28-06-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - अंतर्मुखी बना अर्थात चूप रहा, मुखाने काहीही बोलू नका, प्रत्येक कार्य शांतीने करा, कधीही अशांती पसरवू नका”

प्रश्न:-
तुम्हा मुलांना गरीब बनविणारा सर्वात मोठा शत्रू कोण आहे?

उत्तर:-
क्रोध. म्हटले जाते जिथे क्रोध आहे तिथे पाण्याचे घडे देखील सुकून जातात. भारताचा मटका जो हिरे-माणकांनी भरलेला होता तो या भुतामुळे रिकामा झाला आहे. या भुतांनीच तुम्हाला गरीब बनवले आहे. रागीट मनुष्य स्वतःही तापतो आणि इतरानाही तापवतो म्हणून या भुताला अंतर्मुखी होऊन काढून टाका.

ओम शांती।
बाबा मुलांना समजावून सांगत आहेत - ‘गोड मुलांनो, अंतर्मुखी बना’. अंतर्मुखता अर्थात काहीही बोलायचे नाही. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. ही शिकवण बाबा मुलांना देतात आणि यामध्ये काहीच बोलायचे नाही आहे. फक्त स्पष्टीकरण दिले जाते, गृहस्थ व्यवहारामध्ये असे रहायचे आहे. हे आहे मनमनाभव. माझी आठवण करा हा आहे पहिला पॉईंट. तुम्हा मुलांनी घरामध्ये क्रोध देखील करता कामा नये. क्रोध हा असा आहे जो पाण्याचा घडा देखील सुकवून टाकतो. क्रोधी मनुष्य अशांती पसरवतो त्यामुळे गृहस्थ व्यवहारामध्ये राहून शांतीमध्ये रहायचे आहे. भोजन करून आपल्या धंद्याला किंवा ऑफिसमध्ये निघून जायचे आहे, तिथे देखील शांतीमध्ये राहणे चांगले आहे. सगळे म्हणतात कि आम्हाला शांती पाहिजे. हे तर मुलांना सांगितले आहे कि, शांतीचा सागर एक बाबाच आहेत. बाबाच डायरेक्शन देतात की, माझी आठवण करा. यामध्ये बोलायचे काहीच नाहीये. अंतर्मुखी रहायचे आहे. ऑफिस इत्यादी ठिकाणी आपले काम देखील करायचे आहे तर यामध्ये फार काही बोलायचे नाही, एकदम गोड बनायचे आहे. कुणालाही दुःख देऊ नये. भांडण इत्यादी करणे हा देखील क्रोध आहे, सर्वात मोठा शत्रू आहे - काम विकार. दुसरा नंबर आहे - क्रोध. एकमेकांना दुःख देतात. क्रोधामुळे किती भांडणे होतात. मुले जाणतात सतयुगामध्ये भांडणे होत नाहीत. हे रावणगिरीचे लक्षण आहे. क्रोध असणाऱ्याला आसुरी संप्रदायातला म्हटले जाते. भुताची प्रवेशता आहे ना. यामध्ये बोलायचे काहीच नाहीये कारण त्या मनुष्यांना तर ज्ञानच नाही आहे. ते तर क्रोधच करणार, क्रोधवाल्यावर क्रोध केल्याने भांडण लागते. बाबा समजावून सांगत आहेत - ‘हे खूप बलवान भूत आहे, याला युक्तीने पळवून लावले पाहिजे’. मुखावाटे कोणतेही कटू वचन काढता कामा नये. हे खूप नुकसान करते. विनाश देखील क्रोधानेच होतो ना. घरा-घरामध्ये जिथे क्रोध असतो तिथे खूप अशांती असते. क्रोध केलात तर तुम्ही बाबांचे नाव बदनाम कराल. या भुतांना पळवून लावायचे आहे. एकदा पळवून लावलेत कि मग अर्ध्याकल्पासाठी ही भुते असणारच नाहीत. हे ५ विकार आता फुल फोर्समध्ये आहेत. अशा वेळेलाच बाबा येतात, ज्यावेळी विकार फुल फोर्समध्ये आहेत. हे डोळे खूप क्रिमिनल (विकारी) आहेत. वाणी देखील विकारी आहे. जोर-जोरात बोलल्याने मनुष्य तापतो आणि घराला देखील तापवतो. काम आणि क्रोध हे दोन्ही खूप मोठे शत्रू आहेत. क्रोधवाले बाबांची आठवण करू शकत नाहीत. आठवण करणारे कायम शांतीमध्ये राहतात. आपल्या मनाला विचारायचे आहे - ‘माझ्यामध्ये भूत तर नाही ना?’ मोहाचे देखील, लोभाचे देखील भूत असते. लोभाचे भूत देखील काही कमी नाहीये. हि सर्व भुते आहेत कारण हि रावण सेना आहे.

