29-06-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड मुलांनो, स्वतःला
आत्मा समजून आत्म्याशी बोला म्हणजे मग फुलामध्ये सुगंध भरत जाईल, देह-अभिमानाची
दुर्गंधी नाहीशी होईल”
प्रश्न:-
आपला सुगंध
सर्वत्र पसरविणारी खरी फुले अथवा खरे परवाने (शिवबाबांवर पूर्णपणे बलिहार जाणारे)
कोण आहेत?
उत्तर:-
खरे फूल ते
आहेत जे अनेकांना आप समान सुगंधी फूल बनवतील. श्रीमतावर चालून शमेवर जळून मरणाऱ्या
अर्थात पूर्णपणे बलिहार जाणाऱ्या, जिवंतपणी मरणाऱ्या खऱ्या परवान्यांचा अथवा अशा
फुलांचा सुगंध आपोआपच सर्वत्र पसरतो.
गीत:-
महफिल में जल
उठी शमा…
ओम शांती।
जसे
परवान्यांनी (शिवबाबांवर पूर्णपणे बलिहार जाणाऱ्या आत्म्यांनी) गाणे ऐकले. परवाने
म्हणा अथवा फुले म्हणा, गोष्ट एकच आहे. मुले समजतात - आपण खरोखरच परवाने बनलो आहोत
की फक्त फेऱ्या मारून निघून जातो? शमेला (बाबांना) विसरून जातो. प्रत्येकाने आपल्या
मनाला विचारायचे आहे की आपण कुठपर्यंत फूल बनलो आहोत आणि ज्ञानाचा सुगंध पसरवतो का?
आपल्या सारखे फूल अजून कोणाला बनवले आहे का? हे तर मुले जाणतात - ज्ञानाचा सागर बाबा
आहेत, त्यांचा किती सुगंध आहे? जी चांगली फुले अथवा परवाने आहेत त्यांचा जरूर चांगला
सुगंध येईल. ते सदैव आनंदी राहतील आणि इतरांनाही आप समान फूल अथवा परवाने बनवतील.
फूल नाही तर कळी बनवतील. पूर्ण परवाने ते आहेत जे जिवंतपणी मरतात. बळी चढतात अथवा
ईश्वरीय संतान बनतात. एखादा श्रीमंत जेव्हा एखाद्या गरीबाच्या मुलाला दत्तक घेतो तर
मुलाला त्या श्रीमंताच्या कुशीत आल्याने मग तेच आई-वडील आठवत राहतात आणि गरीब
आई-वडिलांची आठवण विसरायला होईल. जाणतात की आपले आई-वडील गरीब आहेत परंतु आठवण
श्रीमंत आई-वडिलांची करतील, ज्यांच्याकडून धन-संपत्ती मिळते. साधू-संन्यासी इत्यादी
जे आहेत ते साधना करतात मुक्तिधाममध्ये जाण्याकरिता. सर्व जण मुक्तीसाठीच पुरुषार्थ
करतात परंतु मुक्तीचा अर्थ समजत नाहीत. कोणी म्हणतात - ‘आम्ही ज्योत ज्योतीमध्ये
विलीन होणार’. कोणी समजतात की, आपण पार निर्वाण-धाम मध्ये जातो. निर्वाण-धाममध्ये
जाण्याला ज्योतीमध्ये विलीन होणे अथवा एकरूप होणे म्हटले जात नाही. तुम्ही समजता -
आपण दूर देशाचे राहणारे आहोत. या घाणेरड्या दुनियेमध्ये राहून काय करणार. मुलांना
समजावून सांगितले आहे की जेव्हा कोणाला भेटाल तेव्हा हे समजावून सांगावे लागेल की,
हा पूर्व-नियोजित ड्रामा आहे. सतयुग, त्रेता... मग संगमयुग. हे देखील समजावून
सांगितले आहे की, सतयुगाच्या नंतर त्रेताचा संगम होतो. म्हणजेच हे युग फिरते आणि
कलियुगाच्या नंतर सतयुगाचा संगम म्हणजे हे कल्प फिरते. बाबा युगे-युगे येत नाहीत,
जसे मनुष्य समजतात. बाबा म्हणतात - जेव्हा, सर्वच तमोप्रधान बनतात, तेव्हा कलियुगाचा
अंत होतो, तेव्हा त्या कल्पाच्या संगमावर मी येतो. युग पूर्ण होते तर कला कमी होतात.
