27-10-24 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
08.10.2002 ओम शान्ति
मधुबन
“आत्मिक प्रेमाची
मूर्ती बनून शिकवण आणि सहयोग दोन्ही एकत्र द्या”
(विशेष मधुबन निवासी भाऊ-बहिणींसोबत भेट)
आज प्रेमाचे सागर
बापदादा आपल्या मास्टर ज्ञान सागर मुलांना भेटत आहेत. हे परमात्म प्रेम मुलांच्या
पालनेचा आधार आहे. जसे परमात्म प्रेम ब्राह्मण जीवनाचा आधार आहे, तसेच ब्राह्मण
संघटनेचा आधार आत्मिक प्रेम आहे. जे आत्मिक प्रेम तुम्ही मुलेच अनुभवू शकता. आजच्या
विश्वातील आत्मे या खऱ्या, निःस्वार्थ आत्मिक परमात्म प्रेमासाठी तहानलेले आहेत. असे
खरे प्रेम तुम्हा ब्राह्मण आत्म्यांशिवाय इतर कोणालाही प्राप्त होऊ शकत नाही.
तहानलेल्या आत्म्यांची तहान भागविणारे तुम्ही स्वतःला नेहमी परमात्म प्रेम किंवा
आत्मिक प्रेमामध्ये एकरूप झालेले अनुभव करता का? सदैव प्रेमाचे दाता आणि देवता बनून
राहिले आहात? चालता-फिरता आत्मिक प्रेमाची वृत्ती, दृष्टी, बोल, संबंध-संपर्क
अर्थात कर्म अनुभव करता का? कशीही आत्मा असो परंतु तुम्हा ब्राह्मणांची नॅचरल वृत्ती,
ब्राह्मण नेचर बनली आहे का? बनवावी लागते की बनली आहे? फॉलो फादर, फॉलो मदर. आपल्या
ब्राह्मण जन्माच्या सुरुवातीचा काळ आठवा. विभिन्न नेचर (वेगवेगळे स्वभाव) असणारे
बाबांचे बनले. प्रेमाचे सागर बाबांनी एकाच प्रेमाच्या सागराच्या स्वरूपाच्या अनादि
नेचर ने आपले बनवले ना! जर तुम्हा सर्वांची वेगवेगळी नेचर (वेगवेगळे स्वभाव) बघितली
असती तर आपले बनवू शकले असते का? तर स्वतःला विचारा, माझी नॅचरल नेचर (नैसर्गिक
स्वभाव) काय आहे? कोणाचाही कमजोर स्वभाव; खरे तर ब्राह्मण जीवनाचा नॅचरल स्वभाव
‘मास्टर प्रेमाचा सागर’ आहे. जेव्हा दुनियावाले देखील म्हणतात की प्रेम दगडाला
देखील पाझर फोडते; तर तुम्ही आत्मिक प्रेम, परमात्म प्रेम घेऊन इतरांना देणारे,
वेगवेगळया नेचरला (विभिन्न स्वभाव असणाऱ्यांना) परिवर्तन करू शकत नाही काय? करू शकता
की नाही? मागे बसलेले बोला? जे समजतात करू शकतो त्यांनी एक हात वर करा. उंच हात करा,
छोटा नाही. (सर्वांनी हात उंच केला) अच्छा मुबारक असो! मग काही परिस्थिती देखील
येतील. परिस्थिती तर येणारच आहेत. हे तर ब्राह्मण जीवनाच्या रस्त्यावरील साइड सीन्स
आहेत. आणि साइड सीन्स कधी एकसारखे नसतात. काही सुंदरही असतात, काही खराब देखील
असतात. परंतु पार करणे प्रवाशाचे काम आहे, साइडसीन बदलण्याची गोष्ट नाही. तर
बापदादांना काय हवे आहे! सर्वजण ओळखण्यामध्ये तर हुशार झाले आहेत ना.
