29-09-24    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   03.02.2002  ओम शान्ति   मधुबन


“लक्ष्य आणि लक्षण याला समान बनवा, सर्व खजिन्यानी संपन्न बना”


आज सर्व खजिन्यांचे मालक आपल्या खजिन्यांनी संपन्न मुलांना बघत आहेत. प्रत्येक मूल सर्व खजिन्यांनी संपन्न आहे. जो संपन्न असतो त्याची निशाणी आहे - तो सदैव प्राप्ति स्वरूप, तृप्त आत्मा दिसून येईल. सदैव खुश दिसून येईल कारण भरपूर आहे. तर प्रत्येकाने स्वतःला विचारा कि माझ्याकडे किती खजिने जमा आहेत? हे अविनाशी खजिने आत्ताही प्राप्त आहेत आणि भविष्यामध्ये अनेक जन्म सोबत राहतील. हे खजिने संपणारे नाहीत. सर्वात पहिला खजिना आहे - ज्ञानाचा खजिना, ज्या ज्ञानाच्या खजिन्यामुळे या वेळी देखील तुम्ही सर्वजण मुक्ति आणि जीवनमुक्तीचा अनुभव करत आहात. जीवन जगत असताना, जुन्या दुनियेमध्ये राहत असताना, तमोगुणी वायुमंडळामध्ये राहूनही ज्ञानाच्या खजिन्याच्या आधारे या सर्व वायुमंडळ, वायब्रेशन पासून न्यारे मुक्त आहात, कमल पुष्प समान न्यारे मुक्त आत्मे आहात, दुःखा पासून, चिंते पासून, अशांती पासून मुक्त आहात. जीवन जगत असताना वाईट बंधनांपासून मुक्त आहात. व्यर्थ संकल्पांच्या तुफाना पासून मुक्त आहात. आहात का मुक्त? सर्व हात हलवत आहेत.

तर ही मुक्ति आणि जीवनमुक्ती या ज्ञानाच्या खजिन्याचे फळ आहे, प्राप्ति आहे. भले व्यर्थ संकल्प येण्याचा प्रयत्न करतात, निगेटिव्ह सुद्धा येतात परंतु ज्ञान अर्थात समज आहे कि व्यर्थ संकल्प अथवा निगेटिव्हचे काम आहे येणे आणि तुम्हा ज्ञानी तू आत्म्यांचे काम आहे यापासून मुक्त, न्यारे आणि बाबांचे प्रिय राहणे. तर चेक करा - ज्ञानाचा खजिना प्राप्त आहे? भरपूर आहे? संपन्न आहे की कमी आहे? जर कमी असेल तर त्याला जमा करा, रिकामे राहू नका.

