27-05-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड मुलांनो -
काळाचेही काळ बाबा आले आहेत, तुम्हाला काळावर विजय प्राप्त करुन देण्याकरिता,
मनमनाभवच्या मंत्राद्वारेच तुम्ही काळावर विजय प्राप्त कराल”
प्रश्न:-
रुहानी बाबा
तुम्हा रुहानी यात्रींना कोणती एक विशेष शिकवण देतात?
उत्तर:-
हे रूहानी
यात्री - तुम्ही देह-अभिमान सोडून देही-अभिमानी बना. रावणाने अर्ध्या कल्पापासून
तुम्हाला देह-अभिमानी बनविले, आता आत्म-अभिमानी बना. हे रूहानी ज्ञान सुप्रीम रुहच
तुम्हाला देतात इतर कोणीही देऊ शकत नाही.
गीत:-
ओम् नमः शिवाय…
ओम शांती।
मुलांनी आपल्या
बाबांची महिमा ऐकली. गायले देखील जाते उच्च ते उच्च भगवान. ते आहेत सर्व मुलांचे
पिता. बाकी जे पण आहेत, आपसामध्ये सर्व ब्रदर्स आहेत आणि सर्वांचा पिता देखील एकच
आहेत. ते आहेत शिवबाबा. बाबांनी सांगितले आहे - ‘माझ्या मुलांनो, भक्तिमार्गामध्ये
तुम्हाला दोन पिता आहेत - लौकिक पिता आणि पारलौकिक पिता. रचयित्याकडून रचनेला वारसा
मिळतो, तो आहे हदचा वारसा, हा आहे बेहदचा वारसा. बेहदचे पिता तर एकच आहेत ज्यांच्या
कडून बेहदचा वारसा मिळतो. ते आहेत निराकार, त्यांचे नाव आहे परमपिता परमात्मा शिव.
म्हणतात देखील - ‘शिव परमात्माए नमः’, ते आहेत उच्च ते उच्च. तुमची बुद्धी निघून
जाते, निराकार बाबांच्या दिशेने. ते परमधाम मध्ये राहतात, जिथून तुम्ही आत्मे येता.
बाबा देखील तिथेच राहतात. ते आहेतच सर्वांची सद्गती करणारे. त्यातूनही भारत तर
परमपिता परमात्म्याची बर्थ प्लेस आहे, शिव जयंती देखील इथेच साजरी करतात. त्या
रूहानी पित्यालाच ज्ञानाचा सागर, पतित-पावन, लिबरेटर, गाईड म्हटले जाते. तेच दुःख
हर्ता, सुख कर्ता आहेत - हे भारतवासीच जाणतात. हे दुःख-धाम आहे, भारतच सुखधाम होता.
बाबा मुलांना बसून समजावून सांगत आहेत - ‘हे भारतवासी, तुम्ही विश्वाचे मालक होता,
जेव्हा की तुमचा आदि सनातन देवी-देवता धर्म होता. देवी-देवतांचा धर्म-श्रेष्ठ,
कर्म-श्रेष्ठ होते, आता हे धर्म-भ्रष्ट, कर्म-भ्रष्ट बनले आहेत. स्वतःला पावन देवता
म्हणू शकत नाहीत. कलियुगाच्या अंतापर्यंत भक्ती मार्ग चालतो, यामध्ये ज्ञानच नसते.
ज्ञानाद्वारेच सद्गती होते. सर्वांचे सद्गती दाता बाबा जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत
सद्गती होऊ शकत नाही. बाबा म्हणतात - मी कल्पाच्या संगमयुगावर येतो. यावेळी आहेच
पतित दुनिया. एकही पावन नसतो. भले संन्यासी पवित्र बनतात परंतु त्यांना पुनर्जन्म
तर इथेच घ्यावा लागतो. विषातून (विकारातून) जन्म घ्यावा लागेल. परत तर जायचे नाही
आहे. जेव्हा चक्र पूर्ण होते तेव्हाच बाबा येऊन घेऊन जातात. याला म्हटलेच जाते
रूहानी ज्ञान. सुप्रीम रूह, रुहानी ज्ञान देतात. सुप्रीम रुहच ज्ञानाचा सागर,
पतित-पावन आहेत. बाकी शास्त्रांचे ज्ञान तर आहे भक्तिमार्ग. बाबा म्हणतात - यज्ञ,
तप, तीर्थ इत्यादी करत अजूनच खाली घसरत आले आहेत (अधोगती होत आली आहे). तुम्ही पहिले
सतोप्रधान होता. भारतामध्ये प्युरिटी होती तर पीस, प्रोस्पेरिटी देखील होती. हेल्थ,
वेल्थ दोन्ही होते. आज पासून ५ हजार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, हा भारत स्वर्ग होता.
