29-07-2024
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
गोड
मुलांनो - बाबा आले आहेत तुम्हाला ज्ञानरत्न देण्यासाठी, मुरली ऐकविण्यासाठी,
त्यामुळे तुम्ही कधीही मुरली क्लास मिस करायचा नाही, मुरलीवर प्रेम नाही तर बाबांवर
प्रेम नाही’’
प्रश्न:-
सर्वात चांगले
कॅरेक्टर (चारित्र्य) कोणते आहे, जे तुम्ही या नॉलेजद्वारे धारण करता?
उत्तर:-
व्हाइसलेस (निर्विकारी) बनणे हे सर्वात चांगले कॅरेक्टर आहे. तुम्हाला नॉलेज मिळते
की ही सारी दुनिया विशश आहे, विशश म्हणजेच कॅरेक्टरलेस (चारित्र्यहीन). बाबा आले
आहेत वाईसलेस वर्ल्ड (निर्विकारी दुनिया) स्थापन करण्यासाठी. निर्विकारी देवता
चारित्र्यवान आहेत. चारित्र्य सुधारते बाबांच्या आठवणीने .
ओम शांती।
मुलांनो, तुम्ही मुरली क्लास कधीही चुकवता कामा नये. जर मुरली मिस केलीत तर पद
देखील मिस कराल. गोड-गोड रूहानी मुले कुठे बसली आहेत? गॉडली स्पिरिच्युअल
युनिव्हर्सिटीमध्ये (ईश्वरीय अध्यात्मिक विद्यापीठामध्ये). मुलांना हे देखील माहित
आहे की दर ५ हजार वर्षानंतर आपण या युनिव्हर्सिटीमध्ये दाखल होतो. हे देखील तुम्ही
मुले जाणता - बाबा, पिता देखील आहेत, टीचर देखील आहेत, गुरु देखील आहेत. तसे तर
गुरुची मूर्ती वेगळी, पित्याची मूर्ति वेगळी, टीचरची वेगळी असते. ही मूर्ती एकच आहे.
परंतु आहेत तिन्ही अर्थात पिता देखील बनतात, टीचर देखील बनतात, गुरु सुद्धा बनतात.
व्यक्तीच्या लाईफमध्ये हे तिन्ही मुख्य आहेत. इथे पिता, टीचर, गुरु तेच आहेत. तिन्ही
पार्ट स्वतः बजावतात. प्रत्येक गोष्ट समजून घेतल्यावर तर तुम्हा मुलांना खूप आनंद
वाटला पाहिजे आणि अशा त्रिमूर्ती युनिव्हर्सिटीमध्ये अनेकांना आणून दाखल केले पाहिजे.
ज्या युनिव्हर्सिटीमध्ये चांगले शिक्षण असते तर तिथे शिकणारे इतरांना म्हणतात - या
युनिव्हर्सिटीमध्ये शिका, इथे नॉलेज चांगले मिळते आणि कॅरेक्टर देखील सुधारतात.
तुम्हा मुलांनी सुद्धा इतरांना घेऊन यायचे आहे. माता, मातांना, पुरुष, पुरुषांना
समजावून सांगतील. पहा, हे पिता देखील आहेत, टीचर देखील आहेत, गुरु देखील आहेत. आपण
असे समजावून सांगतो की नाही, ते तर प्रत्येकाने आपल्या मनालाच विचारावे. कधी आपल्या
मित्र-संबंधींना, मैत्रिणींना समजावून सांगता का की हे सुप्रीम पिता देखील आहेत,
सुप्रीम टीचर देखील आहेत, सुप्रीम गुरु देखील आहेत? बाबा सुप्रीम देवी-देवता
बनविणारे आहेत, बाबा आप समान पिता बनवत नाहीत. बाकी त्यांची जी महिमा आहे, त्यामध्ये
आप समान बनवितात. बाबांचे काम आहे पालनपोषण करणे आणि प्रेम करणे. अशा बाबांची जरूर
आठवण करायची आहे. त्यांची तुलना इतर कोणाशी होऊ शकत नाही. भले म्हणतात गुरुद्वारे
शांती मिळते. परंतु हे तर विश्वाचे मालक बनवतात. असे देखील कोणी म्हणणार नाहीत की,
‘मी सर्व आत्म्यांचा पिता आहे’. हे कोणालाच माहित नाहीये की सर्व आत्म्यांचा पिता
कोण असू शकतो. एक बेहदचे पिता ज्यांना हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन इत्यादी सर्व ‘गॉड
फादर’ जरूर म्हणतात. बुद्धी जरूर निराकारकडे जाते. हे कोणी म्हटले? आत्म्याने म्हटले,
‘गॉडफादर’. तर जरूर भेटला पाहिजे. फक्त फादर म्हणाल आणि ते कधी भेटणारच नाहीत तर ते
फादर कसे होऊ शकतात? साऱ्या दुनियेतील मुलांची जी आशा आहे ती पूर्ण करतात. सर्वांची
कामना असते की आपण शांतीधामला जावे. आत्म्याला घराची आठवण येते. आत्मा रावण
राज्यामध्ये थकून गेली आहे. इंग्रजीमध्ये देखील म्हणतात - ‘ओ गॉड फादर, लिबरेट करा’.
