27-08-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड मुलांनो, आता या
बेहदच्या जुन्या दुनियेचा विनाश होणार आहे, नवी दुनिया स्थापन होत आहे, त्यामुळे
नवीन दुनियेमध्ये जाण्यासाठी पवित्र बना”
प्रश्न:-
परमात्म्याबद्दल तुम्ही मुले कोणती आश्चर्यकारक गोष्ट जाणता जी मनुष्यांच्या
समजण्याच्या पलीकडे आहे?
उत्तर:-
तुम्ही म्हणता
जशी आत्मा ज्योती बिंदू आहे, तसे परमात्मा देखील अतिसूक्ष्म ज्योती बिंदू आहेत. या
आश्चर्यकारक गोष्टी मनुष्यांच्या समजण्याच्या पलीकडे आहेत. बरीच मुले देखील
याच्यामध्ये गोंधळून जातात. बाबा म्हणतात - ‘मुलांनो, गोंधळून जाऊ नका. जर छोट्या
रूपामध्ये आठवण राहत नसेल तर मोठ्या रुपामध्ये आठवण करा. आठवण जरूर करायची आहे.
गीत:-
रात के राही
थक मत जाना...
ओम शांती।
रूहानी मुलांना
रूहानी बाबा बसून समजावून सांगत आहेत; म्हणून मुलांना आत्म-अभिमानी होऊन बसायचे आहे.
असे इतर कुठल्याही ठिकाणी सांगितले जात नाही. कोणताही साधू-संत असे सांगत नाही की,
आत्म-अभिमानी होऊन बसा. हे एक बाबाच असे सांगतात; इतर कोणालाही असे सांगता देखील
येणार नाही. ही युक्ती कोणी सांगू शकणार नाहीत. तुम्ही मुलेच समजता की, आपण आत्मा
आहोत. आत्माच एक शरीर सोडून दुसरे घेते. कधी बॅरिस्टर, कधी डॉक्टर बनते. आत्माच आता
पतित बनली आहे मग पावन बनेल. आत्म्यामध्ये ज्ञान धारण होते. निराकार बाबा ज्ञानाचे
सागर आहेत तर जरूर येऊन ज्ञान ऐकवतील ना. पतित-पावन आहेत तर जरूर येऊन पावन बनवतील.
ते आहेत - सुप्रीम परमपिता परमात्मा. मी तुमचा पिता सुप्रीम आहे, नॉलेजफुल आहे. मला
आपले शरीर नाहीये. हे सर्व नॉलेज तुमची आत्मा धारण करत आहे; तर तुम्हाला आता
आत्म-अभिमानी बनायचे आहे. देह-अभिमान ठेवायचा नाही. दुसरे कोणतेही असे ठिकाण नाही
जिथे ऐकणारे आणि ऐकविणारे दोघेही देही-अभिमानी असतील. बाबा तर आहेतच निराकार. ते
येऊन तुम्हाला राजयोग शिकवत आहेत. बाकी सर्व मनुष्य आहेतच देह-अभिमानी. भले या
लक्ष्मी-नारायणासाठी म्हणू शकतो की, हे आत्म-अभिमानी होते; तरी देखील देहभान तर
असतोच ना. हे ज्ञान परमपिता परमात्माच येऊन देतात. ज्ञान आत्म्याला धारण करायचे असते.
आत्म्यालाच पतितापासून पावन बनण्याची युक्ती सांगतात. आता सर्व दुनियेचे डाऊन फॉल (अधोगती)
आहे, त्यानंतर राइज (उत्थान) करण्यासाठी येतात. हे तुम्ही मुले जाणता. डाऊन फॉल
अर्थात डिस्ट्रक्शन, राइज अर्थात कन्स्ट्रक्शन. स्थापना आणि विनाश. स्थापना कशाची?
नवीन दुनियेची, स्वर्गाची - स्थापना आणि मग जुनी दुनिया हेल, नरकाचा - विनाश.
डिस्ट्रक्शन आणि कन्स्ट्रक्शन. कलियुग आहे जुनी दुनिया, हिचा विनाश आवश्यक आहे.