बाबा मुलांना आठवणीची यात्रा शिकवतात. परंतु मुले यामध्ये खूप गोंधळून जातात. समजत नाही कारण भक्ती खूप केली आहे ना. भक्ती आहे देह-अभिमान. अर्धा कल्प देह-अभिमान राहिला आहे. बाह्यमुखतेमुळे स्वतःला आत्मा समजू शकत नाहीत. बाबा यावर खूप जोर देतात की, स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. परंतु जमतच नाही. बाकी सगळ्या गोष्टी मानतात देखील आणि पुन्हा म्हणतात आठवण कशी करायची, कोणती अशी चीज दिसून तर येत नाही. त्यांना समजावून सांगितले जाते की, तुम्ही स्वतःला आत्मा समजता. हे देखील जाणता कि ते बेहदचे बाबा आहेत. मुखाने शिव-शिव असे बोलण्याची गरज नाहीये. आतून समजता ना कि मी आत्मा आहे. मनुष्य शांती मागतात, शांतीचा सागर तो एक परमात्माच आहे. जरूर वारसा देखील तेच देतील. आता बाबा समजावून सांगत आहेत कि, माझी आठवण करा तर शांती होईल. आणि जन्म-जन्मांतरीची विकर्म देखील नष्ट होतील. बाकी कोणती अशी चीज नाहीये आणि इतके काही मोठे लिंग नाहीये. आत्मा देखील छोटी आहे बाबा देखील छोटे आहेत. आठवण तर सगळे करतात - ‘हे भगवान, हे गॉड’. हे कोण म्हणते? आत्मा म्हणते - ‘मी, माझ्या बाबांची आठवण करते’. तर बाबा मुलांना म्हणतात - ‘मनमनाभव. गोड-गोड मुलांनो, अंतर्मुखी होऊन रहा. हे जे काही पाहत आहात ते सर्व नष्ट होणार आहे.’ बाकी आत्मा शांतीमध्ये राहते. आत्म्याला शांती धामलाच जायचे आहे. जोपर्यंत आत्मा पवित्र बनत नाही तोपर्यंत शांतीधामला जाऊ शकत नाही. ऋषी-मुनी इत्यादी सर्वजण म्हणतात कि शांती कशी मिळेल. बाबा तर सोपी युक्ती सांगतात. परंतु मुलांमध्ये बरेच असे आहेत जे शांतीमध्ये राहत नाहीत. बाबा जाणतात कि घरामध्ये राहतात, अजिबात शांत राहत नाहीत. सेंटरवर थोडा वेळ जातात, आतून शांत राहून बाबांची आठवण करावी, ते नाही आहे. संपूर्ण दिवस घरामध्ये गोंधळ घालत राहतात, त्यामुळे सेंटरवर येऊन देखील शांतीमध्ये राहू शकत नाहीत. कुणा देहधाऱ्यावर प्रेम बसले की त्यांचे मन कधीही शांत राहू शकणार नाही. बस, त्याचीच आठवण येत राहील. बाबा समजावून सांगतात - मनुष्यांमध्ये ५ भुते आहेत. म्हणतात ना कि यांच्यामध्ये भुताची प्रवेशता आहे. या भुतांनीच तुम्हाला कंगाल बनवले आहे. जेव्हा भूतबाधा होते ते फार तर एक भूत असते, ते देखील कधीतरी प्रवेश करते. बाबा म्हणतात, ५ भुतांची प्रवेशता प्रत्येकामध्ये आहे. या भुतांना पळवून लावण्यासाठीच बोलवतात - ‘बाबा, येऊन आम्हाला शांती द्या, या भुतांना पळवून लावण्याची युक्ती सांगा.’ हि भुते तर सर्वांमध्ये आहेत. हे रावण राज्य आहे ना. सर्वात मोठे भूत आहे ‘काम-क्रोध’. बाबा येऊन भुतांना पळवून लावतात तर त्याच्या बदल्यात काही मिळाले तर पाहिजे ना. ते (दुनियावाले मांत्रिक) भूत-प्रेत पळवून लावतात मिळत काहीच नाही. हे तर मुले जाणतात कि बाबा येतात साऱ्या विश्वामधून भुतांना पळवून लावण्यासाठी. आता साऱ्या विश्वामध्ये सर्वांमध्ये भुतांची प्रवेशता आहे. देवतांमध्ये कोणतेही भुत नसते, ना देह-अभिमानाचे, ना काम, क्रोध, लोभ, मोह… काहीच नसते. लोभाचे भूत देखील काही कमी नाहीये. हे अंडे खाऊ, ते खाऊ… बऱ्याच जणांमध्ये भूते असतात. मनातून समजतात - बरोबर माझ्यामध्ये काम विकाराचे भूत आहे. तर या भुतांना काढण्यासाठी बाबा किती डोकेफोड करत आहेत. देह-अभिमानामध्ये आल्यामुळे मनातून वाटते की गळाभेट घ्यावी, हे करू. आणि मग सगळी कमाई संपुष्टात येते. क्रोध असणाऱ्यांचे देखील हेच हाल आहेत. क्रोधामध्ये येऊन वडील मुलाला मारून टाकतात, मुले वडिलांना मारून टाकतात, पत्नी पतीला मारून टाकते. जेलमध्ये जाऊन तुम्ही पहा कशा-कशा केसेस असतात. या भुतांच्या प्रवेशतेमुळे भारताचे काय हाल झाले आहेत! भारताचा जो मोठा हंडा होता तो सोने-हिरे इत्यादींनी भरलेला होता, तो आता खाली झाला आहे. म्हणतात ना - क्रोधामुळे पाण्याचा घडा देखील सुकून जातो. तर या भारताचे देखील असे हाल झाले आहे. हे देखील कोणीही जाणत नाही. भुतांना काढून टाकण्यासाठी बाबाच येतात. जे इतर कोणीही मनुष्य मात्र काढू शकत नाही. हि ५ भुते खूप जबरदस्त आहेत. अर्धा कल्प तर यांची प्रवेशता होऊन राहिली आहे. आता यावेळी तर गोष्टच विचारू नका. भले कोणी पवित्र राहतात परंतु जन्म तर विकारातूनच मिळतो ना. भूत तर आहे ना. ५ भुतांनी भारताला एकदम गरीब बनवले आहे. ड्रामा कसा बनला आहे, जो बाबा बसून समजावून सांगतात. भारत गरीब बनला आहे, ज्यामुळे बाहेरून कर्ज घेत राहतो. भारतासाठीच बाबा समजावून सांगतात, आता तुम्हा मुलांना या शिक्षणामुळे किती धन मिळत आहे. हे अविनाशी शिक्षण आहे, जे अविनाशी बाबाच शिकवतात. भक्ती मार्गामध्ये किती सामग्री आहे. बाबा (ब्रह्मा बाबा) लहानपणापासून गीता वाचत होते, आणि नारायणाची पूजा करत होते. समजत तर काहीच नव्हते. मी आत्मा आहे, तो माझा पिता आहे, हि देखील समज नव्हती; म्हणून विचारतात कि, ‘कशी आठवण करू?’ अरे, तुम्ही तर भक्तीमार्गामध्ये आठवण करत आला आहात - ‘हे भगवान या, मुक्त करा, आमचा गाईड बना’. गाईड मिळतो - मुक्ती-जीवनमुक्तीसाठी. बाबा या जुन्या दुनियेविषयी तिरस्कार उत्पन्न करतात. या वेळेला सर्वांचे आत्मे काळे आहेत, तर त्यांना गोरे शरीर कसे मिळणार. भले कातडी कितीही गोरी असली, तरीही आत्मा तर काळीच आहे ना. जे गोरे सुंदर शरीरवाले आहेत त्यांना आपल्या सौंदर्याचा किती अभिमान असतो. मनुष्यांना हे कळतही नाही की आत्मा गोरी कशी बनते? म्हणून त्यांना नास्तिक म्हटले जाते. जे आपला पिता रचयिता आणि रचनेला जाणत नाहीत ते आहेत - नास्तिक, जे जाणतात ते आहेत - आस्तिक. बाबा बसून किती चांगल्या पद्धतीने तुम्हा मुलांना समजावून सांगतात. प्रत्येकाने आपल्या मनाला विचारावे कि, ‘माझ्यामध्ये कितपत सफाई आहे? कितपत मी स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करतो?’ आठवणीच्या बळानेच रावणावर विजय प्राप्त करायचा आहे. यामध्ये शरीर बलवान असण्याची गरजच नाहीये. यावेळी सर्वात शक्तिशाली अमेरिका आहे, कारण त्यांच्याकडे भरपूर संपत्ती दारु-गोळा इत्यादी पुष्कळ आहे. हि झाली भौतिक शक्ती, मारण्यासाठी. बुद्धीमध्ये आहे आम्ही विजयी व्हावे. तुमचे तर आहे रुहानी बळ, तुम्ही रावणावर विजय प्राप्त करता. ज्यामुळे तुम्ही विश्वाचे मालक बनता. तुमच्यावर कोणीही विजय मिळवू शकत नाही. अर्धाकल्प कोणीही हिरावून घेऊ शकत नाही आणि इतर कोणालाही बाबांकडून वारसा मिळत नाही. तुम्ही काय बनता, थोडा विचार करा. बाबांची तर खूप प्रेमाने आठवण करायची आहे आणि स्वदर्शन चक्रधारी बनायचे आहे. ते समजतात कि, विष्णूने स्वदर्शन चक्राने सर्वांचा शिरच्छेद केला. परंतु इथे तर हिंसेची काही गोष्टच नाही.

