27-11-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - हदच्या संसाराच्या वाह्यात गोष्टींमध्ये आपला टाइम वेस्ट करायचा नाही, बुद्धीमध्ये सदैव रॉयल विचार चालत रहावे”

प्रश्न:-
कोणती मुले बाबांच्या प्रत्येक डायरेक्शनला अमलात आणू शकतात?

उत्तर:-
जी अंतर्मुखी आहेत, आपला दिखावा करत नाहीत, रुहानी (आत्मिक) नशेमध्ये राहतात, तीच बाबांच्या प्रत्येक डायरेक्शनला अमलात आणू शकतात. तुम्हाला कधीही मिथ्या अहंकार येता कामा नये. आतून एकदम स्वच्छ असावे. आत्मा खूप चांगली असावी, एका बाबांवर खरे प्रेम असावे. कधी लून पानी अर्थात खारेपणाचा संस्कार नसावा, तेव्हाच तुम्हाला बाबांचे प्रत्येक डायरेक्शन अमलात आणता येईल.

ओम शांती।
मुले फक्त आठवणीच्या यात्रेमध्ये बसलेली नाहीत. मुलांना हा अभिमान आहे की आम्ही श्रीमतावर आपले परिस्तान स्थापन करत आहोत. इतका उमंग, खुशी राहिली पाहिजे. कचरापट्टी इत्यादीच्या सर्व वाह्यात गोष्टी काढून टाकल्या पाहिजेत. बेहदच्या बाबांना बघताच हुरुप आला पाहिजे. जितके-जितके तुम्ही आठवणीच्या यात्रेमध्ये रहाल तितकी सुधारणा होत जाईल. बाबा म्हणतात मुलांसाठी रुहानी युनिव्हर्सिटी असायला पाहिजे. तुमची आहेच वर्ल्ड स्पिरिचुअल युनिव्हर्सिटी (जागतिक अध्यात्मिक विद्यापीठ). तर ती युनिव्हर्सिटी आहे कुठे? युनिव्हर्सिटी खास स्थापन केली जाते. त्यासोबत मोठे रॉयल हॉस्टेल पाहिजे. तुमचे किती रॉयल विचार असले पाहिजेत. बाबांना तर रात्रं-दिवस हेच विचार येत राहतात - मुलांना शिकवून उच्च परीक्षेमध्ये कसे पास करावे? ज्यामुळे मग हे विश्वाचे मालक बनणार आहेत. खरे तर तुमची आत्मा शुद्ध सतोप्रधान होती तेव्हा शरीर देखील किती सतोप्रधान सुंदर होते. राजाई देखील किती उच्च होती. तुमचा हदच्या संसाराच्या कचरा पट्टीच्या गोष्टींमध्ये बराच टाइम वेस्ट होतो. तुम्हा स्टुडंटमध्ये कचरापट्टीचे विचार असता कामा नयेत. कमिटी इत्यादी तर खूप छान-छान बनवतात. परंतु योगबल नाही आहे. बाता खूप मारतात - आम्ही हे करू, ते करू. माया देखील म्हणते - मी यांना नाका-कानाने पकडणार. बाबांवर प्रेमच नाही आहे. म्हटले जाते ना - ‘नर चाहत कुछ और…’ तर माया सुद्धा काही करायलाच देत नाही. माया खूप ठकवणारी आहे, कानच कापून टाकते. बाबा मुलांना किती श्रेष्ठ बनवतात, डायरेक्शन देतात - असे-असे करा. बाबा तर मोठ्या रॉयल-रॉयल मुली (बहिणी) सेवेसाठी पाठवतात. कोणी-कोणी म्हणतात - ‘बाबा, आम्ही ट्रेनिंगसाठी जाऊ?’ तर बाबा म्हणतात - ‘मुलांनो, पहिले तुम्ही आपल्यातील उणिवा तर काढून टाका. स्वतःला बघा आपल्यामध्ये किती अवगुण आहेत?’ चांगल्या-चांगल्या महारथींना सुद्धा माया एकदम लून-पानी करून टाकते. अशी खारट (वाईट) मुले आहेत जी बाबांची कधी आठवण सुद्धा करत नाहीत. ज्ञानाचा “ग” सुद्धा जाणत नाहीत. बाहेरून दिखावा खूप आहे. यामध्ये तर खूप अंतर्मुखी होऊन राहिले पाहिजे, परंतु बऱ्याच जणांचे तर असे वर्तन असते जसे निरक्षर मूर्ख लोक असतात, थोडेसे पैसे असतात तर त्याचा नशा चढतो. हेच समजत नाहीत की, अरे, मी तर कंगाल आहे. माया समजू देत नाही. माया अतिशय कठोर आहे. बाबांनी थोडीशी महिमा केली की तेवढयानेच खूप खुश होऊन जातात.