त्यावेळी इतर कोणताच धर्म नव्हता. केवळ एकच आदि सनातन देवी-देवता धर्म होता, जो
परमपिता परमात्म्याने स्थापन केला. स्वर्गाची स्थापना तर तेच करतील, मनुष्य काही करू
शकणार नाहीत. असे तर म्हणता येणार नाही - श्रीकृष्ण रचयिता आहेत. नाही, रचयिता एकच
निराकार शिव आहेत. बाकी आहे त्यांची रचना. रचयित्याकडूनच रचनेला वारसा मिळतो.
बाबा समजावून सांगत आहेत - मी तुमचा बेहदचा पिता आहे, तुम्हाला बेहदचा वारसा देतो,
२१ जन्मांकरिता. सूर्यवंशी, चंद्रवंशी पवित्र धर्म स्थापन करतो. ब्राह्मण धर्मच आहे
शिखा. सर्वश्रेष्ठ आहेत रूहानी पिता, आत्म्यांना आप समान बनवितात. बाबा ज्ञानाचा
सागर, सुखाचा सागर आहेत, तर तुम्हाला देखील बनवितात. भारतच सुखधाम होता, आता तर
दु:खधाम आहे. बाबा कसे येतात, हे कोणालाही माहीत नाही. सतयुग आदि पासून कलियुग अंता
पर्यंत ही सारी हिस्ट्री-जिओग्राफी भारताची आहे. हे लक्ष्मी-नारायण किती हेल्दी,
वेल्दी होते. कधीच आजारी पडत नव्हते. आता काळावर विजय प्राप्त करण्याचे शिक्षण घेत
आहेत. बाबा, ज्यांना काळांचा काळ महाकाळ म्हटले जाते, ते तुम्हाला काळावर विजय
मिळवून देत आहेत. नाव देखील ऐकले - ‘शिवाय नमः’. तुम्ही असे तर म्हणणार नाही की,
परमात्मा सर्वव्यापी आहेत, कुत्र्या-मांजरामध्ये आहेत, यालाच म्हटले जाते धर्माची
ग्लानी. बाबांची ग्लानी (निंदा) करतात. आता ही आहे कल्पाच्या संगमाची वेळ. या वेळीच
‘विनाश काले विपरीत बुद्धी’ म्हटले जाते. आता विनाश तर समोर उभा आहे. गीतेमध्ये
देखील लिहिलेले आहे - ‘यादव, कौरव, पांडव क्या करत भये.’ सर्व शास्त्रमई शिरोमणी
श्रीमत भगवद्गीता आहे, मग त्याद्वारेच इतर शास्त्रे तयार केली गेली आहेत. तुम्ही
जाणता गीता आहे डीटी धर्माचे (देवी-देवता धर्माचे) शास्त्र. बाबा म्हणतात - मी येऊन
तुम्हाला शूद्रा पासून ब्राह्मण बनवतो, मग सो देवी-देवता बनवतो. मग तुम्ही क्षत्रिय,
वैश्य, शूद्र बनता. बाबा समजावून सांगत आहेत - तुम्ही ८४ जन्म कसे घेता. सर्वात
जास्त जन्म जरूर तेच घेतात जे सर्वात पहिले सतयुगामध्ये येतात. जास्तीत-जास्त ८४
जन्म तुम्ही भारतवासीयांनी घेतले आहेत, कमीत-कमी एक जन्म. हे देखील बाबाच बसून
समजावून सांगतात. बाबा व्यतिरिक्त इतर कोणालाही ज्ञानाचा सागर म्हटले जात नाही.