तर गोड-गोड मुलांना बाबा सांगत आहेत - ‘गोड मुलांनो, तुम्ही काय होता, आता आपली हालत तर पहा! भले तुम्ही कितीही भक्ती इत्यादी करत होता परंतु भुतांना काढू शकला नाहीत. आता अंतर्मुखी होऊन पहा आपल्यात कोणते भूत तर नाही ना? कोणावर प्रेम जडले, मिठी मारलीत तर समजा घाट्याच्या खात्यामध्ये गेला. त्याचे तोंड देखील पाहू नये असे वाटते. ते तर जसे अछूत झाले, स्वच्छ नाहीत. आतून मन खात राहते कि बरोबर मी अछूत आहे. बाबा म्हणतात - देहासहित सर्व काही विसरा, स्वतःला आत्मा समजा, ही अवस्था ठेवल्यानेच तुम्ही देवता बनाल. तर कोणतेही भूत येता कामा नये. बाबा सांगत राहतात कि स्वतःला चेक करा. बऱ्याचजणांमध्ये क्रोध आहे, शिव्या दिल्या शिवाय राहत नाहीत, मग भांडणे होतात. क्रोध तर अतिशय वाईट आहे. भुतांना पळवून लावून एकदम स्वच्छ बनायचे आहे. शरीराची आठवण देखील येता कामा नये तेव्हाच उच्च पद प्राप्त करू शकता, म्हणूनच ८ रत्नांचे गायन केले जाते. तुम्हाला ज्ञान रत्न मिळतात रत्न बनण्यासाठी. असे म्हणतात कि, भारतामध्ये ३३ करोड देवता होते, परंतु त्यातून देखील ८ रत्नच पास विद ऑनर होणार. त्यांनाच प्राईज मिळणार. जशी स्कॉलरशिप मिळते ना. तुम्ही जाणता ध्येय खूप मोठे आहे. चालता-चालता कोसळतात (पतन होते), भुताची प्रवेशता होते. तिथे (सतयुगामध्ये) विकार असतच नाहीत. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये सारे ड्रामाचे चक्र फिरले पाहिजे.

