30-07-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - दुःखहर्ता, सुखकर्ता एक बाबा आहेत, तेच तुमची सर्व दुःखे दूर करतात, मनुष्य कोणाचीही दुःखे दूर करू शकत नाही”

प्रश्न:-
विश्वामध्ये अशांतीचे कारण काय आहे? शांती कशी स्थापन होईल?

उत्तर:-
विश्वामध्ये अशांतीचे कारण आहे अनेकानेक धर्म. कलियुगाच्या अंताला जेव्हा अनेकता आहे, तेव्हा अशांती आहे. बाबा येऊन एका सत् धर्माची स्थापना करतात. तिथे शांती प्रस्थापित होते. तुम्ही समजू शकता की या लक्ष्मी-नारायणाच्या राज्यामध्ये शांती होती. पवित्र धर्म, पवित्र कर्म होते. कल्याणकारी बाबा पुन्हा ती नवी दुनिया बनवत आहेत. तिथे अशांतीचे नाव देखील नाही.

ओम शांती।
रुहानी बाबा बसून रुहानी मुलांना समजावून सांगत आहेत - ‘रुहानी बाबांनाच ज्ञानाचा सागर म्हटले जाते’. हे तर मुलांना समजावून सांगितले गेले आहे. मुंबईमध्ये देखील खूप समाजसेवक आहेत, त्यांच्या सभा होतच असतात. मुंबईमध्ये विशेष ज्या ठिकाणी सभा घेतात त्याचे नाव आहे - ‘भारतीय विद्या भवन’. आता विद्या असते दोन प्रकारची. एक आहे भौतिक विद्या, जी शाळा-कॉलेजमध्ये दिली जाते. आता त्याला विद्या भवन म्हणतात. नक्की तिथे कुठली तरी दुसरी गोष्ट आहे. आता विद्या कशाला म्हटले जाते, हे तर मनुष्य जाणतही नाहीत. हे तर ‘रुहानी विद्या भवन’ असायला हवे. ‘विद्या’, ज्ञानाला म्हटले जाते. परमपिता परमात्माच ज्ञान सागर आहेत. श्रीकृष्णाला ज्ञानाचा सागर म्हणणार नाही. शिवबाबांची महिमा वेगळी, श्रीकृष्णाची महिमा वेगळी आहे. भारतवासी गोंधळून गेले आहेत. गीतेचा भगवान श्रीकृष्णाला समजले आहेत त्यामुळे विद्या भवन वगैरे उघडत राहतात. समजत काहीच नाही. विद्या आहे गीतेचे ज्ञान. ते ज्ञान तर आहेच एका बाबांमध्ये. ज्यांना ज्ञानाचा सागर म्हटले जाते, ज्यांना मनुष्य जाणत नाहीत. भारतवासीयांचे धर्मशास्त्र खरे तर एकच आहे - ‘सर्व शास्त्रमई शिरोमणी भगवद्गीता’. आता भगवान कोणाला म्हणता येईल? ते देखील या वेळी भारतवासी समजत नाहीत; एक तर श्रीकृष्णाला म्हणतात किंवा रामाला किंवा स्वतःलाच परमात्मा म्हणतात. आता तर वेळसुद्धा तमोप्रधान आहे, रावण राज्य आहे ना.

तुम्ही मुले जेव्हा कोणाला समजावून सांगता तेव्हा म्हणा - शिव भगवानुवाच. पहिले हे तर समजू दे की ज्ञान सागर एकच परमपिता परमात्मा आहेत, ज्यांचे नाव ‘शिव’ आहे. शिवरात्री देखील साजरी करतात, परंतु कोणाच्याही लक्षात येत नाही. जरूर शिवबाबा आलेले आहेत म्हणून तर शिवरात्री साजरी करतात. शिव कोण आहेत हे देखील जाणत नाहीत. बाबा म्हणतात - ‘भगवान तर सर्वांचा एकच आहे. सर्व आत्मे भाऊ-भाऊ आहेत. आत्म्यांचा पिता एकच परमपिता परमात्मा आहेत, त्यांनाच ज्ञान सागर म्हणतात’. देवतांना हे ज्ञानच नसते. कोणते ज्ञान? रचयिता आणि रचनेच्या आदि-मध्य-अंत चे ज्ञान कोणा मनुष्यामध्ये नाहीये. म्हणतात देखील प्राचीन ऋषी-मुनी जाणत नव्हते. ‘प्राचीन’, याचा सुद्धा अर्थ जाणत नाहीत. सतयुग-त्रेतायुग प्राचीन झाले. सतयुग आहे नवीन दुनिया. तिथे तर ऋषी-मुनी नव्हतेच. हे ऋषी-मुनी इत्यादी सर्व नंतर आले आहेत. ते देखील या ज्ञानाला जाणत नाहीत. नेती-नेती (आम्हाला माहीत नाही) म्हणतात. तेच जाणत नाहीत तर भारतवासी जे आत्ता तमोगुणी झाले आहेत, ते कसे जाणू शकतील?

