29-06-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - शरीरा सहित जे काही दिसते आहे, ते सर्व नष्ट होणार आहे, तुम्हा आत्म्यांना आता घरी परतायचे आहे त्यामुळे जुन्या दुनियेला विसरा’’

प्रश्न:-
तुम्ही मुले कोणत्या शब्दांमध्ये सर्वांना बाबांचा मेसेज सांगू शकता?

उत्तर:-
सर्वांना सांगा की बेहदचे बाबा बेहदचा वारसा देण्यासाठी आले आहेत. आता हदच्या वारशाचा वेळ संपला आहे अर्थात भक्ती पूर्ण झाली. आता रावण राज्य संपुष्टात येत आहे. बाबा आले आहेत तुम्हाला रावण रुपी ५ विकारांच्या जेल मधून सोडविण्यासाठी. हे पुरुषोत्तम संगमयुग आहे, यामध्ये तुम्हाला पुरुषार्थ करून दैवी गुणवाले बनायचे आहे. केवळ पुरुषोत्तम संगम युगाला जरी समजून घ्याल तरी स्थिती श्रेष्ठ बनू शकते.

ओम शांती।
आता रुहानी मुले काय करत आहेत? अव्यभिचारी आठवणीमध्ये बसली आहेत. एक असते अव्यभिचारी आठवण, दुसरी असते व्यभिचारी आठवण. अव्यभिचारी आठवण अथवा अव्यभिचारी भक्तीला जेव्हा सुरूवात होते तेव्हा सर्व शिवाची पूजा करतात. उच्च ते उच्च भगवान तेच आहेत, ते पिता देखील आहेत, आणि मग शिक्षक देखील आहेत. शिकवतात. काय शिकवतात? मनुष्या पासून देवता बनवतात. देवता पासून मनुष्य बनण्यामध्ये तुम्हा मुलांना ८४ जन्म लागले आहेत. तर मनुष्या पासून देवता बनण्यामध्ये एक सेकंद लागतो. हे तर मुले जाणतात - आम्ही बाबांच्या आठवणीमध्ये बसलो आहोत. ते आपले टीचर देखील आहेत, सद्गुरु देखील आहेत. योग शिकवतात की एकाच्या आठवणीमध्ये रहा. ते स्वतः म्हणतात - हे आत्म्यांनो, हे मुलांनो, देहाचे सर्व संबंध सोडा, आता परत जायचे आहे. ही जुनी दुनिया बदलत आहे. आता इथे रहायचे नाहीये. जुन्या दुनियेच्या विनाशासाठीच हा दारू-गोळा इत्यादी बनवलेला आहे. नैसर्गिक आपत्ती देखील मदत करतात. विनाश तर होणार आहे जरूर. तुम्ही पुरुषोत्तम संगमयुगावर आहात. हे आत्मा जाणते की, आपण आता परत जात आहोत; यासाठीच बाबा म्हणतात - ही जुनी दुनिया आणि जुन्या देहाला देखील सोडायचे आहे. देहा सहित जे काही या दुनियेमध्ये पाहण्यात येते हे सर्व नष्ट होणार आहे. शरीर देखील नष्ट होणार आहे. आता आम्हा आत्म्यांना घरी जायचे आहे. गेल्या शिवाय नवीन दुनियेमध्ये येऊ शकणार नाही. आता तुम्ही पुरुषोत्तम बनण्याचा पुरुषार्थ करत आहात. पुरुषोत्तम आहेत हे देवता. सर्वात उच्च ते उच्च आहेत निराकार बाबा. मग मनुष्य सृष्टीमध्ये या, तर यामध्ये आहेत उच्च देवता. ते देखील मनुष्यच आहेत परंतु दैवी गुणवाले. नंतर तेच मग आसुरी गुणवाले बनतात. आता पुन्हा आसुरी गुणांपासून दैवी गुणांमध्ये जावे लागेल. सतयुगामध्ये जावे लागेल. कोणाला? तुम्हा मुलांना. तुम्ही मुले शिकत आहात इतरांना देखील शिकवता. फक्त बाबांचा मेसेज द्यायचा आहे. बेहदचे बाबा बेहदचा वारसा देण्यासाठी आले आहेत. आता हदचा वारसा पूर्ण होतो.