असे तर जेव्हा पूर्ण ग्रहण लागते तेव्हा मी येतो. मी युगे-युगे येत नाही. बाबा बसून
परवान्यांना समजावून सांगत आहेत. परवान्यांमध्ये देखील नंबरवार आहेत. कोणी तर जळून
मरतात (पूर्णपणे बलिहार जातात), कोणी फेरी मारून निघून जातात. श्रीमतावर तुम्हीच
चालू शकता. जर एखाद्या श्रीमतावर चालला नाहीत तर माया पीडत राहील. श्रीमताचे खूप
गायन आहे. ‘श्रीमत भगवत गीता’ म्हटले जाते. शास्त्रे तर नंतर बसून ज्यांनी बनवली,
तर त्या वेळी त्यांची बुद्धी रजो असल्यामुळे त्यांना वाटले की श्रीकृष्ण द्वापर
मध्ये आला. मी येतोच तेव्हा जेव्हा आदि सनातन देवी-देवता धर्म प्रायः लोप होतो. बाकी
सर्व धर्म असतात. असे नाही की, ते देवता धर्माचे मनुष्य अदृश्य होतात; परंतु ते हे
विसरून जातात की आपण देवी-देवता धर्माचे होतो. आपला हिंदू धर्म सांगतात, हे देखील
ड्रामामध्ये नोंदलेले आहे. जेव्हा विसरतील तेव्हाच तर मग मी येऊन देवी-देवता धर्माची
स्थापना करेन. हे एकच पिता आहेत जे येऊन आपल्याला दुःखधाम पासून सुखधामचे मालक
बनवतात. तुम्ही म्हणाल आता आपण नरकाचे मालक आहोत. दुनियेला तमोप्रधान तर बनायचेच आहे.
सर्व पतित आहेत तेव्हाच तर पावन असणाऱ्यांसमोर जाऊन वंदन करतात. आता बाबा म्हणतात,
श्रीमतावर चाला. जन्म-जन्मांतरीचे ओझे डोक्यावर खूप आहे. नाही तर त्राहि-त्राहि
करावे लागेल. ते तर समजतात, आत्मा निर्लेप आहे परंतु नाही, सुख-दुःखाचा अनुभव
आत्माच करते. हे कोणालाच समजत नाही. बाबा वारंवार समजावून सांगतात - ध्येय खूप मोठे
आहे. या वेळी तुम्ही पुरुषार्थ करता जेव्हा दु:खी आहात. तुम्ही जाणता, सतयुगामध्ये
आपण खूप सुखी राहू. तिथे हे माहीत नसणार की, आपल्याला पुन्हा दुःख-धाम मध्ये जायचे
आहे. आपण सुखामध्ये कसे आलो, किती जन्म घेऊ, हे काहीही जाणत नाही. परंतु आता तुम्ही
हे सर्व जाणता तर श्रेष्ठ कोण झाले? तुम्ही ईश्वराची संतान असल्याकारणाने जसे ईश्वर
नॉलेजफुल आहेत, तसे तुम्ही देखील नॉलेजफुल आहात. आता तुम्ही ईश्वरीय संतान आहात
परंतु नंबरवार. कोणी तर खूप उत्तम आहेत, समजतात आपण बाबांच्या मतानुसार चालत आहोत.