बाबांना रात्रंदिवस हेच विचार चालतात की युनिव्हर्सिटी एकदम फर्स्टक्लास असली पाहिजे, जिथे मुले चांगल्या प्रकारे शिकतील. तुम्ही जाणता - आपण स्वर्गामध्ये जात आहोत तर आनंदाचा पारा चढलेला राहिला पाहिजे ना. इथे बाबा वेगवेगळ्या प्रकारचा डोस देतात, नशा चढवतात. कोणी दिवाळखोर असेल, त्याला दारू पाजा, तर समजेल मी बादशहा आहे. आणि नशा उतरल्यानंतर तसाच्या तसा बनतो. आता हा तर आहे रुहानी नशा. तुम्ही जाणता बेहदचे बाबा टीचर बनून आम्हाला शिकवत आहेत आणि डायरेक्शन देत आहेत - असे-असे करा. काही-काही वेळा कोणाला मिथ्या अहंकार सुद्धा येतो. माया आहे ना. अशा काही गोष्टी बनवतात की काही विचारूच नका. बाबा समजतात, हे ज्ञानामध्ये चालू शकणार नाहीत. आतून खूप सफाई पाहिजे. आत्मा खूप चांगली पाहिजे. तुमचे लव्ह मॅरेज झाले आहे ना. लव्ह मॅरेजमध्ये किती प्रेम असते, हे (शिवबाबा) तर पतींचेही पती आहेत. ते देखील किती जणांचे लव्ह मॅरेज होते. एकाचे थोडेच होते. सर्वजण म्हणतात - आमचा तर शिवबाबांसोबत साखरपुडा झाला आहे. आम्ही तर स्वर्गामध्ये जाऊन बसणार. आनंदाची गोष्ट आहे ना. आतून वाटले पाहिजे की, बाबा आमचा किती शृंगार करत आहेत. शिवबाबा शृंगार करतात यांच्याद्वारे (ब्रह्मा बाबांद्वारे); तुमच्या बुद्धीमध्ये आहे की आम्ही बाबांची आठवण करत-करत सतोप्रधान बनणार. या नॉलेजला आणखी कोणी जाणतही नाहीत. याचा खूप नशा राहतो. आत्ता अजून इतका नशा चढत नाही आहे परंतु होणार आहे जरूर. गायन देखील आहे - ‘अतीन्द्रिय सुख गोप-गोपियों से पूछो’. आता तुमची आत्मा किती घाण झाली आहे. जशी काही खूप घाण कचऱ्यामध्ये बसली आहे. त्या आत्म्यांना बाबा येऊन चेंज करतात, रिज्युनवेट (पुनर्जिवित) करतात. मनुष्य नजर (चष्मा) बदलतात तर किती आनंद होतो. तुम्हाला तर आता बाबा मिळाले आहेत तर बेडा पार होतो (जीवन रुपी नावच पार होते). समजता आपण बेहदच्या बाबांचे बनलो आहोत तर स्वतःला किती लवकर सुधारले पाहिजे. रात्रंदिवस हीच खुशी, हेच चिंतन रहावे - तुम्हाला मार्शल बघा कोण मिळालेला आहे! रात्रंदिवस याच विचारामध्ये रहायचे असते. जे कोणी चांगल्या रितीने समजतात, ओळखतात, ते तर जसे उडायला लागतात.

