27-06-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, आठवणीद्वारे आत्म्यामधील कचरा काढून टाकत जा, आत्मा जेव्हा पूर्णपणे पावन बनेल तेव्हाच परत घरी जाऊ शकेल”

प्रश्न:-
या शेवटच्या जन्मामध्ये बाबांच्या कोणत्या डायरेक्शनचे पालन करण्यामध्येच मुलांचे कल्याण आहे?

उत्तर:-
बाबा म्हणतात - गोड मुलांनो, या शेवटच्या जन्मामध्ये बाबांकडून पूर्ण वारसा घ्या. बुद्धीला बाहेर भटकू देऊ नका, विष सोडून अमृत प्या. या शेवटच्या जन्मामध्येच तुम्हाला ६३ जन्मांच्या सवयी मोडायच्या आहेत त्यामुळे रात्रं-दिवस मेहनत करून देही-अभिमानी बना.

ओम शांती।
शांतीधाम विश्रामपुरी आहे. या दुनियेमध्ये सर्वजण थकलेले आहेत. सर्वांना वाटते की आपण आपल्या सुखधाममध्ये जावे. ही दुनिया चांगली वाटत नाही. स्वर्ग बघितल्यावर नरका विषयी प्रेम कसे वाटेल. म्हणतात - ‘बाबा, घाई करा, या दुःखधाममधून आम्हाला लवकर घेऊन चला’. बाबा देखील म्हणतात - ही तर छी-छी (घाणेरडी) दुनिया आहे. याचे नावच आहे डेव्हिल वर्ल्ड (सैतानाची दुनिया), नरक. हे काही चांगले शब्द आहेत का? कुठे डीटी वर्ल्ड (दैवी दुनिया), कुठे सैतानी दुनिया; या सैतानी दुनियेला सगळेच वैतागलेले आहेत. परंतु कोणीही परत जाऊ शकत नाहीत. तमोप्रधानतेची अशुद्धता पडलेली आहे. ती अशुद्धता आत्म्यामधून निघावी, त्यासाठी पुरुषार्थ करत आहेत. जे चांगले पुरुषार्थी आहेत त्यांची अवस्था शेवटी चांगली होईल. ही जुनी दुनिया नष्ट होईल, आता तर थोडे दिवस उरले आहेत. जोपर्यंत बाबा येऊन परत घेऊन जात नाहीत तोपर्यंत कोणीही परत जाऊ शकत नाही. दुनियेमध्ये दुःख आहे ना. घरामध्ये देखील कोणते ना कोणते दुःख असतेच. तुम्हा मुलांच्या मनात बाबा आहेत; आता बाबा आम्हाला दुःखामधून सोडविण्याकरिता आले आहेत. जे चांगले निश्चयबुद्धी आहेत ते बाबांची आठवण कधी विसरत नाहीत. त्यांना म्हटलेच जाते सर्वांचे दुःख-हर्ता. मुलेच ओळखतात. जर सर्वांनीच ओळखले तर मग इतके सगळे मनुष्य जाऊन कुठे राहतील, हे होऊ शकत नाही म्हणून ड्रामामध्ये युक्ती देखील तशीच रचलेली आहे. जे श्रीमतावर चालतात तेच उच्च पद प्राप्त करू शकतात, ते तर ठीक आहे. काहीजण मग शिक्षा भोगून देखील शांतीधाम अथवा पावन दुनियेमध्ये जातील. परंतु उच्च पद प्राप्त करण्यासाठी पुरुषार्थ तर करावा लागेल ना. दुसरी गोष्ट म्हणजे पावन बनल्याशिवाय कोणीही पावन दुनियेमध्ये जाऊ शकत नाही. हे जे म्हणतात की अमुक ज्योत ज्योतीमध्ये विलीन झाली, परत गेला - हे होऊ शकत नाही. लक्ष्मी-नारायण, जे सर्वप्रथम सृष्टीवर आले आहेत, ते सुद्धा परत जाऊ शकत नाहीत तर बाकी कोण कसे काय जाऊ शकतील? यांचे (लक्ष्मी-नारायणाचे) देखील आता ८४ जन्म पूर्ण झाले आहेत. आता परत जाण्यासाठी तपश्चर्या करत आहेत. सर्वजण एका बाबांनाच हाका मारतात. ‘ओ गॉडफादर, ओ लिबरेटर’, ते गॉडफादर दुःख-हर्ता, सुख-कर्ता आहेत. कृष्ण इत्यादी इतर कोणाचा थोडाच धावा करतात? ख्रिश्चन असो, मुसलमान असो, सर्व ‘ओ गॉडफादर’ असे म्हणून धावा करतात. आत्मा आपल्या पित्याला बोलवते. ‘फादर’ तेव्हाच म्हणतात जेव्हा समजतात की, आपण आत्मा आहोत. आत्म्याचे देखील काही स्वरूप तर आहे ना. आत्म्याचा आकार काही मोठा नाहीये. तो तर एक स्टार आहे आणि अतिसूक्ष्म आहे. जसे बाबा आहेत तसेच आत्म्याचे स्वरूप आहे. आता तुम्ही बाबांची महिमा करता - ते सत्-चित् आहेत, ज्ञानाचा सागर, आनंदाचा सागर आहेत. तुमची आत्मा देखील त्यांच्यासारखी बनते. तुमच्या बुद्धीमध्ये आता सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे सर्व ज्ञान आले आहे. इतर कोणत्याही मनुष्यमात्राला हे ज्ञान नाही. संपूर्ण भारत, सर्व परदेश शोधून पहा, कोणालाच हे ज्ञान माहित नाही. आत्मा ८४ जन्मांचा पार्ट बजावते. ८४ लाख तर अशक्य आहेत! ८४ लाख जन्मांचे तर कोणी वर्णन सुद्धा करू शकणार नाही. बाबा म्हणतात - ‘तुम्ही आपल्या जन्मांना जाणत नाही, मी तुम्हाला सांगतो’. हे सर्व ऐकून सुद्धा पत्थर-बुद्धी असल्यामुळे हेच समजत नाहीत की ८४ लाख जन्म असतील तर एवढ्या जन्मांची कथा कशी काय कोणी सांगू शकेल!

