28-02-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुम्ही ईश्वरीय संप्रदाय आहात, तुम्हाला ज्ञान सूर्य बाबा भेटले आहेत, आता तुम्ही जागे झाला आहात तर इतरांना देखील जागे करा”

प्रश्न:-
अनेक प्रकारच्या टकरावाचे कारण तथा त्याचे निवारण काय आहे?

उत्तर:-
जेव्हा देह-अभिमानामध्ये येता तर अनेक प्रकारचे टकराव होतात. मायेची ग्रहचारी बसते. बाबा म्हणतात - देही-अभिमानी बना, सेवेमध्ये लागा. आठवणीच्या यात्रेमध्ये रहा तर ग्रहचारी नष्ट होईल.

ओम शांती।
बाबा, रुहानी मुलांकडे आले आहेत श्रीमत देण्याकरिता अथवा समजावून सांगण्याकरिता. हे तर मुलांना समजले आहे की ड्रामा प्लॅन अनुसार सर्व कार्य होणार आहे. आता थोडा वेळ बाकी आहे. या भारताला रावणपुरीपासून पुन्हा विष्णुपुरी बनवायचे आहे. आता बाबा सुद्धा गुप्त आहेत, शिक्षणही गुप्त आहे. सेंटर्स तर भरपूर आहेत, लहान-मोठ्या गावांमध्ये लहान-मोठी सेंटर्स आहेत आणि मुलेही पुष्कळ आहेत. आता मुलांनी चॅलेंज तर दिले आहे आणि लिहायचे देखील आहे, जेव्हा एखादे लिटरेचर (पुस्तक) बनवायचे असेल तेव्हा त्यामध्ये लिहायचे आहे - ‘आम्ही या आमच्या भारतभूमीला स्वर्ग बनवूनच सोडणार’. तुम्हाला देखील तुमची भारतभूमी खूप प्रिय आहे कारण तुम्ही जाणता की हा भारतच स्वर्ग होता, याला ५ हजार वर्षे झाली आहेत. भारत सौंदर्याने नटलेला होता, याला स्वर्ग म्हटले जाते. तुम्हा ब्रह्मा मुखवंशावळींनाच हे नॉलेज आहे. या भारताला श्रीमतवर आपल्याला स्वर्ग जरूर बनवायचे आहे. सर्वांना रस्ता सांगायचा आहे, अजून कोणती कटकटीची गोष्टच नाही. एकत्र बसून आपसात विचारविनिमय केला पाहिजे की या प्रदर्शनीच्या चित्रांद्वारे आपण अशी कोणती जाहिरात करावी, ज्यामुळे वर्तमानपत्रातही चित्रे छापायला देता येतील, यावर आपसात चर्चासत्र आयोजित केले पाहिजे. जसे गव्हर्नमेंटचे लोक आपसामध्ये भेटतात, सल्लामसलत करतात की भारताला आपण कसे सुधारावे? हे जे एवढे मतभेद झाले आहेत, त्यांना आपसात एकत्र येऊन कसे ठीक करता येईल आणि भारतामध्ये शांती, सुख कसे स्थापन करता येईल! त्या गव्हर्नमेंटचाही पुरुषार्थ चालतो. तुम्ही देखील पांडव गव्हर्नमेंट म्हणून गायले गेले आहात. हे खूप मोठे ईश्वरीय गव्हर्नमेंट आहे, खरेतर याला म्हटले जाते - पावन ईश्वरीय गव्हर्नमेंट, पतित-पावन बाबाच पतित मुलांना बसून पावन दुनियेचा मालक बनवतात. हे मुलेच जाणतात. मुख्य आहेच भारताचा आदि सनातन देवी-देवता धर्म. मुले हे देखील जाणतात की हा आहे रुद्र ज्ञान यज्ञ. रुद्र म्हटलेच जाते ईश्वर-पित्याला, शिवाला. गायले गेले आहे की, बरोबर बाबांनी येऊन रुद्र ज्ञान यज्ञ रचला होता. त्यांनी तर खूपच प्रदीर्घ काळ दिला आहे. अज्ञानाच्या झोपेमध्ये झोपलेले आहेत. आता तुम्हाला बाबांनी जागे केले आहे, तुम्हाला मग इतरांनाही जागे करायचे आहे. ड्रामा प्लॅन अनुसार तुम्ही जागे करत राहता. या वेळेपर्यंत ज्याने जसा-जसा, जितका-जितका पुरुषार्थ केला आहे, तितकाच कल्पापूर्वी सुद्धा केला होता. होय, युद्धाच्या मैदानामध्ये चढ-उतार तर असतातच. कधी माया वरचढ ठरते, तर कधी ईश्वरीय संतान वरचढ होतो. कधी-कधी सेवा खूप चांगल्या प्रकारे वेगाने होते. कधी काही ठिकाणी मुलांमध्ये मायेची विघ्ने येतात. माया एकदम बेशुद्ध करून टाकते. लढाईचे मैदान तर आहे ना. रावण माया रामाच्या मुलांना बेशुद्ध करून टाकते. लक्ष्मणाच्या बाबतीत देखील एक कथा आहे ना.