तुम्ही मुले आता संगमावर आहात. बाकी ते सर्व तर घाणीमध्ये पडलेले आहेत. जसे कचऱ्याच्या कडेला झोपड्या बांधून घाणीमध्ये बसलेले असतात. कितीतरी अशा झोपडपट्ट्या बनलेल्या असतात. ही तर आहे बेहदची गोष्ट. आता त्यातून बाहेर पडण्याची शिवबाबा तुम्हाला अतिशय सोपी युक्ती सांगत आहेत. गोड-गोड मुलांनो, तुम्ही जाणता ना यावेळी तुमची आत्मा आणि शरीर दोन्ही पतित आहेत. आता तुम्ही यातून बाहेर आला आहात. जे-जे बाहेर पडले आहेत त्यांच्यामध्ये ज्ञानाची पराकाष्ठा (उच्चतम स्थिती) आहे ना. तुम्हाला बाबा मिळाले तर मग अजून काय हवे! हा नशा जेव्हा चढेल तेव्हा तुम्ही कोणालाही समजावून सांगू शकाल. बाबा आलेले आहेत. बाबा आमच्या आत्म्याला पवित्र बनवतात. आत्मा पवित्र बनल्यामुळे मग शरीर देखील फर्स्टक्लास मिळते. आत्ता तुमची आत्मा कुठे बसली आहे? या झुग्गी (शरीर रुपी झोपडीमध्ये) बसलेली आहे. तमोप्रधान दुनिया आहे ना. कचऱ्याच्या कडेला येऊन बसला आहात ना. विचार करा आपण कुठून बाहेर पडलो आहोत. बाबांनी घाणेरड्या नाल्यामधून बाहेर काढले आहे. आता आमची आत्मा स्वच्छ बनेल. राहण्यासाठी देखील फर्स्टक्लास महाल बनवतील. आमच्या आत्म्याला बाबा शृंगार करून स्वर्गामध्ये घेऊन जात आहेत. मुलांना आतून अशा प्रकारचे विचार आले पाहिजेत. बाबा किती नशा चढवतात. तुम्ही इतके श्रेष्ठ होता मग घसरत-घसरत एकदम खाली कोसळले आहात (पतन झाले आहे). शिवालयामध्ये होता तेव्हा आत्मा किती शुद्ध होती. तर आपसामध्ये भेटून लवकरात लवकर शिवालयामध्ये जाण्याचा उपाय केला पाहिजे.

बाबांना तर आश्चर्य वाटते - मुलांना ती बुध्दी नाही! बाबा आम्हाला कुठून बाहेर काढतात! पांडव गव्हर्मेंट स्थापन करणारे बाबाच आहेत. भारत जो हेवन (स्वर्ग) होता तो आता हेल (नरक) आहे. आत्म्याची गोष्ट आहे. आत्म्यावरच दया येते. एकदम तमोप्रधान दुनियेमध्ये येऊन आत्मा बसली आहे म्हणून बाबांची आठवण करते - ‘बाबा, आम्हाला तिथे घेऊन जा’. इथे बसून देखील तुम्हाला हे विचार करत राहिले पाहिजे; म्हणून बाबा म्हणतात - मुलांकरिता फर्स्टक्लास युनिव्हर्सिटी बनवा. कल्प-कल्प बनते. तुमचे विचार खूप विशाल असले पाहिजेत. अजून तो नशा चढलेला नाही आहे. नशा असता तर माहित नाही काय करून दाखवतील. मुलांना युनिव्हर्सिटीचा अर्थ समजत नाही. त्या रॉयल्टीच्या नशेमध्ये रहात नाहीत. माया दबा धरून बसलेली आहे. बाबा समजावून सांगतात - ‘मुलांनो, स्वतःचा उलटा नशा चढवू नका. प्रत्येकाने आपले-आपले क्वालिफिकेशन (पात्रता) बघा. मी कसे शिकतो, काय मदत करतो, केवळ बोलाची कढी आणि बोलाचा भात खायचा नाही. जे बोलता ते करायचे आहे. बाता मारायच्या नाहीत की, हे करणार, ते करणार. आज म्हणाल असे करू आणि उद्या मरण आले तर संपून जाल’. सतयुगामध्ये तर असे म्हणणार नाही. तिथे कधी अकाली मृत्यू होत नाही. काळ येऊ शकत नाही. ते आहेच सुखधाम. सुखधामामध्ये काळाला येण्याचा आदेश नाही. ‘रावण राज्य’ आणि ‘राम राज्य’ याचा देखील अर्थ समजून घ्यायचा आहे. आता तुमचे युद्ध आहेच मुळी रावणाशी. देह-अभिमान देखील कमाल करतो, जो एकदम पतित बनवतो. देही-अभिमानी झाल्याने आत्मा शुद्ध बनते. तुम्ही समजता ना तिथे (सतयुगामध्ये) आपले महाल कसे बनणार ते. आता तुम्ही तर संगमावर आला आहात. नंबरवार सुधारत आहात, लायक बनत आहात. तुमची आत्मा पतित झाल्याकारणाने शरीर देखील पतित मिळालेले आहे. आता मी आलो आहे तुम्हाला स्वर्गवासी बनविण्यासाठी. आठवणी सोबतच दैवी गुण देखील पाहिजेत. काही मावशीचे घर थोडेच आहे. समजतात की, बाबा आलेले आहेत आम्हाला नरा पासून नारायण बनविण्यासाठी परंतु मायेचा छुपा विरोध खूप आहे. तुमचे युद्ध आहेच गुप्त; म्हणून तुम्हाला अननोन-वॉरियर्स (गुप्त योद्धे) म्हटले गेले आहे. गुप्त योद्धे दुसरे कोणी असतही नाहीत. तुमचेच नाव आहे वारियर्स (योद्धा). इतर सर्वांची नावे तर रजिस्टरमध्ये आहेतच. तुम्हा गुप्त योद्धयांची चिन्हे त्यांनी वापरली आहेत. तुम्ही किती गुप्त आहात, कोणालाच माहीत नाही. मायेला वश करण्याकरिता तुम्ही विश्वावर विजय प्राप्त करत आहात. तुम्ही बाबांची आठवण करता तरीही माया विसरायला लावते. कल्प-कल्प तुम्ही आपले राज्य स्थापन करता. गुप्त योद्धे तर तुम्ही आहात ज्यामुळे तुम्ही फक्त बाबांची आठवण करता. यामध्ये तुम्ही हात-पाय काहीही चालवत नाही. आठवण करण्यासाठी युक्त्या देखील बाबा भरपूर सांगतात. चालता-फिरता तुम्ही आठवणीची यात्रा करा, अभ्यास सुद्धा करा. आता तुम्ही समजता आपण काय होतो, काय बनलो आहोत. आता पुन्हा बाबा आम्हाला काय बनवत आहेत. किती सोपी युक्ती सांगतात. कुठेही राहून आठवण करा तर गंज उतरेल. कल्प-कल्प ही युक्ती देत राहतात. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा तर सतोप्रधान बनाल, दुसरे कोणतेही बंधन नाही. बाथरूममध्ये जाल तेव्हा देखील स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा तर आत्म्यावरील मळ उतरेल. आत्म्याला कोणता तिलक लावायचा नसतो, ही तर सारी भक्तिमार्गाची खूण आहे. या ज्ञान मार्गामध्ये काही करायची गरज नाही, पैशाचा देखील खर्च नाही. घरबसल्या आठवण करत रहा. किती सोपे आहे. ते बाबा आमचे पिता देखील आहेत, टीचर आणि गुरु सुद्धा आहेत.