तमोप्रधान बनत-बनत पार्ट बजावता-बजावता शांतीधाममध्ये निघून जाल. मग पहिले
सुखधाममध्ये येता. असे नाही, सर्वात पहिले येऊन विकारी बनता. नाही. बाबा समजावून
सांगत आहेत - ‘हे आहे वेश्यालय, रावण राज्य. याला रौरव नरक म्हटले जाते’.
भारतामध्ये किंवा या दुनियेमध्ये किती शास्त्र, किती अभ्यासाची पुस्तके आहेत, हि
सर्व नष्ट होतील. बाबा तुम्हाला ही जी सौगात देत आहेत, ती कधीही भस्म होणारी नाहीये.
हि आहे धारण करण्याची. जी वस्तू उपयोगी नसते त्याला जाळले जाते. ज्ञान काही शास्त्र
नाही जे जाळले जाईल. तुम्हाला नॉलेज मिळते, ज्याद्वारे तुम्ही २१ जन्म पद प्राप्त
करता. असे नाही की या ज्ञानाचे शास्त्र आहे जे जाळून टाकाल. नाही, हे ज्ञान आपोआपच
प्राय:लोप होते. हे ज्ञान काही वाचण्याचे पुस्तक इत्यादी नाहीये. ‘ज्ञान-विज्ञान
भवन’ नाव देखील आहे. परंतु त्यांना हे माहीत नाही की हे नाव का पडले आहे, याचा अर्थ
काय आहे? ज्ञान-विज्ञानाची महिमा किती मोठी आहे! ज्ञान अर्थात सृष्टी चक्राचे नॉलेज
जे आता तुम्ही धारण करता. विज्ञान अर्थात शांतीधाम. तुम्ही ज्ञानाच्याही पलीकडे जाता.
ज्ञानामध्ये शिक्षणाच्या आधारावर मग तुम्ही राज्य करता. तुम्ही समजता आम्हा
आत्म्यांना बाबा येऊन शिकवतात. नाही तर ‘भगवानुवाच’ नाहीसेच होईल. भगवान कोणते
शास्त्र थोडेच वाचून येतात. भगवंतामध्ये तर ज्ञान-विज्ञान दोन्ही आहेत. जो जसा असतो,
तसे बनवतात. या आहेत अति सूक्ष्म गोष्टी. ज्ञानापेक्षाही विज्ञान अति सूक्ष्म आहे.
ज्ञानाच्या पलीकडे जायचे आहे. ज्ञान स्थूल आहे, मी शिकवतो, तर आवाज होतो ना.