तुम्ही म्हणता की सर्व मनुष्य कुंभकर्णाच्या झोपेमध्ये झोपलेले आहेत. तुम्ही ईश्वरीय संप्रदायीच असे म्हणता, ज्यांना ज्ञान सूर्य भेटला आहे आणि जे जागे झाले आहेत, तेच याला समजतील. यामध्ये एकमेकांना सांगण्याची देखील काहीच गरज नाही. तुम्ही जाणता की खरोखर आम्ही ईश्वरीय संप्रदायी जागे झालो आहोत. बाकी सर्वजण अजूनही झोपलेले आहेत. ते हे जाणत नाहीत की परमपिता परमात्मा, मुलांना वारसा देण्यासाठी आलेले आहेत. हे पूर्णपणे विसरून गेले आहेत. बाबा भारतामध्येच येतात. येऊन भारताला स्वर्गाचा मालक बनवतात. भारत स्वर्गाचा मालक होता, यामध्ये काहीच शंका नाही. परमपिता परमात्म्याचा जन्म देखील इथेच होतो. शिवजयंती साजरी करतात ना. जरूर त्यांनी येऊन काहीतरी केले असेल ना. बुद्धी सांगते की जरूर येऊन स्वर्गाची स्थापना केली असेल. प्रेरणेने थोडीच स्थापना होईल. इथे तर तुम्हा मुलांना राजयोग शिकवला जातो. आठवणीची यात्रा सांगितली जाते. प्रेरणेने कोणताही आवाज होतच नाही. समजतात की शंकराची देखील प्रेरणा होते तेव्हा ते यादव मुसळ (मिसाईल्स) इत्यादी बनवतात. परंतु यामध्ये प्रेरणेची तर कोणती गोष्टच नाही आहे. तुम्ही समजला आहात की त्यांचा पार्ट आहे ड्रामामध्ये ही मुसळ (मिसाईल्स) इत्यादी बनविण्याचा. प्रेरणेची गोष्टच नाही. ड्रामा अनुसार विनाश तर जरूर व्हायचाच आहे. गायले गेले आहे - महाभारत लढाईमध्ये मिसाईल्स कामाला आले. तर जो भूतकाळ होऊन गेला आहे तो पुन्हा रिपीट होईल.

