30-01-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - संपूर्ण कल्पातील हे आहे सर्वोत्तम कल्याणकारी संगमयुग, यामध्ये तुम्ही मुले आठवणीच्या सैक्रीनद्वारे सतोप्रधान बनता”

प्रश्न:-
अनेक प्रकारच्या प्रश्नांची उत्पत्ती होण्याचे कारण तसेच त्या सर्वांचे निवारण काय आहे?

उत्तर:-
जेव्हा देह-अभिमानामध्ये येता तेव्हा संशय निर्माण होतो आणि संशय आल्यानेच अनेक प्रश्नांची उत्पत्ती होते. बाबा म्हणतात - मी तुम्हा मुलांना जो धंदा दिला आहे - पतितापासून पावन बना आणि बनवा, या धंद्यामध्ये राहिल्याने सर्व प्रश्न संपुष्टात येतील.

गीत:-
तुम्हें पाके हमने जहान पा लिया है...

ओम शांती।
गोड-गोड रुहानी मुलांनी गाणे ऐकले. हे कोण म्हणाले - ‘गोड-गोड रुहानी मुलांनों?’ जरूर रुहानी बाबाच म्हणू शकतात. गोड-गोड रुहानी मुले आता सन्मुख बसली आहेत आणि बाबा खूप प्रेमाने समजावून सांगत आहेत. आता तुम्ही जाणता - रुहानी बाबांशिवाय सर्वांना सुख-शांती देणारे किंवा सर्वांना या दुःखातून मुक्त करणारे, संपूर्ण दुनियेमध्ये इतर कोणी मनुष्य असू शकत नाही; म्हणून दुःखामध्ये बाबांची आठवण करत राहतात. तुम्ही मुले सन्मुख बसला आहात. तुम्ही जाणता बाबा आपल्याला सुखधामच्या लायक बनवत आहेत. सदैव सुखधामचा मालक बनविणारे बाबा सन्मुख आलेले आहेत. आता समजता सन्मुख ऐकण्यामध्ये आणि दूर राहून ऐकण्यामध्ये खूप फरक आहे. मधुबन मध्ये सन्मुख येता. मधुबन प्रसिद्ध आहे. मधुबनमध्ये त्यांनी श्रीकृष्णाचे चित्र दाखवले आहे. परंतु श्रीकृष्ण काही नाही आहे. तुम्ही मुले जाणता - इथे तर घडोघडी स्वतःला आत्मा निश्चय करायचे आहे, यासाठी मेहनत करावी लागते. मी आत्मा बाबांकडून वारसा घेत आहे. संपूर्ण चक्रामध्ये बाबा एकदाच येतात. हे कल्पातील अतिशय मनोहर असे संगमयुग आहे, याचे नाव ठेवले आहे - पुरुषोत्तम. हेच संगमयुग आहे जिथे सर्व मनुष्यमात्र उत्तम बनतात. आता तर सर्व मनुष्यमात्रांचे आत्मे तमोप्रधान आहेत, ते पुन्हा सतोप्रधान बनतात. सतोप्रधान आहेत तर उत्तम आहेत. तमोप्रधान झाल्याने मनुष्य सुद्धा कनिष्ठ बनतात. तर आता बाबा आत्म्यांना सन्मुख बसून समजावून सांगत आहेत. संपूर्ण पार्ट आत्माच बजावते, शरीर नाही. तुमच्या बुद्धीमध्ये आले आहे की, आपण आत्मे मूलतः निराकारी दुनिया अथवा शांतीधाममध्ये राहणारे आहोत. हे कुणालाच ठाऊक नाही आहे. ना स्वतः सांगू शकतात. तुमच्या बुद्धीचे कुलूप आता उघडले आहे. तुम्ही समजता बरोबर आत्मे परमधाममध्ये राहतात. ते आहे इनकारपोरियल वर्ल्ड (निराकारी दुनिया). हे आहे कारपोरियल वर्ल्ड (साकारी दुनिया). इथे आपण सर्व आत्मे, ॲक्टर्स पार्टधारी आहोत. सर्वप्रथम आपणच पार्ट बजावण्यासाठी येतो, बाकीचे मग क्रमवारीने येत जातात. सर्व ॲक्टर्स एकत्र येत नाहीत. वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्टर्स येत राहतात. सगळे एकत्र तेव्हा होतात जेव्हा नाटक पूर्ण होते. आता तुम्हाला ओळख मिळाली आहे, आम्ही आत्मे मूलतः शांतीधामचे रहिवासी आहोत, इथे पार्ट बजावण्यासाठी येतो. बाबा संपूर्ण वेळ पार्ट बजावण्यासाठी येत नाहीत. आम्हीच पार्ट बजावता-बजावता सतोप्रधानापासून तमोप्रधान बनतो. आता तुम्हा मुलांना सन्मुख ऐकल्याने खूप मजा येते. इतकी मजा मुरली वाचल्याने येत नाही. इथे सन्मुख आहात ना.

