30-03-25 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
30.11.2004 ओम शान्ति
मधुबन
“आता आपल्या चलन आणि
चेहऱ्याद्वारे ब्रह्मा बाबांसारखे अव्यक्त रूप दाखवा, साक्षात्कार मूर्त बना”
आज भाग्य विधाता बाबा
आपल्या चोहो बाजूंच्या श्रेष्ठ भाग्यवान मुलांना पाहून हर्षित होत आहेत. साऱ्या
कल्पामध्ये असे श्रेष्ठ भाग्य कोणाचेही असू शकत नाही. कल्पा-कल्पाची तुम्ही मुलेच
या भाग्याचा अधिकार प्राप्त करता. लक्षात आहे - आपल्या कल्पा-कल्पाच्या अधिकाराचे
भाग्य? हे भाग्य सर्वश्रेष्ठ भाग्य का आहे? कारण की स्वयं भाग्य विधात्याने या
श्रेष्ठ भाग्याचा दिव्य जन्म तुम्हा मुलांना दिलेला आहे, ज्यांचा जन्मच भाग्य
विधात्याद्वारे आहे, त्यापेक्षा श्रेष्ठ भाग्य आणखी असूच शकत नाही. आपल्या भाग्याचा
नशा स्मृतीमध्ये राहतो का? आपल्या भाग्याची लिस्ट काढली तर किती मोठी लिस्ट आहे?
अप्राप्त कोणती वस्तू नाही तुम्हा ब्राह्मणांच्या भाग्यवान जीवनामध्ये. सर्वांच्या
मनामध्ये आपल्या भाग्याची लिस्ट स्मृतीमध्ये आली का! स्मृतीमध्ये आणा, आली का
स्मृतीमध्ये? मन कोणते गाणे गाते? ‘वाह भाग्य विधाता!’ आणि ‘वाह माझे भाग्य!’ या
श्रेष्ठ भाग्याची विशेषता हीच आहे - एका भगवंताद्वारे तीन संबंधांची प्राप्ति आहे.
एका द्वारे एकामध्ये तीन संबंध, जे जीवनामध्ये विशेष संबंध गायले गेले आहेत - पिता,
शिक्षक, सद्गुरु कोणालाही एकाद्वारे तीन विशेष संबंध आणि प्राप्ति नाही आहे. तुम्ही
अभिमानाने म्हणता की, आमचे पिता देखील आहेत, शिक्षक देखील आहेत तर सद्गुरु सुद्धा
आहेत. बाबांद्वारे सर्व खजिन्यांची खाण प्राप्त आहे. खजिन्यांची लिस्ट देखील
स्मृतीमध्ये आली! स्मृतीमध्ये आणा कोण-कोणता खजिना बाबांद्वारे मिळाला! मिळाला आहे
की मिळायचा आहे? काय म्हणणार? बालक सो मालक आहातच. शिक्षकाद्वारे शिक्षणामुळे
श्रेष्ठ पदाची प्राप्ति झाली. तसेही बघायला गेले तर दुनियेमध्ये देखील सर्वात
श्रेष्ठ पद - राज्य पद गायले जाते, मग तुम्ही तर डबल राजे बनला आहात. वर्तमान
स्वराज्य अधिकारी आणि भविष्यामध्ये अनेक जन्म राज्य पदाचे अधिकारी. शिक्षण एका
जन्माचे, तो सुद्धा छोटासा जन्म आणि पदाची प्राप्ति अनेक जन्म, आणि राज्य देखील
अखंड, अटळ, निर्विघ्न राज्य. आत्ता सुद्धा स्वराज्य अधिकारी निश्चिंत बादशहा आहात,
आहात का? बेफिकीर बादशाह बनला आहात? जे निश्चिंत आहेत त्यांनी हात वर करा. निश्चिंत,
थोडी सुद्धा चिंता नाही आहे? बघा, जेव्हा कोणता पपेट शो समोर येतो तेव्हा चिंता
वाटते? मायेचा पपेट शो समोर येतो की नाही? मग थोडी-थोडी चिंता वाटते का? नाही वाटत?
