29-11-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - जर शिवबाबांची कदर असेल तर त्यांच्या श्रीमतानुसार चालत रहा, श्रीमतावर चालणे अर्थात बाबांची कदर करणे”

प्रश्न:-
१.:- बाबांपेक्षाही मुले मोठी जादूगार आहेत - ती कशी?

उत्तर:-
सर्वश्रेष्ठ बाबांना आपला मुलगा बनवणे, तन-मन-धनाने बाबांना वारसदार बनवून आत्मसमर्पण करणे - ही मुलांची जादूगिरी आहे. जे आता भगवंताला वारसदार बनवतात ते २१ जन्मांसाठी वारशाचे अधिकारी बनतात.

प्रश्न:-
ट्रिब्युनल (न्यायसभा) कोणत्या मुलांसाठी बसते?

उत्तर:-
जे दान केलेली वस्तू परत घेण्याचा संकल्प करतात, मायेच्या वश होऊन डिससर्व्हिस करतात त्यांच्यासाठी ट्रिब्युनल बसते.

ओम शांती।
रूहानी विचित्र बाबा बसून विचित्र मुलांना समजावून सांगत आहेत अर्थात दूरदेशी राहणारे, ज्यांना परमपिता परमात्मा म्हटले जाते; अतिशय दूर देशाहून येऊन या शरीराद्वारे तुम्हाला शिकवत आहेत. आता जे शिकतात ते शिकविणाऱ्यासोबत योग तर आपोआपच ठेवतात. सांगावे लागत नाही की, ‘माझ्या मुलांनो, टीचरसोबत योग ठेवा किंवा त्यांची आठवण करा’. नाही, इथे बाबा म्हणतात - ‘माझ्या रूहानी मुलांनो, हे तुमचे पिता देखील आहेत, टीचर देखील आहेत, गुरू देखील आहेत, यांच्यासोबत योग लावा अर्थात बाबांची आठवण करा. हे आहेत विचित्र बाबा. तुम्ही वारंवार यांना विसरून जाता म्हणून सांगावे लागते. शिकवणाऱ्याची आठवण केल्यामुळे तुमची पापे भस्म होतील. लॉ असे सांगत नाही की टीचर म्हणेल मला बघा; यामध्ये तर खूप फायदा आहे. बाबा म्हणतात - ‘फक्त माझी आठवण करा’. या आठवणीच्या शक्तीनेच तुमची पापे नष्ट होणार आहेत, याला म्हटले जाते आठवणीची यात्रा. आता रूहानी विचित्र बाबा मुलांना पाहतात. मुले देखील स्वतःला आत्मा समजून विचित्र बाबांचीच आठवण करतात. तुम्ही तर घडोघडी शरीराच्या भानामध्ये येता, मी तर सारे कल्प शरीरामध्ये येत नाही, फक्त या संगमयुगातच अतिशय दूर देशाहून तुम्हा मुलांना शिकविण्याकरिता येतो. हे चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचे आहे. बाबा आमचे पिता, टीचर आणि सद्गुरु आहेत. विचित्र आहेत. त्यांना आपले स्वतःचे शरीर नाही आहे, मग येतात कसे? म्हणतात - मला प्रकृतीचा (शरीराचा), मुखाचा आधार घ्यावा लागतो. मी तर विचित्र आहे. तुम्ही सर्व चित्र वाले आहात. मला रथ तर जरूर पाहिजे ना. घोडा गाडीमध्ये तर येणार नाहीत ना. बाबा म्हणतात - ‘मी या तनामध्ये प्रवेश करतो, जे नंबरवन आहेत तेच मग शेवटचा नंबर बनतात’. जे सतोप्रधान होते तेच तमोप्रधान बनतात. तर त्यांनाच मग सतोप्रधान बनविण्यासाठी बाबा शिकवतात. समजावून सांगतात - ‘या रावणराज्यामध्ये तुम्हा मुलांना ५ विकारांवर विजय प्राप्त करून जगतजीत बनायचे आहे’. मुलांनो, हे लक्षात ठेवायचे आहे की, आपल्याला विचित्र बाबा शिकवत आहेत. बाबांची आठवण केली नाहीत तर पापे भस्म कशी होतील? या गोष्टी देखील तुम्ही फक्त आत्ता संगमयुगावरच ऐकता. एकदा जे काही