30-10-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुम्हाला आता अतिशय साधेपणाने रहायचे आहे, फॅशनेबल उंची कपडे घातल्याने देखील देह-अभिमान येतो”

प्रश्न:-
जर भाग्यात उच्च पद नसेल तर कोणत्या गोष्टीमध्ये मुले आळशीपणा करतात?

उत्तर:-
बाबा म्हणतात - मुलांनो, स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी चार्ट ठेवा. आठवणीचा चार्ट ठेवण्यामध्ये खूप फायदा आहे. नोटबुक नेहमी हातामध्ये असावे. चेक कराल, किती वेळ बाबांची आठवण केली? माझे रजिस्टर कसे आहे? दैवी कॅरेक्टर (चरित्र) आहे का? कर्म करताना बाबांची आठवण राहते का? आठवणीनेच कट (गंज) उतरेल, श्रेष्ठ भाग्य बनेल.

गीत:-
भोलेनाथ से निराला…

ओम शांती।
गोड-गोड मुलांच्या घरामध्ये हे लक्ष्मी-नारायणाचे चित्र जरूर असायला हवे. यांना (लक्ष्मी-नारायणाला) पाहून खूप आनंद झाला पाहिजे कारण हे आहे तुमच्या शिक्षणाचे एम ऑब्जेक्ट. तुम्ही जाणता आपण स्टुडंट आहोत आणि स्वयं ईश्वर शिकवत आहेत. ईश्वरीय स्टुडंट अथवा विद्यार्थी आहोत, आम्ही हे शिकत आहोत. सर्वांसाठी हे एकच ध्येय आहे. यांना पाहून खूप आनंद झाला पाहिजे. गाणे देखील मुलांनी ऐकले. खूप भोलानाथ आहेत. कोणी-कोणी शंकराला भोलेनाथ समजतात तर मग शिव आणि शंकराला एकत्र करतात. आता तुम्ही जाणता ते शिव उच्च ते उच्च भगवान आहेत आणि शंकर देवता आहे, मग दोघे एक कसे असू शकतील. हे देखील गाण्यामध्ये ऐकले की भक्तांची रक्षा करणारा, जरूर भक्तांवर काही आपत्ती ओढवली आहे. ५ विचारांची आपत्ती सर्वांवर आहे. भक्त देखील सगळेच आहेत. ज्ञानी कोणालाही म्हटले जाऊ शकत नाही. ज्ञान आणि भक्ती बिलकुल वेगळ्या गोष्टी आहेत. जसे शिव आणि शंकर वेगळे आहेत. जेव्हा ज्ञान मिळते तर मग भक्ती राहत नाही. तुम्ही सुखधामचे मालक बनता. अर्ध्या कल्पासाठी सद्गती मिळते. एकाच इशाऱ्याने तुम्ही अर्धा कल्प वारसा प्राप्त करता. बघता भक्तांना किती त्रास आहे. ज्ञानाद्वारे तुम्ही देवता बनता मग जेव्हा भक्तांवर संकटे येतात अर्थात दुःखी होतात तेव्हा बाबा येतात. बाबा समजावून सांगतात ड्रामा अनुसार जे पास्ट झाले ते पुन्हा रिपीट होणार आहे. मग भक्ती सुरू होते तेव्हा वाममार्ग सुरू होतो अर्थात पतित बनण्याचा मार्ग. त्यामध्ये देखील नंबर वन आहे काम विकार, ज्याच्यासाठीच म्हटले जाते काम विकारावर विजय प्राप्त केल्याने तुम्ही जगतजीत बनाल. ते (दुनियावाले) काही विजय थोडाच मिळवतात. रावण राज्यामध्ये विकारा शिवाय तर कोणाचेही शरीर जन्माला येत नाही, सतयुगामध्ये रावण राज्य असत नाही. तिथे (स्वर्गामध्ये) देखील जर रावण असता तर बाकी मग ईश्वराने रामराज्य स्थापन करून काय केले? बाबांना किती काळजी असते. माझी मुले सुखी राहावीत. धन कमावून मुलांना देतात की सुखी रहा. परंतु इथे तर असे होऊ शकत नाही. ही आहे दुःखाची दुनिया. हे बेहदचे बाबा म्हणतात - तुम्ही तिथे जन्म-जन्मांतर सुख भोगत याल. अथाह धन मिळते, २१ जन्म तिथे कोणतेही दुःख असणार नाही. दिवाळे निघणार नाही. या गोष्टी बुद्धीमध्ये धारण करून आंतरिक अत्यानंद झाला पाहिजे. तुमचे ज्ञान आणि योग सर्व गुप्त आहे. स्थूल हत्यार इत्यादी काहीच नाहीये. बाबा समजावून सांगतात ही आहे ज्ञान तलवार. त्यांनी मग प्रतीक म्हणून देवींना स्थूल हत्यारे दिली आहेत. शास्त्र इत्यादी जे वाचतात ते लोक कधी असे म्हणत नाहीत की, ही ज्ञान तलवार आहे, हे ज्ञान खड्ग आहे. हे बेहदचे बाबाच बसून समजावून सांगतात. ते समजतात शक्तीसेनेने विजय मिळवला आहे तर जरूर कोणती हत्यारे असतील. बाबा येऊन या सर्व चुका सांगतात. ही तुमची गोष्ट पुष्कळ लोक ऐकतील. विद्वान इत्यादी देखील एक दिवस येतील. बेहदचे बाबा आहेत ना. तुम्हा मुलांचे श्रीमतावर चालण्यातच कल्याण आहे तेव्हाच देह-अभिमान तुटेल, म्हणून श्रीमंत लोक येतच नाहीत. बाबा म्हणतात - देह अहंकाराला सोडा. भारी कपडे इत्यादीचा देखील नशा असतो. तुम्ही आता वनवासामध्ये आहात ना. आता सासरी जात आहात. तिथे तुम्हाला खूप दाग-दागिने घालतील. इथे उंची कपडे घालायचे नाहीत. बाबा म्हणतात अगदी साधेपणाने रहायचे आहे. जसे कर्म मी करतो, मुलांना देखील साधेपणाने रहायचे आहे. नाही तर देहाचा अभिमान येतो. त्या सर्व गोष्टी खूप नुकसान करतात. तुम्ही जाणता आम्ही सासरी जात आहोत. तिथे आम्हाला खूप दागिने मिळतील. इथे तुम्हाला दागिने इत्यादी घालायचे नाहीयेत. आज-काल चोरी इत्यादी किती होते. रस्त्यामध्येच डाकू लुटतात. दिवसेंदिवस हा गोंधळ इत्यादी जास्तच वाढत जाईल म्हणून बाबा म्हणतात - स्वतःला आत्मा समजून माझी आठवण करा. देह-अभिमानामध्ये आल्याने बाबांना विसरून जाल. ही मेहनत आत्ताच करायला मिळते. नंतर भक्ती मार्गामध्ये कधी ही मेहनत करायला मिळत नाही.