पहिली बाबांची आठवण मग टिचरची आणि नंतर गुरूची, नियम असे सांगतो. टीचरची तर जरूर आठवण कराल, त्यांच्याकडून शिक्षणाचा वारसा मिळतो नंतर वानप्रस्थ अवस्थेमध्ये गुरु मिळतो. हे बाबा तर सर्व काही होलसेलमध्ये देऊन टाकतात. तुम्हाला २१ जन्मांसाठी राजाई होलसेलमध्ये देतात. लग्नामध्ये कन्येला हुंडा गुप्तपणे देतात ना. दिखावा करण्याची आवश्यकता नाही. म्हटले जाते ‘गुप्त दान’. शिवबाबा देखील गुप्त आहेत ना, यामध्ये अहंकाराची काही गोष्ट नाही. कोणा-कोणाला अहंकार असतो की सर्वांनी बघावे. हे आहे सर्व गुप्त. बाबा तुम्हाला विश्वाची बादशाही हुंड्यामध्ये देतात. तुमचा शृंगार किती गुप्तपणे होत आहे. किती मोठा हुंडा मिळतो. बाबा कसे युक्तीने देतात, कोणाला पत्ता सुद्धा लागत नाही. इथे तुम्ही गरीब आहात, दुसऱ्या जन्मामध्ये गोल्डन स्पून इन माऊथ असेल. तुम्ही गोल्डन दुनियेमध्ये जाता ना. तिथे सर्व काही सोन्याचे असेल. श्रीमंतांचे महाल छान जडवलेले असतील. फरक तर जरूर असेल. तुम्ही हे देखील आता समजता - माया सर्वांना उलटे लटकवून टाकते. आता बाबा आलेले आहेत तर मुलांमध्ये किती हिंमत असायला हवी. परंतु माया विसरायला लावते - बाबांचे डायरेक्शन आहे की ब्रह्माबाबांचे? भावाचे आहे की बाबांचे? यामध्येच खूप जण गोंधळतात. बाबा म्हणतात - चांगले असो अथवा वाईट असो - तुम्ही बाबांचे डायरेक्शनच समजा. त्यावर चालावे लागेल. यांची (ब्रह्माबाबांची) काही चूक जरी असली तरी बाबा निर्दोष करतील. त्यांच्यामध्ये ताकद तर आहे ना. तुम्ही बघता हे कसे चालतात, यांच्या मस्तकावर कोण बसले आहे. एकदम बाजूला बसले आहेत. गुरु लोक बाजूला बसवून शिकवतात ना. तरीही मेहनत तर यांना करावी लागते. तमोप्रधानापासून सतोप्रधान बनण्यासाठी पुरुषार्थ करावा लागतो.

