27-06-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुम्हाला शरीरापासून वेगळे होऊन बाबांकडे जायचे आहे, तुम्ही शरीराला सोबत घेऊन जाऊ शकत नाही, त्यामुळे शरीराला विसरून आत्म्याला बघा”

प्रश्न:-
तुम्ही मुले आपले आयुष्य योगबलाने वाढविण्याचा पुरुषार्थ का करता?

उत्तर:-
कारण तुम्हाला इच्छा होते की आपण बाबांद्वारे सर्व काही याच जन्मामध्ये जाणून घ्यावे. बाबांद्वारे सर्व काही ऐकावे, म्हणून तुम्ही योगबलाने आपले आयुष्य वाढविण्याचा पुरुषार्थ करता. आत्ताच तुम्हाला बाबांकडून प्रेम मिळते. असे प्रेम पुन्हा साऱ्या कल्पामध्ये मिळू शकत नाही. बाकी जे शरीर सोडून निघून गेले, त्यांच्यासाठी म्हणणार ड्रामा. त्यांचा तितकाच पार्ट होता.

ओम शांती।
मुले जन्म-जन्मांतर इतर सत्संगांमध्ये गेले आहेत आणि इथे देखील आले आहेत. वास्तविक याला देखील सत्संग म्हटले जाते. सत् का संग तारे. मुलांच्या मनामध्ये येते - आपण आधी भक्तिमार्गातील सत्संगांमध्ये जात होतो आणि आता इथे बसलो आहोत. रात्रं-दिवसाचा फरक जाणवतो. इथे सर्वात आधी तर बाबांचे प्रेम मिळते. नंतर मग बाबांना मुलांचे प्रेम मिळते. आता या जन्मामध्ये तुमच्यामध्ये बदल होत आहे. तुम्हा मुलांना समजले आहे आपण आत्मा आहोत, शरीर नाही. शरीर म्हणणार नाही की, ‘माझी आत्मा’. आत्मा म्हणू शकते, ‘माझे शरीर’. आता मुले समजतात - जन्म-जन्मांतर ते साधू, संत, महात्मा इत्यादी करत आलो आहोत. आज काल तर फॅशन झाली आहे - सांई बाबा, मेहर बाबा… ते देखील सर्व देहधारी झाले. देहधारींच्या प्रेमामध्ये सुख तर असतच नाही. आता तुम्हा मुलांचे आहे रूहानी (आत्मिक) प्रेम. रात्रं-दिवसाचा फरक आहे. इथे तुम्हाला बुद्धी (ज्ञान) मिळते आहे, तिथे तर अगदीच निर्बुद्ध आहेत. तुम्ही आता समजता की, बाबा येऊन आम्हाला शिकवत आहेत. ते सर्वांचे पिता आहेत. पुरुष तथा स्त्री सर्व स्वतःला आत्मा समजतात. बाबा बोलावतात देखील - ‘माझ्या मुलांनो’. मुले देखील प्रतिसाद देतील. हा आहे बाबा आणि मुलांचा मेळावा. मुले जाणतात हा बाबा आणि मुलांचा, आत्मा आणि परमात्म्याचा मेळावा एकदाच होतो. मुले ‘बाबा-बाबा’ करत राहतात. ‘बाबा’ शब्द खूप गोड आहे. ‘बाबा’ म्हटल्यानेच वारशाची आठवण होईल. तुम्ही लहान तर नाही आहात. पिता जे समजावून सांगतात ते मुलाला लगेच समजते. बाबांकडून काय वारसा मिळतो. ते लहान मूल तर समजू शकत