पतित-पावन, ज्ञानाचा सागर म्हटल्याने बुद्धी वरच्या दिशेला जाते. बाबाच सर्वांना
लिबरेट करून परत घरी घेऊन जातात, सर्वांचे सद्गती दाता एक बाबाच आहेत. अच्छा मग
सर्वांची दुर्गती कशी होते? कोण करतो? सद्गती सतयुगाला, दुर्गती कलियुगाला म्हटले
जाते. बाबा म्हणतात - मी कल्प-कल्प तुम्हा मुलांना येऊन सद्गती देतो. तुम्ही मुले
संपूर्ण वर्ल्डची हिस्ट्री-जिओग्राफी जाणता. स्कूलमध्ये तर अर्धीच
हिस्ट्री-जिओग्राफी शिकवतात. सतयुग-त्रेतामध्ये कोण राज्य करत होते, हे कोणालाच
ठाऊक नाहीये. चित्रं तर बरोबर आहेत - हे लक्ष्मी-नारायण राज्य करत होते. किती काळ
ती राजधानी चालली हे तुम्ही सांगू शकता. क्रिश्चियन डिनायस्टी २ हजार वर्षे चालली.
बौद्ध डिनायस्टी इतका काळ चालली. इस्लामी… त्यांच्या अगोदर मग चंद्रवंशी होते
ज्यांचे राज्य १२५० वर्षे चालले. सतयुग-त्रेतामध्ये फक्त सूर्यवंशी-चंद्रवंशीच होते
इतर कोणताच धर्म नव्हता. तुम्हीच सूर्यवंशी-चंद्रवंशी बनता. आता पुन्हा ब्राह्मण
वंशी बनला आहात.
हे सर्व नाटक भारतावरच बनलेले आहे. भारतच हेल आणि हेविन बनतो इतर धर्मियांकरिता असे
म्हणता येणार नाही. ते तर हेवीनमध्ये असतही नाहीत. कोणाचा मृत्यू होतो तर म्हणतात -
स्वर्गवासी झाला, परंतु समजत नाहीत. नरकवासींना तर नरकामधेच जन्म घ्यावा लागेल.
स्वर्गवासी स्वर्गामध्येच पुनर्जन्म घेतील. तुम्ही मुले समजता हे लक्ष्मी-नारायण
स्वर्गवासी होते. त्यांनी ही राजधानी कशी प्राप्त केली. लाखो वर्षांची गोष्ट तर
लक्षातही राहू शकणार नाही. सतयुगामध्ये ही शास्त्रे इत्यादी असत नाहीत. ही सगळी
भक्तिमार्गाची सामग्री आहे. शिडी खाली उतरायचीच आहे. सतोप्रधानापासून सतो, रजो,
तमोमध्ये, ही शिडी उतरण्यामध्ये ५ हजार वर्षे लागतात. सतयुगामध्ये १६ कला संपूर्ण
मग त्रेतामध्ये २ कला कमी, आत्म्यामध्ये चांदीची भेसळ पडते. कॉपर एज्ड मध्ये आले तर
कॉपरची भेसळ पडली, यावेळी एकदमच तमोप्रधान आहेत. आत्म्यामध्येच भेसळ पडते. तुम्हीच
पूर्ण ८४ जन्म घेता. हे रूहानी पिता शिवबाबा येऊन रूहानी मुलांना समजावून सांगत
आहेत. तुम्हाला आता आत्म-अभिमानी बनायचे आहे. रावणाची प्रवेशता झाल्याने सर्व
देह-अभिमानी बनतात. आता स्वतःला आत्मा समजायचे आहे. आपणच ८४ जन्म घेऊन भिन्न-भिन्न
पार्ट बजावत आलो आहोत. आता ८४ जन्मांचे चक्र पूर्ण झाले आहे. आता तर शरीर देखील
जडजडीभूत झाले आहे. द्वापर पासून रावण राज्य सुरु होते. सतयुगामध्ये आहे रामराज्य.
सतयुगामध्ये तुम्ही आत्म-अभिमानी होता. द्वापर, कलियुगामध्ये तुम्ही देह-अभिमानी
बनता. ना आत्म्याला, ना परमात्म्याला जाणता.
बाबा समजावून सांगत आहेत - आत्मा एक स्टार आहे. ‘भ्रकुटी के बीच में चमकता है अजब
सितारा…’ त्याला दिव्य दृष्टी शिवाय पाहिले जाऊ शकत नाही. तो अति सूक्ष्म आहे.
आत्माच एक शरीर सोडून दुसरे घेते. मज आत्म्याने ८४ जन्म घेतले आहेत. परमपिता
परमात्मा देखील बिंदू आहेत, त्यांनाच ज्ञानाचा सागर, पतित-पावन नॉलेजफुल म्हटले जाते.