तुम्ही जाणता ५ हजार वर्षांमध्ये किती महिने, किती तास, किती सेकंद असतात. कोणी हिशोब काढायचा म्हटले तरी काढू शकतो. आणि हे जे झाड आहे (कल्पवृक्षाचे चित्र), त्यामध्ये देखील हे लिहूया कि, कल्पामध्ये इतकी वर्षे, इतके महिने, इतके दिवस, इतके तास, इतके सेकंद असतात. मनुष्य म्हणतील कि हे तर एकदम ॲक्युरेट सांगत आहेत. ८४ जन्मांचा हिशोब सांगतात. तर कल्पाचे आयुष्य का नाही सांगणार. मुलांना मुख्य गोष्ट तर सांगितली आहे कि कसेही करून भुतांना तर पळवून लावायचे आहे. या भूतांनी तुमचा पूर्ण सत्यानाश केला आहे. सर्व मनुष्यमात्रा मध्ये भूते जरूर आहेत. होतेच भ्रष्टाचारापासून उत्पत्ती. तिथे (सतयुगामध्ये) भ्रष्टाचार असत नाही. रावणच नाहीये. रावणाला देखील कोणी समजत नाहीत. तुम्ही रावणावर विजय मिळवता त्यानंतर मग रावण असणारही नाही. आता पुरुषार्थ करा. बाबा आलेले आहेत तर बाबांचा वारसा जरूर मिळाला पाहिजे. तुम्ही अनेकदा देवता बनता. अनेकदा असुर बनता, त्याचा हिशोब काढू शकत नाही.