या वेळी विज्ञानाची घमेंड किती आहे. समजतात की या सायन्स द्वारा भारत स्वर्ग बनला आहे. याला मायेचा भपका म्हटले जाते. ‘फॉल ऑफ पाँप’ असे एक नाटक सुद्धा आहे. म्हणतात देखील की या वेळी भारताचे पतन आहे. सतयुगामध्ये उत्थान आहे, आत्ता पतन आहे. हा काही स्वर्ग थोडाच आहे. हा तर मायेचा भपका आहे, हे संपुष्टात येणारच आहे. मनुष्य समजतात - विमाने आहेत, मोठ-मोठे राजवाडे, विद्युत सुविधा आहेत - हाच स्वर्ग आहे. कोणाचा मृत्यू झाला तरी देखील म्हणतात - स्वर्गवासी झाला. यावरून देखील हे समजत नाहीत की स्वर्गात गेला म्हणजे नक्की स्वर्ग कोणता तरी वेगळा आहे ना. हा तर रावणाचा भपका आहे, बेहदचे बाबा स्वर्गाची स्थापना करत आहेत. या वेळी माया आणि ईश्वरामध्ये चटाभेटी (संघर्ष) आसुरी दुनिया आणि ईश्वरीय दुनियेमध्ये आहे. भारतवासीयांना हे सुद्धा समजावून सांगावे लागेल. दुःखे तर अजून खूप येणार आहेत. अथाह दुःखे येणार आहेत. स्वर्ग तर असतोच सतयुगामध्ये. कलियुगामध्ये असू शकत नाही. हे देखील कोणाला माहीत नाही की पुरुषोत्तम संगमयुग कशाला म्हटले जाते. बाबा हे देखील समजावून सांगतात - ‘ज्ञान आहे दिवस, भक्ती आहे रात्र’. अंधारामध्ये धक्के खात राहतात. भगवंताला भेटण्यासाठी किती वेद-शास्त्र इत्यादी वाचतात. ब्रह्माचा दिवस आणि रात्र अर्थात ब्राह्मणांचा दिवस आणि रात्र. खरे मुखवंशावळी ब्राह्मण तुम्ही आहात. ते तर आहेत कलियुगी कुखवंशावळी ब्राह्मण. तुम्ही आहात पुरुषोत्तम संगमयुगी ब्राह्मण. या गोष्टी इतर कोणीही जाणत नाहीत. या गोष्टी जेव्हा समजतील तेव्हा बुद्धीत येईल की आपण हे काय करत आहोत. भारत सतोप्रधान होता, ज्याला स्वर्ग म्हटले जाते. तर जरूर हा नरक आहे, तेव्हाच तर नरकातून स्वर्गात जातात. तिथे शांती सुद्धा आहे, सुख सुद्धा आहे. लक्ष्मी-नारायणाचे राज्य आहे ना. तुम्ही समजावून सांगू शकता - मनुष्यांची वृद्धी कशी कमी होऊ शकते? अशांती कशी कमी होऊ शकते? अशांती आहेच जुन्या कलियुगी दुनियेमध्ये. नवीन दुनियेमध्येच शांती असते. शांती स्वर्गामध्ये आहे ना. त्यालाच आदि सनातन देवी-देवता धर्म म्हटले जाते. हिंदू धर्म तर आत्ताचा आहे, त्याला आदि सनातन धर्म म्हणू शकत नाही. हे तर हिंदुस्तानच्या नावावरून हिंदू म्हणतात. आदि सनातन देवी-देवता धर्म होता. तिथे संपूर्ण पवित्रता, सुख, शांती, आरोग्य, संपत्ती इत्यादी सर्व होते. आता बोलावतात आम्ही पतित आहोत, हे पतित-पावन या. आता प्रश्न आहे पतित-पावन कोण आहे? श्रीकृष्णाला तर म्हणणार नाही. पतित-पावन तर परमपिता परमात्माच ज्ञानाचा सागर आहेत. तेच येऊन शिकवतात. ज्ञानाला अभ्यास म्हटले जाते. सर्वांचा आधार गीता आहे. आता तुम्ही प्रदर्शनी, म्युझियम वगैरे बनवता परंतु अजूनपर्यंत बी. के. चा अर्थही समजत नाहीत. असे समजतात हा कोणता नवीन धर्म आहे. ऐकतात, समजत काहीच नाहीत. बाबांनी सांगितले आहे एकदम तमोप्रधान पत्थर-बुद्धी आहेत. या वेळी विज्ञान घमेंडी सुद्धा खूप बनले आहेत, सायन्समुळेच आपला विनाश करून घेतात तर पत्थर-बुद्धी म्हणणार ना. पारस बुद्धी थोडेच म्हणणार. बॉम्ब्स इत्यादी बनवतात आपल्याच विनाशासाठी. असे नाही की शंकर विनाश करतो. नाही, यांनीच आपल्या विनाशासाठी सर्व बनवले आहे. परंतु तमोप्रधान पत्थर-बुद्धी समजतच नाहीत. जे काही बनवतात या जुन्या दुनियेच्या विनाशासाठी. विनाश होईल तेव्हा मग नवीन दुनियेचा जयजयकार होईल. ते तर समजतात महिलांचे दुःख दूर कसे करावे? परंतु मनुष्य थोडेच कोणाचे दुःख दूर करू शकतात. दुःखहर्ता, सुखकर्ता तर एक बाबाच आहेत. देवतांना सुद्धा म्हणणार नाही. श्रीकृष्ण देखील देवता आहे त्याला भगवान म्हणू शकत नाही, हे सुद्धा समजत नाहीत. जे हे समजतात ते ब्राह्मण बनून इतरांना देखील समजावून सांगत राहतात. जे राज्यपदावरचे किंवा आदि सनातन देवता धर्माचे आहेत ते निघून येतात. लक्ष्मी-नारायण स्वर्गाचे मालक कसे बनले, असे कोणते कर्म केले ज्यामुळे विश्वाचे मालक बनले? यावेळी कलियुगाच्या अंताला तर अनेक धर्म आहेत तर अशांती आहे. नवीन दुनियेमध्ये असे थोडेच असते. आता हे आहे संगमयुग, जेव्हा बाबा येऊन राजयोग शिकवतात. बाबाच कर्म-अकर्म-विकर्मचे ज्ञान ऐकवतात. आत्मा शरीर घेऊन कर्म करण्यासाठी येते. सतयुगामध्ये जी कर्म करतात ती अकर्म होतात, तिथे विकर्म होत नाहीत. दुःख असतच नाही. कर्म, अकर्म, विकर्माची गती बाबाच येऊन अखेरीला सांगतात. मी यांच्या (ब्रह्मा बाबांच्या) अनेक जन्मांतील शेवटच्या जन्माच्याही शेवटी येतो. या रथामध्ये प्रवेश करतो. अकालमूर्त आत्म्याचा हा रथ आहे. फक्त एक अमृतसरला नाही, सर्व मनुष्यांना अकालतख्त आहे. आत्मा अकाल मूर्त आहे. हे शरीर बोलते-चालते. अकाल आत्म्याचे हे चैतन्य तख्त (सिंहासन) आहे. अकालमूर्त तर सर्वच आहेत बाकी शरीराला काळ खाऊन टाकतो. आत्मा तर अकाल आहे. तख्त तर नष्ट करून टाकतात (शरीर दहन करतात). सतयुगामध्ये तख्त तर फार थोडेच असतात. या वेळी करोडो आत्म्यांचे तख्त आहेत. अकाल आत्म्याला म्हटले जाते. आत्माच तमोप्रधाना पासून सतोप्रधान बनते. मी तर सदा सतोप्रधान पवित्र आहे. भले म्हणतात प्राचीन भारताचा योग, परंतु तो देखील श्रीकृष्णाने शिकवला होता असे समजतात. गीतेलाच खंडन केले आहे. जीवन कहाणीमध्ये नाव बदलले आहे. बाबांच्या ऐवजी मुलाचे नाव टाकले आहे. शिवरात्री साजरी करतात परंतु ते कसे येतात हे जाणत नाहीत. शिव आहेतच परम आत्मा. त्यांची महिमा एकदम वेगळी आहे, आत्म्यांची महिमा वेगळी आहे. मुलांना हे माहीत आहे राधा-कृष्णच लक्ष्मी-नारायण आहेत. लक्ष्मी-नारायणाच्या दोन रूपांनाच विष्णू म्हटले जाते. फरक तर काहीच नाहीये. बाकी ४ भुजावाला, ८ भुजावाला कोणी मनुष्य असत नाही. देवी इत्यादींना किती भुजा दाखवल्या आहेत. समजावून सांगण्यासाठी वेळ लागतो.