तुम्ही मुले समजता की भारत देवी-देवतांचे स्थान होते, परंतु आता नाहीये. चित्र पाहता, होते जरूर. आपण तिथले रहिवासी होतो - सर्वात पहिले आपण देवता होतो, आपल्या पार्टची तरी आठवण कराल की विसरून जाल. बाबा म्हणतात - तुम्ही इथे हा पार्ट बजावला. हा ड्रामा आहे. नवीन दुनिया तीच मग जुनी दुनिया होते. सर्वप्रथम वरून जे आत्मे येतात, ते गोल्डन एज्ड मध्ये येतात. या सर्व गोष्टी आता तुमच्या बुद्धीमध्ये आहेत. तुम्ही विश्वाचे मालक महाराजा-महाराणी होता. तुमची राजधानी होती. आता काही राजधानी नाहीये. आता तुम्ही शिकत आहात, आपण राज्य कसे चालवणार! तिथे वजीर (मंत्री) असत नाहीत. सल्ला देणाऱ्याची गरज नाही. ते तर श्रीमता द्वारे श्रेष्ठ ते श्रेष्ठ बनतात. मग त्यांना इतर कोणाचा सल्ला घेण्याची गरज नाही. जर कोणाकडून सल्ला घेतला तर समजले जाईल यांची बुद्धी कमजोर आहे. आता जे श्रीमत मिळते, ते सतयुगामध्ये देखील कायम राहते. आता तुम्ही समजता - बरोबर, सर्वप्रथम अर्धा कल्प या देवी-देवतांचे राज्य होते. आता तुमची आत्मा रिफ्रेश होत आहे. हे नॉलेज परमात्म्या शिवाय कोणीही देऊ शकत नाही.