थोडी चिंता, चिंतन चालते की नाही चालत? तसे तर श्रेष्ठ भाग्य आत्तापासूनच निश्चिंत
बादशहा बनवते. या थोड्या-फार ज्या गोष्टी येतात त्या आणखीनच पुढे जाण्यासाठी अनुभवी,
परिपक्व बनविणाऱ्या आहेत.
आता तर सर्व या विविध
गोष्टींचे अनुभवी झाला आहात ना! घाबरत तर नाही ना? आरामात साक्षीच्या सीटवर बसून हा
पपेट शो बघा, कार्टून शो बघा. खरेतर तसे काहीच नसते, कार्टून आहे. आता तर मजबूत झाला
आहात ना! आता मजबूत आहात? की कधी-कधी घाबरता? हे कागदाचा वाघ बनून येतात. आहे
कागदाचा परंतु वाघ बनून येतात. आता समयानुसार अनुभवीमूर्त बनून वेळेला, प्रकृतीला,
मायेला चॅलेंज करा - या, आम्ही विजयी आहोत. विजयाचे चॅलेंज करा. (ब्रह्मा बाबांना
मध्ये-मध्ये खोकला येत आहे) आज बाजा थोडा खराब आहे, भेटायचे तर आहे.
बापदादांकडे दोन
ग्रुप पुन्हा-पुन्हा येतात, कशासाठी येतात? दोन्ही ग्रुप बापदादांना म्हणतात - आम्ही
तयार आहोत. एक म्हणजे हा काळ, प्रकृती आणि माया. माया समजून गेली आहे की आता आपले
राज्य जाणार आहे. आणि दुसरा ग्रुप आहे - ॲडव्हान्स पार्टी. दोन्ही ग्रुप डेट विचारत
आहेत. फॉरेनमध्ये तर एक वर्षा अगोदर डेट फिक्स करता ना? आणि इथे ६ महिने अगोदर?
भारतामध्ये फास्ट जातात, १५ दिवसामध्ये सुद्धा काही प्रोग्रामची डेट होऊन जाते. तर
समाप्ती, संपन्नता, बाप समान बनण्याची डेट कोणती आहे? ते बापदादांना विचारतात. ही
डेट आता तुम्हा ब्राह्मणांना फिक्स करायची आहे. होऊ शकते का? डेट फिक्स होऊ शकते
काय? पांडव बोला, तिघेही बोला. (बापदादा निर्वैर भाई, रमेश भाई, बृजमोहन भाईंना
विचारत आहेत) डेट फिक्स होऊ शकते का? बोला - होऊ शकते? की अचानक होणार आहे?
ड्रामामध्ये फिक्स आहे परंतु त्याला प्रॅक्टिकल मध्ये आणायचे आहे की नाही? ते काय
ते सांगा?. होणार आहे? अचानक होणार? डेट फिक्स होणार नाही? होणार? पहिल्या लाइनवाले
सांगा, होणार का? जे म्हणतात ड्रामाला प्रॅक्टिकलमध्ये आणण्यासाठी मनामध्ये डेटचा
संकल्प करावा लागेल, त्यांनी हात वर करा. करावे लागेल? हे हात वर करत नाहीत? अचानक
होणार? डेट फिक्स करू शकता का? मागे बसणाऱ्यांना समजले का? अचानक होणार आहे हे
बरोबर आहे परंतु स्वतःला तयार करण्यासाठी लक्ष्य जरूर ठेवावे लागेल. लक्ष्या शिवाय
संपन्न बनण्यामध्ये निष्काळजीपणा येतो. तुम्ही बघा, जेव्हा डेट फिक्स करता तेव्हा
सफलता मिळते. कोणत्याही प्रोग्रामची डेट फिक्स करता ना? बनायचेच आहे, हा संकल्प तर
करावा लागेल ना! की नाही, ड्रामामध्ये आपोआप होईल? काय समजता? पहिली लाइनवाले सांगा.
प्रेम (डेहराडून) सांगा बरं. करावे लागेल, करावे लागेल? जयंती बोला, करावे लागेल.
ती कधी होणार? शेवटी होईल जेव्हा वेळ येईल! तुम्हाला वेळ संपन्न बनवणार की तुम्ही
वेळेला समीप आणणार?