नाही. इथे तुम्ही जाणता की आपण बाबांकडे आलो आहोत. बाबा म्हणतात - ‘माझ्या मुलांनो’, तर यामध्ये सर्व मुले आली. सर्व आत्मे घरातून इथे येतात पार्ट बजावण्यासाठी. कोण केव्हा पार्ट बजावण्यासाठी येतो, हे देखील बुद्धीमध्ये आहे. ते जिथून येतात त्या सर्वांचे सेक्शन्स वेगवेगळे आहेत. पुन्हा शेवटी मग सर्व आपल्या-आपल्या सेक्शनमध्ये जातात. हे देखील सर्व ड्रामामध्ये नोंदलेले आहे. बाबा कुणालाही पाठवत नाहीत. ऑटोमॅटिकली हा ड्रामा बनलेला आहे. प्रत्येक जण आपापल्या धर्मामध्ये येत राहतात. बुद्धाचा धर्म जर स्थापन झाला नसेल तर त्या धर्माचे कोणीही येणार नाहीत. सर्वप्रथम सूर्यवंशी-चंद्रवंशीच येतात. जे बाबांकडून चांगल्या रीतीने शिकतात, ते नंबरवार सूर्यवंशी, चंद्रवंशीमध्ये शरीर घेतात. तिथे विकाराची तर गोष्टच नाही. योगबलाने आत्मा येऊन गर्भामध्ये प्रवेश करते. यावरून समजणार की माझी आत्मा या शरीरामध्ये जाऊन प्रवेश करेल. वृद्ध समजतात - माझी आत्मा योगबलाने जाऊन हे शरीर घेणार. माझी आत्मा आता पुनर्जन्म घेते. ते वडील देखील समजतात - आमच्याकडे बाळ आले आहे. बाळाची आत्मा येत आहे, जिचा साक्षात्कार होतो. ते स्वतःसाठी असे समजतात - मी जाऊन दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो. हे देखील विचार येतात ना. जरूर तिथला कायदा असेल. मूल कोणत्या वयामध्ये येणार, ते तर सर्व काही नियमितपणे चालत असते ना. ते तर पुढे गेल्यावर जाणीव होईल. सर्व काही माहिती होईल, असे तर नाही १५-२० वयामध्ये मुल होईल, जसे इथे होते. नाही, तिथे (सतयुगामध्ये) आयुष्य दीडशे वर्षांचे असते, तर मूल तेव्हा होईल जेव्हा निम्म्या आयुष्यापेक्षा थोडे जास्त वय असेल, तेव्हा मूल जन्माला येते कारण तिथे एकूण वय जास्त असते, एकच तर मुलगा होणार असतो. मग मुलगी देखील येईल, नियम असेल. आधी मुलाची आणि मग मुलीची आत्मा येते. विवेक म्हणतो आधी मुलगा आला पाहिजे. आधी मेल, नंतर फीमेल. आठ-दहा वर्षे उशिराने येईल. पुढे चालून तुम्हा मुलांना सर्व साक्षात्कार होणार आहेत. कसे तिथले रिती-रिवाज आहेत, या सर्व नवीन दुनियेच्या गोष्टी बाबा बसून समजावून सांगतात. बाबाच नवीन दुनिया स्थापन करणारे आहेत. रिती-रिवाज देखील जरूर सांगत जातील. पुढे गेल्यावर अनेक गोष्टी सांगतील आणि तेव्हा साक्षात्कार होत राहतील. मुले कशी जन्माला येतील, काही नवीन गोष्ट नाही.