तुम्ही गॅरंटी देता की आम्ही भारतामध्ये स्वर्ग स्थापन करू, जिथे एकच धर्म असेल. तुम्ही असे लिहीत नाही की अनेक धर्म विनाश होतील. ते तर चित्रामध्येच लिहिलेले आहे - स्वर्गाची स्थापना होते तेव्हा दुसरा कोणताही धर्म नसतो. आता तुम्हाला हे लक्षात येत आहे. सर्वात मोठा पार्ट शिवाचा, ब्रह्माचा आणि विष्णूचा आहे. ब्रह्मा सो विष्णू, विष्णू सो ब्रह्मा - या तर अतिशय गुह्य गोष्टी आहेत. विष्णूपासून ब्रह्मा कसे बनतात, ब्रह्मापासून मग परत विष्णू कसे बनतात, हे हुशार मुलांच्या लगेच लक्षात येते. दैवी संप्रदायाचे तर बनतातच. कोणा एकाची गोष्ट नाहीये. या गोष्टींना तुम्ही मुले समजता. दुनियेमध्ये हे एकही मनुष्य समजत नाही. भले लक्ष्मी-नारायण अथवा विष्णूची पूजा देखील करतात परंतु त्यांना हे माहित नाही आहे की, विष्णूचीच दोन रूपे लक्ष्मी-नारायण आहेत, जे नवीन दुनियेमध्ये राज्य करतात. बाकी ४ भूजावाला कोणताही मनुष्य नसतो. हे सूक्ष्मवतनमध्ये प्रवृत्ती मार्गाचे एम-ऑब्जेक्ट दाखवतात. या साऱ्या दुनियेचा इतिहास-भूगोल कसा फिरतो, हे कोणीही जाणत नाही. बाबांनाच जाणत नाहीत तर बाबांच्या रचनेला कसे जाणू शकतील. बाबाच रचनेच्या आदि-मध्य-अंताचे नॉलेज सांगतात, ऋषी-मुनी देखील म्हणत होते की, ‘आम्ही जाणत नाही’. बाबांना जाणले असते तर रचनेच्या आदि-मध्य-अंतालाही जाणले असते. बाबा म्हणतात - ‘मी एकदाच येऊन तुम्हा मुलांना देखील सर्व नॉलेज समजावून सांगतो त्यानंतर मी येतच नाही. तर रचता आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताला जाणणार तरी कसे?’ बाबा स्वतः म्हणतात – मी संगमयुगाव्यतिरिक्त बाकी कधीही येतच नाही. मला बोलावतात देखील संगमावरच. ‘पावन’, सतयुगाला म्हटले जाते, ‘पतित’, कलियुगाला म्हटले जाते. तर जरूर मी पतित दुनियेच्या अंतालाच येणार ना. कलियुगाच्या अंताला येऊन पतितापासून पावन बनवतात. सतयुगाच्या सुरुवातीला पावन आहेत, ही तर सोपी गोष्ट आहे ना. मनुष्य काहीच समजू शकत नाहीत की पतित-पावन बाबा कधी येतील. आता तर कलियुगाचा अंत म्हणणार. जर म्हणतात कलियुगाला अजून ४० हजार वर्षे बाकी आहेत तर अजून किती पतित बनतील! किती दुःख होईल! सुख तर असणारच नाही. काहीच माहित नसल्याकारणाने अगदीच घोर अंधारामध्ये आहेत. तुम्ही हे समजू शकता. तर मुलांनी आपसात भेटले पाहिजे. चित्रांवर चांगल्या प्रकारे समजावून सांगावे लागेल. ही देखील ड्रामा अनुसार चित्र इत्यादी सर्व बनवली आहेत. मुले समजतात - जो वेळ निघून जातो, हुबेहूब ड्रामा चालत राहतो. मुलांच्या अवस्था देखील कधी खाली, कधी वर होत राहतील. नीट समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. कधी-कधी ग्रहचारी येऊन बसते, तर तीला नाहीसे करण्यासाठी किती प्रयत्न करतात.