बापदादांनी बघितले आहे
की, स्मृतिमध्ये ज्ञान देखील असते, नशा देखील असतो, निश्चय सुद्धा असतो, परंतु आता
ॲडिशन पाहिजे - चलन आणि चेहऱ्याद्वारे दिसून यावे. बुद्धीमध्ये लक्षात सर्व राहते,
आठवते देखील परंतु आता स्वरूपामध्ये यावे. जेव्हा साधारण रूपामध्ये सुद्धा जर कोणी
मोठ्या आक्युपेशनवाला असेल किंवा कोणी श्रीमंताचा मुलगा वेल एज्युकेटेड असेल तर
त्याच्या वर्तनामधून दिसून येते की हा कोणीतरी आहे. त्याचा कोणता ना कोणता वेगळेपणा
दिसून येतो. तर इतके मोठे भाग्य, वारसा देखील आहे, शिक्षण आणि पद देखील आहे.
स्वराज्य तर आता सुद्धा आहे ना! प्राप्ति देखील सर्व आहेत, परंतु वर्तनामधून आणि
चेहऱ्याद्वारे भाग्याचा तारा मस्तकामध्ये चमकत असलेला दिसून यावा, आता हे ॲडिशन
पाहिजे. आता लोकांना तुम्हा श्रेष्ठ भाग्यवान आत्म्यांद्वारे हा अनुभव होणार आहे,
पाहिजे नाही, होणार आहे की हे आमचे इष्ट देव आहेत, इष्ट देवी आहेत. हे आमचे आहेत.
जसे ब्रह्मा बाबांमध्ये बघितले - साधारण शरीरामध्ये असताना देखील सुरुवातीच्या
काळामध्ये देखील ब्रह्मा बाबांमध्ये काय दिसून येत होते, कृष्ण दिसून येत होता ना!
आदिवाल्यांना अनुभव आहे ना! तर जसे आदिमध्ये ब्रह्मा बाबांद्वारे कृष्ण दिसून येत
होता तसेच शेवटच्या काळामध्ये काय दिसून येत होते? अव्यक्त रूप दिसून येत होते ना!
वर्तनामध्ये, चेहऱ्यामध्ये दिसून आले ना! आता बापदादा विशेष निमित्त मुलांना हे होम
वर्क देत आहेत की आता ब्रह्मा बाप समान अव्यक्त रुप दिसून यावे. चलन आणि
चेहऱ्याद्वारे कमीत-कमी १०८ माळेचे मणी तर दिसून येऊ देत. बापदादा नावे मागत नाहीत
, नावे सांगत नाहीत - १०८ कोण आहेत परंतु त्यांची चलन आणि चेहरा स्वतःच प्रत्यक्ष
व्हावा. हा होमवर्क बापदादा विशेष निमित्त मुलांना देत आहेत. होऊ शकते ना? अच्छा,
किती वेळ पाहिजे? असे समजू नका की जे नंतर आलेले आहेत, टाइमची गोष्ट नाही आहे, कोणी
समजतील आम्हाला तर थोडीच वर्षे झाली आहेत. कोणीही लास्ट सो फास्ट आणि फास्ट सो
फर्स्ट जाऊ शकतात, हे देखील बापदादांचे चॅलेंज आहे, करू शकता. कोणीही करु शकता.
लास्ट वाला देखील होऊ शकतो. फक्त लक्ष्य पक्के ठेवा - करायचेच आहे, होणारच आहे.
