27-03-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - खिवैया आले आहेत तुमची नौका पार करण्यासाठी, तुम्ही बाबांशी सच्चाईने रहा
तर नौका हलेल-डुलेल परंतु बुडणार नाही”
प्रश्न:-
मुलांना
बाबांची यथार्थपणे आठवण न राहण्याचे मुख्य कारण काय आहे?
उत्तर:-
साकारमध्ये येत-येत विसरून गेले आहेत की आपण आत्मा निराकार आहोत आणि आपले बाबा
देखील निराकार आहेत, साकार असल्या कारणाने साकारची आठवण सहज येते. देही-अभिमानी
बनून स्वतःला बिंदू समजून बाबांची आठवण करणे - यामध्येच मेहनत आहे.
ओम शांती।
शिव भगवानुवाच. यांचे नाव काही शिव तर नाही आहे ना. यांचे नाव आहे - ब्रह्मा आणि
यांच्याद्वारे बोलतात - शिव भगवानुवाच. हे तर अनेकदा समजावून सांगितले आहे की,
कोणत्या मनुष्याला किंवा देवताला किंवा सूक्ष्मवतनवासी ब्रह्मा, विष्णू, शंकराला
भगवान म्हटले जात नाही. ज्यांचा कोणता आकार किंवा साकार चित्र आहे त्यांना भगवान
म्हणू शकत नाही. भगवान म्हटलेच जाते बेहदच्या बाबांना. भगवान कोण आहे, हे कोणालाच
माहित नाही. नेती-नेती म्हणतात अर्थात आम्हाला माहित नाही. तुमच्यामध्ये देखील असे
फार थोडे आहेत जे यथार्थ रीतीने जाणतात. आत्मा म्हणते - ‘हे भगवान’. आता आत्मा तर
आहे बिंदू. तर मग बाबा देखील बिंदूच असतील. आता बाबा बसून मुलांना समजावून सांगत
आहेत. बाबांकडे बरीच अशी मुले आहेत, जी हे देखील समजत नाहीत की आपण आत्मा कसा बिंदू
आहोत! कोणी तर चांगल्या रीतीने समजतात, बाबांची आठवण करतात. बेहदचे बाबा आहेत सच्चा
हिरा. हिऱ्याला खूप चांगल्या डब्बीमध्ये ठेवले जाते. कोणाजवळ चांगले हिरे असतात तर
कोणाला दाखवायचे असतील तर सोन्या-चांदीच्या डब्बीमध्ये ठेवून मग दाखवतात. हिऱ्याला
सोनारच जाणे इतर कोणीही जाणू शकत नाही. खोटा हिरा दाखवला तरी देखील कोणाला माहित
होणार नाही. बऱ्याचजणांची अशा प्रकारे फसवणूक होते. तर आता सत्य बाबा आले आहेत,
परंतु खोटे देखील असे काही झाले आहेत जे लोकांना काहीच माहित होत नाही. गायले देखील
जाते - ‘सत्याची नाव हलेल-डुलेल परंतु बुडणार नाही’. खोट्याची नाव त्यांना कितीही
हलविण्याचा प्रयत्न केला तरी हलणार नाही. जे इथे या नावेमध्ये बसले आहेत ते देखील
हलविण्याचा प्रयत्न करतात. ट्रेटर (विद्रोही) म्हणून गायले जातात ना. आता तुम्ही
मुले जाणता खिवैया बाबा आलेले आहेत. ते बागवान देखील आहेत. बाबांनी सांगितले आहे हे
आहे काट्यांचे जंगल. सर्व पतित आहेत ना. किती खोटे आहे. सत्य बाबांना विरळाच कोणी
जाणतो. इथले देखील बरेचजण पूर्णपणे जाणत नाहीत, पूर्ण ओळख नाही, कारण गुप्त आहेत
ना. भगवंताची आठवण तर सर्वजण करतात, हे देखील जाणतात की ते निराकार आहेत.
परमधाममध्ये राहतात. आपण देखील निराकार आत्मा आहोत - हे जाणत नाहीत. साकारमध्ये
राहून-राहून हे विसरून गेले आहेत. साकारमध्ये राहता-राहता साकारचीच आठवण येते.