​​बाबा वारंवार सांगतात - मुलांनो, तुम्ही देह-अभिमानामध्ये येता म्हणूनच टक्कर होते, यामध्ये देही-अभिमानी बनावे लागेल. मुलांमध्ये देह-अभिमान खूप आहे. तुम्ही देही-अभिमानी बना तर बाबांची आठवण राहील आणि सेवेमध्ये प्रगती करत रहाल. उच्च पद ज्यांना मिळवायचे आहे ते सदैव सेवेमध्ये मग्न राहतील. नशिबात नसेल तर मग तदबीर (पुरुषार्थ) सुद्धा होणार नाही. स्वतः म्हणतात - ‘बाबा, आम्हाला धारणा होत नाही, बुद्धीमध्ये ज्ञान टिकत नाही’. ज्यांना धारणा होते तर त्यांना आनंद देखील खूप होतो. समजतात की, शिवबाबा आलेले आहेत, आता बाबा म्हणतात - ‘मुलांनो, तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घेऊन मग इतरांना समजावून सांगा’. काहीजण तर सेवेमध्येच मग्न राहतात. पुरुषार्थ करत राहतात. हे देखील मुले जाणतात की जो सेकंद होऊन जातो, तो ड्रामामध्ये नोंदलेला आहे पुन्हा तसाच रिपीट होईल. मुलांना समजावून सांगितले जाते, बाहेर भाषण इत्यादी ऐकण्यासाठी तर अनेक प्रकारची नवीन लोकं येतात. तुम्ही समजता की गीता-वेद-शास्त्र इत्यादींवर कितीतरी मनुष्य भाषण करतात, त्यांना हे थोडेच माहित आहे की इथे ईश्वर आपला आणि आपल्या रचनेच्या आदि-मध्य-अंताचे रहस्य समजावून सांगत आहेत. रचयिताच येऊन सर्व ज्ञान ऐकवतात. त्रिकालदर्शी बनवणे, हे बाबांचेच काम आहे. शास्त्रांमध्ये या गोष्टीच दिलेल्या नाहीत. या नवीन गोष्टी आहेत. बाबा वारंवार समजावून सांगतात की कुठेही सर्वप्रथम हे समजावून सांगा की गीतेचा भगवान कोण आहे - श्रीकृष्ण आहे की निराकार शिव आहेत? या गोष्टी तुम्ही प्रोजेक्टरवर समजावून सांगू शकणार नाही. प्रदर्शनीमध्ये चित्र समोर ठेवलेले असते, त्यावर समजावून सांगून मग तुम्ही विचारू शकता की, ‘आता सांगा गीतेचा भगवान कोण? ज्ञान सागर कोण आहेत? श्रीकृष्णाला तर म्हणू शकत नाही. पवित्रता, सुख-शांतीचा सागर, लिबरेटर, गाईड कोण आहे?’ सर्वात आधी तर हे लिहून घेतले पाहिजे, फॉर्म भरून घेतला पाहिजे आणि मग सर्वांकडून सही सुद्धा घेतली पाहिजे.

(पक्ष्यांचा आवाज झाला) बघा किती भांडत आहेत. यावेळी साऱ्या दुनियेमध्ये भांडण-तंटाच आहे. मनुष्य देखील आपापसात भांडत रहातात. मनुष्यामध्येच समजण्याची बुद्धी आहे. ५ विकार देखील मनुष्यामध्येच गायले जातात. पशूंची तर गोष्टच नाही. हे आहे विशश वर्ल्ड (विकारी दुनिया). दुनिया मनुष्यांसाठीच म्हटले जाते. कलियुगामध्ये आहे - आसुरी संप्रदाय, सतयुगामध्ये आहे - दैवी संप्रदाय. आता तुम्हाला या सर्व कान्ट्रास्ट विषयी (विरोधाभासा विषयी) माहिती आहे. तुम्ही सिद्ध करून सांगू शकता. शिडीच्या चित्रामध्ये देखील अगदी क्लियर दाखवलेले आहे. खाली आहेत पतित, वर आहेत पावन. यामध्ये खूप क्लियर आहे. शिडीच मुख्य आहे - उतरती कला आणि चढती कला. हे शिडीचे खूप अतिशय चांगले आहे, यामध्ये असे काय टाकावे की जेणेकरून मनुष्य अगदी चांगल्या प्रकारे समजेल की, खरोखर ही पतित दुनिया आहे, पावन दुनिया स्वर्ग होती. इथे सर्व पतित आहेत, एकही पावन असू शकत नाही. रात्रं-दिवस हेच विचार चालले पाहिजेत. आत्म प्रकाश बच्चा लिहितो (आत्मप्रकाश भाईजी लिहितात) - ‘बाबा, हे चित्र बनवू का?’ बाबा म्हणतात - ‘भले विचार सागर मंथन करून कोणतेही चित्र बनव, परंतु शिडीचे चित्र खूप चांगले बनले पाहिजे’. यावर खूप ज्ञान समजावून सांगू शकता. ८४ जन्म पूर्ण करून पुन्हा पहिला जन्म घेतला आहे आणि मग उतरत्या कलेमधून चढत्या कलेमध्ये जावे लागेल, यामध्ये प्रत्येकाचा विचार चालला पाहिजे. नाहीतर सेवा कशी करू शकणार. चित्रांवर समजावून सांगणे खूप सोपे होते. सतयुगा नंतर शिडी उतरायची असते. हे देखील मुले जाणतात - आपण पार्टधारी ॲक्टर्स आहोत. इथून ट्रान्सफर होऊन थेट सतयुगामध्ये जात नाही, आधी शांतीधाम मध्ये जायचे आहे. हो तुमच्यामध्ये सुद्धा नंबरवार आहेत जे या ड्रामामध्ये स्वतःला पार्टधारी समजतात. दुनियेमध्ये असे कोणीही म्हणू शकणार नाही की, आम्ही पार्टधारी आहोत. आपण लिहितो देखील की, पार्टधारी ॲक्टर असून सुद्धा ड्रामाच्या क्रियेटर, डायरेक्टरला आणि आदि-मध्य-अंताला जाणू शकत नसेल तर तो एक नंबरचा बुद्धू आहे. हे तर भगवानुवाच आहे. शिव भगवानुवाच ब्रह्मा तना द्वारे. ज्ञानसागर ते निराकार आहेत, त्यांना स्वतःचे शरीर नाही आहे. समजून घेण्याच्या खूप चांगल्या युक्त्या आहेत. तुम्हा मुलांना खूप नशा असला पाहिजे, आपण कोणाची निंदा थोडीच करतो. ही तर राईट गोष्ट आहे ना. ज्याकोणी मोठ-मोठ्या व्यक्ती आहेत त्या सर्वांची चित्रे तुम्ही टाकू शकता. शिडी कोणालाही दाखवू शकता. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) भारतामध्ये सुख-शांतीची स्थापना करण्यासाठी किंवा भारताला स्वर्ग बनविण्यासाठी आपापसात सेमिनार (चर्चासत्रे) आयोजित करायची आहेत, श्रीमतावर भारताची अशी सेवा करायची आहे.