जितके मतावर चालाल तितके श्रेष्ठ बनाल. बाबा सन्मुख बसून मुलांना समजावून सांगत
आहेत. मुलांनो, देह-अभिमान सोडा, देही-अभिमानी बना, निरंतर आठवण करा. बाबा तर आहेतच
सदा सुखदाता. असे नाही की दुःख देखील बाबाच देतात. बाबा कधी मुलांना दुःख देणार
नाहीत. मुले आपल्या उलट्या वागणुकीमुळे दुःख प्राप्त करतात. बाबा दुःख देऊ शकत
नाहीत. म्हणतात - ‘हे भगवान संतान द्या तर कुळाची वृद्धी होईल’. मुलावर खूप प्रेम
करतात. बाकी दुःख आपल्या कर्मांमुळेच प्राप्त करतात. आता बाबा तुम्हा मुलांना खूप
सुखी बनवत आहेत. म्हणतात - श्रीमतावर चाला. आसुरी मतावर चालल्याने तुम्ही दुःख
प्राप्त करता. मुलांनो, पिता अथवा शिक्षक अथवा मोठ्यांची आज्ञा न मानल्यामुळे तुम्ही
दुःखी होता. स्वतःच दुःखदायी बनतात, मायेचे बनतात. ईश्वराचे मत आता देखील तुम्हालाच
मिळते. ईश्वरीय मताचा रिजल्ट (परिणाम) २१ जन्म चालतो, मग अर्धा कल्प मायेच्या मतावर
चालता. ईश्वर एकदाच येऊन मत देतात. माया तर अर्ध्या कल्पापासून मत देतच राहते. बाबा,
एकदाच मत देतात. मायेच्या मतावर चालल्याने १०० प्रतिशत दुर्भाग्यशाली बनता.
जी चांगली-चांगली फुले
आहेत ते त्याच आनंदामध्ये सदैव मग्न राहतील. नंबरवार आहेत ना. परवाने काही तर
बाबांचे बनून श्रीमतावर चालू लागतात. गरीबच आपला पोतामेल लिहितात. श्रीमंतांना भीती
वाटते की, इथे आमचे पैसे कोणी घेणार तर नाहीत ना. श्रीमंतांसाठी खूप कठीण आहे. बाबा
म्हणतात - मी गरीब निवाज आहे. दान देखील नेहमी गरिबांनाच दिले जाते. सुदामाची गोष्ट
आहे ना - मूठभर तांदूळ घेऊन त्याला महाल दिले. तुम्ही गरीब आहात. समजा कोणाकडे
२५-५० रुपये आहेत, त्यातून २०-२५ पैसे देतात. श्रीमंताने ५० हजार दिले तरी देखील
इक्वल होते म्हणून ‘गरीब निवाज’ नाव गायले गेले आहे. श्रीमंत लोक देखील म्हणतात,
आम्हाला सवड मिळत नाही कारण पूर्ण निश्चय नाही. तुम्ही गरीब आहात. गरिबांना धन
मिळाल्याने आनंद होतो. बाबांनी समजावून सांगितले आहे इथले गरीब तिथे श्रीमंत बनतात
आणि इथले श्रीमंत तिथे गरीब बनतात.
बरेचजण असेही म्हणतात
की, आम्ही यज्ञाची काळजी घ्यावी की कुटुंबाची काळजी घ्यावी? बाबा म्हणतात तुम्ही
तुमच्या कुटुंबाचा खूप चांगला सांभाळ करा. चांगले आहे जे तुम्ही या वेळी गरीब आहात.
श्रीमंत असता तर बाबांकडून पूर्ण वारसा घेऊ शकला नसता. संन्यासी कधी असे म्हणणार
नाहीत. ते तर पैसे घेऊन आपली जागीर बनवतात (देणगी रूपातील जमीन-जायदाद उभी करतात).