अगणित वेळा बनले असाल. अच्छा मुलांनो, शांतीमध्ये रहा तर कधीही क्रोध येणार नाही. बाबा जे शिकवतात ते अमलात आणले पाहिजे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) आपणच आपल्याला विचारायचे आहे - माझ्यामध्ये कोणते भूत तर नाही ना? डोळे क्रिमिनल (विकारी) तर होत नाहीत ना? जोराने बोलण्याचा किंवा अशांती पसरवण्याचा संस्कार तर नाही ना? लोभ-मोहाचा विकार त्रास तर देत नाहीत ना?

२) कोणत्याही देहधाऱ्यावर प्रेम करायचे नाही. देहा सहित सर्वकाही विसरून आठवणीच्या यात्रेद्वारे स्वतःमध्ये रुहानी शक्ती भरायची आहे. एकदाच भुतांना पळवून लावून अर्ध्या कल्पासाठी सुटका करून घ्यायची आहे.

वरदान:-
ईश्वरीय विधानाला समजून विधीद्वारे सिद्धी प्राप्त करणारे फर्स्ट डिव्हीजनचे अधिकारी भव

‘एका पावलाची हिम्मत, तर पद्म पावलांची मदत’, ड्रामामध्ये या विधानाची (नियमाची) विधी नोंदलेली आहे. जर हि विधी, विधानामध्ये (कायद्यामध्ये) नसती तर सगळेच विश्वाचे पहिले राजा बनले असते. नम्बरवार बनण्याचे विधान (नियम) या विधीमुळेच बनते. तर जितकी पाहिजे तितकी हिम्मत ठेवा आणि मदत घ्या. भले समर्पित असा, नाहीतर प्रवृत्तीवाले असा - अधिकार समान आहे परंतु विधीद्वारे सिद्धी आहे. या ईश्वरीय विधानाला (नियमाला) समजून निष्काळजीपणाच्या लीलेला समाप्त करा तेव्हाच फर्स्ट डीव्हीजनचा अधिकार मिळेल.

बोधवाक्य:-
संकल्पाच्या खजिन्याप्रति इकॉनॉमिचे अवतार बना.