तसेच योगाचा खजिना - ज्याद्वारे सर्व शक्तींची प्राप्ति होते. तर स्वतःला बघा योगाच्या खजिन्याद्वारे सर्व शक्ति जमा केल्या आहेत? सर्व? एकजरी शक्ति जर कमी असेल तर ऐनवेळी ती धोका देईल. तुम्हा सर्वांचे टायटल - ‘मास्टर सर्वशक्तिवान’ आहे, शक्तिवान नाही, सर्वशक्तिवान. तर सर्व शक्तींचा खजिना योगबलाद्वारे जमा झाला आहे? भरपूर आहे, प्राप्ती स्वरूप आहे का कमी आहे? कमी का? आता आपल्या कमीला भरून काढू शकता. अजून चान्स आहे. नंतर संपन्न करण्याची वेळ समाप्त झाली तर कमी राहून जाईल. चेक करा - प्रत्येक शक्तिला समोर आणा आणि सर्व दिवसभराच्या दिनचर्येमध्ये चेक करा - जर परसेंटेज सुद्धा कमी असेल तरीही फुल पास म्हणणार नाही; कारण तुम्हा सर्वांचे लक्ष्य आहे, कोणत्याही मुलाला विचारले कि, तुला फुल पास व्हायचे आहे कि अर्धे पास व्हायचे आहे? तर सर्व म्हणतात कि आम्ही तर सूर्यवंशी बनणार, चंद्रवंशी बनणार नाही. चंद्रवंशी बनणार का? बापदादा खूप चांगले तख्त देतील, बनणार चंद्रवंशी? इंडियावाले सूर्यवंशी बनतील, फॉरेनवाले चंद्रवंशी बनतील, बनाल? नाही बनणार? सूर्यवंशी बनायचे आहे? बनायचेच आहे. ही तर बापदादा बातचीत करत आहेत. जर सूर्यवंशी बनायचेच आहे, दृढ निश्चय आहे, बाबांकडे आणि स्वतःशी प्रतिज्ञा केली आहे तर आता पासून कोणत्याही शक्तीची परसेंटेज कमी असू नये. जर म्हणालात परिस्थितीनुसार, समस्यांनुसार परसेंटेज कमी राहिली तर १४ कला बनाल; म्हणून आजकाल बापदादा चोहो बाजूंच्या सर्व मुलांचा पोतामेल, रजिस्टर चेक करत आहेत. बापदादांकडे सुद्धा प्रत्येकाचे रजिस्टर आहे कारण वेळेनुसार अगोदरच बापदादा मुलांना सांगत आहेत कि वेळेच्या गतीनुसार आता ‘कधी’ म्हणू नका, ‘आता’ करा. ‘कधी होईल, करू… होणार तर आहेच…’. असा विचार करू नका. होणार तर नाही आहे, आत्ताच्या आत्ता करायचेच आहे. वेळेची गती तीव्र होत आहे त्यामुळे बाप समान बनण्याचे जे लक्ष्य ठेवले आहे, फुल पास होण्याचे, १६ कला संपन्न बनण्याचे, तर बापदादा सुद्धा हेच इच्छितात कि लक्ष्य आणि प्रॅक्टिकलमध्ये समान लक्षण असावे. जेव्हा लक्ष्य आणि लक्षण दोन्ही समान होतील तेव्हाच बाप समान सहजच बनाल. तर चेक करा - ‘होऊन जाईल, बनूनच जाऊ…’. हा निष्काळजीपणा आहे. जे करायचे आहे, जे बनायचे आहे, जे लक्ष्य आहे, ते आत्तापासूनच करायचे आहे, बनायचे आहे. ‘कधी’ शब्द वापरू नका, आत्ताच्या आत्ता.

तर ज्ञानाचा खजिना, योगाचा खजिना आणि धारणांचा खजिना आहे. ज्याद्वारे (धारणांमुळे) गुणांचा खजिना जमा होत जातो. गुणांमध्येसुद्धा जशा सर्व शक्ति आहेत, तसेच ‘सर्व गुण’ आहेत, फक्त ‘गुण’ नाहीत, ‘सर्व गुण’ आहेत. तर सर्व गुण आहेत कि विचार करता एक-दोन गुण कमी असले, तर काय झाले; हे चालेल? असे चालणार नाही. तर सर्व गुणांचा खजिना जमा आहे? कोणत्या गुणाची कमी आहे त्याला चेक करून भरपूर व्हा.

चौथी गोष्ट आहे - सेवा. सेवेद्वारे सर्वांना अनुभव आहे, जेव्हापण मनसा सेवा अथवा वाणी द्वारे अथवा कर्माद्वारे सुद्धा सेवा करता तर त्याची प्राप्ती म्हणून आत्मिक खुशी मिळते. तर चेक करा सेवेद्वारे खुशीची अनुभूति कितपत केली आहे? जर सेवा केली आणि खुशी झाली नाही, तर ती सेवा यथार्थ सेवा नाही. सेवेमध्ये काही ना काही कमी आहे, म्हणून खुशी मिळत नाही. सेवेचा अर्थ आहे आत्मा स्वतःला आनंददायी, उमललेले रुहानी गुलाब आनंदाच्या झोपाळ्यावर झोके घेणारी अनुभव करेल. तर चेक करा - सर्व दिवस सेवा केली परंतु साऱ्या दिवसभराच्या सेवेच्या तुलनेमध्ये इतकी खुशी झाली कि विचारच चालत राहिले, हे नाही ते, ते नाही हे...? आणि तुमच्या आनंदाचा प्रभाव एक तर सेवा स्थानावर, दुसरा सेवा सोबतींवर, तिसरा ज्या आत्म्यांची सेवा केली त्या आत्म्यांवर पडावा, वायुमंडळ देखील आनंदी व्हावे. हा आहे सेवेचा खजिना - खुशी.