शिवबाबा थोडेच बनवतील. ही घरे इत्यादी सर्व तुम्हा मुलांनी आपल्या स्वतःसाठी बनवली
आहेत. ही कोणाची जागीर (जमीन-जायदाद) नाहीये, हे तर सर्व टेम्पररी आहे कारण अंतिम
वेळी मुलांना इथे येऊन राहायचे आहे. आपले यादगार देखील इथेच आहे. तर शेवटी इथे येऊन
विश्रांती घेतील. जे योगयुक्त असतील ते बाबांकडे पळत येतील. त्यांना मदत देखील
मिळेल. बाबांची खूप मदत मिळते. तुम्हाला इथे बसून विनाश पाहायचा आहे. जसे सुरुवातीला
बाबांनी तुम्हा मुलांचे मन रमण्यासाठी मनोरंजन केले, पुन्हा शेवटी मग मनोरंजन करायला
सुरुवात करतील. खूप प्रेम करतील. जणू वैकुंठामध्ये बसलो आहोत, खूप जवळ येत जाल. हे
तर समजता की आपण यात्रेवर आहोत. थोड्या कालावधी नंतर विनाश होईल. तुम्हाला खूप आनंद
होईल. बस्स, आपण जाऊन प्रिन्स बनणार. वेगवेगळ्या प्रकारची फुले आहेत. प्रत्येक
मुलाला समजले पाहिजे की, मी किती ज्ञानाचा सुगंध देत आहे! मी कोणाला ज्ञान आणि
योगाची शिकवण देतो का! जे हे करतात ते आतून प्रफुल्लित राहतात. बाबा ओळखतात की, हे
कोणत्या अवस्थेमध्ये राहतात. यांची अवस्था कुठ पर्यंत गॅलप करेल (वेगाने प्रगती
करेल)! वेगाने प्रगती त्यांची होईल जे परवाना बनले असतील (संपूर्ण बलिहार गेले
असतील). बाबा समजावून सांगतात - मायेची वादळे तर खूप येतील, त्यांच्यापासून स्वतःला
वाचवायचे आहे. आता हा राजयोग परमपिता परमात्मा येऊन शिकवतात. परमात्मा येऊन
आत्म्यांना समजावून सांगतात. आत्म्याला ज्ञान आहे की, मी आत्मा आपल्या या आत्मा
भावाला हे ज्ञान समजावून सांगत आहे. जसे परमात्मा बाबा आम्हा आत्मा मुलांना समजावून
सांगतात. आपण देखील आत्मा आहोत. बाबा आम्हाला शिकवतात, आणि मग मी या आत्म्यांना
समजावून सांगतो; परंतु हा आत्मिक-पणाचा निश्चय नसल्याकारणाने स्वतःला मनुष्य समजून,
मनुष्यालाच ज्ञान समजावून सांगतात. मी परम-आत्मा तुम्हा आत्म्यांशी बोलतो. तुम्ही
आत्म्याला ऐकवता. असे तुम्ही देही-अभिमानी होऊन कोणाला हे ज्ञान ऐकवाल तर ते लगेच
काळजाला भिडेल. जर स्वतःच देही-अभिमानी राहू शकत नाहीत त्यामुळे इतरांकडूनही धारणा
करवून घेऊ शकत नाहीत. हे खूप मोठे ध्येय आहे. बुद्धीमध्ये हे राहिले पाहिजे की आपण
या ऑर्गन्स द्वारे ऐकतो. बाबा म्हणतात - मी आत्म्यांशी (मुलांशी) बोलतो. बाबांचा
आदेश आहे - अशरीरी बना. देह-अभिमान सोडा, माझी आठवण करा - हे कायम बुद्धीमध्ये
राहिले पाहिजे. मी आत्म्याशी बोलतो, शरीरासोबत नाही. भले फीमेल आहे, तरी देखील मी
तिच्या आत्म्याशीच बोलतो.
तुम्ही मुले समजता -
आपण बाबांचे तर बनलो, परंतु तसे नाही आहे, यासाठी अत्यंत सूक्ष्म बुद्धीची आवश्यकता
असते. मी एक आत्मा आहे, मी यांच्या आत्म्याला समजावून सांगत आहे. हा आपला भाऊ आहे,
याला मार्ग सांगायचा आहे. हे आत्मा समजून घेत आहे असे समजा, तेव्हा आत्म्याला तीर
लागेल. देहाला पाहून ऐकवता तर आत्मा ते ऐकत नाही. अगोदर ही सूचना द्या की, मी
आत्म्याशी बोलत आहे. आत्म्याला ना मेल, ना फीमेल म्हणता येते. आत्मा तर न्यारी आहे.
मेल-फीमेल हे शरीरावरून नाव पडते. जसे ब्रह्मा-सरस्वतीला मेल-फीमेल म्हटले जाते.
शिवबाबांना ना मेल, ना फीमेल म्हणता येईल. तर बाबा आत्म्यांना समजावून सांगतात. खूप
मोठे लक्ष्य आहे. हा पॉइंट खूप प्रभावी आहे. आत्म्याला इंजेक्शन लावायचे आहे, तेव्हा
देह-अभिमान तुटतो. नाहीतर सुगंध येणार नाही, ती ताकद राहणार नाही. गोष्ट खूप छोटी
आहे. आपण आत्म्याशी बोलत आहोत. बाबा म्हणतात - तुम्हाला परत जायचे आहे म्हणून
देही-अभिमानी बना. मनमनाभव. मग ऑटोमॅटिकली मध्याजी भव अवस्था आपोआप होते. आता अतिशय
सूक्ष्म बुद्धी मिळते. पहाटे बसून विचार सागर मंथन करायचे आहे. दिवसभर तर सेवा
करायची आहे कारण कर्मयोगी आहात. लिहिलेले देखील आहे, निद्राजीत बना. रात्री जागून
कमाई करा. दिवसा तर मायेचा मोठा पसारा असतो. अमृतवेलेला वायुमंडळ चांगले असते.