विनाशाची निशाणी - ही महाभारी महाभारत लढाई आहे. महाभारताचा वृत्तांत महाभारताच्या
धर्मग्रंथांमध्ये वर्णन केलेला आहे. बाबा, ब्रह्मा द्वारे स्थापना करतात. तर जरूर
नवीन दुनियेची करतील ना. हा आहे बेहदचा विनाश आणि बेहदची स्थापना, बाबाच मुलांसाठी
नवीन घर बनवतील. मग जुने जरूर नष्ट करवतील. तुम्ही समजता - बाबा आता नवीन दुनिया
स्थापन करत आहेत. तमोप्रधानापासून पुन्हा सतोप्रधान बनविण्यासाठी आम्हाला तयार करत
आहेत. विनाशासाठी महाभारताचे युद्ध प्रसिद्ध आहे. म्हणतात - ही तीच वेळ आहे. तेच
ग्रह येऊन आपसात भेटले आहेत, जे महाभारताच्या वेळी होते. या शिडीच्या चित्रामध्ये
देखील लिहिलेले आहे - ‘भारताच्या उत्थान आणि पतनाची अद्भुत कहाणी’; या लाईनमध्ये
‘कल्प-कल्प’ शब्द देखील आला पाहिजे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत मनुष्य ८४ जन्म घेतात.
हे देखील तुमच्या बुद्धीमध्ये आहे. मनुष्यांच्या बुद्धीला तर एकदम गोदरेजचे कुलूप
लागलेले आहे. या गोष्टी मनुष्यांनी जाणून घ्यायच्या आहेत. आत्मे इथे शरीर धारण
करतात - पार्ट बजावण्याकरिता. तर मग ड्रामाच्या आदि-मध्य-अंताच्या क्रियेटर,
डायरेक्टर मुख्य ॲक्टर्स इत्यादींना जाणून घेतले पाहिजे ना. आता तुम्हाला ड्रामाच्या
आदि-मध्य-अंत, हू इज हू, सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण ड्रामा विषयी ठाऊक झाले आहे.
बाबांकडून हे सर्व नॉलेज मिळत आहे. सृष्टी-चक्र कसे फिरते. याला म्हटले जाते -
रूहानी नॉलेज. जिस्मानी ज्ञानाला फिलॉसॉफी म्हटले जाते. स्पिरिच्युअल नॉलेज, रूहानी
नॉलेजला ज्ञान म्हटले जाते. आता या सर्व गोष्टी मुलांच्या बुद्धीमध्ये पक्क्या
केल्या आहेत.
मुले जाणतात - आता ८४
जन्मांचे नाटक पूर्ण होत आहे. आता आपण परत जाणार आहोत परंतु पतित कोणीही परत जाऊ
शकत नाही. नाहीतर इतके जप-तप, तीर्थ इत्यादी कशाला केले असते. पवित्र बनण्यासाठीच
गंगा स्नान करण्यासाठी जातात, परंतु त्यामुळे कोणी पावन तर बनू शकत नाही त्यामुळे
परत कोणीही जाऊ शकत नाही. थापा तर खूप मारतात की, अमुक पार निर्वाणधाम गेला, ज्योत
ज्योतीमध्ये विलीन झाली. बाबांनी सांगितले आहे - परत कोणीही जाऊ शकत नाही. सर्व ॲक्टर्स
इथेच आहेत. आता नाटक पूर्ण होत आहे तर सर्व स्टेजवर उभे राहिले आहेत. आता सर्व इथे
उपस्थित आहेत. मनुष्यांना माहीत नाहीये की, बौद्ध, ख्रिश्चन इत्यादी कुठे आहेत.
तुम्ही समजता - जे सर्व आत्मे वरून इथे आले आहेत ते सर्व यावेळी तमोप्रधान आहेत.