आता तुम्ही जाणता - आपण ब्राह्मण आहोत, आम्ही ८४ जन्म घेतले आहेत. ब्रह्माने देखील ८४ जन्म घेतले आहेत, विष्णूने देखील ८४ जन्म घेतले आहेत. ब्रह्मा सो विष्णू, विष्णू सो ब्रह्मा. लक्ष्मी-नारायणच ८४ जन्म घेऊन मग पुन्हा ब्रह्मा-सरस्वती बनतात. ही देखील समजून घेण्याची गोष्ट आहे ना. बाबा म्हणतात - दर ५ हजार वर्षांनंतर येऊन मी हे सर्व ज्ञान समजावून सांगतो. ५ हजार वर्षांचे चक्र आहे. आता तुम्हाला वर्णांचे रहस्य देखील समजले आहे. ‘हम सो’, याचा अर्थ देखील समजला आहे, मी आत्मा सो देवता बनतो, नंतर मग हम सो क्षत्रिय, हम सो वैश्य, शूद्र बनतो. इतके-इतके जन्म घेतो मग पुन्हा हम सो ब्राह्मण बनतो. ब्राह्मणांचा हा एक जन्म आहे. हा आहेच मुळी तुमचा हिऱ्या समान जन्म.

बाबा म्हणतात - हे तुमचे उत्तम शरीर आहे, याच्याआधारे तुम्ही स्वर्गाचा वारसा प्राप्त करू शकता, म्हणून आता इकडे-तिकडे भटकू नका. ज्ञान अमृत प्या. समजते देखील बरोबर ८४ जन्म घेतो. तुम्ही सुरुवातीला सतयुगामध्ये सतोप्रधान होता. मग सतो बनलात. नंतर चांदीची अशुद्धता पडली, अगदी संपूर्ण हिशोब सांगतात. आता गव्हर्नमेंट देखील म्हणते सोन्यामध्ये अलॉय (मिश्रधातू) मिक्स करा. १४ कॅरेट सोने वापरा. सोन्यामध्ये मिश्रधातू टाकणे - हे भारतवासी अपशकुन समजतात. लग्न करतात तेव्हा एकदम खरे सोने घालतात. सोन्यावर देखील भारतवासीयांचे खूप प्रेम आहे. का? भारताची गोष्टच विचारू नका. सतयुगामध्ये तर सोन्याचे महाल होते, सोन्याच्या विटा होत्या. जसे इथे विटांचे ढीग लावून ठेवलेले असतात. तिथे सोन्या-चांदीचे ढीग असतात. माया मच्छिंद्रचा खेळ दाखवतात. त्याने सोन्याच्या विटा बघितल्या आणि विचार केला घेऊन जातो. खाली उतरल्यावर बघितले तर काहीच नव्हते. काही ना काही महत्वपूर्ण अर्थ असल्याचे जाणवते. मुली समजतात आता आम्ही पुन्हा स्वर्गात जाणार; आणि मग जर पती इत्यादी त्रास देऊ लागतात तर बिचाऱ्या आतल्या आत रडतात, म्हणतात - ‘कधी एकदा आम्ही सुखधाम मध्ये जाऊ? बाबा आता घाई करा’. बाबा म्हणतात - मुलांनो, घाई कशी करू, आधी तुम्ही योगबलाने आपला