परमपिता परम-आत्म्यामध्येच सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान आहे. बीजरूप असल्या
कारणाने त्यांना सत्-चित्-आनंद स्वरूप म्हटले जाते. बाबांमध्ये जे ज्ञान आहे, ते तर
जरूर ऐकवावे लागेल. हे आहे स्पिरिच्युअल नॉलेज. सर्व आत्म्यांचे पिता येऊन
आत्म्यांना शिकवत आहेत. तुम्हाला आत्म-अभिमानी बनायचे आहे. शिवबाबा आपल्याला शिकवत
आहेत, तेच नॉलेजफुल आहेत. बाबाच येऊन स्वर्गाची रचना रचतात. तुम्हाला स्वर्गाच्या
लायक बनवत आहेत. हे सृष्टी चक्राचे रहस्य कोणीही मनुष्य जाणत नाहीत. बाबांनाच न
जाणल्याकारणाने भारताचे हे हाल झाले आहेत. भारतामध्ये प्युरिटी होती तर पीस,
प्रॉस्पेरिटी होती. आता तर आहेच नरक, तर मग स्वर्गामध्ये कोणी कसे बरे जाऊ शकतील!
अगदीच पत्थर-बुद्धी बनले आहेत.
बाबा म्हणतात - मी मुलांकरिता काही सौगात तर घेऊन येईन. तुम्हाला स्वर्गाचा मालक
बनवतो. ज्यांनी कल्पापूर्वी वारसा घेतला आहे, तेच आता घेतील. मनुष्यापासून देवता
बनतील. वास्तविक सर्व मुले तर प्रजापिता ब्रह्माची आहेत. आता ब्रह्मा द्वारेच
शिवबाबा रचना रचत आहेत. ब्रह्माकुमार-कुमारी बनत जातात. शिवबाबांकडून वारसा
घेण्याकरिता पुरुषार्थ करायचा आहे, तमोप्रधानापासून सतोप्रधान बनायचे आहे. बाबा
म्हणतात - ‘मुलांनो, माझी आठवण करा तर तुमची सर्व विकर्म विनाश होतील’. हे
स्पिरिच्युअल नॉलेज बाबांशिवाय इतर कोणीही देऊ शकत नाही. रुहानी बाबाच आत्म्यांना
ज्ञान देतात. तुम्ही रूहानी यात्रा करता. देह-अभिमानाला सोडून देही-अभिमानी बनता.
आत्मा अविनाशी आहे. आत्म्यामध्येच पार्ट भरलेला आहे. आत्मा कशी ८४ जन्मांचा पार्ट
बजावते, हे आता माहीत झाले आहे. आपण सूर्यवंशी होतो, मग चंद्रवंशी बनलो, आता पुन्हा
आपल्याला सूर्यवंशी बनायचे आहे. आता बाबा सतोप्रधान बनण्याचे शिक्षण देत आहेत,
मामेकम् (मज एकाची) आठवण करा. भगवानुवाच - गीतेचे भगवान शिवबाबा आहेत, ना की
श्रीकृष्ण. श्रीकृष्णाची आत्मा देखील आता शिकत आहे. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक
आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) रूहानी
यात्रा करायची आहे आणि करवून घ्यायची आहे. स्वतःला सतोप्रधान बनविण्याकरिता एका
बाबांचीच आठवण करायची आहे. आत्म-अभिमानी बनण्याचा चांगल्या रीतीने पुरुषार्थ करायचा
आहे.
२) काळावर विजय
प्राप्त करण्याकरिता बाबांनी दिलेली शिकवण लक्षात ठेवायची आहे. स्वतःला रूह (आत्मा)
समजून आत्म्यांना ज्ञान द्यायचे आहे.
वरदान:-
बापदादांच्या
कर्तव्याला आपला निशाणा (लक्ष्य) बनविणारे मास्टर मर्यादा पुरुषोत्तम भव
म्हटले जाते - “अपनी
घोट तो नशा चढे”. कधीही दुसऱ्यांच्या कमाईवर आपली दृष्टी जाता कामा नये. दुसऱ्याच्या
नशेला लक्ष्य बनविण्या ऐवजी बापदादांच्या गुण आणि कर्तव्याला लक्ष्य बनवा.
बापदादांसोबत अधर्माचा विनाश आणि सत्-धर्माची स्थापना या कर्तव्यामध्ये मदतगार बना.