तमोप्रधानापासून सतोप्रधान कल्पापूर्वी देखील बनले होते. बाबाच येऊन स्थापना, विनाश
घडवून आणतात. म्हणतात देखील - हे ज्ञान राजांचाही राजा बनविणारे आहे. हे बेहदच्या
बाबांनी म्हटले आहे की, ‘मी तुम्हाला राजांचाही राजा बनवतो’. श्रीकृष्ण काही स्थापना
करत नाही. क्रियेटर बाबा आहेत. हे बाबाच येऊन सांगतात की, तुम्ही मला तेव्हाच बोलवता
जेव्हा सृष्टी पतित असते. असे नाही की मी नवीन सृष्टी रचतो. जसे दाखवतात प्रलय झाला,
हे सर्व चुकीचे आहे. मनुष्य बोलवतातच की, ‘हे पतित-पावन या’, तर जरूर पतित दुनियेतच
येतील ना. बाबाच येऊन श्रीकृष्ण-पुरीचा साक्षात्कार घडवतात. असे दाखवतात की
श्रीकृष्ण, पिंपळाच्या पानावर समुद्रामध्ये आला… ही गोष्ट ठीक आहे. नवीन दुनियेमध्ये
सर्वप्रथम श्रीकृष्णच येतात. सागरामध्ये नाही परंतु गर्भ-महालामध्ये येतात. अंगठा
चोखत, अतिशय आरामात गर्भ-महालात राहतात. सतयुगामध्ये जी पण मुले असतात ती
गर्भ-महालामध्ये राहतात. त्यांनी (दुनियावाल्यांनी) गर्भ-महालाच्या गोष्टीला मग
सागरामध्ये पानावर बसलेला दाखवला आहे. त्या सर्व आहेत भक्तिमार्गाच्या गोष्टी. बाबा
या सर्व शास्त्रांचे सार बसून समजावून सांगत आहेत. इथे गर्भ-जेलमध्ये रहातात
तेव्हाच तर म्हणतात - ‘आम्हाला बाहेर काढा, आम्ही पुन्हा पाप करणार नाही’. परंतु
रावणाच्या दुनियेमध्ये पाप तर होतच असतात. तरीही पुन्हा पाप करायला लागतात. तुम्ही
अर्धे कल्प जेल-बर्ड्स बनता. चोर लोकांना ‘जेल-बर्ड्स’ म्हणतात. जेलमधून बाहेर
येतात आणि तरी देखील पुन्हा चोरी करत रहातात आणि मग परत जेलमध्ये जावे लागते;
म्हणून ‘जेल-बर्ड्स’ म्हटले जाते. बाबांनी समजावून सांगितले आहे - हे रावण राज्य आहे.
तिथे तर अशा गोष्टी असत नाहीत. ते आहेच रामराज्य. तिथे ना गर्भ-जेल आहे आणि ना तो
जेल (चोरांचा जेल) असतो. इथे तर किती मनुष्य जेलमध्ये पडून असतात. गर्भ-जेल आहे तर
तो जेल देखील आहे. डबल जेल आहे. कलियुगाचा अंत आहे ना.
बाबा समजावून सांगत
आहेत, तुम्ही मुले आता कन्स्ट्रक्शन (स्थापना) करत आहात. उत्थान आणि पतन प्रत्येक
कल्पामध्ये होतच राहते. उत्थान आणि पतन दुनियेचे होते. त्याच्यामध्ये मुख्य पार्ट
भारताचा आहे. गात देखील असतात - ‘आत्मा परमात्मा अलग रहे बहुकाल…’ तर त्याचा देखील
हिशोब पाहिजे ना. कोणते आत्मे खूप काळापासून दूर राहिले आहेत. सर्वप्रथम देवी-देवता
धर्माचे आत्मे पार्ट बजावण्यासाठी येतात. आता ते देवता राहिलेले नाहीत, जे राज्य
करून जातात त्यांची चित्रे, खूणा राहतात. राजाई तर संपुष्टात आली. हेवन (स्वर्ग)
नष्ट होतो तेव्हा मग हेल (नरक) येतो; नंतर मग नरक नष्ट होऊन हेवन बनतो. तर नवीन
दुनियेचे कन्स्ट्रक्शन (स्थापना) होते आणि हेल चे डिस्ट्रक्शन (विनाश) होते.
कन्स्ट्रक्शन साठी मुले पाहिजेत ना. राहणार देखील तुम्हीच आहात. आधी तर तुम्हाला
दैवी गुणवाले देवता बनावे लागेल. असे देखील गायन आहे - ‘मनुष्य से देवता…’ मूत पलीती
(अपवित्र) मनुष्य आहेत ना. भगवानुवाच - गृहस्थ व्यवहारामध्ये राहत असताना कमलपुष्प
समान बनायचे आहे. हा या मृत्यूलोक मधील आहेच मुळी अंतिम जन्म, या जन्मामध्ये पवित्र
बनायचे आहे. हे व्यवस्थित समजावून सांगितले पाहिजे. आम्ही हा मृत्यूलोक मधला अंतिम
जन्म पवित्र राहतो. बाबा म्हणतात - या विकारांवर विजय प्राप्त केल्यामुळे तुम्ही
विश्वाचे मालक बनाल. मुले देखील ऐकून मग इतरांना समजावून सांगतात की, या जुन्या
दुनियेचा विनाश समोर उभा आहे. ही तीच महाभारताची लढाई आहे, काम महाशत्रू आहे,
म्हणून प्रतिज्ञा करा. आता तुम्ही समजता आम्ही पवित्र बनत आहोत. या जुन्या दुनियेचा
विनाश जरूर होणार आहे, त्यापूर्वी पवित्र जरूर बनायचे आहे. विनाश होतो तेव्हा तर मग
काही विचारू नका - हाहा:कार होतो, अत्यंत भयानक मृत्यू आहे. तुम्ही पाहू देखील
शकणार नाही. एखाद्याचे ऑपरेशन होत असले तर कमजोर व्यक्ती तिथे थांबत नाहीत, चक्कर
येऊन पडतात म्हणून डॉक्टर लोक कुटुंबीयांना परवानगी देत नाहीत. हे तर किती मोठे
ऑपरेशन असेल. एकमेकांना मारत राहतील. ही आहे घाणेरडी दुनिया, काट्यांचे जंगल.
