30-08-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
गोड
मुलांनो - ज्ञानाला बुद्धीमध्ये धारण करून आपापसात एकत्र मिळून क्लास चालवा, आपले
आणि इतरांचे कल्याण करून खरी कमाई करत रहा”
प्रश्न:-
तुम्हा मुलांना
कोणता अहंकार कधीही येता कामा नये?
उत्तर:-
खूप मुलांना अहंकार येतो की या छोट्या-छोट्या बालिका आम्हाला काय समजावून सांगणार.
मोठी बहीण निघून गेली तर चिडून क्लासमध्ये येणेच बंद करतील. ही आहेत मायेची विघ्ने.
बाबा म्हणतात - मुलांनो, तुम्ही ऐकविणाऱ्या टीचरच्या नावा-रुपाला न बघता, बाबांच्या
आठवणीमध्ये राहून मुरली ऐका. अहंकारामध्ये येऊ नका.
ओम शांती।
बाबा बसून मुलांना समजावून सांगतात. आता जेव्हा ‘बाबा’ असे म्हटले जाते तर इतक्या
मुलांचे भौतिक पिता तर असू शकत नाहीत. हे आहेत रुहानी पिता. त्यांची असंख्य मुले
आहेत, मुलांसाठीच ही टेप, मुरली इत्यादी सामुग्री आहे. मुले जाणतात आता आपण
संगमयुगावर बसलो आहोत पुरुषोत्तम बनण्यासाठी. ही देखील आनंदाची गोष्ट आहे ना. बाबाच
पुरुषोत्तम बनवितात. हे लक्ष्मी-नारायण पुरुषोत्तम आहेत ना. या सृष्टीमध्येच उत्तम
पुरुष, मध्यम, कनिष्ठ असतात. आदि मध्ये (सुरुवातीला) आहेत - उत्तम, मध्य मध्ये आहेत
- मध्यम, अंता मध्ये आहेत - कनिष्ठ. प्रत्येक वस्तू आधी नवीन उत्तम, मग मध्यम आणि
नंतर कनिष्ठ अर्थात जुनी बनते. दुनियेचे देखील असेच आहे. तर ज्या-ज्या गोष्टींवर
लोकांना शंका येते, त्यावर तुम्हाला समजावून सांगायचे आहे. जास्त करून ब्रह्मा
साठीच म्हणतात की यांना का बसवले आहे? तर मग त्यांना झाडाच्या चित्रासमोर आणले
पाहिजे. बघा खाली देखील तपस्या करत आहेत आणि वर एकदम शेवटी अनेक जन्मांच्या अंतीम
जन्मामध्ये उभे आहेत. बाबा म्हणतात - मी यांच्यामध्ये प्रवेश करतो. या गोष्टी
समजावून सांगणारा खूप हुशार पाहिजे. एक जरी बुद्धू निघाला, तरी सगळ्या बी. के. चे
नाव बदनाम होते. व्यवस्थित समजावून सांगता येत नाही. भले कंप्लिट पास तर शेवटीच
होतात, यावेळी कोणीही १६ कला संपूर्ण बनू शकत नाहीत परंतु समजावून सांगण्यामध्ये
नंबरवार जरूर असतात. परमपिता परमात्म्यावर प्रीत नसेल तर विपरीत बुद्धी झाले ना.
