया या ज्ञान यज्ञामध्ये स्वाहा होईल. या जुन्या दुनियेला आग लागणार आहे. नैसर्गिक आपत्ती देखील येतील. विनाश तर व्हायचाच आहे. मोहरी प्रमाणे सर्व मनुष्य चिरडून नष्ट होतील. बाकी आत्मे वाचतील. हे तर कोणीही समजू शकते - आत्मा अविनाशी आहे. आता ही बेहदची होलिका होणारच आहे, ज्यामध्ये सर्व शरीरे नष्ट होतील. बाकी आत्मे पवित्र बनून निघून जातील. आगीमध्ये वस्तू शुद्ध होते ना. हवन करतात शुद्धतेकरिता. त्या सर्व आहेत भौतिक गोष्टी. आता तर संपूर्ण दुनिया स्वाहा होणार आहे. विनाश होण्यापूर्वी स्थापना जरूर झाली पाहिजे. कोणालाही समजावून सांगताना आधी हे सांगा की, अगोदर स्थापना, नंतर विनाश. ब्रह्मा द्वारे स्थापना. प्रजापिता तर प्रसिद्ध आहेत ना. आदि देव आणि आदि देवी. जगत अंबेची देखील लाखो मंदिरे आहेत. कित्तीतरी जत्रा भरतात. तुम्ही आहात जगत अंबेची मुले - ज्ञान-ज्ञानेश्वरी, नंतर मग बनाल राज-राजेश्वरी. तुम्ही अतिशय श्रीमंत बनता, आणि मग भक्तीमार्गामध्ये लक्ष्मीकडून दीपावलीला विनाशी धन मागतात. इथे तर सर्व काही मिळते. आयुष्मान भव, पुत्रवान भव. तुम्ही जाणता - आपले आयुष्य १५० वर्षांचे असते. बाबा म्हणतात - जितका योग लावाल तितके आयुष्य वाढत राहील. तुम्ही ईश्वराशी योग लावून योगेश्वर बनता. मनुष्य तर आहेत भोगेश्वर. म्हटले देखील जाते - ‘विकारी, मूत पलीती कपड धोए…’ बाबा म्हणतात - मला धोबी देखील म्हणतात. मी येऊन सर्व आत्म्यांना स्वच्छ करतो तर मग शरीर देखील नवीन, शुद्ध मिळणार. बाबा म्हणतात - मी सेकंदामध्ये संपूर्ण दुनियेचे कपडे स्वच्छ करतो. केवळ मनमनाभव झाल्याने आत्मा आणि शरीर पवित्र बनतील. छूमंतर आहे ना; सेकंदामध्ये जीवनमुक्ती. किती सोपा उपाय आहे. बाबांची आठवण करा तर पावन बनाल. चालता-फिरता फक्त बाबांची आठवण करा, अजून काही थोडा सुद्धा तुम्हाला त्रास देत नाही. फक्त आठवण करायची आहे. आता तुमची प्रत्येक सेकंदाला चढती कला होत आहे.