डबल फॉरेनर्स हात वर
करा. तर डबल फॉरेनर्स काय करणार? डबल चान्स घेणार ना. बापदादा नाव अनाऊन्स करणार
नाहीत परंतु त्यांचा चेहरा सांगेल - हे आहेत. हिंमत आहे? पहिल्या लाईनला बापदादा
पहात आहेत. आहे, हिंमत आहे? जर हिंमत असेल तर हात वर करा. हिंमत असेल तर? मागे
बसलेले सुद्धा हात वर करू शकतात. जो ओटे सो अर्जुन. अच्छा - बापदादा रिझल्ट
पाहण्यासाठी, काय-काय पुरुषार्थ करत आहेत, कोण-कोण करत आहेत तो रिझल्ट बघण्यासाठी ६
महिने देत आहेत. ६ महिने रिझल्ट बघणार मग फायनल करतील. ठीक आहे? कारण की बघितले जाते
की आता काळाचा वेग फास्ट जात आहे, रचनेला फास्ट जाता कामा नये, रचताला फास्ट व्हायला
हवे. आता थोडे फास्ट करा, उडा आता. चालत आहोत नाही, उडत आहोत. उत्तरा दाखल खूप छान
उत्तरे देतात की, आम्हीच तर आहोत ना! आणखी कोण असणार! बापदादा खुश होतात. परंतु आता
लोक (आत्मे) जे आहेत ना, ते काही तरी बघू इच्छितात. बापदादांना लक्षात आहे की,
जेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही मुले सेवेसाठी निघाला होता तर मुलांद्वारे
देखील साक्षात्कार होत होते, आता सेवा आणि स्वरुप दोन्ही बाजूला अटेंशन पाहिजे. तर
काय ऐकले! आता साक्षात्कार मूर्त बना. साक्षात ब्रह्मा बाबा बना. अच्छा.
आज नवीन मुले देखील
खूप आलेली आहेत. आपल्या स्नेहाच्या शक्तिने सर्वजण पोहोचले आहेत म्हणून बापदादा
विशेष जी नवीन मुले आलेली आहेत, त्या प्रत्येकाला नावासहित पदमगुणा मुबारक देत आहेत,
त्याच सोबत वरदाता वरदान देत आहेत - ‘सदैव ब्राह्मण जीवनामध्ये जगत रहा, उडत रहा’.
अच्छा.
सेवेचा टर्न पंजाबचा
आहे:-
पंजाबवाले उठा. खूप छान. ही देखील विधी छान बनवली आहे, प्रत्येक झोनला चान्स मिळतो.
एक म्हणजे यज्ञ सेवेद्वारे प्रत्येक पावलामध्ये पदमगुणा कमाई जमा होते कारण की
मेजॉरिटी कोणतेही कर्म करत असताना यज्ञ सेवा लक्षात राहते आणि यज्ञ सेवा आठवल्यामुळे
यज्ञ रचता बाबा तर आठवतातच. तर सेवेमध्ये देखील जास्तीत-जास्त पुण्याचे खाते जमा
करतात आणि जी खरी पुरुषार्थी मुले आहेत ती आपल्या आठवणीच्या चार्टला सोपा आणि
निरंतर बनवू शकतात कारण की इथे एक तर महारथींचा संग आहे, संगाचा रंग सहजच लागू शकतो.
जर अटेंशन असेल तर हे जे ८-१० दिवस मिळतात त्यामध्ये चांगली प्रगती करू शकता. कॉमन
रीतीने सेवा केली तर इतका लाभ नाही आहे, परंतु सहज निरंतर योगी बनण्याचा, पुण्याचे
खाते जमा करण्याचा एक चान्स आहे, आणि मोठ्यात मोठ्या परिवाराच्या नशेमध्ये राहण्याचा,
खुशीमध्ये राहण्याचा चान्स आहे. तर पंजाबवाल्यांना चान्स मिळाला आहे, प्रत्येक झोनला
मिळतो परंतु लक्ष्य ठेवा की तीनही फायदे मिळाले! पुण्याचे खाते किती जमा केले? सहज
आठवणीची प्रोग्रेस किती केली? आणि संघटन अथवा परिवाराचा स्नेह, समीपतेचा अनुभव किती
केला? या तीनही गोष्टींचा रिझल्ट प्रत्येकाने स्वतःचा काढला पाहिजे. ड्रामामध्ये
चान्स तर मिळतो परंतु चान्स घेणारे चान्सलर बना. तर पंजाबवाले हुशार आहेत ना! चांगले
आहे. चांगल्या संख्येने देखील आला आहात आणि सेवा देखील खुल्या दिलाने मिळाली आहे.