तुम्ही मुले आता देही-अभिमानी बनता. भगवंताला म्हटले जाते - परमपिता परमात्मा. हे
समजणे तर एकदम सोपे आहे. परमपिता अर्थात परे ते परे राहणारा ‘परम आत्मा’. तुम्हाला
म्हटले जाते - आत्मा. तुम्हाला ‘परम’ म्हणता येणार नाही. तुम्ही तर पुनर्जन्म घेता
ना. या गोष्टी कोणीही जाणत नाहीत. भगवंताला देखील सर्वव्यापी म्हणतात. भक्त भगवंताला
शोधत असतात, डोंगरांवर, तीर्थक्षेत्रांवर, गंगातटी देखील जातात. समजतात नदी
पतित-पावनी आहे, त्यामध्ये स्नान करून आपण पावन बनणार. भक्ती मार्गामध्ये हे देखील
कोणाला समजत नाही की, आपल्याला पाहिजे काय आहे? फक्त म्हणतात मुक्ती पाहिजे, मोक्ष
पाहिजे कारण इथे दुःखी असल्या कारणाने त्रासलेले आहेत. सतयुगामध्ये कोणी मोक्ष किंवा
मुक्ती थोडीच मागतात. तिथे भगवंताला कोणीही बोलावत नाही, इथे दुःखी असल्या कारणाने
बोलावतात. भक्तीने कोणाचे दुःख दूर करू शकत नाही. भले कोणी संपूर्ण दिवसभर बसून
राम-राम जपतील, तरी देखील दुःख दूर होऊ शकत नाहीत. हे आहेच रावण राज्य. दुःख तर
गळ्यामध्ये जसे बांधूनच टाकलेले आहे. गातात देखील - ‘दुःख में सिमरण सब करें सुख
में करे न कोई’. याचा अर्थ जरूर सुख होते, आता दुःख आहे. सुख होते सतयुगामध्ये,
दुःख आहे आता कलियुगामध्ये म्हणून याला काट्यांचे जंगल म्हटले जाते. पहिला नंबर आहे
देह-अभिमानाचा काटा. नंतर आहे काम विकाराचा काटा.
आता बाबा समजावून
सांगत आहेत - तुम्ही या डोळ्यांनी जे काही पाहता ते नष्ट होणार आहे. आता तुम्हाला
यायचे आहे शांतीधामला. आपल्या घराची आणि राजधानीची आठवण करा. घराच्या आठवणी सोबतच
बाबांची आठवण देखील आवश्यक आहे कारण घर काही पतित-पावन नाही आहे. तुम्ही ‘पतित-पावन’,
बाबांनाच म्हणता. तर बाबांचीच आठवण करावी लागेल. ते म्हणतात - मामेकम् (मज एकाची)
आठवण करा. मलाच बोलावता ना - ‘बाबा, येऊन पावन बनवा’. ज्ञानाचा सागर आहेत तर जरूर
येऊन मुखाद्वारे समजावून सांगावे लागेल. प्रेरणा तर करणार नाहीत. एकीकडे शिव जयंती
देखील साजरी करतात, दुसरीकडे मग म्हणतात नावा-रुपापासून न्यारा आहे. नावा-रूपा
पासून न्यारी वस्तू तर कोणती असत नाही. मग म्हणतात दगडा-मातीमध्ये सर्वांमध्ये आहे.
अनेक मते आहेत ना. बाबा समजावून सांगतात तुम्हाला ५ विकार रुपी रावणाने तुच्छ बुद्धी
बनविले आहे म्हणून देवतांच्या समोर जाऊन नमस्ते करतात. कोणी तर नास्तिक असतात,
कोणालाच मानत नाहीत. इथे बाबांकडे तर येतातच ब्राह्मण, ज्यांना ५ हजार वर्षांपूर्वी
समजावून सांगितले होते. लिहिलेले देखील आहे - ‘परमपिता परमात्मा ब्रह्माद्वारे
स्थापना करतात’; तर ब्रह्माची संतान झालात. प्रजापिता ब्रह्मा तर प्रसिद्ध आहेत.
जरूर ब्राह्मण-ब्राह्मणी देखील असतील. आता तुम्ही शूद्र धर्मातून निघून ब्राह्मण
धर्मामध्ये आला आहात. वास्तवामध्ये हिंदू म्हटले जाणारे आपल्या खऱ्या धर्माला जाणत
नाहीत म्हणून कधी कोणाला मानतील, कधी कोणाला मानतील. सर्वांकडे जात राहतील.