कचरा तर काढून टाका. योगाच्या यात्रेवर रहा. बाबा धीर देतात. बोलावता देखील - ‘हे पतित-पावन या’. गातात देखील - सर्वांचा सद्गती दाता एक. इथलीच गोष्ट आहे. अकासुर-बकासुर या सर्व गोष्टी या संगमयुगातल्या आहेत. ही आहेच आसुरी दुनिया. तर बाबा समजावून सांगत आहेत - ‘मी कल्प-कल्प संगमावर येतो, जेव्हा संपूर्ण झाड जडजडीभूत अवस्थेला प्राप्त होते’.

तुम्ही जाणता - सतयुगामध्ये प्रत्येक गोष्ट सतोप्रधान असते. इथे इतके पशू-पक्षी इत्यादी आहेत, हे इतके सगळे तिथे असणार नाहीत. प्रतिष्ठित लोकांचा परिसर अत्यंत स्वच्छ असतो. त्यांचे राहण्याचे स्थान, फर्निचर इत्यादी खूप उत्कृष्ट असते. तुम्ही देखील इतके श्रेष्ठ देवता बनता. तिथे अशी कुठलीही घाणेरडी गोष्ट राहू शकत नाही. इथे तर मच्छर इत्यादी अनेक प्रकारची रोगराई, किती घाण असते, खेड्यांमध्ये इतकी घाण नसते. मोठ्या-मोठ्या शहरांमध्ये खूप घाण असते कारण लोकसंख्या जास्त आहे. राहण्यासाठी जागा नाही. तुम्ही सर्व विश्वाचे मालक बनता. मनुष्य गातात - ‘घट ही में ब्रह्मा, घट ही में विष्णू… घट ही में ९ लख तारे’ (ज्ञान देण्यासाठी शिवबाबा एका सेकंदात ब्रह्मा बाबांच्या शरीरात प्रवेश करतात; ब्रह्मापासून विष्णू बनण्यासाठीही केवळ एकच सेकंद लागतो आणि नऊ लाख प्रजाही एकाच सेकंदात तयार होते). ब्रह्मा सो विष्णू बनतात. विष्णू सोबत तारे देखील आहेत. सतयुगामध्ये हे देवता बनतात, तर सुरुवातीला अगदी थोडेच असतात. सुरुवातीला झाड छोटे असते, नंतर मग वृद्धी होत जाते. सतयुगामध्ये तर फार थोडे असतील. गोड्या पाण्याच्या नदीकाठी राहत असतील. इथे नद्यांमधून खूप कालवे तयार करतात. तिथे कालवे इत्यादी थोडेच असतात! मूठभर तर मनुष्य असतात. इतक्या जणांसाठी तर गंगा-जमुना आहेतच. त्या नद्यांच्याच आस-पास राहतात. ५ तत्वे देखील देवतांचे गुलाम बनतात. कधीही अवेळी पाऊस पडत नाही. कधीही नदीला पूर येत नाही. नावच आहे स्वर्ग तर मग काय? आता म्हणतात - स्वर्गाचे आयुष्य इतकी लाख वर्षे आहे. अच्छा, बरे मग तिथे कोण राज्य करत होते, हे तर सांगा. किती थापा मारत राहतात.

