29-03-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुम्हाला ज्ञानामुळे एक नवीन जागृती आली आहे, तुम्ही आपल्या ८४ जन्मांना, निराकार आणि साकार पित्याला जाणता, तुमचे भटकणे बंद झाले”

प्रश्न:-
ईश्वराची गत मत न्यारी का गायली गेली आहे?

उत्तर:-
१. कारण ते असे मत देतात ज्याद्वारे तुम्ही ब्राह्मण सर्वात न्यारे बनता. तुम्हा सर्वांचे एक मत होते. २. ईश्वरच आहेत जे सर्वांची सद्गती करतात. पुजारीपासून पूज्य बनवितात म्हणून त्यांची गत मत न्यारी आहे, ज्याला तुम्हा मुलांशिवाय कोणीही समजू शकत नाही.

ओम शांती।
तुम्ही मुले जाणता, मुलांची जर तब्येत ठीक नसेल तर बाबा म्हणतील भले इथे झोपून रहा. यामध्ये काही हरकत नाही कारण सिकीलधी मुले आहेत अर्थात ५ हजार वर्षा नंतर पुन्हा येऊन भेटला आहात. कोणाला भेटला आहात? बेहदच्या बाबांना. हे देखील तुम्ही मुले जाणता, ज्यांना निश्चय आहे की, खरोखर आम्ही बेहदच्या बाबांना भेटलो आहोत कारण बाबा असतातच एक हदचे आणि दुसरे बेहदचे. दुःखामध्ये सर्वजण बेहदच्या बाबांची आठवण करतात. सतयुगामध्ये एकाच लौकिक पित्याला आठवण करतात कारण तिथे आहेच सुखधाम. लौकिक पिता त्याला म्हटले जाते जो या लोक मध्ये जन्म देतो. पारलौकिक पिता तर एकदाच येऊन तुम्हाला आपले बनवतात. तुम्ही राहणारे देखील बाबांसोबत अमरलोक मध्ये आहात - ज्याला परलोक, परमधाम म्हटले जाते. ते आहे परे ते परे धाम. स्वर्गाला परे ते परे म्हणणार नाही. स्वर्ग-नरक इथेच असतो. नवीन दुनियेला स्वर्ग, जुन्या दुनियेला नरक म्हटले जाते. आता आहे पतित दुनिया, बोलावतात देखील - हे पतित-पावन या. सतयुगामध्ये असे म्हणणार नाहीत. जेव्हा पासून रावण राज्य होते तेव्हा पतित बनतात, त्याला म्हणणार ५ विकांराचे राज्य. सतयुगामध्ये आहेच निर्विकारी राज्य. भारताची किती जबरदस्त महिमा आहे. परंतु विकारी असल्या कारणाने भारताच्या महिमेला जाणत नाहीत. भारत संपूर्ण निर्विकारी होता, जेव्हा हे लक्ष्मी-नारायण राज्य करत होते. आता ते राज्य नाही आहे. ते राज्य कुठे गेले - हे पत्थर-बुद्धी वाल्यांना माहित नाही. बाकीचे सर्व आपल्या-आपल्या धर्म स्थापकाला जाणतात, एकच असे भारतवासी आहेत जे ना आपल्या धर्माला जाणत, ना धर्म स्थापकाला जाणत. इतर धर्माचे आपल्या धर्माला तरी जाणतात परंतु ते पुन्हा केव्हा स्थापन करण्यासाठी येतील, हे जाणत नाहीत. शीख लोकांना देखील हे माहीत नाही आहे की, आपला शीख धर्म अगोदर नव्हता. गुरुनानकनी येऊन स्थापन केला म्हणजे मग जरूर सुखधाममध्ये असणार नाही, तेव्हाच तर गुरुनानक येऊन पुन्हा स्थापन करतील कारण दुनियेचा इतिहास-भूगोल रिपीट होतो ना. ख्रिश्चन धर्म सुद्धा नव्हता नंतर स्थापना झाली. पहिली नवीन दुनिया होती, एकच धर्म होता. फक्त तुम्ही भारतवासीच होता, एक धर्म होता आणि मग तुम्ही ८४ जन्म घेत-घेत हे देखील विसरला आहात की, आम्हीच देवता होतो. मग आम्हीच ८४ जन्म घेतो म्हणूनच बाबा म्हणतात - तुम्ही तुमच्या जन्मांना जाणत नाही, मी सांगतो. अर्धा कल्प रामराज्य होते मग रावण राज्य झाले. पहिले आहे सूर्यवंशी घराणे मग चंद्रवंशी घराणे - रामराज्य. सूर्यवंशी लक्ष्मी-नारायणाच्या घराण्याचे राज्य होते, जे सूर्यवंशी लक्ष्मी-नारायणाच्या घराण्याचे होते, ते ८४ जन्म घेऊन आता रावणाच्या घराण्याचे बनले आहेत. पूर्वी पुण्य-आत्म्यांच्या घराण्याचे होते, आता पाप-आत्म्यांच्या घराण्याचे बनले आहेत. ८४ जन्म घेतले आहेत, ते तर ८४ लाख म्हणतात. आता ८४ लाखाचा कोण बसून विचार करेल म्हणून कोणाचा विचार चालतच नाही. आता तुम्हाला बाबांनी समजावून सांगितले आहे, तुम्ही बाबांच्या समोर बसला आहात, निराकार पिता आणि साकार पिता दोघेही भारतामध्ये नामीग्रामी आहेत. गातात देखील परंतु बाबांना जाणत नाहीत, अज्ञानाच्या निद्रेमध्ये झोपलेले आहेत. ज्ञानानेच जागृती येते. प्रकाशामध्ये मनुष्य कधी धक्का खात नाही. अंधारामध्ये धक्के खात राहतात. भारतवासी पूज्य होते, आता पुजारी आहेत. लक्ष्मी-नारायण पूज्य होते ना, हे कोणाची पूजा करतील. आपले चित्र बनवून आपली पूजा तर करणार नाहीत. हे होऊ शकत नाही. तुम्ही मुले जाणता - आपणच पूज्य, तेच मग कसे पुजारी बनतो. या गोष्टी इतर कोणीही समजू शकत नाही. बाबाच समजावून सांगतात; म्हणूनच म्हणतात देखील - ‘ईश्वर की गत मत न्यारी है’.

