30-09-2024
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - आपली बॅटरी चार्ज करण्याचा विचार करा, आपला टाईम परचिंतनामध्ये वाया घालू
नका, अपनी घोट तो नशा चढ़े”
प्रश्न:-
ज्ञान एका
सेकंदाचे असताना देखील बाबांना इतके डिटेलमध्ये समजावून सांगण्याची किंवा इतका वेळ
देण्याची आवश्यकता का आहे?
उत्तर:-
कारण ज्ञान दिल्यानंतर मुलांमध्ये सुधारणा झाली आहे कि नाही, हे देखील बाबा बघतात
आणि सुधारण्यासाठी ज्ञान देतच राहतात. बीज आणि झाडाचे संपूर्ण ज्ञान देतात, ज्यामुळे
त्यांना ज्ञानाचा सागर म्हटले जाते. जर एका सेकंदाचा मंत्र देऊन निघून गेले तर
‘ज्ञानाचा सागर’ हे टायटल देखील मिळणार नाही.
ओम शांती।
रूहानी बाबा बसून रूहानी मुलांना समजावून सांगत आहेत. भक्तिमार्गामध्ये परमपिता
परमात्मा शिवना इथेच पुजतात. भले बुद्धीमध्ये आहे की हे होऊन गेले आहेत. जिथे लिंग
पाहतात तर त्यांची पूजा करतात. हे तर समजतात की शिव परमधाममध्ये राहणारा आहे, होऊन
गेले आहेत, म्हणून त्यांचे यादगार (स्मृती रूप) बनवून पुजतात. ज्यावेळी आठवण केली
जाते तर बुद्धीमध्ये जरूर येते की, निराकार आहे, जो परमधाममध्ये राहणारा आहे,
त्यांना शिव म्हणून पुजतात. मंदिरामध्ये जाऊन माथा टेकवतात, त्यांच्यावर दूध, फळे,
जल इत्यादी वाहतात. परंतु ते तर जड आहे. जडचीच भक्ती करतात. आता तुम्ही जाणता - ते
आहेत चैतन्य, त्यांचे निवासस्थान परमधाम आहे. ते लोक जेव्हा पूजा करतात तर
बुद्धीमध्ये असते की परमधाम निवासी आहेत, होऊन गेले आहेत तेव्हाच तर ही चित्रे बनवली
गेली आहेत, ज्याची पूजा केली जाते. ही चित्रे काही शिवबाबांची नाहीत, त्यांची
प्रतिमा आहे. तसेच देवतांना देखील पूजतात, जड चित्र आहेत, चैतन्य नाहीत. परंतु ते
चैतन्य जे होते ते कुठे गेले, हे समजत नाहीत. जरूर पुनर्जन्म घेऊन खाली आले असतील.
आता तुम्हा मुलांना ज्ञान मिळत आहे. समजता जे काही पूज्य देवता होते ते पुनर्जन्म
घेत आले आहेत. आत्मा तिच आहे, आत्म्याचे नाव बदलत नाही. बाकी शरीराचे नाव बदलते. ती
आत्मा कोणत्या ना कोणत्या शरीरामध्ये आहे. पुनर्जन्म तर घ्यायचाच आहे. तुम्ही पुजता
त्यांना, जे सर्वात पहिले शरीरधारी होते (सतयुगी लक्ष्मी-नारायणाला पुजता) यावेळी
तुमचा विचार चालतो, जे नॉलेज बाबा देत आहेत. तुम्ही समजता ज्या चित्राची पूजा करतात
तो पहिल्या नंबरचा आहे. हे लक्ष्मी-नारायण चैतन्य होते. इथेच भारतामध्ये होते, आता
नाही आहेत. मनुष्य हे समजत नाहीत की ते पुनर्जन्म घेत वेगवेगळे नाव-रूप घेत ८४
जन्मांचा पार्ट बजावत राहतात. हे कोणाच्या लक्षातही येत नाही. सतयुगात होते तर खरे
परंतु आता नाही आहेत. हे देखील कोणाला समजत नाही. आता तुम्ही जाणता - ड्रामाच्या
प्लॅन अनुसार मग चैतन्यमध्ये जरूर येतील. मनुष्यांच्या डोक्यात हा विचारही येत नाही.