क्रिश्चन लोक कधी दुसऱ्या कोणाकडे जाणार नाहीत. आता तुम्ही सिद्ध करून सांगता -
भगवान बाबा म्हणतात - ‘माझी आठवण करा’. एक दिवस वर्तमानपत्रांमध्ये देखील येईल की,
भगवान म्हणतात - माझी आठवण केल्यानेच तुम्ही पतितापासून पावन बनाल. जेव्हा विनाश
जवळ असेल तेव्हा वर्तमानपत्रांद्वारे देखील हा आवाज कानावर पडेल. वर्तमानपत्रांमध्ये
तर कुठून-कुठून समाचार येतात ना. आता देखील टाकू शकता. “भगवानुवाच - परमपिता
परमात्मा शिव म्हणतात - ‘मी आहे पतित-पावन, माझी आठवण करा तर तुम्ही पावन बनाल’”.
या पतित दुनियेचा विनाश समोर उभा आहे. विनाश जरूर होणार आहे, हा देखील सर्वांना
निश्चय होईल. रिहर्सल सुद्धा होत राहील. तुम्ही मुले जाणता, जो पर्यंत राजधानी
स्थापन होत नाही तोपर्यंत विनाश होणार नाही, भूकंप इत्यादी देखील होणार आहेत ना.
एकीकडे बॉम्ब्स फुटतील दुसरीकडे नैसर्गिक आपत्ती देखील येतील. अन्न इत्यादी काहीच
मिळणार नाही, आगबोटी येणार नाहीत, दुष्काळ पडेल, भूकेने तडफडून-तडफडून नष्ट होतील.
उपोषण-संप जे करतात ते निदान काही ना काही पाणी किंवा मध इत्यादी घेत राहतात. वजन
कमी होते. इथे तर बसल्या-बसल्या अचानक भूकंप होईल, मरतील. विनाश तर जरूर होणार आहे.
साधू-संत इत्यादी असे म्हणणार नाहीत की, विनाश होणार आहे म्हणून राम-राम म्हणा.
मनुष्य तर भगवंतालाच जाणत नाहीत. भगवान तर स्वतः स्वतःला जाणत असतील, इतर कोणीही
जाणत नाही. त्यांच्या येण्याची ठरलेली वेळ आहे, जे मग या वृद्ध तनामध्ये येऊन साऱ्या
सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे नॉलेज ऐकवतात. तुम्ही मुले जाणता आता परत जायचे आहे.
याने तर आनंद झाला पाहिजे, आपण शांतीधामला जाणार. मनुष्याला शांतीच हवी आहे परंतु
शांती देणार कोण? म्हणतात ना - शांती देवा… आता देवांचाही देव तर ते एकच सर्वोच्च
बाबा आहेत. ते म्हणतात - मी तुम्हा सर्वांना पावन बनवून घेऊन जाणार. एकालाही सोडणार
नाही. ड्रामा अनुसार सर्वांना जायचेच आहे. गायन आहे - मच्छरांसदृश्य सर्व आत्मे
जातात. हे देखील जाणतात सतयुगामध्ये फार थोडे मनुष्य असतात. आता कलियुग अंतामध्ये
किती प्रचंड मनुष्य आहेत आणि मग थोडे कसे होणार? आता आहे संगम. तुम्ही सतयुगामध्ये
जाण्यासाठी पुरुषार्थ करता. जाणता हा विनाश होणार आहे. मच्छरांसदृश्य आत्मे जातील.
सारी झुंड निघून जाईल. सतयुगामध्ये खूप थोडे राहतील.
बाबा म्हणतात -
कोणत्याही देहधारीची आठवण करू नका, दिसत असतानाही आम्ही बघत नाही. आम्ही आत्मा आहोत,
आम्ही आमच्या घरी जाणार. आनंदाने जुने शरीर सोडायचे आहे. आपल्या शांतीधामची आठवण
करत रहाल तर अंत मती सो गती होईल. एका बाबांचीच आठवण करणे, यामध्येच मेहनत आहे.