आता तुम्ही मुले जाणता बाबांनी आमची गत मत संपूर्ण दुनियेपेक्षा न्यारी केली आहे. संपूर्ण दुनियेमध्ये अनेक मत-मतांतरे आहेत, इथे तुम्हा ब्राह्मणांचे आहे एक मत. ईश्वराची मत आणि गत. गत अर्थात सद्गती. सद्गती दाता एक बाबाच आहेत. गातात देखील - सर्वांचे सद्गती दाता राम. परंतु समजत नाहीत की राम कोणाला म्हटले जाते. म्हणतील - ‘जिकडे पहावे रामच राम आहेत’, याला म्हटले जाते अज्ञान अंध:कार. अंधारामध्ये आहे - दुःख, प्रकाशामध्ये आहे - सुख. अंधारामध्येच बोलावतात ना. आराधना करणे म्हणजे बाबांना बोलावणे, भीक मागतात ना. देवतांच्या मंदिरामध्ये जाऊन भीक मागणे झाले ना. सतयुगामध्ये भीक मागण्याची गरज नाही. भिकाऱ्याला इनसॉल्वेंट (दिवाळखोर) म्हटले जाते. सतयुगामध्ये तुम्ही किती सॉल्वेंट (पावन) होता, त्याला म्हटले जाते पवित्र. भारत आता इनसॉल्वेंट (पतित) आहे. हे देखील कोणी समजत नाहीत. कल्पाचा कालावधी उलटा-सुलटा लिहिल्याने लोकांचे डोकेच फिरले आहे. बाबा खूप प्रेमाने बसून समजावून सांगतात. कल्पापूर्वी देखील मुलांना समजावून सांगितले होते - ‘मज पतित-पावन पित्याची आठवण करा तर तुम्ही पावन बनाल’. पतित कसे बनला आहात, विकारांची भेसळ पडली आहे. सर्व मनुष्यांना गंज चढलेली आहे. आता ती गंज कशी निघेल? माझी आठवण करा. देह-अभिमान सोडून देही-अभिमानी बना. स्वतःला आत्मा समजा. पहिले तुम्ही आत्मा आहात नंतर मग शरीर घेता. आत्मा तर अमर आहे, शरीराचा मृत्यू होतो. सतयुगाला म्हटले जाते अमरलोक. कलियुगाला म्हटले जाते मृत्यूलोक. दुनियेमध्ये हे कोणीही जाणत नाहीत की अमरलोक होते मग मृत्यूलोक कसे बनले. अमरलोक अर्थात अकाली मृत्यू होत नाही. तिथे आयुर्मान देखील मोठे असते. ती आहेच पवित्र दुनिया.