अधर्माचा विनाश करणारे अधर्माचे कार्य अथवा दैवी मर्यादा तोडण्याचे कार्य करू शकत
नाहीत, ते मास्टर मर्यादा पुरुषोत्तम असतात.
बोधवाक्य:-
नॉलेजफुल बनून
व्यर्थ प्रश्नांना स्वाहा करा तर वेळ वाचेल.
मातेश्वरीजींची अनमोल
महावाक्ये -
‘जिसका साथी है भगवान
उसको क्या रोकेगा आंधी और तुफान…’ पहा हे गाणे सिद्ध करते की आत्मा आणि परमात्मा
दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत; आणि ना ईश्वर सर्वव्यापी आहेत. कारण ज्यांचा सोबती
स्वयं भगवान आहेत ते उपस्थित असताना देखील सृष्टीमध्ये इतके दुःख का आहे? मनुष्य
इतके गरीब, परावलंबी का आहेत? परमात्मा तर सुख स्वरूप आहेत तर त्या परमात्म्याला
सर्वव्यापी म्हणणे अर्थात परमात्म्याचा इन्सल्ट करणे आहे. भगवंताची इथे उपस्थिती
असताना दुनिया मग सुखमय असली पाहिजे की दुःखाने भरलेली? मग परमात्म्याला बोलावण्याची
गरजच काय? तर यावेळी माया सर्वव्यापी आहे, ना की परमात्मा उपस्थित आहेत. परमात्मा
केवळ एकदाच संगमावर येतात, तेव्हाच त्यांना हाजिर नाजिर म्हणू शकतो; बाकी त्यांची
आठवण सर्वांच्या हृदयामध्ये जरूर व्यापून राहिलेली आहे. शरीराला चालविणारी शक्ती तर
प्रत्येकामध्ये भिन्न-भिन्न संस्कार असणारी आत्मा आहे, ना की परमात्मा आहेत. आता
विचार करायचा आहे की, परमात्म्याची मदत का घेतली आहे? या मायेच्या
तुफान-चक्रीवादळांमधून पार करण्याकरिता, तर जरूर कोणते तरी मायेचे तुफान आहे ज्याला
पार करण्याकरिता आपण आत्मे परमात्म्याची मदत मागतो. जर ते उपस्थित असते तर ना मायेची
संकटे असती, ना त्यांची मदत घेण्यासाठी आठवण करावी लागली असती. तर आम्हा आत्म्यांचा
आणि परमात्म्याचा दोघांचाही पार्ट या खेळामध्ये आहे. तर जेव्हा परमात्मा येतात
तेव्हा त्यांची पूर्णपणे मदत घेऊन त्यांचे बनायचे आहे, तेव्हाच मायेच्या
वादळांपासून मुक्त होऊ शकाल. भले ते सर्वांचे सुखदाता आहेत परंतु जे प्रॅक्टिकलमध्ये
त्यांचा आधार घेतात त्यांनाच मदत मिळते. तर त्या मुलांना एक्स्ट्रा प्राप्ती होते;
भले ते या दुनियेमध्ये येऊन उपस्थित झाले आहेत, परंतु ओहो! हे आश्चर्यकारक आहे!
दुनिया त्यांना न ओळखल्याकारणाने त्यांची मदत घेऊ शकत नाही, जर त्यांची पूर्णपणे
सोबत घेतील तर ते मदत देण्यामध्ये प्रसिद्ध आहेत. म्हटले जाते - एक पाऊल तुम्ही पुढे
या तर ते दहा पावले पुढे येतील, तर ते संपूर्ण वारसा देतात ज्यामध्ये कोणतीही उणीव
राहत नाही. अच्छा.
हे अव्यक्त इशारे -
सदैव अचल, अडोल एकरस स्थितीचा अनुभव करा.
कोणताही संकल्प आला
तर तो वर बाबांना देऊन स्वतः निरसंकल्प होऊन चालत
राहा. विचार देणे,
इशारा देणे ही वेगळी गोष्ट आहे, हलचलमध्ये येणे - ही वेगळी गोष्ट आहे. तर नेहमी
एकरस. संकल्प दिला आणि निरसंकल्प बनले. नेहमी हे लक्षात राहावे की मला कर्मेंद्रिय
जीत बनायचे आहे. कोणत्या एखाद्या कर्मेंद्रियाचे आकर्षणसुद्धा तुम्हाला बाबांचे बनू
देणार नाही. एकरस स्थितीमध्ये स्थित होऊ देणार नाही.