आज मधुबन निवासींना
विशेष चान्स मिळाला आहे. गोल्डन चान्स आहे ना. अच्छा. या गोल्डन चान्सचे रिटर्न काय?
खूप उमंग-उत्साहाने चान्स घेतला आहे. तसेही खाली बसणारे सुद्धा मधुबन निवासी आहेत (मधुबन
निवासी भाऊ-बहिणींव्यतिरिक्त इतर सर्वजण पांडव भवनमध्ये मुरली ऐकत आहेत) परंतु आज
फक्त ग्रुपनुसार भेटण्याचा चान्स आहे. इतके सगळे एकत्र आले तर दूरपर्यंत पसरतात
म्हणून छोटे-छोटे ग्रुप बनवले आहेत. बाकी आहेत सर्व मधुबन निवासी. जर सेंटरवर
राहणाऱ्यांचा देखील परमनंट ॲड्रेस मधुबनच आहे ना, तर ब्राह्मण अर्थात परमनंट ॲड्रेस
मधुबन. घर मधुबन आहे बाकी सर्व सेवा स्थान आहेत. तर खाली बसणारे असे समजू नका की आज
आम्हाला मधुबन निवासींमधून काढून टाकले आहे. नाही, तुम्ही सर्व मधुबन निवासी आहात.
फक्त तुम्हाला बापदादा समोर पाहू इच्छितात. तर छोट्या ग्रुपमध्ये पाहू शकतात. आता
पहा, मागे बसलेले सुद्धा इतके स्पष्ट दिसून येत नाहीत, हे जवळ बसलेले स्पष्ट दिसून
येतात. परंतु मागे बसलेले बाबांच्या हृदयापासून काही दूर नाहीत. खाली असलेले देखील
हृदयापासून दूर नाहीत. तर बापदादांची हीच इच्छा आहे की वर्तमान वेळेप्रमाणे ‘लव आणि
लॉ’ (प्रेम आणि कायदा) यांचा बॅलन्स ठेवावा लागतो, परंतु लॉ आणि लव याचा बॅलन्स
मिळून लॉ वाटायला नको. लॉ मध्ये देखील लवचा (प्रेमाचा) अनुभव व्हावा. जसे साकार
रूपामध्ये बाबांना पाहिले. लॉ सोबत लव इतके दिले जे प्रत्येकाच्या मुखातून हेच निघत
असे की, ‘बाबांचे माझ्यावर प्रेम आहे. माझे बाबा आहेत’. लॉ चा जरूर वापर करा परंतु
लॉ सोबत प्रेम सुद्धा द्या. फक्त लॉ नाही. फक्त लॉ वापरल्याने कधी-कधी आत्मे कमजोर
असल्या कारणाने निराश होतात. जेव्हा स्वतः आत्मिक प्रेमाची मूर्ती बनाल तेव्हा
तुम्ही दुसऱ्यांना प्रेम (आत्मिक प्रेम, दुसरे प्रेम नाही) देऊ शकाल; आत्मिक प्रेम
अर्थात प्रत्येक समस्येला सोडविण्यामध्ये सहयोगी बनणे. केवळ शिकवण देणेच नाही तर
शिकवण आणि सहयोग एकत्र देणे - हे आहे आत्मिक प्रेमाची मूर्ती बनणे. तर आज विशेष
बापदादा प्रत्येक ब्राह्मण आत्म्याला, मग देश असो किंवा विदेश चोहो बाजूच्या सर्व
मुलांना हीच विशेष गोष्ट अंडरलाइन करवत आहेत की आत्मिक प्रेमाची मूर्ती बना. इतर
आत्म्यांची आत्मिक प्रेमाची तहान भागविणारे दाता-देवता बना. ठीक आहे ना! अच्छा.