मेहनती शिवाय उच्च पद थोडेच मिळेल. बाबा येतातच मुळी तुम्हाला नरापासून नारायण
बनविण्याकरिता. आता या जुन्या दुनियेमध्ये काहीच चैन (शांती) नाही आहे. चैन आहेच
शांतीधाम आणि सुखधाममध्ये. इथे तर घरा-घरामध्ये अशांती आहे, मार-पीट आहे. बाबा
म्हणतात आता या घाणेरड्या दुनियेला (विकारी दुनियेला) विसरा. गोड-गोड मुलांनो, मी
तुमच्यासाठी स्वर्गाची स्थापना करण्यासाठी आलो आहे, या नरकामध्ये तुम्ही पतित बनला
आहात. आता स्वर्गामध्ये यायचे आहे. आता बाबांची आणि स्वर्गाची आठवण करा तर अंत मती
सो गति होईल. लग्नसमारंभ इत्यादी ठिकाणी भले जा परंतु आठवण बाबांची करा. सारे नॉलेज
बुद्धीमध्ये राहिले पाहिजे. भले घरी रहा, मुले इत्यादींचा संभाळ करा परंतु
बुद्धीमध्ये लक्षात ठेवा - बाबांचा आदेश आहे - माझी आठवण करा. घर सोडायचे नाहीये.
नाहीतर मुलांचा सांभाळ कोण करणार? भक्त लोक घरामध्ये राहतात, गृहस्थ व्यवहारामध्ये
राहतात तरी देखील भक्त म्हटले जातात कारण भक्ती करतात, घर-दार सांभाळतात.
विकारामध्ये जातात तरी देखील गुरू लोक त्यांना म्हणतात - श्रीकृष्णाची आठवण करा तर
त्याच्या सारखा मुलगा होईल. या गोष्टींमध्ये आता तुम्हा मुलांना जायचे नाही आहे
कारण तुम्हाला आता सतयुगामध्ये जाण्याच्या गोष्टी ऐकविल्या जातात, ज्याची स्थापना
होत आहे. वैकुंठाची स्थापना काही श्रीकृष्ण करत नाहीत, श्रीकृष्ण तर मालक बनला आहे.
बाबांकडून वारसा घेतला आहे. संगमाच्या वेळीच गीतेचे भगवान येतात. गीता ऐकवली
पित्याने आणि मुलाने ऐकली. भक्तिमार्गामध्ये मग पित्याच्या ऐवजी मुलाचे नाव टाकले
आहे. पित्याला विसरून गेले आहेत त्यामुळे गीतेचे देखील खंडन झाले आहे. ती खंडन
झालेली गीता वाचून काय होणार. बाबा तर राजयोग शिकवून गेले, याच्याद्वारे श्रीकृष्ण
सतयुगाचा मालिक बनला. भक्तिमार्गामध्ये सत्यनारायणाची कथा ऐकून कोणी स्वर्गाचा मालक
बनेल का? आणि कोणी या विचाराने ऐकत सुद्धा नाहीत, त्याने फायदा काहीच मिळत नाही.
साधु-संत इत्यादी आपले-आपले मंत्र देतात, फोटो देतात. इथे तशी काही गोष्ट नाहीये.
इतर सत्संगामध्ये जाल तर म्हणतील अमक्या स्वामीची कथा आहे. कोणाची कथा? वेदांताची
कथा, गीतेची कथा, भागवताची कथा. आता तुम्ही मुले जाणता आपल्याला शिकविणारा कोणी
देहधारी नाही आहे, ना कोणते शास्त्र इत्यादी काही वाचलेले आहे. शिवबाबांनी काही
शास्त्र वाचले आहे काय? वाचतात मनुष्य. शिवबाबा म्हणतात - मी गीता इत्यादी काही
वाचलेले नाही. हा रथ ज्यामध्ये बसलो आहे, याने वाचलेले आहे, मी वाचलेले नाही.
माझ्यामध्ये तर संपूर्ण सृष्टीचक्राच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान आहे. हा (ब्रह्मा)
रोज गीता वाचत असे. पोपटा प्रमाणे तोंडपाठ करत होते, जेव्हा बाबांनी प्रवेश केला तर
लगेच गीता सोडून दिली कारण बुद्धीमध्ये आले हे तर शिवबाबा ऐकवत आहेत.