बाबांनी समजावून सांगितले आहे - सर्व मनुष्य ५ विकार रुपी रावणाच्या जेलमध्ये आहेत. सर्वजण दु:खच झेलत आहेत. सुकी भाकरी मिळते. बाबा येऊन सर्वांना रावणाच्या जेलमधून सोडवून कायम सुखी बनवतात. मनुष्याला देवता, बाबांशिवाय इतर कोणीही बनवू शकणार नाही. तुम्ही इथे बसले आहात, मनुष्या पासून देवता बनण्यासाठी. आता आहे कलियुग. अनेक धर्म झाले आहेत. तुम्हा मुलांना रचता आणि रचनेचा परिचय स्वतः बाबा बसून देतात. तुम्ही फक्त ‘ईश्वर’, ‘परमात्मा’ म्हणत होता. तुम्हाला हे माहीत नव्हते की ते पिता देखील आहेत, टीचर देखील आहेत, गुरु देखील आहेत. त्यांना म्हटले जाते - ‘सद्गुरु’. अकाल मूर्त देखील म्हटले जाते. तुम्हाला ‘आत्मा’ आणि ‘जीव’ म्हटले जाते. ते अकाल मूर्त या शरीर रुपी तख्तावर बसले आहेत. ते जन्म घेत नाहीत. तर ते अकालमूर्त बाबा मुलांना समजावून सांगत आहेत - माझा स्वतःचा रथ नाहीये, मी तुम्हा मुलांना पावन कसे बनवू! मला तर रथ पाहिजे ना. अकालमूर्तला सुद्धा तख्त तर पाहिजे. अकाल तख्त मनुष्याचे असते, इतर कोणाचे असत नाही. तुम्हा प्रत्येकाला तख्त पाहिजे. अकाल मूर्त आत्मा इथे विराजमान आहे. ते सर्वांचे पिता आहेत, त्यांना म्हटले जाते महाकाळ, ते पुनर्जन्मामध्ये येत नाहीत. तुम्ही आत्मे पुनर्जन्मामध्ये येता. मी येतो कल्पाच्या संगमयुगावर. भक्तीला - रात्र, ज्ञानाला - दिवस म्हटले जाते. हे पक्के लक्षात ठेवा. मुख्य आहेतच दोन गोष्टी - अल्फ आणि बे, बाबा आणि बादशाही. बाबा येऊन बादशाही देतात आणि बादशाहीसाठी शिकवतात म्हणून याला पाठशाळा देखील म्हटले जाते. भगवानुवाच, भगवान तर आहेत निराकार. त्यांचा देखील पार्ट असायला हवा. ते आहेत उच्च ते उच्च भगवान, त्यांची सर्वजण आठवण करतात. बाबा म्हणतात - असा कोणी मनुष्य नसेल जो भक्तिमार्गामध्ये आठवण करत नसेल. अंत:करणापासूनच सर्व बोलावतात - ‘हे भगवान, हे लिब्रेटर, ओ गॉड फादर’, कारण ते आहेत सर्व आत्म्यांचे पिता, जरूर बेहदचे सुख देतील. हदचा पिता हदचे सुख देतो. कोणालाच माहित नाही आहे. आता बाबा आले आहेत, म्हणतात - ‘मुलांनो, इतर संग तोडून मज एका बाबांची आठवण करा. बाबांनी हे देखील सांगितले आहे की तुम्ही देवी-देवता नवीन दुनियेमध्ये राहता. तिथे तर अपार सुख आहे. त्या सुखांचा अंत नाही. नवीन घरामध्ये नेहमी सुख असते, जुन्यामध्ये दुःख असते. तेव्हाच तर वडील मुलांसाठी नवीन घर बांधतात. मुलांचा बुद्धीयोग नवीन घरामध्ये जातो. ही तर झाली हदची गोष्ट. आता तर बेहदचे बाबा नवीन दुनिया बनवत आहेत. जुन्या दुनियेमध्ये जे काही पाहता ते कब्रस्तान होणार आहे, आता परिस्तान स्थापन होत आहे. तुम्ही संगमयुगावर आहात. कलियुगाकडे सुद्धा पाहू शकता, सतयुगाकडे देखील पाहू शकता. तुम्ही संगमावर साक्षी होऊन पाहता. प्रदर्शनीमध्ये अथवा म्युझियममध्ये येतात तर तिथे देखील तुम्ही संगमावर उभे करा. या बाजूला आहे कलियुग त्या बाजूला आहे सतयुग; आपण मध्येच आहोत. बाबा नवीन दुनिया स्थापन करतात. जिथे फार थोडे मनुष्य असतात. दुसऱ्या कोणत्याही धर्माचा येत नाही. केवळ तुम्हीच सर्वात पहिले येता. आता तुम्ही स्वर्गामध्ये जाण्याचा पुरुषार्थ करत आहात. पावन होण्यासाठीच मला बोलावले आहे की, ‘हे बाबा, आम्हाला पावन बनवून पावन दुनियेमध्ये घेऊन जा’. असे म्हणत नाही की, शांतीधाममध्ये घेऊन चला. परमधामला म्हटले जाते स्वीट होम. आता आपल्याला घरी जायचे आहे, ज्याला मुक्तिधाम म्हटले जाते, ज्याच्यासाठीच संन्याशी इत्यादी शिकवण देतात. ते सुखधामचे ज्ञान देऊ शकत नाहीत. ते आहेत निवृत्ती मार्गवाले. तुम्हा मुलांना समजावून सांगितले गेले आहे - कोणते धर्म केव्हा येतात. मनुष्य सृष्टी रुपी झाडामध्ये सर्वात पहिले फाउंडेशन तुमचे आहे. बीजाला म्हटले जाते वृक्षपती. बाबा म्हणतात - ‘मी वृक्षपती वर निवास करतो. जेव्हा झाड एकदम जड-जडीभूत होते, तेव्हा मी येतो देवता धर्म स्थापन करण्यासाठी’. बनेन ट्री (वडाचे झाड) खूप वंडरफुल झाड आहे. बिना फाउंडेशन बाकी संपूर्ण झाड उभे आहे. या बेहदच्या झाडामध्ये देखील आदि सनातन देवी-देवता धर्म नाही आहे. बाकी सर्व धर्म अस्तित्वात आहेत.