आता तुम्ही संगमावर आहात. तुम्ही जाणता बाबा येतातच पुरुषोत्तम संगमयुगावर. युद्ध देखील जरूर होईल. अणुबॉम्ब इत्यादी खूप बनवत राहतात. कितीही डोके आपटा की हे आता बंद व्हावे परंतु असे होऊ शकत नाही. ड्रामामध्ये नोंदलेले आहे. सांगून सुद्धा समजणार नाहीत. मृत्यू होणारच आहेत तर बंद कसे होईल. समजतात देखील तरीही बंद करणार नाहीत. ड्रामामध्ये नोंदलेले आहे. यादव आणि कौरवांना खलास व्हायचेच आहे. यादव आहेत - युरोपवासी. त्यांची आहे विज्ञानाची घमेंड, ज्यामुळे विनाश होतो. मग विजय होतो सायलेन्स घमेंडीचा. तुम्हाला शांतीच्या घमेंडीमध्ये रहायला (शांत स्वरूप मध्ये रहायला) शिकवले जाते. बाबांची आठवण करा - डेड सायलेन्स. मी आत्मा शरीरापासून न्यारी आहे. जणू शरीर सोडण्यासाठी आपण पुरुषार्थ करतो, असा कधी कोणी शरीर सोडण्यासाठी पुरुषार्थ करतात का? सर्व दुनिया शोधून या - असा कोणी आहे जो बोलेल - ‘हे आत्मा, आता तुला हे शरीर सोडून जायचे आहे’. पवित्र बना. नाही तर मग शिक्षा भोगावी लागेल. शिक्षा कोण भोगते? आत्मा. त्यावेळी साक्षात्कार होतो. तू ही-ही पापे केली आहेस, आता खा सजा. त्यावेळी फील होते (जाणीव होते). जशी काही अनेक जन्म सजा भोगत आहे. इतके दुःख भोगून, बाकी मग सुखाचा बॅलन्स तो काय राहिला. बाबा म्हणतात - आता कोणतेही पापकर्म करू नका. आपले रजिस्टर ठेवा. प्रत्येक शाळेत वर्तणुकीचे रजिस्टर ठेवतात ना. एज्युकेशन मिनिस्टर देखील म्हणतील - भारताचे कॅरॅक्टर (चारित्र्य) चांगले नाही आहे. बोला - आम्ही या लक्ष्मी-नारायणासारखे कॅरॅक्टर्स बनवितो. हे लक्ष्मी-नारायणाचे चित्र तर कायम सोबत असले पाहिजे. हे आहे एम ऑब्जेक्ट. आम्ही असे बनतो. या आदि सनातन देवी-देवता धर्माची आम्ही स्थापना करत आहोत श्रीमतावर. इथे चाल-चलन (वर्तन) सुधारले जाते. तुमची इथे कचेरी देखील होते. सर्व सेंटर्सवर मुलांना कचेरी केली पाहिजे. रोजचा चार्ट ठेवायला सांगा तर सुधारणा होईल. कोणाच्या नशिबात नसेल तर मग आळस करतात. चार्ट ठेवणे खूप चांगले आहे.