तुम्ही तर अशा ठिकाणी जाता जिथे कल्प-कल्प जावेच लागते. वैकुंठ तर आता अगदी जवळ आला आहे. आता तर एकदम जवळच येऊन पोहोचले आहात. जितके तुम्ही ज्ञान आणि योगामध्ये मजबूत होत जाल तितके प्रत्येक गोष्ट तुम्हाला जवळ दिसून येईल. अनेकदा तुम्ही पार्ट बजावला आहे. आता तुम्हाला समज (ज्ञान) मिळाले आहे, तेच तुम्ही सोबत घेऊन जाल. तिथले रीती-रिवाज काय असतील, सर्व समजतील. सुरुवातीला तुम्हाला सर्व साक्षात्कार झाले होते. त्यावेळेस तर अजून तुम्ही अल्फ (बाबा) बे (बादशाही) शिकत होता. मग शेवटी देखील तुम्हाला जरूर साक्षात्कार झाले पाहिजेत. ते तर बाबा बसून सांगतात, ते सर्व बघण्याची इच्छा तुम्हाला इथे होईल. वाटेल, कुठे शरीर सुटू नये, सर्व काही बघून जावे. यामध्ये आयुष्य वाढविण्यासाठी पाहिजे योगबळ. जेणेकरून बाबांकडून सर्व काही ऐकावे, सर्व काही पहावे. जे आधीच गेले त्यांचा विचार करता कामा नये. तो तर ड्रामाचा पार्ट आहे. त्यांच्या भाग्यातच नव्हते - बाबांकडून जास्त प्रेम घेणे; कारण जितके-जितके तुम्ही सेवाभावी बनता, तेवढे बाबांना अतिशय प्रिय वाटता. जितकी सेवा करता, जितकी बाबांची आठवण करता ती आठवण पक्की होत जाईल. तुम्हाला खूप मजा येईल. आता तुम्ही बनता ईश्वरीय संतान. बाबा म्हणतात - तुम्ही आत्मे माझ्याजवळ होता ना. भक्ती मार्गामध्ये मुक्ती करीता खूप परिश्रम घेतात. जीवनमुक्तीला तर जाणतही नाहीत. हे खूप सुंदर ज्ञान आहे. खूप प्रेम असते. बाबा, पिता देखील आहेत, शिक्षक देखील आहेत, सद्गुरु देखील आहेत. खरे-खरे सुप्रीम बाबा आहेत जे आम्हाला २१ जन्मांसाठी सुखधाम मध्ये घेऊन जातात. आत्माच दुःखी होते. सुख-दुःखाची जाणीव आत्म्यालाच होते. म्हटले देखील जाते पाप-आत्मा, पुण्य-आत्मा. आता बाबा आले आहेत आम्हाला सर्व दुःखांपासून सोडविण्यासाठी. आता तुम्हा मुलांना बेहदमध्ये जायचे आहे. सर्वजण सुखी होणार. सारी दुनियाच सुखी होईल. ड्रामामध्ये पार्ट आहे, तो देखील तुम्हाला समजला आहे. तुम्ही किती आनंदामध्ये राहता. बाबा आले आहेत आपल्याला स्वर्गामध्ये घेऊन जाण्यासाठी. आम्हा सर्व आत्म्यांना स्वर्गामध्ये घेऊन जाणार. बाबा धीर देतात - गोड-गोड मुलांनो, मी तुम्हाला सर्व दुःखांपासून सोडवण्यासाठी आलो आहे. तर अशा बाबांवर किती प्रेम असले पाहिजे. सर्व नात्यांनी तुम्हाला दुःख दिले आहे. ही आहेच दुःखदायी संतान. तुम्ही दुःखी होत, दुःखाच्याच गोष्टी ऐकत आले आहात. आता बाबा सर्व गोष्टी समजावून सांगत आहेत. अनेकदा समजावून सांगितले आहे आणि चक्रवर्ती राजा बनवले आहे. तर असे बाबा जे आपल्याला स्वर्गाचा मालक बनवतात, त्यांच्यावर किती प्रेम असले पाहिजे. एका बाबांचीच तुम्ही आठवण करता. बाबांशिवाय इतर कोणाशीही संबंध नाही. आत्म्यालाच समजावून सांगितले जाते. आपण सुप्रीम बाबांची मुले आहोत. आता जसा काही आम्हाला रस्ता मिळाला आहे, तर मग इतरांना देखील सुखाचा रस्ता सांगायचा आहे. तुम्हाला केवळ अर्ध्याकल्पासाठीच नाही, तर पाऊण कल्प सुख मिळते. तुमच्यावर देखील कितीतरी जण कुर्बान होतात कारण तुम्ही बाबांचा संदेश सांगून सर्व दुःख दूर करता.

