27-09-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुम्हा सर्वांना आठवणीमध्ये राहण्याची मेहनत करायची आहे; तुम्ही स्वतःला आत्मा समजून मज पित्याची आठवण करा तर मी तुम्हाला सर्व पापांपासून मुक्त करेन”

प्रश्न:-
सर्वांच्या सद्गतीचे स्थान कोणते आहे, ज्याचे महत्व साऱ्या दुनियेला कळेल?

उत्तर:-
आबूची भूमी आहे सर्वांच्या सद्गतीचे स्थान. तुम्ही ब्रह्मा कुमारीजच्या समोर ब्रॅकेटमध्ये लिहू शकता हे सर्वोत्तम तीर्थस्थान आहे. संपूर्ण दुनियेची सद्गती इथूनच होणार आहे. सर्वांचे सद्गतीदाता बाबा आणि आदम (ब्रह्माबाबा) इथे बसून सर्वांची सद्गती करतात. ॲडम अर्थात मनुष्य, तो देवता नाही आहे. त्याला भगवंत सुद्धा म्हणू शकत नाही.

ओम शांती।
डबल ओम् शांती, कारण एक आहे बाबांसाठी आणि दुसरे आहे दादांसाठी. दोघांचेही आत्मे आहेत ना. ते (शिवबाबा) आहेत - परम आत्मा, हे (ब्रह्मा बाबा) आहेत - आत्मा. ते देखील लक्ष्य सांगतात की, ‘आपण परमधामचे रहिवासी आहोत’, दोघेही असे म्हणतात. बाबा देखील म्हणतात ओम् शांती, हे (ब्रह्माबाबा) देखील म्हणतात ओम् शांती. मुले देखील म्हणतात ओम् शांती अर्थात मी आत्मा शांतिधामची निवासी आहे. इथे दूर-दूर बसायचे आहे. अंगाला अंग लागता कामा नये कारण प्रत्येकाच्या अवस्थेमध्ये, योगामध्ये रात्रं-दिवसाचा फरक आहे. काहीजण खूप चांगल्या रीतीने आठवण करतात, काहीजण अजिबात आठवण करत नाहीत. तर जे अजिबात आठवण करत नाहीत - ते आहेत पाप-आत्मे, तमोप्रधान आणि जे आठवण करतात ते झाले पुण्य-आत्मे, सतोप्रधान. बराच फरक झाला ना. घरी भले एकत्र राहतात परंतु फरक तर पडतोच ना म्हणूनच भागवतामध्ये आसुरी नावे प्रसिद्ध आहेत. या वेळचीच गोष्ट आहे. बाबा बसून मुलांना समजावून सांगत आहेत - हे आहे ईश्वरीय चरित्र जे भक्तिमार्गामध्ये गातात. सतयुगामध्ये तर काहीही आठवण राहणार नाही, सर्व विसरून जाल. बाबा आत्ताच शिक्षण (ज्ञान) देत आहेत. सतयुगामध्ये तर हे ज्ञान पूर्णपणे विसरून जातात, मग द्वापरमध्ये शास्त्र इत्यादी बनवतात आणि राजयोग शिकवण्याचा प्रयत्न करतात. परंतु राजयोग शिकवता येत नाही. ते तर जेव्हा बाबा सन्मुख येतात तेव्हाच येऊन शिकवतात. तुम्ही जाणता की कसे बाबा येऊन राजयोग शिकवतात. मग ५ हजार वर्षानंतर येऊन असेच म्हणतील - ‘गोड-गोड आत्मिक मुलांनो’, असे कधीच कोणी मनुष्य, मनुष्याला म्हणू शकत नाही. ना देवता, देवतांना असे म्हणू शकणार. एक रुहानी बाबाच रुहानी मुलांना म्हणतात - ‘एकदा पार्ट बजावलात की पुन्हा ५००० वर्षानंतर पार्ट बजावाल कारण नंतर तुम्ही शिडी खाली उतरता’. तुमच्या बुद्धीमध्ये आता आदि-मध्य-अंताचे रहस्य आहे. तुम्ही जाणता ते आहे शांतीधाम अथवा परमधाम. आपण विविध धर्मांचे सर्व आत्मे नंबरवार तिथे निराकारी दुनियेमध्ये राहतो. जसे तारे पाहता ना - कसे उभे आहेत, काहीच दिसण्यात येत नाही. वरती तर कोणती चीज देखील नाही. ब्रह्म तत्त्व आहे. इथे तुम्ही धरतीवर उभे आहात, हे आहे कर्मक्षेत्र. इथे येऊन शरीर धारण करून कर्म करता. बाबांनी समजावून सांगितले आहे - तुम्ही जेव्हा माझ्याकडून वारसा प्राप्त करता तेव्हा २१ जन्म