अजून एक गोष्ट - चार सब्जेक्ट तर आलेच. आणखी आहे संबंध-संपर्क, तो देखील खूप जरुरी आहे; का? बरीच मुले असे समजतात की बापदादांशी तर संबंध आहेच. परिवाराशी संबंध असला काय आणि नसला काय, काय गरज आहे, (काय हरकत आहे) बीजासोबत तर आहेच. परंतु तुम्हाला विश्वाचे राज्य करायचे आहे ना! तर राज्यामध्ये संबंधामध्ये यावेच लागेल. त्यामुळे संबंध-संपर्कामध्ये यायचेच आहे परंतु संबंध-संपर्कामध्ये खरा खजिना मिळतो तो आहे - दुवा (आशीर्वाद). संबंध-संपर्का शिवाय तुमच्याकडे आशीर्वादांचा खजिना जमा होणार नाही. मात-पित्याचे आशीर्वाद तर आहेतच, परंतु संबंध-संपर्कामध्ये सुद्धा आशीर्वाद घ्यायचे आहेत. जर दुवा (आशीर्वाद) मिळत नसतील, फिलिंग (आपुलकीची भावना) जाणवत नसेल तर समजा संबंध-संपर्कामध्ये काही कमतरता आहे. जर संबंध-संपर्क योग्य प्रकारे असेल तर आशीर्वादांची अनुभूती झाली पाहिजे. आणि आशीर्वादांची अनुभूती कोणती होईल? तुम्ही अनुभवी तर आहात ना! जर सेवेमुळे आशीर्वाद मिळत आहेत तर आशीर्वाद मिळण्याचा अनुभव हाच होईल की, जो संबंधामध्ये येताना, कार्य करताना स्वतः देखील डबल लाईट (हलका) असेल, भारीपणा अनुभव करणार नाही आणि ज्याची सेवा केली, संबंध-संपर्कामध्ये आला तो देखील डबल लाईट अनुभव करेल. अनुभव करेल कि हा संबंधामध्ये नेहमी हलका अर्थात इझी आहे, भारी राहणार नाही. ‘संबंधांमध्ये येऊ, नको येऊ…’. परंतु दुवा मिळाल्यामुळे दोन्ही बाजूला नियमाप्रमाणे, इतका इझी देखील नाही - जशी एक म्हण आहे - ‘जास्त गोड पदार्थाला मुंग्या खूप येतात’. तर इतका इझी सुद्धा नाही, परंतु डबल लाईट राहील. तर बापदादा म्हणतात - आपले खजिने चेक करा. वेळ देत आहेत. अजून समाप्तीचा बोर्ड लागलेला नाहीये. त्यामुळे चेक करा आणि पुढे जात रहा.