यावर तुम्ही समजावून सांगू शकता जे प्रीत बुद्धी आहेत ते विजयंती आणि जे विपरीत
बुद्धी आहेत ते विनशन्ती होतात. यावरून देखील कितीतरी मनुष्य भडकतात, मग कोणता न
कोणता आरोप लावतात. भांडणे-समस्या निर्माण करण्यास उशीर करत नाहीत. कोणी करू तरी
काय शकतात. कधी चित्रांना आग लावायला देखील वेळ लावणार नाहीत. बाबा सल्ला देखील
देतात - चित्रांना इन्शुअर करा (चित्रांचा विमा उतरवा). मुलांच्या अवस्थेला देखील
बाबा जाणतात, क्रिमिनल आय (विकारी दृष्टी) बद्दल देखील बाबा रोज समजावून सांगत
राहतात. मुले लिहितात - ‘बाबा, तुम्ही क्रिमिनल आय वर जे समजावून सांगितले आहे ते
अगदी बरोबर सांगितले आहे’. ही दुनिया तमोप्रधान आहे ना. दिवसेंदिवस तमोप्रधान बनत
जातात. ते तर समजतात कलियुग अजून गुडघ्यांवर चालत आहे (रांगत आहे), पूर्णपणे अज्ञान
निद्रेमध्ये झोपलेले आहेत. कधी-कधी असे म्हणतात देखील - ही महाभारत लढाईची वेळ आहे
तर जरूर भगवान कोणत्यातरी रूपामध्ये असतील. रूप तर सांगत नाहीत. त्यांना जरूर
कोणामध्ये तरी प्रवेश करावा लागेल. भाग्यशाली रथाचे गायन आहे. रथ तर आत्म्याचा आपला
असेल ना. त्यामध्ये येऊन प्रवेश करतील. त्याला म्हटले जाते भाग्यशाली रथ. बाकी ते
काही जन्म घेत नाहीत. यांच्याच बाजूला (ब्रह्मा बाबांच्या आत्म्याच्या बाजूला) बसून
ज्ञान देतात. किती चांगल्या रीतीने समजावून सांगितले जाते. त्रिमूर्तीचे चित्र
देखील आहे. त्रिमूर्ती तर ब्रह्मा-विष्णू-शंकराला म्हणणार. जरूर हे काहीतरी करून
गेले आहेत. ज्यामुळे रस्त्यांना, घराला देखील त्रिमूर्ती असे नाव ठेवले आहे. जसे या
रोडला ‘सुभाष मार्ग’ असे नाव दिले आहे. सुभाष (सुभाष चंद्र बोस) ची हिस्ट्री तर
सर्वजण जाणतात ना. त्यांच्या माघारी मग हिस्ट्री लिहित बसतात. मग त्यांचा पुतळा
बनवून मोठे करतात. मग कितीही स्तुती बसून लिहितील. जसे गुरुनानकांचे पुस्तक किती
मोठे बनवले आहे. त्यांनी काही इतके लिहिलेले नाही आहे. ज्ञानाच्या ऐवजी भक्तीच्या
गोष्टी बसून लिहिल्या आहेत. ही चित्रे इत्यादी तर बनवली जातात समजावून सांगण्याकरिता.
हे तर जाणतात या डोळ्यांनी जे काही दिसते ते सर्व भस्म होणार आहे. बाकी आत्मा तर इथे
राहू शकत नाही. जरूर घरी निघून जाईल. अशा प्रकारच्या गोष्टी काही सर्वांच्याच
बुद्धीमध्ये थोड्याच बसतील. जर धारणा असेल तर मग क्लास का चालवत नाहीत. ७-८
वर्षांमध्ये असा कोणी तयार होत नाही जो क्लास चालवू शकेल. खूप ठिकाणी असे चालवतात
देखील. तरी देखील समजतात की मातांचे पद मोठे आहे. चित्रे तर खूप आहेत मग मुरली धारण
करून त्यावर थोडे समजावून सांगतात. हे तर कोणीही करू शकतात. खूप सोपे आहे. मग कळत
नाही की, ब्राह्मणीची मागणी का करतात. ब्राह्मणी कुठे गेली तर बस चिडून बसतात.
क्लासमध्ये येत नाहीत, आपसामध्ये कलह होतात. मुरली तर कोणीही बसून ऐकवू शकतात ना.