बाबा म्हणतात - मी
तुम्हाला स्वर्गाची बादशाही देतो तर आता जुन्या दुनियेमधून मोह नष्ट करा. फक्त
मामेकम् (मज एकाची) आठवण करा. ही मेहनत करायची आहे. खऱ्या आशिकला वारंवार माशूकचीच
आठवण येत राहते. तर आता बाबांची आठवण देखील अशी पक्की राहीली पाहिजे. पारलौकिक बाबा
म्हणतात - मुलांनो, माझी आठवण करा आणि स्वर्गाच्या वारशाची आठवण करा. यामध्ये इतर
कसलाही आवाज करण्याची, चिपळ्या इत्यादी वाजवण्याची काही गरज नाही. काही
चांगली-चांगली गाणी येतात तर तेवढी वाजवली जातात, ज्याचा अर्थ देखील तुम्हाला
समजावून सांगतात. गाणी बनवणारे स्वतः मात्र काहीच जाणत नाहीत. मीरा भक्तिण होती,
तुम्ही तर आता ज्ञानी आहात. मुलांकडून जेव्हा एखादे काम नीट होत नाही तर बाबा
म्हणतात - तू तर जसा भक्त आहेस. तर ते समजतात की बाबांनी आम्हाला असे का म्हटले?
बाबा समजावून सांगत आहेत - मुलांनो, आता बाबांची आठवण करा, पैगंबर बना, मेसेंजर बना,
सर्वांना हाच संदेश द्या की बाबांची आणि वारशाची आठवण करा तर जन्म-जन्मांतरीची पापे
भस्म होतील. आता परत घरी जाण्याची वेळ आहे. भगवान एकच निराकार आहेत, त्यांना आपला
देह नाही आहे. बाबाच आपला परिचय बसून देतात. मनमनाभवचा मंत्र देतात. साधू-संन्यासी
इत्यादी असे कधी म्हणणार नाहीत की आता विनाश होणार आहे, बाबांची आठवण करा. बाबाच
ब्राह्मण मुलांना आठवण करून देतात. आठवणीनेच हेल्थ, शिक्षणाने वेल्थ मिळेल. तुम्ही
काळावर विजय प्राप्त करता. तिथे कधी अकाली मृत्यू होत नाही. देवतांनी काळावर विजय
प्राप्त केला आहे. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) असे कोणतेही
कर्म करायचे नाही ज्यामुळे बाबांकडून भक्ताचे टायटल मिळेल. पैगंबर बनून सर्वांना
बाबांची आणि वारशाची आठवण करण्याचा संदेश द्यायचा आहे.
२) या जुन्या
दुनियेमध्ये काहीच चैन (शांती) नाही, ही घाणेरडी दुनिया (विकारी दुनिया) आहे याला
विसरत जायचे आहे. घराच्या आठवणी सोबतच पावन बनण्यासाठी बाबांची आठवण देखील जरूर
करायची आहे.
वरदान:-
प्रवृत्तीमध्ये
राहत असताना पर-वृत्तीमध्ये राहणारे निरंतर योगी भव
निरंतर योगी बनण्याचे
सोपे साधन आहे - प्रवृत्तीमध्ये राहत असताना पर-वृत्तीमध्ये राहणे. पर-वृत्ती
अर्थात आत्मिक रूप. जो आत्मिक रूपामध्ये स्थित राहतो तो नेहमी न्यारा आणि बाबांचा
प्यारा बनतो. कोणतेही कार्य करेल परंतु असा अनुभव होईल जसे काम केले नाही परंतु खेळ
केला आहे. तर प्रवृत्तीमध्ये राहत असताना आत्मिक रूपामध्ये राहिल्याने सर्व गोष्टी
खेळा प्रमाणे सहज अनुभव होतील. बंधन वाटणार नाही. फक्त स्नेह आणि सहयोगासोबत शक्तीची
जोड द्या तर हाय जंप कराल.
बोधवाक्य:-
बुद्धीची
महीनता किंवा आत्म्याचा हलकेपणाच ब्राह्मण जीवनाची पर्सनॅलिटी आहे.
अव्यक्त इशारे -
सत्यता आणि सभ्यता रुपी कल्चरला धारण करा:-
‘हिम्मते शक्तियां
मदद दे सर्वशक्तिमान’. वाघिणी कधी कोणाला घाबरत नाहीत, निर्भय असतात. असेही भय नाही
की माहित नाही काय होईल! सत्यतेच्या शक्ती स्वरूप होऊन नशेमध्ये बोला, नशेने पहा.
आपण ऑलमाइटी गव्हर्मेंटचे अनुयायी आहोत, याच स्मृती द्वारे अयथार्थला यथार्थामध्ये
आणायचे आहे. सत्याला प्रसिद्ध करायचे आहे ना की लपवायचे आहे परंतु सत्यते सोबत
बोलण्यामध्ये मधुरता आणि सभ्यता गरजेची आहे.