तुम्ही मूलवतन निवासी होता. इथे पार्ट बजावण्यासाठी आले आहात. तुम्ही मुले ऑलराऊंड पार्ट बजावणारे आहात म्हणून जास्तीत जास्त ८४ जन्म आहेत आणि किमान एक जन्म. आणि मनुष्य म्हणतात ८४ लाख जन्म. ते देखील कोणाचे असतील - ते देखील समजू शकत नाहीत. बाबा येऊन तुम्हा मुलांना समजावून सांगत आहेत - ‘८४ जन्म तुम्ही घेता. सर्वात आधी तुम्ही माझ्या पासून वेगळे होता. पहिले असतात सतयुगी देवता. जेव्हा ते आत्मे इथे पार्ट बजावतात तर बाकी सर्व आत्मे कुठे निघून जातात? हे देखील तुम्हीच जाणता - बाकी सर्व आत्मे शांतीधाममध्ये असतात. तर शांतीधाम वेगळे झाले ना. बाकी दुनिया तर हीच आहे. पार्ट इथे बजावतात. नवीन दुनियेमध्ये सुखाचा पार्ट, जुन्या दुनियेमध्ये दुःखाचा पार्ट बजावावा लागतो. सुख आणि दुःखाचा हा खेळ आहे. ते आहे रामराज्य. दुनियेमध्ये कोणताही मनुष्य हे जाणत नाही की सृष्टीचे चक्र कसे फिरते. ना रचयित्याला, ना रचनेच्या आदि-मध्य-अंताला जाणत. ज्ञानाचा सागर एका बाबांनाच म्हटले जाते. रचयिता आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान कोणत्याही शास्त्रामध्ये नाही. मी तुम्हाला ऐकवतो. नंतर मग हे प्राय: लोप होते. सतयुगामध्ये हे राहत नाही. भारताचा प्राचीन सहज राजयोग प्रसिद्ध आहे. गीतेमध्ये देखील ‘राजयोग’ नाव येते. बाबा तुम्हाला राजयोग शिकवून राजाईचा वारसा देतात. बाकी रचनेकडून वारसा मिळू शकत नाही. वारसा मिळतोच रचता बाबांकडून. प्रत्येक मनुष्य क्रियेटर आहे, मुलांना रचतात. ते आहेत हदचे ब्रह्मा, हे आहेत बेहदचे ब्रह्मा. ते आहेत निराकार आत्म्यांचे पिता, ते लौकिक पिता, हे मग आहेत प्रजापिता. प्रजापिता कधी अस्तित्वात असला पाहिजे? सतयुगामध्ये का? नाही. पुरुषोत्तम संगमयुगावर असला पाहिजे. मनुष्यांना हे देखील माहित नाही आहे की सतयुग कधी असते. त्यांनी तर सतयुग, कलियुग इत्यादींना लाखो वर्षे दिली आहेत. बाबा समजावून सांगत आहेत १२५० वर्षांचे एक युग असते. ८४ जन्मांचा देखील हिशोब पाहिजे ना. शिडीचा देखील हिशोब पाहिजे ना - आपण कसे उतरतो. सर्वात पहिले फाउंडेशनमध्ये आहे देवी-देवता. त्यांच्या नंतर मग येतात इस्लामी, बौध्दि. बाबांनी झाडाचे रहस्य देखील सांगितले आहे. बाबांशिवाय तर कोणी शिकवू शकत नाही. तुम्हाला विचारतील, हि चित्रे इत्यादी कशी बनवलीत? कोणी शिकवले? तुम्ही बोला, ‘बाबांनी आम्हाला ध्यानामध्ये दाखवले, आणि मग आम्ही इथे बनवतो. मग त्याला बाबाच या रथामध्ये (ब्रह्मा बाबांच्या तनामध्ये) येऊन करेक्ट करतात की अशा प्रकारे बनवा. स्वतःच करेक्ट करतात.

