28-07-24    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   31.12.20  ओम शान्ति   मधुबन


“बचतीच्या खात्यात जमा करून अखंड महादानी बना”


आज नव युग रचयिता आपल्या नवीन युगाच्या अधिकारी मुलांना पाहत आहेत. आज जुन्या युगामध्ये साधारण आहात आणि उद्या नवीन युगामध्ये राज्य अधिकारी पूज्य असणार आहात. ‘आज’ आणि ‘उद्या’चा खेळ आहे. आज काय आहे आणि उद्या काय असेल! जी अनन्य ज्ञानी तू आत्मा मुले आहेत, त्यांच्या समोर येणारा ‘उद्या’ (भविष्य) सुद्धा इतकाच स्पष्ट आहे जितका ‘आज’ स्पष्ट आहे. तुम्ही तर सर्व नवीन वर्ष साजरे करण्यासाठी आला आहात परंतु बापदादा नवीन युग पाहत आहेत. नवीन वर्षामध्ये मग प्रत्येकाने आपला-आपला नवीन प्लॅन बनवलाच असेल. आज जुने समाप्त होणार आहे, वर्ष समाप्त होते तेव्हा संपूर्ण वर्षाचा रिझल्ट पाहिला जातो. तर आज बापदादांनी सुद्धा प्रत्येक मुलाचा वर्षाचा रिझल्ट पाहिला. बापदादांना तर पहायला काही वेळ लागत नाही. तर आज विशेष सर्व मुलांचे जमेचे खाते पाहिले. पुरुषार्थ तर सर्व मुलांनी केला, आठवणीमध्ये सुद्धा राहिले, सेवा सुद्धा केली, संबंध-संपर्कामध्ये सुद्धा लौकिक किंवा अलौकिक परिवारामध्ये जबाबदारी निभावली, परंतु या तिन्ही गोष्टीमध्ये जमेचे खाते किती जमा झाले?

आज वतनमध्ये बापदादांनी जगत अंबा मम्माला इमर्ज केले. (खोकला आला) आज बाजा (आवाज) थोडा खराब आहे, बोलावे तर लागेल ना. तर बापदादा आणि मम्माने मिळून सर्वांचे बचतीचे खाते पाहिले. बचत करून जमा किती झाले! तर काय पाहिले? नंबरवार तर सर्व आहेतच परंतु जितके जमेचे खाते असायला हवे त्यापेक्षा खात्यामध्ये जमा कमी होते. तर जगत अंबा मम्माने प्रश्न विचारला - ‘आठवणीच्या विषयामध्ये बऱ्याच मुलांचे लक्ष्य सुद्धा चांगले आहे, पुरुषार्थ देखील चांगला आहे, तरीही जमेचे खाते जितके असायला हवे त्यापेक्षा कमी आहे, असे का?’ बातचीत, रुहरिहान करता-करता हाच रिझल्ट निघाला की, योगाचा अभ्यास तर करतच आहेत परंतु योगाच्या स्टेजची पर्सेंटेज साधारण असल्या कारणाने जमेचे खाते साधारणच आहे. योगाचे लक्ष्य चांगल्या रीतीने आहे परंतु योगाचा रिझल्ट आहे - योगयुक्त, युक्तियुक्त बोलणे आणि व्यवहार. त्यामध्ये कमी असल्या कारणाने योग करत असताना योगामध्ये चांगले आहेत, परंतु योगी अर्थात योगीचा जीवनामध्ये प्रभाव, म्हणून जमेच्या खात्यामध्ये काही-काही वेळा जमा होते, परंतु नेहमी जमा होत नाही. चालता-चालता (कर्म करताना) आठवणीची पर्सेंटेज साधारण होऊन जाते. त्यामुळे जमेच्या खात्यामध्ये खूप कमी जमा होते.