बाकी इतके जरूर समजतात की हे होते. आता यांची जड चित्रे आहेत, परंतु ते चैतन्य कुठे
निघून गेले - हे कोणाच्या बुद्धीमध्ये येत नाही. मनुष्य तर ८४ लाख पुनर्जन्म आहेत
असे म्हणतात, हे देखील तुम्हा मुलांना माहित झाले आहे की ८४ जन्मच घेतात, ना की ८४
लाख. आता रामचंद्राची पूजा करतात. त्यांना हे देखील माहित नाही आहे की राम कुठे गेला.
तुम्ही जाणता की श्रीरामाची आत्मा जरूर पुनर्जन्म घेत असेल. इथे परीक्षेमध्ये नापास
होते. परंतु कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये असेल तर जरूर ना. इथेच पुरुषार्थ करत
राहतात. रामाचे इतके नाव प्रसिद्ध आहे, तर जरूर येतील, त्यांना ज्ञान घ्यावे लागेल.
आता काहीच कळून येत नाही तर त्या गोष्टीला सोडून द्यावे लागते. या गोष्टींमध्ये
गेल्याने देखील वेळ वाया जातो, यापेक्षा तर का नाही आपला वेळ सफल करावा. स्वतःच्या
उन्नतीसाठी बॅटरी चार्ज करावी. दुसऱ्या गोष्टींचे चिंतन तर परचिंतन झाले. आता तर
स्वतःचे चिंतन करायचे आहे. आपण आपली बाबांची आठवण करावी. ते देखील जरूर शिकत असतील.
स्वतःची बॅटरी चार्ज करत असतील. म्हटले जाते - ‘अपनी घोट तो नशा चढ़े’.
बाबांनी सांगितले आहे
- जेव्हा तुम्ही सतोप्रधान होता तेव्हा तुमचे खूप उच्च पद होते. आता पुन्हा
पुरुषार्थ करा, माझी आठवण करा तर विकर्म विनाश होतील. ध्येय आहे ना. असे चिंतन
करता-करता सतोप्रधान बनाल. नारायणाचेच स्मरण केल्याने आपण नारायण बनणार. ‘अन्तकाल
में जो नारायण सिमरे…’. तुम्हाला बाबांची आठवण करायची आहे, ज्यामुळे पापे नष्ट
होतील. मग नारायण बनाल. ही नारायण बनण्याची उत्कृष्ट युक्ती आहे. एकच काही नारायण
बनणार नाही ना. ही तर सारी डायनेस्टी (घराणे) बनत आहे. बाबा सर्वश्रेष्ठ पुरुषार्थ
करवून घेतील. हे आहेच राजयोगाचे नॉलेज, ते देखील साऱ्या विश्वाचा मालक बनायचे आहे.
जितका पुरुषार्थ कराल, तितका नक्कीच फायदा आहे. एक तर आपल्याला आत्मा जरूर निश्चय
करा. काहीजण लिहितात देखील असे, अमकी आत्मा तुमची आठवण काढत होती. आत्मा शरीराद्वारे
लिहिते. आत्म्याचे कनेक्शन आहे शिवबाबांसोबत. मी आत्मा अमक्या शरीराच्या
नावा-रुपावाली आहे. हे तर जरूर सांगावे लागेल ना कारण आत्म्याच्या शरीरालाच वेगवेगळी
नावे दिली जातात. मी आत्मा तुमचा मुलगा आहे, मज आत्म्याच्या शरीराचे नाव अमके आहे.
आत्म्याचे नाव तर कधी बदलत नाही. मी आत्मा अमक्या शरीरावाली आहे. शरीराचे नाव तर
जरूर पाहिजे. नाहीतर कारभार चालू शकणार नाही. इथे बाबा म्हणतात मी देखील या
ब्रह्माच्या तनामध्ये टेम्पररी येतो, यांच्या (ब्रह्मा बाबांच्या) आत्म्याला देखील
समजावून सांगतात. मी या शरीराद्वारे तुम्हाला शिकविण्यासाठी आलो आहे. हे माझे शरीर
नाहीये. मी यामध्ये प्रवेश केला आहे. मग निघून जाणार आपल्या धामला. मी आलोच आहे
तुम्हा मुलांना हा मंत्र देण्यासाठी. असे नाही की मंत्र देऊन निघून जातो. नाही,
मुलांकडे पहावे देखील लागते की कितपत सुधारणा झाली आहे. मग सुधारण्यासाठी शिकवण देत
राहतात. सेकंदाचे ज्ञान देऊन निघून गेले तर मग ज्ञानाचा सागर देखील म्हटले जाणार
नाही. किती अवधी झाला आहे, तुम्हाला समजावून सांगत राहतात. झाडाच्या, भक्ती
मार्गाच्या सर्व गोष्टी डिटेलमध्ये (विस्ताराने) समजून घ्यायच्या आहेत. डिटेलमध्ये
समजावून सांगतात. होलसेल अर्थात मनमनाभव. परंतु असे म्हणून निघून तर जाणार नाहीत.