तुम्ही समजता यांना देखील (ब्रह्माला देखील) हे नॉलेज सुप्रीम बाबांकडून मिळते. मग ते आम्हाला संदेश देतात. आम्ही मग इतरांना संदेश देणार. बाबांचा परिचय देत सर्व मुलांना अज्ञान निद्रेतून जागे करत राहतात. भक्तीला अज्ञान म्हटले जाते. ज्ञान आणि भक्ती वेग-वेगळे आहे. ज्ञानसागर बाबा आता तुम्हा मुलांना ज्ञान शिकवत आहेत. तुमच्या मनामध्ये येते, बाबा दर ५००० वर्षानंतर येऊन आम्हाला जागे करतात. आमचा जो दिवा आहे, त्यामध्ये घृत फार थोडे राहिले आहे म्हणून आता परत ज्ञान घृत टाकून दिवा पेटवतात. जेव्हा बाबांची आठवण करता तर आत्मा रुपी दीपक प्रज्वलित होतो. आत्म्यामध्ये जो कट (गंज) चढला आहे तो बाबांच्या आठवणीनेच उतरेल, यातच मायेचे युद्ध चालते. माया घडो-घडी विसरायला लावते आणि कट उतरण्याऐवजी अजूनच चढत जाते. किंबहुना जितकी उतरली होती, त्याही पेक्षा जास्तच चढते. बाबा म्हणतात - ‘मुलांनो, माझी आठवण करा तर कट उतरेल’. यामध्ये मेहनत आहे. शरीराचे आकर्षण नसावे. देही-अभिमानी बना. आपण आत्मा आहोत, बाबांकडे शरीरासहित तर जाऊ शकणार नाही. शरीरापासून वेगळे होऊनच जायचे आहे. आत्म्याला बघितल्याने कट उतरेल, शरीराला बघितल्याने कट चढते. कधी चढते, कधी उतरते - हे चालतच राहते. कधी खाली, कधी वर - अतिशय नाजूक रस्ता आहे. हे होत-होत शेवटी कर्मातीत अवस्था प्राप्त होते. मुख्य म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये डोळेच दगा देतात, म्हणून शरीराला पाहू नका. आपली बुद्धी शांतीधाम-सुखधामध्ये लटकलेली आहे आणि दैवी गुण देखील धारण करायचे आहेत. भोजन देखील शुद्ध खायचे आहे. देवतांचे पवित्र भोजन आहे. ‘वैष्णव’ शब्द ‘विष्णू’ पासून निघाला आहे. देवता कधी घाणेरडी वस्तू थोडीच खात असतील. विष्णूचे मंदिर आहे, ज्याला नर-नारायण सुद्धा म्हणतात. आता लक्ष्मी-नारायण तर साकार आहेत. त्यांना ४ भुजा असता कामा नये. परंतु भक्ती मार्गामध्ये त्यांना देखील ४ भुजा दाखविल्या आहेत. याला म्हटले जाते बेहदचे अज्ञान. समजत नाहीत की ४ भुजावाला कोणता मनुष्य तर असू शकत नाही. सतयुगामध्ये २ भुजावाले असतात. ब्रह्माला देखील २ भुजा आहेत. ब्रह्माची मुलगी सरस्वती, त्यां दोघांना मग एकत्र करून ४ भुजा दाखवल्या आहेत. आता सरस्वती काही ब्रह्माची पत्नी नाहीये, ही तर प्रजापिता ब्रह्माची मुलगी आहे. जितकी मुले ॲडॉप्ट होत जातात, तितक्या यांच्या भुजा वाढत जातात. ब्रह्माच्याच १०८ भुजा आहेत असे म्हणतात. विष्णू किंवा शंकराच्या म्हणणार नाहीत. ब्रह्माच्या भुजा पुष्कळ आहेत. भक्तिमार्गामध्ये तर काहीच समजत नाहीत. बाबा येऊन मुलांना समजावून सांगतात, तुम्ही म्हणता - ‘बाबांनी येऊन आम्हाला हुशार बनवले आहे’. लोक म्हणतात - ‘आम्ही शिवाचे भक्त आहोत’. अच्छा, तुम्ही शिवला काय समजता? आता तुम्ही समजता शिवबाबा सर्व आत्म्यांचे पिता आहेत, म्हणून त्यांची पूजा करतात. मुख्य गोष्ट बाबा म्हणतात - मामेकम् (मज एकाची) आठवण करा. तुम्ही बोलावले देखील आहे - ‘हे पतित-पावन येऊन आम्हाला पावन बनवा’. सर्व बोलावतच राहतात; पतित-पावन सिताराम - हे गात देखील राहतात. बाबांना (ब्रह्माला) थोडेच माहिती होते की बाबा (शिवबाबा) स्वतः येऊन माझ्यामध्ये प्रवेश करतील. केवढे आश्चर्य आहे, कधी कल्पना देखील केली नव्हती. आधी तर आश्चर्य वाटत होते की, हे काय होत आहे! मी कुणाला बघतो तर बसल्या-बसल्या त्यांना आकर्षण वाटते. हे काय होत आहे? शिवबाबा आकर्षित करत होते. समोर बसले तर ध्यानामध्ये निघून जात होते. आश्चर्य वाटले, हे काय आहे! या गोष्टींना समजण्यासाठी मग एकांत पाहिजे. तेव्हा वैराग्य येऊ लागले - कुठे जाऊ? अच्छा, बनारसला जातो. हे त्यांचे (शिवबाबांचे) आकर्षण होते. जे यांच्याकडून देखील करवून घेत होते, इतका मोठा कारभार सर्व सोडून निघून गेले. त्या बिचाऱ्यांना काय माहित की बनारसला का जात आहेत? मग तिथे बागेमध्ये जाऊन बसले. तिथे पेन्सिल हातात घेऊन भिंतीवर चक्र काढत होते. बाबा काय करवून घेत होते, काहीच समजत नव्हते. रात्री झोप येत होती. असे समजत होते कुठे उडून गेलो आहे. मग जसे काही खाली येत होतो. काहीच कळत नसे काय होत आहे. सुरुवातीला किती साक्षात्कार होत होते. मुली बसल्या-बसल्या ध्यानामध्ये जात होत्या. तुम्ही खूप काही बघितले आहे. तुम्ही म्हणाल जे आम्ही बघितले ते तुम्ही बघितलेले नाही. मग शेवटी देखील बाबा खूप साक्षात्कार घडवतील कारण जवळ येत जाणार. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) बाबांचा संदेश देऊन सर्वांची दुःख दूर करायची आहेत. सर्वांना सुखाचा रस्ता सांगायचा आहे. हद मधून निघून बेहदमध्ये जायचे आहे.