आता तुम्हा मुलांना देही-अभिमानी बनायचे आहे. शांतीधाममधून येऊन इथे तुम्ही टॉकी बनला आहात (वाणीमध्ये आला आहात). टॉकी बनल्याशिवाय (वाणीमध्ये आल्याशिवाय) कर्म होऊ शकणार नाही. या नीट समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. जसे बाबांमध्ये सारे ज्ञान आहे तसे तुमच्या आत्म्यामध्ये देखील ज्ञान आहे. आत्मा म्हणते - मी एक शरीर सोडून संस्कारानुसार पुन्हा दुसरे शरीर घेतो. पुनर्जन्म देखील जरूर असतो. आत्म्याला जो काही पार्ट मिळालेला आहे, तो बजावत राहते. संस्कारांनुसार दुसरा जन्म घेत राहतात. आत्म्याची दिवसेंदिवस प्युरिटीची डिग्री (पवित्रतेचे प्रमाण) कमी होत जाते. ‘पतित’ शब्द द्वापरपासून वापरात येतो. तरी देखील थोडा फरक जरूर पडतो. तुम्ही नवीन घर बनवा, एका महिन्यानंतर थोडा तरी फरक जरूर पडेल. आता तुम्ही मुले समजता बाबा आम्हाला वारसा देत आहेत. बाबा म्हणतात - मी आलो आहे तुम्हा आत्म्यांना वारसा देण्याकरिता. जितका जो पुरुषार्थ करेल तितके पद प्राप्त करेल. बाबांकडे मात्र कोणताही भेदभाव नाही. बाबा जाणतात - मी आत्म्यांना शिकवत आहे. आत्म्याचा अधिकार आहे बाबांकडून वारसा घेण्याचा, यामध्ये स्त्री-पुरुषाची दृष्टी इथे राहत नाही. तुम्ही सर्व संतान आहात. बाबांकडून वारसा घेत आहात. सर्व आत्मे ब्रदर्स आहेत, ज्यांना बाबा शिकवत आहेत, वारसा देत आहेत. बाबाच रुहानी मुलांशी बोलत आहेत - ‘माझ्या लाडक्या गोड सिकीलध्या मुलांनो, तुम्ही बराच काळ पार्ट बजावता-बजावता आता पुन्हा येऊन भेटला आहात, आपला वारसा घेण्याकरिता’. हे देखील ड्रामामध्ये नोंदलेले आहे. सुरुवातीपासून पार्ट नोंद झालेला आहे. तुम्ही ॲक्टर्स पार्ट बजावत ॲक्ट करत राहता. आत्मा अविनाशी आहे, यामध्ये अविनाशी पार्ट नोंदलेला आहे. शरीर तर बदलत राहते. बाकी आत्मा केवळ पवित्र पासून अपवित्र बनते. पतित बनते, सतयुगामध्ये आहे पावन. याला म्हटले जाते पतित दुनिया. जेव्हा देवतांचे राज्य होते तेव्हा व्हाईसलेस वर्ल्ड होते (निर्विकारी दुनिया होती); आता नाहीये. हा खेळ आहे ना. नवीन दुनिया सो जुनी दुनिया, जुनी दुनिया पुन्हा नवीन दुनिया. आता सुखधाम स्थापन होत आहे, बाकी सर्व आत्मे मुक्तिधाममध्ये राहतील. आता हे बेहदचे नाटक इथे पूर्ण होत आहे. सर्व आत्मे मच्छरांप्रमाणे जातील. यावेळी कोणतीही आत्मा आली तरीही पतित दुनियेमध्ये तिची काय व्हॅल्यू असेल. व्हॅल्यू त्यांची आहे जे सर्वप्रथम नवीन दुनियेमध्ये येतात. तुम्ही जाणता जी नवीन दुनिया होती ती पुन्हा जुनी बनली आहे. नवीन दुनियेमध्ये आपण देवी-देवता होतो. तिथे दुःखाचे नाव सुद्धा नव्हते. इथे तर अथाह दुःख आहे. बाबा येऊन दुःखाच्या दुनियेतून लिबरेट करतात (मुक्त करतात). ही जुनी दुनिया जरूर बदलणार आहे. तुम्ही समजता बरोबर आपण सतयुगाचे मालक होतो, आणि मग ८४ जन्मानंतर असे बनलो आहोत. आता पुन्हा बाबा म्हणत आहेत - माझी