बापदादांचे मुलांवर प्रेम आहे ना! तर बापदादांना वाटते की कोणत्याही मुलाने मागे राहू नये. प्रत्येक मुलाने जास्तीत-जास्त पुढे जावे. चालता-चालता देह-अभिमान येतो. स्वमान आणि देह-अभिमान. देह-अभिमानाचे कारण आहे - स्वमानामध्ये कमतरता असणे. तर देह-अभिमानाला नाहीसा करण्याचे खूप सोपे साधन आहे - देह-अभिमान येण्याचा एकच शब्द आहे; एकच शब्द आहे आणि तो जाणता देखील. देह-अभिमानाचा एक शब्द कोणता आहे? (मी) अच्छा तर किती वेळा ‘मी-मी’ म्हणता? पूर्ण दिवसामध्ये किती वेळा ‘मी’ बोलता, कधी चेक केले आहे? अच्छा, एक दिवस चेक करा. सारखा-सारखा ‘मी’ शब्द तर येतोच. परंतु मी कोण? पहिला धडा आहे, ‘मी कोण’? जेव्हा देह-अभिमानामध्ये ‘मी’ म्हणता, परंतु वास्तवामध्ये मी आहे कोण? आत्मा की देह? आत्म्याने देह धारण केला, की देहाने आत्मा धारण केली? काय झाले? आत्म्याने देह धारण केला. बरोबर आहे ना? तर आत्म्याने देह धारण केला, तर मी कोण? आत्मा ना! तर सोपे साधन आहे, जेव्हापण ‘मी’ शब्द बोलाल, तर हे आठवा कि, ‘मी कोणती आत्मा आहे?’ आत्मा निराकार आहे, देह साकार आहे. निराकार आत्म्याने साकार देह धारण केला, तर जितके वेळा म्हणून ‘मी-मी’ शब्द बोलता, त्यावेळी हे आठवा कि, ‘मी निराकार आत्मा आहे आणि साकारमध्ये प्रवेश केला आहे’. जेव्हा निराकार स्थिती लक्षात राहील तर निरहंकारी स्वतःच व्हाल. देह-भान नष्ट होईल. तोच पहिला धडा - ‘मी कोण?’ हे स्मृतिमध्ये ठेऊन मी कोणती आत्मा आहे, आत्मा आठवल्याने निराकारी स्थिती पक्की होईल. जिथे निराकारी स्थिती असेल तिथे निरहंकारी, निर्विकारी होणारच. तर उद्यापासून चेक करा - जेव्हा ‘मी’ शब्द म्हणता तर काय आठवते? आणि जितक्या वेळा ‘मी’ शब्द युज कराल तितक्या वेळा निराकारी, निरहंकारी, निर्विकारी आपणच व्हाल. अच्छा!

आज यूथ ग्रुप आला आहे. यूथ पुष्कळ आहेत. बापदादा यूथ ग्रुपला वरदान देतात कि सदैव आबाद (संपन्न) रहा. एकही खजिना वाया घालवू नका, संपन्न रहा, संपन्न करा. लौकिक गुरु लोक आशीर्वाद देतात - ‘आयुष्यवान भव’ आणि बापदादा म्हणतात कि शरीराचे आयुर्मान तर जितके आहे तितकेच राहील त्यामुळे शरीराच्या वयाच्या हिशोबाने ‘आयुष्यवान भव’ चे वरदान देत नाहीत परंतु या ब्राह्मण जीवनामध्ये सदैव आयुष्यवान भव. कशासाठी? ब्राह्मण सो देवता बनणार. तर आयुष्यवान तर असणारच ना! यूथची एक विशेषता असते. तुम्ही यूथ आपल्या विशेषतेला जाणता का? काय विशेषता असते, जाणता का? काय विशेषता आहे तुमच्यामध्ये? (जे हवे ते करू शकतो) अच्छा, करू शकता ना? चांगली गोष्ट आहे, दुनियेच्या हिशोबाने म्हणतात, यूथ खूप जिद्दी असतात, जो विचार करतील ते करतील, दाखवतील. ते (दुनियेतील) लोक उलटे म्हणतात परंतु इथे ब्राह्मण यूथ जिद्दी नाहीत परंतु आपल्या प्रतिज्ञेवर पक्के राहणारे आहेत. हटणारे नाहीत. असे यूथ आहात का? हात वर करणे तर खूप सोपे आहे. बापदादा खुश आहेत हात वर करणे, हि देखील हिम्मत आहे ना. परंतु रोज अमृतवेलेला बाबांसोबत केलेली प्रतिज्ञा की, ‘आम्ही या ब्राह्मण जीवनाच्या प्राप्ती पासून, सेवेपासून कधीही संकल्पामध्ये देखील मागे सरणार नाही’; या दाखवलेल्या धैर्याची, प्रतिज्ञेची दररोज उजळणी करा आणि पुन्हा-पुन्हा चेक करा कि जी हिम्मत ठेवली, संकल्प केला तो प्रॅक्टिकलमध्ये होत आहे?