दुसरे - सेवेची रुहरिहान झाली. सेवा तर खूप करतात, दिवस-रात्र बिझी सुद्धा राहतात. प्लॅन देखील खूप छान-छान बनवतात आणि सेवेमध्ये वृद्धी देखील खूप चांगली होत आहे. तरी देखील मेजॉरिटींचे जमेचे खाते कमी का? तर रुहरिहानमध्ये हेच निघाले की, सेवा तर सगळेच करत आहेत, स्वतःला बिझी ठेवण्याचा पुरुषार्थ सुद्धा चांगला करत आहेत. मग कारण कोणते आहे? तर हेच कारण निघाले की, सेवेचे बळ सुद्धा मिळते, फळ सुद्धा मिळते. बळ आहे - स्वतःच्या मनाची संतुष्टता आणि फळ आहे - सर्वांची संतुष्टता. जर सेवा केली, मेहनत घेतली आणि वेळ दिला तर मनाची संतुष्टता आणि सर्वांची संतुष्टता, भले मग सेवा साथी असोत, किंवा ज्यांची सेवा केली ते असोत सर्वांना मनामध्ये संतुष्टतेचा अनुभव व्हावा; ‘खूप छान, खूप छान’ म्हणत निघून गेले, असे नाही. मनामध्ये संतुष्टतेचे प्रकंपन अनुभव व्हावे. काही मिळाले, खूप चांगले ऐकले, ती वेगळी गोष्ट आहे. काही मिळाले, काही प्राप्त केले, ज्याला बापदादांनी या अगोदर सुद्धा सांगितले आहे - एक आहे - बुद्धीला भिडणारे आणि दुसरे आहे - हृदयाला भिडणारे. जर सेवा केली आणि स्वतःची संतुष्टता, स्वतःला खुश करण्याची संतुष्टता नाही, खूप छान झाले, खूप छान झाले, नाही. स्वतःचे आणि इतर सर्वांचे मन देखील हि संतुष्टता अनुभव करेल. आणि दुसरी गोष्ट आहे कि सेवा केली आणि त्याचा रिझल्ट - ‘माझी मेहनत किंवा मी केले…’. मी केले हे स्वीकार केले अर्थात सेवेचे फळ खाल्ले. जमा झाले नाही. बापदादांनी करवले, बापदादांकडे लक्ष वेधले, आपल्या आत्म्याकडे नाही. हि बहीण खूप चांगली, हा भाई खूप चांगला, नाही. यांचे बापदादा खूप चांगले, असा अनुभव करवणे - हे आहे जमेचे खाते वाढविणे; म्हणूनच असे दिसून आले की, टोटल रिझल्टमध्ये मेहनत जास्त, वेळ, शक्ती जास्त आणि थोडा-थोडा शो जास्त, म्हणून जमेचे खाते कमी होते. जमेच्या खात्याची चावी खूप सोपी आहे, ती डायमंड चावी आहे, गोल्डन चावी लावता परंतु जमेची डायमंड चावी आहे - “निमित्त भाव आणि निर्माण भाव”. जर प्रत्येक आत्म्याप्रती, मग सेवा साथी असोत, किंवा ज्या आत्म्याची सेवा करता ते असोत, दोन्हीमध्ये सेवेच्या वेळी, अगोदर किंवा नंतर नाही, सेवा करते वेळी निमित्त भाव, निर्माण भाव, निःस्वार्थ शुभ भावना आणि शुभ स्नेह इमर्ज असेल तर जमेचे खाते वाढत जाईल.