सतयुगाला म्हटले जाते - गार्डन ऑफ फ्लॉवर्स, फुलांचा बगीचा. देवता चैतन्य फूल आहेत
ना. मनुष्य तर समजतात - स्वर्गामध्ये कोणता तरी फुलांचा बगीचा असतो, जे ऐकतात ते
सांगत राहतात. ‘गार्डन ऑफ अल्लाह’ म्हणतात ना, तर मग ध्यानामध्ये देखील गार्डन
बघतील. अल्लाने हातात फूल दिले, डोक्यामध्येच ईश्वरीय बगीचा आहे. भक्तिमार्गामध्ये
साक्षात्कार करण्यासाठी भक्ती करतात. साक्षात्कार झाल्यावर म्हणतात सर्वव्यापी आहे
ना. जे घडून गेले ते पुन्हा तसेच घडेल. मुले ज्या पोशाखात, जशी आली आहेत, त्याच
पोशाखामध्ये पुन्हा मग कल्पानंतर येतील. ड्रामाला कोणी चांगल्या प्रकारे समजतात,
बाबांकडे कोणी येतात तेव्हा बाबा त्यांना विचारतात की, ‘यापूर्वी कधी आला होता का?’
म्हणतात - ‘हो बाबा, तुम्हाला कल्पापूर्वी देखील भेटलो होतो, तुमच्याकडून वारसा
घेण्यासाठी आलो होतो’. बाबा विचारतात - ‘कोणते पद मिळवले होते?’ बाबा-मम्मा,
म्हणतात तर जरूर त्यांच्या घराण्यामध्ये येतील.
बाबा म्हणतात - ‘असा
पुरुषार्थ करा जेणेकरून उच्च पद प्राप्त होईल’. या सर्व गोष्टी तुमच्या बुद्धीमध्ये
आहेत. खरोखर, युद्ध देखील आहे, नरकाचा विनाश तर होणारच आहे. तुमच्याजवळ चित्रे खूप
फर्स्ट क्लास आहेत. हे दोन गोळे असणारे श्रीकृष्णाचे चित्र देखील छापून घेतले पाहिजे,
याच्यामध्ये ज्ञान खूप स्पष्ट आहे. स्वर्गाची दारे उघडतात तेव्हा नरकाकडे लाथ असते.
तुमचे देखील तोंड स्वर्गाकडे आहे, ही तर एकदम ॲक्युरेट गोष्ट आहे. जाणता की आता
आम्हाला घरी जायचे आहे त्यामुळे घराचीच आठवण करावी लागेल. जुन्या दुनियेला विसरावे
लागेल, याला म्हटले जाते - बेहदचे वैराग्य. जुनी दुनिया सोडून आम्ही बाबांकडे जात
आहोत. आठवणीच्या यात्रेद्वारेच जाऊ. मुख्य आहेच आठवणीची गोष्ट. आठवण तर सगळेच करतात
ना. आता बाबा येऊन यथार्थ गोष्ट सांगत आहेत की, ‘माझी आठवण करा’. ही आहे अव्यभिचारी
आठवण, ती देखील अर्था सहित. तुम्ही जाणता शिवबाबा देखील बिंदू आहेत. स्वतःला देखील
आत्मा बिंदू समजा, बाबांना देखील बिंदू समजा. नवीन गोष्ट पाहून विसरून जातात.