गव्हर्मेंट तर म्हणते, बस दोन-चार लाख बनले तरी देखील ठीक आहे. बापदादा म्हणतात - इथे एक ब्राह्मण यूथ, एक लाख युथच्या बरोबरीचा आहे. इतके मजबूत आहेत. आहात ना? बघा, असे नाही घरी जाऊन पुन्हा लिहाल कि बाबा, माया आली, संस्कार आले, समस्या आली. समस्यांचे समाधान स्वरूप बना. समस्या तर येतील परंतु स्वतःला विचारा - ‘मी कोण?’ समाधान स्वरूप आहे कि समस्ये समोर हार खाणारा आहे? तुम्हा सर्वांचे टायटल कोणते आहे - विजयी रत्न कि हार खाणारे रत्न? ‘विजयी रत्न’ आहे. ब्राह्मण जन्म होताच बापदादांनी प्रत्येक ब्राह्मणाच्या मस्तकावर विजयाचा अमर टिळा लावला आहे. तर ‘अमर भव’चे वरदानी आहात. आता स्वतःशी ही प्रतिज्ञा करा, असे तर प्रतिज्ञा म्हटले तर सगळेच करतील परंतु आपल्या मनामध्ये स्वतःशी प्रतिज्ञा करा - ‘कधीही संस्कारांच्या अधीन होणार नाही जे बाबांचे संस्कार ते मज ब्राह्मण आत्म्याचे संस्कार. जे द्वापर, कलियुगाचे संस्कार आहेत ते माझे संस्कार नाहीत कारण ते बाबांचे संस्कार नाहीत’. हे तमोगुणी संस्कार ब्राह्मणांचे संस्कार आहेत का? नाही ना! तर तुम्ही कोण आहात? ब्राह्मण आहात ना!

बापदादांना देखील यूथ ग्रुपचा अभिमान आहे. बघा, दादींना सुद्धा यूथचा अभिमान आहे. दादीचे प्रेम आहे ना यूथवर. एक्स्ट्रा प्रेम आहे. कुमार आहेत सुकुमार. कुमार नाही, सुकुमार आहेत. एक-एक कुमार विश्वातील कुमारांचे परिवर्तन करून दाखविणारे आहेत. अच्छा, कुमारांना एक काम देऊ? हिम्मत आहे? करावे लागेल. कुमारी, कराल ना?

तर काम देत आहेत लक्ष देऊन ऐका. तर जो पुढचा सीझन असेल, पुढच्या सीझनला कुमारांचा असाच स्पेशल प्रोग्राम ठेऊ परंतु… परंतु सुद्धा आहे. जास्त काम देत नाहीत, तर प्रत्येक कुमाराने १०-१० कुमारांचे, छोटेसे हातातील कडे तयार करून आणा. हातामध्ये कडे घालतात ना. ब्रह्मा बाबांना नेहमी हातामध्ये फुलांचे कडे घालतात. तर प्रत्येक कुमाराने, कमकुवत कुमार आणू नका, मजबूत असलेले आणा. नाहीतर मग मधुबनमध्ये तर येतील आणि नंतर घरी गेल्यावर बदलून जातील! असे नको. असे कुमार पक्के बनवून आणा ज्यांना पाहून बापदादा म्हणतील - ‘वाह कुमार वाह!’ असे तयार आहेत का? करणार असे? थोडा विचार करा. असाच हात वर करू नका. करावे लागेल. बनवावे लागेल. डबल फॉरेनर्स सुद्धा करणार ना? डबल फॉरेनर्समधले कुमार हात वर करा. तर तुम्ही सुद्धा १० आणणार ना? फॉरेनर्स सुद्धा आणणार, इंडियावाले सुद्धा आणतील. मग जे फर्स्ट क्लास क्वालिटीचे कुमार आणतील त्यांना बक्षीस देणार. खूप चांगले बक्षीस देणार, साधे नाही देणार. प्रेम आहे ना कुमारांवर. जर गव्हर्मेंटला जास्तीत-जास्त कुमार पॉझीटीव्ह कर्म करणारे मिळाले तर गव्हर्मेंट किती खुश होईल. जर तुम्ही १०-१० कुमार आणलेत तर संपूर्ण हॉल कुमारांनी भरेल मग गव्हर्मेंटला बोलवूया, पहा हे कुमार. परंतु आणावे लागतील, बनवावे लागतील. जर आपली स्थिती, लक्ष्य आणि लक्षणला समान ठेवाल तर सेवेमध्ये सफलता होईल कि नाही - हा संकल्प सुद्धा येऊ शकत नाही. झाल्यातच जमा आहे. फक्त तुम्हाला निमित्त बनावे लागेल. हि प्रतिज्ञा नेहमी रिवाइज (उजळणी) करत रहा. चमत्कार तर करायचाच आहे. अच्छा.