म्हणतील - फुरसत नाही. हे तर आपले देखील कल्याण करायचे आहे आणि इतरांचे देखील
कल्याण करायचे आहे. खूप मोठी कमाई आहे. खरी कमाई करायची आहे जेणेकरून मनुष्यांचे
जीवन हिऱ्यासारखे बनेल. स्वर्गामध्ये सर्व जातील ना. तिथे कायम सुखी असतात. असे नाही,
प्रजेचे आयुष्य कमी असते. नाही, प्रजेचे देखील आयुष्य मोठे असते. ते आहेच अमरलोक.
बाकी पदे कमी-जास्त असतात. तर कोणत्याही टॉपिकवर क्लास केला पाहिजे. असे का म्हणतात
की चांगली ब्राह्मणी पाहिजे. आपसामध्ये क्लास चालवू शकतात. ओरडायची गरज नाही.
काहीजणांना अहंकार येतो - या छोट्या-छोट्या बालिका आम्हाला काय समजावून सांगतील?
मायेची विघ्न देखील खूप येतात. बुद्धीमध्ये बसतच नाही.
बाबा तर रोज समजावून
सांगत राहतात, शिवबाबा तर टॉपिकवर समजावून सांगणार नाहीत ना. ते तर सागर आहेत. उड्या
मारत राहतील. कधी मुलांना समजावून सांगतात, कधी बाहेरच्यांसाठी समजावून सांगतात.
मुरली तर सर्वांना मिळते. अक्षर ओळख नसेल तर शिकले पाहिजे ना - आपल्या उन्नतीसाठी
पुरुषार्थ केला पाहिजे. आपले देखील आणि दुसऱ्यांचे देखील कल्याण करायचे आहे. हे बाबा
(ब्रह्मा बाबा) देखील ऐकवू शकतात ना, परंतु मुलांचा बुद्धियोग शिवबाबांकडेच रहावा
म्हणून असे म्हणतात की, नेहमी असे समजा शिवबाबा ऐकवत आहेत. शिवबाबांचीच आठवण करा.
शिवबाबा परमधामवरून आले आहेत, मुरली ऐकवत आहेत. हे ब्रह्मा काही परमधाम वरून येऊन
ऐकवत नाही आहेत. असे समजा शिवबाबा या तनामध्ये येऊन आपल्याला मुरली ऐकवत आहेत. याची
बुद्धीमध्ये आठवण राहिली पाहिजे. यथार्थ रीतीने हे बुद्धीमध्ये राहिले तरी देखील
आठवणीची यात्रा होईल ना. परंतु इथे बसलेले असताना देखील खूपजणांचा बुद्धियोग
इकडे-तिकडे जातो. इथे तुम्ही यात्रेवर चांगल्या रीतीने राहू शकता. नाहीतर गावाची
आठवण येईल. घरादाराची आठवण येईल. बुद्धीमध्ये याची आठवण असते - शिवबाबा आम्हाला
यांच्यामध्ये बसून शिकवत आहेत. आम्ही शिवबाबांच्या आठवणीमध्ये मुरली ऐकत होतो मग
बुद्धियोग कुठे पळाला. असा खूप जणांचा बुद्धियोग विचलित होतो. इथे तुम्ही चांगल्या
रीतीने यात्रेवर राहू शकता. तुम्ही समजता - शिवबाबा परमधाम वरून आले आहेत. बाहेर
गावामध्ये वगैरे राहिल्याने मनात हा विचार रहात नाही. कोणी-कोणी असे समजतात
शिवबाबांची मुरली या कानांनी ऐकत आहोत त्यामुळे मग ऐकविणाऱ्याचे नाव-रूप देखील आठवत
नाही. हे सर्व ज्ञान आतले आहे. मनामध्ये विचार असावा शिवबाबांची मुरली आपण ऐकत आहोत.
या देखील आठवणीमध्ये राहण्याच्या युक्त्या आहेत. असे नाही, की, जितका वेळ आपण मुरली
ऐकतो, तितका वेळ आठवणीमध्ये आहोत. नाही, बाबा म्हणतात - खूप जणांची बुद्धी कुठे-कुठे
बाहेर जाते. शेतीवाडी इत्यादीची आठवण येत राहील. बुद्धियोग कुठेही बाहेर भटकता कामा
नये. शिवबाबांची आठवण करण्यामध्ये कोणता त्रास थोडाच आहे. परंतु माया आठवण करू देत
नाही. पूर्णवेळ शिवबाबांची आठवण राहू शकत नाही, आणखी दुसरे-दुसरे विचार येतात.