बापदादांनी जगत अंबा मम्माला दाखवले कि या विधीने सेवा करणाऱ्यांचे जमेचे खाते कसे वाढत जाते. बस, अनेक तासांचे जमेचे खाते सेकंदामध्ये जमा होते. जसे टिक-टिक-टिक जोर लावून पटपट करा, असे मशीन चालते. तर जगत अंबा खूप खुश होत होत्या कि जमेचे खाते, जमा करणे तर खूप सोपे आहे. तर दोघांचे (बापदादा आणि जगत अंबेचे) असे मत झाले कि आता नवीन वर्ष सुरु होत आहे तर जमेचे खाते चेक करा संपूर्ण दिवसामध्ये कोणती चूक केली नाही परंतु समय, संकल्प, सेवा, संबंध-संपर्कामध्ये स्नेह, संतुष्टतेद्वारे किती जमा केले? बरीच मुले फक्त हे चेक करतात - ‘आज वाईट काही झाले नाही. कोणाला दुःख दिले नाही’. परंतु आता हे चेक करा कि संपूर्ण दिवसामध्ये श्रेष्ठ संकल्पांचे खाते किती जमा केले? श्रेष्ठ संकल्पाद्वारे सेवेचे खाते किती जमा झाले? किती आत्म्यांना कोणत्याही कार्यामुळे किती जणांना सुख दिले? योग लावला परंतु योगाची पर्सेंटेज कोणत्या प्रकारची होती? आजच्या दिवशी आशीर्वादांचे खाते किती जमा केले?

या नवीन वर्षामध्ये काय करायचे आहे? काहीही करता भले मनसा असो, वाचा असो, किंवा कर्मणा असो परंतु समयानुसार मनामध्ये हि धून लागून रहावी - मला अखंड महादानी बनायचेच आहे. ‘अखंड महादानी’, महादानी नाही, ‘अखंड’. मनसा द्वारे शक्तींचे दान, वाचे द्वारे ज्ञानाचे दान, आणि आपल्या कर्माद्वारे गुणांचे दान. आजकाल दुनियेमध्ये, भले मग ब्राह्मण परिवाराची दुनिया असो, किंवा अज्ञानींच्या दुनियेमध्ये असो ऐकण्या ऐवजी पाहू इच्छितात. बघून करू इच्छितात. तुम्हा लोकांना सहज सोपे का झाले? ब्रह्मा बाबांना कर्मामध्ये गुणदान मूर्त पाहिले. ज्ञानदान तर करताच परंतु या वर्षामध्ये विशेष लक्ष ठेवा की, प्रत्येक आत्म्याला गुण दान अर्थात आपल्या जीवनातील गुणांद्वारे सहयोग द्यायचा आहे. ब्राह्मणांना दान तर करणार नाही ना, सहयोग द्या. काहीही होऊ देत, कोणी कितीही अवगुणधारी असो, परंतु मला आपल्या जीवनाद्वारे, कर्माद्वारे, संपर्काद्वारे गुणदान अर्थात सहयोगी बनायचे आहे. यामध्ये दुसऱ्याला पाहू नका, हा करत नाही तर मी कशाला करू, हा देखील असाच तर आहे. ब्रह्मा बाबांनी केवळ शिवबाबांना पाहिले. तुम्हा मुलांना जर पहायचे असेल तर ब्रह्मा बाबांना पहा. यामध्ये दुसऱ्यांना न पाहता, हे लक्ष्य ठेवा जसे ब्रह्मा बाबांचे स्लोगन होते - ‘जो ओटे सो अर्जुन’ अर्थात जो स्वतःला निमित्त बनवेल तो नंबरवन अर्जुन होईल. ब्रह्मा बाबा अर्जुन नंबरवन बनले. जर दुसऱ्यांना बघत कराल तर नंबरवन बनणार नाही. नंबरवारमध्ये याल, नंबरवन बनणार नाही. आणि जेव्हा हात वर करायला सांगतात तर सगळे नंबरवारमध्ये हात वर करता का नंबरवनमध्ये हात वर करता? तर लक्ष्य काय ठेवणार? अखंड गुणदानी, अटल, कोणी कितीही हलवू देत, डगमगायचे नाही. प्रत्येकजण एकमेकांना म्हणतात, सगळेच असे आहेत तू का स्वतःला असा त्रास देतोस, तू सुद्धा आमच्यामध्ये सामील हो. कमजोर बनविणारे साथीदार खूप भेटतात. परंतु बापदादांना हवेत हिम्मत, उमंग वाढविणारे साथीदार. तर समजले काय करायचे आहे? सेवा करा परंतु जमेचे खाते वाढवत जा, भरपूर सेवा करा. अगोदर स्वतःची सेवा, नंतर सर्वांची सेवा. आणखी एक गोष्ट बापदादांनी नोट केली, ऐकवू का?