येणाऱ्यांची संख्या सुद्धा चांगली आली आहे. छान आहे, संघटन चांगले आहे. (आज दोन
विंग - ग्राम विकास विंग आणि महिला विंग मिटिंगसाठी आलेले आहेत)
महिला विंगवाले उठा:-
यामध्ये मेजॉरिटी
टीचर्स आहेत काय? टीचर्स हात वर करा. चांगला चान्स आहे. सेवे परी सेवा आणि सेवेच्या
अगोदर मेवा. संघटनची आणि बाबांना भेटण्याची मजा घेणे. तर सेवा आणि मेवा दोन्ही
मिळाले. चांगले आहे. आता कोणता नवीन प्लॅन बनवला आहे? कोणताही, भले महिलांचा असेल,
किंवा कोणत्याही विंगच्या ग्रुप्सचा बनला असेल. तर प्रत्येक ग्रुपने काही विशेष
प्रॅक्टिकल वर्तनामध्ये आणि चेहऱ्यावर कोणता ना कोणता गुण अथवा शक्तिचा विडा उचलावा
की, आम्ही आमचा हा ग्रुप, महिला ग्रुप या गुणाला अथवा शक्तिला प्रॅक्टिकल मध्ये
प्रत्यक्ष रुपामध्ये आणणार. असे प्रत्येक विंगवाल्यांनी आपली कोणती ना कोणती विशेषता
फिक्स करा आणि त्याचा जसा आपसामध्ये सेवेचा रिझल्ट नोट करता ना, तसे आपसामध्ये भले
लिखतमध्ये असेल, किंवा संघटन असेल, हे देखील चेक करत रहा. तर अगोदर तुम्ही लोकांनी
करून दाखवा. महिला विंगने करून दाखवा. ठीक आहे ना. प्रत्येक विंगला आपला काही ना
काही प्लॅन बनवायचा आहे आणि वेळ फिक्स करा की इतक्या वेळेमध्ये इतकी परसेंटेज
प्रॅक्टिकल मध्ये आणायची आहे. मग जे बापदादा इच्छितात ना, चलन आणि चित्रावर यावे (वर्तनामध्ये
आणि चेहऱ्यावर यावे), ते येईल. तर हा प्लॅन बनवून बापदादांना द्या. प्रत्येक विंग
काय करणार? सेवेचा प्लॅन जसा नोट करता ना, तसे हे करून द्या. ठीक आहे ना! करून द्या.
चांगले आहे छोटे-छोटे संघटन कमाल करु शकते. ठीक आहे. काय समजता टीचर्स? करू शकता
का? करू शकता ना? तर प्लॅन बनवा. अच्छा. मुबारक असो सेवेची.
ग्राम विकास विंगवाले
उठा:-
आतापर्यंत ग्राम विकासवाल्यांनी किती गावे परिवर्तन केली आहेत? किती गावामध्ये केले
आहे? (७ गावामध्ये केले आहे, एका गावामध्ये ७५ टक्के पर्यंत काम झाले आहे. या
मीटिंगमध्ये देखील प्रोग्राम बनवला आहे - “समय की पुकार - स्वच्छ स्वर्णिम ग्राम्य
भारत” या प्रोजेक्ट्च्या अंतर्गत गावा-गावाला व्यसनमुक्त आणि स्वच्छ बनविण्याची सेवा
करणार) छान आहे - प्रॅक्टिकल आहे ना. याचा टोटल रिझल्ट जो आहे तो प्रेसिडेंट,
प्राईम मिनिस्टर यांच्याकडे जातो का? (अजून तरी पाठवलेला नाही) पाठवला पाहिजे कारण
की हे जे गावोगाव प्रॅक्टिकल करत आहात, हे तर गव्हर्मेंटचेच काम आहे परंतु तुम्ही
सहयोगी बनत आहात तर रिझल्ट पाहून चांगले मानतील. एक असे बुलेटिन तयार करा ज्यामुळे
गव्हर्मेंटच्या सर्व मुख्य लोकांना ते बुलेटिन जाईल, पुस्तक नाही, मॅगझीन नाही,
सर्व ठिकाणचा शॉर्ट मध्ये टोटल रिझल्ट पाठवला पाहिजे. छान आहे - मुबारक असो. अच्छा
- (मध्ये-मध्ये खोकला येत आहे) आज बाजा शांती मागत आहे. अच्छा.