तुमची कर्म अकर्म होऊन जातात कारण तिथे (सतयुगामध्ये) रावण राज्यच नसते. ते आहे ईश्वरीय राज्य जे आता ईश्वर स्थापन करत आहेत. मुलांना समजावून सांगत राहतात - ‘शिवबाबांची आठवण करा तर स्वर्गाचे मालक बनाल’. स्वर्ग शिवबाबांनी स्थापन केला आहे ना. तर शिवबाबांची आणि सुखधामची आठवण करा. सर्वप्रथम शांतीधामची आठवण करा तर चक्राची देखील आठवण येईल. मुले विसरून जातात, म्हणून वारंवार आठवण करून द्यावी लागते - ‘हे गोड-गोड मुलांनो, स्वतःला आत्मा समजा आणि बाबांची आठवण करा तर तुमची पापे भस्म होतील’. बाबा वचन देतात - ‘तुम्ही माझी आठवण कराल तर तुम्हाला पापांपासून मुक्त करेन’. बाबाच पतित-पावन सर्वशक्तिमान ऑथॉरिटी आहेत, त्यांना वर्ल्ड ऑलमाइटी ऑथॉरिटी म्हटले जाते. ते संपूर्ण सृष्टीच्या आदि-मध्य-अंताला जाणतात. वेद-शास्त्र इत्यादी सर्वकाही जाणतात म्हणून तर म्हणतात यांच्यामध्ये काहीच सार नाहीये (अर्थच नाही आहे). गीतेमध्ये देखील काहीच सार नाहीये. भले ती गीता सर्वशास्त्रमई शिरोमणी मायबाप आहे, बाकी सर्व आहेत मुले. जसे सर्वप्रथम प्रजापिता ब्रह्मा आहेत, बाकी सर्व मुले आहेत. प्रजापिता ब्रह्माला ‘आदम’ म्हणतात. आदम अर्थात ‘मानव’. मनुष्य आहे ना, त्यामुळे यांना देवता म्हणता येणार नाही. ऍडमलाच आदम म्हणतात. भक्तलोक तर ब्रह्मा ऍडमला देवता म्हणतात. बाबा बसून समजावून सांगत आहेत ऍडम अर्थात मानव. ते ना देवता आहेत, ना भगवान आहेत. देवता लक्ष्मी-नारायण आहेत. देवता धर्म आहे स्वर्गामध्ये. नवीन दुनिया आहे ना. ते आहे वंडर ऑफ दी वर्ल्ड (जगातील आश्चर्य). बाकी तर सर्व आहेत मायेची वंडर्स (चमत्कार). द्वापर नंतर मायेची वंडर्स असतात. ईश्वरीय वंडर आहे - हेवन, स्वर्ग जो बाबाच स्थापन करतात. आता स्थापन होत आहे. हे जे दिलवाला मंदिर आहे, त्याचे मोल कोणालाच माहित नाहीये. मनुष्य यात्रा करण्यासाठी जातात, तर सर्वात सुंदर तीर्थस्थान हे आहे. तुम्ही लिहिता ना ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, आबू पर्वत. तर ब्रॅकेटमध्ये हे देखील लिहिले पाहिजे - (सर्वोत्तम तीर्थस्थान) कारण तुम्ही जाणता सर्वांची सद्गती इथूनच होते. हे कोणीही जाणत नाहीत. जसे सर्व शास्त्रमई शिरोमणी गीता आहे तसेच सर्व तीर्थांमध्ये श्रेष्ठ तिर्थ आबू आहे. तर मग मनुष्य वाचतील, त्यांचे लक्ष जाईल. हे संपूर्ण जगातील तीर्थांमध्ये हे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र आहे, जिथे बाबा बसून सर्वांची सद्गती करतात. तीर्थक्षेत्र तर खूप झाली आहेत. गांधीजींच्या समाधीला देखील तीर्थ समजतात. सर्वजण जाऊन तिथे फुले इत्यादी वाहतात, त्यांना काहीच माहित नाहीये. तुम्ही मुले जाणता ना - तर तुम्हाला इथे बसल्यावर मनातून अतिशय आनंद झाला पाहिजे. आम्ही स्वर्गाची स्थापना करत आहोत. आता बाबा म्हणतात - ‘स्वतःला आत्मा समजून माझी आठवण करा’. हा अभ्यास देखील खूप सोपा आहे; यासाठी कोणताही खर्च करावा लागत नाही. तुमच्या मम्माला एका पैशाचा तरी खर्च झाला का? कवडीचाही खर्च न करता किती हुशार नंबरवन बनली. राजयोगिनी बनली ना. मम्मासारखी कोणीही झाली नाही.