स्वतःला आत्मा समजून मग बाबांची आणि आपल्या घराची आठवण करायची आहे. अच्छा बिंदू
छोटा वाटतो, मग घर तर
मोठे आहे ना. घराची आठवण करा. बाबा देखील तिथे राहतात. आम्ही-तुम्ही तिथे जाऊ जिथे
बाबा राहतात. बिंदू आठवत नाही, अच्छा घर तर आठवते ना; ते आहे - शांतीधाम आणि ते आहे
- सुखधाम. हे आहे दुःखधाम. आता तुम्ही नंबरवार पुरुषार्थाअनुसार शिकत आहात मग
सुखधाममध्ये याल. बाबांची मुले आहात तर जरूर स्वर्गाची बादशाही पाहिजे. कल्पापूर्वी
देखील शिवबाबा आले होते, स्वर्गाची बादशाही दिली होती. तुम्ही विसरला आहात. बाबा
म्हणतात - आता तुम्हाला देण्यासाठी पुन्हा आलो आहे. कितीतरी वेळा तुम्ही राज्य घेतले
आहे आणि गमावले आहे! अगणित वेळा वारसा घेतला आहे तरी देखील अशा बाबांना विसरून का
जाता! मायेच्या वादळांशी खूप युद्ध होते; म्हणून एक नाटक देखील दाखवतात - माया त्या
बाजूला ओढते, प्रभू या बाजूला ओढतात. ज्ञानामध्ये विघ्न येत नाहीत, आठवणीमध्ये
विघ्न येतात, याच्यातच मेहनत आहे. आता बाबा म्हणतात - महारथी बना. या जुन्या
दुनियेला तर आग लागणार आहे. या यज्ञामध्ये सारी जुनी दुनिया स्वाहा होणार आहे
त्यामुळे महावीर देखील बनायचे आहे. तुम्हा मुलांना अखंड, अटल, अडोल राज्य मिळवायचे
आहे. बाबांसोबत तुमचा असा बुद्धियोग रहावा की भले कितीही वादळे येवो परंतु माया
काहीही करू शकणार नाही. ही आहे तुमची शेवटची अवस्था, जेव्हा ट्रान्सफर व्हायचे असते.
जशी शाळेमध्ये परीक्षा शेवटी होते, तुमची माळा देखील शेवटी बनेल. तुम्हाला खूप
साक्षात्कार होतील - अमुक हे बनतील, तमुक ते बनतील. ही दासी बनेल... हे सर्व
सांगतील. त्या वेळी मात्र काहीही करू शकणार नाही, मग पश्चाताप करावा लागेल की, आपण
हे काय केले! श्रीमतानुसार का चाललो नाही! परंतु अंत समयी काहीही होऊ शकणार नाही.
असे खूप पश्चाताप करतात. मनुष्य कोणाचा खून करून नंतर मग पश्चाताप करतात. परंतु खून
तर झाला नंतर मग काय करू शकणार. म्हणून बाबा म्हणतात - निष्काळजीपणा करू नका, आपला
पुरुषार्थ करत रहा. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) ८४ जन्मांचे
नाटक आता पूर्ण होत आहे, घरी परत जायचे आहे, त्यामुळे आत्म-अभिमानी राहून पावन
बनायचे आहे. देह-अभिमान नष्ट करायचा आहे.
२) अर्थासहित स्वतःला
आत्मा बिंदू समजून, बिंदू बाबांच्या अव्यभिचारी आठवणीमध्ये राहायचे आहे. महावीर
बनून आपली अवस्था अडोल, अचल बनवायची आहे.
वरदान:-
व्यर्थच्या
लीकेजला समाप्त करून समर्थ बनणारे कम खर्चा बालानशीन भव
संगमयुगावर
बापदादांद्वारे जे काही खजिने मिळाले आहेत त्या सर्व खजिन्यांना व्यर्थ जाण्यापासून
वाचवा म्हणजे मग कम खर्चा बालानशीन बनाल. व्यर्थ पासून बचाव करणे अर्थात समर्थ बनणे.
जिथे समर्थी आहे तिथे व्यर्थ जाईल - असे होऊ शकत नाही. जर व्यर्थ चे लीकेज असेल तर
कितीही पुरुषार्थ करा, मेहनत करा, परंतु शक्तिशाली बनू शकणार नाही, म्हणून लीकेज
चेक करून नष्ट करा, तरच व्यर्थ पासून समर्थ बनाल.
बोधवाक्य:-
प्रवृत्तीमध्ये
राहत असताना संपूर्ण पवित्र राहणे - हेच योगी आणि ज्ञानी तू आत्म्यासाठी चॅलेंज आहे.
हे अव्यक्त इशारे -
अपवित्रतेच्या बीजाला देखील नष्ट करून संपूर्ण स्वच्छ (पवित्र) बना.
पवित्रता, परमात्म
ज्ञानाची नवीनता आहे. अभिमानाने म्हणता ना की, आग आणि कापूस एकत्र राहून देखील आग
लागू शकत नाही. तुम्ही लोक भाषणांमध्ये देखील म्हणता की, पवित्रते शिवाय योगी तू
आत्मा, ज्ञानी तू आत्मा बनूच शकत नाही. तर हे चॅलेंज आता प्रत्यक्ष स्वरूपामध्ये आणा.