पालना (संगोपन) देखील करावी लागते. बरीच मुले बाबांची आठवण करता-करता मग दिसेनासे
होतात. अमकी आत्मा जिचे नाव अमके होते, खूप चांगला शिकत होता - आठवण तर येणार ना.
जुनी-जुनी मुले किती चांगली होती, त्यांना मायेने गिळंकृत केले. सुरुवातीला किती आले.
फटक्यात येऊन बाबांची शरण घेतली. भट्टी बनली. यामध्ये सर्वांनी आपले भाग्य अजमावले
आणि भाग्य अजमावता अजमावता मायेने एकदम उडवून टाकले. थांबू शकले नाहीत. परत ५०००
वर्षानंतर देखील असेच होणार. किती निघून गेले, अर्धे झाड तर नक्की गेले. भले झाडाची
वृद्धी झाली आहे परंतु जुने निघून गेले, समजू शकता - त्यातून काहीजण परत शिकण्यासाठी
येतील नक्की. आठवेल की आम्ही बाबांकडे शिकत होतो बाकीचे सर्व अजून पर्यंत शिकत आहेत,
आपण हार खाल्ली. पुन्हा मैदानात येतील. बाबा येऊ देतील, तरीपण भले येऊन पुरुषार्थ
करू देत. काही ना काही चांगले पद मिळेल.
बाबा आठवण करून देतात
- गोड-गोड मुलांनो, मामेकम् (मज एकाची) आठवण कराल तर पापे नष्ट होतील. आता कशी आठवण
करता, काय असे समजता की बाबा परमधाममध्ये आहेत? नाही. बाबा तर इथे रथामध्ये बसले
आहेत. या रथाची सर्वांना माहिती होते. हा आहे भाग्यशाली रथ. यांच्यामध्ये (ब्रह्मा
बाबांमध्ये) आलेले आहेत. ते (ब्रह्मा बाबा) भक्तिमार्गामध्ये होते तर त्यांना
परमधाममध्ये आठवण करत होते परंतु हे जाणत नव्हते की आठवणीने काय होईल. आता तुम्हा
मुलांना बाबा स्वतः या रथामध्ये बसून श्रीमत देतात, म्हणून तुम्ही मुले समजता बाबा
इथे या मृत्यूलोकमध्ये पुरुषोत्तम संगम युगामध्ये आहेत. तुम्ही जाणता आपल्याला
ब्रह्माची आठवण करायची नाहीये. बाबा म्हणतात - ‘मामेकम् (मज एकाची) आठवण करा, मी या
रथामध्ये राहून तुम्हाला हे नॉलेज देत आहे. स्वतःची देखील ओळख देतो, मी इथे आहे’.
आधी तर तुम्ही समजत होता परमधाममध्ये राहणारा आहे. होऊन गेले आहेत परंतु केव्हा, हे
माहित नव्हते. होऊन तर सर्वजण गेले आहेत ना. ज्यांची देखील चित्रे आहेत, ते आता कुठे
आहेत, याची कोणालाच माहिती नाही. जे जातात ते मग परत आपल्या वेळेनुसार येतात.
भिन्न-भिन्न पार्ट बजावत राहतात. स्वर्गामध्ये तर कोणी जात नाहीत. बाबांनी समजावून
सांगितले आहे स्वर्गामध्ये जाण्यासाठी तर पुरुषार्थ करावा लागतो आणि जुन्या दुनियेचा
अंत, नवीन दुनियेची सुरुवात पाहिजे, ज्याला पुरुषोत्तम संगमयुग म्हटले जाते. हे
ज्ञान आता तुम्हाला आहे. मनुष्य काहीच जाणत नाहीत. समजतात देखील शरीर जळून जाते,
बाकी आत्मा निघून जाते. आता कलियुग आहे तर जरूर जन्म कलियुगामध्येच घेतील.