तुम्ही जाणता - आपण कल्पापूर्वी प्रमाणे पार्ट बजावत आहोत. रुद्र ज्ञान यज्ञामध्ये अनेक प्रकारच्या असुरांची विघ्ने येतील; मग मनुष्य समजतात, असुर लोक वरून घाण, शेण इत्यादी टाकत होते. परंतु नाही, तुम्ही बघत आहात - किती विघ्न पडतात. अबलांवर अत्याचार होतील तेव्हाच तर पापाचा घडा भरेल. बाबा म्हणतात - थोडे सहन करावे लागेल. तुम्ही आपल्या बाबांची आणि वारशाची आठवण करत रहा. मार खाताना देखील बुद्धीत शिवबाबांची आठवण करा. तुमच्या तर बुद्धीमध्ये ज्ञान आहे, एखाद्याला फाशी देतात तेव्हा पादरी लोक त्याला म्हणतात - ‘गॉडफादरची आठवण कर’. असे सांगत नाहीत की, ‘येशू ख्रिस्ताची आठवण कर’. इशारा गॉडकडे करतात. ते इतके गोड आहेत की, सर्वजण त्यांना बोलावतात. आत्माच बोलावते. आता देही-अभिमानी बनण्यामध्येच मेहनत आहे. ६३ जन्म तुम्ही देह-अभिमानामध्ये राहिले आहात. आता या एका जन्मामध्ये ती अर्ध्याकल्पाची सवय मोडायची आहे. तुम्ही जाणता देही-अभिमानी बनल्यामुळे आपण स्वर्गाचे मालक बनू. केवढी श्रेष्ठ प्राप्ती आहे! तर रात्रं-दिवस हाच प्रयत्न करत रहावा लागेल. मनुष्य धंदा इत्यादी साठी देखील किती मेहनत करतात. कमाईच्या वेळी माणसाला कधी डुलक्या अथवा जांभया येणार नाहीत कारण कमाई आहे. पैशाची खुशी असते. थकण्याचा प्रश्नच येत नाही. बाबा देखील अनुभवी आहेत ना. रात्रीची जहाजे येत असत तेव्हा येऊन माल खरेदी करत होते. जोपर्यंत ग्राहकाचा खिसा रिकामा होत नाही तोपर्यंत त्याला सोडणारच नाहीत. बाबांनी रथ देखील पूर्ण अनुभवी घेतला आहे. यांनी (ब्रह्मा बाबांनी) हे सर्व अनुभवले आहे. खेडेगावातील मुलगा होता. १० आण्याला एक मण धान्य विकत होता. आता तर बघा विश्वाचा मालक बनत आहे. एकदम खेडवळ होता. मग प्रगती करत वर गेला तर एकदम हिऱ्यांचा व्यापार करू लागला. बस, फक्त हिऱ्यांच्याच गोष्टी. हे तर मग आहेत असली हिरे. हा आहे रॉयल व्यापार. बाबा खूप अनुभवी आहेत. बाबा व्हाईसरॉय इत्यादींच्या घरी असे जात होते जसे आपलेच घर आहे. यांना मग म्हटले जाते अविनाशी ज्ञान-रत्न! जितकी ही बुद्धीमध्ये धारण कराल, तितके तुम्ही पद्मपती बनाल. शिवबाबांना म्हटले जाते - सौदागर, रत्नाकर. त्यांची महिमा देखील गातात आणि मग म्हणतात ते सर्वव्यापी आहेत. महिमे सोबत मग इतकी निंदा देखील. भक्तिमार्गाची काय हालत झाली आहे. बाबा म्हणतात - जेव्हा भक्ती पूर्ण होते, तेव्हा भक्तांचा रक्षक बाबा येतात. सर्वात जास्त भक्ती कोण करतात हे देखील सिद्ध होते. सर्वात जास्त भक्ती तुम्ही करता. तेच तुम्ही इथे येऊन सर्वप्रथम ब्राह्मण बनता आणि पुन्हा पूज्य बनण्याचा बाबांकडून वारसा घेता. रावणाने पुजारी बनवले आहे, बाबा पूज्य बनवतात. हे आहे भगवानुवाच. भगवान एक आहेत. २-३ भगवान असत नाहीत. गीता भगवंताद्वारे गायली गेली आहे. ‘शिव भगवानुवाच’ ऐवजी श्रीकृष्णाचे नाव टाकले आहे त्यामुळे केवढा फरक झाला आहे. तरी देखील ड्रामा अनुसार गीतेचे नाव असे बदलणारच आहे. आणि मग बोलावतात - ‘हे पतित-पावन या’. बाबा पावन बनवतात, रावण पतित बनवतो. तर समजण्याची किती बुद्धी पाहिजे. श्रीमत, श्रेष्ठ ते श्रेष्ठ मत आहेच मुळी एका बाबांचे. हे लक्ष्मी-नारायण स्वर्गाचे मालक, बाबांच्या श्रीमताद्वारेच बनले आहेत. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) या एका जन्मामध्ये ६३ जन्मांची जुनी देह-अभिमानाची सवय मोडण्यासाठी मेहनत करायची आहे. देही-अभिमानी बनून स्वर्गाचा मालक बनायचे आहे.

