28-03-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - तुम्ही खूप भाग्यवान आहात कारण तुम्हाला बाबांच्या आठवणी शिवाय इतर
कोणतीही काळजी नाही, या बाबांचे (ब्रह्मा बाबांचे) तर तरीही खूप विचार चालतात”
प्रश्न:-
बाबांकडे जी
सपूत मुले आहेत, त्यांची लक्षणे काय असतील?
उत्तर:-
ते, सर्वांचा बुद्धियोग बाबांशी जोडत राहतील, सेवाभावी असतील. चांगल्या रीतीने
शिकून इतरांनाही शिकवतील. बाबांच्या हृदयामध्ये स्थान मिळवलेले असतील. अशी सपूत
मुलेच बाबांचे नाव मोठे करतात. जे पूर्ण शिकत नाहीत ते इतरांनाही खराब करतात. हे
देखील ड्रामामध्ये नोंदलेले आहे.
गीत:-
ले लो दुआयें
मॉं-बाप की...
ओम शांती।
प्रत्येक घरामध्ये आई-वडील आणि २-४ मुले असतात मग आशीर्वाद इत्यादी मागतात. ती तर
हदची गोष्ट आहे. हे हदसाठी गायले गेले आहे. बेहद विषयी कोणालाच माहिती नाही आहे. आता
तुम्ही मुले जाणता आपण बेहदच्या पित्याची मुले आहोत. ते माता-पिता असतात हदचे, ‘ले
लो दुआयें हद के मात-पिता की’. हे आहेत बेहदचे माता-पिता. ते हदचे माता-पिता देखील
मुलांना सांभाळतात आणि मग टीचर शिकवतात. आता तुम्ही मुले जाणता - हे आहेत - बेहदचे
माता-पिता, बेहदचे टीचर, बेहदचे सद्गुरु, सुप्रीम फादर, टीचर, सुप्रीम गुरू. सत्य
बोलणारे, सत्य शिकविणारे. मुलांमध्ये नंबरवार तर असतात ना. लौकिक घरामध्ये २-४ मुले
असतात तर त्यांची किती काळजी घ्यावी लागते. इथे किती असंख्य मुले आहेत, किती सेंटर
वरून मुलांचे समाचार येतात - हा मुलगा असा आहे, हा खोडसाळपणा करतो, हा हैराण करतो,
विघ्न आणतो. चिंता तर या बाबांना वाटेलच ना. प्रजापिता तर हे आहेत ना; असंख्य
मुलांचा विचार करावा लागतो, तेव्हाच तर बाबा म्हणतात - तुम्ही मुले चांगल्या रीतीने
बाबांच्या आठवणीमध्ये राहू शकता. यांना तर हजारो चिंता आहेत. एक चिंता तर आहेच.
अजून दुसरेही हजारो विचार असतात. किती असंख्य मुलांना सांभाळावे लागते. माया देखील
खूप मोठी शत्रू आहे ना. कोणा-कोणाची तर व्यवस्थित चामडीच लोळवते. कोणाच्या नाकाला
पकडते, कोणाच्या शेंडीला पकडते. इतक्या सर्वांचा विचार तर करावा लागतो. तरी देखील
बेहदच्या बाबांच्या आठवणीमध्ये रहावे लागते. तुम्ही आहात बेहदच्या बाबांची मुले.
जाणता आपण बाबांच्या श्रीमतावर चालून का नाही बाबांकडून पूर्ण वारसा घ्यायचा. सगळेच
काही एकरस चालू शकणार नाहीत कारण ही राजाई स्थापन होत आहे, दुसऱ्या कोणाच्या
बुद्धीमध्ये सुद्धा येऊ शकणार नाही. हे आहे खूप उच्च शिक्षण. बादशाही मिळाली की मग
माहित होत नाही की ही राजाई कशी स्थापन झाली. ही राजाई स्थापन होणे खूप वंडरफुल आहे.
आता तुम्ही अनुभवी आहात. अगोदर यांना (ब्रह्मा बाबांना) देखील थोडेच माहीत होते की
आपण कोण होतो, कसे ८४ जन्म घेतले. आता समजले आहे; तुम्ही देखील म्हणता - बाबा,
तुम्ही तेच आहात, ही व्यवस्थित समजून घेण्याची गोष्ट आहे. यावेळीच बाबा येऊन सर्व
गोष्टी समजावून सांगतात. यावेळी भले कोणी कितीही लखपती असेल, करोडपती असेल, बाबा
म्हणतात - हे पैसे इत्यादी सर्व मातीमध्ये मिसळून जाणार आहे. कितीसा वेळ बाकी आहे.