तुम्ही राजऋषी आहात. ऋषी पवित्र असणाऱ्याला म्हटले जाते. तुम्हाला पवित्र कोणी बनवले? त्यांना शंकराचार्य बनवतात, तुम्हाला शिवाचार्य बनवत आहेत. हे (ब्रह्मा बाबा) काही शिकलेले नाहीत. यांच्याद्वारे तुम्हाला शिवबाबा येऊन शिकवतात. शंकराचार्याने तर गर्भातून जन्म घेतला, काही वरून अवतरीत झालेले नाहीत. बाबा तर यांच्यामध्ये प्रवेश करतात, येतात, जातात, मालक आहेत, ज्यांच्यामध्ये पाहिजे त्यांच्यामध्ये प्रवेश करू शकतात. बाबांनी समजावून सांगितले आहे - मी कोणाचे कल्याण करण्या अर्थ प्रवेश करतो. आता तर पतित शरीरामध्येच आहे ना. अनेकांचे कल्याण करतो. मुलांना समजावून सांगितले आहे - माया देखील काही कमी नाहीये. कधी-कधी ध्यानामध्ये माया प्रवेश करून उलटे-सुलटे वदवून घेत राहते त्यामुळे मुलांनी खूप काळजी घ्यायची आहे. कितीतरी जणांमध्ये जेव्हा माया प्रवेश करते तर म्हणतात - मी शिव आहे, अमका आहे. माया अतिशय दुष्ट आहे. समजूतदार मुले चांगल्या रीतीने समजतील की, हा कोणाचा प्रवेश आहे. त्यांचे ठरलेले शरीर तर हेच आहे ना. मग इतरांचे आपण ऐकावेच का! जर ऐकत असाल तर बाबांना विचारा ही गोष्ट राईट आहे की नाही? बाबा लगेच समजावून सांगतील. बऱ्याच ब्राह्मणी देखील या गोष्टींना समजू शकत नाहीत की हे काय आहे. कोणामध्ये तर अशी प्रवेशता होते जे चापट देखील मारतात, शिव्या सुद्धा देऊ लागतात. आता बाबा थोडीच शिवी देतील. या गोष्टींना देखील बरीच मुले समजू शकत नाहीत. फर्स्टक्लास मुले देखील कुठे-कुठे विसरतात. सर्व गोष्टी विचारल्या पाहिजेत कारण बऱ्याच जणांमध्ये माया प्रवेश करते. मग ध्यानामध्ये जाऊन काय-काय बोलत राहतात. यामध्ये देखील खूप काळजी घेतली पाहिजे. बाबांना पूर्ण समाचार दिला पाहिजे. अमक्यामध्ये मम्मा येते, अमक्यामध्ये बाबा येतात; या सर्व गोष्टींना सोडून बाबांचा एकच आदेश आहे की, मामेकम् (मज एकाची) आठवण करा. बाबांची आणि सृष्टीचक्राची आठवण करा. रचयिता आणि रचनेची आठवण करणाऱ्याचा चेहरा सदैव हर्षित राहील. असे भरपूर आहेत ज्यांना आठवण करणे होत नाही. कर्म-बंधन खूप भारी आहे. विवेक म्हणतो - जेव्हा की बेहदचे पिता मिळाले आहेत, म्हणतात माझी आठवण करा तर मग का नाही आपण आठवण करावी. काहीही होते तर बाबांना विचारा. बाबा सांगतील कर्मभोग तर अजून राहिलेला आहे ना. कर्मातीत अवस्था होईल तर मग तुम्ही सदैव हर्षित रहाल. तोपर्यंत काही ना काही होते. हे देखील जाणता - ‘मिरुआ मौत मलुका शिकार’. विनाश होणार आहे. तुम्ही फरिश्ते बनता. बाकी थोडे दिवस या दुनियेमध्ये आहात मग तुम्हा मुलांना हे स्थूलवतन आवडणार नाही. सूक्ष्म वतन आणि मूल वतन आवडेल. सूक्ष्म वतनवासींना म्हटले जाते फरिश्ते. ते फार थोडा वेळ बनता जेव्हा की तुम्ही कर्मातीत अवस्थेला प्राप्त करता. सूक्ष्म वतनमध्ये हड्डी-मांस नाही. हड्डी-मांस नाही तर मग बाकी काय राहिले? फक्त सूक्ष्म शरीर असते! असे नाही की निराकार बनतो. नाही, सूक्ष्म आकार राहतो. तिथे मूवी (संकल्पाची) भाषा चालते. आत्मा आवाजापासून परे आहे. त्याला म्हटले जाते - सटल वर्ल्ड (सूक्ष्म दुनिया). सूक्ष्म आवाज असतो. इथे आहे टॉकी (आवाज). मग मूवी नंतर मग आहे सायलेन्स. इथे बोलणे होते. हा ड्रामाचा पूर्व-नियोजित पार्ट आहे. तिथे (शांतीधाममध्ये) आहे सायलेन्स. ते (सूक्ष्म वतन) आहे मूवी आणि हे (साकार