(नंतर बापदादांनी
मधुबन निवासींसोबत बातचीत केली तसेच सर्वांना नजरेने निहाल करत (तृप्त करत) दृष्टी
दिली)
हॉस्पिटल, आबू निवासी
तसेच पार्टींसोबत अव्यक्त बापदादांचा संवाद:-
सर्वजण स्वतःला भाग्यवान समजता का? साऱ्या विश्वामध्ये सर्वात मोठ्यात मोठे भाग्य
कोणाचे आहे? तुम्ही सर्वजण समजता का की सर्वात मोठ्यात मोठे भाग्य माझे आहे!
प्रत्येक जण असे समजतो का? जेव्हा भाग्यवान असतो तेव्हा आनंदी असतो? कायम आनंदी
राहता का? कधी-कधी तर नाही ना! जर बापदादांनी भाग्याचा तारा चमकवला आहे तर चमकणाऱ्या
ताऱ्याला पाहून आनंदी राहता का? हृदयामध्ये सदैव आनंदाचे ढोल वाजतात. वाजतात का? मन
कोणते गाणे गाते? “वाह माझे श्रेष्ठ भाग्य” - हे गाणे गाता ना? संपूर्ण कल्प तुमच्या
भाग्याचे गायन होत राहते. अर्धा कल्प भाग्याचे प्रारब्ध भोगता आणि अर्धा कल्प
तुमच्या भाग्याचे गायन अनेक आत्मे गात राहतात. सर्वात विशेष गोष्ट आहे की बाबांना
संपूर्ण विश्वामधून कोण आवडले? तुम्ही आवडलात ना! कित्ती आत्मे आहेत परंतु तुम्हीच
आवडलात. ज्यांना भगवंताने पसंत केले, यापेक्षा अधिक काय असू शकते! तर नेहमी
बाबांसोबत आपले भाग्य देखील लक्षात ठेवा. भगवान आणि भाग्य. संपूर्ण कल्पामध्ये अशी
कोणती आत्मा असेल जिला दररोज प्रेमपूर्वक आठवण मिळेल, प्रभू प्रेम मिळेल. रोज
प्रेमपूर्वक आठवण मिळते ना. सर्वात जास्त लाडके कोण आहेत? तुम्हीच लाडके आहात ना.
तर सदैव आपल्या भाग्याची आठवण केल्याने व्यर्थ गोष्टी पळून जातील; पळवावे लागणार
नाही, आपणच पळून जातील.
आता वर्तमान
समयानुसार संगमयुगाच्या वेळेचे महत्व समजून प्रत्येक सेकंद आपले प्रारब्ध श्रेष्ठ
बनवत रहा. एक सेकंद सुद्धा व्यर्थ जाऊ नये कारण एका-एका सेकंदाचे खूप मोठे महत्व आहे.
सेकंद जात नाही परंतु खूप वेळ निघून जातो आणि हा वेळ पुन्हा कधी मिळणार नाही. वेळेचा
चांगल्या प्रकारे परिचय आहे ना. लक्षात राहते ना? पहा, आज तुम्हा सर्वांना स्पेशल
वेळ मिळाला आहे ना. जर एकत्र आला असता तर दिसला सुद्धा नसता. आता बघत तर आहे
कोण-कोण आहेत. सर्व विशेष आत्मे आहात. फक्त आपली विशेषता जाणून विशेषतेला
कार्यामध्ये लावा. ड्रामा अनुसार प्रत्येक ब्राह्मण आत्म्याला कोणती ना कोणती
विशेषता प्राप्त आहे. असे कोणी नाही ज्याच्यामध्ये कोणतीच विशेषता नाही. तर आपल्या
विशेषतेला कायम स्मृतीमध्ये ठेवा आणि तिला सेवेमध्ये लावा. प्रत्येकाची विशेषता,
उडत्या कलेची अतिशय प्रभावी विधी बनेल. सेवेमध्ये लावा, अभिमानामध्ये येऊ नका कारण
संगमावर प्रत्येक विशेषता ड्रामा अनुसार परमात्म देणगी आहे. परमात्म देणगीमध्ये
अभिमान येणार नाही. जसा प्रसाद असतो ना तर त्याला कोणी आपला म्हणणार नाहीत की माझा