विज्ञान सूक्ष्म आहे यामध्ये आवाजापासून दूर शांतीमध्ये जायचे असते. ज्या शांतीसाठी
भटकतात. संन्याशांकडे जातात. परंतु जी गोष्ट बाबांकडे आहे ती दुसऱ्या कोणाकडूनही
मिळू शकत नाही. हठयोग करतात, खड्ड्यामध्ये बसतात परंतु याने काही शांती मिळू शकत
नाही, इथे तर त्रासाची काही गोष्टच नाही. शिक्षण देखील खूप सोपे आहे. ७ दिवसाचा
कोर्स घेतला जातो. ७ दिवसांचा कोर्स करून मग भले कुठेही बाहेर जा, असे इतर कोणत्याही
भौतिक कॉलेजमध्ये करू शकणार नाहीत. तुमच्यासाठी हा कोर्सच ७ दिवसांचा आहे. सर्व
समजावून सांगितले जाते. परंतु ७ दिवस कोणी देऊ शकत नाहीत. बुद्धियोग कुठे ना कुठे
निघून जातो. तुम्ही तर भट्टीमध्ये होता, कोणाचा चेहरा पाहू शकत नव्हता. कोणाशी बोलत
नव्हता. बाहेर सुद्धा पडत नव्हता. तपस्ये करीता सागर किनारी आठवणीमध्ये जाऊन बसत
होता. त्यावेळी या चक्रा विषयी समजले नव्हते. हा अभ्यास समजत नव्हता. सर्वात पहिला
तर बाबांसोबत योग पाहिजे. बाबांचा परिचय पाहिजे. नंतर मग टीचर पाहिजे. पहिले तर
बाबांसोबत योग कसा लावावा, हे देखील शिकावे लागेल कारण हे पिता आहेत अशरीरी, बाकीचे
तर कोणी मानतही नाहीत. म्हणतात - गॉडफादर ओमनी प्रेझेंट आहे. बस्स, ते
सर्वव्यापीचेच ज्ञान चालत आले आहे. आता तुमच्या बुद्धीमध्ये ती गोष्ट नाहीये. तुम्ही
तर स्टुडंट आहात. बाबा म्हणतात - ‘आपला धंदा इत्यादी भले करा परंतु क्लासमध्ये येऊन
जरूर शिका. गृहस्थ व्यवहारामध्ये भले रहा. जर तुम्ही म्हणता शाळेमध्ये जाणार नाही;
तर मग बाबा तरी काय करतील’.(?) अरे, भगवान शिकवतात, भगवान-भगवती बनविण्यासाठी!
भगवानुवाच, मी तुम्हाला राजांचाही राजा बनवतो. तर काय भगवंताकडून राजयोग शिकणार नाही?
असे मग कोण बरे टिकू शकेल! म्हणूनच तुम्हाला घर सोडून पळावे लागले. विषापासून
स्वतःला वाचविण्यासाठी पळून आलात. तुम्ही येऊन भट्टीमध्ये दाखल झालात, जिथे कोणी
पाहू शकणार नाही, भेटू शकणार नाही, कोणालाही पाहत सुद्धा नव्हता. तर मग मन कोणाशी
लावावे. हा मुलांना निश्चय देखील आहे की, स्वयं भगवान शिकवत आहेत. तरी देखील बहाणा
करतात, आजारी आहे, हे काम आहे. बाबा तर खूप शिफ्ट (टाइम) देऊ शकतात. आज काल
स्कूलमध्ये शिफ्ट खूप देतात. इथे काही जास्त अभ्यास तर नाही आहे. केवळ ‘अल्फ’ आणि
‘बे’ (बाबा आणि बादशाही) हे समजण्यासाठी बुद्धी चांगली पाहिजे. अल्फ आणि बे - यांची
आठवण करा, सर्वांना सांगा. त्रिमूर्तीचे चित्र तर बरेचजण बनवतात परंतु वरती शिवबाबा
दाखवत नाहीत. त्यांना हे थोडेच समजते की गीतेचे भगवान ‘शिव’ आहेत, ज्यांच्या द्वारे
हे नॉलेज घेऊन विष्णु बनतो. राजयोग आहे ना. आता हा आहे अनेक जन्मांतील अंतिम जन्म,
किती सोपे स्पष्टीकरण आहे. पुस्तक इत्यादी काहीच हातामध्ये नाही आहे. केवळ एक बॅज
असावा, त्यामध्ये फक्त त्रिमूर्तीचे चित्र असावे. ज्याच्यावरून समजावून सांगायचे आहे
की, बाबा कसे ब्रह्मा द्वारे शिक्षण शिकवून विष्णू समान बनवितात.