बाबा म्हणतात - ‘माझी आठवण करत भोजन बनवा’. शिवबाबांच्या आठवणीमध्ये बनलेले भोजन इतर कोणाला मिळू शकणार नाही. आत्ताच्या भोजनाचेच गायन आहे. ते ब्राह्मण लोक भले स्तुती गातात परंतु अर्थ काहीच समजत नाहीत. महिमा करतात परंतु समजत काहीच नाहीत. इतके मात्र समजते की हे धार्मिक वृत्तीचे आहेत कारण पुजारी आहेत. तिथे (स्वर्गामध्ये) तर धार्मिक वृत्तीची गोष्टच नाही, तिथे भक्ति असत नाही. हे देखील कोणाला माहिती नाही आहे - भक्ति काय गोष्ट असते. म्हणत होते ज्ञान, भक्ति, वैराग्य. किती फर्स्टक्लास शब्द आहेत. ज्ञान - दिवस, भक्ति - रात्र. मग रात्री पासून वैराग्य येते तर दिवसामध्ये जातात. किती क्लियर आहे. आता तुम्हाला समजले आहे त्यामुळे तुम्हाला भक्ती मधला त्रास सहन करावा लागत नाही.

बाबा म्हणतात - ‘माझी आठवण करा, मी तुम्हाला विश्वाचा मालक बनवतो. मी तुमचा बेहदचा पिता आहे, सृष्टीचे चक्र जाणून घेणे देखील किती सोपे आहे. बीज आणि झाडाची आठवण करा. आता कलियुगाचा अंत आहे मग सतयुग येणार आहे. आता तुम्ही संगमयुगावर गुल-गुल (फूल) बनता. आत्मा सतोप्रधान बनली तर मग राहण्यासाठी देखील सतोप्रधान महाल मिळेल. दुनियाच नविन बनते. तर मुलांना किती आनंद झाला पाहिजे. अच्छा.

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) सदैव हा नशा (अभिमान) रहावा की, आम्ही श्रीमतावर आमचे परिस्तान स्थापन करत आहोत. वाह्यात कचरापट्टीच्या गोष्टींना सोडून खूप उल्हासामध्ये रहायचे आहे.

२) आपले विचार खूप विशाल ठेवायचे आहेत. खूप चांगली रॉयल युनिव्हर्सिटी आणि हॉस्टेल उघडण्याचा प्रबंध करायचा आहे. बाबांचे गुप्त मदतगार बनायचे आहे, आपला शो करायचा नाही.

वरदान:-
निमित्त कोणतीही सेवा करत बेहदच्या वृत्ती द्वारे व्हायब्रेशन पसरविणारे बेहद सेवाधारी भव

आता बेहद परिवर्तनाच्या सेवेमध्ये तीव्र गति आणा. असे तर करत नाही आहात ना की, इतके बिझी असतो जो वेळच मिळत नाही. परंतु निमित्त कोणतीही सेवा करत बेहदचे सहयोगी बनू शकता, फक्त वृत्ति बेहदमध्ये असावी तर व्हायब्रेशन पसरत राहतील. जितके बेहदमध्ये बिझी रहाल तर जी ड्युटी आहे ती अजूनच सहज होईल. प्रत्येक संकल्पामधून, प्रत्येक सेकंदाला श्रेष्ठ व्हायब्रेशन पसरविण्याची सेवा करणे म्हणजेच बेहद सेवाधारी बनणे आहे.

बोधवाक्य:-
शिवबाबांसोबत कंबाइंड राहणाऱ्या शिवशक्तींचा शृंगार आहे - ज्ञानाची अस्त्र-शस्त्रे.