पहा, आत्म्यांनाच बाबा बसून शिकवतात. आत्म्यांनाच राज्य मिळते आणि आत्म्यानेच राज्य गमावले आहे. इतकी सूक्ष्म आत्मा किती काम करते. वाईटात वाईट काम आहे विकारामध्ये जाणे. आत्मा ८४ जन्मांचा पार्ट बजावते. छोट्याशा आत्म्यामध्ये किती शक्ती आहे! साऱ्या विश्वावर राज्य करते. या देवतांच्या आत्म्यांमध्ये किती ताकद आहे. प्रत्येक धर्माची आपापली ताकद असते ना. ख्रिश्चन धर्मामध्ये किती ताकद आहे. आत्म्यामध्ये ताकद आहे ज्यामुळे शरीराद्वारे कर्म करते. आत्माच इथे येऊन या कर्मक्षेत्रावर कर्म करते. तिथे (सतयुगामध्ये) कोणते वाईट कर्तव्य होत नाही. आत्मा विकारी मार्गामध्ये तेव्हाच जाते जेव्हा रावणाचे राज्य सुरू होते. मनुष्य तर म्हणतात की, हे विकार तर कायमचेच आहेत. तुम्ही समजावून सांगू शकता - तिथे (सतयुगामध्ये) रावण राज्यच नाही तर मग विकार कसे असू शकतात. तिथे आहेच मुळी योगबल. भारताचा राजयोग प्रसिद्ध आहे. खूप जणांना शिकण्याची इच्छा आहे परंतु जेव्हा तुम्ही शिकवाल तेव्हा. दुसरे तर कोणी शिकवू शकणार नाही. जसे महर्षी होते, योग शिकविण्यासाठी किती मेहनत करत होते. परंतु दुनिया थोडीच जाणते की हे हठयोगी राजयोग शिकवू शकत नाहीत. चिन्मयानंदांकडे किती लोक जातात, एकदा फक्त त्यांनी सांगू तर दे की, खरोखरच भारताचा प्राचीन राजयोग ब्रह्माकुमारींशिवाय दुसरे कोणीही समजावून सांगू शकणार नाही, तर मग बस्स. परंतु तसा नियम नाही ज्यामुळे आता हा आवाज निघेल. सर्वांना थोडेच समजेल. पुष्कळ मेहनत आहे, महिमा देखील सर्वात शेवटी होईल; म्हणतात ना - ‘अहो प्रभू, अहो शिवबाबा तुमची लीला’. आता तुम्हाला समजते की, तुमच्याशिवाय बाबांना सुप्रीम पिता, सुप्रीम टीचर, सुप्रीम सद्गुरु इतर कोणीही समजत नाहीत. इथे देखील असे पुष्कळ आहेत, ज्यांना चालता-चालता माया हैराण करते तर मग एकदमच बुद्धू बनतात. खूप मोठे ध्येय आहे. युद्धाचे मैदान आहे, यामध्ये माया भरपूर विघ्न आणते. ते (विदेशी) लोक विनाशासाठी तयारी करत आहेत. तुम्ही इथे ५ विकारांना जिंकण्यासाठी पुरुषार्थ करत आहात. तुम्ही विजयासाठी, आणि ते विनाशासाठी पुरुषार्थ करत आहेत. दोघांचेही काम एकदमच होईल ना. अजून वेळ बाकी आहे. आमचे राज्य थोडेच स्थापन झाले आहे. राजा, प्रजा अजून सर्व बनायचे आहेत. तुम्ही अर्ध्या कल्पासाठी बाबांकडून वारसा घेता. बाकी मोक्ष तर कोणाला मिळत नाही. ते लोक (दुनियावाले) भले म्हणतात - ‘अमक्याने मोक्ष प्राप्त केला’; मृत्यू नंतर त्यांना थोडेच समजते की कुठे गेला. अशाच बाता मारत राहतात.