होते ते मग कल्पानंतर पुन्हा तेच रिपीट होणार. किती छान स्पष्टीकरण आहे, यासाठी खूप विशालबुद्धी पाहिजे. हा कोणता साधू-संत इत्यादींचा सत्संग नाहीये. त्यांना ‘पिता’ देखील म्हणता तर ‘मुलगा’ देखील म्हणता. तुम्ही जाणता हे आपले बाबा देखील आहेत तर मुलगा सुद्धा आहे. आम्ही आमचा सर्व वारसा या मुलाला देतो आणि बाबांकडून २१ जन्मांसाठी वारसा घेतो. सर्व कचरापट्टी देऊन बाबांकडून आम्ही विश्वाची बादशाही घेतो. म्हणतात - ‘बाबा, आम्ही भक्तीमार्गामध्ये म्हटले होते की, जेव्हा तुम्ही याल तेव्हा आम्ही तुमच्यावर तन-मन-धनासहित वारी जाणार (आत्मसमर्पण करणार)’. लौकिक पिता देखील मुलांवर बलिहार जातात ना. तर इथे तुम्हाला हे कसे विचित्र बाबा मिळाले आहेत, त्यांची आठवण कराल तर तुमची पापे भस्म होतील आणि आपल्या घरी निघून जाल. किती मोठा प्रवास आहे. बाबा कुठे येतात बघा! जुन्या रावण राज्यामध्ये. म्हणतात, माझ्या नशीबामध्ये पावन शरीर मिळणे नाही आहे. पतितांना पावन बनविण्यासाठी कसा येऊ. मला पतित दुनियेमध्येच येऊन सर्वांना पावन बनवावे लागते. तर अशा टीचरची किती कदर देखील ठेवली पाहिजे ना. असे बरेच आहेत जे कदर करणेच जाणत नाहीत. हे देखील ड्रामामध्ये होणारच आहे. राजधानीमध्ये तर नंबरवार सगळेच पाहिजेत ना. तर सर्व प्रकारचे इथेच बनतात. कनिष्ठ दर्जा (पद) मिळणाऱ्यांची अशी अवस्था होईल; ना अभ्यास करणार, ना बाबांच्या आठवणीमध्ये राहणार. हे खूपच विचित्र बाबा आहेत ना, यांचे वर्तन देखील अलौकिक आहे. यांचा पार्ट दुसऱ्या कोणाला मिळू शकत नाही. हे बाबा येऊन तुम्हाला किती उच्च शिक्षण शिकवतात, तर त्याची देखील कदर केली पाहिजे. त्यांच्या श्रीमतानुसार चालले पाहिजे. परंतु माया घडोघडी विसरायला लावते. माया इतकी बलवान आहे की चांगल्या-चांगल्या मुलांना कोसळून घालते. बाबा किती श्रीमंत बनवतात परंतु माया एकदम डोकेच फिरवते. मायेपासून वाचायचे असेल तर बाबांची आठवण अवश्य करावी लागेल. खूप चांगली मुले आहेत जी बाबांची बनून मग मायेची बनतात, काही विचारू नका, पक्के ट्रेटर (द्रोही) बनतात. माया एकदम नाकालाच पकडते. असे शब्द देखील आहेत ना - ‘हत्तीला मगरीने खाल्ले’. परंतु त्याचा अर्थ कोणालाही समजत नाही. बाबा प्रत्येक गोष्ट व्यवस्थित समजावून सांगतात. खूप मुले समजतात देखील, परंतु नंबरवार पुरुषार्थानुसार. कोणाला तर जरासुद्धा धारणा होत नाही. अतिशय उच्च शिक्षण आहे ना, तर त्याची धारणा करू शकत नाहीत. बाबा म्हणतील - ‘यांच्या नशीबात राज्य-भाग्य नाही आहे’. कोणी धोतऱ्याची फुले आहेत, कोणी सुगंधीत फुले आहेत. व्हरायटी बगीचा आहे ना. परंतु असे देखील पाहिजेत ना. राजधानीमध्ये तुम्हाला नोकर-चाकर सुद्धा मिळतील. नाही तर नोकर-चाकर कसे मिळणार? राज्य इथेच बनते. नोकर, चाकर, चांडाळ इत्यादी सगळे मिळतील. ही राजधानी स्थापन होत आहे. सर्वच अद्भुत आहे. बाबा तुम्हाला इतके श्रेष्ठ बनवत आहेत तर अशा बाबांची आठवण करताना प्रेमाश्रू आले पाहिजेत.