२) या हिरेतुल्य उत्तम जन्मामध्ये या बुद्धीला भटकू द्यायचे नाही, सतोप्रधान बनायचे आहे. अत्याचार सहन करावा लागला तरीही बाबांकडून पूर्ण वारसा घ्यायचाच आहे.

वरदान:-
साकार बाबां प्रमाणे आपल्या प्रत्येक कर्माला यादगार बनविणारे आधारमूर्त आणि उद्धारमूर्त भव

जसे साकार बाबांनी (ब्रह्मा बाबांनी) आपले प्रत्येक कर्म यादगार बनविले; तसे तुम्हा सर्वांचे प्रत्येक कर्म यादगार तेव्हा बनेल जेव्हा स्वतःला आधारमूर्त, उद्धारमूर्त समजून चालाल. जे स्वतःला विश्व परिवर्तनाचे आधारमूर्त समजतात, त्यांच्याकडून प्रत्येक कर्म श्रेष्ठ होत असते आणि वृत्ती-दृष्टीमध्ये जेव्हा सर्वांच्या कल्याणाची भावना असते तेव्हा प्रत्येक कर्म श्रेष्ठ बनते. अशी श्रेष्ठ कर्मेच यादगार बनतात.

बोधवाक्य:-
सत्यतेच्या शक्तीला धारण करण्याकरिता सहनशील बना.

हे अव्यक्त इशारे - सदैव हर्षित राहण्याकरिता आपल्या नेचरला (स्वभावाला) सरळ बनवा, सहनशील बना.

या सहजयोगी जीवनामध्ये जर तुम्हाला अडचणींचा अनुभव होत असेल तर मग सहजपणे राज्य कसे बरे कराल. इथले संस्कारच तिथे घेऊन जाणार आहात. बघा, तुमचे यादगार म्हणून देवतांची जी चित्रे बनवतात त्यांच्या चेहऱ्यावर साधेपणा जरूर दाखवतात, तर जो जितका सहज पुरुषार्थी असेल तो मनसामध्ये देखील सरळ (निष्कपट), बोलण्यामध्ये देखील निष्कपट, कर्मामध्ये देखील निष्कपट असेल. त्यालाच फरिश्ता म्हणतात.