तुम्ही जाणता जे शरीर सोडतात ते पुन्हा दुसरे शरीर जरूर घेणार. मोक्ष प्राप्त करू शकत नाहीत. असे नाही की बुडबुडा पाण्यामध्ये विलीन होतो. बाबा म्हणतात - ही शास्त्रे इत्यादी सर्व भक्तिमार्गाची सामुग्री आहे. तुम्ही मुले सन्मुख ऐकता. गरम-गरम हलवा खाता. सर्वात जास्त गरम हलवा कोण खातात? (ब्रह्मा बाबा) हे तर अगदी त्यांच्या बाजूला बसले आहेत. लगेच ऐकतात आणि धारण करतात नंतर मग हेच उच्चपद प्राप्त करतात. सूक्ष्मवतनमध्ये, वैकुंठामध्ये यांचाच (ब्रह्माचाच) साक्षात्कार घडतो. इथे देखील या डोळ्यांनी त्यांनाच (ब्रह्मा बाबांनाच) पाहता. बाबा शिकवतात सर्वांनाच. बाकी आहे आठवणीची मेहनत. आठवणीमध्ये राहणे जसे तुम्हाला कठीण वाटते, तसेच यांना (ब्रह्मा बाबांना) देखील वाटते. यामध्ये काही कृपा करण्याची गोष्ट नाही. बाबा म्हणतात - ‘मी लोन घेतले आहे, त्याचा सर्व हिशोब देणार. बाकी आठवणीचा पुरुषार्थ तर यांना देखील (ब्रह्मा बाबांना सुद्धा) करायचा आहे’. ब्रह्माबाबा म्हणतात - ‘समजतो देखील - शेजारीच बसलो आहे. बाबांची मी आठवण करतो तरी देखील विसरून जातो’. सर्वात जास्त मेहनत यांनाच (ब्रह्माबाबांनाच) करावी लागते. युद्धाच्या मैदानामध्ये जे महारथी पैलवान असतात, जसे हनुमानाचे उदाहरण आहे, तर त्याचीच मायेने परीक्षा घेतली कारण तो महावीर होता. जितका जास्त पैलवान (शक्तिशाली) तितकी माया जास्त परीक्षा घेते. वादळे जास्त येतात. मुले लिहितात - ‘बाबा, आम्हाला असे-असे होते’. बाबा म्हणतात - ‘हे तर सर्व होणारच’. बाबा दररोज समजावून सांगतात - सावध रहा. लिहितात - ‘बाबा, माया खूप वादळे घेऊन येते’. काहीजण देह-अभिमानी असतात तर बाबांना सांगत नाहीत. तुम्ही आता खूप हुशार बनता. आत्मा पवित्र झाल्याने मग शरीर देखील पवित्र मिळते. आत्मा किती चमत्कारीक बनते. पहिले तर गरीबच हे ज्ञान घेतात. बाबा देखील ‘गरीब निवाज’ म्हणून प्रसिद्ध आहेत’. बाकी ते (श्रीमंत) लोक तर उशिरा येतील. तुम्ही जाणता जोपर्यंत भाऊ-बहीण बनत नाही तोपर्यंत भाऊ-भाऊ कसे बनणार. प्रजापिता ब्रह्माची संतान तर भाऊ-बहीणीच झाले ना. तर मग बाबा म्हणतात - ‘भाऊ-भाऊ समजा’. हा आहे सर्वात शेवटचा संबंध मग वरती (परमधाममध्ये) देखील जाऊन भावांना भेटणार. मग सतयुगामध्ये नवीन नाते सुरू होईल. तिथे मेव्हणा, काका, मामा अशी जास्त नाती नसतात. नाती खूप थोडी असतात. मग वाढत जातात. आता तर बाबा म्हणतात भाऊ-बहीण सुद्धा नाही भाऊ-भाऊ समजायचे आहे. नावा-रूपामधून देखील बाहेर पडायचे आहे. बाबा भावांनाच (आत्म्यांनाच) शिकवतात. प्रजापिता ब्रह्मा आहे, तेव्हाच तर भाऊ-बहीणीचे नाते आहे ना. श्रीकृष्ण तर स्वतःच छोटा मुलगा आहे. ते कसे भाऊ-भाऊ बनवणार. गीतेमध्ये देखील या गोष्टी नाही आहेत. हे अतिशय वेगळेच ज्ञान आहे. ड्रामामध्ये सर्व नोंदलेले आहे. एका सेकंदाचा पार्ट दुसऱ्या सेकंदाशी मेळ खाऊ शकत नाही. किती महिने, किती तास, किती दिवस जायचे आहेत, मग ५ हजार वर्षानंतर असेच निघून जातील. कमी बुद्धीवाले तर इतकी धारणा करू शकणार नाहीत; म्हणून बाबा म्हणतात - ‘हे तर खूप सोपे आहे - स्वतःला आत्मा समजा, बेहदच्या बाबांची आठवण करा’. जुन्या दुनियेचा विनाश देखील होणार आहे. बाबा म्हणतात - ‘मी येतोच तेव्हा जेव्हा संगम असतो. तुम्हीच देवी-देवता होता. तुम्ही हे जाणता, जेव्हा यांचे (लक्ष्मी-नारायणाचे) राज्य होते तेव्हा दुसरा कोणताही धर्म नव्हता. आता तर यांचे राज्यच राहिलेले नाही. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) आता अखेरची वेळ आली आहे, घरी परत जायचे आहे त्यामुळे आपली बुद्धी नावा-रूपामधून काढून टाकायची आहे. ‘आपण आत्मे भाऊ-भाऊ आहोत’ - हा अभ्यास करायचा आहे. देह-अभिमानामध्ये यायचे नाही.