तुम्ही माळेतील मणी बनता ना. म्हणतात - ‘बाबा, तुम्ही किती विचित्र आहात. कसे येऊन आम्हा पतितांना पावन बनविण्यासाठी शिकवता’. भक्ती मार्गामध्ये भले शिवाची पूजा करतात परंतु समजतात थोडेच की हे पतित-पावन आहेत; तरीही बोलावत राहतात हे - ‘पतित-पावन या, येऊन आम्हाला गुल-गुल (फूल) देवी-देवता बनवा’. मुलांच्या आज्ञेला बाबा मानतात आणि जेव्हा येतात तेव्हा म्हणतात - ‘मुलांनो, पवित्र बना’. यावरूनच वाद होतात. बाबा वंडरफुल आहेत ना. मुलांना म्हणतात - ‘माझी आठवण करा तर पापे नष्ट होतील’. बाबा जाणतात, आपण आत्म्यांशी बोलत आहोत. सर्व काही आत्माच करते, विकर्म आत्माच करते. आत्माच शरीराद्वारे भोगते. तुमच्यासाठी तर ट्रिब्युनल बसेल. खास अशा मुलांसाठी जे सेवायोग्य बनून मग द्रोही बनतात. हे तर बाबाच जाणतात की माया कशी गिळंकृत करते. म्हणतात - ‘बाबा, मी हरलो, तोंड काळे केले… आता क्षमा करा’. आता कोसळला (विकारात गेला) आणि मायेचा बनला मग क्षमा कशाची? त्यांना तर मग अतोनात मेहनत करावी लागेल. असे खूप आहेत जे मायेसमोर हार खातात. बाबा म्हणतात - इथे बाबांना दान देऊन गेल्यावर परत घेऊ नका. अन्यथा सर्वकाही संपून जाईल. हरिश्चंद्राचे उदाहरण आहे ना. दान देऊन मग खूप सावध रहायचे आहे. जर परत घेतले तर शंभर पटीने दंड होतो; आणि मग खूप कनिष्ठ पद प्राप्त होईल. मुले जाणतात ही राजधानी स्थापन होत आहे. बाकीचे जे धर्म स्थापन करतात त्यांचे सुरुवातीला राज्य नसते. राज्य तेव्हा होते जेव्हा ५०-६० कोटी होतील, तेव्हा सेना तयार होईल. सुरुवातीला तर येतातच एक-दोन, नंतर मग वृद्धी होते. तुम्ही जाणता क्राइस्ट देखील कोणत्या वेषामध्ये येतील. पहिल्या नंबरवाला मग जरूर भिकाऱ्याच्या रूपामध्ये शेवटच्या नंबरवर असेल. ख्रिश्चन लोक लगेच सांगतील की, खरोखर क्राइस्ट यावेळी भिकाऱ्याच्या रूपामध्ये आहेत. समजतात पुनर्जन्म तर घ्यायचाच आहे. प्रत्येकाला तमोप्रधान तर अवश्य बनायचे आहे. या वेळी पूर्ण दुनिया तमोप्रधान जडजडीभूत आहे. या जुन्या दुनियेचा विनाश नक्की होणार आहे. ख्रिश्चन लोकदेखील म्हणतील क्राइस्टच्या ३ हजार वर्षांपूर्वी स्वर्ग होता आता पुन्हा नक्कीच होईल. परंतु या गोष्टी समजावून सांगणार कोण? बाबा म्हणतात - ‘आत्ता मुलांची ती अवस्था कुठे आहे’. वारंवार लिहितात - ‘आम्ही योगामध्ये राहू शकत नाही’. मुलांच्या कृतीवरून समजून येते. बाबांना समाचार द्यायला सुद्धा घाबरतात. बाबा तर मुलांवर किती प्रेम करतात. प्रेमाने नमस्कार करतात. मुलांमध्ये तर अहंकार असतो. चांगल्या-चांगल्या मुलांना माया विसरायला लावते. बाबा समजू शकतात, म्हणतात मी नॉलेजफुल आहे. जानी-जाननहारचा अर्थ असा नाही की मी सर्वांच्या अंतरंगाला जाणतो. मी आलोच आहे शिकविण्यासाठी ना की अंतर्मन वाचण्यासाठी. मी कोणाचेही अंतर्मन वाचत नाही, तर हे साकार देखील (ब्रह्माबाबा देखील) अंतर्मन वाचत नाहीत. यांना तर सर्वकाही विसरून जायचे आहे. मग अंतर्मन काय वाचणार. तुम्ही इथे येताच शिकण्याकरिता. भक्तीमार्गच वेगळा आहे. हा देखील घसरण्यापासून वाचण्यासाठी उपाय तर पाहिजे ना. या गोष्टींमुळेच तुम्ही घसरता. ड्रामाचा खेळ बनलेला आहे. भक्तीमार्गातील शास्त्रे वाचता-वाचता तुम्ही खाली उतरत तमोप्रधान बनता. आता तुम्हाला या घाणेरड्या दुनियेमध्ये अजिबात रहायचे नाही आहे. कलियुगा नंतर पुन्हा सतयुग येणार आहे. आता हे आहे संगमयुग. या सर्व गोष्टी धारण करायच्या आहेत. बाबाच समजावतात, बाकी तर साऱ्या दुनियेच्या बुद्धीला गोदरेजचे कुलूप लागलेले आहे. तुम्ही समजता हे दैवीगुणवाले होते तेच पुन्हा आसुरी गुणवाले बनले आहेत. बाबा समजावून सांगतात - ‘आता भक्तीमार्गातील सर्व गोष्टी विसरून जा. आता मी जे सांगतो ते ऐका, हियर नो इव्हिल... आता माझ्या एकाकडून ऐका. आता मी तुम्हाला तारण्यासाठी आलो आहे’.