आठवण करा तर तुम्ही स्वर्गाचे मालक बनाल. तर आपण का नाही स्वतःला आत्मा निश्चय करावे आणि बाबांची आठवण करावी. काहीतरी मेहनत करावी लागेल ना. राजाई प्राप्त करणे काही सोपे थोडेच आहे. बाबांची आठवण करायची आहे. हे मायेचे वंडर आहे जी वारंवार तुम्हाला विसरायला लावते. त्यासाठी उपाय शोधला पाहिजे. असे नाही, माझे बनल्याने आठवण टिकून राहील. बाकी पुरुषार्थ काय करणार! नाही. जोपर्यंत जीवन आहे पुरुषार्थ करायचा आहे. ज्ञान अमृत पीत राहायचे आहे. हे देखील समजता आपला हा अंतिम जन्म आहे. या शरीराचे भान सोडून देही-अभिमानी बनायचे आहे. गृहस्थ व्यवहारामध्ये देखील राहायचे आहे. पुरुषार्थ जरूर करायचा आहे. फक्त स्वतःला आत्मा निश्चय करून बाबांची आठवण करा. ‘त्वमेव माताश्च पिता…’ ही सर्व आहे भक्ती मार्गाची महिमा. तुम्हाला केवळ एक ‘अल्फ’ची आठवण करायची आहे. एकच गोड सैक्रीन आहे. इतर सर्व गोष्टी सोडून एक सैक्रीन (बाबांची) आठवण करा. आता तुमची आत्मा तमोप्रधान बनली आहे, तिला सतोप्रधान बनविण्यासाठी आठवणीच्या यात्रेमध्ये रहा. सर्वांना हेच सांगा बाबांकडून सुखाचा वारसा घ्या. सुख असतेच सतयुगामध्ये. सुखधाम स्थापन करणारे बाबा आहेत. बाबांची आठवण करणे, आहे खूप सोपे. परंतु मायेचा विरोध खूप आहे म्हणून प्रयत्न करून मज पित्याची आठवण करा तेव्हा खाद (भेसळ) निघून जाईल. सेकंदामध्ये जीवनमुक्ती गायले जाते. आपण आत्मे रुहानी बाबांची संतान आहोत. तिथले रहिवासी आहोत, पुन्हा आपल्याला आपला पार्ट रिपिट करायचा आहे. या ड्रामामध्ये सर्वात जास्ती पार्ट आमचा आहे. सुख देखील सर्वात जास्त आम्हाला मिळेल. बाबा म्हणतात - तुमचा देवी-देवता धर्म खूप सुख देणारा आहे आणि बाकीचे सगळे हिशोब चुकता करून ऑटोमॅटिकली शांतीधाम मध्ये निघून जातील. जास्त विस्तारामध्ये आपण का जावे. बाबा येतातच सर्वांना परत घेऊन जाण्यासाठी. मच्छरांसदृश्य सर्वांना घेऊन जातात. सतयुगामध्ये फार थोडे असतात. हे सर्व ड्रामामध्ये नोंदलेले आहे. शरीर नष्ट होतील. आत्मा जी अविनाशी आहे ती हिशोब चुकता करून निघून जाईल. असे नाही की आत्मा आगीमध्ये पडल्याने पवित्र होईल. आत्म्याला आठवण रुपी योग अग्नीनेच पवित्र व्हायचे आहे. योगाची अग्नी ही आहे. त्यांनी मग नाटक बसून बनवली आहेत. सीता आगीतून पार झाली. आगीने थोडेच काही पावन व्हायचे आहे. बाबा समजावून सांगत आहेत तुम्ही सर्व सीता यावेळी पतित आहात. रावणाच्या राज्यामध्ये आहात. आता एका बाबांच्या आठवणीने तुम्हाला पावन बनायचे आहे. राम एकच आहे. अग्नी शब्द ऐकल्याने समजतात - आगीतून पार झाली. कुठे योग अग्नी, कुठे ती. आत्मा, परमपिता परमात्म्याशी योग ठेवल्यानेच पतितापासून पावन बनेल. रात्रं-दिवसाचा फरक आहे. हेल मध्ये (नरकामध्ये) सर्व सीता रावणाच्या जेलमध्ये शोक वाटिकेमध्ये आहेत. इथले सुख तर कागविष्ठा समान आहे. तुलना केली जाते. स्वर्गाचे सुख तर अथाह आहे.