दुनियेचे समाचार तुम्ही रेडिओ मधून किंवा वर्तमानपत्रांमधून ऐकता - काय-काय होत आहे.
दिवसें-दिवस संघर्ष खूप वाढत चालला आहे. गुंता वाढतच राहतो. सर्व आपसामध्ये
भांडण-मारामाऱ्या करून मरतात. तयारी अशी होत आहे, ज्यावरून लक्षात येते युद्ध सुरू
झाले की झाले. दुनिया जाणत नाही की हे काय होत आहे, काय होणार आहे! तुमच्यामध्ये
देखील असे फार थोडेजण आहेत जे पूर्णपणे समजतात आणि आनंदामध्ये राहतात. या
दुनियेमध्ये आपण बाकी थोडे दिवस आहोत. आता आपल्याला कर्मातीत अवस्थेमध्ये जायचे आहे.
प्रत्येकाला स्वतःसाठी पुरुषार्थ करायचा आहे. तुम्ही तर पुरुषार्थ करता स्वतःसाठी.
जितके जे करतील तितके फळ प्राप्त करतील. आपला पुरुषार्थ करायचा आहे आणि इतरांकडूनही
पुरुषार्थ करवून घ्यायचा आहे. रस्ता सांगायचा आहे. ही जुनी दुनिया नष्ट होणार आहे.
आता बाबा आले आहेत नवीन दुनिया स्थापन करण्यासाठी, तर या विनाशाच्या अगोदर तुम्ही
नवीन दुनियेसाठी हे शिक्षण घ्या. भगवानुवाच - मी तुम्हाला राजयोग शिकवितो. लाडक्या
मुलांनो, तुम्ही भक्ती खूप केली आहे. अर्धा कल्प तुम्ही रावण राज्यामध्ये होता ना.
हे देखील कोणाला माहित नाही आहे की राम कोणाला म्हटले जाते? राम राज्याची स्थापना
कशी झाली? हे सर्व तुम्ही ब्राह्मणच जाणता. तुमच्यामध्ये देखील कोणी तर असेही आहेत
जे काहीच जाणत नाहीत.
बाबांकडे सपूत मुले
ती आहेत जी सर्वांचा बुद्धियोग एका बाबांसोबत जोडतात. जे सेवाभावी आहेत, जे चांगल्या
रीतीने शिकतात त्यांनी बाबांच्या हृदयामध्ये स्थान मिळविले आहे. कोणी तर मग न-लायक
देखील असतात, जे मग सर्व्हीस करण्या ऐवजी डिस-सर्व्हीस करतात, बाबांपासून त्यांचा
बुद्धियोग तोडून टाकतात. हे देखील ड्रामामध्ये नोंदलेले आहे. ड्रामा अनुसार हे
होणारच आहे. जे नीट अभ्यास करत नाहीत ते अजून करतील तरी काय? इतरांना देखील खराब
करतील; म्हणून मुलांना समजावून सांगितले जाते की, बाबांना फालो करा आणि जी सेवाभावी
मुले आहेत, बाबांच्या हृदयामध्ये स्थान मिळवले आहे त्यांची संगत धरा. तुम्ही विचारू
शकता - बाबा, कोणाची संगत करु? बाबा लगेच सांगतील की, यांची संगत खूप चांगली आहे.