सतयुगामध्ये होते तर जन्म देखील सतयुगामध्येच घेत होते. हे देखील जाणता आत्म्यांचा
सर्व स्टॉक निराकारी दुनियेमध्ये असतो. हे तर बुद्धीमध्ये पक्के आहे ना. मग तिथून
येतात, इथे शरीर धारण करून जीव आत्मा बनतात. सर्वांना इथे येऊन जीव आत्मा बनायचे आहे.
आणि मग नंबरवार परत जायचे आहे. सर्वांना तर घेऊन जाणार नाहीत, नाहीतर प्रलय होईल.
असे दाखवतात प्रलय झाला, रिझल्ट (परिणाम) काहीच दाखवत नाहीत. तुम्ही तर जाणता ही
दुनिया आता रिकामी होऊ शकत नाही. गायन आहे - ‘राम गयो रावण गयो, जिनका बहुत परिवार
है’. साऱ्या दुनियेमध्ये रावण संप्रदाय आहे ना. राम संप्रदाय तर खूप थोडा आहे.
रामाचा संप्रदाय आहेच सतयुग-त्रेतामध्ये. खूप फरक असतो. नंतर मग आणखी शाखा-उपशाखा
निघतात. आता तुम्ही बीज आणि झाडाला देखील जाणले आहे. बाबा सर्वकाही जाणतात, तेव्हाच
तर ऐकवत राहतात म्हणून त्यांना ज्ञानसागर म्हटले जाते, एकच गोष्ट असली असती तर मग
कोणती शास्त्रे इत्यादी देखील बनली नसती. झाडाचे डिटेल देखील समजावून सांगत राहतात.
मूळ गोष्ट नंबरवन सब्जेक्ट आहे बाबांची आठवण करणे. यातच मेहनत आहे. यावरच सर्व
अवलंबून आहे. बाकी झाडाला तर तुम्ही जाणले आहे. दुनियेमध्ये या गोष्टींना कोणीही
जाणत नाहीत. तुम्ही सर्व धर्मवाल्यांची तिथी-तारीख इत्यादी सर्व सांगता. अर्ध्या
कल्पामध्ये हे सर्वजण येतात. बाकी आहेत सूर्यवंशी आणि चंद्रवंशी. यांच्यासाठी जास्त
युगे तर असणार नाहीत ना. आहेतच दोन युगे. तिथे मनुष्य देखील थोडे आहेत. ८४ लाख जन्म
तर असू देखील शकत नाहीत. मनुष्य समजण्याच्या पलीकडे जातात म्हणून मग बाबा येऊन समज
देतात. बाबा जे रचयिता आहेत, तेच रचता आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताचे नॉलेज बसून
देतात. भारतवासी तर बिलकुल काहीच जाणत नाहीत. सर्वांची पूजा करत राहतात, मुसलमानांना,
पारसी इत्यादींना, जे येतील त्यांची पूजा करू लागतात कारण आपल्या धर्माला आणि
धर्म-स्थापकाला विसरले आहेत. बाकीचे तर सर्व आपल्या-आपल्या धर्मांना जाणतात,
सर्वांना माहित आहे की, अमका धर्म केव्हा, आणि कोणी स्थापन केला. बाकी
सतयुग-त्रेताच्या इतिहास-भूगोला विषयी मात्र कोणालाच माहिती नाही, चित्र देखील
बघतात शिवबाबांचे हे रूप आहे. तेच उच्च ते उच्च बाबा आहेत. तर आठवण देखील त्यांचीच
करायची आहे. इथे मग सर्वात जास्त पूजा करतात श्रीकृष्णाची कारण पुढच्या नंबरवर आहेत
ना. प्रेम देखील त्यांच्यावरच करतात, आणि गीतेचे भगवान देखील त्यांनाच समजले आहेत.