आज सूर्य आणि चंद्राचे मिलन होते ना. जगत अंबा मम्मा म्हणाल्या, ॲडव्हान्स पार्टीने अजून कधी पर्यंत प्रतीक्षा करायची? कारण तुम्ही जेव्हा ॲडव्हान्स स्टेजवर पोहोचाल तेव्हा ॲडव्हान्स पार्टीचे कार्य पूर्ण होईल. तर जगत अंबा मम्मा ने आज बापदादांना अगदी शांतपणे आणि अतिशय चातुर्याने एक गोष्ट सांगितली, ती कोणती एक गोष्ट सांगितली? बापदादा तर जाणतात, तरीही आज रुहरीहान होती ना. तर काय म्हणाल्या की, मी देखील चक्कर मारत असते, मधुबनमध्ये सुद्धा फेरी मारते तर सेंटरवर सुद्धा फेरी मारते. तर हसत हसत, ज्यांनी जगत अंबा मम्माला पाहिले आहे त्यांना माहित आहे कि हसत, हसत इशाऱ्याने बोलतात, सरळ बोलत नाहीत. तर मम्मा बोलल्या की आजकाल एक विशेषता दिसून येते, कोणती विशेषता? तर म्हणाल्या, की आजकाल अनेक प्रकारचा बेफिकीरपणा आला आहे. कोणामध्ये कोणत्या प्रकारचा बेफिकीरपणा आहे, तर कोणामध्ये कोणत्या प्रकारचा बेफिकीरपणा आहे. ‘होऊन जाईल, करू… बाकीचे सुद्धा करत आहेत, आम्ही सुद्धा करू… असे तर होतेच, चालतेच…' अशी बेफिकीरपणाची भाषा संकल्पामध्ये तर आहेच परंतु बोलण्यामध्ये सुद्धा आहे. तर बापदादांनी म्हटले की यासाठी नवीन वर्षामध्ये तुम्ही एखादी युक्ती मुलांना सांगा. तर तुम्हा सर्वांना माहित आहे जगत अंबा मम्माचे नेहमी एक धारणेचे स्लोगन होते, आठवते? कोणाच्या लक्षात आहे? (हुक्मी हुक्म चला रहा…) तर जगत अंबा म्हणाल्या जर हि धारणा सगळे करतील कि, ‘आम्हाला बापदादा चालवत आहेत, त्याच्या हुकुमावरून प्रत्येक पाऊल उचलत आहोत’. हि स्मृती जर राहिली तर आम्हाला चालविणारे डायरेक्ट बाबा आहेत. तर मग कुठे नजर जाईल? चालणाऱ्याची, चालविणाऱ्याकडेच नजर जाईल, बाकी दुसरीकडे नाही. तर असे करावनहार निमित्त बनवून करून घेत आहेत, चालवत आहेत. जबाबदार करावनहार आहेत. मग सेवेमध्ये जे डोके जड होते ना, ते नेहमी हलके राहील, जसे रुहे गुलाब. समजले, काय करायचे आहे? अखंड महादानी. अच्छा.

नवीन वर्ष साजरे करण्यासाठी सगळे धावत-पळत पोहोचले आहेत. चांगले आहे, हाऊस फुल झाले. ठीक आहे सर्वांना पाणी तर मिळाले ना! मिळाले पाणी? तरीही पाणी पुरविण्याची मेहनत करणाऱ्यांना मुबारक आहे. इतक्या हजारोंना पाणी पोहोचवणे, काही दोन-चार बादल्या तर नाहीत ना! चला, उद्यापासून तर परतीच्या प्रवासासाठी एकत्र व्हाल. सगळे आरामात राहिलात ना! वादळाने थोडासा पेपर घेतला. थोडासा वादळीवारा होता. तुम्ही सर्वजण ठीक होता ना? पांडव, तुम्ही ठीक होता ना? चांगले आहे, कुंभमेळ्यापेक्षा तर चांगले आहे ना! अच्छा, पृथ्वीची तीन पावले तर मिळाली ना! पलंग नाही मिळाला परंतु पृथ्वीची तीन पावले तर मिळाली ना!