असे बरेच आहेत जे संगतच अशी करतात, ज्याचा रंगच उलटा चढतो. गायले देखील जाते - ‘संग
तारे कुसंग बोरे’. वाईट संगत लागली तर एकदम नष्टच करतात. घरामध्ये देखील दास-दासी
पाहिजेत. प्रजेला देखील नोकर-चाकर सर्व हवेत ना. ही सर्व राजधानी स्थापन होत आहे,
यामध्ये अतिशय विशाल बुद्धी पाहिजे; त्यामुळे बेहदचे बाबा मिळाले आहेत तर श्रीमत
घेऊन त्याप्रमाणे चाला. नाही तर फुकटचे पदभ्रष्ट व्हाल. हे शिक्षण आहे यामध्ये आता
जर नापास झालात तर जन्म-जन्मांतर कल्प-कल्पांतर नापास होत रहाल. चांगल्या रीतीने
शिकाल तर कल्प-कल्पांतर चांगल्या रीतीने शिकत रहाल. समजून येते, हे नीट अभ्यास करत
नाहीत, तर काय पद मिळेल? स्वतः देखील समजतात, मी सेवा तर काहीच करत नाही,
माझ्यापेक्षाही हुशार तर खूप आहेत; हुशार असणाऱ्यांनाच भाषणासाठी बोलावतात. तर जरूर
जे हुशार आहेत, उच्च पद देखील तेच प्राप्त करतील. आपण इतकी सेवा करत नाही तर उच्च
पद प्राप्त करू शकणार नाही. टीचर तर स्टुडंटला देखील ओळखू शकतात ना. रोज शिकवतात,
त्यांच्याकडे रजिस्टर असते. अभ्यासाचे आणि वर्तणुकीचे देखील रजिस्टर असते. इथे
देखील असेच आहे, यामध्ये मग मुख्य आहे योगाची गोष्ट. योग चांगला असेल तर वर्तन
देखील चांगले असेल. अभ्यासामध्ये मग कुठेतरी अहंकार येतो, यामध्ये सर्व गुप्त मेहनत
करायची आहे - आठवणीची; म्हणूनच बऱ्याच जणांचे रिपोर्ट येतात की बाबा, आम्ही
योगामध्ये राहू शकत नाही. बाबांनी समजावून सांगितले आहे - ‘योग’ शब्द काढून टाका.
बाबा, ज्यांच्याकडून वारसा मिळतो, त्यांची तुम्ही आठवण करू शकत नाही! आश्चर्य आहे.
बाबा म्हणतात - ‘हे आत्म्यांनो, तुम्ही मज पित्याची आठवण करत नाही, मी तुम्हाला
रस्ता सांगण्यासाठी आलो आहे, तुम्ही माझी आठवण करा तर या योग अग्नीद्वारे पापे भस्म
होतील’. भक्तिमार्गामध्ये लोक किती दगदग सहन करून जातात. कुंभमेळ्यामध्ये किती थंड
पाण्यामध्ये जाऊन स्नान करतात. किती त्रास सहन करतात. इथे तर काही त्रासच नाही. जी
फर्स्टक्लास मुले आहेत ती एका माशुकची खरी-खरी आशिक बनून आठवण करत राहतील.
हिंडण्या-फिरण्यासाठी जातात तर बगीच्यामध्ये एकांतामध्ये बसून आठवण करतील.
झरमुई-झगमुई (परचिंतनाच्या) गप्पा इत्यादी करत राहिल्याने वायुमंडळ खराब होते
त्यामुळे जितका वेळ मिळेल बाबांची आठवण करण्याची प्रॅक्टिस करा. फर्स्टक्लास खऱ्या
माशुकचे आशिक बना. बाबा म्हणतात देहधारीचा फोटो ठेवू नका. फक्त एका शिवबाबांचा फोटो
ठेवा, ज्यांची आठवण करायची आहे. जर समजा सृष्टीचक्राला देखील आठवण करता तरीही
त्रिमूर्ती आणि गोळ्याचे चित्र फर्स्ट क्लास आहे, यामध्ये सारे ज्ञान आहे.