प्रसाद आहे, प्रभू प्रसाद आहे. या विशेषता देखील प्रभू प्रसाद आहे. प्रसाद केवळ
आपल्याप्रती युज केला जात नाही, वाटला जातो. वाटता, महादानी आहात, वरदानी सुद्धा
आहात. पांडव देखील वरदानी, महादानी आहेत, शक्ती देखील महादानी आहात ना? एक-दोन
तासांचे महादानी नाही, खुला भांडार, म्हणून बाबांना भोला भंडारी म्हणतात, खुला
भांडार आहे ना. आत्म्यांना ओंजळभर देत रहा, केवढी मोठी लाईन आहे भिकाऱ्यांची. आणि
तुमच्याकडे किती भरपूर भांडार आहे? अखुट (न संपणारा) भांडार आहे, खुंटणारा (कमी
होणारा) आहे का? वाटण्यामध्ये इकॉनॉमी तर करत नाही ना? यामध्ये फ्राक दिली (मोठ्या
मनाने) वाटा. व्यर्थ घालवण्यामध्ये इकॉनॉमी करा परंतु वाटण्यामध्ये मोठ्या मनाने
वाटा.
सगळे खुश आहेत?
कधी-कधी थोडे-थोडे होते. कधी मूड ऑफ, कधी मूड खूप खुश असे तर नाही ना. फॉलो फादर,
बापदादा मूड ऑफ करतात का? तर फॉलो फादर आहे ना. बापदादांकडे स्पेशल ब्राह्मण
मुलांसाठी टी.व्ही. आहे, त्यामध्ये सर्वांचा वेग-वेगळा मूड दिसतो. किती मजा येत
असेल बघताना! सदैव महादानी बनणाऱ्याचा मूड कधी बदलत नाही. दाता आहात ना, देत जा.
देवता बनणारे अर्थात देणारे. लेवता नाही देवता. किती वेळा देवता बनला आहात, अनेक
वेळा बनला आहात ना. तर देवता अर्थात देण्याचा संस्कार असणारे. कोणी काहीही देवो
परंतु तुम्ही सुखाची ओंजळ, शांतीची ओंजळ, प्रेमाची ओंजळ द्या. लोकांकडे आहेच दुःख,
अशांती तर ते काय देणार, तेच देणार ना. आणि तुमच्याकडे काय आहे - सुख-शांती. सगळे
ठीक आहे ना! अच्छा! मिलन साजरे केले, असे तर नाही समजत ना की, आम्ही नंतर आलो.
स्पेशल आला आहात. तुम्ही तर मधुबनच्या जवळ राहत आहात. मधुबनला वेढा तर चांगला घातला
आहे.
हॉस्पिटलवाले देखील
सेवा चांगली करत आहेत. शांतीवनचे देखील भरपूरजण आहेत. पार्टीवाले सिकीलधे (खूप
वर्षांनी भेटलेले) आहेत. थोडे आहेत म्हणून सिकीलधे आहेत. फॉरेनर्स शिवाय देखील शोभा
येत नाही, त्यामुळे प्रत्येक ग्रुपमधले आपली शोभा वाढविण्यासाठी चांगले येता. अच्छा.
सेवाधारीं सोबत
अव्यक्त बापदादांचा संवाद:-
सर्व सेवेच्या निमित्ताने आपले भाग्य बनविणारे आहात कारण या यज्ञ सेवेचे पुण्य खूप
मोठे आहे. तनाद्वारे सेवा तर करताच परंतु मनाने देखील सेवा करत रहा, तर डबल पुण्य
होते. मनसा सेवा आणि तनाने सेवा. जे कोणी येतात सेवाधारींच्या सेवेचे वायुमंडळ
पाहून आपला लाभ घेऊन जातात. तर जितके पण सेवेच्या वेळी येतात, तेवढ्या आत्म्यांचे
पुण्य अथवा आशीर्वाद जमा होतात. अशी तनाने आणि मनाने देखील सेवा करता. डबल सेवाधारी
आहात का सिंगल, कोण आहात? डबल. डबल करता? सेवेचे प्रत्यक्ष फळ सुद्धा मिळत राहते.