तुम्हा आत्म्यांचा आता शिव साजनसोबत साखरपुडा झाला आहे. म्हणजे मग आत्मा फिमेल झाली ना! शिवबाबा म्हणतात - फक्त माझी आठवण करा तर तुम्ही पावन बनाल. शांतीधामला जाऊन मग सुखधाममध्ये याल. तर मुलांनी ज्ञान रत्नांनी झोळी भरायला हवी. कोणत्याही प्रकारचा संशय येऊ देता कामा नये. देह-अभिमानामध्ये आल्याने मग अनेक प्रकारचे प्रश्न उत्पन्न होतात. मग बाबा जो धंदा देतात तो करत नाहीत. मूळ गोष्ट आहे आपल्याला पतितापासून पावन बनायचे आहे. बाकीच्या गोष्टी सोडून दिल्या पाहिजेत. राजधानीचा जसा रीती-रिवाज असेल तसा चालेल. जसे महाल बनवले असतील तसे बनतील. मूळ गोष्ट आहे पवित्र बनण्याची. बोलावतात देखील - ‘हे पतित-पावन…’ पावन बनल्याने सुखी बनाल. सर्वात पावन आहेत देवी-देवता.

आता तुम्ही २१ जन्मांसाठी सर्वोत्तम पावन बनता. त्याला म्हटले जाते संपूर्ण निर्विकारी पावन. तर बाबा जे श्रीमत देतात त्यानुसार चालले पाहिजे. कोणताही संकल्प उत्पन्न होण्याची गरज नाही. अगोदर आपण पतितापासून पावन तर बनूया. बोलावतात देखील - ‘हे पतित-पावन…’ परंतु काहीच समजत नाहीत. हे देखील जाणत नाहीत की, पतित-पावन कोण आहे? ही आहे पतित दुनिया, ती आहे पावन दुनिया. मुख्य गोष्ट आहेच मुळी पावन बनण्याची. पावन कोण बनविणार? ते काहीच ठाऊक नाही. पतित-पावन, असे म्हणून बोलावतात; परंतु तुम्ही जर बोलाल की, ‘तुम्ही पतित आहात’ तर चिडतील. कोणीही स्वतःला विकारी समजत नाहीत. म्हणतात - सगळे गृहस्थीमध्येच तर होते. राधे-कृष्ण, लक्ष्मी-नारायणाला सुद्धा मुले होती ना. परंतु तिथे योगबलाने मुले जन्मतात, हे विसरून गेले आहेत. त्याला व्हाइसलेस वर्ल्ड, स्वर्ग म्हटले जाते. ते आहे शिवालय. बाबा म्हणतात - पतित दुनियेमध्ये एकही पावन नाही. हे बाबा तर पिता, टीचर आणि सद्गुरू आहेत जे सर्वांना सद्गती देतात. ते (दुनियावाले) तर एक गुरु निघून गेला तर मग मुलाला गादी देतील (उत्तराधिकारी बनवतील). आता ते कसे सद्गतीमध्ये घेऊन जातील? सर्वांचा सद्गती दाता आहेच मुळी एक. सतयुगामध्ये केवळ देवी-देवता होते. बाकी इतके सर्व आत्मे शांतीधाम मध्ये निघून जातील. रावण राज्यातून सुटका होते. बाबा सर्वांना पवित्र बनवून घेऊन जातात. कोणीही पावन असलेला अगदी लगेचच पतित बनत नाही. नंबरवार उतरतात, सतोप्रधानापासून सतो, रजो, तमो… तुमच्या बुद्धीमध्ये ८४ जन्मांचे चक्र पक्के बसले आहे. तुम्ही जसे आता लाईट हाऊस आहात. ज्ञानाद्वारे या चक्राला जाणून घेतले आहे की हे चक्र कसे फिरते. आता तुम्हा मुलांनी इतर सर्वांना मार्ग सांगायचा आहे. सर्वजण नौका आहेत, तुम्ही मार्ग सांगणारे नावाडी आहात. सर्वांना सांगा - तुम्ही शांतीधाम, सुखधामची आठवण करा. कलियुग दुःखधामाला विसरून जा. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) जोपर्यंत जीवन आहे ज्ञान अमृत पित राहायचे आहे. आपली झोळी ज्ञान रत्नांनी भरायची आहे. संशयामध्ये येऊन कोणतेही प्रश्न उत्पन्न करायचे नाहीत.

२) योग अग्नीद्वारे आत्मा रुपी सीतेला पावन बनवायचे आहे. कोणत्याही गोष्टीच्या विस्तारामध्ये जास्त न जाता देही-अभिमानी बनण्याची मेहनत करायची आहे. शांतीधाम आणि सुखधामची आठवण करायची आहे.

वरदान:-
सदैव मनन शक्तीद्वारे मग्न अवस्थेच्या सागरामध्ये सामावण्याचा अनुभव करणारे अनुभवी मूर्त भव

अनुभवाला वाढविण्याचा आधार आहे - मनन शक्ती. मनन करणारा स्वतः मग्न राहतो. मग्न अवस्थेमध्ये योग लावावा लागत नाही परंतु निरंतर लागलेला राहतो, मेहनत करावी लागत नाही. मग्न अर्थात प्रेमाच्या सागरामध्ये सामावलेला, असा सामावलेला ज्याला कोणी वेगळे करू शकत नाही. तर मेहनत करण्यापासून स्वतःला सोडवा, सागराची मुले आहात तर अनुभवाच्या तलावामध्ये स्नान करू नका परंतु सागरामध्ये सामावून जा, तेव्हाच म्हटले जाईल अनुभवीमूर्त.

बोधवाक्य:-
ज्ञान स्वरूप आत्मा ती आहे जिचा प्रत्येक संकल्प, प्रत्येक सेकंद समर्थ असेल.

अव्यक्त इशारे:- या अव्यक्ती महिन्यामध्ये बंधनमुक्त राहून जीवनमुक्त स्थितीचा अनुभव करा. जर कोणताही स्वभाव, संस्कार, व्यक्ती किंवा वैभवाचे बंधन आपल्याकडे आकर्षित करते, तर बाबांच्या आठवणीचे आकर्षण सदैव राहू शकत नाही. कर्मातीत बनणे अर्थात सर्व कर्मबंधनांपासून मुक्त, न्यारे बनून, प्रकृती द्वारे निमित्त-मात्र कर्म करणे. हा न्यारा बनण्याचा पुरुषार्थ वारंवार करत रहा. सहज आणि आपोआप अशी अनुभूती व्हावी की, “करविणारा आणि करणारी ही कर्मेंद्रिये वेगवेगळी आहेत”.