तुम्ही जाणता आम्ही या ८४ च्या चक्राला जाणल्यानेच चक्रवर्ती राजा बनतो. किती सोपे आहे आणि मग पवित्र देखील बनायचे आहे. आठवणीच्या यात्रेचा चार्ट ठेवा, यामध्ये तुमचा खूप फायदा आहे. नोटबुक काढले नाही तर समजा - बाबांची आठवण केली नाही. नोटबुक कायम हातात ठेवा. आपला चार्ट बघा - किती वेळ बाबांची आठवण केली. आठवणी शिवाय गंज उतरू शकणार नाही. गंज निघण्यासाठी वस्तू घासलेट मध्ये ठेवतात ना. कर्म करताना देखील बाबांची आठवण करायची आहे तर पुरुषार्थाचे फळ मिळेल. मेहनत आहे ना. असाच थोडाच ताज डोक्यावर ठेवतील. बाबा इतके उच्च पद देतात, काहीतरी मेहनत तर करायची आहे. यामध्ये हात-पाय इत्यादी काहीही चालवायचे नाही आहेत. अभ्यास तर अगदी सोपा आहे. बुद्धीमध्ये आहे शिवबाबांकडून ब्रह्मा द्वारे आम्ही हे बनत आहोत. कुठेही जाता तर बॅज लावलेला असावा. बोला, वास्तविक कोट ऑफ आर्मस (राजमुद्रा) हे आहे. समजावून सांगण्यासाठी खूप रॉयल्टी (विनम्रता) पाहिजे. अतिशय मधुरपणे सर्वांना समजावून सांगायचे आहे. कोट ऑफ आर्मस (राजमुद्रा) यावर देखील समजावून सांगायचे आहे. प्रीत बुद्धी आणि विपरीत बुद्धी कोणाला म्हटले जाते? तुम्ही पित्याला जाणता का? लौकिक पित्याला काही गॉड तर म्हणणार नाही. ते बेहदचे बाबाच पतित-पावन सुखाचा सागर आहेत. त्यांच्याकडूनच भरभरून सुख मिळते. अज्ञान काळामध्ये असे समजावतात की, आई-वडील देतात. सासरी पाठवतात. आता तुमचे आहे बेहदचे सासर. ते आहे हदचे. ते आई-वडील फारफार तर ५-७ लाख, कोटी देतील. तुमचे तर बाबांनी नाव ठेवले आहे - पद्मा-पदमपती बनणारी मुले. तिथे तर पैशांचा प्रश्नच नसतो. सर्व काही मिळते. खूप सुंदर-सुंदर महाल असतात. जन्म-जन्मांतरासाठी तुम्हाला महाल मिळतात. सुदाम्याचे उदाहरण आहे ना. मूठभर तांदूळ दिल्याचे ऐकले आहे तर इथे देखील घेऊन येतात. आता सुका भात थोडाच खाणार. तर त्यासोबत काही मसाले इत्यादी देखील घेऊन येतात. किती प्रेमाने घेऊन येतात. बाबा तर आम्हाला जन्म-जन्मांतरासाठी देतात म्हणून म्हटले जाते - दाता. भक्तीमार्गामध्ये तुम्ही ईश्वर अर्थ अल्पकाळासाठी देता तर दुसऱ्या जन्मामध्ये मिळते. कोणी गरिबांना देतात, कॉलेज बनवतात तर दुसऱ्या जन्मामध्ये उच्च शिक्षणाचे दान मिळते. धर्मशाळा बनवतात तर घर मिळते कारण धर्मशाळेमध्ये पुष्कळ लोक येतात तर आनंद मिळवतात. ही तर जन्म-जन्मांतरीची गोष्ट आहे. तुम्ही जाणता - शिवबाबांना जे देतात ते सर्व आमच्याच कामासाठी बाबा वापरतात. शिवबाबा काही स्वतःजवळ ठेवत नाहीत. यांना (ब्रह्मा बाबांना) देखील म्हटले - ‘सर्व काही देऊन टाक तर विश्वाचा मालक बनशील’. विनाशाचा साक्षात्कार देखील घडवला, राजाईचा साक्षात्कार देखील घडवला. बस्स, नशा चढला. बाबा, मला विश्वाचा मालक बनवत आहेत. गीतेमध्ये देखील आहे अर्जुनाला साक्षात्कार घडवला. माझी आठवण कर तर तू हे बनशील. विनाश आणि स्थापनेचा साक्षात्कार घडवला. तर याला (ब्रह्मा बाबांना) देखील आनंदाचा पारा चढला. ड्रामामध्ये हा पार्ट होता. भागीरथाला कोणी जाणतात थोडेच. तर तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये हे एम ऑब्जेक्ट राहिले पाहिजे. आपण हे बनत आहोत. जितका पुरुषार्थ कराल तितके उच्च पद प्राप्त कराल. गायले जाते फॉलो फादर. यावेळची गोष्ट आहे. बाबा म्हणतात - मी जो सल्ला देतो त्यावर फॉलो करा. याने (ब्रह्मा बाबांनी) काय केले ते देखील सांगतात. त्यांना सौदागर, रत्नाकर, जादूगार म्हणतात ना. बाबांनी अचानकच सर्व काही सोडून दिले. आधी त्या रत्नांचा सोनार होता, आता अविनाशी ज्ञान रत्नांचा सोनार बनला आहे. नरकाला स्वर्ग बनविणे किती मोठी जादू आहे. मग सौदागर सुद्धा आहेत. मुलांना किती चांगला सौदा देतात. कखपण (अवगुण रुपी) मुठभर तांदूळ घेऊन महाल देतात. किती चांगली कमाई करून देणारे आहेत. हिऱ्यांच्या व्यापारामध्ये देखील असे होते. कोणी अमेरिकन ग्राहक येतो तर त्याच्याकडून शंभराच्या वस्तूचे ५००, १००० सुद्धा घेतील. त्यांच्याकडून तर खूप पैसे घेतात. तुमच्याकडे तर सर्वात जुनी चीज आहे - प्राचीन योग.