‘स्वदर्शन चक्रधारी’ हे तुमचे नाव अर्थासहित आहे. कोणीही नवीन व्यक्ती हे नाव ऐकेल
तर तिला समजू देखील शकणार नाही, हे तुम्ही मुलेच समजता. तुमच्यामध्ये देखील कोणी
चांगल्या रीतीने आठवण करतात. असे बरेचजण आहेत जे आठवणच करत नाहीत. आपलेच जीवन बरबाद
करतात. अभ्यास तर खूप सोपा आहे. बाबा म्हणतात - तुम्हाला साइलेन्सद्वारे सायन्सवर
विजय प्राप्त करायचा आहे. सायलेन्स आणि सायन्स राशी एकच आहे. मिलेट्रीमध्ये देखील ३
मिनिटे सायलेन्स करवून घेतात. लोकांना देखील वाटते आम्हाला शांती मिळावी. आता तुम्ही
जाणता शांतीचे स्थान तर आहेच ब्रह्मांड. ज्या ब्रह्म महतत्त्वामध्ये आपण आत्मा इतकी
छोटी बिंदू राहतो. ते सर्व आत्म्यांचे झाड तर वंडरफुल असेल ना. मनुष्य म्हणतात
देखील - ‘भृकुटी के बीच चमकता है अजब सितारा’. अतिशय बारीक सोन्याचा टिळा बनवून इथे
लावतात. आत्मा देखील बिंदू आहे, बाबा देखील त्यांच्या बाजूला येऊन बसतात. साधु-संत
इत्यादी कोणीही आपल्या आत्म्याला जाणत नाही. जर आत्म्यालाच जाणत नाहीत तर
परमात्म्याला तरी कसे जाणू शकतील? फक्त तुम्ही ब्राह्मणच आत्मा आणि परमात्म्याला
जाणता. कोणत्याही धर्माचा हे जाणू शकत नाही. आता तुम्हीच जाणता, कशी इतकी छोटीशी
आत्मा सारा पार्ट बजावते. सतसंग तर खूप करतात, समजत काहीच नाही. यांनी (ब्रह्मा
बाबांनी) देखील खूप गुरु केले. आता बाबा म्हणतात - हे सगळे आहेत भक्तिमार्गाचे गुरु.
ज्ञान मार्गाचा गुरु आहेच मुळी एक. डबल सिरताज राजांसमोर सिंगल ताजवाले राजे माथा
झुकवतात, नमन करतात कारण ते पवित्र आहेत. त्या पवित्र राजांचीच मंदिरे बनलेली आहेत.
पतित जाऊन त्यांच्यासमोर डोके टेकवतात परंतु त्यांना काही हे थोडेच माहिती आहे की
हे कोण आहेत, आपण डोके का टेकवतो? सोमनाथाचे मंदिर बनवले, आणि आता पूजा तर करतात
परंतु बिंदूची पूजा कशी करावी? बिंदूचे मंदिर कसे बनणार? या आहेत अति गूढ गोष्टी.
गीता इत्यादी मध्ये थोड्याच या गोष्टी आहेत. जे स्वतः मालक आहेत, तेच समजावून
सांगतात. तुम्ही आता जाणता की, कसा इतक्या छोट्याशा आत्म्यामध्ये पार्ट नोंदलेला आहे.
आत्मा देखील अविनाशी आहे, पार्ट देखील अविनाशी आहे. वंडर आहे ना. हा सर्व
पूर्व-नियोजित खेळ आहे. म्हणतात देखील - ‘बनी बनाई बन रही…’ ड्रामामध्ये जे नोंदलेले
आहे, ते तर जरूर होणार. चिंतेचा प्रश्नच नाही.
तुम्हा मुलांनी आता
आपणच आपल्याशी प्रतिज्ञा करायची आहे की, काहीही झाले तरी अश्रू ढाळणार नाही. अमका
मेला, आत्म्याने जाऊन दुसरे शरीर घेतले, मग रडण्याची काय गरज आहे? परत तर येऊ शकत
नाही. अश्रू आले - नापास झाले; म्हणून बाबा म्हणतात - प्रतिज्ञा करा की, आम्ही कधीही
रडणार नाही. ‘चिंता होती पार ब्रह्ममध्ये राहणाऱ्या बाबांची, ते मिळाले तर बाकी काय
पाहिजे’. बाबा म्हणतात - तुम्ही मज पित्याची आठवण करा. मी एकदाच येतो - ही राजधानी
स्थापन करण्यासाठी, यामध्ये युद्ध इत्यादीचा काही प्रश्नच नाही. गीतेमध्ये दाखवले
आहे युद्ध झाले, फक्त पांडव वाचले. ते कुत्र्याला सोबत घेऊन पर्वतावर गतप्राण झाले.
विजय प्राप्त केला आणि मरून गेले. कोणतीच गोष्ट जुळून येत नाही. या सर्व आहेत दंतकथा.
याला म्हटले जाते भक्तिमार्ग.