वतन) आहे टॉकी. या तिन्ही लोकांना देखील आठवण करणारे कोणी विरळेच असतील. बाबा म्हणतात - मुलांनो, सजे पासून सुटण्यासाठी कमीत-कमी ८ तास कर्मयोगी बनून कर्म करा, ८ तास आराम करा आणि ८ तास बाबांची आठवण करा. याच प्रॅक्टिसने तुम्ही पावन बनाल. झोप घेता, ती काही बाबांची आठवण नाहीये. असे देखील कोणी समजू नये की, आम्ही बाबांची तर मुले आहोतच ना मग आठवण कशासाठी करायची. नाही, बाबा तर म्हणतात माझी तिथे (शांतीधाममध्ये) आठवण करा. स्वतःला आत्मा समजून माझी आठवण करा. जोपर्यंत योगबलाने तुम्ही पवित्र बनणार नाही तोपर्यंत तुम्ही घरी देखील जाऊ शकत नाही. नाहीतर मग सजा खाऊन जावे लागेल. सूक्ष्म वतन, मूल वतनमध्ये देखील जायचे आहे आणि मग यायचे आहे स्वर्गामध्ये. बाबांनी समजावून सांगितले आहे पुढे चालून वर्तमानपत्रांमध्ये देखील येईल, आता तर खूप वेळ बाकी आहे. इतकी सारी राजधानी स्थापन होते. साउथ, नॉर्थ, ईस्ट, वेस्ट भारताचा एरिया किती आहे. आता वर्तमानपत्रांद्वारेच आवाज होईल. बाबा म्हणतात - माझी आठवण करा तर तुमची पापे नष्ट होतील. बोलावतात देखील - ‘हे पतित-पावन, लिबरेटर आम्हाला दुःखातून सोडवा. मुले जाणतात ड्रामा प्लॅन अनुसार विनाश देखील होणार आहे. या लढाई नंतर मग शांतीच शांती होईल, सुखधाम होईल. संपूर्ण उलथा-पालथ होईल. सतयुगामध्ये असतोच एक धर्म. कलियुगामध्ये आहेत अनेक धर्म. हे तर कोणीही समजू शकतात. सर्वात पहिले आदि सनातन देवी-देवता धर्म होता, जेव्हा सूर्यवंशी होते तेव्हा चंद्रवंशी नव्हते नंतर मग चंद्रवंशी असतात. नंतर हा देवी-देवता धर्म प्राय: लोप होतो. मागाहून मग बाकीचे धर्मवाले येतात. ते देखील त्यांची संस्था जोपर्यंत वृद्धीला प्राप्त होत नाही तोपर्यंत माहीत थोडेच होईल. आता तुम्ही मुले सृष्टीच्या आदि-मध्य-अंताला जाणता. तुम्हाला विचारतील शिडीच्या चित्रा मध्ये फक्त भारतवासीयांनाच का दाखवले आहे? बोला, हा खेळ आहे भारतावर. अर्धा कल्प आहे त्यांचा पार्ट, बाकी द्वापर, कलियुगामध्ये इतर सर्व धर्म येतात. गोळ्यामध्ये (सृष्टीचक्राच्या चित्रामध्ये) हे संपूर्ण नॉलेज आहे. गोळ्याचे चित्र तर एकदम फर्स्टक्लास आहे. सतयुग-त्रेतामध्ये आहे श्रेष्ठाचारी दुनिया. द्वापर-कलियुग आहे भ्रष्टाचारी दुनिया. आता तुम्ही संगमावर आहात. या ज्ञानाच्या गोष्टी आहेत. हे चार युगांचे चक्र कसे फिरते - हे कोणालाच माहित नाही आहे. सतयुगामध्ये या लक्ष्मी-नारायणाचे राज्य असते. यांना देखील हे थोडेच माहित असते की सतयुगानंतर मग त्रेता येणार आहे, त्रेता नंतर मग द्वापर, कलियुग येणार आहे. इथे देखील मनुष्यांना बिल्कुल माहित नाही आहे. भले म्हणतात परंतु चक्र कसे फिरते, हे कोणीही जाणत नाहीत म्हणून बाबांनी सांगितले आहे - सर्व जोर गीतेवर द्या. सच्ची गीता ऐकल्याने स्वर्गवासी बनतात. इथे (बी. के. ना) शिवबाबा स्वतः ऐकवतात, तिथे (भक्तीमध्ये) मनुष्य वाचतात. गीता देखील सर्वात पहिले तुम्हीच वाचता. भक्तीमध्ये देखील सर्वात पहिले तर तुम्हीच जाता ना. शिवाचे पुजारी पहिले तुम्हीच बनता. सर्वात पहिली एका शिवबाबांची अव्यभिचारी पूजा तुम्हाला सुरु करायची असते. सोमनाथाचे मंदिर बनविण्याची ताकद इतर कोणामध्ये थोडीच आहे. बोर्डावर किती प्रकारच्या गोष्टी लिहू शकता. हे देखील लिहू शकता भारतवासी सच्ची गीता ऐकल्याने सचखंडाचे मालक बनतात.