तुम्हाला आता भोलेनाथ बाबा मिळाले आहेत. किती भोळे आहेत. तुम्हाला काय बनवतात कखपणाच्या (अवगुणाच्या) बदल्यात तुम्हाला २१ जन्मांसाठी काय बनवतात. लोकांना काहीच ठाऊक नाही आहे. कधी म्हणतील भोलेनाथने हे दिले, कधी म्हणतील अंबेने दिले, गुरुने दिले. इथे तर आहे अभ्यास. तुम्ही ईश्वरी पाठशाळेमध्ये बसला आहात. ईश्वरीय पाठशाळा म्हणणार गीतेला. गीतेमध्ये आहे - भगवानुवाच. परंतु हे देखील कोणाला माहित नाही आहे की भगवान कोणाला म्हटले जाते. कोणालाही विचारा परमपिता परमात्म्याला जाणता का? बाबा आहेत बागवान (माळी). तुम्हाला काट्यांपासून फूल बनवत आहेत. त्याला गार्डन ऑफ अल्लाह म्हणतात. युरोपियन लोक देखील म्हणतात पॅराडाईज. खरोखर भारत परिस्तान होता, आता कब्रस्तान आहे. आता पुन्हा तुम्ही परिस्तानचे मालक बनता. बाबा येऊन झोपलेल्यांना जागे करतात. हे देखील तुम्ही जाणता नंबरवार पुरुषार्थानुसार. जे स्वतः जागे होतात तर ते दुसऱ्यांना देखील जागे करतात. जर जागे करत नसतील तर जणू स्वतः जागा झालेला नाही आहे. तर बाबा म्हणतात - ही गाणी इत्यादींची देखील ड्रामामध्ये नोंद आहे. काही गाणी खूप चांगली आहेत. जेव्हा तुम्ही उदास होता तेव्हा ही गाणी चालू करा तर आनंदामध्ये याल. ‘रात के राही थक मत जाना’ - हे देखील गाणे चांगले आहे. आता रात्र पूर्ण होत आहे. मनुष्य समजतात जितकी भक्ती करू तितका भगवान लवकर भेटेल. हनुमान इत्यादीचा साक्षात्कार झाला तर समजतात भगवान भेटला. बाबा म्हणतात - हे साक्षात्कार इत्यादी सर्वांची ड्रामामध्ये नोंद आहे. जी भावना ठेवतात त्याचा साक्षात्कार होतो. बाकी असे कोणी असत नाही. बाबांनी सांगितले आहे हे बॅज तर सर्वांनी नेहमी लावलेले असावेत. तऱ्हे-तऱ्हेचे बनत असतात. समजावून सांगण्याकरिता हे खूप चांगले आहेत.