बाबा म्हणतात - मी तुम्हा मुलांचा सर्व्हंट बनून आलो आहे. तुम्ही बोलावलेच आहे की, ‘हे पतित-पावन या, येऊन आम्हाला पावन बनवा’. ठीक आहे मुलांनो, आलो आहे तर सर्व्हंट झालो ना. जेव्हा तुम्ही खूप पतित बनला आहात तेव्हाच तुम्ही मोठ्याने ओरडत आहात. आता मी आलो आहे. मी कल्प-कल्प येऊन तुम्हा मुलांना हा मंत्र देतो - ‘माझी आठवण करा तर तुम्ही पावन बनाल’. मनमनाभवचा अर्थच आहे - मनमनाभव, मध्याजी भव, अर्थात बाबांची आठवण करा तर तुम्ही विष्णुपुरीचे मालक बनाल. तुम्ही आलाच आहात विष्णुपुरीचे राज्य घेण्यासाठी. रावणपुरी नंतर आहे विष्णुपुरी. कंसपुरी नंतर कृष्णपुरी, किती सोपे करून सांगितले जाते. बाबा म्हणतात - या जुन्या दुनियेमधला मोह काढून टाका. आता आपण ८४ जन्म पूर्ण केले आहेत. हा जुना चोला (शरीर) सोडून आपण नवीन दुनियेमध्ये जाणार आहोत. आठवणीनेच तुमची पापे नष्ट होत जातील. इतकी हिंमत केली पाहिजे. ते तर ‘ब्रह्म’ ची आठवण करतात. समजतात की ‘ब्रह्म’मध्ये लीन होणार. परंतु ‘ब्रह्म’ तर आहे राहण्याचे ठिकाण. ते लोक समाधी लावून बसतात. बस्स, मी ‘ब्रह्म’मध्ये जाऊन लीन होणार. परंतु असे परत तर कोणी जाऊ शकत नाही. ‘ब्रह्म’ तत्वासोबत योग लावल्याने पावन काही बनणार नाही, एकही जाऊ शकणार नाही. पुनर्जन्म तर घ्यावाच लागतो. बाबा येऊन सत्य सांगतात, सचखंड सच्चे बाबा स्थापन करतात. रावण येऊन झूठ खंड बनवतो. आता हे आहे संगमयुग. यामध्ये तुम्ही उत्तम ते उत्तम बनता, म्हणून याला पुरुषोत्तम म्हटले जाते. तुम्ही कवडीपासून हिर्यासारखे बनता. ही आहे बेहदची गोष्ट. उत्तम ते उत्तम मनुष्य आहेत देवता. तर आता पुरुषोत्तम संगमयुगावर तुम्ही बसला आहात. तुम्हाला पुरुषोत्तम बनविणारे आहेत उच्च ते उच्च बाबा. उच्च ते उच्च स्वर्गाचा वारसा तुम्हाला देतात, मग तुम्ही हे विसरता कसे? बाबा म्हणतात - माझी आठवण करा. मुले म्हणतात - बाबा कृपा करा म्हणजे आम्ही विसरणार नाही. हे कसे होऊ शकते! बाबांच्या डायरेक्शनवर चालायचे आहे ना. बाबा म्हणतात - माझी आठवण करा तर तुम्ही पतितापासून पावन बनाल. सल्ल्यानुसार चला ना. अजून कसले आशीर्वाद देणार. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) बाबांच्या प्रत्येक डायरेक्शन प्रमाणे चालून स्वतःला कवडी पासून हिऱ्यासमान बनवायचे आहे. एका बाबांच्या आठवणीमध्ये राहून आपल्या वस्त्राला (शरीराला) स्वच्छ बनवायचे आहे.

२) आता नवीन घरामध्ये जायचे आहे त्यामुळे या जुन्या घरापासून बेहदचे वैराग्य ठेवायचे आहे. नशा असावा की या जुन्या कब्रस्तानावर आम्ही परिस्तान बनवणार आहोत.

वरदान:-
दयेच्या दृष्टीद्वारे घृणेच्या दृष्टीला समाप्त करणारे नॉलेजफुल भव

जी मुले एकमेकांच्या संस्कारांना जाणून संस्कार परिवर्तनाच्या धूनमध्ये राहतात, ती कधी असा विचार करत नाहीत की, ‘हे तर असेच आहेत’, त्यांना म्हणणार नॉलेजफुल. ते स्वतःला बघतात आणि निर्विघ्न राहतात. त्यांचे संस्कार पित्यासमान दयाळूपणाचे असतात. दयेची दृष्टी, घृणेच्या दृष्टीला नष्ट करते. अशी दयाळू मुले कधी आपसामध्ये कट-कट करत नाहीत. ते सपूत बनून सबूत देतात (सुपुत्र बनून पुरावा देतात).

बोधवाक्य:-
सदैव परमात्मा चिंतन करणारेच निश्चिंत बादशहा आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारची चिंता असू शकत नाही.

हे अव्यक्त इशारे:- एकता आणि विश्वासाच्या विशेषतेद्वारे सफलता संपन्न बना.

स्व उन्नती आणि सेवेची उन्नती दोन्हीमध्ये एकाने सांगितले आणि दुसऱ्याने हां जी केले, असे नेहमी एकोप्याने आणि दृढतेने पुढे जात रहा. जसे दादींमध्ये एकोप्याचे आणि दृढतेचे संघटन एकदम पक्के आहे, तसे तुम्हा रत्नांचे देखील संघटन पक्के असावे, तेव्हाच संघटनची शक्ती जे पाहिजे ते करू शकते. संघटनची निशाणी असलेले यादगार आहे - पाच पांडव.