आता तुम्ही मुले जाणता आपण सच्ची गीता ऐकून स्वर्गवासी बनत आहोत. जेव्हा तुम्ही समजावून सांगता तेव्हा म्हणतात - हो, अगदी बरोबर आहे, ठीक आहे आणि बाहेर गेले की संपले. तिथली गोष्ट तिथेच राहते. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) रचयिता आणि रचनेचे ज्ञान आठवून नेहमी हर्षित रहायचे आहे. आठवणीच्या यात्रेद्वारे आपली जुनी सर्व कर्मबंधने नष्ट करून कर्मातीत अवस्था बनवायची आहे.

२) ध्यान-दीदारामध्ये (साक्षात्कारामध्ये) मायेची खूप प्रवेशता होते, त्यामुळे काळजी घ्यायची आहे, बाबांना समाचार देऊन सल्ला घ्यायचा आहे, कोणतीही चूक करायची नाही.

वरदान:-
आपल्या शुभ भावने द्वारे कमजोर आत्म्यांमध्ये बळ भरणारे सदा शक्ती स्वरूप भव सेवाधारी मुलांची विशेष सेवा आहे - स्वतः शक्ती स्वरूप राहणे आणि सर्वांना शक्ती स्वरूप बनविणे अर्थात कमजोर आत्म्यांमध्ये बळ भरणे, यासाठी नेहमी शुभ भावना आणि श्रेष्ठ कामना स्वरूप बना. शुभ भावनेचा अर्थ हा नाही की कोणामध्ये भावना ठेवता-ठेवता त्याच्याच भावविवश व्हाल. ही चूक करायची नाही. शुभ भावना देखील बेहदची असावी. फक्त एका प्रती विशेष भावना ठेवणे हे देखील नुकसानकारक आहे, त्यामुळे बेहदमध्ये स्थित होऊन कमजोर आत्म्यांना आपल्याला प्राप्त झालेल्या शक्तींच्या आधारे शक्ती स्वरूप बनवा.

बोधवाक्य:-
अलंकार ब्राह्मण जीवनाचा शृंगार आहे - म्हणून ‘अलंकारी’ बना ‘देह-अहंकारी’ नाही.

अव्यक्त इशारे - सत्यता आणि सभ्यता रुपी कल्चरला धारण करा. काही मुले म्हणतात - मला तसा तर क्रोध येत नाही, परंतु कोणी खोटे बोलतो तेव्हा क्रोध येतो. तो खोटे बोलला, तुम्ही क्रोधाने बोललात तर दोघांमध्ये राईट कोण? बरेचजण चतुराईने म्हणतात की, आम्ही क्रोध करत नाही, आमचा आवाजच मोठा आहे, आवाजच असा कर्कश आहे परंतु जेव्हा सायन्सच्या साधनांद्वारे आवाजाला कमी-जास्त करू शकता तर काय सायलेन्सच्या शक्तीने आपल्या आवाजाच्या गतीला कमी-जास्त करू शकत नाही?