तुम्ही रुहानी मिलेट्री आहात ना. मिलेट्रीचे नेहमी एक चिन्ह असते. तुम्हा मुलांना देखील हे बॅज लावल्याने नशा राहील - आम्ही हे बनत आहोत. आम्ही स्टुडंट आहोत. बाबा आम्हाला मनुष्यापासून देवता बनवत आहेत. मनुष्य देवतांची पूजा करतात. देवता काही देवतांची पूजा करणार नाहीत. इथे मनुष्य देवतांची पूजा करतात कारण ते श्रेष्ठ आहेत. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) बुद्धीमध्ये नेहमी आपले एम ऑब्जेक्ट लक्षात ठेवायचे आहे. लक्ष्मी-नारायणाचे चित्र नेहमीच सोबत असावे, नेहमी याच आनंदामध्ये राहा की आम्ही असे बनण्याकरिता शिकत आहोत, आता आम्ही गॉडली स्टुडंट आहोत.

२) आपले जुने कखपण (अवगुण रुपी) मुठभर तांदूळ देऊन महाल घ्यायचे आहेत. ब्रह्मा बाबांना फॉलो करून अविनाशी ज्ञान रत्नांचा सोनार बनायचे आहे.

वरदान:-
निश्चयाच्या आधारावर विजयी रत्न बनून सर्वांप्रती मास्टर सहारे दाता भव

निश्चय-बुद्धी मुले विजयी असल्याकारणाने नेहमी आनंदामध्ये नाचत असतात. ते आपल्या विजयाचे वर्णन करत नाहीत परंतु विजयी असल्याकारणाने ते दुसऱ्यांची देखील हिंमत वाढवतात. कोणालाही कमी दाखवण्याचा प्रयत्न करत नाहीत. परंतु बाप समान मास्टर सहारे दाता बनतात अर्थात नीच असणाऱ्याला उच्च पातळीवर नेतात. व्यर्थ पासून नेहमी दूर राहतात. व्यर्थ पासून दूर होणे म्हणजेच विजयी बनणे आहे. अशी विजयी मुले सर्वांसाठी मास्टर सहारे दाता बनतात.

बोधवाक्य:-
नि:स्वार्थ आणि निर्विकल्प स्थितीद्वारे सेवा करणारेच सफलता मूर्त आहेत.

अव्यक्त इशारे:- स्वयं प्रति आणि सर्वांप्रती मनसा द्वारे योगाच्या शक्तींचा प्रयोग करा. योगाचा प्रयोग करण्यासाठी दृष्टी-वृत्तीमध्ये देखील पवित्रतेला अजून अंडरलाईन करा. मुख्य फाउंडेशन आपल्या संकल्पाला शुद्ध, ज्ञान स्वरूप, शक्ती स्वरूप बनवा. कोणी कितीही हरलेला असेल, त्रासलेला असेल, दुःखाच्या प्रभावामध्ये असेल, आनंदामध्ये राहणे असंभव समजत असेल परंतु तुमच्या समोर येताच तुमची मूर्ती, तुमची वृत्ती, तुमची दृष्टी आत्म्याला परिवर्तन करेल. हाच आहे योगाचा प्रयोग.