(मुरली चालू असताना अचानक दोन कुमार बापदादांसमोर स्टेजवर आले, ज्यांना हटविण्यात आले)

अच्छा, आत्ता खेळामध्ये खेळ पाहिला. आता बापदादा म्हणतात - साक्षी होऊन खेळ बघितलात, आनंद घेतलात, आता एका सेकंदामध्ये एकदम देहा पासून विलग पॉवरफुल आत्मिक रूपामध्ये स्थित होऊ शकता? फुलस्टॉप.

(बापदादांनी अतिशय शक्तिशाली ड्रिल करवून घेतली) अच्छा - हाच अभ्यास नियमित मधून-मधून केला पाहिजे. आत्ता-आत्ता कार्यामध्ये या, आत्ता-आत्ता कार्यापासून न्यारे, साकारी सो निराकारी स्थितीमध्ये स्थित व्हा. असाच हा देखील एक अनुभव बघितला, जेव्हा कोणतीही समस्या येते तर असेच एका सेकंदामध्ये साक्षी दृष्टा बनून, समस्येला एक साईडसीन समजून, तुफानाला एक तोहफा समजून त्याला पार करा. अभ्यास आहे ना? पुढे गेल्यावर तर अशा अभ्यासाची खूप गरज भासणार आहे. फुलस्टॉप. क्वेश्चन मार्क नाही, ‘हे का झाले, हे कसे झाले?’ झाले. फुलस्टॉप आणि आपल्या फुल शक्तिशाली स्थितीमध्ये स्थित व्हा. समस्या खाली राहील, तुम्ही उच्च स्थितीमध्ये समस्या रुपी साईडसीनला बघत रहाल. अच्छा.

चोहो बाजूच्या सर्व खजिन्यांनी संपन्न आत्म्यांना, सदैव प्रत्येक क्षणी प्राप्तींनी भरपूर, हसतमुख आणि हर्षित राहणाऱ्या आत्म्यांना, सदैव बाबांसोबत केलेल्या प्रतिज्ञेला जीवनामध्ये प्रत्यक्ष करणाऱ्या ज्ञानी तू आत्मे, योगी तू आत्मे असणाऱ्या मुलांना, सदैव लक्ष्य आणि लक्षणाला समान करणाऱ्या बाप समान आत्म्यांना, सदैव प्रत्येक क्षणी सर्व खजिन्यांचा स्टॉक आणि स्टॉप लावणाऱ्या तीव्र पुरुषार्थी श्रेष्ठ आत्म्यांना बापदादांची प्रेमपूर्वक आठवण, दिलारामची मनापासून प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.

वरदान:-
परिस्थितींना शिक्षक समजून त्यापासून धडा शिकणारे अनुभवी मूर्त भव

कोणत्याही परिस्थितीमध्ये घाबरण्याऐवजी थोड्या वेळासाठी त्याला शिक्षक समजा. परिस्थिती तुम्हाला विशेष दोन शक्तींची अनुभवी बनविते एक सहनशक्ति आणि दुसरी सामना करण्याची शक्ति. हे दोन्ही धडे शिकाल तर अनुभवी बनाल. जेव्हा म्हणता, ‘मी तर ट्रस्टी आहे, माझे काहीच नाही’ तर मग परिस्थितींना घाबरता कशासाठी. ट्रस्टी अर्थात सर्वकाही बाबांच्या हवाली केले; त्यामुळे जे होईल ते चांगलेच होईल या स्मृतीद्वारे सदैव निश्चिंत, समर्थ स्वरूपामध्ये रहा.

सुविचार:-
ज्यांचा स्वभाव गोड आहे ते चुकूनही कोणाला दुःख देऊ शकत नाहीत.