तर नवीन वर्षामध्ये चोहो बाजूची मुले सुद्धा विदेशामध्ये सुद्धा, देशामध्ये सुद्धा नवीन वर्षाचा सोहळा बुद्धीद्वारे पाहत आहेत, कानाद्वारे ऐकत आहेत. मधुबनमध्ये सुद्धा बघत आहेत. मधुबनवाल्यांनी सुद्धा यज्ञ रक्षक बनून सेवेचा पार्ट बजावला आहे, खूप छान. बापदादा विदेश आणि देशवासीयांसोबत मधुबन निवासींना देखील जे सेवेच्या निमित्त आहेत, त्यांना सुद्धा मुबारक देत आहेत. अच्छा. बाकी ग्रीटिंगकार्ड तर पुष्कळ आली आहेत. तुम्ही देखील सर्वजण बघत आहात ना खूप ग्रीटिंगकार्ड आली आहेत. ग्रीटिंगकार्ड तर काही मोठी गोष्ट नाहीये परंतु यामध्ये लपलेला हृदयाचा स्नेह आहे. तर बापदादा ग्रीटिंगकार्डची सजावट बघत नाहीत परंतु हृदयाचा मौल्यवान स्नेह किती भरलेला आहे, तर सर्वांनी आपल्या-आपल्या हृदयातील स्नेह पाठवला आहे. तर अशा स्नेही आत्म्यांना विशेष प्रत्येकाचे नाव तर घेणार नाहीत ना! परंतु बापदादा कार्डच्या बदल्यात अशा मुलांना स्नेहाने भरलेला रिगार्ड देत आहेत. आठवणीचे पत्र, टेलीफोन, कम्प्युटर, ई-मेल, जी काही साधने आहेत त्या सर्व साधनांच्या अगोदर संकल्पाद्वारेच बापदादांकडे पोहोचते नंतर मग तुमच्या कम्प्युटर आणि ई-मेल मध्ये येते. मुलांचा स्नेह बापदादांकडे प्रत्येक वेळी पोहोचतोच. परंतु आज विशेष बऱ्याचजणांनी नवीन वर्षाचे प्लॅन सुद्धा लिहिले आहेत, प्रतिज्ञा देखील केल्या आहेत, झालेल्या गोष्टींना फुलस्टॉप लावून पुढे जाण्याची हिम्मत सुद्धा ठेवली आहे. सर्वांना बापदादा म्हणत आहेत खूप-खूप शाब्बास मुलांनो, शाब्बास!

तुम्ही सर्व खुश होत आहात ना! तर ते सुद्धा खुश होत आहेत. आता बापदादांची हीच अंतःकरणापासूनची आशा आहे कि “दात्याची मुले आहात प्रत्येकजण दाता बना” मागू नका ‘हे मिळायला हवे, असे व्हायला हवे, असे करायला हवे’. दाता बना, एकमेकांना पुढे घेऊन जाण्यासाठी मोठ्या मनाचे बना. बापदादांना छोटे म्हणतात कि, ‘आम्हाला मोठ्यांचे प्रेम मिळायला हवे’ आणि बाबा छोट्यांना म्हणतात कि, ‘मोठ्यांचा रिगार्ड ठेवा तर प्रेम मिळेल’. रिगार्ड देणे हेच रिगार्ड घेणे आहे. रिगार्ड असाच मिळत नाही. देणे हेच घेणे आहे. जर तुमची जड चित्रे (मुर्त्या) देतात. ‘देवता’ याचा अर्थच आहे - देणारा. ‘देवी’ याचा अर्थच आहे - देणारी. तर तुम्ही चैतन्य देवी-देवता दाता बना, द्या. जर सर्वजण देणारे दाता बनले, मग घेणारे तर संपूनच जातील ना! मग चोहो बाजूला संतुष्टतेचा, रुहानी गुलाबाचा सुगंध पसरेल. ऐकलेत!