जितका वेळ राहता, एक्स्ट्रा खुशी मिळते ना! तर प्रत्यक्ष फळ सुद्धा खाता, आशीर्वादही
जमा होतात, भविष्य देखील बनले आणि वर्तमान सुद्धा बनले. बापदादांना देखील आनंद होतो
की मुले आपले प्रारब्ध अतिशय सोपे आणि श्रेष्ठ बनवत आहेत. बस्स सेवा, सेवा आणि सेवा.
इतर कोणत्याही गोष्टींमध्ये जाऊ नका. सेवा अर्थात जमा करणे. जितका पण वेळ मिळतो
तेवढी डबल कमाई करा. प्रत्यक्ष फळ देखील आणि भविष्य देखील, सेवेचा चान्स देखील
तुम्हा आत्म्यांना प्राप्त आहे. सेवाधारींवर बापदादांचे विशेष प्रेम आहे कारण
बापदादा देखील विश्वाचे सेवक आहेत. तर समान झाले ना! मनाला बिझी ठेवता का रिकामे
ठेवता? मधुबन अर्थात आठवण आणि सेवा. चालता-फिरता मन आठवणीमध्ये अथवा सेवेमध्ये बिझी
असावे. सगळे आनंदी राहता ना? कधी-कधी वाले तर नाही आहात ना? सदैव आनंदी राहणारे.
तुमच्या आनंदाला पाहून दुसरे देखील आनंदी होतात. सेवाधारींना देखील टर्न मिळाला,
खुश आहात ना! विशेष टर्न मिळाला ना? मधुबनवाल्यांच्या निमित्ताने तुमचाही गोल्डन
चान्स झाला. स्वतः सदैव स्वमानामध्ये राहून उडत रहा. स्वमानाला कधीही सोडू नका, भले
मग झाडू मारत आहात परंतु स्वमान काय आहे? विश्वातील सर्व आत्म्यांमध्ये श्रेष्ठ
आत्मा आहे. तर आपला आत्मिक स्वमान कोणतेही काम करताना विसरू नका. नशा राहतो ना,
आत्मिक नशा. आम्ही कोणाचे बनलो! भाग्य लक्षात राहते ना? विसरत तर नाही ना? जेवढा पण
वेळ सेवेसाठी मिळतो तेवढा वेळ एक-एक सेकंद सफल करा. व्यर्थ जायला नको, साधारण सुद्धा
नाही. आत्मिक नशेमध्ये, आत्मिक प्राप्तींमध्ये वेळ जावा. असे लक्ष्य ठेवता ना. अच्छा,
ओम् शांती.
वरदान:-
स्नेहाच्या
उड्डाणाद्वारे सदैव समीपतेचा अनुभव करणारे स्नेही मूर्त भव
सर्व मुलांमध्ये
बापदादांचा स्नेह सामावलेला आहे, स्नेहाच्या शक्तीने सर्व पुढे उडत जात आहेत.
स्नेहाची झेप तनाने अथवा मनाने, अंतःकरणाने बाबांच्या जवळ आणते. भले ज्ञान, योग,
धारणेमध्ये सर्व यथाशक्ती नम्बरवार आहेत परंतु स्नेहामध्ये प्रत्येकजण नंबर वन आहे.
हा स्नेहच, ब्राह्मण जीवन प्रदान करण्याचा मुख्य आधार आहे. स्नेहाचा अर्थ आहे - पास
राहणे (जवळ राहणे), पास होणे (उत्तीर्ण होणे) आणि प्रत्येक परिस्थितीला अतिशय
सहजतेने पास करणे (पार करणे).
सुविचार:-
आपल्या नजरेमध्ये
बाबांना सामावून घ्या तर मायेच्या नजरेपासून वाचाल.