नंबरवार पुरुषार्था नुसार आहेत ना. जे खूप जवळचे असतील त्यांच्या बुद्धीमध्ये
चांगल्या रीतीने बसेल. सर्व थोडेच आठच्या माळेमध्ये येऊ शकणार. ज्ञान, योग, दैवी
गुण हे सर्व आपल्यामध्ये बघायचे आहे. माझ्यामध्ये कोणता अवगुण तर नाही आहे? मायेच्या
वश कोणते विकर्म तर होत नाही ना? कोणी-कोणी तर खूप लोभी बनतात. लोभाचे देखील भूत
असते. तर मायेची प्रवेशता अशी होते ज्यामुळे भूक-भूक करत राहतात - ‘खाऊ-खाऊ पेट में
बलाऊ…’ कोणाची खाण्यामध्ये खूप आसक्ती असते. खाणे देखील नियमा नुसार असले पाहिजे.
असंख्य मुले आहेत. आता अजून पुष्कळ मुले बनणार आहेत. किती ब्राह्मण-ब्राह्मणी बनतील.
मुलांना देखील सांगतो - तुम्ही ब्राह्मण बनून बसा. मातांना पुढे ठेवले जाते.
शिवशक्ती भारत मातांची जय.
बाबा म्हणतात -
स्वतःला आत्मा समजा आणि बाबांची आठवण करा. स्वदर्शन चक्र फिरवत रहा. स्वदर्शन
चक्रधारी तुम्ही ब्राह्मण आहात. या गोष्टी नवीन कोणी आला तर समजू शकणार नाही. तुम्ही
आहात सर्वोत्तम ब्रह्मा मुखवंशावली ब्राह्मण कुलभूषण, स्वदर्शन चक्रधारी. नवीन कोणी
ऐकेल तर म्हणेल स्वदर्शनचक्र तर विष्णूला आहे. हे मग या सर्वांना सांगत राहतात,
मानणार नाहीत म्हणून एकदम नवीन लोकांना सभेमध्ये परवानगी देत नाहीत. समजू शकणार
नाहीत. कोणी-कोणी मग चिडतात - आम्ही काय मूर्ख आहोत ज्यामुळे येऊ देत नाहीत; कारण
इतर सत्संगांमध्ये तर असे कोणीही जात असतात. तिथे तर शास्त्रांच्याच गोष्टी ऐकवत
राहतात. ते ऐकणे हा प्रत्येकाचा हक्क आहे. इथे तर सांभाळावे लागते. हे ईश्वरीय
ज्ञान बुद्धीमध्ये बसत नाही तर चिडतात. चित्रांना देखील सांभाळावे लागते. या आसुरी
दुनियेमध्ये आपली दैवी राजधानी स्थापन करायची आहे. जसे क्राईस्ट आला आपला धर्म
स्थापन करण्यासाठी. हे बाबा दैवी राजधानी स्थापन करतात. यामध्ये हिंसेची कोणती
गोष्ट नाहीये. तुम्ही ना कामकटारीची ना स्थूल हिंसा करू शकता. गातात देखील - ‘मूत
पलीती कपड़ धोए’. मनुष्य तर एकदमच घोर अंधारामध्ये आहेत. बाबा येऊन घोर अंधारातून
लख्ख प्रकाश करतात. तरी देखील कोणी-कोणी ‘बाबा’ म्हणतात आणि मग तोंड फिरवितात.