बाबा म्हणतात - तुम्हा
मुलांना यापासून वैराग्य आले पाहिजे. जुन्या वस्तूचा तिरस्कार वाटतो ना. ‘तिरस्कार’
शब्द कठोर आहे. ‘वैराग्य’ शब्द गोड आहे. जेव्हा ज्ञान मिळते तेव्हा मग भक्तीचे
वैराग्य येते. सतयुग-त्रेतामध्ये तर ज्ञानाचे प्रारब्ध मग २१ जन्मांकरिता मिळते.
तिथे ज्ञानाची गरज राहत नाही. मग जेव्हा तुम्ही वाममार्गामध्ये जाता तर शिडी उतरता.
आता आहे अंत. बाबा म्हणतात - आता या जुन्या दुनियेपासून तुम्हा मुलांना वैराग्य
येणार आहे. तुम्ही आता शूद्रा पासून ब्राह्मण बनले आहात मग सो देवता बनणार. इतर
मनुष्य या गोष्टींना काय जाणतील. भले विराट रूपाचे चित्र बनवतात परंतु त्याच्यामध्ये
ना शेंडी आहे (ना ब्राह्मण आहेत), ना शिव आहेत. म्हणतात - देवता, क्षत्रिय, वैश्य,
शूद्र. बस्स, शूद्रापासून देवता कसे आणि कोण बनवतात, हे काहीच जाणत नाहीत. बाबा
म्हणतात - तुम्ही देवी-देवता किती श्रीमंत होता मग ते सर्व धन कुठे गेले! माथा
टेकवता-टेकवता टिप्पर घासत पैसे गमावले. कालचीच गोष्ट आहे ना. तुम्हाला हे बनवून
गेले आणि मग तुम्ही काय बनला आहात! अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१)
झरमुई-झगमुईच्या (परचिंतनाच्या) गप्पा मारून वातावरण खराब करायचे नाही. एकांतामध्ये
बसून खरे-खरे आशिक बनून आपल्या माशुकची आठवण करायची आहे.
२) आपणच आपल्याशी
प्रतिज्ञा करायची आहे की कधी रडणार नाही. डोळ्यांवाटे अश्रू ढाळणार नाही. जे
सेवाभावी आहेत, बाबांच्या हृदयामध्ये स्थान मिळवलेले आहेत त्यांचीच संगत करायची आहे.
आपले रजिस्टर खूप चांगले ठेवायचे आहे.
वरदान:-
पॉवरफुल वृत्ती
द्वारे मनसा सेवा करणारे विश्व कल्याणकारी भव
विश्वातील तडफडणाऱ्या
आत्म्यांना रस्ता सांगण्यासाठी साक्षात बाप समान लाईट हाऊस, माइट हाऊस बना. लक्ष्य
ठेवा की प्रत्येक आत्म्याला काही ना काही द्यायचेच आहे. भले मग मुक्ती द्या नाहीतर
जीवनमुक्ती द्या. सर्वांप्रती महादानी आणि वरदानी बना. आता आपापल्या स्थानाची सेवा
तर करता परंतु एका स्थानावर राहून मनसा शक्तीद्वारे वायुमंडळ, व्हायब्रेशनद्वारे
विश्वाची सेवा करा. अशी पॉवरफुल वृत्ती बनवा ज्याद्वारे वायुमंडळ बनेल - तेव्हा
म्हणणार विश्व कल्याणकारी आत्मा.
स्लोगन:-
अशरीरीपणाची
एक्सरसाइज आणि व्यर्थ संकल्प रुपी भोजनाच्या उपवासाद्वारे स्वतःला तंदुरुस्त बनवा.
अव्यक्त इशारे -
सत्यता आणि सभ्यता रुपी कल्चरला धारण करा:-
आता आपल्या भाषणांची
रूपरेषा नवीन करा. विश्व शांतीसाठीची भाषणे तर खूप केलीत परंतु अध्यात्मिक ज्ञान आणि
शक्ती काय आहे आणि याचा सोर्स कोण आहे! या सत्यतेला सभ्यतापूर्वक सिद्ध करा.
सर्वांना समजावे की, हे भगवंताचे कार्य सुरू आहे. माता खूप चांगले कार्य करत आहेत -
वेळे अनुसार ही देखील धरणी बनवावी लागली, परंतु जसे फादर शोज सन आहे, तसे सन शोज
फादर असावे, तेव्हा प्रत्यक्षतेचा झेंडा फडकेल.