२) शेवटी सर्व साक्षात्कार करण्यासाठी तथा बाबांच्या प्रेमाची पालना घेण्यासाठी ज्ञान-योगामध्ये मजबूत बनायचे आहे. दुसऱ्यांचे चिंतन न करता योगबलाने आपले आयुष्य वाढवायचे आहे.

वरदान:-
निष्काळजीपणा आणि अटेन्शनच्या अभिमानाला (अहंकाराला) सोडून बाबांच्या मदतीचे पात्र बनणारे सहज पुरुषार्थी भव

काही मुले हिम्मत बाळगण्या ऐवजी निष्काळजीपणामुळे अभिमानामध्ये येतात की आम्ही तर सदैव पात्र आहोतच. बाबा आम्हाला मदत करणार नाहीत तर कुणाला करणार! या अहंकारापोटी हिंम्मतीच्या विधीला विसरून जातात. बऱ्याचजणांमध्ये मग स्वतःवर अटेंशन देण्याचा (स्वतःच्या पुरुषार्थाचा) देखील अहंकार असतो जो मदतीपासून वंचित करतो. असे समजतात आम्ही तर खूप योग लावला, ज्ञानी-योगी तू आत्मा बनलो, सेवेची राजधानी बनली… अशा प्रकारच्या अहंकाराला सोडून हिंम्मतीच्या आधारावर मदतीचे पात्र बना तर सहज पुरुषार्थी बनाल.

बोधवाक्य:-
जे वेस्ट आणि निगेटिव्ह संकल्प चालतात त्यांना परिवर्तन करून विश्व कल्याणाच्या कार्यामध्ये लावा.