शिक्षण सोडून देतात. बाबा विश्वाचा मालक बनविण्यासाठी शिकवतात, अशा शिक्षणाला सोडून
देतात तर त्यांना म्हटले जाते - महामूर्ख. किती जबरदस्त खजिना मिळतो. अशा बाबांना
थोडेच कधी सोडले पाहिजे. एक गाणे देखील आहे - ‘आप प्यार करो या ठुकराओ, हम आपका दर
कभी नही छोड़ेंगे. बाबा आलेलेच आहेत - बेहदची बादशाही देण्यासाठी. सोडण्याची तर
गोष्टच नाही. हो, चांगले गुण धारण करायचे आहेत. बायका देखील रिपोर्ट लिहितात - हे (पती)
आम्हाला खूप त्रास देतात. आजकाल लोक खूप-खूप खराब आहेत. खूप सांभाळले पाहिजे.
भावांनी बहिणींची काळजी घ्यायची आहे. आम्हा आत्म्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये
बाबांकडून वारसा जरूर घ्यायचा आहे. बाबांना सोडल्यामुळे वारसा खलास होतो.
निश्चयबुद्धी विजयन्ती, संशयबुद्धी विनशन्ती. मग पद खूप कमी होते. ज्ञान एक
ज्ञान-सागर बाबाच देऊ शकतात. बाकी सर्व आहे भक्ती. भले कोणी कितीही स्वतःला ज्ञानी
समजू दे परंतु बाबा म्हणतात सर्वांकडे शास्त्रांचे आणि भक्तीचे ज्ञान आहे. खरे
ज्ञान कशाला म्हटले जाते, हे देखील मनुष्य जाणत नाहीत. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) लक्ष
ठेवायचे आहे की मुरली ऐकते वेळी बुद्धियोग बाहेर भटकत तर नाही ना? सदैव ही स्मृती
रहावी की आपण शिवबाबांची महावाक्ये ऐकत आहोत. ही देखील आठवणीची यात्रा आहे.
२) आपणच आपल्याला
बघायचे आहे की, आपल्यामध्ये ज्ञान-योग आणि दैवी गुण आहेत का? लोभाचे भूत तर नाही आहे
ना? मायेच्या वश होऊन कोणते विकर्म तर होत नाही?
वरदान:-
निमित्त
भावच्या स्मृतीद्वारे हलचलला (अशांतीला) समाप्त करणारे सदा अचल-अडोल भव
निमित्त भावाने अनेक
प्रकारचा ‘मी’पणा, ‘माझे’ पणा सहजच नष्ट होतो. ही स्मृती सर्व प्रकारच्या हलचल
पासून (अशांती मधून) सोडवून अचल-अडोल स्थितीचा अनुभव करविते. सेवेमध्ये देखील मेहनत
करावी लागत नाही. कारण निमित्त बनणाऱ्यांच्या बुद्धीमध्ये सदैव याची आठवण राहते की,
‘आपण जे करणार ते बघून इतर करतील’. सेवेच्या निमित्त बनणे अर्थात स्टेजवर येणे.
स्टेजकडे आपोआपच सर्वांची नजर जाते. तर ही स्मृती देखील सेफ्टीचे साधन बनते.
बोधवाक्य:-
सर्व
गोष्टींमध्ये न्यारे बना तर परमात्म पित्याच्या सहाऱ्याचा अनुभव होईल
अव्यक्त इशारे:-
सहजयोगी बनायचे असेल तर परमात्म प्रेमाचे अनुभवी बना. वर्तमान समयी भटकत असलेल्या
आत्म्यांना एक तर शांती पाहिजे, दुसरे रूहानी स्नेह पाहिजे. प्रेम आणि शांतीचाच
सर्व ठिकाणी अभाव आहे त्यामुळे जो काही प्रोग्राम कराल त्यामध्ये पहिले तर बाबांच्या
नात्यातील प्रेमाची महिमा करा आणि मग त्याच प्रेमाने आत्म्यांचे नाते जोडल्यानंतर
शांतीचा अनुभव करवा. प्रेम स्वरूप आणि शांत स्वरूप दोन्हीचा बॅलन्स असावा.