बाबा म्हणतात - ‘मी आहेच गरीब निवाज. मी येतो देखील तेव्हा जेव्हा भारत गरीब बनतो. राहूचे ग्रहण लागते. बृहस्पतीची दशा होती, आता राहूचे ग्रहण भारतावरच काय साऱ्या दुनियेवर आहे म्हणूनच बाबा मग भारतामध्ये येतात, येऊन नवीन दुनिया स्थापन करतात, ज्याला स्वर्ग म्हटले जाते. भगवानुवाच - मी तुम्हाला राजांचाही राजा, डबल मुकुटधारी स्वर्गाचा मालक बनवतो. ५ हजार वर्षे झाली जेव्हा आदि सनातन देवी-देवता धर्म होता. तो आता नाही आहे. तमोप्रधान झाले आहेत. बाबा स्वतःच आपला अर्थात रचयिता आणि रचनेचा परिचय देतात. तुमच्याकडे प्रदर्शनी, म्युझियममध्ये इतके येतात, सर्व समजतात थोडेच. कोणी विरळेच समजून कोर्स करतात. रचयिता आणि रचनेला जाणतात. रचता आहेत बेहदचे बाबा. त्यांच्याकडून बेहदचा वारसा मिळतो. हे ज्ञान बाबाच देतात. मग राज्यपद मिळाले की तिथे ज्ञानाची आवश्यकता नसते. सद्गती म्हटले जाते - नवी दुनिया स्वर्गाला, दुर्गति म्हटले जाते - जुनी दुनिया नरकाला. बाबा समजावून तर खूप चांगल्या प्रकारे सांगतात. तर मुलांनी देखील असे समजावून सांगायचे आहे. लक्ष्मी-नारायणाचे चित्र दाखवायचे आहे. ही विश्वामध्ये शांती स्थापन होत आहे. आदि सनातन देवी-देवता धर्माचा पाया राहिलेला नाही जो बाबा स्थापन करत आहेत. देवतांचा पवित्र धर्म होता, पवित्र कर्म होते. आता हि आहेच विकारी दुनिया. नव्या दुनियेला म्हटले जाते निर्विकारी दुनिया, शिवालय. आता समजावून सांगावे लागेल तेव्हा तर बिचाऱ्यांचे काही कल्याण होईल. बाबांनाच कल्याणकारी म्हटले जाते. ते येतातच पुरुषोत्तम संगमयुगावर. कल्याणकारी युगामध्ये कल्याणकारी बाबा येऊन सर्वांचे कल्याण करतात. जुन्या दुनियेला बदलून नवीन दुनिया स्थापन करतात. ज्ञानाद्वारेच सद्गती होते. यावर रोज वेळ ठरवून घेऊन समजावून सांगू शकता. तुम्ही बोला - रचता आणि रचनेच्या आदि-मध्य-अंतला आम्हीच जाणतो. हा गीतेचा एपिसोड चालू आहे ज्यामध्ये भगवंताने येऊन राजयोग शिकवला आहे. डबल मुकुटधारी बनवले आहे. हे लक्ष्मी-नारायण देखील राजयोगाद्वारे हे बनले आहेत. या पुरुषोत्तम संगमयुगावर बाबांकडून राजयोग शिकतात. बाबा प्रत्येक गोष्ट किती सहजपणे समजावून सांगतात. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-