तर नवीन वर्षामध्ये जुनी भाषा बोलू नका, काहीजण जी जुनी भाषा बोलतात ती चांगली वाटत नाही, तर जुने बोल, जुनी चाल, जुन्या कोणत्याही सवयीमुळे लाचार बनू नका. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःला विचारा कि नवीन आहे! काय नवीन केले? बस फक्त २१ वे शतक साजरे करायचे आहे, २१ जन्मांचा वारसा संपूर्ण २१ व्या शतकामध्ये प्राप्त करायचाच आहे! प्राप्त करायचा आहे ना! अच्छा.

चोहो बाजूच्या नवीन युगाच्या अधिकारी श्रेष्ठ आत्म्यांना, सर्व मुलांना, जे सदैव प्रत्येक पावलामध्ये पद्म जमा करणारे आत्मे आहेत, सदैव स्वतःला ब्रह्मा बाबांप्रमाणे सर्वांसमोर सॅम्पल बनून सिम्पल बनविणाऱ्या आत्म्यांना सदैव आपल्या जीवनामध्ये गुणांना प्रत्यक्ष करून इतरांना गुणवान बनविणाऱ्या, सदैव अखंड महादानी, महा सहयोगी आत्म्यांना बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.

यावेळी जुन्या आणि नवीन वर्षाच्या संगमाची वेळ आहे. संगमाची वेळ अर्थात जुने समाप्त झाले आणि नव्याचा आरंभ झाला. जसे बेहदच्या संगमयुगामध्ये तुम्ही सर्व ब्राह्मण आत्मे विश्व परिवर्तन करण्याच्या निमित्त आहात, तसे आजच्या या जुन्या आणि नवीन वर्षाच्या संगमावर देखील स्व परिवर्तनाचा संकल्प दृढ केला आहे आणि करायचाच आहे. जे सांगितले प्रत्येक सेकंद अटल, अखंड महादानी बनायचे आहे. दात्याची मुले मास्टर दाता बनायचे आहे. जुन्या वर्षाला निरोप देण्यासोबतच जुन्या दुनियेचे आकर्षण आणि जुन्या संस्कारांना निरोप देऊन नवीन श्रेष्ठ संस्कारांचे आवाहन करायचे आहे. सर्वांना अरब-खरब वेळा मुबारक असो, मुबारक असो, मुबारक असो.

वरदान:-
प्राप्ती स्वरूप बनून ‘का, काय’ या प्रश्नांपासून दूर राहणारे सदा प्रसन्नचित्त भव

जे प्राप्ती स्वरूप संपन्न आत्मे आहेत त्यांना कधीही कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत प्रश्न उत्पन्न होत नाही. त्यांच्या चेहऱ्यावर आणि वर्तनामध्ये प्रसन्नतेची पर्सनॅलिटी दिसून येईल, यालाच संतुष्टता म्हणतात. जर प्रसन्नता कमी होत असेल तर त्याचे कारण आहे प्राप्ती कमी आणि प्राप्ती कमी असण्याचे कारण आहे कोणती ना कोणती इच्छा. अति सूक्ष्म इच्छा अप्राप्तीकडे खेचून नेतात, म्हणून अल्पकाळाच्या इच्छांना सोडून प्राप्ती स्वरूप बना तर सदैव प्रसन्नचित्त रहाल.

सुविचार:-
परमात्म प्रेमामध्ये लवलिन रहा तर मायेचे आकर्षण समाप्त होईल.