बाबांना असे तर लिहित नाहीत की अमुक वेळी उठून विचार सागर मंथन करतो. खूप मेहनत आहे.
तुम्ही विश्वाचे मालक बनता. इथे तर हदचे मालक आहात. पाण्याच्या हद्दीवरून देखील किती
भांडणे होत राहतात. शत्रुता खोलवर रुजलेली आहे. आपसात एकमेकांना खऱ्या अर्थाने भाऊ
समजत नाहीत. असेच फक्त म्हणतात की, आपण सर्व एक आहोत. एक तर असू शकत नाहीत. असंख्य
आत्मे आहेत, सर्वांचा आपापला पार्ट आहे. तुम्ही इथे बसले आहात. कल्पापूर्वी देखील
बसला असाल. पान हलले ड्रामा अनुसार. असे नाही की प्रत्येक पानाला परमात्मा हलवतात.
अशा प्रकारे एक-एक गोष्टी नीट समजून घेऊन मग इतरांना समजावून सांगा. तुम्ही
प्रत्येकजण स्वतःला ओळखू शकतो की, आपण परवाना बनलो आहे का (संपूर्ण बलिहार गेलो आहे
का)! आपण बाबांच्या मतावर चालत राहतो का! फालतू गोष्टी तर करत नाही ना! आपला पैसा
कुठे पापाच्या कामासाठी तर खर्च करत नाही ना? अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) स्वतःला
आत्मा समजून आत्म्याशी बोलायचे आहे. देही-अभिमानी बनून ऐकल्याने आणि ऐकविल्याने
धारणा चांगली होईल.
२) निद्राजीत बनायचे
आहे, रात्री जागून कमाई करायची आहे. विचार सागर मंथन करायचे आहे. कोणत्याही फालतू
गोष्टींमध्ये आपला वेळ वाया घालवायचा नाही.
वरदान:-
तपस्ये द्वारे
आपल्या विकर्मांना अथवा तमोगुणी संस्कारांना भस्म करणारे तपस्वी मूर्त भव
जसे आता ईश्वरीय
पालनेचे कर्तव्य चालू आहे, तसे शेवटी तपस्येद्वारे आपल्या विकर्मांना आणि प्रत्येक
आत्म्याच्या तमोगुणी संस्कारांना अथवा प्रकृतीच्या तमोगुणाला भस्म करण्याचे कर्तव्य
(कार्य) चालणार आहे. यासाठी सदैव एकरस स्थितीच्या आसनावर स्थित होऊन आपल्या तपस्वी
रूपाला प्रत्यक्ष करा. आपल्या प्रत्येक कर्मेंद्रिया मधून देह-अभिमानाचा त्याग आणि
आत्म-अभिमानी बनण्याची तपस्या प्रत्यक्ष रूपामध्ये दिसून यावी.
बोधवाक्य:-
संस्कारांची
टक्कर होण्यापासून वाचण्याकरिता बालक आणि मालकपणाचा बॅलेन्स ठेवा.
हे अव्यक्त इशारे -
सदैव हर्षित राहण्याकरिता आपल्या नेचरला (स्वभावाला) सरळ बनवा, सहनशील बना.
बाबांना भोलानाथ
म्हणतात परंतु असे भोळे नाहीत जे सामना करू शकणार नाहीत. भोलानाथ सोबतच ऑलमाइटी
ऑथॉरिटी देखील आहेत. तुम्ही देखील आपल्या शक्ती स्वरूपाला विसरून फक्त भोळे बनू नका,
नाहीतर मायेचा गोळा लागेल. असे शक्ती स्वरूप बना जेणेकरून माया सामना करण्यापूर्वीच
नमस्कार करेल. अत्यंत सावध, आणि सजग सतर्क राहा.