१) राजयोगाचा अभ्यास सोर्स ऑफ इन्कम आहे (कमाईचे साधन आहे) कारण याद्वारेच आपण राजांचाही राजा बनतो. हा आत्मिक अभ्यास रोज शिकायचा आहे आणि शिकवायचा आहे.

२) सदैव हा नशा रहावा की आम्ही ब्राह्मण सच्चे मुखवंशावळी आहोत, आम्ही कलियुगी रात्रीतून निघून दिवसामध्ये आलो आहोत, हे आहे कल्याणकारी पुरुषोत्तम युग, यावेळी आपले आणि सर्वांचे कल्याण करायचे आहे.

वरदान:-
प्रत्येक श्रेष्ठ संकल्पाला कर्मामध्ये आणणारे मास्टर सर्वशक्तीमान भव
मास्टर सर्वशक्तीमान अर्थात संकल्प आणि कर्म एकसमान असणे. जर संकल्प खूप श्रेष्ठ असेल आणि कर्म संकल्पाप्रमाणे नसेल तर मास्टर सर्वशक्तीमान म्हणणार नाही. तर चेक करा जे श्रेष्ठ संकल्प करता ते कर्मामध्ये (प्रत्यक्षात) येतात की नाही. मास्टर सर्वशक्तीमानचे लक्षण आहे की जी शक्ती ज्या वेळी आवश्यक आहे ती शक्ती कार्यामध्ये वापरण्यास सक्षम असेल. स्थूल आणि सूक्ष्म सर्व शक्ती इतक्या कंट्रोलमध्ये असाव्यात की, ज्या वेळी ज्या शक्तीची आवश्यकता असेल ती कार्यामध्ये वापरता येईल.

बोधवाक्य:-
ज्ञानी तू आत्मा मुलांमध्ये जर क्रोध असेल तर त्यामुळे बाबांच्या नावाची निंदा होते.