श्रीकृष्णाला श्याम-सुंदर म्हणतात, परंतु मनुष्य तर समजू शकत नाहीत की असे का म्हटले जाते? तो (श्रीकृष्ण) वैकुंठाचा मालक होता तेव्हा गोरा होता, मग गावातील मुलगा सावळा बनला, म्हणून त्यालाच श्याम-सुंदर म्हणतात. हेच पहिले येतात. ततत्वम्. या लक्ष्मी-नारायणाचे राज्य चालते. आदि सनातन देवी-देवता धर्माची स्थापना कोण करतात? हे देखील कोणाला माहित नाहीये. भारताला देखील विसरून हिंदुस्थानचे रहिवासी हिंदू म्हणतात. मी भारतातच येतो. भारतामध्ये देवतांचे राज्य होते जे आता प्राय: लोप झाले आहे. मी पुन्हा स्थापना करण्यासाठी येतो. सर्वात पहिला आहेच आदि सनातन देवी-देवता धर्म. हे झाड वृद्धीला प्राप्त होत राहते. नवीन-नवीन पाने (धर्म), मठ-पंथ शेवटी येतात. तर त्यांची देखील शोभा असते. मग अंतामध्ये जेव्हा संपूर्ण झाड जड-जडीभूत अवस्थेला प्राप्त होते, तेव्हा पुन्हा मी येतो. ‘यदा यदा ही…’ आत्मा स्वतःला देखील जाणत नाही, तर पित्याला देखील जाणत नाही. स्वतःला देखील शिवी देतात, बाबांना आणि देवतांना देखील शिव्या देत राहतात. तमोप्रधान, अडाणी बनतात तेव्हा मी येतो. पतित दुनियेमध्येच यावे लागेल. तुम्ही मनुष्यांना जीवदान देता अर्थात मनुष्या पासून देवता बनवता. सर्व दुःखांपासून दूर करता, ते देखील अर्ध्याकल्पासाठी. गायन देखील आहे ना - ‘वंदे मातरम्’. कोणत्या माता, ज्यांची वंदना करतात? तुम्ही माता आहात, साऱ्या सृष्टीला स्वर्ग बनवता. भले पुरुष देखील आहेत, परंतु मेजॉरिटी मातांची आहे म्हणून बाबा मातांची महिमा करतात. बाबा येऊन तुम्हाला इतके महिमा लायक बनवितात. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) अपार सुखाच्या दुनियेमध्ये येण्यासाठी संगम युगावर उभे रहायचे आहे. साक्षी होऊन सर्व काही बघत असताना बुद्धीयोग नवीन दुनियेमध्ये लावायचा आहे. बुद्धीमध्ये रहावे आता आपण घरी परतत आहोत.

२) सर्वांना जीवनदान द्यायचे आहे, मनुष्या पासून देवता बनविण्याची सेवा करायची आहे. बेहदच्या बाबांकडून शिकून इतरांना शिकवायचे आहे. दैवी गुण धारण करायचे आहेत आणि करवून घ्यायचे आहेत.

वरदान:-
नेहमी श्रेष्ठ वेळेप्रमाणे श्रेष्ठ कर्म करत ‘ वाह-वाह ’ चे गाणे गाणारे भाग्यवान आत्मा भव

या श्रेष्ठ वेळेवर नेहमी श्रेष्ठ कर्म करत “वाह-वाह’’चे गाणे मनातून गात रहा. ‘वाह माझे श्रेष्ठ कर्म’ किंवा ‘वाह श्रेष्ठ कर्म शिकविणारे बाबा’. तर नेहमी ‘वाह-वाह!’चे गाणे गात रहा. कधी चुकूनही दुःखाचे दृश्य पाहून देखील ‘हाय’ शब्द निघता कामा नये. ‘वाह ड्रामा वाह!’ आणि ‘वाह बाबा वाह!’ जे स्वप्नामध्ये देखील नव्हते ते भाग्य घर बसल्या मिळाले. याच भाग्याच्या नशेमध्ये रहा.

बोधवाक्य:-
मन-बुद्धीला शक्तिशाली बनवा तर कोणत्याही भयग्रस्त परिस्थितीमध्ये अचल अडोल रहाल.