बरेचजण असे समजतात की, आपण राधे सारखे बनावे. कलश तर मातांना मिळतो. जसे काही
राधेच्या अनेक जन्मांच्या अंतिम जन्मामध्ये तिला कलश मिळतो. हे रहस्य देखील बाबाच
समजावून सांगू शकतात इतर कोणीही मनुष्य मात्र जाणत नाहीत. तुमच्याकडे सेंटरवर
कितीतरी येतात. कोणी तर एक दिवस येतात मग ४ दिवस येतच नाहीत. तर विचारले पाहिजे -
‘इतके दिवस तुम्ही काय करत होता? बाबांची आठवण करत होता का? स्वदर्शन चक्र फिरवत
होता का?’ जे खूप उशिराने येतात त्यांना लेखी सुद्धा विचारायला हवे. बरेच बदली होऊन
जातात तरी देखील कोणत्यातरी सेंटरचा तर जरूर आहे, त्यांना मंत्र मिळालेला आहे -
बाबांची आठवण करायची आहे आणि चक्राला बुद्धीमध्ये फिरवायचे आहे. बाबांनी तर खूप सोपी
गोष्ट सांगितली आहे. शब्दच दोन आहेत - मनमनाभव, माझी आठवण करा आणि वारशाची आठवण करा,
यामध्ये संपूर्ण चक्र येते. जेव्हा कोणी शरीर सोडतात तेव्हा म्हणतात - ‘अमका
स्वर्गवासी झाला’. परंतु स्वर्ग काय आहे, कोणालाच माहित नाही. तुम्ही आता समजता तिथे
तर राजाई आहे. वरपासून खालपर्यंत, श्रीमंता पासून गरिबापर्यंत सर्व सुखी असतात. इथे
आहे दुःखी दुनिया. ती आहे सुखी दुनिया. बाबा समजावून तर खूप चांगले सांगतात. भले
कोणी दुकानदार असेल किंवा कोणीही असेल, अभ्यासासाठी बहाणा करणे चांगले वाटत नाही.
येत नसतील तर त्यांना विचारायचे आहे, ‘तुम्ही बाबांची किती आठवण करता? स्वदर्शन
चक्र फिरवता?’ खा-प्या, हिंडा-फिरा - त्याला काही मनाई नाही. यासाठी देखील वेळ काढा.
इतरांचे देखील कल्याण करायचे आहे. समजा कोणाचे कपडे स्वच्छ करण्याचे (धोब्याचे) काम
आहे, तर त्यांच्याकडे खूप लोक येतात. भले मुसलमान आहेत किंवा पारसी आहेत, हिंदू
आहेत; तुम्ही बोला - बघा तुम्ही स्थूल कपडे धुता, परंतु हे जे तुमचे शरीर आहे, हे
तर जुने मिळालेले वस्त्र आहे, आत्मा सुद्धा तमोप्रधान आहे, त्याला सतोप्रधान स्वच्छ
बनवायचे आहे. ही संपूर्ण दुनिया तमोप्रधान, पतित, कलियुगी जुनी आहे. तमोप्रधाना
पासून सतोप्रधान बनण्यासाठी लक्ष्य आहे ना. आता करा अथवा नका करू, समजा अथवा नका
समजू, तुमची मर्जी. तुम्ही आत्मा आहात ना. आत्मा जरूर पवित्र असली पाहिजे. आता तर
तुमची आत्मा अशुद्ध बनली आहे. आत्मा आणि शरीर दोन्ही मळलेले आहेत. त्यांना स्वच्छ
करण्यासाठी तुम्ही बाबांची आठवण करा तर गॅरंटी आहे, तुमची आत्मा एकदम १०० टक्के
पवित्र सोने बनेल, मग दागिना (शरीर) देखील चांगला बनेल. माना अथवा नका मानू, तुमची
मर्जी. ही देखील किती सेवा झाली. डॉक्टरांकडे जा, कॉलेजेसमध्ये जा, मोठ-मोठ्यांना
जाऊन समजावून सांगा की कॅरेक्टर (चारित्र्य) खूप चांगले असले पाहिजे. इथे तर सर्व
आहेत कॅरेक्टरलेस (चारित्र्यहीन). बाबा म्हणतात निर्विकारी बनायचे आहे. निर्विकारी
दुनिया होती ना. आता विकारी आहे अर्थात चारित्र्यहीन आहे. चारित्र्य खूप खराब झाली
आहेत. निर्विकारी बनल्या शिवाय सुधारणार नाहीत. इथे मनुष्य आहेच कामी. तर आता विकारी
दुनियेपासून निर्विकारी दुनिया एक बाबाच स्थापन करतात. बाकी जुनी दुनिया विकारी
होईल. हे चक्र आहे ना. या गोळ्याच्या चित्रामध्ये स्पष्टीकरण अतिशय चांगले दिले आहे.