२) सेवेमध्ये प्रगती करण्यासाठी किंवा सेवेद्वारे उच्च पद प्राप्त करण्यासाठी देही-अभिमानी होऊन राहण्याची मेहनत करायची आहे. ज्ञानाचे विचार सागर मंथन करायचे आहे.

वरदान:-
पवित्रतेच्या आधारावर सुख-शांतीचा अनुभव करणारे नंबर वन अधिकारी भव

जी मुले "पवित्रतेच्या" प्रतिज्ञेला कायम लक्षात ठेवतात, त्यांना सुख-शांतीची अनुभूती आपोआप होते. पवित्रतेचा अधिकार घेण्यामध्ये नंबर वन राहणे अर्थात सर्व प्राप्तींमध्ये नंबर वन बनणे आहे; त्यामुळे पवित्रतेच्या फाउंडेशनला कधीही कमजोर करू नका तेव्हाच लास्ट सो फास्ट जाल. सदैव याच धर्मामध्ये स्थित रहाल की, काहीही होऊ देत, भले व्यक्ती असो, नाहीतर प्रकृती असो, किंवा परिस्थिती कितीही हलवू देत, परंतु ‘धरत परिये धर्म न छोडिये’ (धरा सुटली तरी धर्म सोडू नका).

बोधवाक्य:-
व्यर्थ पासून इनोसंट बना म्हणजे मग खरेखरे सेंट (संत) बनाल.

हे अव्यक्त इशारे:- एकता आणि विश्वासाच्या विशेषतेद्वारे सफलता संपन्न बना.

बापदादांची इच्छा आहे की प्रत्येक मुलाने एकरस श्रेष्ठ स्थितीचा आसनधारी, एकांतवासी, अशरीरी, एकता स्थापक, एकनामी आणि इकॉनॉमीचा अवतार बनावे. एकमेकांच्या विचारांना समजून घेऊन सन्मान द्यावा, एकमेकांना इशारा द्यावा, देवाण-घेवाण करून आपसातील संघटनच्या शक्तीचे स्वरूप प्रत्यक्ष करावे कारण तुमच्या संघटनाच्या एकतेची शक्ती संपूर्ण ब्राह्मण परिवाराला संघटनेमध्ये आणण्यासाठी निमित्त बनेल.