२) प्रत्येक आत्म्याची अवस्था (स्थिती) आणि योग यामध्ये रात्रं-दिवसाचा फरक आहे त्यामुळे दूर-दूर बसायचे आहे. अंगाला अंग लागता कामा नये. पुण्य आत्मा बनण्यासाठी आठवणीमध्ये राहण्याची मेहनत करायची आहे.

वरदान:-
बाबांच्या प्रेमाखातर आपल्या मूळ दोषाला कुर्बान करणारे ज्ञानी तू आत्मा भव

बापदादा पाहतात की अजूनपर्यंत ५ ही विकारांचे व्यर्थ संकल्प बहुसंख्य मुलांचे चालतात. ज्ञानी आत्म्यांना देखील कधी-कधी आपल्या गुणाचा किंवा विशेषतेचा अभिमान येतो, प्रत्येकजण आपल्या मूळ दोषाला अथवा मूळ संस्काराला जाणतात देखील, त्या दोषाला बाबांच्या प्रेमाखातर कुर्बान करुन टाकणे - हाच प्रेमाचा पुरावा आहे. स्नेही अथवा ज्ञानी तू आत्मे बाबांच्या प्रेमामध्ये व्यर्थ संकल्पांना देखील समर्पित करतात.

बोधवाक्य:-
ाच्या सीटवर स्थित राहून सर्वांना सन्मान देणारे माननीय आत्मा बना.