ही निर्विकार दुनिया होती, जिथे देवी-देवता राज्य करत होते. आता ते कुठे गेले?
आत्म्याचा तर विनाश होत नाही, एक शरीर सोडून दुसरे घेते. देवी-देवतांनी देखील ८४
जन्म घेतले आहेत. आता तुम्ही हुशार बनले आहात. पूर्वी तुम्हाला काहीच माहित नव्हते.
आता हि जुनी दुनिया किती घाणेरडी आहे, तुम्ही अनुभव करता की, बाबा जे सांगतात ते तर
एकदम बरोबर आहे. तिथे (सतयुग) तर आहेच पवित्र दुनिया. ही पवित्र दुनिया नसल्या
कारणाने स्वतःला देवता ऐवजी हिंदू नाव दिले आहे. हिंदुस्थानमध्ये राहणारे हिंदू
म्हणतात, देवता आहेत स्वर्गामध्ये. आता तुम्हाला हे चक्र समजले आहे. जे हुशार आहेत
ते चांगल्या प्रकारे समजतात; तर जसे बाबा समजावून सांगतात तसे मग पुन्हा रिपीट केले
पाहिजे (उजळणी केली पाहिजे). मुख्य-मुख्य शब्द लिहीत जा. मग ऐकवा, बाबांनी हे-हे
पॉईंट्स ऐकवले आहेत. बोला - मी तर गीतेचे ज्ञान ऐकवतो. हे गीतेचेच युग आहे. ४ युगे
आहेत, हे तर सर्वच जाणतात. हे आहे लिप युग. या संगमयुगा विषयी कोणालाच माहित नाही
आहे, तुम्ही जाणता हे पुरुषोत्तम संगम युग आहे. लोक शिवजयंती सुद्धा साजरी करतात
परंतु ते कधी आले, काय केले हे जाणत नाहीत. शिवजयंती नंतर आहे कृष्णजयंती त्यानंतर
मग राम जयंती. जगत अंबा, जगत पित्याची जयंती तर कोणी साजरी करत नाहीत. सर्व नंबरवार
येतात ना. आता तुम्हाला हे संपूर्ण नॉलेज मिळते. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक
आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) आपले बाबा,
सुप्रीम पिता, सुप्रीम टीचर, सुप्रीम सतगुरु आहेत - ही गोष्ट सर्वांना सांगायची आहे.
‘अल्फ’ आणि ‘बे’चा पाठ शिकवायचा आहे.
२) ज्ञान अर्थात
सृष्टी चक्राच्या नॉलेजला धारण करून स्वदर्शन चक्रधारी बनायचे आहे आणि विज्ञान
अर्थात आवाजा पासून दूर शांतीमध्ये जायचे आहे. ७ दिवसाचा कोर्स करून मग कुठेही
राहून अभ्यास करायचा आहे.
वरदान:-
सेवेमध्ये
मान-शानच्या कच्च्या फळाचा त्याग करून सदैव प्रसन्नचित्त राहणारे अभिमान मुक्त भव
रॉयल रूपातील इच्छेचे स्वरूप नाव, मान आणि शान आहे. जे नावासाठी सेवा करतात, त्यांचे
नाव अल्पकाळासाठी होते परंतु उच्च पदामध्ये नाव मागे जाते; कारण कच्चे फळ खाल्ले.
बरीच मुले विचार करतात की सेवेच्या रिझल्टमध्ये मला मान मिळाला पाहिजे. परंतु हा
मान नाही अभिमान आहे. जिथे अभिमान आहे तिथे प्रसन्नता राहू शकत नाही, म्हणून अभिमान
मुक्त बनून नेहमी प्रसन्नतेचा अनुभव करा.
बोधवाक्य:-
परमात्म
प्रेमाच्या सुखदाई झुल्यामध्ये झूला तर दुःखाची लाट येऊ शकणार नाही.