बापदादांकडे, चोहो
बाजूंच्या सेवेचा रिझल्ट देखील येत असतो आणि विशेष आजकाल कोणताही कोपरा राहून जाऊ
नये - सर्वांना संदेश मिळावा, हा प्लॅन जो प्रॅक्टिकल मध्ये करत आहात, त्याचा
रिझल्ट देखील चांगला आहे. बापदादांकडे डबल विदेशी मुलांचे समाचार आले आहेत आणि
ज्यांनी कोणी मेगा प्रोग्राम (भारतामध्ये) केले आहेत, त्यांचा समाचार देखील सर्व
मिळाला आहे. चारी बाजूंना सेवेचा रिझल्ट सफलता पूर्वक मिळाला आहे. तर मुलांनी जसे
सेवेमध्ये, संदेश देण्याच्या रिझल्टमध्ये सफलता प्राप्त केली आहे तसेच वाणीद्वारे,
संपर्काद्वारे आणि त्याच सोबत आपल्या चेहऱ्याद्वारे फरिश्ता रुपाचा साक्षात्कार
घडवत रहा.
अच्छा - जे
पहिल्यांदाच आले आहेत त्यांनी हात वर करा. भरपूर आहेत. चांगले आहे टू लेटचा बोर्ड
लागण्याआधी आला आहात, छान आहे, चान्स घ्या. कमाल करुन दाखवा. हिंमत ठेवा, बापदादांची
मदत प्रत्येक मुलासोबत आहे. अच्छा!
बापदादा चोहो
बाजूंच्या साकार सन्मुख बसलेल्या मुलांना आणि आपल्या-आपल्या स्थानावर, देशामध्ये
बाबांसोबत मिलन साजरे करणाऱ्या चोहो बाजूंच्या मुलांना खूप-खूप सेवेची, स्नेहाची आणि
पुरुषार्थाची मुबारक तर देत आहेत परंतु पुरुषार्थामध्ये तीव्र पुरुषार्थी बनून आता
आत्म्यांना दुःख आणि अशांती पासून सोडविण्याचा पुरुषार्थ अजून तीव्र करा. दुःख,
अशांती, भ्रष्टाचार अतिमध्ये जात आहे, आता अति चा अंत करुन सर्वांना बाबांकडून
मुक्तिधामचा वारसा मिळवून द्या. अशा सदैव दृढ संकल्पवाल्या मुलांना प्रेमपूर्वक
आठवण आणि नमस्ते. ओम् शांती.
वरदान:-
नम्रता आणि
ऑथॉरिटीच्या बॅलन्स द्वारे बाबांना प्रत्यक्ष करणारे विशेष सेवाधारी भव जिथे बॅलन्स
असतो तिथे चमत्कार दिसून येतो. जेव्हा तुम्ही नम्रता आणि सत्यतेच्या ऑथॉरिटीच्या
बॅलन्सने कोणालाही बाबांचा परिचय द्याल तर चमत्कार दिसून येईल. अशाच प्रकारे बाबांना
प्रत्यक्ष करायचे आहे. तुमचे बोलणे स्पष्ट असावे, त्यामध्ये स्नेह सुद्धा असावा,
नम्रता आणि मधुरता देखील असावी तसेच महानता आणि सत्यता देखील असावी तेव्हाच
प्रत्यक्षता होईल. बोलत असताना मधे-मधे अनुभव करवत जा ज्यामुळे त्या धून मध्ये
निमग्न झाल्याचा अनुभव करतील. असे स्वरूपाद्वारे सेवा करणारेच विशेष सेवाधारी आहेत.
सुविचार:-
वेळेवर कोणतेही साधन
जरी नसले तरीही साधनेमध्ये विघ्न पडू नये.
अव्यक्त इशारे -
सत्यता आणि सभ्यता रुपी कल्चरला धारण करा:- काहीजण असे समजतात की, क्रोध काही कोणता
विकार नाही आहे, हे शस्त्र आहे. परंतु क्रोध ज्ञानी तू आत्म्यासाठी महाशत्रु आहे.
कारण क्रोध अनेक आत्म्यांच्या संबंध-संपर्कामध्ये आल्यामुळे प्रसिद्ध होतो आणि
क्रोधाला पाहून बाबांच्या नावाची खूप निंदा होते. बोलणारे हेच म्हणतात - ‘बघितले,
ज्ञानी तू आत्मा मुलांना’; त्यामुळे याच्या अंशाला देखील नष्ट करून सभ्यता पूर्वक
व्यवहार करा.