तुम्ही आहात ईश्वरीय संप्रदाय. प्रजापिता ब्रह्माच्या मुखकमलामधून तुम्ही जन्मले आहात, इतकी सारी दत्तक मुले आहेत. त्यांना (ब्रह्मा बाबांना) आदि देव म्हटले जाते, महावीर देखील म्हणतात. तुम्ही मुले महावीर आहात ना - जे योगबलाने मायेवर विजय प्राप्त करता. बाबांना म्हटले जाते - ज्ञानाचा सागर. ज्ञानसागर बाबा तुम्हाला अविनाशी ज्ञानरत्नांच्या थाळ्या भरभरून देत आहेत. तुम्हाला श्रीमंत बनवतात. जे ज्ञानाची धारणा करतात ते उच्च पद प्राप्त करतात, जे धारणा करत नाहीत तर नक्कीच त्यांना कनिष्ठ पद मिळेल. बाबांकडून तुम्ही कुबेराचा खजिना मिळवता. अल्लाह अवलदीनची सुद्धा एक गोष्ट आहे ना. तुम्ही जाणता तिथे (स्वर्गामध्ये) आपल्याला कोणतीही वस्तू अप्राप्त नसते. बाबा २१ जन्मांसाठी वारसा देतात. बेहदचे बाबा बेहदचा वारसा देतात. हदचा वारसा मिळून देखील बेहदच्या बाबांची आठवण अवश्य करतात - ‘हे परमात्मा दया करा, कृपा करा’. हे थोडेच कोणाला माहीत आहे की ते काय देणार आहेत. आता तुम्हाला समजते आहे बाबा तर आम्हाला विश्वाचा मालक बनवत आहेत. चित्रांमध्ये देखील आहे ब्रह्मा द्वारा स्थापना; ब्रह्मा साधारण रूपामध्ये समोर बसले आहेत. स्थापना करणार आहेत तर जरूर त्यांनाच बसवणार ना. बाबा किती चांगल्या प्रकारे समजावून सांगतात; परंतु तुम्ही पूर्णपणे समजावून सांगू शकत नाही. भक्तीमार्गामध्ये शंकरा समोर जाऊन म्हणतात - ‘भर दो झोली’. आत्मा म्हणते - ‘मी गरीब आहे, माझी झोळी भरा, मला असे बनवा’. आता तुम्ही झोळी भरण्यासाठी आला आहात. म्हणतात - आम्ही तर नरा पासून नारायण बनू इच्छितो. हे शिक्षणच नरापासून नारायण बनण्यासाठी आहे. जुन्या दुनियेमध्ये येण्याची इच्छा कोणाला होईल! परंतु नव्या दुनियेमध्ये तर सर्वच काही येणार नाहीत. कोणी २५ टक्के जुन्यामध्ये येतील. काही कमतरता तर असेलच ना. थोडा जरी कोणाला संदेश देत राहिलात तरी तुम्ही स्वर्गाचे मालक जरूर बनाल. आता नरकाचे मालक सुद्धा सगळेच आहेत ना. राजा, राणी, प्रजा सर्व नरकाचे मालक आहेत. तिथे (स्वर्गामध्ये) होते डबल मुकुटधारी. आता ते नाही आहेत. आजकाल तर धर्म इत्यादीला कोणी मानत नाहीत. देवी-देवता धर्म नष्ट झाला आहे. गायले जाते - रिलिजन इज माइट (धर्म एक शक्ती आहे), धर्माला न मानल्याकारणाने ती ताकद राहिलेली नाही आहे. बाबा समजावून सांगत आहेत - ‘गोड-गोड मुलांनो, तुम्हीच पूज्य पासून पुजारी बनता. ८४ जन्म घेता ना. हम सो ब्राह्मण, सो देवता मग हम सो क्षत्रिय... बुद्धीमध्ये हे सारे चक्र येते ना?’ हे ८४ चे चक्र आपण फिरतच राहतो; आता पुन्हा घरी परत जायचे आहे. कोणीही पतित जाऊ शकत नाही. आत्माच पतित किंवा पावन बनते. सोन्यामध्ये अशुद्धता मिसळली जाते ना. दागिन्यामध्ये मिसळत नाही, हा आहे ज्ञान-अग्नी ज्यामुळे सर्व अशुद्धता निघून जाईल आणि तुम्ही पक्के शुद्ध सोने बनाल मग तुम्हाला दागिना देखील चांगला मिळेल. आता आत्मा पतित आहे तर पावन असणाऱ्या समोर नतमस्तक होतात. करते तर सर्व काही आत्माच ना. आता बाबा समजावून सांगतात - ‘मुलांनो, फक्त मामेकम् (मज एकाची) आठवण करा तर बेडा (जीवन रुपी नौका) पार कराल. पवित्र बनून पवित्र दुनियेमध्ये निघून जाल’. तर आता जो जितका पुरुषार्थ करेल. सर्वांना हाच परिचय देत रहा. ते आहेत हदचे पिता, हे आहेत बेहदचे पिता. संगमावरच स्वर्गाचा वारसा देण्यासाठी बाबा येतात. तर अशा बाबांची आठवण करावी लागेल ना. टीचरला कधी विद्यार्थी विसरतात का! परंतु इथे माया विसरायला लावत राहणार. खूप सावध रहायचे आहे. युद्धाचे मैदान आहे ना. बाबा म्हणतात - ‘आता विकारामध्ये जाऊ नका, घाणेरडे बनू नका. आता तर स्वर्गामध्ये जायचे आहे’. पवित्र बनूनच पवित्र नवीन दुनियेचे मालक बनाल. तुम्हाला विश्वाची बादशाही देतो. काही छोटी गोष्ट आहे का? फक्त हा एक जन्म पवित्र बना. आता पवित्र बनला नाहीत तर खाली पडाल. प्रलोभने खूप आहेत. काम विकारावर विजय प्राप्त केल्याने तुम्ही जगाचे मालक बनाल. तुम्ही स्पष्टपणे सांगू शकता - परमपिता परमात्माच जगद्गुरू आहेत जे साऱ्या जगाला सद्गती देतात. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) अविनाशी ज्ञानरत्नांनी बुद्धीरूपी झोळी भरून श्रीमंत बनायचे आहे. कोणत्याही प्रकारचा अहंकार दाखवायचा नाही.

२) सेवायोग्य बनून मग कधी ट्रेटर बनून डिससर्व्हिस करायची नाही. दान दिल्यानंतर खूप-खूप सावध रहायचे आहे, दान दिलेली वस्तू परत घेण्याचा संकल्पसुद्धा येता कामा नये.

वरदान:-
डायरेक्ट परमात्म लाईटच्या कनेक्शन द्वारे अंधःकाराला पळवून लावणारे लाईट हाऊस भव

तुम्हा मुलांकडे डायरेक्ट परमात्म लाईटचे कनेक्शन आहे. फक्त स्वमानाच्या स्मृतीचे बटण डायरेक्ट लाईनने चालू करा तर लाईट येईल आणि कितीही प्रखर सूर्यप्रकाशाला झाकून टाकणारा काळा ढग असो, तो देखील पळून जाईल. यामुळे स्वतः तर प्रकाशामध्ये रहालच, परंतु इतरांसाठी देखील लाईट हाऊस बनाल.

बोधवाक्य:-
स्व-पुरुषार्थामध्ये वेगवान बना तर तुमच्या व्हायब्रेशनद्वारे दुसऱ्यांची माया सहजच पळून जाईल.