ऐकविणारा पाहिजे तेव्हाच तर त्यांच्याकडून वारसा मिळेल. बाबाच ऐकवतात, नवीन दुनियेची
स्थापना आणि जुन्या दुनियेचा विनाश करविणारे एका बाबांशिवाय आणखी कोणी असू शकत नाही.
ब्रह्मा द्वारे स्थापना, शंकरा द्वारे विनाश, विष्णू द्वारे पालना - हे देखील
लिहितात. इथल्या साठीच आहे. परंतु काहीच समजत नाही.
तुम्ही जाणता ती आहे
निराकारी सृष्टी. ही आहे साकारी सृष्टी. सृष्टी तर हीच आहे, इथेच रामराज्य आणि रावण
राज्य असते. महिमा सर्व इथली आहे. बाकी सूक्ष्म वतनचा फक्त साक्षात्कार होतो.
मूलवतनमध्ये तर आत्मे राहतात मग इथे येऊन पार्ट बजावतात. बाकी सूक्ष्म वतनमध्ये काय
आहे, त्याचे चित्र बनवले आहे, ज्यावर बाबा समजावून सांगतात. तुम्हा मुलांना असा
सूक्ष्म वतनवासी फरिश्ता बनायचे आहे. फरिश्ते हाडा-मासाविना असतात. म्हणतात ना -
दधिचि ऋषींनी हाडे सुद्धा दिली. बाकी शंकराचे गायन तर कुठेच नाहीये.
ब्रह्मा-विष्णूचे मंदिर आहे. शंकराचे काहीच नाहीये. तर त्यांना लावले आहे विनाशासाठी.
बाकी असा काही नेत्र उघडून विनाश करत नाहीत. देवता मग हिंसक काम कसे करतील. ना ते
करत, ना शिवबाबा असे डायरेक्शन देत. डायरेक्शन देणाऱ्यावर देखील येते ना. बोलणाराच
फसतो. ते तर शिव-शंकराला एकच आहेत असे म्हणतात. आता बाबा देखील म्हणतात माझी आठवण
करा, मामेकम् (मज एकाची) आठवण करा. असे तर म्हणत नाहीत की शिव-शंकराची आठवण करा.
पतित पावन एकालाच म्हणतात. ईश्वर बसून अर्था सहित समजावून सांगतात, हे कोणीही जाणत
नाही त्यामुळे हे चित्र पाहून गोंधळून जातात. अर्थ तर जरूर सांगावा लागेल ना.
समजण्यासाठी वेळ लागतो. कोटींमध्ये कोणी विरळा निघतो. मी जो आहे, जसा आहे,
कोटींमध्ये कोणीच मला ओळखू शकतात. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) कोणत्याही
गोष्टीच्या चिंतनामध्ये आपला वेळ वाया घालवायचा नाही. आपल्याच मस्तीमध्ये रहायचे आहे.
स्वयंप्रति चिंतन करून आत्म्याला सतोप्रधान बनवायचे आहे.
२) नरापासून नारायण
बनण्यासाठी अंतिम समयी एका बाबांचीच आठवण रहावी. या सर्वोच्च युक्तीला समोर ठेऊन
पुरुषार्थ करायचा आहे - मी आत्मा आहे. या शरीराला विसरून जायचे आहे.
वरदान:-
दात्याच्या
देणगीला लक्षात ठेवून सर्व आकर्षणांपासून मुक्त राहणारे, आकर्षण मुक्त भव
बरीच मुले म्हणतात की
यांच्या विषयी मला कोणते आकर्षण नाही आहे, परंतु यांचा हा गुण खूप चांगला आहे किंवा
यांच्यामध्ये सेवेची विशेषता खूप चांगली आहे. परंतु कोणत्या व्यक्ती अथवा संपत्तीकडे
वारंवार संकल्प जाणे हा देखील मोह आहे. कोणाचीही विशेषता पाहून, गुणांना अथवा सेवेला
पाहून दात्याला विसरू नका. ही दात्याची देणगी आहे - ही स्मृती मोहापासून मुक्त,
आकर्षण-मुक्त बनवेल. तुम्ही कोणावरही प्रभावित होणार नाही.
बोधवाक्य:-
असे रुहानी
सोशल वर्कर बना जे भटकणाऱ्या आत्म्यांना ठिकाणा द्याल, भगवंताशी भेट घालून द्याल.